PMC Security Guard | सुरक्षा रक्षकांच्या वेतनाबाबत महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी ठरवून दिली नियमावली

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Security Guard | सुरक्षा रक्षकांच्या वेतनाबाबत महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी ठरवून दिली नियमावली

PMC Security Guard | पुणे महापालिकेच्या सुरक्षा विभागामार्फत (PMC Security Department) पुरविण्यात येणाऱ्या बहुउद्देशीय कामगारांचे वेतन (Salary) विहित वेळेत होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत.  बहुउद्देशीय कामगारांची हजेरी संबंधित खात्यांकडून विहित वेळेत प्राप्त होत नसल्याने कामगारांना महिनेमहा १० तारखेच्या आंत वेतन आदा करणे अडचणी होत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमणार (IAS Dr Kunal Khemnar) यांनी नियमावली ठरवून दिली आहे. (PMC Security Guard)

अशी आहे नियमावली

१. सर्व संबंधित खात्यांकडून महिनेमहाची हजेरी २५ तारीख गृहित धरून संभाव्य हजेरी संबंधित खात्याचे पर्यवेक्षकीय अधिकारी/ विभागप्रमुख यांच्या स्वाक्षरीने देण्यात यावी. सदर हजेरी महिनेमहा महिन्याच्या ३० तारखेपर्यंत ठेकेदारास देण्याची तजवीज करावी.
२. ठेकेदाराने त्यांच्याकडील कंत्राटी कामगारांचे वेतन पुढील महिन्याच्या ५ तारखेपर्यंत आदा करण्याची
दक्षता घ्यावी.
३. संभाव्य हजेरीमध्ये कामगार गैरहजर राहिल्यास सदर गैरहजेरीचे वेतन त्याचे पुढील वेतनातून वसूल करण्याची कारवाई करण्यात करावी.
संबंधित खात्यांकडून विहित वेळेत हजेरी न मिळाल्यामुळे बहुउद्देशीय कामगारांचे वेतन करण्यामध्ये विलंब झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित खातेप्रमुखांची राहील. असे अतिरिक्त आयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. (Pune Municipal Corporation News)
——
News Title | PMC Security Guard | Municipal Additional Commissioner has decided the rules regarding the salary of security guards

PMC Pune Transgender Employees | पुणे महापालिकेच्या सेवेत येणार P.hd, M.Tech. B.Sc. झालेले अजून 10 तृतीयपंथी

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Pune Transgender Employees | पुणे महापालिकेच्या सेवेत येणार P.hd, M.Tech. B.Sc. झालेले अजून 10 तृतीयपंथी

| सुरक्षा विभागाकडून घेण्यात आल्या अजून 10 लोकांच्या मुलाखती

PMC Pune Transgender Employees | पुणे महानगरपालिकेच्या (Pune municipal corporation) सेवेत 10 तृतीयपंथी व्यक्तींना (Transgender) कंत्राटी सेवक (Contract employee) म्हणून रुजू करून घेण्यात आले आहे.  पुणे महानगरपालिकेचा (PMC Pune) एक पुरोगामी पाउल उचलण्याचा मानस असून समाजातील सर्वच वर्गाना नागरिक हक्क कायद्यानुसार समानतेची वागणूक मिळावी या उद्देशाने तृतीयपंथी व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणणे कामी मनपाच्या मिळकतीचे संरक्षणार्थ प्रायोगिक तत्वावर तृतीयपंथी व्यक्तींना कामावर घेतले जाणार आहे. नुकतेच 10 तृतीय पंथीयांना नोकरी दिल्यानंतर अजून 10 लोकांना कामावर घेतले जाणार आहे. त्यांच्या मुलाखती घेतल्या गेल्या आहेत. यामध्ये पीएचडी, एमटेक, बीएस्सी शिक्षण झालेल्या तृतीय पंथियांचा समावेश आहे. महापालिका आयुक्तांच्या हस्ते लवकरच यांना नियुक्तीपत्र दिली जाणार आहेत. अशी माहिती महापालिकेचे मुख्य सुरक्षा अधिकारी राकेश विटकर यांनी दिली. (PMC Pune Transgender Employees)


पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू हॉस्पिटल, राजीव गांधी प्राणीसंग्रहालय, मनपा भवन तसेच अनधिकृत बांधकाम निर्मुलन व अतिक्रमण विभागाच्या कारवाई करिता सदरच्या तृतीयपंथी व्यक्तींना नेमणूक दिली जाणार आहे. शहरातील तृतीयपंथीय वर्गासाठी काम करण्याऱ्या सेवाभावी संस्थांचे कमिटी तयार करून मनपा कर्मचारी अधिकारी व तृतीयपंथी कामगार याच्यात सलोख्याचे व सामाजिक स्नेह राहावं यासाठी जनजागृती अभियान राबविले जाणार आहे. भविष्यात तृतीयपंथीय व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांच्याकरिता लोकाभिमुख उपक्रम राबविण्याचा संकल्प असून त्यानुसार कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे. पुणे महानगरपालिकेचा उपक्रम समाजातील प्रत्येक घटकास न्याय देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. असे राकेश विटकर म्हणाले.  (Pune Municipal Corporation News)
नवीन मुलाखती घेतलेल्या तृतिय पंथीयांचे उच्च शिक्षण झालेले आहे. काही ठिकाणी हे लोक नोकरी देखील करत होते. मात्र नोकरीच्या ठिकाणी होत असलेली हेळसांड पाहून या लोकांनी नोकऱ्या सोडणे पसन्त केले. त्यानुसार या लोकांनी महापालिकेत नोकरी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान आगामी काळात महापालिका देखील या लोकांना त्यांच्या शिक्षणानुसार काम देणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. (PMC Pune News)
—-
News Title | PMC Pune Transgender Employees | P.hd, M.Tech will come in the service of Pune Municipal Corporation. B.Sc. yet 10 transgender

PMC Fake Identity Card | बोगस ओळखपत्र बनवणारा ‘आयडी चौधरी’ महापालिकेचाच कर्मचारी!

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Fake Identity Card | बोगस ओळखपत्र बनवणारा ‘आयडी चौधरी’ पुणे महापालिकेचाच कर्मचारी! 

 
 
PMC Fake Identity Card | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) लोगोचा (PMC Pune Logo) आणि नावाचा वापर करून बोगस ओळखपत्र (Bogus Identity card) तयार करण्याचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये ठेकेदार, त्यांचे कामगार, माजी नगरसेवकांचे कार्यकर्ते, मानधनावर काम करणारे, लायझनिंग करणारे कर्मचारी अशा लोकांचा समावेश आहे. अशा प्रकारचे बोगस ओळखपत्र तयार करून देणारा हा महापालिकेचाच कर्मचारी असल्याचे उघड झाले आहे. ‘आयडी चौधरी’ या नावाने त्याला ओळखले जाते. हा उद्योग करून त्याने लाखो रुपये देखील कमावले आहेत. यावर महापालिका प्रशासन काय कारवाई करणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (PMC Fake Identity Card)
मागील आठवड्यपासून पुणे महापालिकेत (PMC Pune) ओळखपत्र तपासण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये महापालिकेला असे 175 बोगस ओळखपत्र धारक सापडले आहेत. तूर्तास तरी सुरक्षा विभागाने (PMC Security Department) या लोकांना तंबी देऊन सोडले आहे. आगामी काळात मात्र अशा लोकांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा सुरक्षा विभागाकडून देण्यात आला आहे. महापालिकेत वेगवेगळ्या कामासाठी नागरिक येत असतात. मात्र यातील काही लोक हे महापालिकेत पार्किंग करण्यासाठी, काही कारण नसताना येत असलेले आढळले आहे. यामुळे पार्किंग करण्यासाठी जागा शिल्लक राहत नाही. तसेच हकनाक गर्दी दिसते. पुणे हे दहशतवाद्यांचे सॉफ्ट टार्गेट आहे हे नुकतेच काही प्रकरणावरून सिद्ध झाले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सुरक्षा विभागाने महापालिकेत येणाऱ्या नागरिकांची कसून चौकशी सुरु केली आहे. हे काम तृतीय पंथीयांना देण्यात आले आहे. ओळखपत्र दाखवल्याशिवाय कुणालाही प्रवेश दिला जात नाही. यामध्येच महापालिकेला बोगस ओळखपत्र मिळाले. महापालिकेच्या लोगोचा यासाठी वापर करण्यात येत आहे. ओळखपत्र आणि लेस चा वापर करून महापालिकेत प्रवेश मिळवला जात आहे. (Pune Municipal Corporation)
दरम्यान असे बोगस ओळखपत्र बनवणारी अशी कुठली कंपनी किंवा टोळी नसून एकच व्यक्ती असल्याचे समोर येत आहे. हा महापालिकेचाच कर्मचारी आहे. त्याला ‘आयडी चौधरी’ म्हणून ओळखले जाते. महापालिकेच्या ऑडिट विभागात हा कर्मचारी काम करतो. याची 2020 सालापासून म्हणजे कोरोना काळापासून सुरु आहे. कारण टाळेबंदीच्या काळात महापालिकेच्या कायम तसेच ठेका तत्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बाहेर फिरण्यासाठी ओळखपत्र दाखवणे बंधनकारक केले होते. काही कर्मचाऱ्यांकडे आयडी च्या लेस नव्हत्या तर काही लोकांकडे आयडी नव्हते. मग हा कर्मचारी लेस बनवून देत असे. त्याचा दर 70-100 रु असा होता. आता हा दर 150-200 रुपयांपर्यंत गेला आहे. कोरोना काळात जवळसपास सर्वच कर्मचाऱ्यांनी याचा लाभ घेतला आहे. त्यासाठी पैसे देखील खर्च केले आहेत. त्याचप्रमाणे ओळखपत्र बनवण्यासाठी एक अर्ज तयार करण्यात आला आहे. ज्यावर विभागप्रमुख किंवा अधिकारीक व्यक्तीचा सही शिक्का आणण्यास सांगितला जातो. त्यानुसार ओळखपत्र बनवून दिले जाते. याचा लाभ सद्यस्थितीत ठेका तत्वावर, मानधनावर काम करणारे कर्मचारी, ठेकेदार, लायझनिंग करणारे लोक घेत आहेत. ही सगळी कामे हाच कर्मचारी करतो. 
सध्या तरी महापालिका प्रशासनाने असे ओळखपत्र जप्त केले  आहेत. मात्र हे बनवण्यावर कशा पद्धतीने कारवाई केली जाणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (PMC Pune News) 
———
 News Title | PMC Fake Identity Card | ‘ID Chaudhary’ who made bogus identity card is an employee of the Pune Municipal Corporation!