Information and Public Relations Department | माहिती व जनसंपर्क विभागाच्या उपायुक्तांचा पदभार अचानक बदलला  | अतिरिक्त महापालिका आयुक्त यांचे आदेश 

Categories
Breaking News PMC पुणे

माहिती व जनसंपर्क विभागाच्या उपायुक्तांचा पदभार अचानक बदलला

| अतिरिक्त महापालिका आयुक्त यांचे आदेश

पुणे | महापालिकेच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या उपायुक्त यांचा पदभार बदलून नवीन अधिकाऱ्याकडे देण्यात आला आहे. आयुक्तांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्तांनी हे आदेश जारी केले आहेत.
माहिती आणि जनसंपर्क विभागाची जबाबदारी उपायुक्त सचिन इथापे यांच्याकडे देण्यात आली होती. मात्र त्यांच्याकडून नुकताच हा पदभार काढून घेण्यात आला आहे. आता ही जबाबदारी उपायुक्त चेतना केरुरे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. महापालिका आयुक्त अचानक असे पदभार बदलत राहतात. त्याचे नेमके कारण समजून येत नाही. मात्र आयुक्तांच्या या भूमिकेची अधिकाऱ्यांमध्ये मात्र चर्चा होते.

Deputy Commissioner | PMC Pune | आशिष महाडदळकर यांची उपायुक्त पदी पदोन्नती 

Categories
Breaking News PMC पुणे

आशिष महाडदळकर यांची उपायुक्त पदी पदोन्नती

पुणे | महापालिकेचे सहायक आयुक्त आशिष महाडदळकर यांना ज्येष्ठतेने पदोन्नती देण्यात आली आहे. त्यांची वर्णी आता महापालिका उपायुक्त वर्ग 1 पदी लागली आहे.
महाडदळकर यांच्याकडे उपायुक्त विशेष हे पद देण्यात आले आहे. तर मुद्रणालय आणि जनरल रेकॉर्ड या विभागाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी हे आदेश जारी केले आहेत. महापालिकेचा एखादा कर्मचारी उपायुक्त होतो, याबाबत त्यांचे कौतुक केले जात आहे.

Deputy Commissioner | पदोन्नतीने उपायुक्त झालेल्या अधिकाऱ्यावर सोपवली ‘ही’ जबाबदारी | महापालिका आयुक्तांचे आदेश

Categories
Breaking News PMC पुणे

पदोन्नतीने उपायुक्त झालेल्या अधिकाऱ्यावर सोपवली ‘ही’ जबाबदारी

| महापालिका आयुक्तांचे आदेश

पुणे | महापालिकेच्या सहायक आयुक्त या पदावरून उपायुक्त या पदावर किशोरी शिंदे आणि युनूस पठाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान महापालिका आयुक्तांनी त्यांच्यावर विभिन्न विभागाची जबाबदारी देखील सोपवली आहे. त्यानुसार उपायुक्त किशोरी शिंदे यांच्याकडे परिमंडळ क्रमांक 1 ची जबाबदारी देण्यात आली आहे. तर युनूस पठाण यांच्याकडे झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन या विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.

पुणे महापालिकेच्या तीन सहायक आयुक्त तथा क्षेत्रीय अधिकाऱ्यांना पदोन्नतीच्या माध्यमातून उपायुक्त या पदावर बढती देण्यात आली आहे.  यामध्ये युनूस पठाण, किशोरी शिंदे आणि आशिष महाडदळकर यांचा समावेश आहे. याबाबतच्या प्रस्तावाला नुकतीच मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान यातील दोघांना विविध विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर संजय गावडे निवृत झाल्यानंतर आशिष महाडदळकर यांना जबाबदारी दिली जाणार आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

 

Deputy Commissioners | PMC | महापालिकेचे तीन ‘सहायक आयुक्त’ होणार ‘उपायुक्त’

Categories
Breaking News PMC पुणे

महापालिकेचे तीन ‘सहायक आयुक्त’ होणार ‘उपायुक्त’

| विधी समिती समोर प्रस्ताव

पुणे | पुणे महापालिकेच्या (PMC Pune) तीन सहायक आयुक्त (Assistant commissioner) तथा क्षेत्रीय अधिकाऱ्यांना (ward officers) पदोन्नतीच्या (promotion) माध्यमातून उपायुक्त (Deputy commissioner) या पदावर बढती देण्यात येणार आहे.  यामध्ये युनूस पठाण, किशोरी शिंदे आणि आशिष महाडदळकर यांचा समावेश आहे. याबाबतचा प्रस्ताव विधी समिती समोर ठेवण्यात आला आहे. यावर समितीच्या पुढील बैठकीत चर्चा होईल. (PMC pune)

समितीच्या प्रस्तावानुसार पुणे महानगरपालिका प्रशासनाकडील ‘उप आयुक्त’ वर्ग-१ (पे मेट्रिक्स S-२३ ६७७००-२०८७००) या पदावर ‘सहाय्यक आयुक्त’ वर्ग-१ या पदावरून पदोन्नतीने नेमणूक करणेसाठी तयार करावयाचे निवड यादी व प्रतिक्षा यादीसाठी दिनांक २७/१२/२०२२ रोजी पदोन्नती समितीची बैठक घेण्यात आली.  मान्य आकृतीबंधानुसार उप आयुक्त’ वर्ग-१ या संवर्गातील एकूण १८ पदे मंजूर असून, ५०% प्रमाणे पदोन्नतीची एकूण ९ मंजूर पदे आहेत. शासनाचे नगर विकास विभाग यांचेमार्फत सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई कार्यालय यांचेकडून ‘उप आयुक्त’ वर्ग-१ या पदाचे पदोन्नतीच्या रोस्टरची तपासणी दि. २५/११/२०१६ रोजी झालेली आहे. त्यानुसार 3 पदे रिक्त राहत होती. या  स्थितीनुसार सद्यस्थितीत उप आयुक्त पदाच्या २ रिक्त जागा उपलब्ध होत असून,  संजय गावडे, उप आयुक्त यांच्या सेवानिवृत्तीनंतर दि.३१/०३/२०२३ पश्चात १ जागा रिक्त होणार आहे.  सदर रिक्त जागांकरिता निवड यादी व प्रतिक्षा यादी तयार करणेस  पदोन्नती समितीने एकमताने शिफारस केली आहे. (Pune Municipal corporation)

 पदोन्नतीसाठी कमीत कमी ७ पदे उपलब्ध असल्यास १ पद दिव्यांगांसाठी आरक्षित करण्यात यावे. तसेच, ७ पेक्षा जास्त पदे पदोन्नतीसाठी उपलब्ध होत असल्यास ४% विहित आरक्षणानुसार पदाची गणना करून दिव्यांगांसाठी पदे निश्चित करण्यात यावीत. अशी तरतूद आहे. सद्यस्थितीत फक्त २ पदे रिक्त आहेत. “उप आयुक्त” या पदाच्या एकूण ९ जागांपैकी नितीन  उदास हे दिव्यांग अधिकारी सध्या उप आयुक्त या पदावर कार्यरत आहेत.
त्यानुसार उक्त तीन अधिकारी उपायुक्त या पदासाठी पात्र होत आहेत. विधी समितीच्या माध्यमातून हा प्रस्ताव मुख्य सभेसमोर ठेवला जाईल. त्यानंतर त्यावर अंमल केला जाईल. (Law committee)

Deputy Commissioners | PMC Pune | महापालिकेत अजून एक  उपायुक्तांची प्रतिनियुक्तीने नियुक्ती

Categories
Breaking News PMC पुणे

महापालिकेत अजून एक  उपायुक्तांची प्रतिनियुक्तीने नियुक्ती

: महापालिका आयुक्तांचे आदेश

पुणे : पुणे महापालिकेत अजून एक उपायुक्तांची नियुक्ती प्रतिनियुक्तीने करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त यांनी जारी केले आहेत.

अपर जिल्हाधिकारी म्हणून काम करणारे महेश पाटील यांची महापालिकेत उपायुक्त या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे मंडई विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन व दक्षता विभाग या विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.  सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन विभागाची जबाबदारी या अगोदर होती.