Vishrantwadi Flyover | PMC Estimate Committee | विश्रांतवाडी येथील उड्डाणपुलाला एस्टिमेट कमिटीत मान्यता | 62 कोटींचा निधी 

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Vishrantwadi Flyover | PMC Estimate Committee | विश्रांतवाडी येथील उड्डाणपुलाला एस्टिमेट कमिटीत मान्यता | 62 कोटींचा निधी

Vishrantwadi Flyover | PMC Estimate Committee |विश्रांतवाडी येथे उड्डाणपूल व ग्रेड ग्रेड सेपरेटर निर्मितीसाठी पुणे महापालिकेच्या इस्तीमेट समितीने आज 62 कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली आहे.

केंद्र सरकारच्या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत सन 2019 मध्ये शहरातील 200 किलोमीटर रस्त्यांचे रोड सेफ्टी ऑडिट करण्यात आले होते. पुणे नगर रस्ता हा वाहतुकीसाठी सर्वात धोकादायक असल्याचे बाब समोर आली होती. याचा विचार करून पुणे नगर रस्ता हे एक एक मानून नगर रस्ता एकात्मिक वाहतूक आराखडा तयार केला होता. त्यामध्ये मेट्रो मार्गांचे नियोजन, बीआरटी मार्गांचे सक्षमीकरण व पुरेशी बस संख्या ठिkठिकाणी उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर, भुयारी मार्ग आणि रोड सेफ्टी ऑडिटमध्ये सुचविलेल्या उपाययोजना करण्याचे ठरविले होते. त्यानुसार येरवडा येथील गोलफ चौकातील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. विश्रांतवाडी येथे उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपूलासाठी एस्टिमेट कमिटीने आज 62 कोटी रुपयांना मान्यता दिली. (Pune Municipal Corporation)


आळंदी रस्त्यावरील विश्रांतवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला होता. ही कोंडी सोडविण्यासाठी या ठिकाणी उड्डाणपुल उभारण्यासाठी मी सातत्याने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि महापालिकडे पाठपुरावा केला होता. अखेर या प्रयत्नाना यश आले असून महापालिकेच्या एस्टीमेट कमिटीच्या बैठकीत विश्रांतवाडी येथील उड्डाणपुलाच्या ६२ कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. लवकरच या पुलाच्या कामासाठी निविदा प्रक्रिया निघून प्रत्यक्ष कामाला सुरवात होईल. पुलाचे काम पूर्ण झाल्यावर आळंदी रस्ता, धानोरी रस्ता आणि विमानतळ रस्ता यासर्वाकंडे जाणाऱ्यांचा मार्ग निश्चितपणे सुकर होईल.

– सुनिल टिंगरे, आमदार, वडगाव शेरी.

———-

या उड्डाणपुलाच्या निर्मितीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च शिक्षण व तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी पुढाकार घेतला. या दोघांचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि हे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार.

माजी आमदार जगदीश मुळीक


आंबेडकर चौक येथे मुख्यसभेत भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचा दर्शनी भागांत पुर्णाकृती पुतळा बसवायचा ठराव पारित झालेला आहे. ते ही या ईस्टिमेट मधे असावे.

डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर, पुणे मनपा

———–

MLA Sunil Tingre | Ajit Pawar | विश्रांतवाडी चौकातील फ्लाईओवर व ग्रेडसेपरेटरचे काम एका महिन्यात  सुरू करा | उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मनपा प्रशासनास आदेश

Categories
Breaking News PMC Political पुणे

MLA Sunil Tingre | Ajit Pawar | विश्रांतवाडी चौकातील फ्लाईओवर व ग्रेडसेपरेटरचे काम एका महिन्यात  सुरू करा

| उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मनपा प्रशासनास आदेश

 

MLA Sunil Tingre | Ajit Pawar | विश्रांतवाड़ी (Vishrantwadi) येथील मुकुंदराव आंबेडकर चौकातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी फ्लाईओवर व ग्रेडसेपरेटरचे नियोजन करण्यात आले आहे. या कामाचे टेंडर काढून महिन्याभरात काम सुरू करण्याचा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी मनपा प्रशासनास शनिवारी दिला.  या कामासाठी वडगांवशेरी मतदार संघाचे आमदार सुनिल टिंगरे (MLA Sunil Tingre)  सतत पाठपुरावा करीत आहेत.

कौन्सिल हॉल येथे शनिवारी सकाळी अजित पवार यांनी मनपा अधिकार्‍यांची बैठक घेतली. या बैठकीत विभिन्न विषयांसोबतच विश्रांतवाड़ी परिसरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपायों की माहिती मागण्यात आली. बैठकीमध्ये आमदार सुनिल टिंगरे, विभागीय आयुक्त सौरभ राव (IAS Saurabh Rao), जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (IAS Dr Rajesh Deshmukh), मनपा आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar), अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार (IAS Dr Kunal Khemnar), विकास ढाकणे व अन्य अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मनपा प्रशासनाने विश्रांतवाडी येथील मुकुंदराव आंबेडकर चौकात करण्यात येणार्‍या फ्लाईओवर व ग्रेडसेपरेटर सहित संपूर्ण कामाचे सादरीकरण करण्यात आले. वाहतूक समस्या सोडविण्यासाठी करण्यात आलेल्या उपायांची माहिती देण्यात आली. यावेळी उपस्थित करण्यात आलेल्या शंकांचे समाधान देखील प्रशासनाने केले. या प्रकल्पाची संपूर्ण माहिती घेतल्यानंतर अजित पवार यांनी एका महिन्याच्या अवधिमध्ये या कामाचे टेंडर काढून प्रत्यक्ष कामाची सुरूवात करण्याचा आदेश प्रशासनाला दिला.

—-

विश्रांतवाडी येथील मुकुंदराव चौकातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी विभिन्न उपायांवर एकसाथ अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. या चौकात चार रस्ते एकत्र येतात, परंतु रस्त्यांच्या दिशा वेगळ्या असल्याने इतर ठिकाणी केलेल्या उपायांवर येथे अंमलबजावणी करने योग्य नाही. येथे फ्लाईओवर व ग्रेडसेपरटची एकसाथ गरज आहे. याकरिता मागील कित्येक महिन्यांपासून पाठपुरावा केला जात आहे. अनेक वेळा महापालिकेच्या अधिकार्‍यांसोबत प्रत्यक्ष पाहणी देखील केली आहे. येथील कामाच्या डिझाइन बाबतही अधिकार्‍यांसोबत चर्चा करण्यात आली आहे. आता या प्रकल्पाचे काम लवकरात लवकर सुरू करून या परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडविल्या जातील.

सुनिल टिंगरे (आमदार – वडगावशेरी विधानसभा मतदार संघ)