Illegal Hoardings | PMC | शहरातील अनधिकृत होर्डिंग वरील कारवाईला मिळणार ‘बळ’ | ठेकेदाराच्या माध्यमातून महापालिका करणार कारवाई 

Categories
Breaking News PMC पुणे

शहरातील अनधिकृत होर्डिंग वरील कारवाईला मिळणार ‘बळ’

| ठेकेदाराच्या माध्यमातून महापालिका करणार कारवाई

पुणे : शहरातील अनधिकृत होर्डिंग आणि फ्लेक्स वरील कारवाईला आता बळ मिळणार आहे. महापालिकेकडे कर्मचारी कमी आहेत म्हणून कारवाई करता येत नाही, असे कारण महापालिका प्रशासन देत होते. मात्र आता असे कारण देता येणार नाही. कारण महापालिका ठेकेदाराच्या कर्मचाऱ्याच्या माध्यमातून अनधिकृत होर्डिंग वर कारवाई करणार आहे. यासाठी प्रशासनाने टेंडर प्रक्रिया राबवली होती. यासाठी महापालिकेला 74 लाखाचा खर्च येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडून स्थायी समिती समोर ठेवण्यात आला आहे. यावर उद्याच्या बैठकीत चर्चा होणार आहे.
शहरात अनधिकृत होर्डिंगचा सुळसुळाट झाल्याने महापालिका प्रशासनाने यावर कारवाई करण्यासाठी एक अभियान सुरु केले होते. शिवाय महापालिका आयुक्तांनी परिपत्रक काढून दंडाची रक्कम वाढवून गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. आयुक्तांनी आदेश दिल्याने थोडे दिवस कारवाई केली गेली. मात्र मनुष्यबळाचे कारण देत ही कारवाई थांबवली गेली. शहरात ठिकठिकाणी आणि विशेष म्हणजे कुठलीही परवानगी नसताना विद्युत पोलवर बॅनर, फ्लेक्स लावले जाताहेत. यावर ना गुन्हे दाखल होताहेत ना दंड वसूल केला जातो. यावरून महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांनी अतिरिक्त आयुक्त आणि विभाग प्रमुख यांचा चांगलाच क्लास घेतला होता. शिवाय कारवाई करून शहर साफ ठेवण्याचे देखील निर्देश दिले. दरम्यान आयुक्तांच्या या आदेशानंतर आकाशचिन्ह विभागाने तात्काळ कारवाई करण्यास सुरवात केली होती. विशेष म्हणजे अभय दिले गेलेल्या विद्युत पोलवरील फ्लेक्स काढण्यास सुरुवात केली होती.
शहरात ठिकठिकाणी आणि विशेष म्हणजे कुठलीही परवानगी नसताना विद्युत पोलवर(light pole)  बॅनर, फ्लेक्स(Banner, felx) लावले जाताहेत. यावर ना गुन्हे दाखल होताहेत ना दंड वसूल केला जातो. याबाबत ‘कारभारी’ वृत्तसंस्थने आवाज उठवला होता. त्याची दखल घेत महापालिका प्रशासनाने(pmc civic body) एक जाहीर प्रकटन दिले होते. ज्यात इशारा दिला होता की हे फलक काढून टाका शिवाय यापुढे लावल्यास त्यांच्यावर फौजदारी खटला दाखल केला जाईल. महापालिकेच्या या इशाऱ्यानंतर आता शहराचे विद्रुपीकरण थांबेल, असा विश्वास व्यक्त केला जात होता. तरीही जाहिरात फलकाचे मालक हे फलक काढून घेत नाहीत.

: स्थायी समिती समोर प्रस्ताव

शहरातील अनधिकृत होर्डिंग आणि फ्लेक्स वरील कारवाईला आता बळ मिळणार आहे. महापालिकेकडे कर्मचारी कमी आहेत म्हणून कारवाई करता येत नाही, असे कारण महापालिका प्रशासन देत होते. मात्र आता असे कारण देता येणार नाही. कारण महापालिका ठेकेदाराच्या कर्मचाऱ्याच्या माध्यमातून अनधिकृत होर्डिंग वर कारवाई करणार आहे. यासाठी प्रशासनाने टेंडर प्रक्रिया राबवली होती. यासाठी महापालिकेला 74 लाखाचा खर्च येणार आहे. ठेकेदार अविष्कार घोलप याना हे काम देण्यात येणार आहे. विशेष हे आहे कि 16% कमी दराने हे टेंडर ठेकेदाराने घेतले आहे. याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडून स्थायी समिती समोर ठेवण्यात आला आहे. यावर उद्याच्या बैठकीत चर्चा होणार आहे.

Banners in Pune : आम्ही तुम्हाला काहीही बोलणार नाही, तुम्ही जिथे कुठे असाल तिथून परत या

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

आम्ही तुम्हाला काहीही बोलणार नाही, तुम्ही जिथे कुठे असाल तिथून परत या

:  पुण्यात चंद्रकांत पाटलांचे बॅनर चर्चेत

पुणेकर हे टोमणे मारण्यात जगात प्रसिद्ध असल्याचं बोललं जातं. शिवाय, अनेकदा त्याचा प्रत्यय देखील येतो. किमान शब्दात कमाल अपमान करणे ही पुणेकरांची खासियत असल्याचंही सांगितलं जातं. शिवाय पुणेरी पाट्यांबाबत तर आणखी वेगळं काही सांगायलाच नको. पुणेरी पाट्यांवरील मजकूर तर जगभरात चर्चेत असतो. आता पुणेरी पाट्यांपाठोपाठ पुण्यात झळकणाऱ्या बॅनर्सची देखील चर्चा होताना दिसत आहे. कोथरूडमध्ये लावण्यात आलेले अशाचप्रकारेच एक बॅनर सध्या प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे, शिवाय सोशल मीडियावर देखील मोठ्याप्रमाणावर व्हायरल होत आहे. कारण, हे बॅनर ज्यांच्यासाठी लावलं आहे आणि या बॅनरवर जो मजकूर हे दोन्ही अर्थातच काही सामान्य नाही.

पुण्यातील कोथरुडमध्ये म्हणजेच भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मतदारसंघात हे बॅनर झळकले आहे. विशेष म्हणजे या बॅनरवर चंद्रकांत पाटील यांचा फोटो असून, त्यासोबत ‘दादा परत’ या असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

Unauthorized Flex : PMC : अनधिकृत जाहिरात फलक लावल्यास आता इतका दंड होणार : महापालिकेने बनवले धोरण

Categories
Breaking News PMC पुणे

अनधिकृत जाहिरात फलक लावल्यास आता 50 हजाराचा दंड

: महापालिकेने बनवले धोरण

पुणे : पुणे महानगरपालिका परवाना व आकाशचिन्ह विभागाकडून महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम २४४, २४५ व त्यानुसार अस्तित्वात आलेल्या जाहिरात व फलक नियंत्रण नियम २००३ अन्वये पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये खाजगी जागेत उभारल्या जाणा-या जाहिरात फलकांना परवानगी व नुतनीकरण देणेत येते. महानगरपालिकेकडून वेळोवेळी निश्चित केलेल्या दरानुसार जाहिरात शुल्क बसुली करण्यात येते. त्याचबरोबर अनधिकृत जाहिरात फलकाबाबत ही दंडाची तरतूद करण्यात आली आहे. याबाबत महापालिकेने एक धोरण बनवले आहे. त्याला नुकतीच महापालिका आयुक्तांनी मान्यता दिली आहे.

: असे आहे धोरण

(१) अनाधिकृत जाहिरात फलक निष्कासन कारबाई खर्च वसुली बाबतः-

(अ) नियमन्वित न होणा-या जाहिरात फलकांबाबतः-

१. अनधिकृत जाहिरात फलकावर बृहन्मुंबई
महानगरपालिकेच्या धोरणानुसार रक्कम रूपये ५० हजार
प्रति जाहिरात फलक दंड वसुलीची रक्कम निश्चित करणे,
२. सदरचा खर्च अनधिकृत जाहिरात फलक लावणा-या संस्था/व्यक्ती कडून वसुल करणेस,
३. सदर संस्थेने / व्यक्तीने खर्च विहीत मुदतीत न भरल्यास संबंधीत जागा मालकाकडून खर्च बमुल
करणे,
४, जागा मालक याने सदर खर्च विहीत मुदतीत न भरल्यास सदरची रक्कमेचा बोजा जागा मालक च्या मिळकत करामध्ये समाविष्ट करून मिळकत कर वसुली धोरणानुसार कारवाई करणे.

नियमन्वित होणा-या जाहिरात फलकांबाबतः-

१. अनाधिकृत जाहिरात फलक नियमान्वीत करताना आकारणी योग्य शुल्क + तेवढेच शुल्क जाहिरात
फलक जागेवर लावलेल्या दिनांकापासून आकारून नियमान्वीत करणेस,
(२) परवानगी दिलेल्या जाहिरात फलकधारकांकडून विलंब शुल्क / तडजोड शुल्क वसुल करणे बाबतः-
१. जाहिरात फलक, नामफलक नुतनीकरणाचा अर्ज, जाहिरात फलक, नामफलक शुल्क मुदत संपल्यानंतर
३ महिने पर्यंत उशीर झाल्यास मासिक आकारणी योग्य शुल्काच्या २५%, ६ महिने पर्यंत उशीर झाल्यास मासिक आकारणी योग्य शुल्काच्या ५०% आणि त्यापुढे उशीर झाल्यास मासिक आकारणी योग्य शुल्काच्या १००% इतके विलंब शुल्क / दंड आकारणेस,
२.  महापालिका आयुक्त ठ.क्र. ६/७६७ दि. ०९.०१.२००९ चे विलंब शुल्क / तडजोड शुल्क धोरणा ऐवजी या नवीन धोरणात मध्ये जाहिरात फलक, नामफलक नुतनीकरण अर्ज, जाहिरात
फलक, नामफलक शुल्क मुदत संपल्यानंतर ३ महिने पर्यंत उशीर झाल्यास मासिक आकारणी योग्य शुल्काच्या २५%, ६ महिने पर्यंत उशीर झाल्यास मासिक आकारणी योग्य शुल्काच्या ५०% आणि त्यापुढे उशीर झाल्यास मासिक आकारणी योग्य शुल्काच्या १००% इतके विलंब शुल्क / दंड आकारणे, त्या नुसार मागील सर्व थकबाकी नियमन्वित करणेस,

(३) अनधिकृत बोर्ड, बॅनर, फ्लेक्स, झेंडे इ. निष्कासन खर्च वसुल व दंड आकारणी बाबतः-

१. सुमारे १ ते १० बोर्ड लावणा-यांकरीता कमीत कमी १००० रूपये दंड वसुल करणेस, तसेच त्यापेक्षा जास्त बोर्ड, बॅनर लावणा-यांवर जास्तीत जास्त ५००० रूपये दंड वसुल करणेस, तरी, उपरोक्त नमुद केल्यानुसार आपले क्षेत्रिय कार्यालयाकडून जाहिरात फलक, नामफलक शुल्क आकारणी,विलंब शुल्क / तडजोड शुल्क, अनधिकृत जाहिरात फलक निष्कासन कारवाई खर्च वसुली, अनाधिकृत बोर्ड, बॅनर, फ्लेक्स, इ. निष्कासन खर्च वसुल व दंड वसुली बाबत कार्यवाही करण्यात यावी. असे आदेश देण्यात आले आहेत.