Maharashtra Andhashradhha Nirmoolan Samiti | भूताच्या शोधात रात्रभर स्मशानात | महाराष्ट्र अंनिसच्या पुणे शहर शाखेचा उपक्रम

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

Maharashtra Andhashradhha Nirmoolan Samiti | भूताच्या शोधात रात्रभर स्मशानात | महाराष्ट्र अंनिसच्या पुणे शहर शाखेचा उपक्रम

Maharashtra Andhashradhha Nirmoolan Samiti – (The Karbhari News Service) – उरुळी कांचन जवळील भवरापुर गावच्या स्मशानभूमीत लहान मोठे पन्नास जण शनिवारी (दि.६) रात्रभर मुक्कामी राहिले. तिथेच जेवले, स्वच्छता केली, गाणी म्हटली, चमत्काराचे प्रयोग सादर केले, भूतांची माहिती जाणून घेतली, त्यांना साद घातली, पण भुते काही दिसली नाहीत. स्मशानात अतृप्त आत्मे हे भुताच्या स्वरूपात भटकतात आणि त्यांचा पांढरा वेश, उलटे पाय, उंच शरीरयष्टी असते, हा समाज काही खरा ठरला नाही. मात्र इंद्रियजन्य भास आणि असे-असे भूत असते, या संस्कारातून भुताची कल्पना लोकांच्या मनांमध्ये रुजल्याचे सगळ्यांना मनोमन पटले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुणे शहर शाखेने भवरापुर ग्रामपंचायतच्या सहकार्याने स्मशान भेट कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शनिवारी सायंकाळी सातवाजेपासून रविवारी सकाळी सातवाजेपर्यन्त पन्नास जण स्मशानात मुक्कामी होते. यावेळी गावाचे सरपंच सचिन सातव, शाखेचे अध्यक्ष लालचंद कुंवर, कार्याध्यक्ष विशाल विमल, सचिव स्वप्नील भोसले, माजी सरपंच बबन साठे, सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. मयूर पटारे, निशांत धाईंजे, प्रवीण खुंटे, रतन नामपल्ले, स्नेहल लांडगे, अनुज भुजबळ, मनोहर पाटील, समाधान भगत, नम्रता ओव्हाळ, राज भगत, ज्ञानेश महाजन, संजय निकम, योगेश हुपरिकर, मंगेश चित्ते, सुरज चव्हाण, विवेक इंगोले यांच्या प्रयत्नातून कार्यक्रम पार पडला.

भुताची कल्पना जनमानसाच्या मानगुटीवर

‘एका पिढीकडून पुढच्या पिढीच्या मनावर अनेक माध्यमांद्वारे भूत असल्याचे कल्पना रंगवून संस्कार केले जातात. तसेच, मानसिक अनारोग्य व इंद्रियजन्य भ्रमातून भूत असल्याचे भास निर्माण होतात. त्यामुळे आजही समाजात भुताची कल्पना जनमानसाच्या मानगुटीवर बसली आहे. त्यातून अंधश्रद्धा, भीती, शोषण, मानसिक ताण, फसवणूक घडत आहे. लोकांना त्यातून बाहेर काढण्यासाठी प्रबोधनाची गरज आहे’, असे विशाल विमल यांनी सांगितले.

Sting Operation | MANS | महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे स्टिंग ऑपरेशन | पाषाणसारख्या उच्छभ्रू भागात भोंदूगिरी उघड

Categories
Breaking News cultural social पुणे

Sting Operation | MANS | महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे  स्टिंग ऑपरेशन | पाषाणसारख्या उच्छभ्रू भागात भोंदूगिरी उघड

Sting Operation | MANS | पुण्यातील पाषाणसारख्या उच्चभ्रू भागात कन्सल्टन्सीच्या नावाखाली जादूटोणा करत असलेल्या वृषाली ढोले शिरसाठ या तरुण महिलेचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (Maharashtra Andhshraddha Nirmulan Samiti) कार्यकर्ते, पोलीस आणि पीडित व्यक्तीने स्टिंग ऑपरेशन (Sting Opération) करून पर्दापाश केला आहे. नैराश्य दूर करून स्पर्धा परीक्षेत यश मिळवून देण्यासाठी युवकाला औषधोपचार घेण्यापासून रोखून त्याला गंडेदोरे बांधून राख खायला दिली. पाय धुतलेले पाणी प्यायला दिले. अंगी अंतींद्रिये शक्ती असल्याचे भासवून युवकाला मृत्यूची भीती घातली. युवकाची सुमारे दीड लाख रुपयांची फसवणूक करून त्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे. अशी माहिती विशाल विमल (Vishal Vimal) यांनी दिली.
या प्रकरणी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात वृषाली संतोष ढोले शिरसाठ (वय – 39, रा. वंशज गार्डन, पाषाण) या महिलेसह साथीदार माया राहुल गजभिये ( वय- 45, रा. विठ्ठलनगर, पाषाण) आणि सतीश चंद्रशेखर वर्मा (वय – ३३, रा. गणेश हॉस्टेल, पाटीलनगर, बावधन) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. फसवणूक झाल्याप्रकरणी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या पाषाण परिसतील 23 वर्षीय युवकाने फिर्याद दिली आहे. जादूटोणा विरोधी कायदा कलम 3(2) आणि भारतीय दंड विधान संहिता कलम 420, 506(2), ३४ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. सदर प्रकरणी पुढील कार्यवाही चतुशृंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जगन्नाथ जानकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी गुरव, पोलीस उपनिरीक्षक विद्या पवार करत आहेत.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पुर्णवेळ कार्यकर्ते विशाल विमल (बोपोडी, पुणे) यांना सदर महिला आणि साथीदार हे जादूटोणा, भोंदूगिरी आणि फसवणूक करत असल्याची नोव्हेंबर महिन्यात माहिती मिळाली. महा. अंनिसच्या पुणे शहर शाखेच्या कार्यकर्त्यानी सदर प्रकरणी शहानिशा केली.  वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (दि. १६)  विशाल विमल हे पिडित युवक व साध्या वेशातील चतुशृंगी ठाण्याच्या पोलिसांसोबत सदर महिलेच्या पाषाण, मुक्ता रेसिडेन्सी येथील गुरुदत्त कन्सल्टन्सी कार्यालयात उपचारासाठी गेले. रिसेपशनिस्ट माया गजभिये आणि सतिष वर्मा हे बाहेरच्या रुममध्ये बसले होते. विशाल यांना कन्सल्टींग फी एक हजार  रुपये भरावयास लावून त्यानंतर विशाल  यांना आतमधील रुममध्ये जाण्यास सांगितले. आतमध्ये बसलेल्या वृषाली ढोले शिरसाठ यांनी कोणतीही समस्या न विचारता विशाल यांच्या हातात गंडा बांधून राख खाण्यास दिली. सदर महीला ही आघोरी, अनिष्ठ, जादुटोणा प्रकार करुन लोकांना फसवत असल्याची विशाल यांचीही खात्री झाल्याने त्यांनी पोलीसांना आतमध्ये बोलावले.  पोलीसांनी आतमध्ये येऊन सदर पंचनामा करुन जादूटोण्याच्या वस्तू जप्त केल्या आहेत.
स्पर्धा परीक्षांमध्ये अपयश आल्याने सदर युवक नैराश्येमध्ये होतो. समुपदेशक महिला असल्याची सोशल मीडियावरील जाहिरात पाहून हा युवक सदर महिलेकडे सप्टेंबर २०२१ पासून उपचारासाठी जात होता. त्याला  कोणतीही समस्या न विचारता सदर महिलेने अतेंद्रीय शक्तीने समस्या ओळखल्याचे सांगितले.  युवकाचे आयुष्य वयाच्या ३० वर्षापर्यंत आहे असे सांगुन ते वाढविण्यासाठी आलौकीक शक्तीची कृपा असलेला गंडा हातात बांधण्यास व राख  खाण्यास दिली. त्याने युवकाच्या घशाला इजा झाली आणी पोटाचा विकार झाला. सदर महिलेने तिच्या अंगात अतेंद्रिय शक्ती असल्याचे सांगुन गंडा न बांधल्यास युवकाला मृत्युची भीती घातली. नैराश्य आर्थिक अडचण दूर होण्याचा चमत्कार घडेल औषध उपचार घेण्याची गरज नाही असे भाकीत करुन युवकाची सुमारे दीड लाख रुपये अर्थिक फसवणुक केली आहे. तसेच सदर महिलेने युवकाकडून स्वतःची पुजा करून घेऊन त्याला पाय धुतलेले पाणी प्यायला दिले आहे. त्यामुळे त्याला  पोटाचे विकार झाले.   सदर महिलेने युवकाचे मित्र आणि नातेवाईक यांनाही शारीरीक व मानसीक आजार बरे करण्यासाठी घेऊन येण्यास सांगून त्यांचीही फसवणूक केली आहे.

Andhshradhha Nirmoolan Samiti | Vishal Vimal | पैशाचा पाऊस हा जादूटोणाविरोधी गुन्हा | गुन्हा दाखल करण्याची महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीची मागणी

Categories
Breaking News cultural social पुणे

Andhshradhha Nirmoolan Samiti | Vishal Vimal | पैशाचा पाऊस हा जादूटोणाविरोधी गुन्हा | गुन्हा दाखल करण्याची महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीची मागणी

 

Andhshradhha Nirmoolan Samiti | Vishal Vimal |पुणे : अंधश्रद्धा, जादूटोणा, चमत्कार करून पाच कोटी रुपयांचा पाऊस पाडतो असे सांगून भोंदूबाबा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हडपसर परिसरातील एका युवकाची १८ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. हा सगळा प्रकार महाराष्ट्रात लागू असलेल्या जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा असून या कायद्याच्या कलम 3 नुसार भोंदूबाबा आणि सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पूर्णवेळ कार्यकर्ते विशाल विमल यांनी केली आहे. (Andhshradhha Nirmoolan Samiti | Vishal Vimal)

युनिव्हर्सल शाळेशेजारी असलेल्या एका बंगल्यामध्ये भोंदूबाबा पूजा मांडून बसला होता. पैशांचा पाऊस पाडतो असे सांगून १८ लाख रुपये भरा, त्याचे तुम्हाला ५ कोटी रुपये करून देतो असे आमिष त्याने दिले होते. अधिक पैसे मिळवण्याच्या आमिषाला बळी पडून चमत्कार जादूटोण्याच्या आहारी गेलेल्या एका तरुणाने १८ लाख रुपये बाबाला दिले. त्यांनतर तोतया पोलिसांचे पथक तेथे आले आणि ते १८ लाख रुपये व भोंदूबाबाला घेऊन गेले. मात्र पोलिस हे तोतया असून भोंदूबाबा आणि सहकाऱ्यांनी ही एकत्रित येऊन फसवणूक केल्याचे तरुणांच्या नंतर लक्षात आले. ३ ऑक्टोबर २०२३ रोजी हा प्रकार घडला आहे. यासंबंधी तरुणाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे. भोंदूबाबा आयरा शाब, माधुरी मोरे, रॉकी वैद्य, किशोर पांडागळे यांच्याविरोधात हडपसर पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधान संहितेच्या कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. मात्र त्यात जादूटोणाविरोधी कायद्याची कलमे समाविष्ट केलेली नाहीत.

पैशाचा पाऊस पाडण्याचा चमत्कार घडवून आणण्याचा दावा करून त्यासाठी आर्थिक फसवणूक करणे हा महाराष्ट्रात १० वर्षांपासून लागू असलेल्या जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा आहे. युवकाची १८ लाख रुपयांची फसवणूक करून चमत्काराद्वारे पाच कोटी रुपयांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखविणे हा जादूटोणा विरोधी कायद्याच्या कलम 3 स्वरूपानुसार गुन्हा आहे. त्यामुळे भोंदूबाबा आणि या फसवणूक प्रकारात सहभागी असणाऱ्या सहकाऱ्यांविरोधात जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विशाल विमल यांनी केली आहे.

पाऊस, दुष्काळ, अतिवृष्टी, वेळीअवेळी पाऊस का पडतो आणि त्याच्यामागे असलेल्या कार्यकारणभावाची माहिती प्राथमिक शाळेत मिळते. मात्र आपल्या समाजात हा कार्यकारणभाव अजूनही लक्षात घेतला जात नसल्याने पैशाचा पाऊस पडण्याच्या आमिषावर लोक विश्वास ठेवत आहेत. पैशाच्या पावसातून आर्थिक प्राप्ती होणार यासाठी स्वतःची आर्थिक फसवणूक करून घेत आहेत, ही अत्यंत चिंताजनक गोष्ट आहे, असेही विशाल विमल यांनी सांगितले.

MANS Vs Bageshwar Dham Sarkar | राज्याच्या गृह खात्याचे संविधान विरोधी कृत्यांना पाठबळ | धिरेंद्र शास्त्रीच्या दरबारात गृहमंत्री, पोलीस अधिकारी नतमस्तक | महा. अंनिस चा आरोप 

Categories
Breaking News cultural Political social पुणे महाराष्ट्र

MANS Vs Bageshwar Dham Sarkar | राज्याच्या गृह खात्याचे संविधान विरोधी कृत्यांना पाठबळ | धिरेंद्र शास्त्रीच्या दरबारात गृहमंत्री, पोलीस अधिकारी नतमस्तक | महा. अंनिस चा आरोप

 

MANS Vs Bageshwar Dham Sarkar |वादग्रस्त असलेल्या बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांचा पुण्यातील संगमवाडी परिसरातील तीन दिवशीय सत्संग आणि दरबार कार्यक्रम 22 नोव्हेंबर २०२३ रोजी संपला असला तरी आमचे काम अद्याप संपलेले नाही. अशास्त्रीय, अवैज्ञानिक, घटनाबाह्य, दिशाभूल, फसवणूक करणारे आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे वक्तव्य, भाष्य, कृत्य धिरेंद्र शास्त्री सतत करत असून त्याची पुनरावृत्ती पुण्यात देखील झाली आहे, असा आरोप महा. अंनिसने केला आहे. गुन्हे दाखल करून कारवाईची मागणी पोलीस यंत्रणेकडे कार्यक्रमपूर्व केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून थेट राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलीस अधिकारी धिरेंद्र शास्त्री यांच्या चरणी लिन झाले आहेत. राज्याचा गृह विभाग अशास्त्रीय, अवैज्ञानिक, घटनाबाह्य वक्तव्य, भाष्य, कृत्य करणाऱ्याला, दिशाभूल, फसवणूक करणाऱ्याला व अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्याला बळ, पाठींबा देत आहेत. उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलीस प्रशासनाचे हे वर्तन संविधान विरोधी आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पूर्णवेळ कार्यकर्ते विशाल विमल यांनी केले आहे. महा. अंनिसने मागण्यांचे निवेदन पुन्हा गुरुवारी पोलीस प्रशासनाला दिले आहे. पुणे शहर अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त आर राजा यांची भेट घेतली. यावेळी विशाल विमल, एकनाथ पाठक, प्रतीक पाटील उपस्थित होते.

अपरिचित व्यक्तीच्या भूतकाळात घडलेल्या गोष्टी अचूकपणे कागदावर लिहून दाखवतो. लोकांच्या मनात काय सुरू आहे ते ओळखतो. असाध्य आजार बरे करतो. भूत प्रेते पळवून लावतो. लिंबूद्वारे समाधान प्राप्त करून देतो, आदी दावे धीरेंद्र शास्त्री यांनी त्यांच्या कार्यक्रमातून केले आहेत. तसेच संतांसंबंधी चुकीची बदनामीकारक वक्तव्य केली आहेत. धिरेंद्र शास्त्री यांनी महा. अंनिसच्या चमत्कार सिद्ध चाचणीला सामोरे जाण्याऐवजी पळवाट काढली आहे. तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी भक्त आणि संयोजकांमध्ये हाणामारी झाली. शहरात पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, आदी सर्व बाबी या तत्सम कायद्यांच्या नियमांचा भंग करणाऱ्या असून कारवाईसाठी पात्र आहे. त्यामुळे वरील बाबींसंदर्भात गुन्हे दाखल करून कारवाई व्हावी, अशीही मागणी महा. अंनिसने केली आहे.

 

१) पुण्यात झालेल्या सदर कार्यक्रमाचे व्हिडीओ शूटिंग करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे पोलीस प्रशासनाकडे केली होती. ते व्हिडीओ शूटिंग उपलब्ध करून द्यावे. प्रचलित कायद्यांच्या विसंगत विधाने, भाष्य, वक्तव्ये, इशारे, कृत्य धिरेंद्र शास्त्री यांनी केल्याचे प्रसारमाध्यमातून समोर आले आहे. त्यामुळे संपूर्ण कार्यक्रमाचा व्हिडीओ तपासून धिरेंद्र शास्त्री यांच्यावर जादूटोणाविरोधी कायदा, ड्रग्ज अँड मॅजिक ॲक्ट आणि तत्सम कायद्यांनुसार गुन्हा दाखल करून कारवाई करावी. २) संतांसंबंधी धिरेंद्र शास्त्री यांनी चुकीची, बदनामीकारक वक्तव्य केली आहे. त्यामुळे धिरेंद्र शास्त्री यांना समज देण्यात यावी आणि तत्सम कायद्यांच्या आधारे गुन्हे दाखल करून कारवाई करावी. ३) धिरेंद्र शास्त्री हे चमत्काराचे अशास्त्रीय, अवैज्ञानिक, अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे दावे करत आहेत. ते दावे त्यांनी सिद्ध करून दाखवावेत आणि आमचे 21 लाख रुपये बक्षीस मिळवावे, असे आव्हान आहे. राज्यात सोईच्या ठिकाणी, तज्ञ कमिटीसमोर, निवडक कार्यकर्त्यांसह ही दावे सिद्धता चाचणी होईल. ही चाचणी घेण्यासाठी पोलीस यंत्रणेने सहकार्य करावे आणि धिरेंद्र शास्त्री यांना हजर करावे. ४) वर्दीवर असणारे पोलीस अधिकारी हे धिरेंद्र शास्त्री यांच्या दरबारात जाऊन शास्त्रीपुढे नतमस्तक झाले. त्यांनी अशास्त्रीय पद्धतीने समस्यांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न केला असून त्यांचे दरबारात जाणे हे महाराष्ट्र सेवा अधिनियम व तत्सम कायद्यांचा भंग करणारे आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी. ५) धिरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी भक्त आणि संयोजक यांच्यामध्ये हाणामारी झाली आहे. तसेच शहरात वाहतूक कोंडी आणि पार्किंगचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे यासंबंधी संबंधितांवर कारवाई व्हावी. ६) धिरेंद्र शास्त्री यांची विधाने, भाष्य, कृत्ये याला महा. अंनिसचा विरोध असून त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी एका निवेदनाद्वारे पोलीस प्रशासनाकडे कार्यक्रमपूर्व केली होती. पण त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. पुण्यातील कार्यक्रमात देखील पुन्हा धिरेंद्र शास्त्री यांनी अशास्त्रीय, अवैज्ञानिक, घटनाविरोधी, अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे, चुकीची माहिती देणारे वक्तव्य, भाष्य, कृत्य केली आहेत. धिरेंद्र शास्त्री यांची ही कार्यपद्धती थांबत नाही. त्यामुळे पुन्हा पुण्यात धिरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमाला परवानगी देऊ नये. पुन्हा होणाऱ्या कार्यक्रमाला महा. अंनिसचा विरोध असणार आहे. ७) धीरेंद्र शास्त्री हे करत असलेले दावे अशास्त्रीय असल्याची उकल करून शास्त्रीय विचारधारा समाजात रुजवण्यासाठी शासन संस्थेने प्रसारमाध्यमे, शिक्षण संस्था आदींमार्फत प्रयत्न करावेत. ८) धीरेंद्र शास्त्री यांच्या दाव्यांविरोधी महा. अंनिस शास्त्रीय माहिती, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करण्याचे काम करत आहे, त्याला पाठबळ द्यावे.

भारतीय राज्यघटनेने व्यक्तीला देव धर्म श्रद्धा उपासना स्वातंत्र्य दिले. त्याचा महा. अंनिस संघटना आदर करते. मात्र व्यक्तीची देव धर्म श्रद्धा उपासनेच्या आधारे फसवणूक, दिशाभूल, शोषण होत असेल, त्यातून सार्वजनिक आरोग्य, नीतिमत्ता, कायदा सुव्यवस्थेला अडथळा येत असेल तर त्याविरोधी संघटना भूमिका, प्रबोधन, प्रतिकार, कृतिकार्यक्रम करत आली आहे. महा. अंनिसचे हे वर्तन घटनेशी सुसंगत असून मानवी जीवन समृद्ध करण्यासाठीचे आहे. धीरेंद्र शास्त्री हे लोकांच्या देव, धर्म, श्रद्धा, उपासना आणि भावना, अगतिकता, अज्ञान यांचा गैरफायदा घेऊन लोकांना देव धर्म श्रद्धा उपासनेशी निगडित विसंगत, अशास्त्रीय, अवैज्ञानिक बाबी सांगत आहेत. लोकांना ते सांगून प्रभावित करत असून अशास्त्रीय मार्गाने जगण्यास प्रवृत्त करत आहेत. हे भारतीय राज्यघटनेच्या दृष्टीने विसंगत आहे. भारतीय राज्य घटनेत वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करणे हे नागरिकांचे कर्तव्य असल्याचे सांगितले आहे. मात्र धीरेंद्र शास्त्री हे अशास्त्रीय, अवैज्ञानिक दावे करून लोकांना प्रभावित करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी करत आहोत.

Bageshwar Dham Sarkar News | अगर कोई आपत्ति है तो दरबार में आमने-सामने करेंगे | बागेश्वर धाम सरकार की ‘अनीस’ को जवाबी चुनौती

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र

Bageshwar Dham Sarkar News | अगर कोई आपत्ति है तो दरबार में आमने-सामने करेंगे | बागेश्वर धाम सरकार की ‘अनीस’ को जवाबी चुनौती

Bageshwar Dham Sarkar News | पुणे: हमारा द्वारपाल हिंदू एकता और भारतीय संस्कृति के संरक्षण और प्रचार के लिए है।  धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) उर्फ ​​बागेश्वर धाम सरकार ने महाराष्ट्र अंधश्रद्धा उन्मूलन समिति (MANS) को जवाबी चुनौती दी कि क्या इस पर कोई आपत्ति है.  उन्होंने अपने राजनीतिक समर्थकों को भी सलाह दी कि वे चुनाव तभी जीतेंगे जब वे जनता को अपने पिता के समान मानेंगे।(Bageshwar Dham Sarkar)
 भारतीय जनता पार्टी के पूर्व विधायक जगदीश मुलिक ने संगमवाड़ी में बागेश्वर बाबा का तीन दिवसीय संतसंग दरबार का आयोजन किया है।  कार्यक्रम से पहले बाबा ने पत्रकारों से बातचीत की.  अनीस समेत कई राजनीतिक दलों और संगठनों ने बाबा के इस दरबार का विरोध किया है.  एनिस ने आक्रामक तरीके से मांग की कि बाबा संविधान के खिलाफ बोलते हैं, संतों की आलोचना करते हैं, अवैज्ञानिक सबूत देकर अंधविश्वास को बढ़ावा देते हैं, उनके खिलाफ मामला दर्ज किया जाए।  इस बारे में बात करते हुए बागेश्वर बाबा ने कहा कि दरबार हर किसी को हिंदू संस्कृति के बारे में जानने के लिए है.  मैं अस्पतालों के ख़िलाफ़ नहीं हूं, लेकिन मुझे नहीं लगता कि मंत्र विज्ञान और मंत्र चिकित्सा की वकालत करने में कुछ भी गलत है।  बाबा ने यह भी दावा किया कि मुझ पर भगवान की कृपा है.
 बागेश्वर बाबा ने कहा कि अगर तुम्हें आपत्ति है तो कोर्ट में आओ, आमने-सामने करके सुनाएंगे, लेकिन उस वक्त बहाना मत बनाना.  संविधान में अब तक इतने संशोधन हो चुके हैं तो एक संशोधन हिंदू राष्ट्र के लिए भी कर दीजिए.  हिंदू राष्ट्र बन जाने से अल्पसंख्यकों को कहीं जाने की जरूरत नहीं है.  हिंदू राष्ट्र में सामाजिक समरसता, समानता और धर्म के अंतर्गत कर्म का महत्व होगा।  लेकिन अगर किसी के दिल में झूठ है, तो उसके लिए हिंदू राष्ट्र में कोई जगह नहीं है,’ बागेश्वर बाबा ने कहा।

 संत तुकाराम का सम्मान

 संत तुकाराम मुझे भगवान जैसा लगता है।  एक लेख पर बोलते समय मैंने उनके सन्दर्भ में बुन्देलखण्डी भाषा के शब्दों का गलत प्रयोग किया।  मैं उसके लिए माफी माँगता हूँ।  अगर पुणे दौरे में समय मिला तो हम देहू जाकर संत तुकाराम महाराज की समाधि के दर्शन करेंगे
– धीरेंद्र शास्त्री उर्फ ​​बागेश्वर धाम सरकार

If any objections, we will do it face to face in Darbar | Bageshwar Dham sarkars counter-challenge to ‘Anis'(MANS)

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

If any objections, we will do it face to face in Darbar | Bageshwar Dham sarkars counter-challenge to ‘Anis'(MANS)

 Pune: Our gatekeeper is for preserving and promoting Hindu unity and Indian culture.  Dhirendra Shastri alias Bageshwar Dham Sarkar gave a counter challenge to the Maharashtra Superstition Eradication Committee if there are any objections to it.  He also advised his political supporters that they will win the elections only if they treat the people as their father.
 Former Bharatiya Janata Party MLA Jagdish Mulik has organized a 3-day Santsang Durbar of Bageshwar Baba at Sangamwadi.  Baba interacted with journalists before the program.  Anis (MANS) and many political parties and organizations have opposed this court of Baba.  MANS  aggressively demanded that Baba speaks against the constitution, criticizes saints, fuels superstitions by giving unscientific proofs, to file a case against him.  Talking about it, Bageshwar Baba said that the Durbar is there for everyone to know about Hindu culture.  I am not against hospitals, but I don’t think there is anything wrong in advocating mantra science and mantra therapy.  Baba also claimed that I have the grace of God.
 Bageshwar Baba said that if you have objections, then come to the Darbar, let’s do it face to face, but don’t make excuses at that time.  So many amendments have been made in the constitution so far, then make one amendment for Hindu Rashtra.  Minorities don’t need to go anywhere as Hindu Rashtra has become.  Social harmony, equality and karma under religion will be important in Hindu Rashtra.  But if one has a lie in his heart, he has no place in Hindu Rashtra,’ said Bageshwar Baba.
 Respect for Saint Tukaram
 Sant Tukaram I feel like God.  While speaking on an article, I made a wrong use of words in reference to him from Bundelkhandi language.  I apologize for that.  If we have time in our Pune tour, we will go to Dehu and see the Samadhi of Sant Tukaram Maharaj
– Dhirendra Shastri aka Bageshwar Dham Sarkar

Dhirendra Shastri News | धिरेंद्र शास्त्रीनी दावे सिद्ध केल्यास २१ लाखांचे बक्षीस देणार | महा. अंनिसचे आव्हान

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र

Dhirendra Shastri News | धिरेंद्र शास्त्रीनी दावे सिद्ध केल्यास २१ लाखांचे बक्षीस देणार | महा. अंनिसचे आव्हान

Dhirendra Shastri News | बागेश्वर धामचे धिरेंद्र शास्त्री बाबा (Dhirendra Shastri Bageshwar Dham) सत्संग व दरबाराच्या माध्यमातून अशास्त्रीय, अवैज्ञानिक, घटनात्मक तरतुदीविरोधी भाष्य आणि अंधश्रद्धला खतपाणी घालणारी वक्तव्ये, कृती, दावे करत असतात. त्याला महा. अंनिसने आक्षेप घेऊन बाबांवर गुन्हा नोंदवून कारवाई करण्याची मागणी शासन यंत्रणेकडे केली आहे. तसेच बाबा जे अशास्त्रीय, अवैज्ञानिक, वक्तव्य, दावे, कृती करत आहे, त्यासंबंधी बाबांनी सोयीच्या ठिकाणी, नियंत्रित परिस्थितीत आणि वकील, पोलीस अधिकारी, निवडक कार्यकर्ते, विविध क्ष्रेत्रतील निवडक तज्ञ मंडळींच्या कमिटीसमोर दावे, कृती सिद्ध करावेत, बाबांना 21 लाखांचे बक्षीस दिले जाईल असे आव्हान बाबांना महा. अंनिसने वेळोवेळी दिले आहे. मात्र ते आव्हान बाबा लेखी स्वरूपात स्वीकारत नसल्याचे महा. अंनिसचे (Maharashtra Andhashradhha nirmoolan samiti) पूर्णवेळ कार्यकर्ते विशाल विमल (Vishal Vimal) यांनी सांगितले. (Bageshwar Baba News)

पुण्यात सोमवार ते बुधवार या तीन दिवस बागेश्वर धामचे धिरेंद्र शास्त्री बाबांचा सत्संग व दरबार कार्यक्रम होत आहे, त्या पार्श्वभूमीवर बाबांनी सोमवारी (दि. २०) पत्रकार परिषदेत महा. अंनिसने दिलेल्या आव्हान प्रक्रियेसंबंधी दिशाभूल करणारे वक्तव्य केले असल्याचे प्रसारमाध्यमातून समजले. “माझ्या दरबारामध्ये या, तुमचे काय म्हणणे आहे ते मांडा. आपण दूध का दूध आणि पाणी का पाणी करू, एकदाच आमने- सामने होऊन जाऊ द्या” असे बाबांनी म्हटले आहे. यासंबंधी बोलताना विशाल विमल म्हणाले की, सोशल मीडियावर बाबांचे जे भक्त हिंसक प्रतिक्रिया देतात, स्वतः बाबा देखील अशास्त्रीय, असंविधानिक, अवैज्ञानिक, अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे, चितावणीखोर आणि भडकावून वक्तव्य करतात. त्यामुळे आक्षेप, खुलासे, दाव्यांची सिद्धता ही दरबारात, सत्संगाच्या ठिकाणी शांततेत कशी होऊ शकते ? असा प्रश्न उपस्थित करून विशाल विमल म्हणाले की, उलट दरबारात आमने सामने आल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे वस्तुस्थिती पाहता बाबांच्या दरबारात अथवा सत्संगाच्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था पाळण्याची जबाबदारी असणारी शासन यंत्रणा, पोलीस यंत्रणा आणि खुद्द बाबा देखील आमने सामने वक्तव्य आणि दाव्यांची सिद्धता चाचणी पार पाडू शकत नाहीत. त्यामुळे दरबारात, सत्संगाच्या ठिकाणी आमने सामने यावे असे म्हणणे ही बाबांनी काढलेली पळवाट आहे.

महा. अंनिसने आजवर विविध धर्मीय बुवाबाबा आणि अम्मा ताईंच्या अशास्त्रीय दाव्यांचा पर्दापाश केला आहे. अनेक बाबांना आव्हान देऊन त्यांची सिद्धता चाचणी घेऊन त्यांचे दावे खोटे असल्याचे सिद्ध केले. त्यामुळे धिरेंद्र शास्त्री बाबा करत असलेले दावे त्यांनी सिद्ध करण्याचे महा. अंनिसचे आव्हान स्वीकारावे. आव्हान स्वीकारल्याचे लेखी द्यावे. महा. अंनिस बाबांच्या संबंधी जी भूमिका घेत आहे ती संविधानिक आहे. त्यामुळे शासन व्यवस्थेने या प्रकरणाकडे केवळ बघ्याच्या भूमिकेतून न पाहता, पुढाकार घेऊन नियंत्रित परिस्थितीत दाव्यांची सिद्धता चाचणी आयोजनात सहभाग दर्शवावा. बाबांनी सोयीच्या ठिकाणी, नियंत्रित परिस्थितीत आणि वकील, पोलीस अधिकारी, निवडक कार्यकर्ते, विविध क्ष्रेत्रतील निवडक तज्ञ मंडळींच्या कमिटीसमोर दावे, कृती सिद्ध करावेत, असे पुन्हा आम्ही बाबांना आव्हान देत आहोत, असेही विशाल विमल म्हणाले. संघटनेच्यावतीने लवकरच बाबांशी पत्रव्यवहार केला जाणार आहे. राज्यात सोईच्या ठिकाणी नियंत्रित परिस्थितीत दावे सिद्ध करण्याची प्रक्रिया पार पाडण्यासाठी अंनिस तयार आहे. बाबांनी दावे सिद्ध केल्यास 21 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल, असेही विशाल विमल म्हणाले.

Unscientific claims of Baba Bageshwar | MANS demands legal action

Categories
Breaking News cultural social पुणे

Unscientific claims of Baba Bageshwar | MANS demands legal action

Bageshwar Maharaj in Pune | Accurately writes down on paper what happened in the past of a stranger. Knows what’s going on in people’s minds. Talks with Ravana over the phone. Cures disease. The ghost drives away the dead. Gives satisfaction through lemon. Dhirendra Shastri Baba of Bageshwar Dham claims that he is the messenger of God through his program. He also makes defamatory statements about saints. Maha demands that action should be taken against Bageshwar’s father who made claims and comments that are anti-constitutional, unscientific, unscientific and fueling superstition. It has been done by the Pune District Executive of Annis. Satsang and Darbar program of Baba of Bageshwar is being held for three days from Monday to Wednesday in Pune, on this occasion Maha. The district executive of Maharashtra Andhshraddha Nirmulan Samiti Pune has made this demand, said Vishal Vimal, a full-time worker of the organization in a press conference. At this time Maha. Annis Pune District Working President Samyak Vs. M., District Officer Eknath Pathak, Pune City Branch Officer Swapnil Bhosale, Prateek Patil etc. were present.

The Constitution of India gives individual freedom of religion, belief and worship. His Majesty. Annis organization respects. However, if a person is being cheated, misled, exploited on the basis of worshiping God, religion, faith, public health, ethics, law and order, the organization has been playing a role, awakening, resisting, and working against it. Maha. This behavior of Annis is in harmony with the constitution and enriches human life. Baba of Bageshwar is taking advantage of people’s God, religion, faith, worship and emotions, vulnerability, ignorance and telling people inconsistent, unscientific, unscientific matters related to God, religion, faith and worship. Influencing people by telling them and leading them to live in an unscientific way. This is inconsistent with the Constitution of India. The Constitution of India states that it is the duty of citizens to adopt a scientific approach. But Baba of Bageshwar is influencing people by making unscientific, unscientific claims. The Drugs and Magic Remedies Advertisement Objectable Act 1954 of the Central Government and the Anti-Witchcraft Act have been in force in the state for ten years. Bageshwar’s father is violating this law. This Baba has also made false and defamatory statements about Sant Tukaram Maharaj that Jijai alias Awali, Tukob’s wife used to beat him daily, so he became a devotee of Ramji. Vishal Vimal also said that we are demanding action against them.

Here are the demands

1) Baba of Bageshwar is making unscriptural claims, commentaries which are inconsistent with the principles of the Indian Constitution. Therefore, the government should take action against those who claim and comment against the principles of the constitution under the Anti-witchcraft Act, Drugs and Magic Act and similar laws.
2) Taking into consideration the defamatory and damaging statements of Baba of Bageshwar regarding saints, action should be taken against him as per Indian Penal Code and other similar laws.
3) Government organization should make efforts through mass media, educational institutions etc. to inculcate scientific ideology in the society by deciding that the claims made by Bageshwar Baba are unscientific.
4) Bageshwar’s Maha against Baba’s claims. Annis is working to spread scientific information, scientific approach, it should be supported by the government system.
5) Bageshwar’s Baba to prove the claims he is making. Accept the challenge of Annis. Baba has been challenged through the media regarding this. On behalf of the organization, correspondence with Baba will be done soon. The process of proving claims will be carried out under controlled conditions at a place of convenience in the State. A reward of Rs 21 lakh will be given if those claims are proved.
6) Baba’s program of Bageshwar is taking place on Monday, Tuesday and Wednesday (20th, 21st, 22nd) at Sangamwadi area in Pune. Government system should strictly warn Baba and organizers of programs not to make unscientific, unscientific, fueling superstitions and defamatory statements and inflammatory statements, statements that spoil social health by Babas of Bageshwar.
7) The government system should instruct the organizers to shoot video of the said event taking place in Pune. In case of statements, comments, statements, warnings, actions inconsistent with the prevailing laws, action should be taken against the father by filing a case.

Bageshwar Maharaj in Pune | बागेश्वरच्या बाबांचे घटनाविरोधी अशास्त्रीय दावे | कायदेशीर कारवाईची महा.अंनिसची मागणी

Categories
Breaking News cultural social पुणे

Bageshwar Maharaj in Pune | बागेश्वरच्या बाबांचे घटनाविरोधी अशास्त्रीय दावे

| कायदेशीर कारवाईची महा.अंनिसची मागणी

Bageshwar Maharaj in Pune | अपरिचित व्यक्तीच्या भूतकाळात घडलेल्या गोष्टी अचूकपणे कागदावर लिहून दाखवतो. लोकांच्या मनात काय सुरू आहे ते ओळखतो. रावणासोबत फोनद्वारे बोलतो. आजार बरे करतो. भूत प्रेते पळवून लावतो. लिंबूद्वारे समाधान प्राप्त करून देतो. ईश्वराचा दूत आहे, आदी दावे बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री बाबा त्यांच्या कार्यक्रमातून करतात. तसेच संतांसंबंधी बदनामीकारक वक्तव्य करतात. संविधान मूल्यविरोधी, अशास्त्रीय, अवैज्ञानिक आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे दावे आणि भाष्य करणाऱ्या बागेश्वरच्या बाबांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी महा. अंनिसच्या पुणे जिल्हा कार्यकारिणीने केली आहे. पुण्यात सोमवार ते बुधवार या तीन दिवस बागेश्वरच्या बाबांचा सत्संग व दरबार कार्यक्रम होत आहे, त्यानिमित्ताने महा. अंनिस पुणे (Maharashtra Andhshraddha Nirmulan Samiti Pune) जिल्हा कार्यकारिणीने ही मागणी केली आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत संघटनेचे पूर्णवेळ कार्यकर्ते विशाल विमल (Vishal Vimal) यांनी दिली. यावेळी महा.अंनिस पुणे जिल्हा कार्याध्यक्ष सम्यक वि. म., जिल्हा पदाधिकारी एकनाथ पाठक, पुणे शहर शाखा पदाधिकारी स्वप्नील भोसले, प्रतीक पाटील आदी उपस्थित होते.
भारतीय राज्यघटनेने व्यक्तीला देव धर्म श्रद्धा उपासना स्वातंत्र्य दिले. त्याचा महा. अंनिस संघटना आदर करते. मात्र  व्यक्तीची देव धर्म श्रद्धा उपासनेच्या आधारे  फसवणूक, दिशाभूल, शोषण होत असेल, त्यातून सार्वजनिक आरोग्य, नीतिमत्ता, कायदा सुव्यवस्थेला अडथळा येत असेल त्याविरोधी संघटना भूमिका, प्रबोधन, प्रतिकार, कृतिकार्यक्रम करत आली आहे. महा. अंनिसचे हे वर्तन घटनेशी सुसंगत असून मानवी जीवन समृद्ध करण्यासाठीचे आहे. बागेश्वरचे बाबा हे लोकांच्या देव, धर्म, श्रद्धा, उपासना आणि भावना, अगतिकता, अज्ञान यांचा गैरफायदा घेऊन लोकांना देव धर्म श्रद्धा उपासनेशी निगडित विसंगत, अशास्त्रीय, अवैज्ञानिक बाबी सांगत आहेत. लोकांना ते सांगून प्रभावित करत असून अशास्त्रीय मार्गाने जगण्यास प्रवृत्त करत आहेत. हे भारतीय राज्यघटनेच्या दृष्टीने विसंगत आहे. भारतीय राज्य घटनेत वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करणे हे नागरिकांचे कर्तव्य असल्याचे सांगितले आहे. मात्र बागेश्वरचे बाबा अशास्त्रीय, अवैज्ञानिक दावे करून लोकांना प्रभावित करत आहेत. देशात केंद्र शासनाचा ड्रगज अँड मॅजिक रेमिडीज अडव्हरटाइजमेन्ट ऑब्जेक्श नेबल ॲक्ट १९५४ व राज्यात दहा वर्षांपासून जादूटोणाविरोधी कायदा लागू आहे. या कायद्याचे उल्लंघन बागेश्वरच्या बाबांकडून होत आहे. जिजाई उर्फ आवली ही तुकोबांची पत्नी ही त्यांना दररोज मारहाण करीत असे म्हणून ते रामजीचे भक्त झाले, असेही संत तुकाराम महाराजांबद्दल खोटे आणि बदनामीकारक वक्तव्य या बाबांनी केलेले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी करत आहोत, असेही विशाल विमल यांनी सांगितले.

या आहेत मागण्या

१) बागेश्वरचे बाबा हे भारतीय राज्यघटनेच्या तत्वाशी विसंगत असे अशास्त्रीय दावे, भाष्य करत आहेत. त्यामुळे घटनेच्या तत्वाच्या विरोधी दावे व भाष्य करणाऱ्या बाबांवर शासन व्यवस्थेने जादूटोणाविरोधी कायदा, ड्रग्ज अँड मॅजिक ॲक्ट आणि तत्सम कायद्यांनुसार कारवाई करावी.
२) संतांसंबंधी बागेश्वरच्या बाबांचे बदनामीकारक, अब्रुनुकसानकारक वक्तव्य  भाष्य लक्षात घेऊन त्यांच्यावर भारतीय दंड संहिता आणि अन्य तत्सम कायद्यानुसार कारवाई करावी.
३) बागेश्वरचे बाबा करत असलेले दावे अशास्त्रीय असल्याची उकल करून शास्त्रीय विचारधारा समाजात रुजवण्यासाठी शासन संस्थेने प्रसारमाध्यमे, शिक्षण संस्था आदींमार्फत प्रयत्न करावेत.
४) बागेश्वरचे बाबांच्या दाव्यांविरोधी महा. अंनिस शास्त्रीय माहिती, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करण्याचे काम करत आहे, त्याला शासन व्यवस्थेने पाठबळ द्यावे.
५) बागेश्वरच्या बाबा करत असलेले दावे त्यांनी सिद्ध करण्याचे महा. अंनिसचे आव्हान स्वीकारावे. यासंबंधी प्रसारमाध्यमातून बाबांना आव्हान कळविले आहे. संघटनेच्यावतीने लवकरच बाबांशी पत्रव्यवहार केला जाणार आहे. राज्यात सोईच्या ठिकाणी नियंत्रित परिस्थितीत दावे सिद्ध करण्याची प्रक्रिया पार पाडली जाईल. ते दावे सिद्ध केल्यास 21 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल.
६) पुण्यात संगमवाडी परिसरात बागेश्वरच्या बाबांचा कार्यक्रम सोमवार, मंगळवार, आणि बुधवारी (दि. २०, २१, २२) होत आहे. अशास्त्रीय, अवैज्ञानिक, अंधश्रद्धेला खतपाणी घालणे आणि बदनामीकारक वक्तव्य आणि प्रक्षोभक विधाने, सामाजिक स्वास्थेय बिघडवणारी वक्तव्ये  बागेश्वरच्या बाबांकडून घडू नये यासाठी बाबा आणि कार्यक्रमांच्या संयोजकांना शासन व्यवस्थेने सक्त ताकीद द्यावी.
७) पुण्यात होत असलेल्या सदर कार्यक्रमाने व्हिडीओ शूटिंग करण्याची सूचना संयोजकांना शासन व्यवस्थेने द्यावी. प्रचलित कायद्यांच्या विसंगत विधाने, भाष्य, वक्तव्ये, इशारे, कृत्य घडल्यास बाबांवर गुन्हे दाखल करून कारवाई करावी.

Maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti (MANS) | Pune | पाश्चात्यांपेक्षा भारतीय विवेकवादी परंपरा समृद्ध |  महा.अंनिसचे अध्यक्ष अविनाश पाटील यांचे प्रतिपादन

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

Maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti (MANS) | Pune | पाश्चात्यांपेक्षा भारतीय विवेकवादी परंपरा समृद्ध |  महा.अंनिसचे अध्यक्ष अविनाश पाटील यांचे प्रतिपादन

– ‘संतविचार, संविधानिक मूल्ये व विवेकवादी परंपरा’ या शिबिरात बीजभाषण

 

Maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti (MANS) | Pune | पाश्चात्य विवेकवादी परंपरेपेक्षा भारतीय विवेकवादी परंपरा ही समृद्ध आहे. बुद्ध, चार्वाक, संत आणि सुधारकांची विवेकवादी परंपरा जैविक आहे, असे प्रतिपादन महा. अंनिसचे अध्यक्ष अविनाश पाटील (Avinash Patil) यांनी केले. (Maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti (MANS) | Pune)

डॉ. नरेंद्र दाभोलकर (Dr Naredndra Dabholkar) यांच्या जन्मदिनानिमित्त महा. अंनिसच्या शिवाजीनगर पुणे शाखेने ‘संतविचार, संविधानिक मूल्ये व विवेकवादी परंपरा’ या विषयावर एकदिवसीय शिबिर आयोजित केले होते. उदघाटन सत्रात अविनाश पाटील यांनी बीजभाषण केले. सत्राच्या अध्यक्षस्थानी लालचंद कुंवर होते. यावेळी शिबीराचे समन्वयक, पूर्णवेळ कायकर्ते विशाल विमल उपस्थित होते. शाखेचे सचिव शाम येणगे यांनी प्रास्ताविक केले. दुसऱ्या सत्रात संत साहित्याचे अभ्यासक धम्मकीर्ती महाराज परभणीकर यांनी मांडणी केली तर अध्यक्षस्थानी केशव कुदळे होते. तिसऱ्या सत्रात गणेश महाराज फरताळे यांनी मांडणी केली तर अध्यक्षस्थानी माधुरी गायकवाड होत्या.

माणूस हा भावना आणि विचारांचे मिश्रण आहे. भारतीय विवेकवादी परंपरेत भावना आणि विचारांचे प्रतिबिंब आहे. त्यामुळे ती परंपरा मानवी जगणे उन्नत करण्यासाठी उपयुक्त आहे. पाश्चात्य विवेकवादी परंपरा ही अधिक तर्ककठोर आणि विचारांवर आधारलेली असल्याने ती मनुष्याला बांधून ठेवण्यात कमी पडत आहे. संत सुधारकांचा वारसा कालसुसंगतपणे समजून घेण्याची गरज आहे. तो समाज सुधारणेचा भाग आहे. तो समाज बदलाची प्रक्रिया म्हणून महत्वाचा आहे. संतांनी केवळ उपदेश केला नसून प्रश्न विचारण्याचा वारसा जपला आहे, असेही अविनाश पाटील यांनी सांगितले.

संतांनी केलेली मांडणी ही आजच्या एकूणच धर्मांधतेला उत्तर देण्यास प्रभावी आहे, हे सप्रमाण सांगून अत्यन्त सडेतोड, तर्कसुसंगत मांडणी धम्मकीर्ती महाराजांनी केली. जागतिक पातळीवर विज्ञान दृष्टिकोन विकसित झालेला नव्हता तेव्हा 12 व्या शतकात भारतात संत परंपरेने भावनेला साद घालत तर्कशुद्ध आणि कार्यकारणभाव असलेली मांडणी केली. त्या काळच्या अंदाधुंदीला उत्तर दिले. तीच संतांची मांडणी आजच्या काळालाही उत्तर आहे, असे गणेश महाराज फरताळे यांनी सांगितले.

प्रत्येक सत्रानंतर प्रश्न उत्तरांच्या माध्यमातुन प्रश्नांचे निराकरण करण्यात आले. संतविचार, संविधानिक मूल्ये विवेकवादी परंपरेची सांगड घालून प्राप्त परिस्थितीला उत्तर देता येईल असा आशावाद शिबिरार्थींकडून व्यक्त झाला. शिबीरातून जो संवाद घडला त्यातून वैयक्तिक व सामूहिक पातळीवर कृतीकार्यक्रम ठरला आहे. मयूर पटारे, शीतल साठे, विनोद लातूरकर, स्नेहल लांडगे, प्रवीण खुंटे, योगेश्वरी भोसले, आकाश छाया, स्वप्नील भोसले, रविराज थोरात, रतन नामपल्ले, प्रिया आमले, प्रतीक पाटील यांचा गायन, परिचय, सुत्रसंचलन, संयोजनात सहभाग होता.