MNS Pune | PMC Road Work | रस्त्यांच्या चुकीच्या कामामुळे पावसाळ्यात घरात आणि दुकानात पाणी जाण्याची शक्यता! 

Categories
Breaking News PMC Political पुणे

MNS Pune | PMC Road Work | रस्त्यांच्या चुकीच्या कामामुळे पावसाळ्यात घरात आणि दुकानात पाणी जाण्याची शक्यता!

| महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पुणे महापालिकेवर आरोप

MNS Pune | PMC Road Work | पुणे शहरातील रस्ते पुणे महापालिकेकडून (Pune Municipal Corporation) चुकीच्या पद्धतीने डांबरीकरण करत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (Maharashtra Navnirman Sen) करण्यात आला आहे. कामामुळे रोडच्या दोन्ही बाजुंना असणाऱ्या घरांची तसेच दुकानाची रोडपासुन असणारी उंची कमी होत आहे. त्यामुळे पावसाळ्यात दुकानात /घरात पाणी जावून नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. याबाबत योग्य कार्यवाही न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा मनसे (MNS Pune) कडून देण्यात आला आहे. (MNS Pune | PMC Road Work)

मनसेने दिलेल्या निवेदनानुसार पुणे  महापालिकेमार्फत (PMC Pune) पुणे शहरामध्ये रस्ते डांबरीकरण करण्याचे काम वेगाने सुरु आहे. परंतु काम करत असताना ठेकेदारांकडुन पुर्वीचे रस्ते खोदकाम करुन वरचा थर काढुन नंतर डांबरीकरण करणे गरजेचे असताना, पुर्वीच्याच रस्त्यावर नव्याने डांबरयुक्त खडी टाकुन काम करण्यात येत आहे. अशा कामामुळे रोडच्या दोन्ही बाजुंना असणाऱ्या घरांची तसेच दुकानाची रोडपासुन असणारी उंची कमी होत आहे. त्यामुळे पावसाळ्यात सदर दुकानात /घरात पाणी जावून नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. (PMC Road Department)

मनसेने पुढे म्हटले आहे कि, आमच्या पहाणीनुसार पुणे महानगरपालिकेने मेहेंदळे गॅरेज रोड, वारजे, तसेच कोथरुड मधील अंतर्गत रस्त्यांवरती अश्या पध्दतीचे काम झालेले आहे. तरी महापालिकेमार्फत सदर कामाची त्वरीत पहाणी करुन सदर ठेकेदारांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी. तसेच आपल्या चुकीच्या कामामुळे जर वरील भागामध्ये असणाऱ्या दुकानामध्ये व घरांमध्ये पावसाचे पाणी गेल्यास, नागरिकांचे होणारे सर्व नुकसान संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्या कडून वसूल करण्यात यावे. तरी या विषयांवर त्वरित कार्यवाही करावी. अन्यथा पालिके विरुद्ध आंदोलन करण्याचा इशारा मनसे कडून देण्यात आला आहे. (Maharashtra Navnirman Sena pune)
News Title | MNS Pune | PMC Road Work | Due to the wrong work of the roads, there is a possibility of water entering the house and shop during the rainy season!| Maharashtra Navnirman Sena accuses Pune Municipal Corporation

MNS Agitation | PMC Pune | पिण्याच्या पाण्याच्या लाईन मधून सांडपाणी मिश्रित पाणी | मनसेने केला आरोप आणि पुणे महापालिकेवर काढला मोर्चा 

Categories
Breaking News PMC Political पुणे

MNS Agitation | PMC Pune | पिण्याच्या पाण्याच्या लाईन मधून सांडपाणी मिश्रित पाणी | मनसेने केला आरोप आणि पुणे महापालिकेवर काढला मोर्चा

MNS Agitation | PMC Pune | पुणे शहरातील पाणी प्रश्नावर (Pune Water issue) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (Maharashtra Navnirman Sena) वतीने पुणे महानगरपालिके (Pune Municipal Corporation) समोर जोरदार निदर्शने करण्यात आले. या आंदोलनात मोठया संख्येने महिला पाण्याचे हांडे घेऊन सहभागी झाल्या होत्या.  पुणे महानगर पालिका प्रशासनाच्या (Pune Civic Body) विरोधात घोषणा देण्यात आल्या. या प्रसंगी पुणे महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे (Additional Commissioner Ravindra Binwade) यांना निवेदन देण्यात आले. (MNS Agitation | PMC Pune)
याप्रसंगीं  पक्षाचे नेते राजेंद्र वागसकर, शहर अध्यक्ष साईनाथ बाबर, सरचिटणीस किशोर शिंदे,  बाळ शेडगे,  रणजीत शिरोळे, हेमंत संभूस, महिला शहर अध्यक्षा वनिता वागसकर, आरती बाबर,  पुष्पां कनोजिया,  अस्मिता शिंदे,  विभाग अध्यक्ष अमोल शिरस,  विनायक कोतकर,  गणेश भोकरे,  सुनील कदम, सुधीर धावडे,  विक्रांत अमराळे, अजय कदम, विजय मते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मनसेच्या निवेदनात म्हटले आहे कि पुणे महापालिकेने दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यास सुरुवात केली आहे. मात्र, त्यानंतर दोन-दोन दिवस पाणीपुरवठा विस्कळित होत असल्याने पुणे शहरातील सर्व भागातील नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. हडपसर, कोंढवा, मुंढवा, वारजे, कोथरूड, शिवाजीनगर, वडगावशेरी, वाघोली, ओंध, बाणेर, पाषाण, कर्वेरोड, डेक्कन सर्व पेठा, पुणे कॅम्प या भागात पाणी पुरवठा होत नसल्याने पुणेकरांचे पाण्यावाचून प्रचंड हाल होत असल्याचे चित्र दैनंदिन झाले आहे. पुणे शहरातील सर्व भागातील पेठा उपनगरातील सर्व भागात अशीच परिस्थिती आहे. पुण्याचे  पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक विस्कळित झाले असल्याने दोन तीन दिवसाने पाणी येणे तेही कमी दाबाने पाणी येणे. रात्री अपरात्री पाणी आल्याने महिलांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. या पेठेतून दुसऱ्या पेठेत डोक्यावर हांडे घेऊन महिला पाण्यासाठी वणवण फिरत आहेत, पाणी प्रश्नावर पुणे मनपा पाणीपुरवठा अधिकारी मात्र उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे.
मनसेने पुढे म्हटले आहे कि, पुणे शहरातील टँकर ने सुरु असलेल्या पाणी पुरवठ्यामध्ये  कोणतीही पाणी टंचाईची तक्रार नसल्याने पुणे मनपा अधिकारी व टँकर माफिया यांच्या संगनमताने पुणेकरांवर पाणीकपात लादली असल्याचा संशय पुणेकरांना येत आहे. पुणे शहरात ४३ पाण्याच्या टाक्या बांधून तयार आहेत त्यासाठी पुणे शहरातील रस्ते खोदाई करून पाइप लाइन टाकण्यात आलेल्या आहेत. पुणे शहरात २४/ ७ पाणीपुरवठा करण्याच्या नावाखाली करोडो रुपयांचे बजेट वापरण्यात आले आहे. मेट्रो, स्मार्ट सिटी कामामुळे  रस्ते खडल्याने पिण्याच्या पाण्याच्या लाईन मधून सांडपाणी मिश्रित पाणी अनेक भागात येत आहे.
आगामी काळात पुणे शहराचा पाणी पुरवठा नियमित व योग्य दाबाने करण्यात यावा. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी. असा इशारा प्रशासनाला देण्यात आला.
News Title | MNS Agitation | PMC Pune | Mixed water from drinking water line | MNS accused and marched against Pune Municipal Corporation

MNS Pune | Raj Thackeray | मनसे पदाधिकारी आणि वसंत मोरे यांना एकत्र आणणार का राज ठाकरे?  | उद्यापासून राज ठाकरे पुणे दौऱ्यावर 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

मनसे पदाधिकारी आणि वसंत मोरे यांना एकत्र आणणार का राज ठाकरे? 

: उद्यापासून राज ठाकरे पुणे दौऱ्यावर 

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) पुन्हा एकदा उद्यापासून पुण्याच्या (Pune) दोन दिवसीय दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यादरम्यान, राज ठाकरे पक्षातील विविध पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या बैठक घेणार असल्याचे सांगितले जात आहे. त्याशिवाय रविवारी मनसेच्या (MNS) पार पडलेल्या मेळाव्या संदर्भातदेखील राज ठाकरे या दौऱ्यामध्ये आढावा घेणार आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पुढील महिन्यातील पाच तारखेला राज ठाकरे अयोध्या (Ayodhya) दौऱ्यावर जाणार आहेत. त्यापूर्वी पुण्यातील या दौऱ्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघितले जात आहे. तर, दुसरीकडे आगामी काही दिवसात पुण्यामध्ये राज यांची आणखी एक जाहीर सभा होणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. (Raj Thackeray Pune Tour)

दरम्यान, गुढीपाडव्याच्या सभेमध्ये राज ठाकरे यांनी रज्यातील मशिदींवरील भोंगे उतरवण्याचा अल्टिमेटम राज्य सरकारला दिला होता. त्यानंतर उत्तरसभेत आणि औरंगाबाद येथे पार पडलेल्या सभेतदेखील त्यांनी मनसे त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याचे जाहीर केले होते. जदरम्यान, राज यांच्या या भूमिकेनंतर पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी थेट नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे पुणे शहरातील पदाधिकारी आणि वसंत मोरे यांच्यात मागील काही दिवसांपासून बेबनाव झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज ठाकरे दोन दिवसीय पुणे दौऱ्यामध्ये पुणे मनसेमधील खदखद दूर करण्याचा प्रयत्न करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अयोध्या दौऱ्यापूर्वी पुण्यात होणार ‘राज’ सभा?दोन दिवसीय पुणे दौऱ्यामध्ये राज ठाकरे पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याचे सांगितले जात आहे. त्याशिवाय अयोध्या दौऱ्याआधी राज ठाकरे यांची पुण्यामध्ये जाहीर सभा घेण्याची चर्चा देखील पुणे मनसेमध्ये जोरदार सुरू आहे. नुकतीच मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ सभा पार पडल्या यामध्ये मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता जोरदार टीका केली होती. त्यामुळे मुख्यमंत्री आणि फडणवीसांपाठोपाठ आता राज ठाकरेदेखील पुण्यामध्ये जाहीर सभा घेणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली असून, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत या सभेबाबत चर्चा होऊ शकते अशी शक्यतादेखील व्यक्त केली जात आहे. दरम्यान, औरंगाबाद येथील सभेनंतर आता राज ठाकरे पुन्हा एकदा 21 ते 28 मे दरम्यान पुण्यात सभा घेणार असल्याची माहिती समोर आली असून, यासभेसाठी मनसेकडून पोलिसांना पत्र देत परवानगी मागण्यात आली आहे.

MNS : Sainath Babar : पुण्यात उद्या हनुमान चालीसा लावणारच  : मनसे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांचा इशारा 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

पुण्यात उद्या हनुमान चालीसा लावणारच 

: मनसे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांचा इशारा 

पुणे : मशिदींवरील भोंगे उतरवण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी ‘३ मे’ चा अल्टिमेटम दिला होता. जर भोंगे उतरवले गेले नाही तर उद्या बुधवारी चार मे पासून मशिदींसमोर जोऱ्यात हनुमान चालीसा लावला जाईला, अशा इशारा राज यांना दिला होता. मनसेचे (MNS) पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी हनुमान चालीसा लावणारच असे ट्विट करुन सांगितले आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, पुण्यात (Pune) उद्या हनुमान चालीसा लावणारच तयारीत रहा.

दुसरीकडे आज मंगळवारी (ता.तीन) मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या विरोधात औरंगाबाद येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आले आहेत. तसेच राज्यातील पक्षाचे पदाधिकाऱ्यांवर कारवाई सुरु करण्यास पोलिसांनी सुरु केले आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. यासाठी राज्य सरकारकडून पावले उचलली जात आहेत. खासदार इम्तियाज जलील यांनी राज ठाकरे यांच्यावर दाखल कलमांवरुन सरकारवर टीका केली.

Vasant More : MNS : पुणे मनसेत कोण आहेत पार्ट टाइम जॉबवाले?  : वसंत मोरे आज राज ठाकरेंना याबाबत बोलणार  

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

पुणे मनसेत कोण आहेत पार्ट टाइम जॉबवाले?

: वसंत मोरे आज राज ठाकरेंना याबाबत बोलणार

पुणे : मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये मशिदीवरील भोंग्याबाबत केलेल्या वक्तव्यावर पुण्यातील मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर मोरे यांना शहराध्यक्ष पदाला मुकावे लागले होते. मोरे नाराज असल्याची चर्चाही होती याशिवाय ते राष्ट्रवादी किंवा शिवसेनेत जाणार असल्याचेही बोलले जात होते. या पक्षांकडून ऑफर असल्याचा दावाही मोरे यांनी केला होता. परंतु मनसे सोडून जाणार नसल्याचेही त्यानी स्पष्ट केलं होते. दरम्यान आज मोरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थावर भेट घेणार आहेत.

वसंत मोरे पुण्याहून मुंबईकडे रवाना झाले आहेत. त्याआधी मोरे म्हणाले राज ठाकरे जे विचारतील त्याबाबतीत चर्चा करेन, संघटना तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी खूप चांगले प्रयत्न केले, यात मला शंभर टक्के यश मिळाले आहे. या यशामुळे काही पार्टटाईम जॉबवाले नाराज झाले होते. त्यांच्यामुळे थोडी अडचण झाली, अशी खंत वसंत मोरे यांनी व्यक्त केली आहे. या पार्टटाईम जॉबवाल्यांबद्दल आज राज ठाकरे यांच्याशी बोलणार आहे, मशिदींसमोर भोंगे लावण्याने माझ्या प्रभागातील अडचणी राज ठाकरे यांच्यासमोर मांडणार आहे. राज ठाकरे माझी अडचण समजून घेतील अशी आपल्याला अपेक्षा असल्याचेही मोरे यांनी व्यक्त केली आहे.

Sainath Babar : MNS : Pune : पुणे मनसेचे नवे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर! : वसंत मोरे यांना पदावरून हटवले  : मोरे यांनी बाबर यांचे केले अभिनंदन 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

पुणे मनसेचे नवे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर!

: वसंत मोरे यांना पदावरून हटवले

: मोरे यांनी बाबर यांचे केले अभिनंदन

पुणे : मनसे पुणेत नवा बदल करण्यात आला आहे. मशिदीवरील भोंगे काढण्याच्या राज ठाकरे यांच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांना पदावरून हटवण्यात आले असून त्यांच्या जागी माजी नगरसेवक साईनाथ बाबर यांची नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान मोरे यांनी ट्विटर वरून नवे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांचे अभिनंदन केले आहे.

गुढी पाडव्याच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटविण्याची मागणी केली होती. त्यावर राज्य तसेच देशभरातून प्रतिक्रिया उमटल्या होत्या. पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनीही यास विरोध केला होता. पक्षाचे पुण्यातील शहराध्यक्ष वसंत मोरे यांनीदेखील या निर्णयावर नाराजी व्यक्त करीत मला माझ्या प्रभागात शांतता हवी, असल्याचे म्हटले होते.

गेले दोन-चार दिवस या विषयावर पक्षात वाद सुरू होता. या पाश्‍र्वभूमीवर पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांना ठाकरे यांनी आज मुंबईत बोलावले होते. राज ठाकरे यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर वसंत मोरे यांना पदावरून हटवत माजी नगरसेवक साईनाथ बाबर यांची नवे शहराध्यक्ष म्हणून निवड करण्यात आल्याचे आज दुपारी जाहीर करण्यात आले.

माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्या या आदेशाचे पुण्यात पालन होणार नसल्याचे स्पष्ट केले होते. ”सध्या रमजान सुरू आहे. त्यामुळे माझ्या प्रभागात मला शांतता हवी आहे. म्हणून असे कोणतेही पाऊल उचलणार नाही. काही अनधिकृत गोष्टी असल्यास राज्य सरकारने त्यावर कारवाई करावी, असेही वसंत मोरे यांनी म्हटले होते.

दरम्यान वसंत मोरे यांनी spirit दाखवत नवे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांचे अभिनंदन केले आहे. मोरे यांनी बाबर यांचे अभिनंदन करताना म्हटले आहे कि, “अरे मी तर कधीपासूनच तुझा मावळा आहे ” कार्यक्षम नगरसेवक मनसेचे गटनेते साईनाथ बाबर यांची पुणे शहर अध्यक्ष पदी निवड! खूप खूप अभिनंदन साई!

Maharashtra Navnirman Sena : भोंग्यावरून मनसेत दोन मतप्रवाह!

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

भोंग्यावरून मनसेत दोन मतप्रवाह!

पुणे : मशिदींसमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजवून अजानला विरोध केला जाईल, असा इशारा राज ठाकरे यांनी दिल्यानंतर मनसेच्या पुण्यातील एका मुस्लिम कार्यकर्त्याने पक्ष सोडला आहे. तर खुद्द शहर अध्यक्ष वसंत मोरे देखील नाराज आहेत. तर दुसरीकडे पदाधिकारी म्हंणतात कि राज साहेबांचा आदेश हा आमच्यासाठी शेवटचा. यामुळे शहर मनसेत दोन मतप्रवाह झाल्याचे दिसून येत आहे.

मुंबईत गुढीपाडव्यानिमित्त आयोजित सभेला संबोधित करताना राज ठाकरे यांनी मशिदींमध्ये अजानसाठी लाऊडस्पीकरचा वापर थांबवावा, अशी मागणी राज्य सरकारला केली. तसेच प्रतिकार म्हणून हनुमान चालिसा लावा, असा आदेशही कार्यकर्त्यांना दिला होता. मात्र त्याला विरोध होताना दिसत आहे.

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील (मनसे) धार्मिकवादामुळे आपण राजीनामा दिल्याचे शाखा अध्यक्ष माजीद शेख यांनी सोमवारी सांगितले. शेख म्हणाले की, राज ठाकरे राज्याच्या विकासाच्या गप्पा मारायचे, पण आता ते राजकारणासाठी जाती-धर्माचा आधार घेत आहेत.

वास्तविक पाहता भाषणात राज ठाकरे यांनीच जातीपातीच्या राजकारणातून बाहेर पडण्याचे आवाहन केले. मात्र त्याचवेळी आपण धर्माचं राजकारण करणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे त्यांची जात आणि धर्मसंदर्भातील भूमिका एकाच वेळी दोन दगडांवर पाय ठेवण्यासारखी असल्याचं अनेकांना वाटत आहे.

 

दरम्यान पुण्यातील मनसे नेते आणि शहर अध्यक्ष वसंत मोरे हे देखील राज ठाकरे यांच्या नव्या आदेशामुळे संभ्रमात असल्याचं दिसून येत आहे. ते म्हणाले की, माझ्या आणि साईनाथ बाबर यांच्या प्रभागात मुस्लीम मतदान मोठ्या प्रमाणात आहे. त्याचा परिणाम निवडणुकीत होईल. तसेच मी माझ्या प्रभागात शांतता कशी राहील याचा प्रयत्न करणार. कोणीही वेगळा प्रयत्न करणार नाही. मात्र मलाच कळेना झाले आहे, मी काय भूमिका घ्यावी, असा संभ्रम वसंत मोरे यांनी बोलून दाखवला.

तर साईनाथ बाबर यांनी आपण नाराज नसल्याचे म्हटले आहे. तर मनसे सरचिटणीस अजय शिंदे यांनी म्हटले आहे कि, आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचा आदेश अंतीम, होय आम्ही हिदूच ! वैयक्तिक भूमिकेला पक्षात स्थान नाही. यामुळे मनसेत आता दोन मतप्रवाह असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Raj Thackeray : आपापल्या प्रभागात जनसंपर्क वाढवा  : राज ठाकरेंचा मनसैनिकांना सल्ला 

Categories
Political पुणे

आपापल्या प्रभागात जनसंपर्क वाढवा

: राज ठाकरेंचा मनसैनिकांना सल्ला

पुणे : मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक १८ चे मनसेचे पुणे शहर संघटक  प्रल्हाद गवळी (Pralhad Gavali) यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे (Public relation office) उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी राज ठाकरे म्हणाले प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपआपल्या प्रभागांमध्ये (wards) जनसंपर्क वाढून लोकांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्या अडचणी समजून घ्यावे.

या कार्यक्रमासाठी मनसेचे नेते बाबू वागसकर, किशोर शिंदे, अजय शिंदे, सुशीला नेटके, वनिता वागसकर, गणेश भोकरे, प्रशांत मते, प्रकाश ढमढेरे, संगीता तिकोने व इतर पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन प्रल्‍हाद गवळी यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाळा देवळे, हेमंत कंठाळे ,साईनाथ चकोर,संदीप ढवळे,उमेश लोखंडे,विकास गवळी, गौरव गवळी,दक्ष गवळी , श्रीराज पवार, विहंग कोटकर, यश येते, प्रज्वल कसबे, भूषण शिदे, युवराज लोखंडे, सौरभ पडावकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यक्रमासाठी नादब्रम्ह ढोल पथक, आढाव सनईवादक पाचशे ते सहाशे फेटे धारी मनसे सैनिक उपस्थित होते तसेच चाफ्याचा हार व तलवार देऊन प्रल्हाद गवळीनी  राज साहेबांचे स्वागत केले.

MNS Pune : Vasant More : Parks and Jogging Track : पुणे शहरातील मनपाची उद्याने, जॉगिंग ट्रॅक पूर्ण क्षमतेने चालू करा 

Categories
Breaking News PMC Political पुणे

पुणे शहरातील मनपाची उद्याने, जॉगिंग ट्रॅक पूर्ण क्षमतेने चालू करा

: शहर मनसेची महापालिकेकडे मागणी

पुणे : शहरात कोरोनाचा (Corona) कहर असल्यामुळे महापालिकेकडून (Pune Municipal Corporation) उद्याने (Park’s and jogging track) बंद ठेवण्यात आली होती. सद्यस्थितीत देखील ही उद्याने आणि जॉगिंग ट्रॅक पूर्ण क्षमतेने सुरु नाहीत. आता कोरोनाचा कहर कमी झाला आहे. त्यामुळे उद्याने आणि जॉगिंग ट्रॅक पूर्ण क्षमतेने सुरु करावेत, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS pune)  व महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेच्या वतीने महापालिकेकडे करण्यात आली आहे.

: लहान मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना होईल लाभ

शहर मनसेच्या पत्रानुसार गेल्या जवळपास दोन वर्षाच्या कालावधीत कोरोनाच्या जागतिक संकटामुळे पुणे शहरातील उद्याने व जॉगिग ट्रॅक बंद अथवा कमी कालावधीसाठी पुर्ण क्षमतेने सुरू नव्हते. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे सद्यस्थितीत बरीच उद्याने व जॉगिंग ट्रॅक कोरोनाच्या निर्बंधामुळे  कमी कालावधीसाठी सुरू आहेत. परंतु आता शासनाने बऱ्यापैकी निर्बध सर्व स्तरांवर उठवण्यास सुरूवात केली आहे. किंबहुना शिथील केलेले आहेत. शहरातील उद्याने जॉगिंग ट्रॅक व लहान मुलांची किंडांगणे ही आरोग्याच्या दृष्टीने व विरंगुळयाच्या दृष्टीने महत्वाची आहेत. शहरातील कोरोना रूग्ण संख्या व तीचा दर यामध्ये मोठया प्रमाणात घट झालेली आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेच्या वतीने आम्ही आपणास या निवेदनाद्वारे विनंती करू इच्छितो की, पुणे शहरातील उद्याने जॉगिंग ट्रॅक व उद्यानातील लहान मुलांची खेळणी यांच्या वेळा पुर्ववत (पुर्ण क्षमतेने) कराव्यात. जेणेकरून पुणे शहरातील नागरीकांना लहान मुलांना व ज्येष्ठ नागरीकांना या सुविधांचा पुरेपुर लाभ घेता येईल.