Pune Municipal Corporation | पुणे महापालिकेत फसवणुकीचा नवा फंडा!

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune Municipal Corporation | पुणे महापालिकेत फसवणुकीचा नवा फंडा!

| अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सतर्क राहण्याचे कामगार कल्याण आणि सुरक्षा विभागाचे आवाहन

Pune Municipal Corporation | पुणे | पुणे महापालिकेत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना (PMC Employees and Officers) फसवण्याचे नवीन प्रकार समोर येत आहेत. हे फक्त महापालिका भवन (PMC Building) मधेच नाही तर क्षेत्रीय कार्यालयात (PMC Ward Offices) देखील अशाच गोष्टी घडताना दिसत आहेत. विशेष म्हणजे हे काम नागरिकांकडूनच होताना दिसत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन महापालिकेच्या कामगार कल्याण (PMC Chief Labour Welfare Department) आणि सुरक्षा विभागाकडून (PMC Security Department) करण्यात आले आहे. (PMC Pune)
वेगवेगळ्या कामानिमित्त नागरिक महापालिकेच्या विविध विभागात येत राहतात. महापालिकेच्या सर्व गेटवर नागरिकांना पास देऊनच आत पाठवले जाते. असे असले तरी काही नागरिक मात्र खोडसाळपणा करत असल्याचे दिसून येत आहे. काही नागरिक आपल्या वृद्धपणाचा फायदा घेत आहेत. शुक्रवारी आणि त्याआधी देखील अशा फसवणुकीला खुद्द मुख्य कामगार कल्याण अधिकारी अरुण खिलारी (PMC Chief Labour Welfare Officer Arun Khilari) यांनाच सामोरे जावे लागले. मात्र याआधी देखील त्यांना असा प्रकार माहित असल्याने खिलारी यांनी फसवणूक होऊ दिली नाही. (Pune Municipal Corporation News)
याबाबत अरुण खिलारी यांनी सांगितले कि, एक वृद्ध महिला माझ्या कार्यालयात आली. 65 च्या पुढे वय असेल त्या महिलेचे. मी त्यांना पाणी, चहा द्यायला सांगितले. मग ती महिला मला तिची कर्मकहाणी सांगू लागली. मी कशी एकटी असते. मुलं सांभाळत नाहीत. आर्थिक अडचण, अशा बऱ्याच गोष्टी. तर आता तुम्ही मला आर्थिक मदत करा. खिलारी यांनी पुढे सांगितले कि, त्या महिलेची कर्मकहाणी ऐकल्यानंतर मला आठवले कि असेच याआधी मी ऐकले होते आणि पैसे पण दिले होते. तर हा प्रकार माझ्याबाबत याच महिलेने मी क्षेत्रीय अधिकारी असताना केला होता. त्यानंतर हीच महिला मला एकदा कामगार आयुक्तांच्या कार्यालयात भेटली होती आणि आपली कर्मकहाणी आर्थिक सहायता मागत होती. दुसऱ्या वेळेस मी टाळले होते. मात्र आता ही तिसरी वेळ होती. त्यामुळे मी त्या महिलेला कटवलं. अशाच पद्धतीने महापालिकेत आणि क्षेत्रीय कार्यालयात येऊन ही महिला कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना पैसे मागत असते. यावर आळा घालायला हवाय. याबाबत मी सुरक्षा विभागाला देखील कळवले आहे.
महापालिकेत अशाच पद्धतीने बरेच नागरिक फिरत असतात. कुणी पापड, चिक्की, पुस्तके विकायला येतात. प्रत्येक विभागात जाऊन कर्मचाऱ्यांना त्रास देत बसतात. कर्मचारी दया दाखवून त्यांना मदत करत असतात. मात्र नेहमीच हे होत असल्याने कर्मचारी वैतागून जातात. अशा लोकांवर सुरक्षा विभागाकडून आळा घातला जायला हवाय.
—-
अशा प्रकाराबाबत आम्ही गंभीरपणे दखल घेतली आहे. आमचे सुरक्षा विभागाचे 3/4 कमर्चारी आम्ही महापालिका भवनात साध्या वेशात तैनात करणार आहोत. जेणेकरून अशा व्यक्ती आम्हांला ओळखता येतील आणि कर्मचारी, अधिकाऱ्यांची फसवणूक थांबेल. तशा सूचना आम्ही आमच्या विभागाला दिल्या आहेत.
राकेश विटकर, सुरक्षा अधिकारी, पुणे महापालिका. 
——–

PMC Pune Transgender Employees | पुणे महापालिकेच्या सेवेत येणार P.hd, M.Tech. B.Sc. झालेले अजून 10 तृतीयपंथी

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Pune Transgender Employees | पुणे महापालिकेच्या सेवेत येणार P.hd, M.Tech. B.Sc. झालेले अजून 10 तृतीयपंथी

| सुरक्षा विभागाकडून घेण्यात आल्या अजून 10 लोकांच्या मुलाखती

PMC Pune Transgender Employees | पुणे महानगरपालिकेच्या (Pune municipal corporation) सेवेत 10 तृतीयपंथी व्यक्तींना (Transgender) कंत्राटी सेवक (Contract employee) म्हणून रुजू करून घेण्यात आले आहे.  पुणे महानगरपालिकेचा (PMC Pune) एक पुरोगामी पाउल उचलण्याचा मानस असून समाजातील सर्वच वर्गाना नागरिक हक्क कायद्यानुसार समानतेची वागणूक मिळावी या उद्देशाने तृतीयपंथी व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणणे कामी मनपाच्या मिळकतीचे संरक्षणार्थ प्रायोगिक तत्वावर तृतीयपंथी व्यक्तींना कामावर घेतले जाणार आहे. नुकतेच 10 तृतीय पंथीयांना नोकरी दिल्यानंतर अजून 10 लोकांना कामावर घेतले जाणार आहे. त्यांच्या मुलाखती घेतल्या गेल्या आहेत. यामध्ये पीएचडी, एमटेक, बीएस्सी शिक्षण झालेल्या तृतीय पंथियांचा समावेश आहे. महापालिका आयुक्तांच्या हस्ते लवकरच यांना नियुक्तीपत्र दिली जाणार आहेत. अशी माहिती महापालिकेचे मुख्य सुरक्षा अधिकारी राकेश विटकर यांनी दिली. (PMC Pune Transgender Employees)


पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू हॉस्पिटल, राजीव गांधी प्राणीसंग्रहालय, मनपा भवन तसेच अनधिकृत बांधकाम निर्मुलन व अतिक्रमण विभागाच्या कारवाई करिता सदरच्या तृतीयपंथी व्यक्तींना नेमणूक दिली जाणार आहे. शहरातील तृतीयपंथीय वर्गासाठी काम करण्याऱ्या सेवाभावी संस्थांचे कमिटी तयार करून मनपा कर्मचारी अधिकारी व तृतीयपंथी कामगार याच्यात सलोख्याचे व सामाजिक स्नेह राहावं यासाठी जनजागृती अभियान राबविले जाणार आहे. भविष्यात तृतीयपंथीय व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांच्याकरिता लोकाभिमुख उपक्रम राबविण्याचा संकल्प असून त्यानुसार कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे. पुणे महानगरपालिकेचा उपक्रम समाजातील प्रत्येक घटकास न्याय देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. असे राकेश विटकर म्हणाले.  (Pune Municipal Corporation News)
नवीन मुलाखती घेतलेल्या तृतिय पंथीयांचे उच्च शिक्षण झालेले आहे. काही ठिकाणी हे लोक नोकरी देखील करत होते. मात्र नोकरीच्या ठिकाणी होत असलेली हेळसांड पाहून या लोकांनी नोकऱ्या सोडणे पसन्त केले. त्यानुसार या लोकांनी महापालिकेत नोकरी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान आगामी काळात महापालिका देखील या लोकांना त्यांच्या शिक्षणानुसार काम देणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. (PMC Pune News)
—-
News Title | PMC Pune Transgender Employees | P.hd, M.Tech will come in the service of Pune Municipal Corporation. B.Sc. yet 10 transgender

PMC Bogus Identity Card | पुणे महापालिकेत बोगस ओळखपत्र धारकांचा सुळसुळाट | सुरक्षा विभागाने जप्त केली 175 बोगस ओळखपत्र 

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Bogus Identity Card | पुणे महापालिकेत बोगस ओळखपत्र धारकांचा सुळसुळाट | सुरक्षा विभागाने जप्त केली 175 बोगस ओळखपत्र

PMC Bogus Identity Card | पुणे महापालिकेच्या लोगोचा (PMC Pune Logo) आणि नावाचा वापर करून बोगस ओळखपत्र (Bogus Identity card) तयार करण्याचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये ठेकेदार, त्यांचे कामगार, माजी नगरसेवकांचे कार्यकर्ते, मानधनावर काम करणारे, लायझनिंग करणारे कर्मचारी अशा लोकांचा समावेश आहे. मागील आठवड्यपासून महापकिकेने ओळखपत्र तपासण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये महापालिकेला असे 175 बोगस ओळखपत्र धारक सापडले आहेत. तूर्तास तरी सुरक्षा विभागाने (PMC Security Department) या लोकांना तंबी देऊन सोडले आहे. आगामी काळात मात्र अशा लोकांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा सुरक्षा विभागाकडून देण्यात आला आहे. उपायुक्त माधव जगताप (Deputy Commissioner Madhav Jagtap) यांनी ही माहिती दिली. (PMC Bogus Identity Card)
महापालिकेत वेगवेगळ्या कामासाठी नागरिक येत असतात. मात्र यातील काही लोक हे महापालिकेत पार्किंग करण्यासाठी, काही कारण नसताना येत असलेले आढळले आहे. यामुळे पार्किंग करण्यासाठी जागा शिल्लक राहत नाही. तसेच हकनाक गर्दी दिसते. पुणे हे दहशतवाद्यांचे सॉफ्ट टार्गेट आहे हे नुकतेच काही प्रकरणावरून सिद्ध झाले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सुरक्षा विभागाने महापालिकेत येणाऱ्या नागरिकांची कसून चौकशी सुरु केली आहे. हे काम तृतीय पंथीयांना देण्यात आले आहे. ओळखपत्र दाखवल्याशिवाय कुणालाही प्रवेश दिला जात नाही. यामध्येच महापालिकेला बोगस ओळखपत्र मिळाले. महापालिकेच्या लोगोचा यासाठी वापर करण्यात येत आहे. (Pune Municipal Corporation)
याबाबत मुख्य सुरक्षा अधिकारी राकेश विटकर यांनी सांगितले कि, महापालीकेच्या कर्मचाऱ्यांना स्वतंत्र स्मार्ट कार्ड देण्यात आली आहेत. त्यावर सेवक कोड नंबर आणि आधार कोड आहे. मात्र बोगस ओळखपत्रावर असे काही आढळून आले नाही. त्यामुळे अशी 175 ओळखपत्र आम्ही जप्त केली आहेत. यामध्ये ठेकेदार, त्यांचे कामगार, माजी नगरसेवकांचे कार्यकर्ते, मानधनावर काम करणारे कर्मचारी अशा लोकांचा समावेश आहे. विटकर यांनी सांगितले कि तूर्तास तरी या लोकांना आम्ही सक्त ताकीद दिली आहे कि असे ओळखपत्र न वापरता तुमच्या कंपनीचे किंवा ठेकेदाराचे ओळखपत्र वापरा. आगामी काळात असे प्रकार घडले तर फौजदारी कारवाई केली जाईल. (PMC Pune News)
विटकर यांनी पुढे सांगितले कि नुकतेच नेमलेले तृतीयपंथी हे काम चांगले करत आहेत. तसेच सहायक सुरक्षा भारत जाधव, सुरक्षा जमादार – राजू येनपुरे हे यात मदत करत आहेत. पालिकेत येताना ओळखपत्र असणे आवश्यक आहे. तसेच महापालिका कर्मचाऱ्यांनी कामावर असताना ओळखपत्र परिधान करणे आवश्यक आहे. असे ही विटकर यांनी सांगितले.
——
जे लोक महापालिकेत अशा पद्धतीने बोगस ओळखपत्र वापरतात त्यांनी आपल्या कंपनीचे किंवा ठेकेदाराच्या नावाचे ओळखपत्र बनवणे आवश्यक आहे. याबाबतचे आदेश देखील अतिरिक्त आयुक्तांनी जारी केले आहेत.  आम्ही हे जप्त केलेले ओळखपत्र सामान्य प्रशासन विभागाकडे देणार आहोत.
माधव जगताप, उपायुक्त, सुरक्षा विभाग 
—–
महापालिकेत जे लोक  बोगस ID कार्ड धारण करतील त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच असे ओळखपत्र बनवून देणाऱ्या लोकांना देखील कारवाई केली जाईल. मनपा कर्मचाऱ्यांनी कामावर असताना ओळखपत्र घालणे आवश्यक आहे.
राकेश विटकर, मुख्य सुरक्षा अधिकारी 
———-
News Title | PMC Bogus Identity Card | In Pune Municipal Corporation, bogus identity card holders are in trouble Security department seized 175 fake identity cards