PM Modi Pune Tour | पुणे शहर परिसरात अवकाश उड्डाणावर निर्बंध | जिल्हाधिकारी यांचे आदेश

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे

PM Modi Pune Tour | पुणे शहर परिसरात अवकाश उड्डाणावर निर्बंध | जिल्हाधिकारी यांचे आदेश

PM Modi Pune Tour – (The Karbhari News Service) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २९ आणि ३० एप्रिल रोजी नियोजित पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अति महत्वाच्या व्यक्तींची सुरक्षा तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी २७ एप्रिल रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते ३० एप्रिल रोजी रात्री १२ वाजेपर्यंत पुणे शहर परिसरात पॅराग्लायडींग, हॉट बलुन सफारी, ड्रोन, मायक्रोलाईट एअरोप्लेन इत्यादी प्रकारच्या अवकाश उड्डाणावर निर्बंध घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जारी केले आहेत. (Dr Suhas Diwase IAS)

या आदेशाचे उल्लघंन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय दंड संहिता १८६० कलम १८८ च्या दंडनियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही असेही जिल्हाधिकारी यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

PM Narendra Modi Birthday | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे सेवा पंधरवडा !

Categories
Breaking News Political पुणे

PM Narendra Modi Birthday | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे सेवा पंधरवडा !

– भाजपाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांची माहिती

 

PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi Birthday) यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या काळात सेवा पंधरवडा आयोजित केला असून या अभियानात विविध सेवा कार्यक्रम राबविले जाणार असल्याची माहिती भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate) यांनी दिली.

घाटे यांनी सांगितले, की सेवा पंधरवड्यात युवा मोर्चातर्फे रक्तदान व आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मोदी सरकार आणि राज्य सरकारच्या गोरगरिबांच्या कल्याणासाठीच्या योजनांची माहिती पोहोचवण्यासाठी वस्ती संपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. त्याचबरोबर २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त व्यापक प्रमाणात स्वच्छतेचे उपक्रम हाती घेतले जाणार आहेत. देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात योगदान दिलेल्या महापुरूषांचे पुतळे तसेच परिसर स्वच्छ करण्याचे कार्यक्रम ही होणार आहेत. आयुष्यमान भव सप्ताहानिमित्त गरजू जनतेकरिता आयुष्मान कार्ड वाटप तसेच नोंदणी कार्यक्रमाचेही आयोजन केले जाणार आहे. या पंधरवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यक्तिमत्व, विकासाची दृष्टी, धोरणे आणि त्यांना मिळालेले यश या विषयावरील प्रदर्शनीही आयोजित केली जाणार आहे, असे त्यांनी नमूद केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेले ९ वर्षात केंद्र सरकारच्या माध्यमातून अंत्योदयाचा विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या. सेवा,सुशासन आणि गरीब कल्याणासाठी वचनबद्ध असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पक्ष संघटनेकडून त्यांचा सेवाभाव विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे, असेही घाटे म्हणाले.

Aayushyamaan Bhava campaign: Maharashtra will perform its best – Assures Chief Minister Eknath Shinde

Categories
Breaking News Political social आरोग्य देश/विदेश

Aayushyamaan Bhava campaign: Maharashtra will perform its best – Assures Chief Minister Eknath Shinde

 

Aayushyamaan Bhava is a sort of blessing given for a healthy life. With this vision and concept of Prime Minister Narendra Modi, the Aayushyamaan Bhava campaign for the healthy life of the people of the nation has been started nationwide. This drive is going to be implemented in the entire state and Maharashtra will perform its best in providing the best health services for the people, said Chief Minister Eknath Shinde.

The Aayushyamaan Bhava campaign was started nationwide today at the hands of President of India Draupadi Murmu. The campaign was inaugurated in the state at the Sahyadri guest house at the hands of Governor Ramesh Bais and Chief Minister Eknath Shinde. The Chief Minister was speaking on this occasion. Health Minister Dr Tanaji Sawant was also present.

Speaking further, Chief Minister Mr Shinde said that his government has given huge benefits to the common man through the Chief Minister’s Medical Assistance Cell. In the last one year, the financial assistance of more than 100 crore Rupees has been disbursed. The medical services are provided free of charge in all the government hospitals. Mr Shinde also said that 2 crore cards are going to be distributed jointly under the Mahatma Jyotirao Phule Jan Aarogya Yojana and Aayushman Bharat Pradhanmantri Aarogya Yojana. He said that the health cover of rupees 5 lakh will be provided now onwards. He said that Maharashtra is leading the entire nation in the health sector and all the health schemes and ventures are implemented with common people at the central point.

He further said that through the medium of Ayushman cards, it will be possible for common people to get medical treatment on time and for this the Aayushyamaan Bhava is an ambitious campaign which will be implemented in the state from 17th of September up to 31st of December 2023. The registration and distribution of the Ayushman card of all the eligible beneficiaries under this campaign will be done.
Various initiatives inaugurated

Chief Minister Mr Eknath Shinde felicitated the ‘Nikshay Mitra’ and the districts that have done outstanding work under the National Tuberculosis Eradication Program. Similarly, the distribution of cards under the Mahatma Jyotirao Phule Jan Aarogya Yojana and Aayushman Bharat Pradhanmantri Aarogya Yojana was also done at the hands of the Chief Minister. More than 2 crore cards are going to be distributed in the state under the schemes, the Chief Minister said.
The Arogya Aadhar App, Maharashtra Nursing Home registration App and Samuday Aarogya Adhikari App meant for the officers of the Aarogyavardhini centers of the state were also launched in the program.

Common man at the center- Chief Minister
Speaking further Chief Minister Mr Shinde said that while implementing these schemes, the quality health services are to be provided till the remotest rural areas of the state and this is extremely necessary. He said that by keeping the common man of the state at the center, the Aayushyamaan Sabha, Aayushyamaan fest, health checkup for Anganwadi and primary school children, blood donation camp, awareness campaigns for organ donation, cleanliness drives, health check- up of male above 18 years and other such campaigns will be implemented. He further said that the state government has decided to provide free of charge medical services and medical checkups under the public health department and government hospitals of the state. He said that through the Chief Minister Medical Assistance Cell, assistance of more than 112 crore rupees have been distributed in the last one year.

Aayushyamaan Gram Sabha on 2nd October
The Aayushyamaan Gram Sabha is going to be organized on 2nd October and it will be very important for creating awareness about the Ayushman Bharat Arogya Yojana. The Chief Minister directed to prepare the list of all the eligible beneficiaries of Ayushman Gram Sabha and all those who have been benefited by the Ayushman Bharat Jan Aarogya Yojana in the state. He also directed to update the list of hospitals that are affiliated to the Pradhanmantri Jan Aarogya Yojana.

‘Organ donation very important’
Stating that organ donation is a generous and noble work; Mr Shinde further said that public awareness should be created in this regard during the Ayushman Sabha. He also said that for providing nutritious food to the patients of Tuberculosis, the initiative for preparing ‘Nikshay Mitra’ should also be encouraged as it will be useful for providing health services to the people of the state.

Prime Minister’s participation in the 20th ASEAN-India Summit and the 18th East Asia Summit

Categories
Breaking News Commerce Political social देश/विदेश

Prime Minister’s participation in the 20th ASEAN-India Summit and the 18th East Asia Summit

             |   Prime Minister attended the 20th ASEAN-India Summit and the 18th East Asia Summit (EAS) in Jakarta on 7 September 2023.

At the ASEAN-India Summit, Prime Minister held extensive discussions with ASEAN partners on further strengthening of ASEAN-India Comprehensive Strategic Partnership and charting its future course. Prime Minister reaffirmed ASEAN centrality in the Indo-Pacific and highlighted the synergies between India’s Indo-Pacific Ocean’s Initiative (IPOI) and ASEAN’s Outlook on the Indo-Pacific (AOIP). He also emphasized the need to complete the review of ASEAN-India FTA (AITIGA) in a time bound manner.

Prime Minister presented a 12-point proposal for strengthening India – ASEAN cooperation covering connectivity, digital transformation, trade and economic engagement, addressing contemporary challenges, people-to-people contacts and deepening strategic engagement, as follows:

• Establishing multi-modal connectivity and economic corridor that links South-East Asia-India-West Asia-Europe

• Offered to share India’s Digital Public Infrastructure Stack with ASEAN partners

• Announced ASEAN-India fund for Digital Future focusing on cooperation in digital transformation and financial connectivity

• Announced renewal of support to Economic and Research Institute of ASEAN and East Asia (ERIA) to act as knowledge partner for enhancing our engagement.

• Called for collectively raising issues being faced by Global South in multilateral fora

• Invited ASEAN countries to join Global Centre for Traditional Medicine being established by WHO in India

• Called for working together on Mission LiFE

• Offered to share India’s experience in providing affordable and quality medicines to people through Jan-Aushadhi Kendras

• Called for collective fight against terrorism, terror financing and cyber-disinformation

• Invited ASEAN countries to join Coalition for Disaster Resilient Infrastructure

• Called for cooperation in disaster management 

• Called for enhanced cooperation on maritime safety, security and domain awareness

Two Joint Statements, one on Maritime Cooperation, and the other on Food Security were adopted. 

In addition to India and ASEAN Leaders, Timor-Leste participated in the Summit as Observor.

At the 18th East Asia Summit, Prime reiterated the importance of EAS mechanism and reaffirmed our support to further strengthening it. Prime Minister underlined India’s support for ASEAN centrality and called for ensuring a free, open and rules based Indo-Pacific. 

Prime Minister highlighted synergies of visions for Indo-Pacific between India and ASEAN, and underscored that ASEAN is the focal point of Quad’s vision.

Prime Minister also called for a cooperative approach to address global challenges including terrorism, climate change and resilient supply chains for essential items including food and medicines, and for energy security. He highlighted India’s steps in the area of climate change and our initiatives such as ISA, CDRI, LiFE and OSOWOG.

Leaders also exchanged views on regional and international issues.

PM Modi in Pune News | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते पुणे मेट्रोच्या मार्गिकांसह विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन

Categories
Breaking News Political social देश/विदेश पुणे महाराष्ट्र

PM Modi in Pune News | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते पुणे मेट्रोच्या मार्गिकांसह विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन

| मेट्रो ही आधुनिक भारतातील शहरांची जीवनरेखा- प्रधानमंत्री

PM Modi in Pune News | शहरी मध्यमवर्गीयांच्या जीवनशैलीविषयी सरकार गंभीर असून सर्वसामान्यांचे जीवन सुकर करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आधुनिक बनवावे लागेल. त्यादृष्टीने पुणे शहरात मेट्रो (Pune Metro) सुरू करण्यात आली असून मेट्रो ही आधुनिक भारतातील शहरांची जीवनरेखा बनत आहे, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी केले. (PM Modi in Pune News)
प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी पुणे मेट्रोच्या टप्पा २ च्या (Pune Metro Phase 2) पूर्ण झालेल्या दोन मार्गिकांचे हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण केले. शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालय येथे आयोजित या कार्यक्रमात मेट्रो लोकार्पणासह  पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) अंतर्गत कचऱ्यापासून ऊर्जा निर्माण करणाऱ्या (Waste to Energy) संयंत्राचे उद्घाटन, पुणे (Pune Municipal Corporation l) आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेद्वारे (Pimpari Chinchwad Municipal Corporation) प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत (PM Awas Yojana) बांधण्यात आलेल्या घरांचे लाभार्थ्यांना हस्तांतरण, पिंपरी चिंचवड मनपा (PCMC) आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (PMRDA) प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरांचे भूमिपूजन प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis), अजित पवार (DCM Ajit Pawar), पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Guardian Minister Chandrakant Patil), सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार चंद्रशेखर बावनकुळे आदी उपस्थित होते.

*पुणे शहर हे युवकांची स्वप्ने पूर्ण करणारे शहर*

पुणे शहर हे देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देणारे, युवांची स्वप्ने पूर्ण करणारे शहर आहे, असे सांगून प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले, या पाच वर्षात पुण्यात सुमारे २४ कि.मी. मेट्रोचे नेटवर्क सुरू झाले आहे. पुण्यासारख्या शहरात प्रदूषण कमी करण्यासाठी मेट्रो रेल्वे आवश्यक असून हे जाळे वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. २०१४ पर्यंत देशात २५० कि.मी. पेक्षा कमी मेट्रो नेटवर्क होते. आता देशात ८०० कि.मी. पेक्षा अधिक मेट्रोचे जाळे तयार झाले असून आणखी 1 हजार किलोमीटरचे काम सुरू आहे. २०१४ मध्ये फक्त ५ शहरात असलेली मेट्रो आज देशातील २० शहरात संचालित आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे आणि नागपूर येथे मेट्रो कार्यरत आहेत. मेट्रो ही आधुनिक भारतातील शहरांची नवी ‘जीवनरेषा’ बनत आहे, असेही श्री. मोदी म्हणाले.

*‘वेस्ट टू वेल्थ’ संकल्पनेवर भर*

श्री. मोदी पुढे म्हणाले, जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी स्वच्छता महत्वाची आहे. आम्ही स्वच्छ भारत अभियान केवळ शौचालयांच्या निर्मतीपूरते मर्यादित ठेवले नाही तर कचरा व्यवस्थापनावर भर देत आहोत. कचऱ्याचे डोंगर हटविण्यासाठी प्रयत्न करत आहोत. ‘वेस्ट टू वेल्थ’ या संकल्पनेवर भर देत आहोत. पिंपरी चिंचवडचा ‘वेस्ट टू एनर्जी’ खूप उत्कृष्ट प्रकल्प असून यातून कचऱ्यापासून वीज बनणार आहे. यामुळे प्रदुषणाची समस्या नष्ट होण्यासह महापालिकेची आर्थिक बचतही होणार आहे.

*महाराष्ट्राने देशाच्या औद्योगिक विकासाला गती दिली*

स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाने देशाच्या औद्योगिक विकासाला गती दिली आहे. म्हणून येथे औद्योगिक विकासाला अधिक गती देण्यासाठी पायाभूत सुविधांवर अधिक भर देण्यात येत आहे.  रेल्वेच्या विकासात २०१४ च्या तुलनेत १२ पट अधिक खर्च केला जात आहे. महाराष्ट्राच्या विविध शहरांना आसपासच्या इकॉनॉमिक हबशी जोडले जात आहे. मुंबई- अहमदाबाद हायस्पीड रेल्वे, दिल्ली मुंबई इकॉनॉमिक कॉरिडॉरमुळे औद्योगिक विकास होणार आहे. वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर मुळे महाराष्ट्राची उत्तर भारतासोबत रेल्वे जोडणी वाढणार आहे. महाराष्ट्र, तेलंगणा आणि छत्तीसगड यांच्यादरम्यान बनविण्यात आलेल्या पारेषण वाहिनी जाळ्यामुळे महाराष्ट्रातील उद्योगांना नवी गती मिळणार आहे. त्याचबरोबर ऑईल गॅस लाईन, औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी, नवी मुंबई विमानतळ, सेंद्रा बिडकीन औद्योगिक पार्क यांच्यात महाराष्ट्राच्या  अर्थव्यवस्थेला नवी गती देण्याची क्षमता आहे.

*डिजीटल क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या विकासात पुण्याचा मोठा वाटा*

महाराष्ट्राचा विकास होईल तेव्हा भारताचा विकास होईल आणि भारताचा विकास होईल त्याचा तेवढाचा लाभ महाराष्ट्राला होईल. गेल्या ९ वर्षात इनोव्हेशन आणि स्टार्टअपच्या बाबतीत भारताने जगात नवी ओळख मिळवली आहे. आज स्टार्टअपची संख्या १ लाखाच्या वर झाली आहे. ही इकोसिस्टीम डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरच्या विस्तारामुळे तयार झाली आहे. भारतात डिजीटल इन्फ्रास्ट्रक्चरचा पाया घालण्यात पुण्याचा मोठा वाटा आहे. स्वस्त स्मार्टफोन, गावोगावी पोहोचलेल्या इंटरनेट सुविधेमुळे हे शक्य झाले आहे. जगभरात सर्वाधिक वेगाने ५ जी इंटरनेट सुविधा पोहोचवणारा आपला देश बनला आहे. फिनटेक, बायोटेक, ॲग्रीटेक आदी सर्वच क्षेत्रात आपले युवा उत्कृष्ट काम करत आहेत.

*गरीबांसाठी ४ कोटीपेक्षा अधिक घरांची निर्मिती*

गेल्या ९ वर्षात गाव आणि शहरात गरीबांसाठी ४ कोटीपेक्षा अधिक पक्क्या घरांची निर्मिती केली आहे. त्यातही शहरी गरिबांसाठी ७५ लाखापेक्षा अधिक घरे बनविली आहेत. नवीन घरांच्या निर्मितीमध्ये पारदर्शकता आणली असून गुणवत्ताही सुधारली आहे. त्यातील जास्तीत जास्त घरे महिलांच्या नावावर करण्याचे काम आम्ही केले आहे. पहिल्यांदाच महिलांच्या नावावर काही संपत्ती नोंदणीकृत झाली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधलेल्या घरांमुळे नागरिकांसाठी येणारे सण विशेष आनंदाचे ठरतील, असेही प्रधानमंत्री म्हणाले.

*देशाची ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्यासाठी महाराष्ट्र योगदान देईल | मुख्यमंत्री*

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पुणे शहर, जिल्हा ही एक ऐतिहासिक नगरी आहे. येथे मेट्रो प्रकल्पाचा शुभारंभ झाला आहे. पुणे मेट्रोमुळे मुंबई शहरासारखाच लाखो पुणेकरांनाही लाभ मिळणार आहे. रिंग रोडसह पुणे शहरात विविध विकास प्रकल्प सुरू आहेत त्याला चालना देण्याचे काम सरकार करेल. शेतकरी, कष्टकरी, कामगार, माता-भगिनी, विद्यार्थी तरुण या सर्वांसह सर्वसमावेशक विकासाचा रथ पुढे नेण्याचे काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करत आहेत. सर्वसामान्याचे, गोरगरीबाचे स्वप्न पुढे नेण्यासाठी मोदीजी प्रयत्न करत आहेत.
प्रधानमंत्री मोदी यांच्या प्रयत्नांमुळे जगभरात भारताचे नाव आदराने घेतले जाते. देशाचे ५ ट्रिलियन डॉलरचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्राची १ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्याची आपली जबाबदारी असून त्यात महाराष्ट्र योगदान देईल. सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडविण्यासाठी अनेक प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत, असेही श्री. शिंदे म्हणाले.

*पुणे मेट्रोमुळे वाहतुकीची समस्या दूर होईल | देवेंद्र फडणवीस*

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज मेट्रोच्या दोन मार्गिका जोडल्या जात असल्यामुळे एका भागातून दुसऱ्या भागात जाण्याकरिता विशेष मदत या क्रॉसिंगमुळे होणार आहे. यात तयार झालेले एक एक स्थानक स्थापत्याचा उत्तम नमुना आहे. मेट्रोचा वाढीव टप्पा पूर्ण होईल तेव्हा खऱ्या अर्थाने पुणे व पिंपरी शहरातील वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. देशातील सर्वोत्तम इलेक्ट्रिक बसेसचा ताफा पुणे व पिंपरी- चिंचवड शहरामध्ये पीएमपीएमएलकडे आहे. प्रधानमंत्री श्री. मोदी यांची संकल्पना असलेली कुठलेही प्रदूषण न करणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुण्यामध्ये होत आहे.
चक्रीय अर्थव्यवस्था असली पाहिजे या प्रधानमंत्री मोदींच्या भूमिकेनुसार पिंपरी चिंचवड मनपाकडून उभारण्यात आलेल्या ‘वेस्ट टू एनर्जी प्रकल्प’ हे उदाहरण आहे. त्यामध्ये निर्माण होणारी ऊर्जा अपारंपरिक असणार आहे. तसेच त्यासाठीचे पाणी देखील एसटीपी मधून पुर्नप्रक्रिया केलेले असेल. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या घरांमुळे येत्या काळात एकही कुटुंब बेघर राहणार नाही. पुणे ही औद्योगिक नगरी, माहिती तंत्रज्ञान नगरी आहे, स्टार्टअपची राजधानी आहे. येत्या काळात पुण्याला नवीन रिंगरोड आणि नवीन विमानतळ देणार आहोत. खऱ्या अर्थाने पुणे ही जशी विद्येची, उद्योगाची नगरी आहे तशी ती स्वप्नपूर्तीची नगरी होईल हा विश्वास आहे.

*शहराच्या विकासात पुणेकरांची साथ | उपमुख्यमंत्री अजित पवार*

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुणे शहराच्या विकासाबरोबरच महाराष्ट्राच्या विकासाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच साथ दिली आहे. मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होत असल्याचा आनंद आहे. मेट्रोच्या कामामध्ये येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी पुणेकरांनी एकजुटीने काम केले.
ते पुढे म्हणाले, ३५० वर्षांपूर्वी राजमाता जिजाऊंनी बाल शिवबांच्या हस्ते सोन्याचा नांगर फिरवून पुण्याचा विकास करण्याचे काम केले. या भूमीत अनेक कला, क्रीडा तसेच गुणवंत, बुद्धीवंतांनी पुण्याच्या विकासामध्ये योगदान दिले. शेतकरी, कष्टकऱ्यांनी पुण्याच्या वैभवात भर घातली. उद्योजकांनी आर्थिक सुबत्ता आणण्याचा प्रयत्न केला. देशातील प्रत्येक गोरगरीब, कष्टकऱ्याला स्वस्तात घर देण्याचे प्रधानमंत्री यांचे स्वप्न आहे. आज पंतप्रधान यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पुणे व पिंपरी चिंचवड येथील घरांचे लोकार्पण होत आहे. या योजनेंतर्गत मिळालेल्या घरात सुखाचा,आनंदाचा संसार करा आणि मुलांना जबाबदार नागरिक बनवा, असाही संदेश त्यांनी लाभार्थ्यांना दिला.
प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी मेट्रोच्या दोन्ही मार्गाना हिरवी झेंडी दाखवून लोकार्पण केले आणि प्रातिनिधिक स्वरुपात 3 महिलांना प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांच्या चाव्या वितरीत केल्या. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

*विकासकामांमुळे शहर विकासाला गती*

पुणे मेट्रोच्या फुगेवाडी ते सिव्हील कोर्ट या ६.९ किलोमीटरच्या मार्गिकेवर ४ स्थानके आहेत, तर गरवारे कॉलेज ते रुबी हॉल या ४.७ किलोमीटरच्या मार्गिकेवर ७ स्थानके आहेत. अशाप्रकारे आतापर्यंत एकूण २१ स्थानकांसह २३.६६ किमी लांबीचा मेट्रो मार्ग पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात कार्यान्वित करण्यात आला आहे. यामुळे प्रवासाचा वेळ ५० टक्क्यांनी कमी होणार आहे. या मार्गिकांमुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरे आणि पुणे शहरातील महत्वाची ठिकाणे जोडली गेली आहेत.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेद्वारे बांधण्यात आलेली १ हजार २८८ घरे आणि पुणे महापालिकेने बांधलेल्या २ हजार ६५८ घरे प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते हस्तांतरित करण्यात आली. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेद्वारे बांधण्यात येणाऱ्या सुमारे १ हजार १९० घरांची आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून बांधण्यात येणाऱ्या ६ हजार ४०० हून अधिक घरांची पायाभरणी देखील करण्यात आली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेद्वारे सुमारे ३०० कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आलेल्या ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प क्षमता ७०० टन प्रति दिवस असून वीज निर्मिती क्षमता १४ मेगावॅट प्रति तास आहे.
0000
News Title | PM Modi in Pune News | Inauguration and Bhoomi Pujan of various projects including Pune Metro lines by Prime Minister Narendra Modi

Lokmanya Tilak National Award 2023 | PM Modi | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

Categories
Breaking News cultural Political social देश/विदेश पुणे महाराष्ट्र

Lokmanya Tilak National Award 2023 | PM Modi | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

| महापुरुषांच्या भूमीत लोकमान्यांच्या नावाने पुरस्कार मिळणे हे सौभाग्य-प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

| लोकमान्य टिळकांना अपेक्षित देश घडविण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे प्रयत्न-मुख्यमंत्री

Lokmanya Tilak National Award 2023 |  PM Modi | पुणे ही छत्रपती शिवाजी महाराज, चाफेकर बंधू यांची भूमी आहे. या भूमीशी ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची प्रेरणा आणि आदर्श जोडलेले आहेत. अशा भूमीत लोकमान्य टिळक (Lokmanya Tilak) यांच्या नावाचा पुरस्कार मिळत आहे ते आपले सौभाग्य आहे, विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यभूमीत मिळणारा पुरस्कार हा आपला सन्मान आहे, अशा शब्दात  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. (Lokmanya Tilak National Award 2023| PM Modi)
स.प. महाविद्यालय (S P College) येथे प्रधानमंत्री श्री. मोदी (PM Narendra Modi) यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने (Lokmanya Tilak National Award) सन्मानित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis), अजित पवार (DCM Ajit Pawar), ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार (MP Sharad Pawar), ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक (Deepak Tilak), विश्वस्त सुशीलकुमार शिंदे, डॉ. रोहित टिळक, गीताली टिळक, डॉ. प्रणती टिळक आदी उपस्थित होते. स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

प्रधानमंत्री श्री.मोदी म्हणाले, लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य लढ्याची दिशाच बदलली.  देशाची संस्कृती आणि परंपरा महान असल्याचा विश्वास लोकांमध्ये निर्माण केला. देश स्वतंत्र होऊ शकतो हा विश्वास लोकांमध्ये त्यांनी पहिल्यांदा निर्माण केला. देशासमोर सहकार्याचे मोठे उदाहरण ठेवले. स्वातंत्र्य लढ्यातील वर्तमानपत्राचे महत्व ओळखून त्यांनी केसरी आणि मराठा ही वृत्तपत्र सुरू केली. स्वातंत्र्यासाठी इंग्रजांसोबत लढा देतानाच समाजातील वाईट प्रथांविरोधातही त्यांनी लढा दिला. (PM Modi in Pune)
गीतारहस्याच्या माध्यमातून त्यांनी  कर्मयोग सोप्या पद्धतीत सांगितला. त्यांचा लोकांवर विश्वास होता. असाच लोकांच्या कर्तृत्वावर प्रामाणिकपणावर आमचाही विश्वास आहे. देशात विश्वासाने भरलेले सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. यामुळेच देश विकासाकडे वेगाने वाटचाल करीत आहे. लोकमान्य टिळकांच्या विचारांमधील देश निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
लोकमान्य टिळकांना समृद्ध, बलाढ्य, कर्तुत्ववान देशाची निर्मिती अपेक्षित होती. त्यासाठी त्यांनी देशामध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण केले. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक युवकांनी त्याकाळी स्वातंत्र्य संग्रामात सहभाग घेतला. त्यापैकी महत्वाचे उदाहरण म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर हे होत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना इंग्लडला जावून बॅरीस्टर होता यावे यासाठी त्यांना शिष्यवृत्ती देण्याची शिफारसही टिळकांनी केली होती.
न्यू इंग्लिश स्कूल, डेक्क्न एज्युकेशन सोसायटी, फर्ग्युसन महाविद्यालयासारख्या संस्थांची स्थापना ही त्यांची दूरदृष्टी दर्शवून देते. या संस्थातून असे कित्येक युवा निघाले ज्यांनी टिळकांचे मिशन पुढे चालवले. राष्ट्रनिर्माणामध्ये आपली भूमिका बजावली. व्यवस्था निर्मितीकडून संस्थांची निर्मिती, संस्था निर्मितीतून व्यक्तीनिर्मिती आणि व्यक्तीनिर्मितीतून राष्ट्रनिर्मिती हे व्हिजन राष्ट्राच्या भविष्यासाठी पथदर्शी असते. त्यावर आज देश प्रभावीपणे वाटचाल करत आहे. देशातील लोकांच्या विश्वासाने आणि प्रयत्नांमुळेच देश आज जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था बनल्याचे श्री.मोदी म्हणाले.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या नावे मिळणाऱ्या पुरस्काराची रक्कम नमामी गंगे प्रकल्पाला देत असल्याची घोषणा प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी यावेळी केली.
*लोकमान्य टिळकांना अपेक्षित देश घडविण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे प्रयत्न-मुख्यमंत्री*
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्यचळवळीचे जनक आणि बहुआयामी प्रतिभावंत होते. त्यांनी दिलेल्या लढ्यामुळे आपण स्वातंत्र्याचा सूर्य अनुभवतो आहे. ते प्रखर राष्ट्रभक्त होते. ब्रिटींशांविरुद्ध लढताना त्यांच्या शब्दांना धार येत होती. लोकमान्य टिळकांना अपेक्षित असलेला देश निर्माण करण्यामध्ये प्रधानमंत्री श्री.मोदी यांचे कार्य महत्वाचे आहे. आज जग एक महत्वाचा नेता म्हणून मोदीजींकडे पाहत आहे. परदेशात त्यांना मिळणारा मान पाहून आम्हा देशवासियांना अभिमान वाटतो.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, प्रधानमंत्री श्री. मोदी यांना गेल्या ९ वर्षामध्ये आपल्या देशासाठी केलेल्या कामांना लोकमान्यता मिळाली आहे. ते समाजाचे, सामान्य माणसाचे मन ओळखणारे नेते आहेत. त्यांनी देशाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ हे सूत्र ठेऊन देशात सुराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला  आहे. हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या या कामाचा सन्मान आहे. मोठ मोठ्या देशांची अर्थव्यवस्था कोलमडून जात असताना भारताची अर्थव्यवस्था १० व्या क्रमांकावरुन ५ व्या क्रमांकावर आणण्याचे काम प्रधानमंत्री श्री.मोदी यांनी केले आहे.
खासदार श्री. पवार म्हणाले, यापूर्वी लोकमान्य टिळक पुरस्कार हा इंदिरा गांधी, खान अब्दुल गफार खान, शंकर दयाल शर्मा, अटलबिहारी वाजपेयी, बाळासाहेब देवरस, मनमोहन सिंह यांना मिळाला होता. या नेत्यांच्या पंक्तीत नरेंद्र मोदी यांचा समावेश झाला याचा आनंद आहे. देशाच्या जडणघडणीमध्ये लोकमान्य टिळक व महात्मा गांधी यांचे मोलाचे योगदान आहे. नव्या पिढीला या कर्तृत्ववान दृष्टीचा आदर्श अखंडपणे प्रेरणा देईल.
स्वागत करताना ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. टिळक यांनी लोकमान्य टिळक यांचे व्यक्तीमत्व आणि कार्य यांची ओळख करुन दिली. तसेच ४१ वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यामागील भूमिका विषद केली.
यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह विशेष निमंत्रित व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमापूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दगडुशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले.
0000
News Title | Lokmanya Tilak National Award 2023 | PM Modi | Lokmanya Tilak National Award conferred on Prime Minister Narendra Modi