Pune River Pollution | नद्यांच्या प्रदूषणामुळे पुणेकरांचे आरोग्य धोक्यात! | मिळकत धारकांना स्वतःचा STP प्रकल्प करणे बंधनकारक करण्याची मागणी 

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Pune River Pollution | नद्यांच्या प्रदूषणामुळे पुणेकरांचे आरोग्य धोक्यात! | मिळकत धारकांना स्वतःचा STP प्रकल्प करणे बंधनकारक करण्याची मागणी

| नगरसेवक हरिदास चरवड यांची पालकमंत्र्याकडे तक्रार

 

Pune River Pollution | पुण्यातील नद्यांच्या प्रदूषणामुळे पुणेकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे नद्यात पाणी सोडताना प्रक्रिया करून सोडले जाणे आवश्यक आहे. याबाबत भाजपचे माजी नगरसेवक हरिदास चरवड (Haridas Charwad BJP Pune)  यांनी पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे तक्रार केली आहे.

 

चरवड यांच्या निवेदनानुसार पुणे शहर व जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारी धरणे सिंहगड भागात आहेत, मोसी, मुठा आणि आंबी या नद्यांवर वरसगाव, पानशेत, खडकवासला अशा धरणांची निर्मिती करण्यात आली आहे. पानशेत धरण परिसर ते खडकवासल्यापर्यंत नदीच्या दोन्ही बाजूला प्रचंड प्रमाणात नागरिकीकरण झालेली आहे. गावे तसेच लोकवस्ती नव्याने निर्माण होत आहेत तसेच नदीकिनारी दोन्ही बाजूला मोठ मोठे पंचतारांकित रिसॉर्ट्स, हॉटेल तसेच फार्म हाऊस झालेली आहे. सदर सर्व विकसित झालेल्या भाग त्यांचे सर्व ड्रेनेजचे पाणी कोणतीही प्रक्रिया नकरता थेट नदीमध्ये सोडत आहे. तसेच नदी लगतच्या सर्व ग्रामपंचायतीकडे स्वतःचे मैला पाणी शुद्धीकरण प्रकल्प ( STP ) नसल्याने नाईलाजास्तव ग्रामपंचायतींना मैलापाणी नदीमध्ये सोडावे लागत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नदी अस्वच्छ व प्रदूषित होत आहे. पुढे हे पाणी कालव्यांद्वारे पुणेकरांना पिण्यासाठी तसेच ग्रामीण भागात शेतीसाठी सोडले जात आहे.

या बाबत सर्वेक्षण करून सर्व मिळकत धारकांना स्वतःचा मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प (STP ) किंवा तत्सम कार्यप्रणाली बंधनकारक करावी तसेच मैलापाणी नदीमध्ये सोडण्यास बंदी घालण्यात यावी. अशी मागणी भारतीय जनता पार्टी पुणे शहर उपाध्यक्ष नगरसेवक हरिदास चरवड यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तसेस पुणे जिल्हाधिकारी, पुणे मनपा आयुक्त आणि मुख्य अभियंता खडकवासला पाटबंधारे विभाग , सिंचन भवन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पाण्याची कमतरता पाहता खडकवासला धरणासह इतर दोन धरणांमधील गाळ पुणे मनपाद्वारे द्वारा काढल्यास खडकवासला धरणाची साठवण क्षमता वाढेल व नद्यांच्या पाण्याचा पुरेपूर वापरही होईल शहरांमध्ये होणारी प्रचंड वाढ भविष्यकाळामध्ये मोठ्या संकटाला आमंत्रण आहे. बांधकामांना वाढवून दिलेले FSI, मेट्रो FSI, विकत मिळणारे FSI, यामुळे यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण येणार आहे.

1. खडकवासला धरणाच्या वरील म्हणजे पानशेत वरसगाव धरणा पर्यंतची नद्या गाळ काढून स्वच्छ करून घ्याव्यात.
2. वरसगाव , पानशेत ते खडकवासला धरण क्षेत्रातील नद्यांलगतच्या सर्व ग्रामपंचायतीस मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प ( STP ) निर्मितीसाठी महाराष्ट्र शासनाद्वारे जागा आणि निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा.
3. खाजगी मिळकतदारांना मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प ( STP ) किंवा तत्सम कार्यप्रणाली ( छोटे युनिट, नैसर्गिक प्रकल्प) बंधनकारक करावा.
याबाबत तातडीने सर्वे व्हावा अशी मागणी हरिदास चरवड यांनी केली आहे.

PMC pune Vs Irrigation Pune | पुणे महापालिका आणि पाटबंधारे यांच्या वादात मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे | आप च्या विजय कुंभार यांची मागणी

Categories
Breaking News PMC Political social पुणे

PMC pune Vs Irrigation Pune | पुणे महापालिका आणि पाटबंधारे यांच्या वादात मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे | आप च्या विजय कुंभार यांची मागणी 

 
 
PMC Pune Vs Irrigation Pune | पुणे | पुणे शहराच्या पाणी कोट्यावरून (Pune Water Quota) पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) आणि पाटबंधारे विभाग (Pune Irrigation Department) यांच्यात चांगलाच वाद रंगला आहे. पुणे महापालिकेने सादर केलेल्या वॉटर बजेट (PMC Pune Water Budget) मध्ये जेवढा पाणी कोटा मागितला त्यापेक्षा खूप पाणी कोटा पाटबंधारेने मंजूर केला आहे. शिवाय समाविष्ट गावांना देखील आम्हीच पाणी देतो, अशी भूमिका पाटबंधारे विभागाने घेतली आहे. यावरून पुणे महापालिकेने पाटबंधारे विभागाला चांगलेच सुनावले आहे. मात्र या दोन संस्थांच्या वादात पुणेकर हक्काच्या पाण्यापासून वंचित राहू नये, यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालावे, अशी मागणी महाराष्ट्र आम आदमी पार्टीचे उपाध्यक्ष विजय कुंभार (Vijay Kumbhar) यांनी केली आहे. (PMC Pune Vs Irrigation Pune) 
 
पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) हद्दीत 34 गावांचा (34 included Villages) झालेला समावेश आणि दरवर्षी वाढणारी लोकसंख्या गृहीत धरता अर्थात 72 लाख लोकसंख्या गृहीत धरून शहराला आता 20.90 टीएमसी (20.90 TMC) पाण्याची आवश्यकता लागणार आहे. पुणे महापालिकेने पाण्याचे अंदाजपत्रक अर्थात वॉटर बजेट (PMC Pune Water Budget 2013-24) जलसंपदा विभागाला (Department of Water Resources) सादर करत ही मागणी केली होती. मात्र पाटबंधारे विभागाने महापालिकेला फक्त 12.82 टीएमसी पाणी मंजूर केले आहे. समाविष्ट 34 गावांना आम्हीच पाणी देतो असे म्हणत पाटबंधारे विभागाने 2.34 टीएमसी पाणी कमी केले आहे.  यामुळे महापालिकेने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. समाविष्ट गावांना पुणे महापालिकेने पाणी देणे बंद केले तर याची सर्वस्वी जबाबदारी पाटबंधारेची राहील, असा इशारा पुणे महापालिकेकडून देण्यात आला आहे. (Pune Municipal Corporation) 

पुणे महापालिकेकडून दरवर्षी जलसंपदा विभागाला वॉटर बजेट सादर करत पाणी कोटा वाढवून देण्याची मागणी केली जाते. यावर्षी 20.34 टीएमसी पाणी मागण्यात आले होते. सद्यस्थितीत शहराला जलसंपदा विभागाकडून 14.61 टीएमसी पाणी दिले जात आहे. जलसंपदा विभाग पाण्याचा कोटा किती मंजूर करणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार होते. त्यानुसार जलसंपदा विभागाने फक्त 12.82 TMC पाणी कोटा मंजूर केला आहे. पाटबंधारे विभागाने पुन्हा एकदा मनमानी केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता महापालिका पाणीपुरवठा विभागाने पाटबंधारे विभागाला खरमरीत पत्र लिहिले आहे. तसेच महापालिकेने काही मागण्या देखील केल्या आहेत. (PMC Water Budget)  या वादावरून विजय कुंभार यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे आणि या वादात लक्ष घालण्याची मागणी केली आहे. 
—-

पुणे महापालिकेने ज्या मागण्या केल्या आहेत आणि त्या रास्त आहेत. त्यामुळे आपण पाटबंधारे विभाग आणि पुणे महापालिका याच्यातील वाद मिटवावा. दोन आस्थापनांचा वादात पुणेकर हक्काचे पाण्यापासून वंचित राहू नयेत याची काळजी घ्यावी.

विजय कुंभार, उपाध्यक्ष, आप, महाराष्ट्र