Inflation | Mohan Joshi | महागाईमुळे जेवण बनले बेचव | रोज एकदाच जेवायचे हे व्रत घ्यावे लागेल? | मोहन जोशी

Categories
Breaking News Commerce Political पुणे

Inflation | Mohan Joshi | महागाईमुळे जेवण बनले बेचव | रोज एकदाच जेवायचे हे व्रत घ्यावे लागेल? |  मोहन जोशी

Inflation | Mohan Joshi | महागाईच्यामुळे (Inflation) जनतेचे जेवण आता बेचव बनले असून, रोज एकदाच जेवायचे असे व्रत मोदी राजवटीत (Modi Government) जनतेला घ्यावे लागेल काय, असा प्रश्न आता पडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि त्यांचे भाजपा सरकार (BJP) मात्र महागाई बाबत तोंड, डोळे आणि कान बंद करून बसले आहेत. ते केवळ त्यांचे फोटो माध्यमात छापून यावेत, चॅनल्सवर रोज दिसावे आणि तासंतास निरर्थक भाषणे करीत राहावे यातच दंग आहेत. त्यामुळेच चिरडीला आलेली जनता आता निवडणुकीची वाट बघत असून मतदानातून निष्क्रिय मोदी सरकारला ते धडा शिकवल्या शिवाय राहणार नाहीत असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Maharashtra Congress Vice President Mohan Joshi) यांनी केले. (inflation | Mohan Joshi)
मोहन जोशी म्हणाले की, जागतिक क्रुडऑइलच्या किमती ११२ डॉलर्सवरून ६५-७० डॉलरपर्यंत खाली आल्या आहेत, तरीही देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी न करता मोदी सरकारने जनतेची लूट चालू ठेवली आहे. ३ प्रमुख ऑइल कंपन्यांना तब्बल 1 लाख कोटी रुपयांचा नफा होत आहे. कॉंग्रेसचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळात क्रुडऑइलच्ये दर ११२ डॉलर्स एवढे वाढले तरीही सबसिडी देऊन त्यांनी पेट्रोल व डिझेलचे भाव ६० ते ७० रुपये एवढे कमी ठेवले होते. आता तर क्रुडऑइलच्या किमती ६५-७० डॉलर्स एवढ्या कमी झाल्या आहेत. त्यामुळे सबसिडी न देताही पेट्रोल व डिझेलचे दर ६५ रुपयेपर्यंत ठेवणे सहज शक्य आहे. मात्र मोदी सरकारला हे शक्य असूनही ते असे करीत नाहीत याबद्दल जनतेत आता चीड निर्माण झाली आहे. (Inflation in India)
ते पुढे म्हणाले की, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, साखर, तेल, तूप त्याबरोबरच मसाल्याचे पदार्थ, सर्व प्रकारच्या भाज्या, डाळी, साबुदाणा, पोहे, खोबरे अशा प्रत्येकच जीवनावश्यक वस्तूंचे भाव दुप्पट अथवा तिप्पट वाढून गगनाला भिडले तरीही कुंभकर्णाप्रमाणे झोपलेल्या मोदी सरकारला जाग येत नाही. भाजपच्या कोणाही खासदार, आमदार, नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या तोंडातून  महागाईबाबत म्हणजेच मोदी विरोधात ब्र देखील उच्चारला जात नाही. याबद्दलही जनतेत चीड निर्माण झाली आहे. (Congress)
त्यामुळेच आता भाजपसारख्या पक्षाला मतदान करणाऱ्यांनादेखील मोदी सरकार सत्तेतून दूर करावे तरच ‘अच्छे दिन’ येतील असे वाटू लागले आहे. ‘इंडिया’ या विरोधी पक्षांच्या आघाडीने महागाई विरुद्ध रणशिंग फुंकले असून जनतेने त्यास साथ द्यावी आणि प्रत्येक वेळी पेट्रोल / डिझेल भरताना अकार्यक्षम मोदींमुळे जास्त दर द्यावा लागत आहे याची आठवण ठेवावी असे आवाहन मोहन जोशी यांनी शेवटी केले.
——
News Title | Inflation | Mohan Joshi | Due to inflation, food became bechav Do you have to take this vow to eat only once a day? | Mohan Joshi

8th Pay Commission Update | 8 व्या वेतन आयोगाची केंद्र सरकारची तयारी सुरू!

Categories
Breaking News Commerce Political social देश/विदेश लाइफस्टाइल

8th Pay Commission Update |  8 व्या वेतन आयोगाची केंद्र सरकारची तयारी सुरू!

8th Pay Commission Update |  2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या (Lok sabha Election 2024) पार्श्वभूमीवर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांवर (Central Government Employees) मोदी सरकार (Modi Government) मेहरबानी करणार असल्याची शक्यता आहे.  सरकार त्यांना खूप चांगली बातमी देणार आहे.  सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 7व्या वेतन आयोगानंतर (7th Pay Commission) आता 8व्या वेतन आयोगाची (8th Pay Commission Update) चर्चा सुरू झाली आहे.  चर्चा नुसती एवढीच नाही, तर याबाबतचा प्रस्ताव तयार होत असल्याची आनंदाची बातमी आहे.  पुढील वर्षी मोदी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. (8th Pay Commission Update)
 केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या किमान पगारात मोठी वाढ होऊ शकते.  पुढील वर्षी केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना ही भेट देऊ शकते.  आतापर्यंत 8 वा वेतन आयोग येणार नाही अशी चर्चा होती.  पण, आता 7व्या वेतन आयोगाच्या  बातम्यांनंतर पुढील वेतन आयोगाची तयारी सुरू होण्याची शक्यता आहे.  मात्र, सरकारकडून अद्याप कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही.  पण, सरकारचा तसा इरादा असल्याचे सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे.  कर्मचाऱ्यांच्या सततच्या मागणीनंतर पुढील वेतन आयोगाची भेट होऊ शकते. (8th Pay Commission Latest News)

 पगारात मोठी वाढ असेल

 सूत्रांच्या माहितीनुसार, 2024 मध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत.  त्यामुळे कर्मचाऱ्यांसाठी नवा वेतन आयोग गठीत केला जाऊ शकतो.  8व्या वेतन आयोगाच्या वेळीच कर्मचाऱ्यांच्या पगारात सर्वात मोठी वाढ होणार आहे.  हे प्रकरण पुढे सरकत आहे, असे खात्रीने म्हणता येईल.  नव्या वेतन आयोगात काय येणार आणि काय नाही, हे सांगणे घाईचे असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे.  कारण, त्याची संपूर्ण जबाबदारी वेतन आयोगाच्या अध्यक्षांची असेल.  2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी नवीन वेतन आयोगाच्या अध्यक्षांची घोषणा देखील होऊ शकते.  त्यांच्या देखरेखीखाली एक समिती स्थापन करण्यात येणार असून त्यानंतर कोणत्या सूत्राने पगार वाढवायचा याचा निर्णय घेतला जाणार आहे. (7th Pay Commission News)

 आठवा वेतन आयोग कधी येणार?

 जर सूत्रांवर विश्वास ठेवायचा असेल तर, 2024 मध्ये 8 वा वेतन आयोग स्थापन केला जावा.  त्याचबरोबर दीड वर्षात त्याची अंमलबजावणी होऊ शकते.  तज्ज्ञांच्या मते, असे झाल्यास केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी झेप होईल.  7 व्या वेतन आयोगाच्या तुलनेत 8 व्या वेतन आयोगात अनेक बदल शक्य आहेत.  फिटमेंट फॅक्टरच्या बाबतीतही काही बदल होऊ शकतात. आतापर्यंत सरकार 10 वर्षांतून एकदा वेतन आयोग स्थापन करते.

 8 व्या वेतन आयोगात किती पगार वाढणार?

 7 व्या वेतन आयोगाच्या तुलनेत 8 व्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांची लॉटरी होणार आहे.  सर्व काही सुरळीत राहिल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी झेप अपेक्षित आहे.  कर्मचाऱ्यांचे फिटमेंट फॅक्टर ३.६८ पटीने वाढेल.  तसेच फॉर्म्युला काहीही असो, कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात ४४.४४% वाढ होऊ शकते.  त्यामुळे कर्मचार्‍यांसाठी ही आनंदाची बातमी आहे ज्यामुळे कर्मचार्‍यांना खूप आनंद होऊ शकतो.
News Title | 8th Pay Commission Update |  The central government’s preparations for the 8th pay commission have started!

Pune | Modi Government | Congress | मोदी सरकारची आठ वर्षे | पुण्याच्या पदरी शून्यच

Categories
Breaking News PMC Political देश/विदेश पुणे

मोदी सरकारची आठ वर्षे | पुण्याच्या पदरी शून्यच

– माजी आमदार मोहन जोशी

पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या आठ वर्षांच्या कारकिर्दीत पुण्यासाठी मोठमोठ्या योजना जाहीर झाल्या प्रत्यक्षात मात्र, पुणेकरांच्या पदरी शून्यच विकासकामे पडली, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

स्मार्ट सिटी ते नदी सुधार प्रकल्प अशा अनेक योजनांमध्ये घोळ घालण्यात आले. खासदार गिरीश बापट, माजी मंत्री प्रकाश जावडेकर, भाजपचे १०० नगरसेवक यांची अकार्यक्षमता आणि अनास्था पुण्याच्या विकासाला बाधा ठरले आहेत, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

पंतप्रधानांनी गाजावाजा केलेल्या स्मार्ट सिटी योजनेचा पुण्यात पूर्णपणे बोजवारा उडालेला आहे. ही योजनाच आता गुंडाळली जाईल. शिवाजीनगर ते हिंजेवाडी या मेट्रोच्या कामाला दिरंगाई झाली. भाजपच्या खासदारानेच निदर्शने केली, इतका सावळा गोंधळ यांच्या कारभारात आहे. निवडणुकीच्या तोंडावर घाईघाईने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलावून, त्यांच्या हस्ते वनाज ते गरवारे कॉलेज या मेट्रो मार्गाचे उदघाटन झाले. पण, नंतरचे काम पुढेच सरकलेले नाही. त्यामुळे मेट्रोला प्रवासीच मिळेना अशी अवस्था झालेली आहे. केंद्र सरकारने निधी मंजूर करुनही भाजपचे स्थानिक खासदार आणि नगरसेवक यांच्या निष्क्रियतेमुळे नदी सुधार प्रकल्प सुरु करण्यास सहा वर्षें दिरंगाई झाली. नंतर महापालिका निवडणुका जवळ येताच प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न झाला. पण, पुणेकरांनाच हा प्रकल्प मान्य झाला नाही आणि काम अडकून पडले. कोविड साथीच्या काळात अदर पूनावाला मोफत लस देऊ इच्छित होते. परंतु, भाजपचे स्थानिक खासदार आणि माजी महापौरांनी उदासीनता दाखवली आणि एक संधी हुकली. पुरंदर विमानतळाचा घोळही अजून मिटलेला नाही. ही सर्व अनास्थेची लक्षणे आहेत, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

नोटाबंदीतून ज्यांचे धंदे उखडले गेले ते अजून सावरलेले नाहीत. महागाईमुळे सर्वसामान्य जनता हवालदिल आहे. मध्यमवर्गीयांचे हाल वाढले, बेकार तरुणांना चांगल्या रोजगारांच्या संधी उपलब्ध होत नाहीत. मोदी सरकारच्या आठ वर्षांच्या काळात अर्थव्यवस्था ढासळली, असा आरोप मोहन जोशी यांनी पत्रकात केला आहे.

काँग्रेस सरकारच्या काळात पुण्याच्या विकासासाठी जवाहरलाल नेहरु नागरी पुनर्निर्माण योजना राबविण्यात आली. त्यातून पुणे शहरात दीड हजार कोटीहून अधिक रकमेची कामे झाली. काँग्रेसच्या काळात केंद्र सरकारच्या अनेक आस्थापना, संस्था पुण्यात उभ्या राहिल्या. मोदी सरकारच्या काळात भरीव प्रकल्प, संस्था पुण्यात उभी राहिलेली नाही, असेही मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.