PM Modi Wishesh Pune Metro : पंतप्रधान मोदींनी पुणे मेट्रोला दिल्या शुभेच्छा  : वाचा शुभेच्छा पत्र जसेच्या तसे 

Categories
Breaking News देश/विदेश पुणे

पंतप्रधान मोदींनी पुणे मेट्रोला दिल्या शुभेच्छा

: वाचा शुभेच्छा पत्र जसेच्या तसे

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे मेट्रोचे उदघाटन केले. शिवाय तिकीट काढून प्रवास देखील केला. प्रवास झाल्यांनतर मोदींनी पुणे मेट्रोला लिखित स्वरूपात शुभेच्छा दिल्या आहेत.

: अशा आहेत शुभेच्छा

 

मझे अत्यंत हर्ष हो रहा है
कि पुणे शहर में आज से
अंतराष्ट्रीय स्तर की मेट्रो सेवा
शुरू हो रही है। पुणे में
नागरिकों को एक तीव्र,
सुरक्षित और पर्यावरण अनुकूल
शहरी यातायात का साधन
उपलब्ध होने जा रहा है।
मैं सभी पुणे वासियों को
मेट्रो सेवा के सफल संचालन
के लिए अपनी शुभकामनाये
देता हूँ।

PM Modi Attack on congress : काँग्रेसच्या काळात फक्त भूमीपूजन; पण प्रकल्प कधी पूर्ण होईल हे समजत नसे

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे

काँग्रेसच्या काळात फक्त भूमीपूजन; पण प्रकल्प कधी पूर्ण होईल हे समजत नसे

: पंतप्रधान मोदींचा काँग्रेस वर प्रहार

पुणे : पुण्यात आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे अनावरण, गरवारे ते आनंदनगर मेट्रो चे  आणि इ बस सेवेचे उदघाटन असे कार्यक्रम झाले. त्यानंतर एमआयटीच्या प्रांगणात मोठ्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोदींनी काँग्रेसला टोला लगावला आहे.

मोदी म्हणाले, या मेट्रो प्रकल्पाचे भूमीपूजन करण्यासाठी मला बोलविले होते. आता तिचे उद्घाटन करण्याचे सौभाग्य मिळाले. काँग्रेस सरकारच्या काळात भूमीपूजन होत होते. पण तो प्रकल्प कधी पूर्ण होईल हे समजत नसे. वेळेवर प्रकल्प पूर्ण होऊ शकतो, हे मेट्रोने दाखवून दिले असल्याचे सांगून त्यांनी काँग्रेस सरकारवर टीका करण्याची संधी साधली आहे.

”आज बारापेक्षा जास्त शहरात मेट्रो काम चालू आहे. त्यात महाराष्ट्र जास्त आहेत. मुबंई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक इकडे मेट्रो सुरू होतेय. लोकांना आग्रह जे मोठे लोक समाजात आपण मानतो त्यांना आग्रह की मेट्रो प्रवास सवय लावा जेवढा जास्त मेट्रो प्रवास तेवढी शहराला मदत होईल. तसेच जास्तीत जास्त ई वाहतूक सुरू झाली पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.”

महाराष्ट्रातील स्वातंत्र्य सेनानी यांना मोदींकडून श्रद्धांजली

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी कर्वी अनेकांच्या कामाने पावन झालेल्या पुणेकरांना नमस्कार करत आहे. देश स्वतंत्र अमृतमहोत्सव साजरा करतोय. पुण्याच विशेष महत्व आहे. यामध्ये लोकमान्य ,टिळक चाफेकर बंधू असे स्वातंत्र्य सेनानी यांना श्रद्धांजली वाहत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Sharad Pawar Vs Girish Mahajan : कसलाही संबंध नसताना शरद पवार पुणे मेट्रोने फिरून आले 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

कसलाही संबंध नसताना शरद पवार पुणे मेट्रोने फिरून आले

: पवारांच्या प्रतिक्रियेवर भाजपची तिखट प्रतिक्रिया

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्रात येणार असून ते पुणे दौरा करणार आहे. पुण्यातील बहुप्रतिक्षित मेट्रोचा प्रारंभ मोदी करणार आहेत. मात्र मोदींच्या येण्याआधीच महाराष्ट्राचं राजकारण तापल्याच दिसून येत आहे. मोदींच्या दौऱ्याच्या एकदिवस आधी शरद पवारांनी मेट्रोच्या कामाबाबत विधान केलं होतं. त्याला भाजपने चोख प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळत आहे.

भाजपचे मंत्री युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना सोडवून आणण्यासाठी प्रयत्न करतातय. सरकारमधील चार मंत्री युक्रेनमधील विद्यार्थ्यांना सोडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आज सहा विमानांनी विद्यार्थी आलेत. मात्र केंद्र सरकारला विद्यार्थ्यांची काळजी नाही, असं दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न पवार करत असल्याची टीका गिरीश महाजन यांनी यांनी केली.

 

महाजन पुढं म्हणाले की, विकासकामं पूर्णत्वाकडे जात आहेत. काही कामं पूर्ण झाली. मात्र काही दिवसांपूर्वी शरद पवार कारण नसताना मेट्रोमध्ये फिरून आले. आपण किती चांगलं काम करतो हे दाखविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र मेट्रोचा आणि पवारांचा काडीचा तरी संबंध आहे का, असा सवालही महाजन यांनी उपस्थित केला.

दरम्यान शरद पवार राजकीय आरोप करतात. मात्र मोदी येणार असल्याने पुणे भाजपमय, मोदीमय झालंय. त्याचं पवारांना वाईट वाटत आहे. त्यामुळे ते वाटेल ते आरोप करतायत असंही महाजन यांनी म्हटलं.

 

शरद पवार म्हणाले होते की,’रशिया आणि युक्रेनमधील संघर्षाचा परिणाम विद्यार्थ्यांवर होतोय. ‘आज ही हजारो मुलं अडकलीयत. जीव मुठीत धरुन ती तिथं आहेत. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात येतात. त्यांच्या येण्याला माझा आक्षेप नाही, पण मेट्रोचे काम पूर्ण नाही. अर्धवट कामाचे उद्घाटन करण्यासाठी मोदी येतायत.

PM Modi tour pune : Sharad pawar : अर्धवट कामाचं उदघाटन करताना काही संकट आल्यास .. : शरद पवारांनी PM मोदींना दिला इशारा 

Categories
Breaking News PMC Political देश/विदेश पुणे

अर्धवट कामाचं उदघाटन करताना काही संकट आल्यास ..

: शरद पवारांनी PM मोदींना दिला इशारा 

पुणे : पुणे मेट्रोचं उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते उद्या होणार आहे. त्यासाठी शहरात मोठी तयारी सुरु आहे. पण या उद्घाटन कार्यक्रमावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा आणि राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी गंभीर इशारा दिला आहे. मेट्रोच्या अर्धवट कामाचं उद्घाटन होतंय, काही संकट निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी आपल्याला घ्यावी लागेल, असं शरद पवार यांनी PM मोदींना उद्देशून म्हटलं आहे.

पवार म्हणाले, “माझी आज देशाच्या पंतप्रधानांना विनंती आहे की ते उद्या पुण्यात येत आहेत. त्यांच्या दौऱ्याबद्दल काही तक्रार नाही, पण या मेट्रोचं काम पूर्ण झालेलं नाही त्याच उदघाटन होत आहे. नदी सुधार करण्याची गरज आहे. नदी सुधारण्याचं काम हाती घेतलं पाहिजे. पण या नदीवर अनेक धरणं आहेत. त्यामुळं कधी ढगफुटी झाली तर या मोठ्या संकटाची झळ आजूबाजूच्या गावातील लोकांना बसणार आहे. अर्धवट कामाचं उदघाटन केलं जातंय त्याच स्वागत करू, पण अशा अर्धवट कामामुळं जर काही संकट निर्माण झाल तर आपल्यालाच ते पाहायला लागेल” नवीन नदी सुधार प्रकल्पाबाबत अधिकारी आणि नेत्यांशी बोलू यावर तोडगा काढू असंही त्यांनी म्हटलं आहे.

बऱ्याच दिवसांनी या परिसरात आलो आहे. पुणं बदलतंय, शहराचा चेहरा बदलतोय, पूर्वी इकडे जुन्या पद्धतीच गाव होतं. नागरिककरण वाढलं त्यामुळं आता जुनी ओळख राहिली नाही. देशाच्या कानाकोपऱ्यातून इथं लोक आले आहेत. पण एकूणच पुणे शहरातील कामांबाबत आता सामंजस्याची कमतरता भासत आहे, असंही शरद पवार पत्रकार परिषदेत म्हणाले.

PMRDA : Pune Metro : पुणे मेट्रोला PMRDA चा इशारा! 

Categories
Breaking News PMC पुणे

पुणे मेट्रोला PMRDA चा इशारा

: गणेशखिंड रस्त्यावरील काम तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश

पुणे : गणेशखिंड ते रेंज हिल पर्यंत १३२ के.व्ही. भूमिगत केबल टाकणे या कामातील शिल्लक असलेल्या भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अॅग्रिकल्चरल बँकिंग कॉलेज ते सेंन्ट्रल मॉल या लांबीमध्ये केबल टाकण्यास पुणे महानगरपालिकेने परवानगी दिलेली आहे. सदर कामाची मुदत १५ दिवस इतकी देण्यात आली होती. मात्र महिना उलटूनही मेट्रो कडून हे काम करण्यात आलेले नाही. हे काम तात्काळ करा अन्यथा बॅरीकेड्स लावून मेट्रो piling चे काम सुरु करण्यात येईल. असा इशारा PMRDA ने पुणे मेट्रो ला दिला आहे.

: असे आहे PMRDA चे पत्र

महामेट्रो, पुणे या संस्थेस गणेशखिंड ते रेंज हिल पर्यंत १३२ के.व्ही. भूमिगत केबल टाकणे या कामातील शिल्लकअसलेल्या भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अॅग्रिकल्चरल बँकिंग कॉलेज ते सेंन्ट्रल मॉल या लांबीमध्ये केबल टाकण्यासउपरोक्त संदर्भान्वये पुणे महानगरपालिकेने परवानगी दिलेली आहे. सदर कामाची मुदत १५ दिवस इतकी देण्यात आली होती. परंतु, आज मितीस १ महिना पूर्ण होऊन देखील आपल्या मार्फत १४० मी लांबीमध्ये काँक्रीट रस्त्यामधून केबल टाकण्यासाठी खोदाई काम करून केवळ मोकळे पाईप (Empty Pipe) टाकण्याचे काम पूर्ण केले आहे व दोन्ही बाजूस केबल जोडण्याचे (Cable Jointing) काम अद्याप पूर्ण केलेले नाही. सदर काम तत्काळ पूर्ण करून घेण्यात यावे अन्यथा या भागामध्ये ९ मी रुंदीने बॅरीकेड्स लावून मेट्रोचे piling काम सुरु करण्यात येईल. यापूर्वीच १३२ के.व्ही. भूमिगत केबल टाकणेचे काम करण्यासाठी व अस्तित्वातील वाहतुकीस कोणताही अडथळा निर्माण होऊ नये व पुरेसा रस्ता उपलब्ध होणेसाठी मेट्रोचे piling चे काम बंद करून बॅरीकेड्स हटविण्यात आलेले आहेत. तरी, आपणास कळविण्यात येते की, पुणे मेट्रो लाईन – ३ प्रकल्प हा PPP तत्वावर राबविण्यात येत असल्यामुळे सदर प्रकल्प ४० महिन्यात पूर्ण करण्याचे कालबद्ध नियोजन आहे. सदर नियुजानाम्ध्ये अपव्यय आल्यास सवलतकार कंपनी प्राधिकरणाकडे नुकसान भरपाईचा दावा करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी उर्वरित भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अॅग्रिकल्चरल बँकिंग कॉलेज ते सेंन्ट्रल मॉल या लांबीमध्ये १३२ के.व्ही. भूमिगत केबल टाकण्याच्या कामाचे नियोजन काटेकोरपणे करावे. अन्यथा या भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अॅग्रिकल्चरल बँकिंग कॉलेज ते सेंन्ट्रल मॉल या लांबीमध्ये ९ मी रुंदीने बॅरीकेड्स लावून मेट्रो piling चे काम सुरु करण्यात येईल

Metro Station : Garware college : Swatantryaveer Savarkar : मोदी मेट्रोने प्रवास करणार आहेत, त्यामुळे गरवारे महाविद्यालय येथील मेट्रो स्थानकाचे नामकरण स्वातंत्र्यवीर सावरकर स्थानक करावे

Categories
Breaking News Political पुणे

मोदी मेट्रोने प्रवास करणार आहेत, त्यामुळे गरवारे महाविद्यालय येथील मेट्रो स्थानकाचे नामकरण स्वातंत्र्यवीर सावरकर स्थानक करावे

: भाजपा प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांतदादा पाटील यांची मागणी

पुणे : गरवारे महाविद्यालय येथील मेट्रो स्थानकाचे नामकरण स्वातंत्र्यवीर सावरकर स्थानक असे करावे, अशी आग्रही मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांतदादा पाटील यांनी केली. तसेच यासंदर्भात मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकांना पत्र ही दिले असल्याची माहितीही पाटील यांनी दिली.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज डेक्कन येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकातील स्वातंत्र्यवीरांच्या प्रतिमेस आ. पाटील यांनी अभिवादन केले. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

यावेळी भाजपा पुणे शहर सरचिटणीस तथा मनपा निवडणूक प्रचार प्रमुख राजेश पांडे, सरचिटणीस दत्ताभाऊ खाडे, दीपक पोटे, भाजपा शिवाजी नगर मंडल अध्यक्ष रवी साळेगावकर, कोथरूड मंडल अध्यक्ष पुनित जोशी, भाजपा पुणे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर, शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा मंजुश्री खर्डेकर यांच्यासह नगरसेविका ज्योत्स्नाताई एकबोटे, अल्पनाताई वर्पे,श्रद्धाताई प्रभुणे,वासंतीताई जाधव, नगरसेवक जयंत भावे, राजाभाऊ बराटे, सुशिल मेंगडे पदाधिकारी अनिता तलाठी, हर्षदाताई फरांदे,पल्लवीताई गाडगीळ, विद्या टेमकर, कुलदीप सावळेकर, नवनाथ जाधव, स्वप्निल राजीवडे, रणजित हगवणे, प्रकाश तात्या बालवडकर, सतिश मोहोळ, अमोल डांगे, शिवाजी शेळके, गायत्री लांडे, महेश पवळे, दीपक पवार, अतुल चाकणकर, वैभव मुरकुटे, श्रद्धा मराठे, यांच्या सह भाजपाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

.‌पाटील म्हणाले की, “स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमचं सर्वांचं श्रद्धास्थान आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी पुण्यात याच ठिकाणी विदेशी कपड्यांची होळी करुन, ब्रिटिश सरकारला आव्हान दिले होते. त्यामुळे या परिसराचे आम्हा सर्वांसाठी वेगळे महत्त्व आहे.”

ते पुढे म्हणाले की, “येत्या ६ मार्च रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पुण्यातील विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यासाठी दौऱ्यावर येणार आहेत.‌ यावेळी गरवारे महाविद्यालय येथील मेट्रो स्थानक येथे मेट्रोने प्रवासही करणार आहेत.‌ त्यामुळे या मेट्रो स्थानकाचे नामकरण स्वातंत्र्यवीर सावरकर करावे, यासाठी मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्या कडे पत्राद्वारे मागणी केली आहे.”

Sharad pawar : Pune Metro : शरद पवार यांचा पुणे मेट्रोने प्रवास!  : चंद्रकांत पाटील यांनी साधले शरसंधान 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

शरद पवार यांचा पुणे मेट्रोने प्रवास!

: चंद्रकांत पाटील यांनी साधले शरसंधान

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी आज पुणे मेट्रोच्या फुगेवाडी स्टेशनला भेट दिली. स्टेशन परिसराची पाहणी करून त्यांनी फुगेवाडी ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका असा प्रवासही मेट्रो ने केला. त्यांच्या याच मेट्रो प्रवासावर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी आक्षेप घेत शरद पवारांच्या उपस्थितीत पुणे मेट्रोची चाचणी म्हणजे आयत्या पिठावर रेघोट्या असल्याचे सांगत टीका केली होती. तसेच मेट्रो प्रशासनाविरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात असल्याचेही त्यांनी सांगितले होते.

त्यानंतर आता पुणे महामेट्रोकडून यावर स्पष्टीकरण देण्यात आले. मेट्रो प्रकल्पाची माहिती हवी म्हणून शरद पवारांकडून आम्हाला विचारणा करण्यात आली होती. पुणे मेट्रोचे काम सुरू होऊन साडेचार वर्षे झाली, परंतु ते आतापर्यंत कधीही आले नव्हते. त्यामुळे आम्ही त्यांना फुगेवाडी येथील मेट्रो स्टेशनच्या कार्यालयात बोलावले. त्यानुसार ते आज या ठिकाणी आले होते.

हा प्रकल्प कधी सुरू झाला, खर्च किती, सध्याची स्थिती काय आहे ही सर्व माहिती त्यांना देण्यात आली. त्यानंतर फुगेवाडी स्टेशनची त्यांना माहिती दिली आणि नंतर त्यांनी मेट्रोने प्रवास केला. आजच्या भेटीत मेट्रोची ट्रायल रण झाली नाही, शरद पवारांना फक्त मेट्रो संदर्भातली माहिती देण्यात आली. या मार्गावरील मेट्रोची ट्रायल 2019 मध्येच झाल्याचे महामेट्रोचे सरव्यवस्थापक हेमंत सोनवणे यांनी सांगितले.

चंद्रकांत पाटील यांनी मेट्रोतून प्रवास केल्यानंतर शरद पवार यांच्यावर टीका केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज मेट्रोची चाचणी घेऊन जणू काही त्यांच्यामुळे पुणे मेट्रोचा प्रकल्प झाल्याचे प्रशासनाने भासविणे म्हणजे आयत्या पिठावर रेघोट्या असा प्रकार आहे. पुणे व पिंपरी चिंचवडमधील लोकप्रतिनिधींना डावलून केवळ राज्यसभा सदस्य असलेल्या एका नेत्याच्या उपस्थितीत चाचणी घेतल्याबद्दल मेट्रोच्या प्रशासनाविरोधात आपण विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव दाखल करणार आहे, असा इशारा त्यांनी दिला.

Mahavikas Aghadi Vs BJP : Metro Bridge : महाविकास आघाडी म्हणते, विकासाच्या नावाखाली गणेश उत्सव परंपरा नष्ट करण्याचा भाजपचा प्रयत्न; तर भाजप म्हणते, गणेश मंडळ कार्यकर्त्यांच्या आडून महाविकास आघाडीचे राजकारण

Categories
Breaking News PMC Political पुणे

विकासाच्या नावाखाली गणेश उत्सव परंपरा नष्ट करण्याचा भाजपचा प्रयत्न : महाविकास आघाडी

: गणेश मंडळ कार्यकर्त्यांच्या आडून महाविकास आघाडीचे राजकारण : भाजप

पुणे : मेट्रो प्रकल्पाच्या पुलावरून महापालिकेचे मुख्य सभागृह आणि बाहेर देखील महाविकास आघाडी आणि सत्ताधारी भाजप च्या नेत्यामध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली.    मेट्रोच्या पुलाची उंची वाढवण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना व काँग्रेस या महाविकास आघाडीतील तिन्ही घटकपक्षांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या मेट्रो पुलाची उंची न वाढवता काम सुरू ठेवून पुणे शहराची परंपरा मोडीत काढण्याचा दुर्दैवी प्रयत्न सत्ताधारी भाजप करत आहेत असा आरोप या तीनही पक्षांच्या वतीने करण्यात आला. तर भाजपने आरोप केला कि गणेश मंडळ कार्यकर्त्यांच्या आडून महाविकास आघाडी राजकारण करते आहे.

: आमचा विरोध हे महापौरांचे हास्यास्पद वक्तव्य – प्रशांत जगताप

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले कि “गणेशोत्सव” म्हणजे पुणे शहराचे सांस्कृतिक वैभव… पुणे शहरातील गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकीची भुरळ केवळ महाराष्ट्राला किंवा भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला आहे. मात्र पुणे शहराच्या या वैभवाला गालबोट लागतेय की काय असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. पुणे शहरातील सर्व मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक ही छत्रपती संभाजी महाराज पूल (लकडी पूल) येथून जाते. गेल्या 131 वर्षांपासून ही परंपरा अखंडितपणे चालू आहे. मात्र छत्रपती संभाजी महाराज पुलावरून प्रस्तावित असलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या पुलामुळे ही परंपरा खंडीत होणार आहे. या मेट्रोच्या पुलाची उंची वाढवण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना व काँग्रेस या महाविकास आघाडीतील तिन्ही घटकपक्षांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या मेट्रो पुलाची उंची न वाढवता काम सुरू ठेवून पुणे शहराची परंपरा मोडीत काढण्याचा दुर्दैवी प्रयत्न सत्ताधारी भाजप करत आहेत असा आरोप या तीनही पक्षांच्या वतीने करण्यात आला. याबाबत आज महाविकास आघाडीतील पक्षांनी प्रश्न उपस्थित केले असता महाविकास आघाडीचा मेट्रो प्रकल्पास विरोध असल्याचे हास्यास्पद वक्तव्य  महापौरांनी केले आहे.  पालक मंत्री आदेशाने मेट्रोचे काम सुरु झाले असे  महापौर महोदयांनी सांगितले, जर हे खरे असेल तर महापौरांनी सप्टेबर मध्ये काम थांबवताना कोणत्या अधिकारांत मेट्रोचे काम थांबवले होते. पुणे शहराच्या अस्मितेच्या या प्रश्नावर महानगरपालिकेच्या सभागृहात चर्चा व्हावी अशी मागणी महाविकास आघाडीतील घटकपक्षांनी केली असता भर सभागृहात महापौरांचं खोटं वक्तव्य उघडं पडेल म्हणून भारतीय जनता पक्षाने चर्चा घडू दिली नाही. पुणेकरांच्या प्रतिनिधींना सभागृहात बोलण्याची संधी न देता महापौरांनी मोदी सरकारच्या हुकूमशाही पॅटर्न पुणे महानगरपालिकेत राबवला आहे.

“राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पुणे शहराच्या विकासाला विरोध नाही तसेच मेट्रोला देखील विरोध नाही, मात्र विकासाच्या नावाखाली पुण्याच्या परंपरेला नष्ट करण्याचा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. हिंदुत्वाचा आणि संस्कृतीचा ठेका घेतलेल्या भाजपचे देवंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जो DPR केला त्यात या चुका झाल्या आहेत त्यामुळे ही नामुष्की ओढवली आहे हे पुणेकरांच्या समोर आणण्यासाठी आज सभागृहात बोलू देण्याची आमची मागणी होती परंतू हे सत्य जनतेसमोर येऊ नये म्हणूनच महापौरांनी आम्हाला सभागृहात बोलू दिलं नाही.” असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले.

: महाविकास आघाडीचे नेते गणेश मंडळांची दिशाभूल करत आहेत : महापौर

याबाबत महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, गणेश मंडळ कार्यकर्त्यांच्या आडून महाविकास आघाडीचे राजकारण सुरु आहे. गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना खोटे सांगून त्यांची दिशाभूल केली जात आहे. कारण काम सुरु करण्याचे आणि ते ही पोलिस बंदोबस्तात करण्याचे आदेश पालकमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. त्यामुळे आम्ही सभागृहात सर्व नेत्यांना सांगत होतो कि आपण अजित दादांना भेटून हा प्रश्न निकाली लावू. मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आमचे ऐकले नाही. आम्हाला सभा चालू द्यायची होती. कारण शहराच्या हिताचे ३०० विषय मंजूर करायचे आहेत. मात्र विरोधी नगरसेवकांनी गोंधळ घालत सभा बंद करण्याचे काम केले. सभागृह नेते गणेश बिडकर म्हणाले, महानगरपालिकेची सर्वसाधारण झाल्यानंतर या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सर्व पक्षाचे पदाधिकारी एकत्र येऊ. यावर काही उपाय काढता येईल का? यासाठी महापौर यांच्या कार्यालयात बैठक घेऊन सर्व पक्षांचे एक शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार तसेच नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊ असा उपाय सुचविला. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना यात रस नव्हता. केवळ राजकारण करून महाविकास आघाडी गणेश मंडळाची, कार्यकर्त्यांची दिशाभूल करत आहेत. अजूनही आम्ही दोन्ही नेत्यांकडे यासाठी पाठपुरावा करण्यास तयार आहोत. तर स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने म्हणाले, विकासाच्या आड कधीही गणेश मंडळ कार्यकर्ता येत नाही. टी पुण्याची परंपरा नाही. मात्र महाविकास आघाडी वेगळेच राजकारण खेळू पाहत आहे.

Pune Metro : Murlidhar Mohol : महापौरांनी स्पष्टच केले; व्यवहार्य पर्याय नसल्याने लकडी पुलावर मेट्रोचे काम सुरु करणार

Categories
Breaking News PMC पुणे महाराष्ट्र

व्यवहार्य पर्याय नसल्याने लकडी पुलावर मेट्रोचे काम सुरु करणार : महापौर मोहोळ

– सुचवलेल्या पर्यायाने खर्च ७० कोटींनी आणि कालावधी दोन वर्षांनी वाढणार

पुणे : छत्रपती संभाजी महाराज पुलावरील मेट्रोच्या कामासाठी गणेशोत्सव मंडळांनी आणि मेट्रोने सुचवलेले पर्याय व्यवहार्य नसल्याचा अहवाल मेट्रो तांत्रिक तज्ञांकडून प्राप्त झाला असून यापेक्षा अधिक काळ मेट्रोचे काम बंद ठेवणे शहराच्या विकासाच्या दृष्टीने उचित नाही. म्हणूनच मेट्रोचे काम पुन्हा सुरु असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

गणेश विसर्जन मिरवणुकीत छत्रपती संभाजी महाराज पुलाववरील मेट्रो मार्ग अडथळा ठरेल, असा आक्षेप काही गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी घेतला होता. त्यावर मेट्रोचे काम थांबवून महापौर मोहोळ यांनी गणेशोत्सव मंडळ कार्यकर्ते, मेट्रो अधिकारी आणि तज्ञांच्या तीन बैठका घेतल्या होत्या. शिवाय महापौर मोहोळ यांनी कार्यकर्त्यांकडून पर्यायही मागवला होता. या पर्यायांचा अभ्यास मेट्रोने अभ्यास केल्यानंतर मेट्रोने सुचविलेले दोन्ही पर्यायही व्यवहार्य नसल्याचा निष्कर्ष निघाला होता. त्या पार्श्वभूमीवर महापौर मोहोळ यांनी काम सुरु करण्यास सांगितले आहे.

याबाबत महापौर मोहोळ म्हणाले, ‘विकासाची कामे करत असताना संस्कृती जपणे, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहेच. मीही स्वतः आधी गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्त्या आणि नंतर लोकप्रतिनिधी आहे. पुण्याच्या गणेशोत्सवाने आजवर समाजभान जपत झालेले बदल स्वीकारले. काळानुरूप बदलत, परंपराही जपत पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाने जगाच्या नकाशावर छाप उमटवली. मेट्रोच्या अर्थात शहर विकासाच्या मुद्द्यावरही कार्यकर्ते साथ देत मेट्रोच्या कामाला साथ देऊन पुण्याच्या प्रगतीचे साक्षीदार होतील.’

गणेशोत्सव मंडळांनी दिलेल्या पर्यायात मेट्रो मार्ग खंडित करण्याचा पर्याय होता. मात्र देशभरातील कोणत्याही मेट्रोने असा पर्याय कुठेही अवलंबला गेला नाही. याबाबत मेट्रो मार्ग सलग ठेवण्याची मेट्रोची भूमिका होती. तर मेट्रोने सुचवलेल्या पहिल्या पर्यायानुसार पुलाच्या आजूबाजूचे ३९ पिलर पाडून नव्याने बांधावे लागणार होते. त्यासाठी ७० कोटी रुपयांचा खर्च आणि २४ महिन्यांचा अतिरिक्त कालावधी लागणार होता. दुसऱ्या पर्यायानुसार १७ पिलर पाडून नव्याने बांधणे हाही होता. त्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी आणि २३ कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च होणार होता. त्यामुळे व्यावहारिक विचार करता आणि कामाची सद्यस्थिती लक्षात घेता दोन्ही पर्याय योग्य नसल्याचे मेट्रोच्या तांत्रिक तज्ज्ञांचे म्हणणे होते. या सर्व बाबी लक्षात घेता, आहे त्या परिस्थितीत काम सुरु करण्याचा पर्याय अधिक योग्य वाटला’, असेही महापौर मोहोळ यांनी स्पष्ट केले.