PT 3 Form | Pune Property Tax | PT-3 अर्ज भरून देण्याची मुदत 30 नोव्हेंबर पर्यंत | पुणेकरांना दिलासा

Categories
Breaking News PMC social पुणे

PT 3 Form | Pune Property Tax | PT-3 अर्ज भरून देण्याची मुदत 30 नोव्हेंबर पर्यंत | पुणेकरांना दिलासा

| महापालिकेने 15 दिवस मुदत वाढवली

PT 3 form | Pune Property tax | पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) कर आकारणी विभागाचे फॉर्म PT-3 (PMC Property tax Department PT 3 Form) भरून देण्याची मुदत 15 नोव्हेंबर रोजी संपत आहे. मात्र दिवाळीची सुट्टी आणि नागरिकांची मागणी पाहता ही मुदत 30 नोव्हेंबर पर्यंत वाढवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. याबाबत गुरुवारी आदेश जारी करण्यात येणार आहेत. अशी माहिती कर आकारणी व कर संकलन विभागाचे प्रमुख अजित देशमुख यांनी दिली. दरम्यान महापालिकेकडे आतापर्यंत 38 हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. आगामी 15 दिवसात ही संख्या 50-60 हजारापर्यंत जाऊ शकते. असा अंदाज प्रशासनाकडून वर्तवण्यात आला. (PMC Property tax Department PT 3 Form)
  पुणे महानगरपालिकेकडून (Pune Municipal Corporation) केवळ निवासी मिळकतींना (Residential property) स्वःवापराकरिता देण्यात येणारी ४०% सवलत (40% Discount) कायम करण्यात आली आहे. ज्या नव्याने बांधकाम झालेल्या निवासी मिळकतींची आकारणी ४०% सवलत न देता ०१.०४.२०१९ पासून पुढे झालेली आहे त्या सर्व मिळकतींना व ज्या मिळकतींची ४०% सवलत जी.आय.एस. सर्व्हे अंतर्गत दि.०१.०४.२०१८ पासून रद्द करण्यात आली आहे व अशा मिळकतींना ह्यापूर्वी फरकाची देयके (PMC property Tax bill) पाठवण्यात आली होती अशा सर्व मिळकतींना ४०% सवलतीचा लाभ ०१.०४.२०२३ पासून पुढील कालावधीकरिता देण्यात येत आहे. (PMC property Tax)
वरील सर्व मिळकतींना ४०% सवलतीचा लाभ आकारणी दिनांक/दुरुस्ती दिनांकापासून (म्हणजेच ज्या निवासी मिळकतींना दि. ०१.०४.२०१८ पासून दि. ३१.०३.२०२३ पर्यंत सवलत देय आहे परंतु दिली गेलेली नाही) ती सवलत घेणेकरिता व देण्यात आलेली सवलत ०१.०४.२०२३ पासून पुढील कालावधीकरिता सुरु राहणेकरिता मिळकतधारकाने PT-३ अर्ज (PT 3application form) संपूर्ण पुराव्यांसह १५ नोव्हेंबर २०२३ पूर्वी कर आकारणी व कर संकलन (pmc pune property Tax department) खात्याकडे सादर करणे आवश्यक राहील. असे महापालिकेकडून सांगण्यात आले होते. संबंधित मिळकतधारकांनी संपूर्ण मिळकतकर भरला असल्यास जादा जमा होणारी रक्कम PT-३ अर्ज भरून दिलेनंतर पुढील ४ वर्षांचे समान हप्त्यात आर्थिक वर्षाच्या देयकातून समायोजित करण्यात येईल. विहित मुदतीत अर्ज सादर न केल्यास मिळकतीचा वापर मिळकतधारक स्वः वापराकरिता करीत नसल्याचे गृहीत धरून अशा मिळकतीची सन २०२३-२४ करिता
दिली गेलेली सवलत रद्द करण्यात येईल. असे महापालिकेकडून सांगण्यात आले होते. दरम्यान ही मुदत आता महापालिका प्रशासनाने वाढवली आहे. आता ही मुदत 30 नोव्हेंबर असणार आहे. दिवाळीची सुट्टी आल्याने नागरिकांनी मुदत वाढवण्याची मागणी केली होती. त्यानुसार प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.  (Pune property tax)

PMC Property Tax Department | उपायुक्त अजित देशमुख यांची प्रॉपर्टी टॅक्स वसुलीसाठी धडक मोहीम | जागेवर जाऊन केली व्यावसायिक मिळकतींची तपासणी

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Property Tax Department | उपायुक्त अजित देशमुख यांची प्रॉपर्टी टॅक्स वसुलीसाठी धडक मोहीम | जागेवर जाऊन केली व्यावसायिक मिळकतींची तपासणी

PMC Property Tax Department  | प्रॉपर्टी टॅक्स (PMC Property Tax) हा महापालिकेचा उत्पनाचा महत्वाचा स्रोत आहे. मात्र 40% सवलतीच्या (40 Discount on property Tax) प्रक्रियेमुळे टॅक्स वसुलीला गती मिळताना दिसत नाही. त्यामुळे विभागप्रमुख तथा उपायुक्त अजित देशमुख (Deputy Commissioner Ajit Deshmukh) यांनी स्वतः फिल्डवर उतरत व्यावसायिक मिळकतीची (Commercial Properties) तपासणी सुरु केली आहे. मंगळवारी नर्हे, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, धायरी, वडगाव बुद्रुक, वडगाव खुर्द येथील २५ व्यावसायिक मिळकतींची तपासणी करण्यात आली. यावेळी थकबाकी असणाऱ्या मिळकती सील केल्या तर काही मिळकत धारकांनी जागेवर प्रॉपर्टी टॅक्स भरला. (PMC Property Tax Department)

पुणे महानगरपालिकेमधील कर आकारणी व कर संकलन विभाग (PMC Pune Property Tax Department) हा उत्पन्नाचा महत्वाचा स्त्रोत आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता खात्यास देण्यात आलेल्या उद्दिष्ट पूर्ततेच्या अनुषंगाने पुणे महानगरपालिकेस (Pune Municipal Corporation) जास्तीत जास्त उत्पन्न प्राप्त होण्याच्या अनुषंगाने कर आकारणी व कर संकलन कार्यालयाकडून थकबाकी वसुली, सिलिंग व आकारणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. (PMC Pune)

मंगळवारी   अजित देशमुख, उप आयुक्त कर आकारणी व कर संकलन तसेच  राजेश कामठे, प्रशासन अधिकारी त्यांच्या कार्यक्षेत्रातील पथकासह सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत धायरी, वडगाव बुद्रुक · वडगाव खुर्द, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, नऱ्हे या ठिकाणी २५ मिळकतींना प्रत्यक्ष भेटी दिल्या. सदर तपासणी दरम्यान अनधिकृत बांधकाम असलेल्या मिळकती, रूफ टॉप, साईड मार्जिन, फ्रंट मार्जिन असलेल्या मिळकती शोधण्यात आल्या. तसेच थकबाकी असल्यास, धनादेश प्राप्त करण्यात आले किंवा मिळकती सील करण्यात आल्या. तसेच आकारणी न झालेल्या मिळकतींची तपासणी करण्यात आली. हॉटेल साईड मार्जिन, टेरेसचा वापर व अनधिकृत गोडाऊन व औद्योगिक मिळकतींच्या आकारानींची तपासणी करण्यात आली. (Pune Property Tax)

अशी केली कारवाई

त्रिमूर्ती इंजिनियरिंग, नर्हे या मिळकतीवर अंदाजे २० हजार स्क्वेअर फुटाचे आकारणी न झालेले गोडाऊनची आकारणी करण्यात आली. आंबेगाव च्या हॉटेल वेदांत येथे फ्रंट मार्जिन व रूफ टॉप येथे तपासणी दरम्यान अनधिकृत वापर सुरु असल्याने, त्याची आकारणी तीन पटीने करण्याचे आदेश देण्यात आले. हॉटेल विठ्ठल आंबेगाव बुद्रुक येथे ३० लाख थकबाकी असल्यामुळे सील करण्यात आले. सील करतेवेळी रक्कम ३० लाखांचा धनादेश प्राप्त.  धायरीतील हॉटेलवर रक्कम रु. ३१ लाख ३९ हजार इतकी थकबाकी असल्यामुळे मिळकत सील करण्यात आली. धायरीतील हॉटेलवर मिळकत सीलींगची कारवाई करते वेळी रक्कम रु.२ लाखांचा पुढील तारखेचा धनादेश प्राप्त झाला. धायरीतील गोडाउनवर अंदाजे १४,००० स्क्वेअर फूट अनधिकृत पत्र्याचे गोडाऊन MSEB च्या पुरवठा दिनांकानुसार सन २०१९ पासून सुरु असल्याने अनधिकृत बांधकामाची तीन पटीने आकारणी करण्याचे आदेश देण्यात आले. (Pune Municipal Corporation News) 

या पुढेही संपूर्ण शहरात अशाच प्रकारे प्रत्यक्ष भेटी देऊन, मिळकतींच्या आकारणीची तपासणी करून वाढीव बांधकाम, अनधिकृत वापर व आकारणी न झालेल्या मिळकतींची आकरणी करणे, थकबाकी वसुली व सीलींग करणेची मोहीम तीव्र करण्यात येणार आहे. असे कर आकारणी विभागाच्या वतीने सांगण्यात आले. (Pune Property tax News)
——
News Title | PMC Property Tax Department |  Deputy Commissioner Ajit Deshmukh’s campaign for property tax collection  Went to the place and checked the commercial income

PMC Property Tax | 400 हून अधिक प्रॉपर्टी सील | कारवाई अधिक तीव्र करण्याचा प्रॉपर्टी टॅक्स विभागाचा इशारा

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Property Tax | 400 हून अधिक प्रॉपर्टी सील | कारवाई अधिक तीव्र करण्याचा प्रॉपर्टी टॅक्स विभागाचा इशारा

PMC Property Tax | कर आकारणी व करसंकलन विभागाकडून (PMC Property Tax Department) मे महिन्यापासूनच थकबाकी असणाऱ्या बिगरनिवासी मिळकतीवर (Commercial Properties) सिलिंग कारवाई (Sealing Action) मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे. एका महिन्यात ४०० हून
अधिक बिगरनिवासी मिळकती विभागाकडून सील करण्यात आल्या आहेत. यापुढेही थकबाकी असलेल्या मिळकतीवर सिलिंग कारवाई तीव्र करण्यात येणार आहे. अशी माहिती उपायुक्त अजित देशमुख (PMC Deputy Commissioner Ajit Deshmukh) यांनी दिली. (PMC Property Tax)

पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) हद्दीतील सर्व मिळकतधारकांना (Pune Property Holder) आवाहन महापालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे की, सन २०२३-२४ ची देयके (PMC Property Tax bill) वितरीत करण्यात आली असून ३१ जुलै २०२३ पर्यंत संपूर्ण मिळकतकर भरा व सर्वसाधारण करावर ५ किंवा १०% सवलत मिळवा. (PMC Pune News)

१५ मे २०२३ ते दि. ३१ जुलै २०२३ पर्यंत आपल्या निवासी, बिगरनिवासी, मोकळ्या जागा यांचा संपूर्ण मिळकतकर भरल्यास पुणे महानगरपालिकेकडून र. रु. १ कोटीपर्यत बक्षिस असलेली लॉटरी योजना घोषित करण्यात आली आहे. ज्यामध्ये ५ पेट्रोल कार, १५ ई-बाईक, १५ मोबाईल फोन, १० लॅपटॉप अशी एकूण ४५ बक्षिसे मिळकतधारकांना प्राप्त होतील. लॉटरी योजनेचा लाभ घेणेसाठी कुठल्याही प्रकारे अर्ज करण्याची आवश्यकता नाही केवळ आपला संपूर्ण मिळकतकर दि. १५ मे २०२३ ते  ३१ जुलै २०२३ ह्या कालावधीत भरणे आवश्यक आहे. असे कर संकलन विभागाकडून सांगण्यात आले. (PMC Property Tax Lottery)
—-
News Title | PMC Property Tax |  Over 400 Property Seals |  Property tax department warns to step up action

PMC Property Tax |  Who exactly will get 40% discount on property tax?  Whose discount will be cancelled?  |  Know everything

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Property Tax |  Who exactly will get 40% discount on property tax?  Whose discount will be cancelled?  |  Know everything

 PMC Property Tax |  Pune Municipal Corporation (PMC) has maintained a 40% discount for self-use of residential properties only.  All newly constructed residential properties on which levy has been extended from 01.04.2019 without 40% concession and on which 40% concession has been extended to G.I.S.  40% discount will be given to all the properties which have been canceled from 01.04.2018 under the survey and the difference payments (PMC property Tax bill) were sent earlier to such properties from 01.04.2023 for the next period.  (PMC Property Tax)
 All the above incomes will benefit from 40% discount from the date of levy/amendment date (i.e. the residential properties for which the discount is due from 01.04.2018 to 31.03.2023 but not given) and the discount given is 01.  For continuation for the next period from 04.2023 the property holder should submit PT-3 application form with complete proofs dt.  It will be necessary to submit to Taxation and Tax Collection Department (pmc pune property tax department) before 15 November 2023.  If the income tax is fully paid by the concerned property holders, the excess amount will be adjusted from the financial year payment in equal installments for the next 4 years after filing PT-3 application.  Use of property in case of non-submission of application within prescribed period
 for the year 2023-24 of such income assuming that the holder of the property is not making it for self-consumption
 The discount given will be cancelled.  (Pune property tax)