Rahul Gandhi | खा. राहुल गांधींविरुद्धचा निकाल म्हणजे भाजपच्या कपटी षडयंत्राचा भाग – मोहन जोशी

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे

खा. राहुल गांधींविरुद्धचा निकाल म्हणजे
भाजपच्या कपटी षडयंत्राचा भाग – मोहन जोशी

आगामी २०२४च्या निवडणुकीत कॉंग्रेस नेते खा. राहुल गांधींच्या प्रभावामुळे मोदी सरकार व भाजपा सत्ते वरून फेकले जाणार हे लक्षात आल्यामुळेच, खा. राहुल गांधींवर विविध खटले दाखल करून व आरोप करून लोकसभेतून त्यांना अपात्र करणे हे षडयंत्र मोदी सरकार व भाजपाने रचले आहे. सुरत सत्र न्यायाल्याचा निकाल हा त्यातीलच एक भाग आहे. मात्र यामुळे आता देशातील कॉंग्रेस कार्यकर्ते पेटून उठले आहेत. येत्या लोकसभा निवडणुकीत केंद्रातून मोदी सरकारला कॉंग्रेस कार्यकर्ते निश्चित पराभूत करतील अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी आज दिली.

ते म्हणाले की, कर्नाटकातील कोलार येथे २३ एप्रिल २०१९ रोजी झालेल्या निवडणुकीत जाहीरसभेत केलेल्या भाषणात ‘नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी यांचे आडनाव कॉमन का आहे? सर्व चोरांचे नाव मोदी का असते?’ अशी टीका कॉंग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी केली होती. या टीकेमुळे गुजरातमधील मोदी समाजाची मानहानी झाली असे सांगून दाखल केलेल्या खटल्यात सुरत सत्र न्यायालयाने कॉंग्रेस नेते खा. राहुल गांधी यांना २ वर्षाची शिक्षा ठोठावली हा भाजपाचा राजकीय विशाल षडयंत्राचा भाग आहे असे मोहन जोशी म्हणाले.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार आणि भाजपा म्हणजे भारत देश नाही असे असूनही लंडनमध्ये मोदी सरकारवर केलेली टीका म्हणजे भारत विरोधी बाब आहे असे सांगत भाजपने गेल्या आठवड्यात संसद बंद पाडली हा देखील त्या षडयंत्राचा भाग आहे.

‘भारत जोडो’ यात्रेनंतर साऱ्या देशात बदलेल्या वातावरणामुळे मोदी सरकार व भाजपला धडकी भरली आहे. त्यातच प्रचंड महगाई, बेकारी आणि अर्थव्यवस्थेचा खेळखंडोबा यामुळे संतप्त झालेली देशातील जनता मोदी सरकार व भाजपला येणाऱ्या २०२४च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत करणार याची प्रचिती भाजपला जागोजागी येऊ लागली आहे. पुण्यातील कसबा विधानसभा निवडणूक ही त्याचीच प्रचिती आहे असे मोहन जोशी म्हणाले.

त्यामुळेच देशातील या मोदी सरकार विरुद्धच्या असंतोषाचे नेतृत्व करणारे कॉंग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांना विविध खटल्यांमध्ये अडकवणे, त्यांची प्रतिमा डागाळणे आणि सत्र न्यायाल्याने शिक्षा दिल्याच्या नावाखाली त्यांना लोकसभेतील त्यांचे अध्यक्ष यांच्या मार्फत अपात्र करणे हे मोठे षडयंत्र भाजपा ने रचले आहे. असे सांगून मोहन जोशी म्हणाले की, यामुळे कॉंग्रेस पक्ष झुकणार नाही. लोकशाहीतील निवडणूक आयोग सत्र न्यायालय यांच्यावर दडपण आणून स्वतःला हवे तसे निर्णय लाऊन घेतले जातात अशी टीका भाजपावर होत आहे. त्याचाच हा भाग असावा. मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अडाणी प्रेम उघड झाल्यामुळे ते आणि त्यांचा भाजपा पक्ष घायकुतीला आला आहे त्याचेच हे बोलके उदाहरण आहे. आमचे नेते खा. राहुल गांधी यांच्या विरोधातील षडयंत्राचा मुकाबला करण्यासाठी व लोकशाही वाचवण्यासाठी कॉंग्रेस कार्यकर्ते जेलभरो आंदोलन करतील असा इशारा आम्ही देतो असे मोहन जोशी यांनी शेवटी म्हटले.

 

Integrated Food Security Scheme | नवीन एकात्मिक अन्न सुरक्षा योजना सुरू | 81.35 कोटी लाभार्थ्यांना मिळणार मोफत रेशन

Categories
Breaking News social देश/विदेश लाइफस्टाइल

नवीन एकात्मिक अन्न सुरक्षा योजना सुरू | 81.35 कोटी लाभार्थ्यांना मिळणार मोफत रेशन

 केंद्र सरकारची नवीन एकात्मिक अन्न सुरक्षा योजना 1 जानेवारी 2023 पासून सुरू झाली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार, नवीन योजना 2023 मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा- NFSA अंतर्गत 81.35 कोटी लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य प्रदान करेल.
 केंद्र सरकारची नवीन एकात्मिक अन्न सुरक्षा योजना 1 जानेवारी 2023 पासून सुरू झाली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार, नवीन योजना 2023 मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा- NFSA अंतर्गत 81.35 कोटी लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य प्रदान करेल.  ही योजना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याची (NFSA) प्रभावी आणि न्याय्य अंमलबजावणी सुनिश्चित करेल.  पुरेशा प्रमाणात दर्जेदार अन्नधान्य उपलब्ध करून अन्न आणि पौष्टिक सुरक्षा मिळण्याची खात्री करून आपल्या देशवासियांना सन्मानपूर्वक जीवन जगण्याची संधी उपलब्ध करून देण्याची भारत सरकारची सामाजिक आणि कायदेशीर बांधिलकी आहे.
 देशातील 81.35 कोटी लोकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे
 सर्वात असुरक्षित 67 टक्के लोकसंख्येसाठी म्हणजेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा-NFSA अंतर्गत समाविष्ट असलेल्या 81.35 कोटी लोकांसाठी ही वचनबद्धता पूर्ण करण्यासाठी, एक राष्ट्र – एक किंमत – एक रेशन ही संकल्पना पूर्ण करण्यासाठी केंद्राच्या नवीन योजनेला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. P
 या योजनेअंतर्गत भारत सरकार पुढील एका वर्षासाठी देशभरातील 5.33 लाख रास्त भाव दुकानांच्या विस्तृत नेटवर्कद्वारे सर्व राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा-NFSA लाभार्थ्यांना म्हणजेच अंत्योदय अन्न योजना (AAY) कुटुंबे आणि प्राधान्य कुटुंब (PHH) व्यक्तींना मोफत अन्नधान्य प्रदान करेल. या निर्णयामुळे गरिबांसाठी अन्नधान्याची उपलब्धता, परवडणारी आणि उपलब्धतेच्या दृष्टीने राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा-NFSA, 2013 च्या तरतुदी मजबूत होतील.
 2023 मध्ये सरकार 2 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त अनुदानाचा भार उचलणार आहे.
 नवीन एकात्मिक योजना अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या दोन विद्यमान अन्न अनुदान योजना एकत्रित करेल- 1) राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा-NFSA साठी भारतीय अन्न महामंडळ-FCI ला अन्न अनुदान, आणि 2) विकेंद्रित खरेदी राज्यांसाठी अन्न अनुदान, सुरक्षा कायदा-NFSA अंतर्गत समाविष्ट असलेल्या राज्यांना मोफत अन्नधान्य खरेदी, वाटप आणि वितरणाशी संबंधित राष्ट्रीय अन्न.
 मोफत अन्नधान्य देशभरात वन नेशन वन रेशन कार्ड (ONORC) अंतर्गत पोर्टेबिलिटीची एकसमान अंमलबजावणी सुनिश्चित करेल आणि या निवड-आधारित प्लॅटफॉर्मला आणखी मजबूत करेल.  केंद्र सरकार 2023 वर्षासाठी 2 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त अन्न अनुदान उचलणार आहे.  नवीन योजनेचा उद्देश लाभार्थी स्तरावर राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा-NFSA अंतर्गत अन्न सुरक्षेबाबत एकसमानता आणि स्पष्टता आणणे हा आहे.

NCP Pune | पुणे  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महागाई, बेरोजगारीच्या रावणाचे प्रतीकात्मक दहन 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

पुणे  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महागाई, बेरोजगारीच्या रावणाचे प्रतीकात्मक दहन

गेल्या आठ वर्षांमध्ये केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सातत्याने वाढणारी महागाई, सुशिक्षित तरुणांवर आलेले बेरोजगारीचे संकट, अन्नधान्यावरील जीएसटी, इंधन दरवाढ, विकास कामांमधील भ्रष्टाचार, सरकारी कंपन्यांचे खाजगीकरण, सातत्याने देशातील विविध भागात सुरू असणाऱ्या धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या घटना, शेतकरी बळीराजाच्या आत्महत्या, सातत्याने महिलांवर होणारे अत्याचार, केंद्र सरकारची लोकशाही विरोधी धोरणे या सर्व अन्यायकारक व जुलूमकारक गोष्टींमुळे भारतातील जनता त्रस्त झाली आहे. अनेक वेळा आंदोलने, मोर्चे, निवेदने देत लोकशाहीच्या मार्गाने केलेल्या विरोधाने देखील केंद्र सरकारला जाग येत नाही, त्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे विजयादशमीच्या पूर्वसंध्येला देशातील या दृष्ट प्रवृत्तींच्या रावणाचे दहन करण्यात आले. तसेच “महागाईचा रावण जाळलाच पाहिजे…,बेरोजगारीचा रावण जाळलाच पाहिजे….,धार्मिक द्वेष करणारा रावण जाळलाच पाहिजे….” या घोषणा देत केंद्रातील मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. भारतीय नागरिकांवर या गोष्टी लादणाऱ्या भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून दूर ठेवण्याचा दृढ निश्चय देखील युवकांनी यावेळी केला.

यावेळी बोलताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, “देशातील युवक हा देशाच्या विकासाचा प्रमुख शिलेदार असतो परंतु हाच युवक आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत देशाच्या राजसत्तेच्या विरोधात बंड पुकारत आहे. केंद्र व राज्यातील सत्ताधारी भाजपने बेरोजगारीमुळे युवकांवर ही वेळ आणली आहे.राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने देखील ज्या दृष्ट प्रवृत्तीचे रावण दहन झाले आहे, त्या दृष्ट प्रवृत्ती देशातील युवक,युवती, महिला यांसह समाजातील प्रत्येक घटकासाठी अतिशय घातक आहेत. या सर्व गोष्टी आपल्या जनतेवर लादण्याचे काम भारतीय जनता पार्टीने केले आहे. आज या महागाईमुळे तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या घरातून बचत ही जवळपास हद्दपार झाली आहे. देशातील प्रत्येक नागरिकाने केवळ आपली नोकरी, व्यवसाय, छोटा मोठा काम- धंदा करणे व त्यातून जमा झालेल्या पैशात आपल्या कुटुंबाच्या उदर निर्वाहासाठी ज्या काही जीवनावश्यक गोष्टी खरेदी करतील, त्या प्रत्येक गोष्टीवर भरमसाठ टॅक्स भरणे केवळ हेच कालचक्र सध्या सुरू आहे. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास भविष्यकाळात भारतीय नागरिकांची परिस्थिती श्रीलंकेतील नागरिकांसारखी होण्याची दाट शक्यता आहे. ही परिस्थिती जर उद्भवू द्यायची नसेल तर गल्लीपासून -दिल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टी नावाच्या दृष्ट राक्षसाचा वध करणे हे ही काळाची गरज बनली आहे.

या आंदोलन प्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख ,युवक शहराध्यक्ष किशोर कांबळे,विशाल वाकडकर, मनोज पाचपुते,महेश हांडे, अजिंक्य पालकर,रोहन पायगुडे,कुणाल पोकळे, ॲड.निखिल मलानी,मंगेश मोरे,स्वप्निल जोशी,योगेश सुतार,गजानन लोंढे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.