Bharat Jodo Yatra | भारत जोडो यात्रेला १०० दिवस पूर्ण झाल्या निमित्ताने पुण्यात प्रतिकात्मक पदयात्रा

Categories
Breaking News Political social देश/विदेश पुणे महाराष्ट्र

भारत जोडो यात्रेला १०० दिवस पूर्ण झाल्या निमित्ताने पुण्यात प्रतिकात्मक पदयात्रा

भारत जोडो यात्रेला (Bharat Jodo Yatra) १०० दिवस पुर्ण झाले त्या निमित्ताने भारत जोडो यात्रा समिती, पुणे तर्फे पुण्यात सकाळी ८ ते १० या वेळेत प्रतिकात्मक पदयात्रा (symbolic walk) काढण्यात आली. भारताला जोडणाऱ्या महात्मा गांधींचे (Mahatma Gandhi) राजकीय गुरू गोपाळ कृष्ण गोखले (Gopal Krishna Gokhale) यांच्या पुतळ्याला हार घालून पदयात्रेची सुरूवात करण्यात आली. या पदयात्रेचे प्रास्ताविक करताना ॲड. अभय छाजेड म्हणाले की, ‘‘भारत जोडो यात्रा देश जोडणारी यात्रा असून ही यात्रा काश्मीर मध्ये पोहोचल्यानंतर देशातील राजकीय वातावरण पूर्णपणे बदलेले असेल. राहुल गांधीजींच्या भारत जोडो यात्रेचा जो देश हिताचा उद्देश आहे, त्या प्रयत्नांना साथ देण्यासाठी आम्ही ही पदयात्रा काढीत आहोत.’’

      यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते व कायदेतज्ञ ॲड. असिम सरोदे म्हणाले की, ‘‘देशातील विभाजनकारी शक्तींना प्रेम, सत्य, अहिंसेच्या मार्गाने हरविले जाऊ शकते हा या यात्रेचा संदेश आहे. भारत जोडोमुळे अनेक लोक एकत्र आली. काँग्रेस पक्षाला लोक जोडली जातील का? याचा विचार न करता राहुल गांधी आज चालत आहेत यामुळे लोक त्यांच्याकडे आर्कषली जात आहेत. भारत जोडो यात्रेमुळे देशाची लोकशाही मजबूत होईल अशी खात्री राहुलजी गांधी यांना आहे.’’

      यानंतर सामाजिक कार्यकर्ते विश्वभंर चौधरी यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. ते म्हणाले की, ‘‘गेल्या आठ वर्षात समाजात, जातीजातीत, धर्माधर्मात व्देष, तेढ निर्माण करून देशातील वातावरण दूषित करण्यात आले  आहे. हे प्रयास आजही सुरू आहे. अशा वातावरणात देशाला धर्मनिरपेक्षतेच्या सूत्रात पुन्हा एकत्र बांधण्याचे काम महात्मा गांधींचे आचार विचार करू शकत होते. गेले शंभर दिवस कन्याकुमारी पासून सुरू केलेल्या भारत जोडो यात्रेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ते ठळकपणे अधोरेखीत केले आहे. त्यामुळे या यात्रेमुळे म. गांधींनी दाखवलेल्या धर्मनिरपेक्षतेचा मार्ग काँग्रेसला पुन्हा एकदा गवसला आहे.’’

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यावेळी म्हणाले की, ‘‘सत्तारूढ हे धर्मा धर्मांमध्ये तेढ निर्माण करणे, महिलांचा सन्मान न करणे, महापुरूषांचा वारंवार अपमान करणे, संविधानाचा न पाळण्याचे काम आत्ताचे सत्ताधारी करीत आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या हे ईडीचे मुख्य कार्यकारी असल्यासारखे वागत आहे. या सत्ताधारी पक्षाने लाजलज्जा सोडली आहे म्हणून आम्ही भारत जोडो म्हणत आहोत’’

      महागाई, बेरोजगारीच्या विरोधात निघालेल्या या यात्रेचा संदेश घराघरापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आपली आहे असे लोकायतच्या अलका जोशी म्हणाल्या.

      तिरंगा झेंड्याखाली निघालेल्या या पदयात्रेचा समारोप पोलिस ग्राउंड येथे करण्यात आला. संपूर्ण पदयात्रे दरम्यान ‘महागाईशी नाते तोडा, भारत जोडा‘ या व इतर घोषणांनी, रंग दे बसंती‘ , ‘हम होंगे कामयाब‘ या गाण्यांनी फर्ग्युसन कॉलेज रोडवर जोशपूर्ण वातावरण तयार झाले होते.

      समारोप करताना पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी युक्रांदचे संदीप बर्वे, काँग्रसचे दत्ता बहिरट यांनी मनोगत व्यक्त केले.

या पदयात्रेत गोपाळ कृष्ण गोखले यांची नात शर्मिष्ठा खेरे, युवराज शाह, निरज जैन, संगिता तिवारी, रजनी त्रिभुवन, रफिक शेख, जाबुंवत मनोहर, ॲड. अनिल कांकरीया, गोपाळ तिवारी, रविंद्र म्हसकर, संदीप मोकाटे, विनय ढेरे, विजय खळदकर, अजित जाधव, अविनाश गोतारणे, रमेश सोनकांबळे, रविंद्र आरडे, हेमंत राजभोज, जयकुमार ठोंबरे, विनोद रणपिसे, गुलाम खान, चैतन्य पुरदंरे, भगवान कडू, अशोक गेलोत, शिलार रतनगिरी, सुनिल शिंदे, आबा जगताप, सोमेश्वर बालगुडे, प्रसन्न मोरे, राजेंद्र भूतडा, विश्वास दिघे, सुंदरा ओव्हाळ, शर्वरी गोतारणे, रजिया बल्लारी इ. तसेच लोकायत व युक्रांतचे कार्यकर्ते सहभागी होते.

Dr. Ganesh Devi | ‘भारत जोडो’मुळे सामाजिक ऐक्य, सलोखा वाढेल : डॉ. गणेश देवी

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

‘भारत जोडो’मुळे सामाजिक ऐक्य, सलोखा वाढेल : डॉ. गणेश देवी

– अठराव्या सेवा कर्तव्य त्याग सप्ताहांतर्गत ‘भारत जोडो’ महाराष्ट्रातील यात्रेच्या छायाचित्रांचे तीन दिवसीय प्रदर्शन

पुणे : “राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी १०२ वर्षांपूर्वी देशभर झपाटून प्रवास केला. हजारो अनुयायांना स्वातंत्र्यसंग्रामात आणले. आज राहुल गांधी (Rahul Gandhi) भारत जोडो यात्रेतून (Bharat Jodo Yatra) तितक्याच झपाट्याने प्रवास करताहेत. देशातील द्वेष संपवून समाजाला जोडण्याचे काम राहुल गांधी करत आहेत. भारत जोडो यात्रेमुळे सामाजिक ऐक्य, सलोखा वाढेल. तसेच सामाजिक, राजकीय व अध्यात्मिक उद्देशाने निघालेल्या ‘भारत जोडो’ यात्रेतुन काँग्रेसही उभारी घेईल,” असे प्रतिपादन ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी (Dr Ganesh Devi) यांनी केले.

श्रीमती सोनिया गांधी (Soniya Gandhi) यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित १८ व्या सेवा कर्तव्य त्याग सप्ताहांतर्गत महाराष्ट्रातील ‘भारत जोडो’ पदयात्रेतील छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. देवी यांच्या हस्ते झाले. बालगंधर्व कलादालनात हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. येत्या शुक्रवारपर्यंत (दि. ९) सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी (Fomer MLA Mohan Joshi) होते. यावेळी सौ. देवी, शिक्षक मतदारसंघाचे आमदार जयंत आसगावर, माजी मंत्री रमेश बागवे, शेतकरी नेते गजानन अमदाबादकर, राजस्थान काँग्रेसचे नेते जुगल प्रजापती, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस वीरेंद्र किराड, दत्ता बहिरट, चंद्रशेखर कपोते, रमेश अय्यर, चेतन अगरवाल, प्रशांत सुरसे, आयुब पठाण, प्रथमेश आबनावे, पुष्कर आबनावे आदी उपस्थित होते.

डॉ. गणेश देवी म्हणाले, “महात्मा गांधींचा जो झंजावात होता, तोच झंझावात राहुल गांधींच्या यात्रेत दिसत आहे. आपल्या हातून झालेल्या चुकांचा पश्चाताप करण्याची ही वेळ आहे. मात्र, या कठोर तपश्चर्येतून समाजातील तणाव, दुरावा दूर करून समाज व देशाला एकसंध ठेवण्याचा प्रयत्न राहुल गांधी करत आहेत. भाजपच्या धोरणामुळे समाज विभागाला जात आहे. हे थांबवण्यासाठी द्वेषमुक्तीचा हा लढा अधिक विस्तृत व्हायला हवा. त्यासाठी भारत जोडो यात्रेत प्रत्येक भारतीयाने सहभागी व्हावे. आजचा अंधार दूर करून उद्याची पहाट उजाडणार, हा आशावाद या यात्रेने दिला आहे.”

प्रास्ताविकात मोहन जोशी म्हणाले, “देशाच्या इतिहासात ‘भारत जोडो’ यात्रा एक महत्त्वाची घटना आहे. दोन आठवडे ही यात्रा महाराष्ट्रातून गेली. या देदीप्यमान यात्रेत अनेकांना सहभागी होता आले नाही. त्यामुळे या छायाचित्र प्रदर्शनातून ही यात्रा पुणेकरांना अनुभवता येईल. निवडक २०० छायाचित्रातून ही चित्ररूपीयात्रा साकारली आहे.”

जयंत आसगावकर म्हणाले, “मोहन जोशी यांच्या प्रयत्नातून सुरु असलेल्या या सप्ताहाचे सातत्य खूप महत्वाचे आहे. राहुल गांधी झपाट्याने काम करताहेत. द्वेषभावना संपवण्याचे ध्येय घेऊन चालत आहेत. यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अधिक लोकांनी यात सहभागी होऊन एकजूट दाखवावी. यातून तरुण कार्यकर्त्यांनाही प्रोत्साहन मिळत आहे.”

गजानन आमदाबादकर म्हणाले, “राहुल गांधींची भारत जोडो यात्रा भविष्याची नांदी आहे. शेतकरी या देशाचे चित्र बदलू शकतो. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राहुल गांधी प्रयत्न करताहेत. त्यांच्याशी संवाद साधून त्यांचे म्हणणे ऐकून घेताहेत. त्यामुळे शेतकरी या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले. आपल्या मुलांच्या मनात द्वेष पसरवण्याचे काम होतेय, हे थांबले पाहिजे.”

अजित जाधव यांनी सूत्रसंचालन केले. प्रथमेश आबनावे यांनी आभार मानले.

Bharat Jodo Yatra | भारत जोडो यात्रेसाठी पुण्यातील शक्ती स्थळांवरून मातीचे संकलन |पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचा उपक्रम

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

भारत जोडो यात्रेसाठी पुण्यातील शक्ती स्थळांवरून मातीचे संकलन

|पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचा उपक्रम

काँग्रेस नेते  खा. राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो यात्रेसाठी पुणे शहरातील शक्तीस्थळांवरील मातीचे संकलन आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व जिल्ह्याचे भारत जोडो यात्रेचे समन्वयक ॲड. अभय छाजेड यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

पुणे शहरातील ऐतिहासिक व भारतीय स्वातंत्र्य लढ्याशी सबंधित शक्ती स्थळांवरील माती सकंलन आज करण्यात आले. पुणे शहर हे ऐतिहासिक वारसा असलेले शहर असून छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी असलेल्या पुण्यातील लाल महालातून माती संकलन करण्यात आले. त्यानंतर काँग्रेस भवन हे देखील स्वातंत्र्य पूर्व काळातील एक अग्रगण्य स्थान असून १९४२ च्या चले जाव चळवळीमध्ये याच ठिकाणी देशातील पहिला हुतात्मा नारायण दाभाडे हे होते. आद्य क्रांतीकारक उमाजीराजे नाईक यांना इंग्रजांनी ज्या ठिकाणी फाशी दिली त्या मामलेदार कचेरी येथील त्यांच्या स्मारकातून माती संकलन केले. स्वातंत्र्यपूर्व काळात समाज सुधारणेबरोबरच स्वातंत्र्याचे महत्व ज्यांनी पटवून दिले व स्त्री शिक्षणाचा पाया ज्यांनी रचला अशा महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या ऐतिहासिक समाधी स्थळावरून (समताभूमी) येथून मातीचे संकलन केले. महात्मा गांधीजींचे गुरू ना. गोपाळकृष्ण गोखले यांच्या राहत्या घरातून म्हणजेच गोखले इन्स्टिट्यूट गोखले स्मारक येथून माती संकलनीत करण्यात आली. भारतीय स्वातंत्र्याचे जहाल नेते लोकमान्य बाल गंगाधर टिळक यांचे पुणे येथील राहते घर या ठिकाणाहून देखील माती संकलित करण्यात आली. आद्य क्रांतीगुरू वीर लहुजी वस्ताद साळवे यांचे संगमंवाडी स्मारकाची माती संकलित करण्यात आली. छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी असलेले, तानाजी मालुसरे यांच्या बलिदानाने पावन झालेल्या सिंहगडावून, छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक वढू ब्रु. येथून व भीमा कोरोगाव येथील विजय स्तंभ येथून व तळेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानातून मातीचे संकलन केले गेले.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस उपाध्यक्ष संगीता तिवारी, सुजित यादव, सचिन आडेकर, सुनिल शिंदे, विजय खळदकर, अजित जाधव, रजनी त्रिभुवन, शिलार रतनगिरी, राहुल तायडे, राकेश त्रिभुवन, ऋषीकेश बालगुडे, अमर गायकवाड, रवि आरडे, हरिदास अडसूळ, दत्ता जाधव, योगेश बोर्डे इत्यादींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.