VAT on petrol and diesel | पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी करण्याबाबत लवकरच निर्णय | शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याचा निश्चय | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Categories
Breaking News Political social महाराष्ट्र शेती

शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याचा निश्चय | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

| पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी करण्याबाबत लवकरच निर्णय

मुंबई| शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याचा निश्चय राज्य सरकारने केला असून राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी पेट्रोल डिझेल वरील व्हॅट कमी करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. विधानसभेत विश्वासदर्शक ठरावानंतर अभिनंदनाच्या प्रस्तावावर भाषणाच्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

हिरकणी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी 21 कोटी

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले,रायगड पायथ्याशी असलेल्या हिरकणी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी 21 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. या निधीतून हिरकणी गावाचा सर्वांगीण विकास साधला जाईल. केंद्र सरकारने काही दिवसांपुर्वी इंधनावरील कपात केली त्याच धर्तीवर राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी इंधनावरील व्हॅट कमी करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे.

आगामी कालावधीत सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी निर्णय घेण्यात येतील. महाराष्ट्र् राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून साकारत असलेल्या समृध्दी महामार्गातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होवून राज्याच्या विकासाला चालना मिळेल.मुंबईतील मेट्रो प्रकल्पाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाईल.मेट्रो प्रकल्प गतीने पूर्ण करण्याकडे राज्य शासनाचे प्राधान्य असेल.राज्यातील सर्व प्रलंबित प्रकल्पांच्या कामांनी गती देणार आहोत.तसेच शासनाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारे एकांगी निर्णय न घेता सर्वांच्या हितासाठी शासन प्रयत्न करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी दिली.

राज्य शासन सर्वांना बरोबर घेवून सर्वधर्मीयांना समन्यायाने वागणूक देणार असून सर्वांच्या विकासासाठी हे शासन काम करेल.राज्यातील सर्व प्रलंबित प्रकल्पांची कामे मार्गी लावण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाहीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले,हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांचा सच्चा सैनिक म्हणून मी काम करणार आहे.जनसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी तत्काळ निर्णय घेवून सर्वसामान्यांची कामे लवकर होण्यासाठी आमचे सरकार भर देणार असून महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी अहोरात्र प्रयत्न करणार आहोत.

Soyabean Price | सोयाबीनच्या हमिभावात ३५० रुपयाची वाढ

Categories
Breaking News Commerce देश/विदेश महाराष्ट्र शेती

सोयाबीनच्या हमिभावात ३५० रुपयाची वाढ

पुणे : केंद्र सरकारने तीळाच्या हमीभावात सर्वाधिक वाढ केली. सोयाबीनला ३५० रुपयांची वाढ मिळाली. तर कापसाला लांब धाग्यासाठी ३५५ रुपये आणि मध्यम धाग्यासाठी ३५४ रुपये वाढविण्यात आले.

केंद्राने यंदा सोयाबीनसह इतरही तेलबिया पिकांच्या हमीभावात गेल्यावर्षीच्या तुलनेत अधिक वाढ केल्याचे दिसते. केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकित बुधवारी (ता.८) खरिप हंगाम २०२२-२३ साठी १४ पिकांच्या हमीभाव वाढीला मंजुरी देण्यात आली. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा सोयाबीन आणि कापसाच्या हमीभावात अधिक वाढ केली. या १४ पिकांमध्ये तिळासाठी सर्वाधिक ५२३ रुपये वाढ करण्यात आली. २०२१-२२ च्या हंगामात सोयाबीनच्या हमीभावात ७० रुपये वाढ केली होती. मात्र यंदा ३५० रुपयांची वाढ करण्यात आली. त्यामुळं सोयाबीनचा हमीभाव ३९५० रुपयांनी ४३०० रुपये झाला. तर मध्यम धागा कापसाच्या हमीभावात ३५४ रुपयांची वाढ करून ६०८० रुपये करण्यात आला. तर लांब धागा कापसासाठी ३५५ रुपयांची वाढ देऊन ६३८० रुपये हमीभाव जाहिर केला. मुगाच्या हमीभावात ४८० रुपये वाढ केली. मुगाचा हमीभाव आता ७२७५ रुपयांवरून ७७५५ रुपयांवर पोचला. तर तुरीच्या हमीभावात गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही ३०० रुपयांची वाढ करण्यात आली. हंगामात तुरीला आता ६६०० रुपये हमीभाव जाहिर झाला.

या पिकांमध्ये मक्याला सर्वांत कमी ९२ रुपये वाढ मिळाली. मक्याचा हमीभाव १८७० रुपयांवरून १९६२ रुपये करण्यात आला.भूईमुगालाही ३०० रुपयांची वाढ मिळाली. खरिपात आता भुईमुगाला ५८५० रुपये हमीभाव मिळेल. मागील हंगामात २७५ रुपये वाढ मिळाली होती. तर सूर्यफुलाचा हमीभावही ३८५ रुपयांनी वाढविण्यात आला. आता सूर्यफुलाला ६४०० रुपयांचा हमीभाव जाहिर झाला. मागील हंगामात सूर्यफुलाला केवळ १३० रुपयांची वाढ मिळाली होती.तेलबियांसाठी चांगली वाढकेंद्र सरकारने खरिप हंगाम २०२२-२३ मध्ये तेलबिया पिकांच्या हमीभावात चांगली वाढली. तीळाच्या हमीभावात सर्वाधिक ५२३ रुपये वाढ झाली. तर सोयाबीन ३५० रुपये, सूर्यफुल ३८५ रुपये आणि भुईमुगाला ३०० रुपये वाढ मिळाली.

Farmers | CMO | शेतकऱ्यांबाबत सरकारचे काही महत्वपूर्ण निर्णय

Categories
Breaking News social महाराष्ट्र शेती

शेतकरी आंदोलकांवरील इतर गुन्हे शासन मागे घेणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ५० हजार रुपये अनुदानाचे १ जुलै या कृषीदिनापासून वाटप

पुणतांबा येथील शेतकरी आंदोलनासंदर्भात बैठकीत निर्णय

मुंबई |  सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि जिवितहानीसारखे गंभीर गुन्हे वगळता शेतकरी आंदोलनांतील शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात येतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ५० हजार रुपये अनुदानाचे वाटप १ जुलै या कृषीदिनापासून करण्यात येणार आहे. कृषीमूल्य आयोगाच्या अध्यक्षांची नेमणूकही लवकरच करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगितले.

पुणतांबा येथील शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला खासदार सदाशिवराव लोखंडे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, कृषीमंत्री दादाजी भुसे, दुग्धव्यवसाय विकासमंत्री सुनील केदार, सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये,महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, रोहयोचे अपर मुख्य सचिव नंद कुमार, सहकार व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव अनूप कुमार, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, प्रधान सचिव दिनेश वाघमारे, जे. पी गुप्ता, किसान क्रांती संघटनेचे प्रतिनिधी सरपंच डॉ. धनंजय धनवटे, सुभाषराव कुलकर्णी, सुहासराव वहाडणे, सुभाष वहाडणे, संगीता भोरकडे, ॲड. विजय सदाफळ, अॅड. चांगदेव धनवटे, धनंजय जाधव, बाळासाहेब चव्हाण, नामदेव धनवटे, विठ्ठलराव जाधव, ॲड मुरलीधर थोरात, अनिल नळे, योगेश रायते, अमोल सराळकर, दत्तात्रय धनवटे, बाळासाहेब भोरकडे, निकिता जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. साखर आयुक्त शेखर गायकवाड,च अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले हे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, शेतकरी जगला तर राज्य जगेल हे लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय राज्यशासनाने घेतले आहेत. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा मोठा निर्णय घेण्यात आला. शेतकरी समाधानी होण्यासाठी, शेतकऱ्यांना अधिक सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. गळीत हंगाम 2021-2022 मधील अतिरिक्त ऊसाचे गाळप करण्यासाठी वाहतूक अनुदान व साखर घट उतारा अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऊस उत्पादक शेतक-यांना ईथेनॉल निर्मितीसाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. यंदा राज्यात ऊसाचे विक्रमी उत्पादन व गाळप झाले असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक राहू नये यासाठी शासनाने सर्वतोपरी उपाययोजना केल्या आहेत. यंदाच्या गाळप हंगामात ऊस शिल्लक राहणार नाही. याउपरही जर ऊस शिल्लक राहिला तर शिल्लक ऊसाला भरपाई देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल.

दुग्धविकास विभागामार्फत दूध उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. कोरोना संकटाच्या काळातही दूध व्यवसायाला मदत करण्यात आली. दूध उत्पादन वाढीसाठी देशी गाईंच्या जातींवर विशेषत्वाने लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे. दुधाला एफआरपी देण्यासंदर्भातील प्रस्ताव संबंधीत समितीसमोर ठेऊन अभ्यासाअंती त्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल. कांदाचाळी आणि कोल्ड स्टोअरेजच्या माध्यमातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सुविधा देण्यात येत आहेत. कांदा निर्यातीवरील बंदीसंदर्भात ठराव करून तो केंद्रसरकारकडे सादर करण्यात येईल. शेतकऱ्यांना सौरऊर्जा पंपाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजनांबरोबरच संशोधनाला चालना देऊन कृषिविकास साधण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

बैठकीत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषीमंत्री दादाजी भुसे, दुग्धव्यवसाय विकासमंत्री सुनील केदार, सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनीही संबंधीत विभागामार्फत शेतकऱ्यांच्या हितासाठी घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती दिली.

Monsoon | यंदा पाऊस चांगला | पण जून मध्ये पेरणीसाठी घाई करू नका

Categories
Breaking News social देश/विदेश महाराष्ट्र शेती

यंदा पाऊस चांगला | पण जून मध्ये पेरणीसाठी घाई करू नका

यंदा वाऱ्याचा वेग कमी राहिल्याने, जूनमध्ये पावसात खंड राहणार असून, शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये, असा सल्ला हवामानतज्ज्ञ डॉ.रामचंद्र साबळे यांनी दिला आहे. मात्र, त्यानंतर चांगला पाऊस असून, संपूर्ण मान्सून काळात यंदा पाऊस १०१ टक्के होणार आहे, तसेच दुष्काळी पट्ट्यात चांगला पाऊस होणार, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने मंगळवारी मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्याचा अंदाज जाहीर केला. त्यात देशात यंदा १०३ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे, तसेच जूनमध्ये राज्याच्या दक्षिण कोकण, मुंबई, तसेच पश्चिम विदर्भाच्या काही जिल्ह्यांत कमी पावसाची शक्यता आहे. त्यानुसार, साबळे यांनी त्यांच्या मॉडेलचा अंदाज जाहीर केला, त्यात राज्यात १०१ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यासाठी त्यांनी राज्यातील ८४ ठिकाणी नोंदविण्यात आलेल्या कमाल व किमान तापमान सकाळ व दुपारची सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा ताशी वेग व सूर्यप्रकाशाचा कालावाधी या घटकांचा अभ्यास केला. त्यानुसार, राज्यात १०१ टक्के पावसाचा शक्यता त्यांनी वर्तविली आहे. मात्र, यंदा वाऱ्याचा ताशी वेग कमी आढळल्याने जून महिन्यात पावसात खंड पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानंतर, जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये पावसाचे प्रमाण चांगले राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पेरणीची घाई करू नये

जूनमध्ये पावसात खंड पडणार असल्याने, शेतकऱ्यांनी जमिनीत ६५ मिलिमीटर म्हणजेच अडीच ते तीन फूट ओलावा असल्याशिवाय पेरणीला घाई करू नये, असा सल्ला साबळे यांनी दिला आहे. त्यामुळे खान्देश, विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी सिंचनाची सोय असल्याशिवाय कापूस व सोयाबीनची लागवड करण्याची घाई करू नये. जिरायती शेतकऱ्यांनी कडधान्य पिकांची लागवड करावी, असेही ते म्हणाले.

हवामान बदलाचा परिणाम

राज्यात गेल्या काही वर्षांपासून जूनमध्ये पावसात खंड पडत आहे. त्याचा परिणाम पीक उत्पादनावर होत आहे. गेली दोन वर्षे सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांत महापूर आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रही आता हवामान बदलाला प्रवण राज्य झाले आहे. त्या दृष्टीने पीक बदल करायला हवा व नियोजन करावे, असेही ते म्हणाले.

PM Kisan | EKYC | ‘पीएम-किसान’ योजनेअंतर्गत ‘ई-केवायसी’ करण्यास ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ

Categories
Breaking News देश/विदेश महाराष्ट्र शेती

‘पीएम-किसान’ योजनेअंतर्गत ‘ई-केवायसी’ करण्यास ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ

पुणे –  प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना द्यावयाचा लाभ सहजरित्या अदा करता यावा म्हणून केंद्र शासनाने  योजनेच्या लाभार्थ्यांनी त्यांची ओळख  पडताळणी (ई-केवायसी) पूर्ण करण्यासाठी केंद्र शासनाने  ३१ जुलै २०२२ पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे.

शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी  योजनेअंतर्गत सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबीयास (पती, पत्नी व त्यांची १८ वर्षाखालील अपत्ये) २ हजार रुपये प्रती हप्ता या प्रमाणे ३ हप्त्यात ६००० रुपये प्रती वर्षी लाभ त्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येत आहे. आज अखेर या योजने अंतर्गत राज्यातील १ कोटी ९ लाख ४६ हजार  लाभार्थ्यांना एकूण १८ हजार १५१ कोटी ७० लाख रुपये  लाभ अदा करण्यात आलेला आहे.

लाभार्थ्यास स्वतः पीएम किसान पोर्टलवर https://pmkisan.gov.in/ या लिंक आधारे किंवा सामाईक सुविधा केंद्रामार्फत ई-केवायसी पडताळणी करण्याच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या दोनपैकी स्वत:च्या सोईनुसार एका सुविधेच्या आधारे लाभार्थ्यास त्याची ई-केवायसी पडताळणी करता येईल. यापूर्वी ई-केवायसी ३१ मे २०२२ पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

पीएम किसान पोर्टलवरील लिंकद्वारे  लाभार्थ्यास त्यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न केलेल्या मोबाईलवर येणाऱ्या ओटीपीच्या आधारे स्वत:ची ई-केवायसी पडताळणी करता येईल. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. यासाठी सामाईक सुविधा केंद्राकडून रक्कम १५ रुपये प्रती लाभार्थी शुल्क आकारण्यात  येईल.

राज्यात २६ मे २०२२ अखेर एकुण ५२ लाख ८२ हजार लाभार्थ्यांची पडताळणी पूर्ण करण्यात आली आहे. उर्वरीत लाभार्थ्यांनी स्वत: अथवा सामाईक सुविधा केंद्रच्या माध्यमातून त्यांची ई-केवायसी पडताळणी केंद्र शासनाने दिलेल्या ३१ जुलै २०२२ च्या मुदतीपूर्वी पूर्ण करावी, असे आवाहन उपआयुक्त (कृषि गणना) तथा पथक प्रमुख, पी.एम.किसान विनयकुमार आवटे यांनी केले आहे.

Farmers Protest : Saundare : MLA Rajendra Raut : सौंदरे गावच्या नागरिकांनी सोलापूर महामार्ग रोखला  : वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी 

Categories
Breaking News Political social महाराष्ट्र

सौंदरे गावच्या नागरिकांनी सोलापूर महामार्ग रोखला

: वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

बार्शी :  महावितरणच्या मनमानी कारभारा विरोधात सौंदरे गावचे शेतकरी उस्फुर्तपणे रस्त्यावर उतरले आहेत. वीज पुरवठा सुरू करण्याची मागणी करत बार्शी – सोलापूर महामार्ग रोखला.  सरकार अजूनही भानावर येणार नसेल तर आंदोलन आणखी तीव्र करावे लागेल. असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. दरम्यान बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी देखील ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना पत्र लिहीत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

: आमदार राऊत यांचा सरकारला इशारा

 सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांची वीज खंडीत केली असून तालुक्यातील शेतकरी अतिवृष्टी व कोरोना महामारीमुळे आर्थिक अडचणीमध्ये सापडलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यात महावितरणने शेतीपंपाचा वीज पुरवठा खंडीत केल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. याचाच परिणाम म्हणून महावितरणच्या मनमानी कारभारा विरोधात सौंदरे गावचे शेतकरी उस्फुर्तपणे रस्त्यावर उतरले आहेत. वीज पुरवठा सुरू करण्याची मागणी करत बार्शी – सोलापूर महामार्ग रोखला.  सरकार अजूनही भानावर येणार नसेल तर आंदोलन आणखी तीव्र करावे लागेल. असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. दरम्यान बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी देखील ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना पत्र लिहीत आंदोलनाचा इशारा दिला आहे.  आमदार राजेंद्र राऊत यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, शेतकऱ्यांचे  वीज बील माफ करुन वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा.  अन्यथा बार्शी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांसमवेत रास्ता रोको आंदोलन व मोर्चा काढण्यात येईल. याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील. तरी शेतीपंपाचा वीज पुरवठा सुरळीत होणेकामी संबंधीतांना आदेश व्हावेत. असे ही राऊत यांनी पत्रात म्हटले आहे. 

Sambhaji Patil Nilangekar : आमदार संभाजी पाटील निलंगेकर म्हणतात, महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्त्या कारभारामुळे शेतकरी उद्ध्वस्त!

Categories
Political पुणे महाराष्ट्र

महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्ट , नाकर्त्या कारभारामुळे शेतकरी उद्ध्वस्त

: भाजपाचे आमदार संभाजी पाटील निलंगेकरांचा घणाघाती आरोप

अतिवृष्टीग्रस्तांना तसेच वादळग्रस्तांना अल्प मदत देऊन शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने कर्जमाफीबाबतही बळीराजाची फसवणूक केली. पीक विमा कंपन्यांना फायदेशीर अटी बनवून नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचित ठेवले. नैसर्गिक संकटांमुळे खचलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याऐवजी महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना आपल्या भ्रष्ट , नाकर्त्या आणि कोडग्या कारभारामुळे उद्ध्वस्त केले , असा घणाघाती आरोप भारतीय जनता पार्टीचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला.

संभाजी पाटील निलंगेकर यांनी या पत्रकार परिषदेत आघाडी सरकारच्या शेतकरी द्रोही भूमिकेचा पंचनामाच सादर केला. ते म्हणाले की, सत्तेवर येण्यापूर्वी शेतकऱ्यांना बांधावर जाऊन हेक्टरी २५ हजार , हेक्टरी ५० हजार मदत द्या अशा मागण्या करणाऱ्या उद्धव ठाकरे , अजित पवार यांनी गेल्या दोन वर्षात राज्यातील अतिवृष्टीचा , महापुराचा आणि चक्रीवादळाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना किरकोळ मदत करत शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा केली. अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना अलीकडेच आघाडी सरकारने १० हजार कोटी मदतीचे पॅकेज जाहीर केले. त्या आधी जुलै मध्ये पूर आणि पावसाचा फटका बसलेल्यांना ११ हजार ५०० कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. या मदतीमधील ७ हजार कोटी दीर्घकालीन उपाययोजनांसाठी तर ३ हजार कोटी पुनर्बांधणी , पुनर्वसनासाठी आहेत. याचा अर्थ पूरग्रस्त, अतिवृष्टीग्रस्तांसाठी केवळ १५०० कोटींची तातडीची मदत करण्यात आली.

संपूर्ण मराठवाड्यात , विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात अतिवृष्टीमुळे ५० लाख हेक्टरवरील पिके जमीनदोस्त झाली. त्याचबरोबर हजारो हेक्टर जमीन खरवडून निघाली, जनावरे वाहून गेली , घरे पडली. मात्र सरकारी मदतीत शेतकऱ्यांच्या या नुकसानीचा विचारही केला गेला नाही. शेतकऱ्यांना मदत द्यायची वेळ आली की केंद्र सरकारकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकण्याचा निर्लज्जपणा आघाडी सरकारने गेल्या २ वर्षांत वारंवार केला. उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रात बंद पाळणाऱ्या शिवसेना , राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेतृत्वाला नैसर्गिक आघाताचा मारा सहन करणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी वेळ काढता आला नाही , असेही ते म्हणाले.

संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितले की , मोठा गाजावाजा करून जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफीही आघाडी सरकारला प्रत्यक्षात आणता आली नाही. आघाडी सरकारने कर्जमाफीसाठी फक्त १५० कोटींची तरतूद केली आहे. महाआघाडी सरकारने पीक विमा काढणाऱ्या कंपन्यांना फायदेशीर अटी तयार केल्याने राज्यातील ३० लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी या वर्षी पीक विमा काढलाच नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत असताना २०१९-२० या वर्षी ८५ लाख शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी भरपाई मिळाली होती. त्यावर्षी पीक विमा कंपन्यांना १ हजार कोटींचा तोटा झाला होता. या सरकारने पीक विमा कंपन्यांशी तीन वर्षांसाठी उंबरठा उत्पादन गोठवून करार केल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. गेल्या वर्षी फक्त १५ लाख शेतकऱ्यांना ९७५ कोटी रु. ची भरपाई विमा कंपन्यांकडून मिळाली. मात्र विमा कंपन्यांना मागील वर्षी ४ हजार कोटींहून अधिक नफा मिळाला. लॉकडाऊन व कोरोना संकटामुळे अडचणीत आलेला शेतकरी महाविकास आघाडी सरकारच्या थापेबाजी व नाकर्तेपणाला कंटाळून आत्महत्या करत आहे.