Tipu Sultan | Pune BJP | टिपू सुलतान चे उदात्तीकरण सहन केले जाणार नाही | धीरज घाटे

Categories
Breaking News Political social पुणे

Tipu Sultan | Pune BJP | टिपू सुलतान चे उदात्तीकरण सहन केले जाणार नाही | धीरज घाटे

Tipu Sultan | Pune BJP | पुणे | ज्याने असंख्य हिंदूंची कत्तल केली ज्याने अनेक लोकांचे बळजबरी धर्मांतर करून त्यांचा अमानुष छळ केला. अशा धर्मांध विकृती असलेल्या टिपू सुलतान ची जयंती (Tipu Sultan Jayanti) महाराष्ट्रात साजरी केली जात असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. त्याचे उदात्तीकरण होऊ देणार नाही. पोलिसांनी वेळीच असल्या प्रवृत्तीला आळा घालावा. अन्यथा या प्रवृत्तीचा बिमोड करण्यास आम्ही समर्थ आहोत असा इशारा भारतीय जनता पार्टी चे शहराध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate) यांनी दिला.

पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन तातडीने अशी धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांना शासन करण्याची मागणी केली. नुकतीच पुण्यात टिपू सुलतान ची जयंती साजरी करण्यात आली.
पुढे बोलताना घाटे यांनी पोलिसांनी या बाबत गंभीरतेने दखल घेऊन ह्या लोकांचा शोध घेऊन कारवाई करून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी अशी मागणी केली.

या शिष्टमंडळामध्ये घाटे यांच्यासह सरचिटणीस पुनीत जोशी, राघवेंद्र मानकर ,राजेंद्र शिळीमकर ,राहुल भंडारे ,वर्षा तापकीर, महेश पुंडे यांचा समावेश होता

CP Pune | PMC Pune | पावसाळ्यात पुणेकरांना नाहक त्रास होणार नाही याची काळजी घ्या | पुणे पोलीस आयुक्तांच्या पुणे महापालिकेला सूचना

Categories
Breaking News PMC social पुणे

CP Pune | PMC Pune | पावसाळ्यात पुणेकरांना नाहक त्रास होणार नाही याची काळजी घ्या | पुणे पोलीस आयुक्तांच्या पुणे महापालिकेला सूचना

CP Pune | PMC Pune | यावर्षी पावसाळा (Monsoon) सुरु होणेपुर्वी शहरातील वॉटर लॉगींगचे ठिकाणांची (Water Logging Places) व ड्रेनेजच्या झाकणांची (Drainage Covers) पाहणी करा. तसेच रस्त्यावरील खड्यांची (Potholes) पाहणी करुन तात्काळ दुरुस्ती आणि उपाययोजना करुन घेणे उचित होणार आहे. जेणेकरुन वाहतूक कोंडी (Traffic Jam) होणार नाही.  तसेच नागरीकांना नाहक त्रास होणार नाही. अशा सूचना पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Pune Ritesh Kumar) यांनी पुणे महापालिकेला (Pune Municipal Corporation) केल्या आहेत. (CP Pune | PMC Pune)

विकासकाम झाल्यानंतर काळजी घेतली जात नाही

पोलीस आयुक्तांनी महापालिकेला दिलेल्या पत्रानुसार पुणे शहरामध्ये विविध विकासकामे (Devlopment Works) सुरु असुन विविध विकासकामांकरीता रस्ते खोदाई ( ड्रेनेज लाईन / पिण्याचे पाईपलाईन / इलेक्ट्रीसीटी केबल / गॅस लाईन ) करण्यात येते. मात्र काम पूर्ण झालेनंतर त्या कामाकरीता खोदलले रस्ते तात्काळ दुरुस्त केले जात नाहीत. कंपनीने नियुक्त केलेला ठेकेदार खोदलेला रस्ता व्यवस्थित बुजवत नाहीत. खडी, माती टाकून बुजवलेल्या रस्त्यावरुन गाडी गेल्यास रस्ता लगेच खचून तो वाढतच जातो. त्यात पाणी साचल्याने खड्डे तयार होतात व असे खड्डे अपघातास कारणीभूत होतात.  विकास कामांकरीता रस्ते खोदाई झालेनंतर खोदलेला भाग बऱ्याच ठिकाणी तसाच ठेवला जात असून त्यामुळे वाहनचालक व नागरिकांना मोठया गैरसोयीला सामोरे जावे लागते. प्रसंगी अपघात होण्याची शक्यता वाढते. (Pune Police)

मेट्रोच्या कामाने अडचणी वाढल्या

पुणे शहरामधील अनेक रस्त्यावर मेट्रोचे कामकाज (Pune Metro) चालु असुन त्या कामाच्या अनषंगाने रस्त्यावर खोदण्याचे कामे करण्यात आलेली आहे. काम पुर्ण झालेनंतर त्याकारीता खोदलेले रस्ते दुरूस्त केले गेलेले नाहीत. त्यामध्ये तात्पुरती खडी, माती टाकुन ते बुजविण्यात येतात. या ठिकाणावरून वाहने जाऊन रस्ता खचला जातो. त्यामुळे मोठा खड्डा होऊन पावसाचे पाणी साठवुन अपघात होण्याची शक्यता असते. मेट्रोच्या कामाचा राडारोडा रस्त्यावर तसाच पडुन वाहतुकीची कोंडी होवुन नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. मेट्रोच्या कामकाजाकरीता बरेच ठिकाणी बॅरीकेडस् करण्यात आले असुन मेट्रोचे कामकाज पुर्ण झालेनंतरही सदर ठिकाणाचे बॅरीकेडस् तसेच असल्याने वाहतुकीस कॅरेज वे कमी मिळुन अडथळा होवुन पावसाळयामध्ये सदर बॅरीकेडस् चुकविण्यात पावसाच्या पाण्यामुळे वाहने घसरून अपघात होतात. मेट्रोच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेली मशिनरी रोडवर तशीच ठेवण्यात आलेली आहे.  त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत असुन वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. (Pune Municipal Corporation News)

वाहनचालकांना करावी लागते कसरत

विविध कामांमुळे रस्त्यांची दूरावस्था होवून त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत असून, पादचाऱ्यांना नेहमी जीव मुठीत घेवून रस्त्यावर चालावे लागत आहे. अनेक भागात सांडपाण्याची वाहिनी तुंबल्यामुळे अगर फुटल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर साचल्यामुळे रस्ता वाहतूकीस उपलब्ध होत नाही. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागते. अनेक ठिकाणी ड्रेनेजची तुटलेली झाकणे, रस्त्यावर अर्धवट बाहेर आलेली झाकणे यामुळे अपघातास निमंत्रण ठरते व रस्त्यावरचे खड्डे व अशी तुटलेली झाकणे चुकविण्याचे नादात वाहनचालकांचे वाहनावरचे लक्ष विचलीत होवून पायी चालणाऱ्या नागरिकांचा तसेच इतर वाहनचालकांचा जीव धोक्यात येऊ शकतो. (Pune police commissioner)

अनधिकृत फेरीवाल्यावर कारवाई आवश्यक

पुणे शहरामध्ये विविध ठिकाणी फुटपाथ, रस्ते या ठिकाणी विशेषतः शहराचे मध्यवर्ती भागात मोठया प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत परिणामी वाहतूकीस रस्ता कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने वाहतूक
कोंडीच्या घटना घडत आहेत, रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. अशा ठिकाणी वाहनचालक रस्त्यातच वाहन उभे करीत असतात, फुटपाथवर झालेल्या अतिक्रमणांमुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरुन चालावे लागते त्यामुळेही अपघात होण्याची शक्यता वाढते. याकरीता अशी अतिक्रमणे काढण्यात येवून फेरीवाले, पथारीवाले यांचेवर दैनंदिन कारवाई करणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांना फुटपाथवरुन चालणे शक्य होवून पादचाऱ्यांचे अपघात कमी होतील. तसेच त्यामुळे वाहतूक कोंडीही कमी होण्यास मदत होईल. (Hawker’s in Pune)

पार्किंग व्यवस्था उपलब्ध करणे आवश्यक

पुणे शहरामध्ये वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून वाहनांकरीता पार्किंग उपलब्ध नसल्याने रोडवर वाहने पार्क होत असतात, याकरीता पुणे महानगरपालिके तर्फे जास्तीत जास्त पार्किंग व्यवस्था उपलब्ध करणे आवश्यक आहे. शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी बाजारपेठ / भाजीमंडई आहे अशा ठिकाणी महानगरपालिकेमार्फत पार्किंगची व्यवस्था / पार्किंग प्लाझा करणे गरजेचे आहे. (Parking Management)

सिग्नल यंत्रणा असणे गरजेचे

पुणे शहरामध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा उपलब्ध नसल्याने वाहतूक नियमन करणे जिकिरीचे होत आहे. त्यातच पुणे शहरातील प्रवेशाचे ठिकाणी जेथे अवजड वाहतूकीची संख्या जास्त आहे, अशा ठिकाणी रस्त्यांची रुंदी जास्त असणे तसेच चौकामध्ये सिग्नल व्यवस्था असणे गरजेचे आहे. (Signal Management)

वाहतूक कोंडीवर उपाययोजनासठी बैठक आवश्यक

पुणे शहरामध्ये वारंवार होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वरील सर्व स्टेक होल्डर्स यांची संयुक्त बैठक झाल्यास एकत्रित चर्चा होऊन पावसाळयापुर्वी उपाययोजना करणेबाबत तात्काळ अंमलबजावणी करणे सोयीचे होईल. जेणेकरुन पावसाळ्यामध्ये उद्भवणाऱ्या समस्यांमुळे व वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागणार नाही. तसेच पोलीसांना वाहतूक नियमन करणे सोईस्कर होईल. ( Pune Traffic update)

पावसाळ्यात खड्डे होणार नाहीत याची दक्षता घ्या

पावसामुळे शहरातील विविध ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडल्याने तसेच विविध कारणांमुळे रस्त्यावर मोठया प्रमाणात पाणी साठून वाहतूक कोंडी झाल्याने वॉटर लॉगींगचे ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यात येवून वॉटर लॉगींग होणाऱ्या ठिकाणी उपाययोजना होणे आवश्यक आहे. मागील वर्षी पावसाचे पाणी साठून वॉटर लॉगींग
झाल्याने त्याचा परिणाम शहरातील वाहतूकीवर झाला होता, शहरामध्ये जागोजागी प्रचंड प्रमाणात वाहतूक
कोंडी होऊन नागरिकांची गैरसोय झाली होती. त्यामुळे नागरिकांना इच्छितस्थळी पोहोचणेसाठी त्रास सहन करावा लागला होता. वॉटर लॉगींगचे ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था होऊन लहान मोठे अपघात झाले. तसेच जागोजागी ड्रेनेजचे झाकणातुन तुंबलेले पाणी रस्त्यावर येऊन बरीचशी वाहने रस्त्यात अडकुन पडल्याने
नागरिकांना त्रास झाल्याने प्रशासनास नागरिकांचा रोष सहन करावा लागला. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी
पावसाळयापुर्वीच ड्रेनेज झाकणांची दुरुस्ती तसेच रस्त्यांची दुरुस्ती वेळेत होणे अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरुन नागरिकांना तसेच प्रशासनास नाहक त्रास सहन करावा लागणार नाही व नागरिकांची गैरसोय
होणार नाही. माहितीचे अनुषंगाने यावर्षी पावसाळा सुरु होणेपुर्वी अशा वॉटर लॉगींगचे ठिकाणांची व ड्रेनेजच्या झाकणांची पाहणी तसेच रस्त्यावरील खड्यांची पाहणी करुन तात्काळ दुरुस्ती / उपाययोजना करुन घेणे उचित राहील जेणेकरुन वाहतूक कोंडी होणार नाही तसेच नागरीकांना नाहक त्रास होणार नाही. असे पोलिस आयुक्तांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
—-
News Title | CP Pune |  PMC Pune |  Take care that Pune residents do not face any hardship during monsoon season  Notice of Pune Police Commissioner to Pune Municipal Corporation