पुणे महापालिकेत 320 पदांसाठी भरती | 10 मार्चपर्यंत निघणार जाहिरात
| वर्ग 1 ते 3 मधील विविध 11 पदांसाठी असेल भरती
महापालिकेच्या प्रस्तावानुसार उमेदवारांकडून अर्ज मागविण्यासाठी जाहिरात देणे आवश्यक आहे. त्यानुसार महापालिका संकेतस्थळ आणि वर्तमानपत्रात जाहिरात देण्यात येईल. राज्य सरकारच्या नियमानुसार गट ब आणि क मधील पदांसाठी ( फायरमन/ अग्निशमन विमोचन पदा व्यतिरिक्त) परीक्षेसाठी सामान्य ज्ञान, मराठी, इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी या विषयावर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील. तर अभियांत्रिकी विषयाशी संबंधित प्रश्न पदवी/पदविका परीक्षेच्या दर्जासमान राहतील. प्रति प्रश्न 2. गुण प्रमाणे १०० प्रश्नांचे एकूण २०० गुणांकरिता होणाऱ्या परीक्षेसाठी एकत्रितपणे १२० मिनिटांचा कालावधी अनुज्ञेय राहील. भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे गुणांकन तक्ता तयार करण्यात आला
टप्पा क्र. २ मधील रिक्त ३२० पदे IBPS संस्थेमार्फत भरणे उचित ठरेल. सदर पदभरती प्रक्रीयेच्या अनुषंगाने खुला प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी र.रु. १०००/- व मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी र.रु. ९००/- परीक्षेचे प्रवेशशुल्क निश्चित करण्यात आले आहे. सदरचे प्रवेशशुल्क हे ऑनलाईन स्वीकारण्यात येणार असून, बँक ऑफ महाराष्ट्र, पी.एम.सी शाखा, (१४३०), शिवाजीनगर, पुणे येथील खाते क्रमांक ६००३९६३६६४७ वर जमा करण्यात येणार आहे. या बाबतचा प्रस्ताव स्थायी समिती समोर ठेवण्यात आला आहे.
– ही असतील पदे
१) क्ष-किरण तज्ञ (रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट) (८ पदे)
२) वैदयकीय अधिकारी/ निवासी वैदयकीय अधिकारी (२० पदे)
३) उप संचालक (प्राणी संग्रहालय) (१ पद)
४) पशु वैदयकीय अधिकारी (२ पदे)
५) वरिष्ठ आरोग्य निरीक्षक / सिनिअर सॅनिटरी इन्स्पेक्टर / विभागीय आरोग्य निरीक्षक (२०
पदे)
६) कनिष्ठ अभियंता (विद्युत) (१० पदे)
७) आरोग्य निरीक्षक / सॅनिटरी इन्स्पेक्टर (४० पदे)
८) वाहन निरीक्षक / व्हेईकल इन्स्पेक्टर (३ पदे)
९) औषध निर्माता (१५ पदे)
१०) पशुधन पर्यवेक्षक (लाईव्ह स्टॉक सुपरवायझर) (१ पद),
११) अग्निशामक विमोचक / फायरमन (२०० पदे)