Sanitation | PMC | नालेसफाई संदर्भात मनपा प्रशासनाला इशारा !

Categories
Breaking News PMC Political पुणे

नालेसफाई संदर्भात मनपा प्रशासनाला इशारा !

भारतीय जनता पक्ष पुणे शहराच्या शिष्टमंडळाने आज पावसाळी कामांच्या नियोजनातील निष्काळजीपणाबाबत महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी पावसाळा सुरू झाला तरी अपूर्ण असलेली नालेसफाई, निकृष्ट दर्जाची पावसाळी कामे, अद्यापही ‘जैसे थे’ स्थितीत असलेला राडारोडा आणि आपत्ती व्यवस्थापनाचा अभाव अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. पुराच्या सुरक्षेचा धोका असणाऱ्या ठिकाणांची वस्तुस्थिती देखील यावेळी आयुक्तांच्या लक्षात आणून देत, तात्काळ दखल घेऊन लवकरात लवकर कामे पूर्ण करण्याची मागणी केली.

वाढता पाऊस आणि संभाव्य पुरस्थितीचा धोका लक्षात घेऊन प्रभाग स्तरावर आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन करावे अशी मागणी मुळीक यांनी केली.

मुळीक म्हणाले, ‘अती पावसाच्या कालावधीत नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागू नये आणि त्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय साधावा याची दक्षता घेणे आवश्यक आहे. महापालिकेच्या विविध विभागात पोलीस प्रशासन पुणे महानगर परिवहन महामंडळ स्मार्ट सिटी यातील समन्वय महत्त्वाचा आहे.’
मुळीक पुढे म्हणाले, ‘पावसाचे पाणी साठण्याची संभाव्य ठिकाणे, रस्त्यात पडणारे खड्डे, पाण्याचा निचरा होण्याचे मार्ग, मोठे नाले, पुरामुळे बाधीत होणारे परिसर, निवारा यांची संख्या, साधन सामग्री आदींबाबत तातडीचे नियोजन होणे आवश्यक आहे.’

यावेळी जगदीश मुळीक, प्रदेश उपाध्यक्षा वर्षा तापकीर, सरचिटणीस गणेश घोष, उपाध्यक्ष गणेश कळमकर, माजी उपमहापौर सरस्वती शेंडगे, सुशिल मेंगडे यांच्यासह मंडल अध्यक्ष व नगरसेवक उपस्थित होते.

State women Commission | यंदा प्रथमच मिळणार महिला वारकऱ्यांना आरोग्यविषयक अत्याधुनिक सोयीसुविधा

Categories
Breaking News cultural Political social पुणे महाराष्ट्र

यंदा प्रथमच मिळणार महिला वारकऱ्यांना आरोग्यविषयक अत्याधुनिक सोयीसुविधा

| महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा ‘आरोग्यवारी’ अभियानाचा पुण्यातून शुभारंभ

आरोग्यवारी उपक्रमाचा आरंभ पुण्यातील पालखी विश्रामस्थळ असलेल्या निवडुंगा विठोबा मंदिर येथे  दि.१९ जून रोजी दुपारी १२.३० वा. होत असून या कार्यक्रमाच्या उदघाटनाला राज्यसभा सदस्या वंदना चव्हाण या उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्र राज्याला वारकरी संप्रदायामुळे समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभला आहे. संतांनी आपल्या जनजागृती कार्याच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात आध्यात्मिक लोकशाही स्थापन केली आहे. वारी ही महाराष्ट्रातील एक सांस्कृतिक परंपरा आहे. धर्म, जाती, पंथ, लिंग या पलीकडे जाऊन सर्व समावेशक समाजमन तयार करण्याचे कार्य संतांनी केले आहे. आषाढी व कार्तिकी वारीच्या निमित्ताने वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून देहू/आळंदी/पंढरपूर येथे दाखल होत असतात. या वारकऱ्यांमध्ये सहभागी होणा-या महिलांची संख्या देखील लक्षणीय असते हे लक्षात घेता महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची संकल्पना असलेल्या ‘आरोग्यवारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून वारीमध्ये सहभागी होणा-या महिलांना काही मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत आग्रही भूमिका घेतली होती.
यामध्ये ,
१. वारी काळात दर दहा ते वीस कि.मी. अंतरावर वारकरी महिलांसाठी शौचालय व न्हाणी घराची व्यवस्था असावी.
२. सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग व सॅनिटरी नॅपकिन बर्निंग मशीन उपलब्ध करून देण्यात यावे.
३. स्त्रीरोग तज्ज्ञांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी.
४. महिला सुरक्षिततेकरीता महिला हेल्पलाईन क्रमांक मुक्कामाच्या ठिकाणी/मंदिर परीसरात दर्शनी भागात लावावेत.
अशा सुविधा पुरविण्याबाबत पुणे , सातारा आणि सोलापूर जिल्ह्याच्या प्रशासनास निर्देश देण्यात आलेले होते व या तीनही जिल्ह्याच्या प्रशासनाने आरोग्यवारी या संकल्पनेला अत्यंत सकारात्मक असा प्रतिसाद देत महिला वारकऱ्यांसाठी या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत त्याबद्दल या सर्वांचे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून मनःपूर्वक अभिनंदन. आरोग्य आणि सुरक्षाबाबतीतच्या या महत्वाच्या सुविधा महिला वारकऱ्यांच्या उपलब्ध करून दिल्याने पुरोगामी महाराष्ट्रात महिला आरोग्य विषयक जागृतीचा एक नवीन अध्याय सुरु झाला आहे असं म्हणता येईल.

Lal Mahal : Deepali Dhumal : लाल महालातील स्वच्छतागृहांची दुरुस्ती व स्वच्छता रखडली! 

Categories
Breaking News cultural PMC Political पुणे

लाल महालातील स्वच्छतागृहांची दुरुस्ती व स्वच्छता रखडली!

: विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी वेधले लक्ष

पुणे : स्वच्छ अभियानात पुणे महापालिका वेगवेगळे नामांकन मिळवत आहे. मात्र दुसरीकडे महत्वाच्या ऐतिहासिक वास्तूंची स्वच्छता करण्यात मात्र महापालिका उदासीन दिसत आहे. याकडे महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी लक्ष वेधले आहे. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर महालाची स्वच्छता तात्काळ करावी. अशी मागणी धुमाळ यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

: महापालिका आयुक्तांना दिले पत्र

धुमाळ यांच्या पत्रानुसार कसबा पेठेत राजमाता जिजाऊ लाल महाल आहे. सदर लाल महाल मध्ये राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांचे ऐतिहासिक स्मारक असल्याने त्या लाल महालाला ऐतिहासिक ओळख आहे. त्यामुळे रोज अनेक हजारो शिवप्रेमी नागरिक या लाल महालामध्ये दर्शनासाठी येत असतात. तसेच शनिवार दिनांक. १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असल्यामुळे सदर ठिकाणी अनेक कार्यक्रम होणार आहे. लाल महाल सद्यस्थितीत अस्तिवातात असलेले स्वच्छतागृहांची अवस्था खुपच बिकट व अनेक अडचणी आहेत. पाण्याचे नळ तुटलेले आहे, फरशीचे टाईल्स तुटलेले आहे व दैनदिन स्वच्छता ठेवण्याची गरज आहे. १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असल्यामुळे हजारोच्या संख्येने नागरिक येणार आहेत. त्यामुळे लाल महालातील स्वच्छतागृहांची दुरुस्ती व परिसराची स्वच्छता करणे अत्यंत आवश्यक आहे.
तरी लाल महाल येथील स्वच्छतागृहांची दुरुस्ती व परिसराची स्वच्छता तातडीने करण्यात यावी. तसेच काही जागी आवश्यक असल्यास रंगरंगोटी करण्यात यावी.  तसेच लाल महाल येथील देखभाल दुरुस्ती व स्वच्छता करण्यासाठी कामय कामगरांची नियुक्ती तातडीने करण्यात यावी.

PMC : Beggars : ऐकावे ते नवलच!  : 115 कुटुंबांनी भीक मागणे सोडले 

Categories
Breaking News PMC social पुणे

ऐकावे ते नवलच!  : 115 कुटुंबांनी भीक मागणे सोडले

: पुणे महापालिकेचा अभिनव उपक्रम

पुणे : पुणे महापालिका आणि डॉक्टर फॉर बेगर्स यांच्या माध्यमातून एक अभिनव उपक्रम राबवला जात आहे. या माध्यमातून शहरातील भिक्षेकरी स्वच्छता अभियान राबवत आहेत. त्यामुळे या लोकांच्या हाताला काम मिळाले आहे. त्याचाच प्रतिसाद म्हणून 115 कुटुंबांनी भीक मागणे सोडून दिले आहे.

भिक्षेकरी राबवत आहेत स्वछता अभियान

डॉ. मनिपा सोनवणे व डॉ. अभिजीत सोनवणे, “डॉक्टर फॉर बेगर्स (भिक्षेक-यांचा डॉक्टर”) म्हणुन ” पुण्यामध्ये काम करतात. “डॉक्टर फॉर बेगर्स (भिक्षेक-यांचा डॉक्टर”) या प्रकल्पाच्या माध्यमातुन पुण्यातील रस्त्यावरच्या आणि मंदिराबाहेरच्या अंध अपंग आणि ज्यांना नाइलाजाने भिक मागावी लागत आहे, अशा वयस्कर व्यक्तिंना ते रस्त्यावरच तपासुन लागेल ती मोफत वैदयकिय सेवा देत असतात. या माध्यमातुन भिक्षेक-यांचे पुनर्वसन करणे व समुळ उच्चाटन करणे, हा या प्रकल्पाचा मुळ हेतु आहे. सध्या भिक्षेकरी म्हणून

आयुष्य जगत असलेल्या लोकांशी रस्त्यातच संवाद साधुन, विश्वास निर्माण करून त्यांना छोटे व्यवसाय करण्यासाठी निधी अथवा वस्तु उपलब्ध करून देवून त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत करणे असे या प्रकल्पाचे ढोवळ स्वरूप आहे. आजपावेतो ११५ कुटुंबांनी भीक मागणे सोडले असुन ते आता स्वतःच्या पायावर उभे आहेत. या दाम्पत्याने ५२ भिक्षेक-यांच्या मुलांच्या शिक्षणाची जवाबदारी घेतली आहे.
कोणतेही कौशल्य अंगी नसतांना भिक्षेक-यांच्या हाताला आता काय काम दयावे या विचारात असतांना आदरणीय संत गाडगेबाबांच्या विचारातून जन्माला आलेली हि भीक मागणाऱ्यांची खराटा पलटण! आठवड्यातून दर शुक्रवारी ही ४० लोकांची खराटा पलटण, आलटून-पालटून या संपूर्ण रस्त्याची स्वच्छता करीत आहे. दिनांक ७/०१/२०२२ रोजी खराटा पलटणचे ३५ भिक्षेकरी व कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रिय कार्यालयाचे सफाई कर्मचारी यांनी शनिवार पेठेतील ख्वाजा इसामुद्दीन (बडी दर्गा) दर्गाच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करून अंदाजे ५० कि. सुका कचरा गोळा केला.
याप्रसंगी अजित देशमुख, उपयुक्त, पुणे महानगरपालिका, डॉ. केतकी घाटगे, सहाय्यक आरोग्य अधिकारी, डॉ अभिजित सोनावणे,संस्थापक सोहम ट्रस्ट, डॉ. मनीषा सोनावणे, अध्यक्षा सोहम ट्रस्ट, इमामुद्दीन इनामदार, प्रमुख आरोग्य निरीक्षक, मोहिते व बंडगर प्रमुख आरोग्य निरीक्षक, इतर आरोग्य निरीक्षक सफाई कर्मचारी व खराटा पलटणचे अंदाजे ३५ भिक्षेकरी स्वयंसेवी उपस्थित होते.