Tag: Assistant commissioner
सहायक आयुक्त पदाच्या नेमणुकीच्या पद्धतीत बदल
त्यानुसार प्रशासकीय सेवाश्रेणी – १ मधील सहाय्यक आयुक्त (क्रिडा, अतिक्रमण, घनकचरा व्यवस्थापन, स्थानिक संस्थाकर अधिक्षक, मालमत्ता व व्यवस्थापन, कर आकारणी व कर संकलन) या पदाची नेमणुकीची प्रचलित पद्धत ही 25% नामनिर्देशन, पदोन्नती-५०% आणि प्रतिनियुक्ती 25% अशी आहे. 50% पदोन्नती ही महापालिका कर्मचाऱ्यांमधून सेवाज्येष्ठेतेनुसार केली जात होती.
खालीलप्रमाणे दुरुस्तीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी.
2. निवड पद्धतीने पदोन्नती – ५०%
अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी धारण करणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील वर्ग-१, २ व ३ मधील किमान ५ वर्षाचा अनुभव धारण करणारे कर्मचारी यांच्या मधून परीक्षेद्वारे गुणवत्तेनुसार निवड पद्धती नियुक्तीने.
महापालिकेचे तीन ‘सहायक आयुक्त’ होणार ‘उपायुक्त’
| विधी समिती समोर प्रस्ताव
समितीच्या प्रस्तावानुसार पुणे महानगरपालिका प्रशासनाकडील ‘उप आयुक्त’ वर्ग-१ (पे मेट्रिक्स S-२३ ६७७००-२०८७००) या पदावर ‘सहाय्यक आयुक्त’ वर्ग-१ या पदावरून पदोन्नतीने नेमणूक करणेसाठी तयार करावयाचे निवड यादी व प्रतिक्षा यादीसाठी दिनांक २७/१२/२०२२ रोजी पदोन्नती समितीची बैठक घेण्यात आली. मान्य आकृतीबंधानुसार उप आयुक्त’ वर्ग-१ या संवर्गातील एकूण १८ पदे मंजूर असून, ५०% प्रमाणे पदोन्नतीची एकूण ९ मंजूर पदे आहेत. शासनाचे नगर विकास विभाग यांचेमार्फत सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई कार्यालय यांचेकडून ‘उप आयुक्त’ वर्ग-१ या पदाचे पदोन्नतीच्या रोस्टरची तपासणी दि. २५/११/२०१६ रोजी झालेली आहे. त्यानुसार 3 पदे रिक्त राहत होती. या स्थितीनुसार सद्यस्थितीत उप आयुक्त पदाच्या २ रिक्त जागा उपलब्ध होत असून, संजय गावडे, उप आयुक्त यांच्या सेवानिवृत्तीनंतर दि.३१/०३/२०२३ पश्चात १ जागा रिक्त होणार आहे. सदर रिक्त जागांकरिता निवड यादी व प्रतिक्षा यादी तयार करणेस पदोन्नती समितीने एकमताने शिफारस केली आहे. (Pune Municipal corporation)
कंत्राटी कामगारांची प्रत्येक महिन्याच्या वेतनाची माहिती संगणक प्रणालीमध्ये अद्ययावत करण्याचे आदेश
| सर्व विभागांना महापालिका सहायक आयुक्तांचे आदेश
पुणे | महानगरपालिकेत विविध विभागांमार्फत कामकाजाकरिता निविदाधारकांची नियुक्ती करण्यात येते. या नियुक्त करण्यात आलेल्या निविदाधारकांमार्फत कामकाजाकरिता कंत्राटी कामगारांची नियुक्ती करण्यात येते. सदर नियुक्त निविदाधारकांनी त्यांच्यामार्फत नेमण्यात आलेल्या कंत्राटी कामगारांचे महिनेमहाचे वेतन वेळेत देणेस आवश्यक आहे. तथापि असे निदर्शनास आले आहे की, सदर कंत्राटी सेवकांचे दर महिनेमहाचे वेतन उशिरा देण्यात येत असल्याने महापालिका आयुक्त, अतिरिक्त महापालिका आयुक्त, मुख्य कामगार अधिकारी यांच्याकडे कंत्राटी कामगारांच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे कंत्राटी कामगारांची प्रत्येक महिन्याच्या वेतनाची माहिती संगणक प्रणालीमध्ये अद्ययावत करण्याचे आदेश सहायक महापालिका आयुक्त यांनी महापालिकेच्या सर्व विभागांना दिले आहेत.
contractemployee.pmc.gov.in ही संगणक प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने सर्व संबंधित विभागांनी त्यांच्या विभागांचे ऑनलाईन User Id व Password कामगार सल्लागार यांचेमार्फत घेण्यात यावेत. तदनुषंगाने आपले विभागाकडील निविदाधारकांची माहिती व कंत्राटी मनुष्यबळाच्या कंत्राटी सेवकांच्या वेतनाबाबतचा डाटा एन्ट्री करणे अपेक्षित आहे. कंत्राटी सेवकांचे दर महिनेमहाचे वेतन अदा केल्याबाबतची माहिती अद्ययावत करण्यात यावी. माहिती व तंत्रज्ञान विभाग व कामगार सल्लागार विभागामार्फत सदर संगणक प्रणालीचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येईल. याबाबत संबंधित सर्व विभागांनी ८ दिवसात सर्व माहितीसह डाटा एन्ट्री पूर्ण करावी व वेळोवेळी माहिती अद्ययावत करण्यात यावी.