MLA Sunil Tingre | Ajit Pawar | विश्रांतवाडी चौकातील फ्लाईओवर व ग्रेडसेपरेटरचे काम एका महिन्यात  सुरू करा | उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मनपा प्रशासनास आदेश

Categories
Breaking News PMC Political पुणे

MLA Sunil Tingre | Ajit Pawar | विश्रांतवाडी चौकातील फ्लाईओवर व ग्रेडसेपरेटरचे काम एका महिन्यात  सुरू करा

| उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मनपा प्रशासनास आदेश

 

MLA Sunil Tingre | Ajit Pawar | विश्रांतवाड़ी (Vishrantwadi) येथील मुकुंदराव आंबेडकर चौकातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी फ्लाईओवर व ग्रेडसेपरेटरचे नियोजन करण्यात आले आहे. या कामाचे टेंडर काढून महिन्याभरात काम सुरू करण्याचा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी मनपा प्रशासनास शनिवारी दिला.  या कामासाठी वडगांवशेरी मतदार संघाचे आमदार सुनिल टिंगरे (MLA Sunil Tingre)  सतत पाठपुरावा करीत आहेत.

कौन्सिल हॉल येथे शनिवारी सकाळी अजित पवार यांनी मनपा अधिकार्‍यांची बैठक घेतली. या बैठकीत विभिन्न विषयांसोबतच विश्रांतवाड़ी परिसरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपायों की माहिती मागण्यात आली. बैठकीमध्ये आमदार सुनिल टिंगरे, विभागीय आयुक्त सौरभ राव (IAS Saurabh Rao), जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (IAS Dr Rajesh Deshmukh), मनपा आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar), अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार (IAS Dr Kunal Khemnar), विकास ढाकणे व अन्य अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मनपा प्रशासनाने विश्रांतवाडी येथील मुकुंदराव आंबेडकर चौकात करण्यात येणार्‍या फ्लाईओवर व ग्रेडसेपरेटर सहित संपूर्ण कामाचे सादरीकरण करण्यात आले. वाहतूक समस्या सोडविण्यासाठी करण्यात आलेल्या उपायांची माहिती देण्यात आली. यावेळी उपस्थित करण्यात आलेल्या शंकांचे समाधान देखील प्रशासनाने केले. या प्रकल्पाची संपूर्ण माहिती घेतल्यानंतर अजित पवार यांनी एका महिन्याच्या अवधिमध्ये या कामाचे टेंडर काढून प्रत्यक्ष कामाची सुरूवात करण्याचा आदेश प्रशासनाला दिला.

—-

विश्रांतवाडी येथील मुकुंदराव चौकातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी विभिन्न उपायांवर एकसाथ अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. या चौकात चार रस्ते एकत्र येतात, परंतु रस्त्यांच्या दिशा वेगळ्या असल्याने इतर ठिकाणी केलेल्या उपायांवर येथे अंमलबजावणी करने योग्य नाही. येथे फ्लाईओवर व ग्रेडसेपरटची एकसाथ गरज आहे. याकरिता मागील कित्येक महिन्यांपासून पाठपुरावा केला जात आहे. अनेक वेळा महापालिकेच्या अधिकार्‍यांसोबत प्रत्यक्ष पाहणी देखील केली आहे. येथील कामाच्या डिझाइन बाबतही अधिकार्‍यांसोबत चर्चा करण्यात आली आहे. आता या प्रकल्पाचे काम लवकरात लवकर सुरू करून या परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडविल्या जातील.

सुनिल टिंगरे (आमदार – वडगावशेरी विधानसभा मतदार संघ)

Three-storey flyover | नगर रस्त्यावरील तीन मजली उड्डाणपूल थेट विमाननगरपर्यंत करणार | अजित पवार यांनी केली पाहणी ; बीआरटी काढण्याची सुचना

Categories
Breaking News PMC Political पुणे

नगर रस्त्यावरील तीन मजली उड्डाणपूल थेट विमाननगरपर्यंत करणार

| अजित पवार यांनी केली पाहणी ; बीआरटी काढण्याची सुचना

नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी थेट विमाननगर मधील हयात हॉटेल पर्यंत तीन मजली उड्डाणपूलाचा आराखडा तयार करण्यात येईल. अशी माहिती भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) अधिकाऱ्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना शुक्रवारी दिली. तर वाहतूक सुरळीत करण्यासाठी या मार्गावरील बीआरटी काढून टाकून अतिक्रमनांवर कारवाई करावी अशा सूचना पवार यांनी महापालिका अधिकाऱ्यांना केल्या.

नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासदर्भात उपाययोजना करण्यासाठी वडगाव शेरीचे आमदार सुनिल टिंगरे यांनी नुकतेच महापालिका भवनासमोर उपोषण केले होते. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नगर रस्त्यावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून वाहतूक कोंडीचा आढावा घेतला. यावेळी आमदार टिंगरे यांच्यासह एनएचएआयचे संजय कदम, महापालिका अतिरिक आयुक्त विकास ढाकणे, अधिक्षक अभियंता श्रीनिवास बोनाला, पथ विभाग प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी तसेच पीडब्लूडी, पोलिस वाहतूक विभागाचे उपायुक्त विजय मगर
आणि महामेट्रोचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पवार यांनी वाहतूक कोंडीच्या कारणांची माहिती घेऊन त्या सोडविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. केंद्र शासनाच्या माध्यमातून पुणे ते औरंगाबाद या महामार्गाचे जे काम हाती घेण्यात आले आहे. त्यात शिक्रापूर ते वाघोली पर्यत जे तीन मजली  उड्डाणपूल करण्यात येणार आहे तो थेट विमाननगर मधील हयात हॉटेल पर्यत करण्यासंबंधीचा आराखडा तयार करावा. त्यासाठी आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यास मंजुरी मिळवून देऊ असे पवार यांनी सांगितले. तसेच महामेट्रोचे प्रमुख ब्रिजेश दीक्षित यांच्याशी पवार यांनी फोनवरून संपर्क साधून उड्डाणपूलाच्या कामानुसार मेट्रोचा सुधारित डीपीआर करण्याच्या सुचना दिल्या. एनएचआयच्या अधिकऱयांनी त्यास सहमती दिली. तसेच केंद्र शासनाच्या जे एनएनयुआरएम योजनेंतर्गत रस्त्यासाठी निधी आणताना त्यावर बीआरटी योजना बंधनकारक होती. त्यानुसार त्यावेळेस बीआरटी योजना राबविली होती. आता मात्र या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली असल्याने बीआरटी मार्ग काढून टाकावा अशा सूचना पवार यांनी पालिका अधिकाऱ्यांना केल्या. तसेच वाघोली, लोहगावकडून पिंपरी चिंचवड कडे जाणाऱ्या रिंगरोडचे कामही तात्काळ सुरू करण्यास पवार यांनी सांगितले. दरम्यान नगर रस्त्यावरील वाहतूक उपाय योजनांसाठी समिती नेमण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सागण्यात आले.

| नदी काठच्या रस्त्याच्या सात दिवसात निविदा

नगर रस्त्याला पर्यायी ठरणाऱ्या खराडी- शिवणे रस्त्याच्या कामाचा आढावा पवार यांनी घेतला. यावेळी अति. आयुक्त ढाकणे यांनी या रस्त्यावरील राहिलेल्या दोन जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असून ती आता झाली असून आठवडा भरात रस्त्याच्या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू होईल असे सांगितले.

|माझ्या पक्षाच्या लोकांची असेल तरी अतिक्रमणे काढा

नगर रस्त्यावर वाघोली पर्यत मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. त्यावर तात्काळ कारवाई करा. त्यात माझ्या पक्षाच्या लोकांची जरी अतिक्रमणे असली तरी त्यावर कारवाई करून ती काढून टाका अशा स्पष्ट सूचना पवार यांनी दिल्या.

Jagdish Mulik | नगर रस्त्यावर खराडी, विश्रांतवाडी येथे उड्डाणपुल उभारणार

Categories
Breaking News PMC Political पुणे

नगर रस्त्यावर खराडी, विश्रांतवाडी येथे उड्डाणपुल उभारणार

| भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी घेतली महापालिका आयुक्तांची भेट

वडगावशेरी मतदार संघातील नगर रस्त्यावर खराडी आणि विश्रांतवाडी येथे मंजूर करण्यात आलेल्या उड्डाण पूल उभारण्याचे काम निधीची तरतूद करून लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन केली.

या वेळी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष योगेश मुळीक, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी सभागृह नेते गणेश बिडकर उपस्थित होते.

मुळीक म्हणाले, ‘केंद्र सरकारच्या रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत सन 2018 मध्ये शहरातील 200 किलोमीटर रस्त्यांचे रोड सेफ्टी ऑडिट करण्यात आले होते. त्यात पुणे-नगर रस्ता हा वाहतुकीसाठी सर्वात धोकादायक असल्याची बाब समोर आली होती. त्याचा विचार करून पुणे नगर रस्ता हे एक एकक मानून तत्कालीन स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांनी नगर रस्ता एकात्मिक वाहतूक आराखडा तयार केला होता, त्यामध्ये मेट्रो मार्गांचे नियोजन, बीआरटी मार्गांचे सक्षमीकरण, पुरेशा बसव्यवस्था, आणि गोल्फ चौक, खराडी कल्याण नगर, येरवडा, विश्रांतवाडी येथे आवश्यकतेप्रमाणे उड्डाणपूल किंवा ग्रेड कामे अंदाजपत्रकात सुचविली होती. त्यापैकी गोल्फ चौकातील उड्डाणपुलाचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले. खराडी येथे उड्डाणपुलासाठी राज्य सरकार निधी उपलब्ध करून देणार आहे. त्या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच सूतोवाच केले. राज्य सरकार आणि महापालिकेच्या माध्यमातून लवकरच काम सुरू करण्याचे आश्वासन आयुक्तांनी यावेळी दिले.’

flyover at Golf Chowk | गोल्फ चौकातील उड्डाणपूल डिसेंबर अखेर खुला होणार!

Categories
Breaking News PMC Political social पुणे

गोल्फ चौकातील उड्डाणपूल डिसेंबर अखेर खुला होणार

| भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची माहिती

येरवड्यातील गोल्फ चौक येथील उड्डाणपूलाचे 75 टक्के काम पूर्ण झाले असून, या वर्षी डिसेंबरअखेर तो वाहतुकीसाठी खुला केला जाईल, अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष माजी आमदार जगदीश मुळीक यांनी दिली.

मुळीक यांनी आज उड्डाणपूलाच्या कामाची पाहणी करून तो लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सूचना दिल्या. नवी खडकी गावाकडे जाणारा रस्ता खुला ठेवावा, असे त्यांनी सुचविले. अधीक्षक अभियंता-श्रीमती सूष्मिता शिर्के, कार्यकारी अभियंता-श्री अभिजीत आंबेकर, उप अभियंता-श्री संदीप पाटील,शाखा अभियंता-रणजीत मुटकुळे, तज्ञ सल्लागार श्री अमित मुनोतमाजी, नगरसेवक योगेश मुळीक, राहुल भंडारे, श्वेता गलांडे, मुक्ता जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.

नगर रस्त्यावर गुंजन चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, शास्त्रीनगर या भागात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते. ती नियंत्रणात आणण्यासाठी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष योगेश मुळीक यांच्या प्रयत्नातून हा उड्डाणपूल उभारण्यात येत आहे.

यावेळी शहराध्यक्ष जगदीश मुळीक मा. स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, राहूल भंडारे, मुक्ता जगताप, श्वेता गलांडे, संतोष राजगुरु, संतोष भरणे, गणेश देवकर, अन्वर पठाण, ज्ञानेश्र्वर शिंदे, सुनिल जाधव, किशोर वाघमारे, प्रताप मोहिते, धनंजय बाराथे, विकास सोनावणे, राजू जाधव, पुनाजी जगताप, सुभाष देवकर, गणेश गवारे, अधीक्षक अभियंता-श्रीमती सूष्मिता शिर्के, कार्यकारीअभियंता-श्रीअभिजित आंबेकर,उप अभियंता-श्री संदीपपाटील, शाखाअभियंता-रणजी त मुटकुळे,तज्ञ सल्लागार श्री अमित मुनोत चव्हाण यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Inauguration of flyover connecting Pashan-Sus | राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वर पाषाण-सूसला जोडणाऱ्या उड्डाणपूलाचे लोकार्पण

Categories
Breaking News PMC Political social पुणे

राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वर पाषाण-सूसला जोडणाऱ्या उड्डाणपूलाचे लोकार्पण

| शहराच्या विकासासाठी  लोकप्रतिनिधींनी एकजुटीने काम करावे- उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे| पाषाण-सूसला जोडणारा उड्डाणपूल हा हिंजवडी माहिती तंत्रज्ञान पार्कच्या बाजूला होणाऱ्या वाहतुकीसाठी उपयुक्त ठरणार असून वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास बऱ्याच अंशी मदत होईल, असा विश्वास उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. शहराच्या विकासासाठी  लोकप्रतिनिधींनी एकजुटीने काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वर पुणे महानगरपालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या पाषाण-सूसला जोडणाऱ्या उड्डाणपूलाचे लोकार्पण  मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होत्या. याप्रसंगी आमदार भीमराव तापकीर, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, रवींद्र बिनवडे, विलास कानडे, माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, माजी सभागृहनेते गणेश बीडकर आदी उपस्थित होते.

चांदणी चौकातील सहापदरी पूल झाल्यावर या भागातील बरेचसे प्रश्न मार्गी लागतील असे सांगून श्री. पाटील म्हणाले, या परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आणि त्यासाठी वाहतूक वळवण्यासाठी काही बाबतीत हा पूल उपयुक्त होईल. पुणे शहराची गतीने वाढ होत आहे. उद्योग, व्यापार, शैक्षणिक क्षेत्र आदींमध्ये शहर पुढे राहण्यासाठी रस्ते, उडाणपूल, मेट्रो, पूल आदी पायाभूत सुविधांची निर्मिती गरजेची आहे. चांगल्या प्रकारचे घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छ पाण्याची व्यवस्था, शांतता आदीमुळे सर्वांनाच हे शहर राहण्यासाठी सुरक्षित वाटते.

मंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले, येत्या काळात शहरातील अनेक प्रश्न मार्गी लावायचे आहे. मेट्रो, सर्व भागात २४ तास समप्रमाण पाणी पुरवठा, जायका प्रकल्प आदी प्रकल्प गतीने पूर्ण करायचे आहेत. पाषाण- सूस भागातील घनकचरा प्रकल्प हलवण्याची नागरिकांची मागणी असून येथील लोकप्रतिनिधींनी नागरी वस्तीपासून दूर असलेली योग्य जागा शोधावी. या जागेचे संपादन करून तेथे हा प्रकल्प स्थलांतरीत करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

उद्घाटन करण्यात आलेल्या पूलाला राजमाता जिजाऊ भोसले यांचे नाव देण्यात  येईल आणि राजमाता जिजाऊंचा पुतळाही या ठिकाणी उभा केला जाईल, असेही श्री. पाटील म्हणाले.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, १९९५ नंतर उड्डाणपूल, तसेच रस्त्यांच्या बाबतीत राज्यात चांगली पाऊले टाकली गेली आहेत. शहरात मोठ्या पावसामुळे सिग्नल व्यवस्था बंद पडू नये यावर उपाययोजना करणे आणि अशावेळी ऐनवेळचे वाहतूक नियोजन करणे गरजेचे आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था, घनकचरा, सांडपाण्याचे व्यवस्थापन गरजेचे आहे.

माजी महापौर मोहोळ म्हणाले, या भागातील वाहतूक कोंडीवर हा पूल उपयुक्त ठरणार आहे. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. १०० टक्के कचऱ्यावर प्रक्रिया करणारे देशातील ५ व्या क्रमांकावर पुण्याचा समावेश आहे.

पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांनी प्रास्ताविकात पुलाबाबत माहिती दिली.  हा पूल ४७० मीटरचा असून पुलामुळे कात्रज व हिंजवडी आयटी पार्ककडे जाणारी वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याचे प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी माजी नगरसेवक बाबुराव चांदेरे, अमोल बालवडकर यांनीही मनोगत व्यक्त केले.

फेब्रुवारी २०२० पासून काम सुरू झालेल्या या पुलाचे काम कोविडकाळातही गतीने सुरू ठेऊन पूर्ण केल्याबद्दल महानगरपालिकेचे अधिकारी, अभियंते तसेच कंत्राटदारांचा सत्कार करण्यात आला. तसेच  श्रावणी सतीश गोगुलवार हीचा १२ वी सीबीएसई बोर्डात ९९.४० टक्के गुण मिळवून राज्यात पहिला क्रमांक मिळवल्याबद्दल  सत्कार करण्यात आला.

असा आहे उड्डाणपूल
४१ कोटी रुपये खर्चातून उभारलेला ४७० मीटर लांबीचा हा उड्डाणपूल राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वर पाषाण-सूसला जोडणारा आहे. पाषाण-कात्रज, हिंजवडी माहिती तंत्रज्ञान पार्क, मुळशीला जोडणारा हा पूल वाहतूकीसाठी मोठा उपयुक्त ठरणार आहे. हिंजवडी आयटी पार्ककडे जाणारी आणि मुळशीकडून येणारी वाहतूक सुकर होणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा
उड्डाणपुलाचे उद्घाटन दूरदृश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार होते. तांत्रिक कारणामुळ त्यांना सहभागी होता आले नाही. तथापि, मुख्यमंत्र्यांनी मंत्री श्री. पाटील यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधत या लोकार्पण सोहळ्यास शुभेच्छा दिल्या.