Ganesh Mandal | गणेश मंडळाचे मांडव काढून घेण्यासाठी उद्या पर्यंतची मुदत |नाही काढल्यास पुढील वर्षी परवानगी नाही | महापालिका उपायुक्त माधव जगताप यांचे आदेश

Categories
Breaking News PMC social पुणे

गणेश मंडळाचे मांडव काढून घेण्यासाठी उद्या पर्यंतची मुदत |नाही काढल्यास पुढील वर्षी परवानगी नाही

| महापालिका उपायुक्त माधव जगताप यांचे आदेश

पुणे – गणेशोत्सव संपल्यानंतरही रस्त्यावर मंडळांचे मांडव, कमानी, रनिंग मांडव काढले न गेल्याने नागरिकांना व वाहतुकीला अडथळा होत आहे. १४ सप्टेंबर पर्यंत सर्व मांडव काढून घ्यावेत, मांडवामुळे पडलेले खड्डे मंडळांनी बुजविले आहेत की नाहीत ते पाहून त्याचा अहवाल क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांनी १५ सप्टेंबर रोजी अतिक्रमण कार्यालयाकडे सादर करावा. जर मंडळांनी रस्ता, पादचारी मार्ग मोकळा केला नसल्यास त्यास पुढील वर्षी गणेशोत्सवासाठी परवागनी देऊ नये असे स्पष्ट प्रस्ताव सादर करा असे आदेश अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी दिले आहेत.

यंदाच्या वर्षी निर्बंधमुक्त गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. महापालिकेने परवाना शुल्क माफ केल्याने व पुढील पाच वर्षांसाठी एकच परवाना ग्राह्य धरला जाणार असल्याने मंडळांना दिलासा मिळाला. गणेशोत्सवानंतर मंडळांनी, खासगी कंपन्यांनी रस्ते व पादचारी मार्गावरील देखावे साहित्य, मिरवणूक साहित्य, बोर्ड, बॅनर, जाहिराती तीन दिवसात काढून घेणे बंधनकारक आहे. पण मंडळांनी व खासगी व्यक्तींनी मुदतीत साहित्य व बोर्ड काढलेले नाहीत. त्याच प्रमाणे मांडव काढल्यानंतर खड्डेही बुजविले नाहीत. त्यामुळे पादचारी व वाहतुकीला अडथळा होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत आहेत.

प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांनी त्यांच्या हद्दीतील मंडळांनी मांडव काढला की नाही, रस्ते स्वखर्चातून दुरुस्त केले की नाही याची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करावी. त्याचा अहवाल आयुक्तांकडे सादर केला जाणार आहे, त्यामुळे सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी त्यांचा अहवाल १५ सप्टेंबर रोजी अतिक्रमण विभागाकडे सादर करावा. ज्या मंडळांनी रस्ता, पादचारी मार्ग मोकळा केला नाही, त्यांना पुढील वर्षी परवानगी देऊ नये असा प्रस्तावही सादर करावा असे आदेशात नमूद केले आहे.

Anant Chaturdashi 2022 | पुणे उपनगरात गणेश मंडळांना रात्री १२ पर्यंत परवानगी

Categories
Breaking News cultural PMC Political social पुणे

Anant Chaturdashi 2022 | पुणे उपनगरात गणेश मंडळांना रात्री १२ पर्यंत परवानगी

उपनगरातील गणेश मंडळे ही शहरातील मंडळांच्या एक दिवस अगोदर म्हणजे गुरुवारी गणेश विसर्जन करीत असतात. मात्र, गुरुवारी रात्री १० वाजेपर्यंतच उपनगरातील मंडळांना परवानगी असल्याने ही वेळ वाढवून देण्याची मागणी उपनगरातील स्थानिक मंडळांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे जनतेचे सरकार आहे, असे सांगत जल्लोषात गणेशोत्सव साजरा करा, असे म्हणत वेळ वाढवून देत असल्याचे सांगितले.

बुधवारी सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रूक येथील संकल्प मित्र मंडळाच्या गणेश दर्शनासाठी ते आले असताना त्यांनी थेट मंडळाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, हे जनतेचे सरकार आहे. जनतेच्या भावनांचा विचार केला जाईल. निर्बंधमुक्त गणेशोत्सव केला आहे. रात्री १२ वाजेपर्यंत उत्साहात गणेशोत्सव साजरा करा, असे म्हणताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

sound limit | Ganeshotsav | गणेशोत्सवात रात्री १० पर्यंतच्या ध्वनीमर्यादेला आता पाच दिवसांची सवलत गणेशोत्सव मंडळांना सर्व परवानग्या एक खिडकीद्वारे

Categories
Breaking News cultural PMC Political social पुणे

गणेशोत्सवात रात्री १० पर्यंतच्या ध्वनीमर्यादेला आता पाच दिवसांची सवलत

गणेशोत्सव मंडळांना सर्व परवानग्या एक खिडकीद्वारे

ध्वनीमर्यादेत अतिरिक्त एक दिवस शिथिलता

गणेशोत्सव कालावधीदरम्यान जिल्हाधिकारी यांनी ध्वनीमर्यादेला ४ दिवसांची सवलत दिली होती. गणेश मंडळांच्या मागणीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यामध्ये एक दिवसाची वाढ करण्याचे आदेश दिले.

गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दहीहंडी आदी आगामी सण, उत्सव शांततेत, उत्साहात, धुमधडाक्यात साजरा करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेश मंडळांना केले. उत्सवात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दहीहंडी, मोहरम तसेच आगामी सण व उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्तालयात कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात आढावा बैठक मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, पुणे शहरात सार्वजनिक गणेशोत्सवाला १२५ हून अधिक वर्षांची परंपरा आहे. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती हे उत्सव समाजजागृतीच्या उद्देशाने सुरू केले. ही परंपरा मंडळांनी सुरू ठेवावी. गेली दोन वर्षे आपण कोरोनाच्या सावटाखाली होतो, त्यामुळे आपले सण उत्साहाने साजरे करता आलेले नाहीत. त्यामुळे यंदा गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दही हंडी आदी सण उत्साहाने, धुमधडाक्यात साजरे व्हावेत यासाठी राज्य शासनामार्फत गणेशोत्सव मंडळांना सहकार्य करण्यात येईल.

कोविडमध्ये गणेश मंडळांनी सामाजिक जबाबदारीने चांगले काम केले आहे. आगामी गणेशोत्सवातही उत्कृष्ट काम करावे, कोरोनाबाबत चांगली जनजागृती करावी. गोविंदा उत्सवही चांगल्याप्रकारे साजरा करावा, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

राज्य शासनाने गणेश मूर्तींबाबतचे निर्बंध काढून टाकल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. विविध परवानग्याही एक‍ खिडकी पद्धतीने देण्यात याव्यात. मनपाने मंडप टाकण्यासाठीचे शुल्क मंडळांकडून घेऊ नये. वीज मंडळांना तात्पुरते वीजजोड देण्याबाबत प्रशासनाने कार्यवाही करावी असे सांगून परवानग्यांसाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांना चकरा माराव्या लागू नये याची काळजी घ्यावी असेही निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

गणेशोत्सव तसेच अन्य सण-उत्सव साजरे करताना सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयांच्या आदेशांचे पालन होईल याकडे विशेष लक्ष देऊन उत्सवाला कोणतेही गालबोट लागणार नाही याची काळजी घ्यावी, असेही श्री. शिंदे म्हणाले. छोट्या फेरीवाल्यांच्या व्यवसायाबद्दलही प्रशासनाने सकारात्मक रहावे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

यावेळी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आगामी सण उत्सवांच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी केलेल्या तयारीचे सादरीकरण केले.

या बैठकीला माजी मंत्री तानाजी सावंत, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, माजी आमदार विलास लांडे, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर, रामनाथ पोकळे, नामदेव चव्हाण, राजेंद्र डहाळे, विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

Ganesh festival | गणेश मंडळासोबत महापालिका व पोलिसांची बैठक होणार या दिवशी  | गणेशत्सवाचे होणार नियोजन

Categories
Breaking News cultural PMC पुणे

गणेश मंडळासोबत महापालिका व पोलिसांची बैठक होणार या दिवशी

| गणेशत्सवाचे होणार नियोजन

पुणे | पुण्यात गणेशोत्सव मोठा थाटामाटात साजरा केला जातो. याबाबत नियोजन करण्यासाठी दरवर्षी गणेश मंडळे आणि पोलीस सोबत महापालिका बैठक घेते. त्यानुसार 8 ऑगस्ट ला ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

पुणे शहरात दि. ३१/०८/२०२२ ते दि.०९/०९/२०२२ चे कालावधीत सालाबादप्रमाणे या वर्षीचा गणेशोत्सव साजरा होत असून त्या अनुषंगाने करावयाच्या नियोजनाबाबत महापालिका आयुक्त यांचे अध्यक्षते खाली दि. १२/०७/२०२२ रोजी प्राथमिक बैठक घेण्यात आली होती. त्यामधील झालेल्या चर्चेमध्ये विषयांकित प्रकरणी पुन्हा बैठक घेणेकरिता पुणे शहरातील गणेश मंडळांचे पदाधिकारीसह मनपा व पोलीस प्रशासन यांची सयुंक्त एकत्रित बैठक घेणेबाबत निश्चित करण्यात आले होते. त्या अनुषंगाने महापालिका आयुक्त यांनी पुणे महानगरपालिकेच्या जुन्या छत्रपती शिवाजी
महाराज या सभागृहामध्ये सर्व संबंधित अधिकारी व शहरातील गणेश मंडळांचे पदाधिकारी यांची सयुंक्त बैठक 8 ऑगस्ट ला
आयोजित केली आहे. यासाठी गणेश मंडळांनी उपस्थित राहण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

Pune Metro : Murlidhar Mohol : महापौरांनी स्पष्टच केले; व्यवहार्य पर्याय नसल्याने लकडी पुलावर मेट्रोचे काम सुरु करणार

Categories
Breaking News PMC पुणे महाराष्ट्र

व्यवहार्य पर्याय नसल्याने लकडी पुलावर मेट्रोचे काम सुरु करणार : महापौर मोहोळ

– सुचवलेल्या पर्यायाने खर्च ७० कोटींनी आणि कालावधी दोन वर्षांनी वाढणार

पुणे : छत्रपती संभाजी महाराज पुलावरील मेट्रोच्या कामासाठी गणेशोत्सव मंडळांनी आणि मेट्रोने सुचवलेले पर्याय व्यवहार्य नसल्याचा अहवाल मेट्रो तांत्रिक तज्ञांकडून प्राप्त झाला असून यापेक्षा अधिक काळ मेट्रोचे काम बंद ठेवणे शहराच्या विकासाच्या दृष्टीने उचित नाही. म्हणूनच मेट्रोचे काम पुन्हा सुरु असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

गणेश विसर्जन मिरवणुकीत छत्रपती संभाजी महाराज पुलाववरील मेट्रो मार्ग अडथळा ठरेल, असा आक्षेप काही गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी घेतला होता. त्यावर मेट्रोचे काम थांबवून महापौर मोहोळ यांनी गणेशोत्सव मंडळ कार्यकर्ते, मेट्रो अधिकारी आणि तज्ञांच्या तीन बैठका घेतल्या होत्या. शिवाय महापौर मोहोळ यांनी कार्यकर्त्यांकडून पर्यायही मागवला होता. या पर्यायांचा अभ्यास मेट्रोने अभ्यास केल्यानंतर मेट्रोने सुचविलेले दोन्ही पर्यायही व्यवहार्य नसल्याचा निष्कर्ष निघाला होता. त्या पार्श्वभूमीवर महापौर मोहोळ यांनी काम सुरु करण्यास सांगितले आहे.

याबाबत महापौर मोहोळ म्हणाले, ‘विकासाची कामे करत असताना संस्कृती जपणे, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहेच. मीही स्वतः आधी गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्त्या आणि नंतर लोकप्रतिनिधी आहे. पुण्याच्या गणेशोत्सवाने आजवर समाजभान जपत झालेले बदल स्वीकारले. काळानुरूप बदलत, परंपराही जपत पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाने जगाच्या नकाशावर छाप उमटवली. मेट्रोच्या अर्थात शहर विकासाच्या मुद्द्यावरही कार्यकर्ते साथ देत मेट्रोच्या कामाला साथ देऊन पुण्याच्या प्रगतीचे साक्षीदार होतील.’

गणेशोत्सव मंडळांनी दिलेल्या पर्यायात मेट्रो मार्ग खंडित करण्याचा पर्याय होता. मात्र देशभरातील कोणत्याही मेट्रोने असा पर्याय कुठेही अवलंबला गेला नाही. याबाबत मेट्रो मार्ग सलग ठेवण्याची मेट्रोची भूमिका होती. तर मेट्रोने सुचवलेल्या पहिल्या पर्यायानुसार पुलाच्या आजूबाजूचे ३९ पिलर पाडून नव्याने बांधावे लागणार होते. त्यासाठी ७० कोटी रुपयांचा खर्च आणि २४ महिन्यांचा अतिरिक्त कालावधी लागणार होता. दुसऱ्या पर्यायानुसार १७ पिलर पाडून नव्याने बांधणे हाही होता. त्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी आणि २३ कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च होणार होता. त्यामुळे व्यावहारिक विचार करता आणि कामाची सद्यस्थिती लक्षात घेता दोन्ही पर्याय योग्य नसल्याचे मेट्रोच्या तांत्रिक तज्ज्ञांचे म्हणणे होते. या सर्व बाबी लक्षात घेता, आहे त्या परिस्थितीत काम सुरु करण्याचा पर्याय अधिक योग्य वाटला’, असेही महापौर मोहोळ यांनी स्पष्ट केले.