Field officer | PMC Pune | शिक्षण विभागाच्या फिल्ड अधिकाऱ्यावर राहणार नजर 

Categories
Breaking News Education PMC पुणे

शिक्षण विभागाच्या फिल्ड अधिकाऱ्यावर राहणार नजर

| जीपीएस बेस्ड हजेरी अनिवार्य

पुणे | महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या फिल्ड अधिकाऱ्यावर आता महापालिका प्रशासनाला नजर ठेवता येणार आहे. यासाठी महापालिका जीपीएस बेस्ड अटेन्डन्स सिस्टीम कार्यान्वित करणार आहे. फिल्ड ऑफिसरने रोज किती शाळांना व कोणत्या शाळांना भेट दिली हे समजणार. त्यांची दैनिक उपस्थिती वेळेसह नोंदविली जाणार, या अॅप्लिकेशनव्दारे फिल्ड ऑफिसरर्सचे दैनंदीन रिपोर्ट नोंदविले जातील. यासाठी महापालिकेला 7 लाख 20 हजाराचा खर्च येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समिती समोर ठेवण्यात आला आहे.

प्रस्तावानुसार शिक्षण विभाग (प्राथ), पुणे मनपाच्या सर्व फिल्ड / विभागीय अधिकारी (उपप्रशासकीय अधिकारी / सहा. प्रशासकीय अधिकारी/क्रीडाअधिकारी/पर्यवेक्षक) यांचेकरिता जी.पी.एस आधारित अॅप्लिकेशन आहे. यामध्ये फिल्ड ऑफिसरने रोज किती शाळांना व कोणत्या शाळांना भेट दिली हे समजणार. त्यांची दैनिक उपस्थिती वेळेसह नोंदविली जाणार, या अॅप्लिकेशनव्दारे फिल्ड ऑफिसरर्सचे दैनंदीन रिपोर्ट नोंदविले जातील, शाळा भेटी अहवाल (Real Time Report) तयार करता यईल तसेच शाळानिहाय भौतिक स्थितीचा आढावा घेणे सुलभ होईल. याकरिता रक्कम रूपये ७,२०,०००/- इतक खर्च आवश्यक आहे.

सद्यस्थितीमध्ये शिक्षण विभाग (प्राथ), पुणे मनपाच्या सन २०२२-२३ च्या अंदाजपत्रकामध्य विषयांकित कामाकरिता अंदाजपत्रकीय तरतूद उपलब्ध नाही. विषयांकित कामाकरिता रक्कम रूप ७,२०,०००/- वर्गीकरणाने उपलब्ध झाल्यास सदर विषयाची मध्यवर्ती भांडार विभागामार्फत निविट प्रक्रिया राबवून निविदा अटी व शर्तीमध्ये पात्र होणाऱ्या संस्थेकडून जी.पी.एस बेस्ड अटेंडन्स सिस्टी कार्यान्वित करण्यात येईल. सदरची ७,२०,०००/- रक्कम शिक्षण विभाग (प्राथ), पुणे मनपाच्या स २०२२-२३ च्या अंदाजपत्रकातील प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र (RE12A138) या अर्थशिर्षकातील रकमेतू वर्गीकरणाने उपलब्ध करता येणे शक्य आहे. याला वित्तीय समितीने मान्यता दिली आहे.

Student Accident Sanugrah Grant | पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सुधारित राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना

Categories
Breaking News Education महाराष्ट्र

पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सुधारित राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना

 

मुंबई:- इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सुधारित राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना लागू करण्यास शासनाने मान्यता दिल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली. वाढलेली महागाई व विद्यार्थ्यांचे अपघाताचे वेगवेगळे स्वरूप या अनुषंगाने सर्व बाबींचा विचार करून शासनाने सुधारित योजना लागू करण्याचा निर्णय घेतला असून याबाबतचा शासन निर्णय 21 जून 2022 रोजी जारी करण्यात आला आहे.

सुधारित योजनेअंतर्गत विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास एक लाख 50 हजार रूपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. अपघातामुळे विद्यार्थ्यांना कायमचे अपंगत्व (दोन अवयव/ दोन डोळे किंवा एक अवयव व एक डोळा निकामी) झाल्यास एक लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान, अपघातामुळे कायमचे अपंगत्व (एक अवयव किंवा एक डोळा कायम निकामी) आल्यास 75 हजार रुपयांचे अनुदान, विद्यार्थ्यास अपघातामुळे शस्त्रक्रिया करावी लागल्यास प्रत्यक्ष रुग्णालयाचा खर्च किंवा जास्तीत जास्त एक लाख रूपये अनुदान, विद्यार्थी आजारी पडून सर्पदंशाने किंवा पोहताना मृत्यू झाल्यास एक लाख 50 हजार रूपयांचे अनुदान तसेच विद्यार्थी कोणत्याही कारणाने (क्रीडा स्पर्धेत खेळताना, शाळेतील जड वस्तू पडून, आगीमुळे, विजेचा धक्का, वीज अंगावर पडून) जखमी झाल्यास प्रत्यक्ष रुग्णालयाचा खर्च किंवा जास्तीत जास्त एक लाख रूपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल.

विद्यार्थ्यांच्या सानुग्रह अनुदानाचे प्रस्ताव तयार करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांचे पालक व संबंधित शाळांचे मुख्याध्यापक/ गट शिक्षणाधिकारी/ शिक्षणाधिकारी (प्राथमिक)/ माध्यमिक)/ शिक्षण निरीक्षक यांची असणार आहे. या योजनेमध्ये आत्महत्येचा प्रयत्न करणे, आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वतःला जखमी करून घेणे, गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात, अमली पदार्थांच्या अमलाखाली असताना झालेला अपघात, नैसर्गिक मृत्यू, मोटार शर्यतीतील अपघात याबाबींचा समावेश राहणार नाही.

या योजनेअंतर्गत विद्यार्थ्याचे निधन झाल्यास त्यांच्या कुटुंबियांपैकी विद्यार्थ्याची आई, विद्यार्थ्याची आई हयात नसल्यास वडील किंवा विद्यार्थ्याचे आई-वडील हयात नसल्यास 18 वर्षावरील भाऊ किंवा अविवाहित बहीण किंवा पालक यांना या प्राधान्य क्रमानुसार सानुग्रह अनुदानाची रक्कम अदा केली जाईल.

या योजनेतील प्रस्ताव निकाली काढण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात येत आहे. या समितीसमोर इयत्ता पहिली ते आठवी व इयत्ता नववी ते बारावी मध्ये शिकणाऱ्या मुला-मुलींकरिता प्रस्ताव सादर करण्याची जबाबदारी अनुक्रमे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांची राहील. तर, बृहन्मुंबई शहराकरिता संबंधित शिक्षण निरीक्षक यांनी प्रस्तावांची छाननी करून समितीसमोर सादर करावेत, असे यासंबंधीच्या शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.

Aba Bagul | मनस्वी आनंद….गुणवत्तेचा आणि आदर्शवत वाटचालीचा

Categories
Breaking News Education PMC Political पुणे

मनस्वी आनंद….गुणवत्तेचा आणि आदर्शवत वाटचालीचा

माजी उपमहापौर व काँग्रेस पक्षाचे मा. गटनेते आबा बागुल यांच्या संकल्पनेतून देशात प्रथमच साकारलेल्या आणि रोल मॉडेल ठरलेल्या पुणे महानगरपालिकेच्या   राजीव गांधी  अकॅडमी ऑफ   ई- लर्निंग स्कुलचे   विद्यार्थी घवघवीत यश संपादन करत आहेत आणि विविध क्षेत्रात यशस्वी  पदार्पण करत आहेत.

आनंदाची आणि अभिमानास्पद  बाब अशी की, पुणे महानगरपालिका संचलित राजीव गांधी अकॅडमी ऑफ इ-लर्निग स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स पुणे या कनिष्ठ महाविद्यालयाचा शैक्षणिक वर्ष एप्रिल/मे 2022 चा इयत्ता बारावीचा निकाल 97.49टक्के लागला असून यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. यंदा एकूण 403 विद्यार्थी परीक्षेस बसले होते .त्यापैकी 389 विद्यार्थी चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाले असून यंदा निकाल ९७.४९टक्के लागला आहे.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आबा बागुल यांनी मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांना पुढील करिअरसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.तसेच सर्व शिक्षक वृंद आणि कर्मचारी वर्गाचेही आबा बागुल यांनी आभार व्यक्त करून गुणवत्तेची ही उत्तुंग भरारी सदैव असू द्या अशा शुभेच्छाही दिल्या.

विशेष म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षणाची अल्पावधीत ख्याती निर्माण करणाऱ्या राजीव गांधी ई लर्निंग स्कुलमधील विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत आहेत.२०१७च्या बॅचमधील नितिशा संजय जगताप ही  आज ‘आयपीएस अधिकारी ‘ झाली आहे. नितिशाची बहीण तनिशा जगताप ही सुद्धा  २०१५च्या बॅचमधून घवघवीत यश संपादन करून आज इंजिनीअर म्हणून कार्यरत आहे.  राजीव गांधी  अकॅडमी ऑफ   ई- लर्निंग स्कुलने दहावी -बारावी आणि अन्य परीक्षांच्या   निकालांमध्ये सातत्याने शंभर टक्क्यांची परंपरा कायम राखली आहे. आयआयटीमध्ये ५०० विद्यार्थी तर जेईईमध्ये १००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. इतकेच नाहीतर ‘नासा’साठी दोन विद्यार्थीही पात्र ठरले आहेत .खऱ्या अर्थाने हा गुणवत्तेचा आणि आदर्शवत वाटचालीचा जल्लोष आहे.

Teacher Recruitment | PMC | अर्ज करण्यासाठी उद्याची शेवटची मुदत  | महापालिका इंग्रजी शाळेत नेमणार शिक्षक 

Categories
Breaking News Education PMC पुणे

अर्ज करण्यासाठी उद्याची शेवटची मुदत

| महापालिका इंग्रजी शाळेत नेमणार शिक्षक

पुणे महापालिकेच्या इंग्रजी माध्यमांच्या प्राथमिक शाळांसाठी शिक्षकांच्या नियुक्‍त्या करण्यात येणार आहेत. सहा महिन्यांकरिता मानधनावर या नियुक्त्या होणार आहेत. यासाठी अर्ज सादर करण्यासाठी 31 मेपर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे.

सन 2022-23 हे शैक्षणिक वर्ष पुढील महिन्यात सुरू होणार आहे. त्यापूर्वीच इंग्रजी माध्यमांच्या शाळांसाठी शिक्षक भरती करण्याची गरज भासू लागली आहे. दरमहा 15 हजार रुपये मानधनावर हंगामी स्वरूपात या शिक्षकांच्या नेमणुका होणार आहेत. प्राथमिक शिक्षक या पदांसाठी निवड, प्रतीक्षा यादी, शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेच्या प्राप्त गुणानुक्रमे यांना प्राधान्य देऊन नेमणुका होणार आहेत.

 

शैक्षणिक, व्यावसायिक अर्हता व अटींची पुर्तता करणाऱ्या वैयक्तिक माहितीसहचे अर्ज, गुणपत्रक व प्रमाणपत्रांच्या प्रमाणित स्वयंसाक्षांकित, छायांकित प्रतीसह महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत समक्ष अर्ज सादर करण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे. पोस्टाने किंवा टपालाने अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. अर्ज सादर करताना उमेदवारांनाच्या मूळ कागदपत्रांची पडताळणीही करण्यात येणार आहे.

School Opening : Pune : Mayor : पुण्यातील शाळा सुरु होणार कि नाही?  : महापौरांनी दिले ‘हे’ संकेत 

Categories
Breaking News Education पुणे महाराष्ट्र

पुण्यातील शाळा सुरु होणार कि नाही?

: महापौरांनी दिले ‘हे’ संकेत

पुणे : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात दिवसाला मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढत असताना राज्यातील शाळा१५ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता. पण, आता शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड यांनी यासंदर्भात माहिती दिली. राज्यात 24 तारखेपासून 1 ली ते 12 वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे गायकवाड यांनी सांगितले. मात्र पुण्यातील शाळा सुरु होणार कि नाही, याबाबत मात्र द्विधा स्थिती आहे. असं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले आहे. शनिवारी पालकमंत्री अजित पवार यांच्या सोबत होणाऱ्या बैठकीत हा निर्णय घेतला जाईल. असे महापौरांनी म्हटले आहे.

वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यात सरकारने 15 फेब्रुवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. आता 24 जानेवारीपासून पुन्हा शाळा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, स्थानिक प्रशासनाला त्याचे अधिकारही देण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला दिली मंजुरी, त्यामुळे सोमवारपासून राज्यात पुन्हा शाळेची घंटा वाजणार आहे, असेही वर्षा गायकवाड यांनी म्हटले.

दरम्यान पुण्यातील शाळा सुरु होणार कि नाही, याबाबत मात्र द्विधा स्थिती आहे. असं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले आहे. शनिवारी पालकमंत्री अजित पवार यांच्या सोबत होणाऱ्या बैठकीत हा निर्णय घेतला जाईल. असे महापौरांनी म्हटले आहे. कारण शहरात कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. त्यामुळे याबाबत विचार करावा लागणार आहे.

Pune School Reopen : पुण्यातील  पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा गुरुवार पासून  सुरु होणार : महापालिका आयुक्तांचे आदेश जारी 

Categories
Breaking News Education PMC पुणे महाराष्ट्र

पुण्यातील  पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा गुरुवार पासून  सुरु होणार

: महापालिका आयुक्तांचे आदेश जारी

पुणे : ओमायक्रोन  विषाणूची धास्ती संपूर्ण जगाने घेतली आहे. ऑस्ट्रिया, जर्मनी सारख्या शहरात तर लॉकडाऊन करण्यात आला आहे. पुणे शहरात लसीकरण मोठ्या प्रमाणात झाले असले तरी लहान मुलांचे लसीकरण झालेले नाही. त्यामुळे १५ डिसेंबरपर्यंत पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय पुणे महापालिकेकडून घेण्यात आला होता. पुणे शहरात सध्यस्थितीत ओमायक्रोनचा एकच सक्रिय रुग्ण आहे. तसेच परदेशावरून येणाऱ्या प्रवाशांवर पुणे महापालिका लक्ष ठेऊन आहे. त्याच अनुषंगाने शहरातील शाळा १६ डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.  आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे निर्देश जारी केले आहेत.

राज्य सरकारने एक डिसेंबरला पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ओमायक्रॉन विषाणूमुळे सतर्क राहण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. पण शिक्षण  विभाग आणि राजेश टोपे यांनी शाळा सुरु होण्याच्या निर्णयात कोणताही बदल होणार नसल्याचे स्पष्ट केल्यावर अनेक जिल्ह्यात शाळा सुरु करण्याच्या तयारीलाही सुरुवात झाली होती. मात्र मुंबई महापलिककेने या विषाणूचा धोका पाहता शाळा १ तारखेपासून सुरु होणार नसल्याचे जाहीर केले होते. तर पुणे महापालिकेने १५ डिसेंबरपर्यंत शाळा बंद राहणार असल्याचे सांगितले होते. त्याच अनुषंगाने शहरातील शाळा १६ डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.  आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे निर्देश जारी केले आहेत.

जिल्ह्याचे पालकमंत्री, विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त अशा आम्ही सर्वांनी चर्चा करून शाळा सुरु करण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे. सर्व नियम पाळून या शाळा गुरुवार पासून सुरु होतील.

        मुरलीधर मोहोळ, महापौर

School Reopen : पुण्यातील 1 ली ते 7 वी पर्यंतच्या शाळा 15 डिसेंबर पर्यंत बंदच : महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती

Categories
Breaking News Education PMC पुणे

1 ली ते ७ वी पर्यंतच्या शाळा 15 डिसेंबर पर्यंत बंदच

: 15 डिसेंबर ला बैठक घेऊन  नंतर निर्णय

: महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती

पुणे : राज्य सरकारने (Maharashtra Government) उद्या म्हणजेच 1 डिसेंबर पासून राज्यातील पहिलीपासूनचे वर्ग सुरु (Pune School Reopen) करण्याचा निर्णय घेतला. पण मुंबई महापालिकेने (BMC) 1 डिसेंबरऐवजी 15 डिसेंबरपासून शाळा सुरु (Pune School Reopen) करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर आता पुणे महापालिकेनं (Pune Corporation) देखील पुण्यातील 1 ली ते ७ वी पर्यंतच्या शाळा 15 डिसेंबर पर्यंत बंदच ठेवण्याचा  निर्णय घेतल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol) यांनी दिली. 15 डिसेंबर ला बैठक घेऊन पुढील नियोजन केले जाईल, असे ही महापौर म्हणाले.

शाळा सुरु (Pune School Reopen) करण्यासंदर्भात महापौर मुरलीधर मोहोळ आणि महापालिका आयुक्त विक्रम कुमार
(Municipal Corporation Commissioner Vikram Kumar) यांच्या बैठक झाली. या बैठकीत पुण्यातील शाळा 15 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ओमिक्रॉन विषाणू (Omicron Variant) संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात तीन दिवसांसाठी निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत.
त्यामुळे पुण्यातील शाळा 15 डिसेंबर पर्यंत बंदच ठेवण्याचा  निर्णय महापालिकेनं घेतला आहे.

राज्य सरकारने 1 डिसेंबरपासून पहिली ते चौथी शाळा सुरु करण्याची घोषणा केली आहे. मात्र, पालक संघटना आणि शिक्षण संस्था यांच्यासोबत चर्चा करुन निर्णय घेतला जाईल. असे महापौरांनी सांगितले. त्यामुळे शाळा सुरु (Pune School Reopen) करण्याबाबत प्रशासनात संभ्रम असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. अखेर पुणे महापालिका आयुक्त आणि महापौर यांच्यात चर्चा झाल्यानंतर पहिली ते सातवीच्या शाळा 15 डिसेंबर पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. वर्ग सुरु करण्यासाठीची तयारी पूर्ण झालेली आहे. मात्र, ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या (Omicron variant) पार्श्वभूमीवर महापालिकेने सावध पवित्रा घेतला आहे.