Road Repairing | PMC Pune | 50 रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी लागणार 193 कोटी! | 50 कोटी वर्गीकरणाने तर 143 कोटी 72 ब नुसार उपलब्ध केले जाणार

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

50 रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी लागणार 193 कोटी!

| 50 कोटी वर्गीकरणाने तर 143 कोटी 72 ब नुसार उपलब्ध केले जाणार

पुणे | शहरातील (pune city) ५० रस्त्यांवर साधारणपणे १४० ठिकाणी रस्त्यांच्या दुरुस्तीची (Road repairing) आवश्यकता आहे. रस्त्याची सदयस्थिती रस्त्यांवरील वाहतुक शहरातील महत्वाचे लिंक रोड, वर्दळीचे रस्ते याचा विचार करुन कोणते रस्ते डांबरीकरण करावयाचे, कोणते रस्ते कॉक्रीट करावयाचे आणि कोणते रस्ते यु.टी.डब्ल्यु.टी. करावयाचे हे निश्चित करण्यात आलेले आहे. यासाठी 193 कोटींची आवश्यकता आहे. त्यातील 50 कोटी हे वर्गीकरणाने उपलब्ध केले जाणार आहेत. तर 143 कोटी हे 72 ब नुसार उपलब्ध केले जाणार आहेत. महापालिका प्रशासनाकडून (PMC official) याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.  (PMC Pune)
प्रशासनाच्या प्रस्तावानुसार चालु वर्षीच्या पावसाळयाच्या कालावधीमध्ये सलग पाऊस, विविध सर्व्हिसेस करिता म्हणजेच ड्रेनेज, 24*7 च्या पाण्याच्या लाईन्स, केबल खोदाई यामुळे शहरातील काही रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील मुख्य वर्दळीचे रस्ते जे खराब झालेले आहेत अथवा रस्त्याचा काही भाग खराब झालेला आहे. अशा सर्व ठिकाणांची पाहणी करुन त्या अनुषंगाने सविस्तर रस्त्यांची यादी तयार करण्यात आलेली आहे.
सदयस्थितीत एकुण १४०० कि.मी. लांबीचे प्राथमिक टप्प्यातील सर्व्हेक्षण पुर्ण झालेले असून सदर सर्व्हेक्षण हे व्हिज्युअल इन्स्पेक्शन व रफो मिटर या दोन्ही पध्दतीने करण्यात आलेले आहे. या सर्व्हेक्षणामध्ये प्रथम टप्प्यामध्ये जिथे रस्ता खराब झालेला आहे अथवा रस्त्याचा काही भाग खराब झालेला आहे अशा सुमारे १४० ठिकाणांची व एकुण १४८ कि.मी. लांबीची रस्त्यांच्या खराब भागांची ठिकाणे प्रथम टप्प्यामध्ये निश्चित केलेली आहेत. (Pune Municipal corporation)
शहरातील ५० रस्त्यांवर साधारणपणे १४० ठिकाणी रस्त्यांच्या दुरुसतीची आवश्यकता आहे. रस्त्याची सदयस्थिती रस्त्यांवरील वाहतुक शहरातील महत्वाचे लिंक रोड, वर्दळीचे रस्ते याचा विचार करुन कोणते रस्ते डांबरीकरण करावयाचे, कोणते रस्ते कॉक्रीट करावयाचे आणि कोणते रस्ते यु.टी.डब्ल्यु.टी. करावयाचे हे निश्चित करण्यात आलेले आहे. त्यानुसार ७ कॉक्रीट व यु.टी.डब्ल्यु.टी. रस्ते व ४३ डांबरीकरणाचे रस्ते दुरुस्तीसाठी निश्चित करण्यात आलेले आहे. कामाच्या सोईनुसार  ३ पॅकेजेस निश्चित करण्यात आलेले आहे. (PMC Road Department)पॅकेज क्र. १ – ७ रस्ते – ६६,९९,६६, ४०७.६५/-रु

पॅकेज क्रं. २ – १४ रस्ते – ६३, ४७, ६५, ३९९.५४/-रु
पॅकेज क्रं. ३ –  २९ रस्ते – ६२,९९,७९, ८७९.८०/-रु
एकुण   – ५० रस्ते – १९३,४७, ११,६८६.९९/-रु