Pune Water Cut New Timetable | पुणे शहराच्या या भागात होणार एक दिवसाआड पाणीपुरवठा!

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune Water Cut New Timetable | पुणे शहराच्या या भागात होणार एक दिवसाआड पाणीपुरवठा!

Pune Water Cut New Timetable | पुणे शहरातील (Pune City) पाणीपुरवठ्याच्या नियोजनानुसार शहरात सध्या दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा (Pune water cut on Thursday) बंद ठेवण्यात येत आहे. त्यामुळे प्रभाग क्र ४ खराडी (Kharadi) मधील काही भागात अपुऱ्या पाणीपुरवठा विषयक तक्रारी येत आहेत. त्या तक्रारीच्या अनुषंगाने खराडी मध्ये एक दिवसआड (Alternate Day  water cut) पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात येत आहे. शनिवार १०/०६/२०२३ पासून प्रभाग क्र ४ खराडी मध्ये खालील प्रमाणे एक दिवसआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी याबाबतची नोंद घेऊन सहकार्य करावे. असे आवाहन पुणे महापालिका पाणी पुरवठा विभागाच्या (PMC Pune water supply department) वतीने करण्यात आले आहे. (Pune Water cut New Timetable)

एक दिवसआड पाणीपुरवठा होणारा भाग व वेळ

शुक्रवार, रविवार, मंगळवार

सुधारित वेळ दुपारी १.३० ते सायंकाळी ६.०
चंदननगर, श्रीकृष्ण सोसायटी, हनुमान व्यायाम शाळा, मथुरानगर, संघर्ष चौक, शिवाजी पुतळा, दत्तप्रसाद, चव्हाण नगर, त्रिमूर्ती सोसायटी, प्रीत नगर, समता सोसायटी, म्हाडा सोसायटी, नागपाल रोड.
सुधारित वेळ सकाळी ९.३० ते दुपारी २.००
| चौधरी वस्ती, सातववस्ती, पंढरीनगर, गुलमोहर, रक्षकनगर, शंकरनगर.

शनिवार, सोमवार, बुधवार

सुधारित वेळ दुपारी १.३० ते सायंकाळी ६.००
बोराटे वस्ती गल्ली नं. १ ते १३, शंकरनगर,
वृंदावन सोसायटी, राघवेंद्रनगर, यशवंतनगर,
तुकराम नगर, सितारा बेकरी, साई पार्क,
शेजवल पार्क,साईबाबा मंदिर.
सुधारित वेळ सकाळी ९.३० ते दुपारी २.००
गणपती सोसायटी, तुकारामनगर, बोराटेवस्ती, झेन्सार, थिटे नगर,पाटील बुवानगर.
News Title | Pune Water Cut New Timetable | One day water supply will be done in this part of Pune city!

Rain Water | Dams | चार धरणातील पाणी साठ पोहोचला ३.६७ टीएमसी वर  | धरण क्षेत्रात जोरदार पाऊस 

Categories
Breaking News social पुणे

चार धरणातील पाणीसाठा  पोहोचला ३.६७ टीएमसी वर

| धरण क्षेत्रात जोरदार पाऊस

पुणे : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत गेल्या तीन दिवसापासून  जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडवासाला या चारही धरणाचा एकूण पाणीसाठा ३.६७ टीएमसी  झाला आहे. मागील वर्षी याच दिवशी हा साठा ८.६७ टीएमसी इतका होता.

हा पाणी साठा २ जुलै रोजी २.५१ टीएमसी पर्यंत खाली आला होता. मात्र, गेल्या तीन ते चार दिवसापासून या चारही धरणात पावसाला सुरुवात झाली होती. तर सोमवारी रात्री नंतर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने रात्रीत शहराचे ८ दिवसांचे पाणी वाढले आहे.

 

सोमवारी सायंकाळी हा पाणीसाठा २.७६ टीएमसी होता तो मंगळवारी सकाळी ०.२० ने वाढून २.९६ झाला असल्याची पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली. तर बुधवारी सकाळी हा पाणी साठा ३.६७ टीएमसी झाला हे. या चारही धरणात अद्यापही पासून सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात ओढे, नाले तसेच आसपासच्या परिसरातून पाणी येत असल्याने हा साठा आणखी वाढेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार, खडकवासला १९ मिमी, पानशेत ६८  मिमी, वरसगाव ७०  मिमी तर टेमघर धरणात ६५  मिमी पावसाची नोंद गेल्या २४ तासात झाली आहे.