Be careful if you harm the tree for Holi!  The fine can be up to 1 lakh!  |  Warning of Garden Department of Pune Municipal Corporation

Categories
Breaking News cultural PMC social पुणे

  Be careful if you harm the tree for Holi!  The fine can be up to 1 lakh!

 |  Warning of Garden Department of Pune Municipal Corporation

 PMC Garden Department – (The Karbhari News Service) |  No trees should be cut on the occasion of Holi.  Such an appeal has been made on behalf of the Garden Department of Pune Municipal Corporation (PMC Garden Department).  It is an offense to burn, cut down trees or do any act of harming trees in any way without a permit.  A fine of up to 1 lakh can be imposed for this.  Park Superintendent Ashok Ghorpade (Ashok Ghorpade PMC) has given this warning to the citizens.  (Pune Municipal Corporation (PMC)
 The Maharashtra (Urban Area) Tree Preservation Act, 1975 to Pune Municipal Corporation Jurisdiction has been implemented.  The Tree Authority functions as per the Maharashtra (Urban Areas) Protection and Preservation of Trees Act, 1975, Maharashtra (Urban Areas) Tree Protection and Conservation Rules, 2009 and the order of May High Court, Bombay dated 20th September, 2013.  (Pune PMC News)
 As per the Maharashtra (Urban Areas) Protection and Preservation of Trees (Amendment) Act, 2021
 It is an offense to burn, cut down trees or do any act of harming trees in any way without a permit.  Such an offense shall be punishable with fine of an amount equal to the value drawn but not exceeding one lakh rupees, using such method as may be notified by the Government.’
 However, the municipal park department issued a public appeal to all the citizens of the city not to cut down any trees on the occasion of Holi.  If any person is felling trees without permission or reducing the extent, Hon’ble the concerned field office.  Complaint should be made to Municipal Assistant Commissioner and Tree Officer / Tree Authority Office, Pune Municipal Corporation or on Toll Free Number – 18001030222, WhatsApp No. 9689900002 or www.complaint.  Punecorporation.org complaint portal or SMS  Alert mobile phone service no.  9223050607 without delay S.  M.  S.  should do

PMC Pune Mula Mutha River front devlopment Project | झाडे तोडण्याबाबत सरकार अंतिम निर्णय घेणार! 

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Pune Mula Mutha River front devlopment Project | झाडे तोडण्याबाबत सरकार अंतिम निर्णय घेणार!

| पुणे महापालिका राज्य सरकारला पाठवणार अहवाल

PMC Pune Mula Mutha River front devlopment project | पुणे महानगरपालिकेने नदी सुधार प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शहरातून जाणाऱ्या मुळा आणि मुठा नदीलगतची 6,000 झाडे तोडण्याची योजना आखली आहे. रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट (RFD) प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी प्रस्तावित झाडे तोडण्यास विरोध होत असताना, पुणे महानगरपालिका (pune municipal corporation) अंतिम निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारला आपला अहवाल पाठवणार आहे. (Pmc Pune river front project)
 प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शहरातून जाणाऱ्या मुळा आणि मुठा नदीलगतची 6,000 झाडे तोडण्याची योजना महापालिकेने आखली आहे.  या निर्णयाला विरोध म्हणून, पर्यावरणवादी लोकांनी त्यांना मिळालेला PMC चा पुरस्कार ‘पर्यावरण दूत’ परत केला. (Chipko Andolan pune)
 पर्यावरण तज्ज्ञांनी जनतेसह संभाजी गार्डन ते गरवारे कॉलेज पुलाजवळील मुठा नदीपात्रापर्यंत मोर्चा काढला आणि पर्यावरणविरोधी कठोर धोरणाविरुद्ध ‘चिपको आंदोलन’चा एक भाग म्हणून झाडांना मिठी मारल्याने हा निषेध आणखी तीव्र झाला.(pmc Pune news)
 “पीएमसीने रिव्हरफ्रंट विकास प्रकल्पासाठी झाडे तोडण्यासाठी पुणे वृक्ष प्राधिकरणाकडे (pune tree authourity ) परवानगी मागितली होती.  त्यावर 150 आक्षेप घेण्यात आले.  त्यामुळे 8 ते 10 मे या कालावधीत जनसुनावणी होणार असून दररोज 50 जणांना सुनावणीसाठी बोलावण्यात येणार आहे.
 पुणे वृक्ष प्राधिकरण अंतिम निर्णयासाठी आपला अहवाल महाराष्ट्र सरकारला सादर करेल, आणि पीएमसी कायद्यानुसार आवश्यक सर्व प्रक्रिया पूर्ण करेल. त्यानुसार सरकार निर्णय देणार आहे. (Pune Municipal Corporation)
 दरम्यान, पीएमसीने दावा केला आहे की, तोडण्याचा प्रस्ताव असलेली बहुतांश झाडे झुडपे आणि परदेशी प्रजातींची आहेत.  पीएमसीचे कार्यकारी अभियंता युवराज देशमुख म्हणाले, “प्रकल्पासाठी तोडण्यात येणार्‍या झाडांची भरपाई करण्यासाठी आम्ही स्थानिक प्रजातींची 65,000 हून अधिक झाडे लावणार आहोत.”
 नागरी प्रस्तावानुसार, एकूण 7,539 झाडे बाधित होणार आहेत, त्यापैकी 3,110 झाडे पूर्णपणे तोडली जाणार आहेत, तर 4,329 पुनर्रोपण केली जाणार आहेत.  पीएमसी नुकसान भरून काढण्यासाठी 66,434 नवीन झाडे लावणार आहे. (Pmc Pune Marathi News)

Video | PMC Pune River Revival Project | पुणे मनपाकडून खुलासा करण्यासाठी अधिक्षक अभियंता यांचा व्हिडिओ प्रसारित

Categories
Breaking News PMC social पुणे

नदी पुनरुज्जीवनाच्या कामासाठी काढण्यात येणारे वृक्ष सुबाभूळ, कुबाभूळ प्रजातीची

| पुणे मनपाकडून खुलासा करण्यासाठी अधिक्षक अभियंता यांचा व्हिडिओ प्रसारित

PMC Pune River Revival Project |  पुणे महानगरपालिकेने (PMC Pune) मुळा मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प (Mula Mutha River Revival Porject) हाती घेतला आहे. पुनरुज्जीवनाचे काम करीत असताना नदी लगत असणारी ६ ते ७ हजारांपेक्षा जास्त वृक्ष तोडली (Tree cutting) जाणार असल्याची सध्या चर्चा समाज माध्यमांमध्ये आहे. मात्र, नदी पुनरुज्जीवन प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होणार असल्याच्या चर्चेमध्ये कोणतेही तथ्य नाही, असे पुणे महानगरपालिकेच्या प्रकल्प विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबत महानगरपालिकेच्या प्रकल्प विभागाच्या वतीने एक व्हिडिओ सुद्धा प्रसारित करण्यात आला आहे. (Pune Municipal corporation)

तीन हजार झाडे काढण्यात येणार 

पुणे महानगरपालिकेच्या अधिक्षक अभियंता युवराज देशमुख यांचा हा व्हिडिओ असून त्यामध्ये नदी सुधार प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या वृक्षाबाबत सविस्तर माहिती दिली आहे. देशमुख यांचा व्हिडिओही महानगरपालिकेने प्रसारित केला आहे. या व्हिडिओमध्ये देशमुख यांनी सांगितले आहे की, ‘नदी सुधार प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होणार, अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे. परंतु प्रत्यक्षात ती वस्तुस्थिती नाही. नदी सुधार प्रकल्पांतर्गत सुरुवातीला दहा किलोमीटरचा नदी काठ विकसित करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी आवश्यक सर्वेक्षण केले आहे. त्यामध्ये तीन हजार झाडे काढण्यात येणार आहे. पण हे सर्व झाडे झुडूप या प्रकारात येतात,’ असे देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. ते पुढे म्हणाले, ‘या तीन हजार वृक्षांमध्ये ९६ टक्के झाडे ही सुबाभूळ, कुबाभूळ या प्रजातीमधील आहेत. या वृक्षांची अनियंत्रित वाढ होत असते. नदी सुधार प्रकल्पाच्या कामासाठी जेथे झाडे काढणे आवश्यक आहे, तेथेच ती काढली जाणार आहेत. त्यामध्येही सुबाभूळ आणि कुबाभूळ यांचे प्रमाण जास्त आहे. इतर झाडांची पुर्नरोपण करण्यात येणार आहे.’ (PMC Pune River Revival Project)

पक्ष्यांसाठी, वन्यप्राण्यासाठी फळे-फुले देणारी झाडे लावणार

‘नदी सुधार प्रकल्पासाठी स्थानिक प्रजातीची कोणतेही झाड काढले जाणार नाही,’ असे सांगतानाच देशमुख पुढे म्हणाले की, ‘उलट पुणे महानगरपालिकेच्या वतीने स्थानिक प्रजातीची ६० ते ६५ हजार वृक्षांचे रोपण करण्यात येणार आहे. हे सर्व वृक्षारोपण करताना बंगलोर येथील बॉटनीमध्ये अभ्यास असणाऱ्या एका संस्थेची मदत घेतली जाणार आहे. तेथील तज्ज्ञांनी नदीकडेला कुठल्या पद्धतीची झाडे असली पाहिजेत, याचा तांत्रिक अभ्यास केला असून ती झाडे लावली जाणार आहेत. यामध्येही सावली देणारे झाडे, पक्ष्यांसाठी, वन्यप्राण्यासाठी फळे-फुले देणारी झाडे, नदीला पूरक अशी झाडे लावण्याचे नियोजन केले आहे. नदी कडेला ही झाडे लावण्याचे नियोजन सुनियोजित पद्धतीने करणार आहोत. जेणेकरून ही झाडे टिकून राहतील.’ (PMC Pune River Revival Project)