PMC Pedestrian Day | पुणे महापालिकेकडून सलग तिसऱ्या वर्षी पादचारी दिन साजरा

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Pedestrian Day | पुणे महापालिकेकडून सलग तिसऱ्या वर्षी पादचारी दिन साजरा

 

PMC Pedestrian Day | पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) पादचारी दिवस (Pedestrian Day) हा अभिनव उपक्रम देशात राबवणारी पहिली महापालिका आहे.  यंदा देखील पादचारी दिनाचे तिसरे वर्ष साजरा करण्यात आले. अशी माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. (PMC Pune News)

पुण्यातील प्रतिष्ठित लक्ष्मी रस्ता या दिवशी वाहन विरहित करण्यात आला. नगरकर तालीम चौक ते गरुड गणपती चौक हा रस्ता वाहनांना बंद करून फक्तं पादचारी करण्यात आला. या शिवाय पुणे शहरातील १०० चौक देखील पादचारी सुरक्षा निश्चित करण्यात आले. आज पुणे महापालिकेच्या पथ विभागाने दर वर्षी प्रमाणे हा उपक्रम यशस्वी करून दाखवला. पथ विभागाने केलेल्या योजना व मागील पाच वर्षात केलेली कामे यंदा प्रदर्शित करण्यात आली. पदपथ नियोजन करताना महत्त्वाचे मापदंड यावेळी प्रदर्शित करण्यात आले , परिसर संस्थेच्या मार्फत सार्वजनिक व शाश्वत वाहतुक याचे महत्व,  सेव किड्स फाऊंडेशन तर्फे लहान मुलांसाठी रस्ते सुरक्षा कार्यशाळा , एकांश ट्रस्ट तर्फे विकलांग अपंग लोकांसाठी जनजागृती कार्यशाळा , साथी हाथ बढाना संस्थेचे मानसिक आरोग्य या विषयी पथनाट्य,  sptm मार्फत झेब्रा वेषभूषा करून  रस्ते सुरक्षा बाबत प्रबोधन असे उपक्रम होते.

त्र्यंबकेश्वर संस्थेतर्फे मर्दानी खेळ , रस्ता Jammers तर्फे संगीत इत्यादी मनोरंजन उपक्रम होते. आज महामेट्रोने ई-स्कुटी  ही विद्युत वाहन मेट्रोपासून घरापर्यंत प्रवासासाठी उपलब्ध केले तसेच पीएमपीएमएल ने जादा बसचे नियोजन केले. या कार्यक्रमाचे उद्घाटन पुणे महानगरपालिकेचे मा. श्री विकास ढाकणे, अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि) यांच्या हस्ते झाले व पथ विभागाचे मा. मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर अणि मा. अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे, माजी मुख्य अभियंता (पथ विभाग) व्ही. जी. कुलकर्णी तसेच पर्यावरण विभागाचे प्रमुख मा.माधव जगताप उपस्थित होते.  लक्ष्मी रस्ता व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष श्री फत्तेचंद रांका , पथारी संघटनेचे श्री. रवींद्र माळवदकर व श्री. शंके हे  उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचा  सामान्य लोकांनी आनंद घेतला.

Pedestrian Day | PMC Pune | पुणे महानगरपालिकेमार्फत जागतिक पादचारी दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

Categories
Breaking News cultural PMC पुणे

 पुणे महानगरपालिकेमार्फत जागतिक पादचारी दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

| २७३७ नागरीक, स्वयंसेवी संस्था व खाजगी संस्थांचे प्रतिनिधी, मनपा अधिकारी व कर्मचारी यांचा सहभाग

पुणे महानगरपालिकेमार्फत (Pune Municipal corporation) ११ डिसेंबर  रोजी पादचारी दिन (Pedestrian Day) साजरा करण्यात आला असून पादचा-यांच्या सुरक्षिततेसाठी आणि चालण्याच्या योग्यतेसाठी USDG मार्गदर्शक तत्वानुसार पादचारी सुधारणांची योजना आखली जाणार आहे. यामध्ये फुटपाथ दुरुस्ती, झेब्रा क्रॉसिंग रंगविणे, पादचारी सिग्नल बसवणे, मिड ब्लॉक क्रॉसिंग वाढवणे इ. कामे करून पादचारी पूरक व सुरक्षित रस्ता ओलांडायची सोय इ. कामकाज पथ विभागामार्फत (Road Dept) केले जाणार आहे.

दिनांक ११ रोजी १५ क्षेत्रिय लक्ष्मी रस्ता, जंगली महाराज रस्ता, पाषाण सुस रस्ता, बिबवेवाडी रस्ता- राम्यानगरी ते पुष्पमंगल, सहकारनगर रस्ता – गजानन महाराज मठ ते पंचमी हॉटेल, वानवडी – जगताप चौक, मोहम्मदवाडी चौक रोड आणि संविधानरोड चौक, रहेजा सर्कल ते विबग्नोर शाळा, सासवड रस्ता हडपसर गाडीतळ ते गोंधळे नगर, मयूर कॉलनी रोड आणि सिटी प्राईड थिएटर रोड कोथरूड, कर्वेरोड – पौड फाटा ते डहाणूकर कॉलनी, खराडी दक्षिण मुख्य रस्ता, आळंदी रोड ते विश्रांतवाडी ते ५०९ चौक रस्ता अशा विविध ठिकाणी स्वच्छता व जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात आले. (Pedestrian Day)

यामध्ये पदपथांची स्वच्छता, कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृती, सोसायटी स्तरावर ओला कचरा जिरविण्याचे खत प्रकल्प राबविणे, ई-कच-याबाबत जनजागृती, स्वच्छ सर्वेक्षण २०२३ बाबत प्रचार व प्रसार असे विविध उपक्रम राबविण्यात आले. (PMC Pune)


महापालिका आयुक्त,  विक्रम कुमार, अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ.कुणाल खेमनार, अतिरिक्त महापालिका आयुक्त,  विकास ढाकणे, मुख्य अभियंता पथ विभाग  व्ही. जी. कुलकर्णी,  उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन  आशा राऊत, उपायुक्त  माधव जगताप,  महापालिका सहाय्यक आयुक्त आशिष महादळकर यांचे मार्गदर्शनानुसार कसबा – विश्रामबाग क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत जागतिक पादचारी दिनानिमित्त लक्ष्मी रस्ता याठिकाणी नागरिकांसाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. (Pune Municipal corporation)

स्वच्छ सर्वेक्षण २०२३ बाबत माहिती देऊन स्वच्छता विषयक शपथ घेण्यात आली तसेच swatchta apps download करण्यात आले. याठिकाणी स्वच्छ संस्थेमार्फ V – कले उपक्रम राबविण्यात आला व पुणे महानगरपालिकेच्या विविध उपक्रमांबाबत माहिती देण्यात आली. १५ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत राबविण्यात आलेल्या या उपक्रमात एकूण २७३७ नागरीक, स्वयंसेवी संस्था व खाजगी संस्थांचे प्रतिनिधी, मनपा अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेतला. (pedestrian Day)

Pedestrian Day : Mayor : PMC : पादचारी दिन साजरा करणारे देशातील पहिले शहर बनले पुणे  : महापौर मुरलीधर मोहोळ 

Categories
Breaking News PMC पुणे

पादचारी दिन साजरा करणारे देशातील पहिले शहर बनले पुणे

: महापौर मुरलीधर मोहोळ

पुणे : लक्ष्मी रस्त्याचा झालेला खुला मॉल, शहरात ठिकठिकाणी सजलेले रस्ते, पादचारी मार्गांच्या सोडवलेल्या समस्या आणि रस्त्यावर चालण्यासाठी पुणेकरांचा मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद. अशा उत्साहपूर्ण वातावरणात शनिवारी पुण्यातील पहिला पुणे महापौर पादचारी दिन साजरा करण्यात आला. शिवाय या पादचारी दिनासोबतच पुणे पादचारी दिन साजरा करणारे देशातील पहिले शहर बनले.

पुणे शहरातील ठिकाणी ५०० मी लांबीचे रस्ते पादचारीपूरक निर्माण करणे, चौक पादचारी सुरक्षितता लक्षात घेऊन सुधारणा कामे करणे आणि सुरक्षित मिड ब्लॉक क्रॉसिंग सुधारणा कामे करणे या पादचारी अनुषंगे कामांचा समावेश होता.
सर्वात महत्वाचा उपक्रम लक्ष्मी रस्त्यावर “ओपन स्ट्रीट मॉल” ही संकल्पना घेऊन नगरकर तालीम चौक ते उंबऱ्या गणपती चौक या सुमारे ४०० मी लांबीचा रस्ता पूर्णतः वाहनासाठी बंद करून पादचारी नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आला. सकाळी ११ वाजता मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते या उपक्रमाला सुरुवात झाली. यावेळी हेमंत रासने, (स्थायी समिती अध्यक्ष), मा.विक्रमकुमार ( महापालिका आयुक्त), मा.कुणाल खेमणार ( अती. म.आ ) यांचे उपस्थित सर्व लांबिमध्ये पादचारी कामांची पाहणी केली.

संपूर्ण रस्त्यावर दोन्ही बाजूचे फूटपाथ पादचाऱ्यांसाठी मोकळे केले, रस्त्याचे दोन्ही कडेला रंगीत रचना निर्माण केल्या व त्यामध्ये पथारी व्यावसायिक यांना जागा देण्यात आली, रस्त्यावर विविध ठिकाणी आकर्षक झाडे, फुले यांच्या कुंड्या ठेवणेत आल्या.
रस्त्यावर लहान मुलांना खेळण्याचे स्वरूपात प्रशिक्षण सेफ किड्स संस्थेद्वारे सोय केली होती.

सकाळी ११ ते संध्याकाळी ४ पर्यंत नागरिकांनी उस्पुर्तपणे सहभागी होऊन, या संकल्पनेस प्रतिसाद दिला. नागरिकांनी मुक्त स्वरूपात विहार व खरेदीचा आनंद घेतला. व्यापारी, पथारी व्यावसायिक व नागरिकांनी या संकल्पनेस चांगला पाठिंबा दिला
लोकांच्या सूचना व प्रतिक्रिया यातून यापुढे पुणे शहरात पादचारी सुविधा आणखी चांगल्या स्वरूपात निर्माण करणेचा प्रयत्न राहणार आहे.

पादचारी दिन हे केवळ निमित्त : महापौर मोहोळ

पादचारी दिन हे केवळ एकदिवसीय निमित्त असले तरी या निमित्ताने पादचाऱ्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी, शहरातील पादचारी मार्गांची दुरुस्ती व्हावी, झेब्रा क्रॉसिंग रंगवले जावेत, भुयारी मार्गांची दुरुस्ती व्हावी, भुयारी मार्गातील विद्युत व्यवस्था आणि सीसीटीव्ही यंत्रणा सुरु व्हावी, असे अनेक उद्देश या आयोजनामागे होते, असे महापौर मोहोळ यांनी सांगितले.

पाषाण-सुस रस्त्यावर ‘स्ट्रीट फॉर पीपल’

केंद्र शासनाच्या उपक्रमात भाग घेऊन पाषाण-सुस रस्त्यावर ‘स्ट्रीट फॉर पीपल’ ही संकल्पना निर्माण केली आहे. अभिनव आर्ट कॉलेज ते मुंबई-पुणे हायवे पर्यंत सुमारे ५०० मी लांबीचा रस्ता विकसित केला आहे. या रस्त्यावर वाहनासाठी तीन लेन, स्वतंत्र सायकल मार्ग, प्रशस्त पादचारी मार्ग आणि रस्त्याच्या कडेला ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था निर्माण केली असून व्यायामाची साधने, स्केट बोर्ड खेळणेची सुविधा, रोलर स्केटिंग खेळणेची सुविधा, लहान मुलांना अर्बन ९५ संकल्पनेवर आधारित खेळणेची साधने, फ्लोअर गेम उपलब्ध करून देणेत आली आहेत.

Vasant More : Pedestrian Day : दुसऱ्या प्रभागात चमकोगिरी करण्यापेक्षा स्वतःच्या प्रभागाची दुरावस्था दूर करा : मनसे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांचे महापौरांना खुले आव्हान

Categories
Breaking News PMC Political पुणे

दुसऱ्या प्रभागात चमकोगिरी करण्यापेक्षा स्वतःच्या प्रभागाची दुरावस्था दूर करा

: मनसे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांचे महापौरांना खुले आव्हान

पुणे : आज ११ डिसेंबर हा पुणे शहराचा पादचारी दिन घोषित करून महापौर मुरलीधर मोहोळ यांनी शहरात विविध ठिकाणी घेतलेल्या कार्यक्रमांचा पंचनामा शहरातील पदपथांची दुरावस्था दाखवत महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेने केला.  राजसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांच्या नेतृत्वाखाली व मनसे पर्यावरण शहर अध्यक्ष नितीन जगताप यांच्या माध्यमातून जनहित कक्षाचे शहर अध्यक्ष नरेंद्र तांबोळी यांच्या उपस्थितीत पुणे शहराच्या आठही मतदारसंघामध्ये विभाग अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली पदपथांवरील अतिक्रमणे आणि पादचाऱ्यांच्या हक्काची होत असलेली पायमल्ली याचा लेखाजोखा फेसबुक live च्या माध्यमातून प्रत्यक्षपणे मांडण्यात आला.

पादचाऱ्यांना रस्त्यांवर प्रथम प्राधान्य असायला हवे, पदपथ अतिक्रमणमुक्त असावेत, झेब्रा क्रॉसिंगचे रंग सुस्पष्ट असावेत, पादचाऱ्यांचे रस्ता ओलांडण्यासाठीचे सिंनल्स दुरुस्त असावेत, अपंगांसाठी आणि दृष्टीहीन लोकांसाठी पदपथ सुस्थितीत असावेत.  अशा मागणीचे फलक घेऊन  महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्या प्रभागात मनसेने विरोधाभास दर्शवत मनसे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी महापौर यांना खुले आव्हान दिले आहे. फक्त 1 दिवस पादचारी दिन साजरा करून जनतेच्या डोळ्यात धूळफेक न करता पादचाऱ्यांचे हक्क अबाधित ठेवले आणि पदपथ अतिक्रमणमुक्त झाले तरच पादचारी दिन सार्थकी लागला असे म्हणता येईल.  दररोजच पादचारी दिन साजरा होईल असे प्रतिपादन मनसे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी यावेळी केले. तुम्ही दुसऱ्या प्रभागात चमकोगिरी करण्यापेक्षा स्वतःच्या प्रभागाची दुरावस्था दूर करावी असे म्हणत वसंत मोरेंनी स्वतःच्या प्रभागातील सलग 3 किलोमीटरच्या उत्कृष्ट अशा पदपथावरून पायी फेरी मारली. यानिमित्ताने पुणे शहरात इतर सगळ्या विरोधी पक्षांपेक्षा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हाच प्रखर विरोधी पक्ष असल्याचे अधोरेखित झाले आहे. आगामी काळात पुणे शहराच्या आणि जनतेच्या हक्कासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हाच एकमेव पर्याय असल्याचे सांगून वसंत मोरेंनी शासन प्रशासनाला धारेवर धरले. यावेळी संपुर्ण शहरातील पदाधिकारी आजी माजी नगरसेवक विभाग अध्यक्ष शाखा अध्यक्ष महिला सेनेचे पदाधिकारी व मनसेच्या सर्व अंगीकृत संघटनांनी सहभाग घेतला होता.