Pune Model code of Conduct | कर्मचाऱ्यांनो तुम्ही ‘आदर्श आचारसंहितेची’ ‘लढाई’ लढा; पण तुमच्या ‘शस्त्राने’!

Categories
Breaking News PMC पुणे

Pune Model code of Conduct | कर्मचाऱ्यांनो तुम्ही ‘आदर्श आचारसंहितेची’ ‘लढाई’ लढा; पण तुमच्या ‘शस्त्राने’!

| पदरमोड करून महापालिका कर्मचारी रंगवताहेत भिंती!

Pune Model Code of Conduct – (The Karbhari News Service) – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या (Loksabha Election 2024) अनुषंगाने राज्यात  आदर्श आचार संहिता (Model Code of Conduct) लागू करण्यात आली आहे. त्या अनुषंगान सार्वजनिक ठिकाणचे राजकीय फ्लेक्स, बॅनर, पक्षांच्या जाहिराती काढून टाकण्याचे आदेश महापालिका निवडणूक विभागाच्या (PMC Election Department) वतीने देण्यात आले आहेत. मात्र ही कारवाई करण्यासाठी महापालिके कडून कर्मचाऱ्यांना कुठलेही साहित्य पुरवण्यात आले नाही. त्यामुळे पदरचे पैसे खर्च करून आम्हांला भिंती रंगवाव्या लागत आहेत. अशी खंत महापालिका कर्मचारी व्यक्त करत आहेत. (Pune Municipal Corporation (PMC)

भारत निवडणूक आयोगाने निवडणुका मुक्त व निष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी आचार संहिता लागू होण्याच्या कालावधीत जाहिरातींच्या प्रकाशना संदर्भात वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचना अधिक्रमित करून एकत्रित सूचना निदर्शनास आणल्या आहेत. या सूचना सर्व सबंधित यंत्रणांच्या निदर्शनास आणून त्यांना सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्याबाबत कळविणेत आलेले आहे. त्यानुसार महापालिका  कार्यक्षेत्रातील शासकीय संपत्तीच्या भिंतीवरील लेखन, पोस्टर / पेपर्स किंवा कटआऊट / होर्डिंग्ज / बंनर्स / झेंडे तसेच शासकीय बसेस वरील पक्षाच्या जाहिराती, सार्वजनिक ठिकाणी जसे रेल्वे स्टेशन बसस्टॅंड, विमानतळ, रेल्वेपूल, रस्ते, इलेक्ट्रीक / टेलिफोन खांब, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इमारती इत्यादी निवडणुका जाहीर झाल्या नंतर काढून टाकणेबाबतची कार्यवाही करण्यात यावी. असे  जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी पुणे यांनी कळविले आहे. त्यानुसार आदर्श आचार संहितेचे पालन करण्याबाबत महापालिका निवडणूक विभागाने सर्व क्षेत्रीय कार्यालयांना आदेश दिले आहेत.

या आदेशानुसार क्षेत्रीय कार्यालय स्तरावर कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. आकाशचिन्ह विभागाचे कर्मचारी हे काम करत आहेत. मात्र हे काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांना कुठलेही साहित्य पुरवण्यात आले नाही. शहरात बऱ्याच ठिकाणी असे पोस्टर्स बॅनर लागले आहेत. तसेच भिंतीवर माजी नगरसेवकांनी सर्वत्र आपली नावे छापली आहेत. ही नावे काढण्यासाठी संबंधित भिंत नव्याने पेंट करावी करावी लागते. मात्र हे देखील संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडून उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. कर्मचारी पदरमोड करून या भिंती रंगवत आहेत. मात्र आम्ही नेहमी कसा खर्च करणार, असा प्रश्न देखील कर्मचारी उपस्थित करत आहेत. याबाबत महापालिका प्रशासनाकडून मात्र थंड प्रतिसाद देण्यात आला.
अनधिकृत फ्लेक्स, बॅनर काढणे ही नेहमीची कारवाई असते. यात नवीन काही नसते. यासाठी काही साहित्य लागत असेल तर क्षेत्रीय कार्यालय उपलब्ध करून देतातच. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी पदरमोड करण्याची गरजच लागत नाही.
चेतना केरुरे, उपायुक्त, महापालिका निवडणूक कार्यालय. 

Pune Hoarding Renewal | 7 दिवसांत नवीनीकरण प्रस्ताव दाखल करण्याचे अधिकृत होर्डिंग धारकांना आदेश | उपायुक्त माधव जगताप यांचे आदेश

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune Hoarding Renewal | 7 दिवसांत नवीनीकरण प्रस्ताव दाखल करण्याचे अधिकृत होर्डिंग धारकांना आदेश

| उपायुक्त माधव जगताप यांचे आदेश

Pune Hoarding Renewal | शहरातील अधिकृत होर्डिंग धारकांकडून नवीनीकरण करून घेण्यात उदासीनता दिसून येत आहे. चालू आर्थिक वर्षात 1826 पैकी फक्त 245 लोकांनी नवीनीकरण केले आहे. त्यामुळे येत्या 7 दिवसांत सर्वांनी नवीनीकरण करून घेण्याचे प्रस्ताव दाखल करण्याचे आदेश उपायुक्त माधव जगताप (Madhav Jagtap) यांनी दिले आहेत. अन्यथा होर्डिंग, फ्लेक्सवर कारवाई करण्याचा इशारा जगताप यांनी दिला आहे. (PMC Sky Sign Department)

पुणे महानगरपालिकेच्या परवाना व आकाशचिन्ह विभागामार्फत (PMC Pune Sky Sign Department) पुणे शहर हद्दीमध्ये जाहिरात फलक उभारणेस परवानगी दिली जाते. महाराष्ट्र महानगरपालिका आकाशचिन्हे (स्काय साईन ) व जाहिरात प्रदर्शित करण्याचे नियमन आणि नियंत्रण नियम, २०२२ चे तरतुदीनुसार दरवर्षी अधिकृत जाहिरात फलकांचे नूतनीकरण केले जाते. त्यानुसार प्रचलित दरानुसार जाहिरात शुल्क भरून घेण्यात येते. सद्यस्थितीत सन २०२३ २४ मध्ये एकुण १८२६ अधिकृत जाहिरात फलक असून त्यापैकी केवळ २४५ जाहिरात फलक धारकांनी नूतनीकरण करून घेतलेले आहे. उर्वरित १५८१ अधिकृत जाहिरात फलक धारकांनी नूतनीकरण करून घेणे बाकी आहे. (Pune Municipal Corporation)

दरम्यान परवाना व आकाशचिन्ह विभागाचे प्रमुख श्री. माधव जगताप, उप आयुक्त यांनी शुक्रवार रोजी सर्व महापालिका सहायक आयुक्त यांचेसोबत बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये सर्व महापालिका सहायक आयुक्त यांना सर्व अधिकृत जाहिरात फलकधारकांचे नूतनीकरण ७ दिवसांचे आत पुर्ण करणेबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत. तसेच जे अधिकृत जाहिरातदार ७ दिवसांचे आत नूतनीकरणास प्रस्ताव दाखल करणार नाहीत अशा जाहिरात फलकांवर निष्कासनाची कारवाई करण्याचे आदेशीत केलेले आहे. (PMC Pune News)

– ज्यादा दरामुळे उदासीनता

दरम्यान महापालिका प्रशासनाने चालू आर्थिक वर्षात नवीनीकरणासाठी आणि नवीन प्रस्तावासाठी शहरात होर्डिंग, फ्लेक्स, बोर्ड लावायचे (Hoarding) असतील, तर होर्डिंग धारकांना आणखी ज्यादा दर म्हणजे 580 प्रति चौरस फूट दर करण्यात आला आहे. पूर्वी हा दर 111 होता. तर काही लोकांसाठी 222 होता. दरम्यान आता 580 दर झाल्याने होर्डिंग धारकांची उदासीनता दिसून येत आहे. जे होर्डिंग धारक कोर्टात गेले आहेत त्यांना 111 रु दराने मान्यता देण्यात येत आहे. असेच लोक नवीनीकरणासाठी पुढे येत आहेत. बाकी लोकांना 580 दर आहे. हा दर परवडत नसल्याने नवीनीकरणाबाबत उदासीनता दिसून येत आहे.
—-

Punit Balan Group | Oxyrich |  माधव जगताप यांची नोटीस चुकीची आणि बेकायदेशीर | पुनीत बालन 

Categories
Breaking News cultural PMC पुणे

Punit Balan Group | Oxyrich |  माधव जगताप यांची नोटीस चुकीची आणि बेकायदेशीर | पुनीत बालन

Punit Balan Group | Oxyrich | ऑक्सिरिच कंपनीच्या पुनीत बालन (Oxyrich punit Balan) यांना दहिहंडी उत्सवाचे दरम्यानचे कालावधीत अनधिकृत फलक, बोर्ड, बॅनर, फ्लेक्स इ. लावून सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण केल्याने 3 कोटी 20 लाखांचा दंड भरणेबाबतचे आदेश पुणे महापालिका अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप (Deputy Commissioner Madhav Jagtap) यांनी दिले होते. तसेच याबाबत बालन यांच्याकडून खुलासा देखील मागवण्यात आला होता. बालन यांनी आपला खुलासा माधव जगताप यांना सादर केला आहे. त्यात बालन यांनी म्हटले आहे कि, जगताप यांनी दिलेली सदर नोटीस चुकीची व बेकायदेशीर असून सदर नोटीस मंडळाना देण्याऐवजी जाणूनबुजून व वैयक्तिक आकसापोटी माझी बदनामी करिता माझ्या नावे नोटीस दिली आहे. दरम्यान बालन यांच्या खुलाश्यावर महापालिका काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. (PMC Sky Sign Department)

 पुनीत बालन यांचा सविस्तर खुलासा खालीलप्रमाणे :

सार्वजनिक उत्सव सादर करणे आणि त्यास निःशुल्क मान्यता देण्यासंदर्भात  मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली १४/०९/२०२३ रोजी बैठक घेवून निर्णय घेतला आहे असे  वृत्तपत्रात आले आहे. तसेच तुमचे पत्र जावक क्रमांक ई/५७४६ दिनांक ०४/०१/२०२३ सदर मा.उप सचिव, महाराष्ट्र शासन, गृह विभाग, मंत्रालय मुख्य इमारत, मुंबई यांजकडे सादर केलेले पत्र. सदर पत्रामध्ये तुम्ही नमूद केले आहे की पुणे शहरातील गणेशउत्सव कालावधीत रस्ता, पदपथावर उभारण्यात येणाऱ्या मान्य मापाच्या उत्सव मंडप/ स्टेज करिता पूर्वीपासूनच कोणतेही परवाना शुल्क आकारण्यात येत नव्हते. तसेच सन २०१९ पूर्वी स्थानिक पोलीस विभागाकडून मान्यता दिलेल्या स्वागत कमानी व रनिंग मंडप यांना आकारण्यात येत असलेले परवाना शुल्क देखील पुणे महानगरपालिका आकाशचिन्ह परवाना व विभाग मुख्य सभा ठराव क्रमांक ५६४ दिनांक ०९/०९/२०१९ अन्वये रद्द करण्यास मान्यता दिलेली असून त्याबाबत सन २०१९ पासून कोणतेही शुल्क आकारले जात नाही.

पुणे शहरात सन २०१९ गणेशउत्सव कालावधीत मोहरम / दहीहंडी आणि गणेशउत्सव मंडळाना ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने देण्यात आलेल्या नि: शुल्क परवानगी ही पुढील ५ वर्षा करिता म्हणजेच सन २०२२ पासून सन २०२७ सालापर्यंत गृहीतधरणे बाबत पुणे महानगरपालिका, पुणे कडून सार्वजनिक गणेशउत्सव २०२२ करिता सर्व गणेश मंडळे, पोलीस अधिकारी व मनपा अधिकारी यांची ०८/०८/२०२२ रोजी झालेल्या बैठकीत एकत्रित निर्णय घेण्यात आलेला होता.
वरील सर्व गोष्टींचा विचार करता तुम्ही पाठवलेली नोटीस ही माझे व्यक्तिमत्व बदनाम करण्यासाठी जाणूनबुजून मला पाठवली आहे. तसेच तुम्ही घेतलेला निर्णय चुकीचा व आयोग्य असून त्यानुसार आपण क्रमांक एल-१०४३ ०३/१०/२०२३ ची आमच्या कार्यालयात ०४/१०/२०२३ रोजी देण्यात
आलेली नोटीस रद्द करण्यात यावी तसेच सदर नोटीस केल्या बाबत प्रसारमाध्यमांना देखील कळवावेसबब, ज्याअर्थी या शासनानेच निर्बंधमुक्त” उत्सवाची घोषना केलेली आहे. त्याअर्थी आपणा दंड / विद्रुपीकरण शुल्क इत्यादिची मागणी आमच्याकडे करणे बेकायदेशीर व चुकीचे आहे. तसेच अश्या वसुली मिळकतकरातून करण्याबाबत उल्लेख देखील बेकायदेशीर आहे याचीही नोंद घ्यावी.

PMC Sky Sign Department | परवाना निरीक्षक राजेंद्र केवटे, सुरेंद्र राऊत, लक्ष्मीकांत शिंदे यांचे निलंबन

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Sky Sign Department | परवाना निरीक्षक राजेंद्र केवटे, सुरेंद्र राऊत, लक्ष्मीकांत शिंदे यांचे निलंबन

| उपायुक्त माधव जगताप यांची माहिती

PMC Sky Sign Department | पुणे – नियमांचे उल्लंघन करून टिळक चौकात संभाजी पोलिस चौकीच्या मागे होर्डिंग (Hoardings) उभारणीचे काम सुरू होते. मात्र त्याकडे कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने तीन परवाना निरीक्षकांचे (Licence Inspector) निलंबन करण्यात आले आहे. अशी माहिती उपायुक्त माधव जगताप (Deputy Commissioner Madhav Jagtap) यांनी दिली. यामध्ये परवाना निरीक्षक राजेंद्र केवटे, सुरेंद्र राऊत, लक्ष्मीकांत शिंदे यांचा समावेश आहे. (PMC Sky Sign Department)
महापालिकेच्या आकाश चिन्ह विभागातर्फे (Pune Municipal Corporation Sky Sign Department) संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडून परवानग्या दिल्या जातात. पण अनेकदा कागदावर सगळे योग्य असले तरी प्रत्यक्षात नियमांचे उल्लंघन केलेले असते. असाच प्रकार शहराच्या मध्यवर्ती भागात संभाजी पोलिस चौकीच्या (Sambhaji Police Chowki) मागे उभारलेल्या होर्डिंगमुळे उघडकीस आला आहे. या ठिकाणी तीन होर्डिंगला परवानगी दिल्यानंतर त्यामध्ये नियमानुसार एक मीटरचे अंतर ठेवणे बंधनकारक होते. पण संबंधित व्यावसायिकाने सलग १०० फुटांचे होर्डिंग उभारले आहेत. हे काम सुरू असताना अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात होते. याबाबत भाजप नेते तुषार पाटील यांनी देखील तक्रार केली होती. यावर अतिरिक्त  आयुक्त डॉ. खेमनार, उपायुक्त माधव जगताप, अविनाश सकपाळ यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली असता त्यामध्ये अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे परवाना निरीक्षकांना यावर कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा करण्यास सांगितले होते. पण त्यांनी खुलासा सादर केला नाही. होर्डिंग व्यावसायिकाला होर्डिंगवर जाहिरात लावण्यास मनाई केलेली असतानाही तेथे जाहिरात लावण्यात आली आहे. त्याकडेही परवाना निरीक्षक राजेंद्र केवटे, सुरेंद्र राऊत, लक्ष्मीकांत शिंदे यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे या तिघांना निलंबित करण्याचा आदेश उपायुक्त माधव जगताप यांनी काढला आहे. (Pune Municipal Corporation)

| या कारणांमुळे केले निलंबित

 होर्डिंगमध्ये एक फुटाचे अंतर न ठेवता १०० फूट लांबीचे एकच होर्डिंग उभारले. संभाजी पुलाच्या भरावाला छेद देऊन होर्डिंग उभारले आहे. होर्डिंग उभारताना वृक्षतोड करण्यात आली, पण त्याच्या परवानगीबाबत स्पष्टता नाही. जागा नदीपात्रात असूनही पूर रेषेबाबत पाटबंधारे विभागाचा अभिप्राय नाहीजागेचा मोजणी नकाशा नाही. पोलीस  विभागाचा अभिप्राय नाही. जमीन महापालिकेच्या मालकीची आहे की नाही याची खात्री नाही. (PMC Pune)
—–
News Title | PMC Sky Sign Department | Suspension of license inspectors Rajendra Kevate, Surendra Raut, Laxmikant Shinde Information of Deputy Commissioner Madhav Jagtap