shivsena Pune | भगवद्गीतेच्या शिकवणीप्रमाणे जे गेले त्यांचा शोक करायचा नाही | डॉ. नीलम गोऱ्हे

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

शिवसेनेच्या वतीने उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठीच महाआरतीचे आयोजन

शिवसेनेचा महावृक्ष आणखी विशाल होण्याची प्रार्थना; श्री चरणी केला ६२ किलोंचा मोदक अर्पण

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हे केवळ पुणेकरांचे नव्हे तर देशभरातल्या असंख्य गणेश भक्तांचे आराध्य दैवत आहे. शिवसेना पक्षप्रमुख  उद्धवजी ठाकरे यांच्या २७ जुलै रोजीच्या वाढदिवसानिमित्त आज येथे पुणे शहर शिवसेनेच्या वतीने महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने मा. श्री उद्धवजी ठाकरे यांचे सर्व संकल्प पूर्ण होवोत आणि राज्यातील जनतेच्या मनातील सर्व संभ्रम दूर होण्यासाठी आशीर्वाद मिळावेत. शिवसेनेचा वटवृक्ष विशाल महावृक्षात रुपांतरीत होवो, अशी प्रार्थना केल्याचे शिवसेना उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज येथे सांगितले.

त्या म्हणाल्या, ” शिवसेना हा पक्ष शिवसैनिकांच्या भावनांवर आणि विचारांवर चालत असलेल्या पक्ष आहे. अनेक वेळा लोकांनी पक्षातून बाहेर जाण्याचा प्रसंग येऊन गेला. मात्र भगवद्गीतेच्या शिकवणीप्रमाणे जे गेले त्यांचा शोक करायचा नाही आणि आपले काम सातत्याने पुढे चालू ठेवायचे या तत्त्वानुसार मा. उद्धवजींच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्ष आपले काम आणि कार्य जोरदारपणे सुरू ठेवत आहे.”

आज पुण्यामध्ये शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्ते महिला आघाडी यांच्यासह दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात महाआरती करण्यात आली. यावेळी श्री गणेशांना उद्धवजीच्या वाढदिवसानिमित्त ६२ किलोंचा मोदक डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला.

शिवसहकार सेनेचे पुणे जिल्हाप्रमुख बाळासाहेब भांडे, शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, शहर संघटक राजेंद्र शिंदे यांनी श्रींना अभिषेक केला आणि श्री उद्धवजी ठाकरे यांना दीर्घायुष्य आरोग्य लाभावे अशी प्रार्थना केली.

या कार्यक्रमाला पुणे शहरातील सामान्य नागरिक मोठ्या संख्येने हजर होते त्याचप्रमाणे शिवसेनेचे पदाधिकारी पुणे जिल्हा संघटक
राम गायकवाड, नितिन चांदेरे बाजार समिती सदस्य, उप शहर प्रमुख आनंद गोयल, प्रशांत राणे, संतोष गोपाळ, म्हाळुंगे गावचे युवा सरपंच मयुर भांडे, संजय गवळी, अविनाश मरळ, शादाब मुलाणी, स्वप्नील कुंजीर, धनंजय चौधरी, युवराज शिंगाडे, राजू विटकर, महिला आघाडीच्या संगीता ठोसर, पल्लवी जावळे, कल्पना थोरवे, श्रुती नाझीरकर, स्वाती कथलकर, कविता आंब्रे, ज्योती चांदेरे, विद्या होडे, शर्मिला येवले, अनिता परदेशी, निकीता मारटकर, गायत्री गरुड आदी उपस्थित होते.

CM Eknath Shinde | मुख्यमंत्र्यांनी पुण्यात सत्कार नाकारला | कारण घ्या जाणून 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांनी पुण्यात सत्कार नाकारला | कारण घ्या जाणून

एक रिक्षावाला राज्याचा मुख्यमंत्री बनला, त्याच्या सत्कारासाठी पुण्यातील रिक्षाचालकांनी, शिवसैनिकांनी आणि आठवले गटाने जय्यत तयारी केली होती. भर पावसात सायंकाळपासून हे कार्यकर्ते उभे होते. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या साऱ्यांकडून सत्कार, जल्लोष नम्रपणे नाकारला आहे.

मुख्यमंत्री स्टेजवर आल्यावर त्यांना भला मोठा हार घालण्यात येत होता. बाहेर ढोल ताशे, फटाके वाजविण्यास सुरुवात झाली होती. इतक्यात शिंदे यांनी माईक हातात घेतला. ”सर्वांना माझी नम्र विनंती आहे, कुठेही वाद्ये फटाके वाजवू नका. कारण अमरनाथमध्ये पुण्यातील तीन जण मृत्यूमुखी पडले आहेत. यामुळे कुठेही जल्लोष करू नका”, असे भावनिक आवाहन उपस्थित समर्थक, आठवले गटाच्या कार्यकर्त्यांना मुख्यमंत्र्यांनी केले.

मी तुम्हाला खास भेटायला आलोय. मी आषाढी एकादशीच्या पुजेला जात आहे, वेळेत पोहोचायचे आहे. सर्वांचे आभार मानतो. अमरनाथ यात्रेत मृत्यूमुखी पडलेल्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. सर्वांनी दोन मिनिटे उभे राहून या मृतांना श्रद्धांजली द्यावी, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले.

 

मी पुन्हा आपल्याला भेटायला येईन. तुम्हा सर्वांच्या आणि राज्यातील जनतेच्या आशिर्वादाने या राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. मी मुख्यमंत्री पदाचा वापर जनतेच्या भल्यासाठी, कामासाठी करेन, असे आश्वासन शिंदे यांनी दिले. बाळासाहेब, दिघेंचे विचार पुढे नेण्याचे काम करणार आहे, असे शिंदे म्हणाले.

युवासेना सहसचिव महाराष्ट्र राज्य किरण साळी, शिवसेना सहसंपर्क प्रमुख अजय भोसले, युवासेना उपाध्यक्ष विद्यापीठ कक्ष आकाश शिंदे आदी उपस्थित होते. महत्वाची बाब म्हणजे शिवसेनेचे माजी नगरसेवक नाना भानगिरे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र ट्राफिकमध्ये अडकल्याने कार्यक्रमात पोहचू शकले नाहीत.

Shivsena | Kothrud | एकनाथ शिंदेच्या फोटोला जोडे मारत कोथरूड मध्ये शिवसेनेचे जोरदार आंदोलन 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

एकनाथ शिंदेच्या फोटोला जोडे मारत कोथरूड मध्ये शिवसेनेचे जोरदार आंदोलन

कोथरूड येथे  शिवसेना अंगार है, बाकी सब भंगार है, ज्याला भगवा कळेल त्याचेच संकट टळेल, गद्दारांना माफी नाही, उद्धव साहेब आम्हास आपला सार्थ अभिमान आहे.अशी जोरदार घोषणाबाजी करत पुण्यातील कोथरूड येथे एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी बंडखोर आमदारांच्या फोटोला जोडे मारत कोथरूड येथील कर्वे पुतळा चौकात रस्त्यावर उतरत बंडखोर आमदारांचा निषेध करत आंदोलन केले.

आम्ही उध्दव ठाकरे बरोबरच असल्याचे आंदोलकांनी सांगितले. एकनाथ शिंदे यांनी असंख्य आमदारांना घेऊन शिवसेनेसोबत बंड केल्याने शिवसैनिकांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. निम्म्यापेक्षा जास्त शिवसेनेचे आमदार हे मंत्री शिंदे यांच्यासोबत आहेत. याच्‍या विरोधात आज कोथरुड येथे शिवसेना व युवासेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे.

शिवसेना, महिला आघाडी, युवासेना, युवतीसेना, अंगिकृत संघटनेतील सर्व पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संखेने सहभागी होते. यावेळी अनेक शिवसैनिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यावेळी शहरप्रमूख गजानन थरकुडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले त्याप्रसंगी माजी गटनेता पृथ्वीराज सुतार, योगेश मोकाटे,नितिन शिंदे भारत सुतार, श्रीपाद चिकणे,
किशोर सोनार ,राजेश पळसकर, राम थरकुडे,नितिन पवार, अनिल घोलप,उमेश भेलके वैभव दिघे,नंदकुमार घाटे,दिलिप गायकवाड,कांताआप्पा बराटे,दिनेश बराटे,बाप्पू चव्हाण,अमित आल्हाट
बाळासाहेब धनवडे, अनिल भगत ,योगेश मारणे
राजू कुलकर्णी,गौरव झेंडे, शिवाजी गाढवे,शुभम कांबळे,लखन तोंडे,कूणाल कांदे सविताताई मते,छायाताई भोसले प्रज्ञा लोणकर,भारती भोपळे शर्मिला शिंदे,जोती चांदिरे पल्लवी नागपुरे,अनिल माझीरे जगदीश दिघे,अनिल भगत मंदार धुमाळ,पुरुषोत्तम विटेकर, सागर तनपुरे,दिनेश नाथ,महेश शिंदे
ऋषिकेश कुलकर्णी,आदि उपस्थित होते.

Shivsena | Pune | देशपांडेच्या जाण्याने शिवसेनेला काडीचा फरक पडत नाही  | शहर प्रमुख गजानन थरकुडे

Categories
Breaking News Political पुणे

देशपांडेच्या जाण्याने शिवसेनेला काडीचा फरक पडत नाही

: शहर प्रमुख गजानन थरकुडे

पुणे : शाम देशपांडे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. यावर शहर प्रमुख गजानन थरकुडे यांनी देशपांडे यांच्या जाण्याने शिवसेनेला काडीचाही फरक पडत नाही, असा टोला लगावला आहे.

थरकुडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार शिवसेना ही निष्ठावंतांची संघटना आहे. शाम देशपांडे यांना महापालिकेत तीनवेळा प्रतिनिधीत्व दिले. स्थायी समितीचे अध्यक्षपद, महापालिकेतील गटनेतेपद, शहरप्रमुख, विधानसभेची उमेद्वारी अशी पदे देऊनही शाम देशपांडे समाधानी नव्हते. शिवसेनेबद्दल कृतघ्न असण्याऐवजी त्यांनी कृतघ्नपणा दाखविला आहे. ते शिवसेनेत सक्रियही नव्हते, त्यामुळे त्यांच्या पक्षातून बाहेर पडण्यामुळे शिवसेनेला काडीचाही फरक पडणार नाही, असे शिवसेनेच्या वतीने जाहीर करण्यात आले.  शिवसेनेचे शहरप्रमुख गजानन थरकुडे यांनी हे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.

मेट्रोच्या उद्घाटनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात दाखल झाले होते, तेव्हा पंतप्रधान मोदींच्या स्वागताचे पुण्यनगरीत शाम देशपांडे यांनी बोर्ड लावले होते. यावरूनच देशपांडे यांची भूमिका स्पष्ट झाली होती. शिवसेनेने भरभरून देऊनही देशपांडे यांना त्याची जाणीव नसणे हे कृतघ्नपणाचे लक्षण आहे. ते शिवसेनेत सक्रिय नव्हतेच त्यामुळे ते असले किंवा नसले तरी शिवसेनेला काही फरक पडत नाही. शिवसेना हा निष्ठावंत शिवसैनिकांचा पक्ष आहे, असे शहरप्रमुख गजानन थरकुडे यांनी म्हटले आहे.