G20 Summit in Pune |  Sinhagad Fort |  Foreign guests of the G 20 conference will visit Sinhagad Fort!

Categories
Breaking News cultural PMC social पुणे महाराष्ट्र

G20 Summit in Pune |  Sinhagad Fort |  Foreign guests of the G 20 conference will visit Sinhagad Fort!

 |  Divisional Commissioner’s order to beautify Sinhagad road

 G20 Summit in Pune |  Sinhagad Fort |  (Author: Ganesh Mule) |  The G-20 Summit in Pune will be held in the month of June.  The foreign guests invited for this conference want to know about the culture of Maharashtra.  Accordingly, a trip to Sinhagad Fort, which is near from Pune, will be arranged for the guests.  Accordingly, the Divisional Commissioner has issued an order to Pune Municipal Corporation(PMC), Pune Zilla Parishad and Public Works Department to repair, repair and beautify Sinhagad Road from Pune to Sinhagad for this tourist visit.  PWD) are given.  (G 20 summit in Pune | Sinhgadh Fort)
 The G-20 conference has been organized in India, Italy and Indonesia in 3 countries from 1/12/2022 to next 1 year.  Accordingly, the third meeting of the Department of Information and Technology will be held in Pune (G 20 Summit In Pune) from 12 to 14 June 2023 in Maharashtra.  The responsibility of successfully planning and organizing this ambitious program rests with the central government as well as the state government.  (Sinhagad Fort News)!
  3rd DEW Group’s D.  12 June to 14 June
 Meanwhile, the instructions regarding the pre-planning of the meeting to be held in Pune have been received from the Deputy Secretary of the State.  (Sinhagad Road Maintenance and beautification)
 Accordingly, Maharashtra Government’s letter dt.  As per 15/05/2023 dt.  DEWG Conference is being held from 12th to 14th June.  It is planned to take the invitees to Sinhagad fort as part of local tourism and sightseeing.  However, due to the palanquins of Shri Sant Dnyaneshwar Maharaj and Shri Sant Tukaram Maharaj staying in Pune during this period, it is planned to take the guests to Sinhagad via NDA Khadakawas.  Therefore, the repair, repair and beautification of the road under your jurisdiction should be started immediately.  Such orders have been given by the Divisional Commissioner to Pune Municipal Corporation, Pune Zilla Parishad and Public Works Department.
 ——

G 20 summit in pune | Sinhagad Fort | G 20 परिषदेतील परदेशी पाहुणे करणार सिंहगडाची सफर!

Categories
Breaking News cultural PMC social पुणे महाराष्ट्र

G 20 summit in pune | Sinhagad Fort | G 20 परिषदेतील परदेशी पाहुणे करणार सिंहगडाची सफर!

| सिंहगड रस्त्याचे सुशोभीकरण करण्याचे विभागीय आयुक्तांचे आदेश

G 20 summit in pune | Sinhagad Fort | (Author: Ganesh Mule) | पुण्यात जून महिन्यात G- २० परिषद (G 20 Summit in Pune) होणार आहे. या परिषदेसाठी निमंत्रित परदेशी पाहुण्याना महाराष्ट्राच्या संस्कृतीविषयी (Maharashtrian Culture) अवगत करायचे आहे. त्यानुसार पुण्यापासून जवळच असलेल्या सिंहगड किल्ल्याची (Sinhagad Fort) सफर या पाहुण्यांना घडवून आणली जाणार आहे. त्यानुसार या पर्यटन भेटीकरिता पुणे ते सिंहगड रस्त्याची डागडुजी, दुरुस्ती, व सुशोभिकरण (Sinhagad Road Maintenance and beautification) करुन घेण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी (Divisional Commissioner) पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) , जिल्हा परिषद (Pune Zilla parishad) आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला(PWD)  दिले आहेत. (G 20 summit in pune | Sinhgadh Fort)

जी-२० परिषदेचे आयोजन भारत, इटली व इंडोनेशिया या ३ देशात दि.१/१२/२०२२ ते पुढील १ वर्ष या कालावधीमध्ये करण्यात आलेले आहे. त्यानुसार महाराष्ट्रामध्ये १२ ते १४ जून २०२३ या कालावधीत माहिती व तंत्रज्ञान या विभागाची तिसरी बैठक पुणे (G 20 Summit In Pune) येथे होणार आहे. या महत्वकांक्षी कार्यक्रमाचे यशस्वीरित्या नियोजन व आयोजन करण्याची जबाबदारी केंद्रशासनाच्या बरोबरच राज्य शासनावरही असून या कालावधीमध्ये जगातील जवळपास ४० देशांमधून सुमारे १०० मान्यवर सदर परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत. (Sinhagad Fort News)!
 तिस-या DEW Group च्या दि. १२ जून ते १४ जून दरम्यान पुणे येथे होणा-या बैठकीच्या पूर्व नियोजनबाबतच्या सूचना राज्याचे उपसचिव यांचेकडून प्राप्त झालेल्या आहेत. (Sinhagad Road Maintenance and beautification) 
त्याअनुषंगाने महाराष्ट्र शासनाचे पत्र दि. १५/०५/२०२३ नुसार दि. १२ ते १४ जून DEWG परिषद आयोजित करणेत आली आहे. यासाठी येणाऱ्या निमंत्रितांना स्थानिक पर्यटन व स्थळ दर्शनांतर्गत किल्ले सिंहगड येथे घेऊन जाणे नियोजित आहे. मात्र या कालावधीमधे पुणे येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालख्या मुक्कामी असले कारणाने निमंत्रीत पाहुण्यांना NDA खडकावासला मार्गे सिंहगडावर नेणे नियोजित आहे. त्यास्तव उपरोक्त मार्गाचा आपल्या अखत्यारित असणाऱ्या रस्त्याची डागडुजी, दुरुस्ती व सुशोभिकरण यास तात्काळ सुरुवात करावी. असे आदेश विभागीय आयुक्त यांनी पुणे महापालिका, पुणे जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत.
——
News Title | G20 Summit in Pune |  Sinhagad Fort |  Foreign guests of the G 20 conference will visit Sinhagad! |  Divisional Commissioner’s order to beautify Sinhagad road

Sinhagad Fort | सिंहगड परिसर संवर्धनासाठी ३ कोटी ७५ लाख मंजूर

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र

प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत सिंहगड परिसर संवर्धनासाठी ३ कोटी ७५ लाख मंजूर

पुणे | सिंहगड किल्ल्याचा कल्याण दरवाजा आणि परिसर संवर्धनासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रयत्नामुळे प्रादेशिक पर्यटन योजनेतून ३ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. पुरातत्व विभागातर्फे एप्रिलअखेर या कामांना सुरूवात करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील सिंहगड किल्ल्याचा विकास आराखड्याचा प्रश्न बरेच वर्ष प्रलंबित होता. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सिंहगड किल्ल्याचा विकास करण्याबाबत मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळी पालकमंत्री श्री.पाटील यांनी जिल्हातील प्राचीन मंदीरे, गड व किल्ले यांचा २०२३-२४ च्या जिल्हा विकास आराखड्यात प्राधान्याने समावेश करुन त्यांचे जतन व संवर्धन तसेच त्या ठिकाणी भाविक व पर्यटकांसाठी पायाभुत सुविधा निर्माण करण्याचे नियोजन करण्याचे आश्वासीत केले होते.

सिंहगड किल्ल्याचा संवर्धनाचा विषय महत्वाचा असल्याने २०२२-२३ मध्ये त्याकरिता निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासनदेखील पालकमंत्र्यांनी दिले होते. त्या अनुषंगाने प्रादेशिक पर्यटन योजनेतून हा निधी मजूर झालेला आहे.

*जिल्हा वार्षिक योजनेतून ३० कोटींची तरतूद*

जिल्हा वार्षीक योजनेमधुन यावर्षी ३० कोटी रुपये जिल्ह्यातील गड व किल्ले संवर्धनासाठी उपलब्ध करुन देण्याचे नियोजन आहे. त्याबाबतचा विकास आराखडा बनविण्याच्या सुचना पालकमंत्री पाटील यांनी राज्य पुरातत्व विभाग़ाच्या सहायक संचालकांना दिल्या आहेत. येत्या जिल्हा नियोजन समितीच्या आगामी बैठकीत या सर्व कामांना मंजुरी देवून ही कामे पुढील वर्षी मार्च अखेरीस पुर्णत्वास नेण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

*जिल्ह्यातील ऐतिहासिक व धार्मिक स्थळांचा विकास*

जिल्ह्यातील प्राचीन वास्तू व गड किल्ला संवर्धनास, ऐतिहासिक तसेच धार्मिक स्थळांच्या विकासास २०२३-२४ मध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे. यामुळे जिल्ह्यातील पर्यटनास मोठ्या प्रमाणात चालना मिळून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. त्यादृष्टीने जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून नियोजनही करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी स्वत: या कामांकडे लक्ष दिले असून त्याचा आढावादेखील सातत्याने घेण्यात येत आहे.

स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ मौजे तुळापुर ता. हवेली व समाधी स्थळ स्मारक वढू (बु.) ता. शिरूर येथील २६९ कोटी २४ लाख रुपयांच्या विकास आराखड्यातील कामांची निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली. छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथीच्या दिवशी विकास आराखड्याची निविदा प्रक्रिया प्रसिद्ध करण्यात आली. दोन्ही कामे छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीपूर्वी सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

श्री क्षेत्र जेजुरी विकास आराखड्यांतर्गत १०९ कोटी ५७ लाखांच्या विकास आराखड्यातील कामांची निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मुख्य मंदीराचे जतन संवर्धनाच्या कामाच्या निविदेने विकास आराखड्यास सुरुवात करण्यात येत आहे. मौजे सदुंबरे ता. मावळ येथील श्री संत जगनाडे महाराज विकास आराखड्यासही मंजुरी देवून शासन मान्यतेसाठी विभागीय आयुक्त कार्यालयास ६२ कोटी ९३ लाख रुपयांचा आराखडा सादर करण्यात आला आहे.

अष्टविनायक विकासाचा ४३ कोटी २३ लाख रुपयांचा आराखडा मुख्य सचिवांच्या मंजुरीने मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीकडे मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. हुतात्मा शिवराम हरी राजगुरू स्मारक विकास आराखडा सुधारीत करुन शासनास सादर करण्याचे काम करण्यात येत आहे. देशातील क्रांतिकारकांचे असिम त्यागाचे स्थान सर्वांना प्रेरणा व स्फुर्ती देणारे असावे आणि ते राष्ट्रीय स्तरावरील प्रेरणा केंद्र व्हावे यासाठी किमान २०० कोटींचा आराखडा तयार करण्याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर यांनी दिली आहे.

——

ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची कामे पुरातत्व विभागामार्फत करताना मूळ वास्तु व प्राचीन शैली यांच्याशी साधर्म्य असणारी कामे दिसतील याकडे लक्ष दिले जाईल. गड व किल्ले ही राष्ट्रीय अभिमानाचे प्रतिके असल्याने हा इतिहास जतन करुन ठेवण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. तसेच या कामांमुळे जिल्ह्यातील पर्यटनालाही चालना मिळणार आहे.

– डॉ.राजेश देशमुख, जिल्हाधिकारी

0000