Maharashtra Politics | अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री तर आठ जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

Maharashtra Politics | अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री तर आठ जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

Maharashtra Politics | विधानसभेचे सदस्य अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह नऊ जणांनी आज दुपारी राजभवनावर मंत्रिपदाची शपथ (Oath For Minister) घेतली. त्यांना राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांनी राजभवनातील (Raj Bhavan) दरबार हॉलमध्ये पद व गोपनीयतेची शपथ दिली. (Maharashtra Politics)
            आज मंत्रिपदाची शपथ घेतलेल्यांमध्ये श्री. छगन चंद्रकांत भुजबळ (Minister Chagan Bhujbal), श्री. दिलीप दत्तात्रय वळसे- पाटील (Minister Dilip walse Patil), श्री. हसन मियालाल मुश्रीफ (Minister Hasan Mushrif), श्री. धनंजय पंडितराव मुंडे (Minister Dhananjay Munde), श्री. धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम (Dharmravbaba Aatram), आदिती सुनील तटकरे (Minister Aditi Tatkare), श्री. संजय बाबूराव बनसोडे (Sanjay Bansode), श्री. अनिल भाईदास पाटील (Anil Patil) यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
            यावेळी विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, विधानसभेचे सदस्य, लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते.
०००००

Gram Panchayats on Palkhi Marg | पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना नऊ कोटी अनुदान

Categories
Breaking News cultural Political social पुणे महाराष्ट्र

पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना नऊ कोटी अनुदान

| ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

मुंबई | पंढरपूरला जाणाऱ्या पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना अनुदान देण्यासाठी दोन कोटी एकोणसाठ लाख पंच्याहत्तर हजार रुपयांच्या तसेच वारकरी भाविकांना तात्पुरत्या स्वच्छता सुविधा पुरविण्यासाठी सहा कोटी त्र्याहत्तर लाख वीस हजार रुपयांच्या निधीस राज्य शासनाने मंजुरी दिली आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज दिली. पंढरपूरची आषाढी वारी निर्मल वारी होण्यासाठी यामुळे मदत होणार आहे, असेही श्री. मुश्रीफ यांनी सांगितले. आषाढी पालखी सोहळ्यासाठी देहू येथे १३ ठिकाणी ८०० आणि आळंदी येथे २१ ठिकाणी १००० तात्पुरत्या स्वच्छतागृहांची सुविधा करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आषाढी एकादशी निमित्त पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना अनुदान देण्याबाबत मागणी करण्यात आली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे, असे  मुश्रीफ यांनी सांगितले.

आषाढी एकादशीच्या निमित्त पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यांतून विविध संतांच्या पालख्या सोबत मार्गक्रमण करणाऱ्या वारकऱ्यांना सोयी सुविधा पुरविण्यासाठी पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना अनुदान देण्यात येते. यानुसार पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींना अनुदान देण्यासाठी दोन कोटी एकोणसाठ लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे, असे  मुश्रीफ यांनी सांगितले.

पुणे, सातारा व सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मागणी केलेल्या निधीच्या पन्नास टक्के निधी राज्य शासनाने उपलब्ध करून दिला आहे. उर्वरित निधी जिल्हा परिषदांनी त्यांच्या स्वनिधीतून अथवा अन्य निधीतून उपलब्ध करावयाचा आहे. हा निधी जिल्हा परिषदांनी ग्रामपंचायतींना मागणीनुसार उपलब्ध करून द्यायचा आहे, असे मुश्रीफ यांनी सांगितले.

पुणे जिल्हा परिषदेला ब्याऐंशी लाख रुपये, सातारा जिल्हा परिषदेला वीस लाख पंचवीस हजार रुपये तर सोलापूर जिल्हा परिषदेला एक कोटी सत्तावन्न लाख पन्नास हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात येणार आहे.

सहा कोटी त्र्याहत्तर लाख रुपयांचा निधी पुणे जिल्हा परिषदेला मंजूर

पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यातून मार्गक्रमण करणाऱ्या विविध संतांच्या पालख्या सोबत असणाऱ्या भाविकांना स्वच्छता पुरविण्यासाठी भाडेतत्त्वावर तात्पुरत्या शौचालयाची व्यवस्था करण्यासाठी सहा कोटी त्र्याहत्तर लाख वीस हजार रुपयांचा निधी पुणे जिल्हा परिषदेला उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली असल्याचेही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. एकूण मंजुरीच्या वीस टक्के प्रमाणात म्हणजेच एक कोटी चौतीस लाख चौसष्ठ हजार रुपयांचा निधी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना बीडीएस प्रणालीद्वारे वितरित करण्यात आला असल्याची माहितीही श्री. मुश्रीफ यांनी दिली.

world child labour day 2022 | जागतिक बालकामगार दिन | राज्य सरकारने सुरु केली हेल्पलाईन 

Categories
Breaking News social देश/विदेश महाराष्ट्र

जागतिक बालकामगार दिन | राज्य सरकारने सुरु केली हेल्पलाईन

जागतिक बालकामगार दिन 2022 च्या  निमित्ताने राज्य सरकारने एक हेल्पलाईन सुरु केली आहे. महाराष्ट्राच्या कामगार मंत्र्यांनी लोकांना 1098 डायल करून बालमजुरीबद्दल माहिती देण्याची घोषणा केली.
 देशात कठोर कायदे अस्तित्वात असूनही, बालमजुरी ही एक दुर्दैवी प्रथा आहे जी आजही आपल्या समाजात आहे.  आज आपण जागतिक बालमजुरी विरोधी दिन साजरा करत असताना, महाराष्ट्राने ही प्रथा रोखण्यासाठी आणखी एक पाऊल उचलले आहे.
 महाराष्ट्राचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी जनतेला 1098 वर डायल करून बालमजुरी आणि संबंधित घटनांबद्दल माहिती देण्याचे आवाहन केले आहे. “बालमजुरी संपवण्यासाठी आम्हाला सर्वांच्या सहकार्याची गरज आहे.  लोकांनी 1098 हेल्पलाइन डायल करून आम्हाला कळवावे,” मंत्री म्हणाले
 माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असेही मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.  “14 वर्षाखालील मुले शाळेत जाण्याऐवजी काम करताना आढळल्यास लोकांनी हेल्पलाइन वापरून आम्हाला कळवावे.  सरकार अशा मुलांना मोफत शिक्षण देईल,”
 बालमजुरी ही जगभरातील एक गंभीर समस्या आहे.  2015 मध्ये, जागतिक नेत्यांनी 2025 पर्यंत सर्व प्रकारचे बालमजुरी समाप्त करण्यासाठी कार्य करण्यासाठी शाश्वत विकास लक्ष्य (SDGs) स्वीकारले होते. आम्ही निर्धारित तारखेच्या जवळ येत असताना, नियोजित प्रयत्नांमध्ये आमचे यश अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे दिसते.
 जून 2021 मध्ये, UNICEF आणि आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) ने दोन दशकांत बालकामगारांच्या संख्येत झालेल्या पहिल्या वाढीबद्दल लोकांना चेतावणी दिली होती.  2016 आणि 2019 दरम्यान UN शाश्वत विकास उद्दिष्टे स्वीकारल्याच्या चार वर्षांमध्ये आकडेवारी आणखी खराब झाली.
 ILO आणि UNICEF ने जाहीर केलेल्या जागतिक अंदाजानुसार, 2020 च्या सुरुवातीला 97 दशलक्ष मुले आणि 63 दशलक्ष मुलींसह 160 दशलक्ष पेक्षा जास्त मुलांना बालमजुरी करण्यास भाग पाडले गेले  .
 यापैकी सुमारे 79 दशलक्ष मुलांना काही प्रकारचे धोकादायक काम करण्यास भाग पाडले गेले.  धक्कादायक म्हणजे, उप-सहारा आफ्रिकेतील 86 दशलक्ष मुले बालमजुरीमध्ये गुंतलेली आहेत.