Amar Education Society | डॉ रमेश शेलार यांची अमर एज्युकेशन सोसायटीच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्गदर्शक पदी नियुक्ती

Categories
Breaking News Education पुणे

Amar Education Society | डॉ रमेश शेलार यांची अमर एज्युकेशन सोसायटीच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्गदर्शक पदी नियुक्ती

Ramesh Shelar PMC – (The Karbhari News Service) – अमर एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित एस. पी. इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज या विद्यालयाच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्गदर्शक
पदी पुणे महापालिकेचे पर्यावरण व्यवस्थापक (अकार्यकारी) रमेश शेलार (Ramesh Shelar PMC) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोसायटीच्या वतीने त्यांना नुकतेच हे पत्र देण्यात आले आहे. (Amar Education Society)

पुणे महानगरपालिकेमध्ये पर्यावरण व्यवस्थापक (अकार्यकारी) या पदावर कार्यरत असलेले अधिकारी  रमेश शेलार, यांना एम.आय.टी. आर्ट, डिझाईन, टेक्नोलॉजी युनिवर्सिटी पुणे यांचे कडून त्यांनी सादर केलेले प्रबंध “THE STUDY OF TRANSFORMATION OF SOLID WASTE TO REVENUE WITH REFERENCE TO MUNICIPAL CORPORATIONS IN WESTERN REGION OF MAHARASHTRA” यांस 4 एप्रिल रोजी पि.एच.डी. प्रदान करण्यात आलेले आहे.
त्यानंतर शेलार यांना अमर एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित एस. पी. इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज या विद्यालयाच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्गदर्शक पदी नियुक्त करण्यात आले आहे. शाळा व्यवस्थापन समिती ही पुढील 5 वर्षाकरीता कार्यरत असणार आहे.
—-
संस्थेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्गदर्शक पदी झालेली नियुक्ती ही मनस्वी आनंद देणारी आहे. विद्यार्थ्यांसाठी या पदावर विनामोबदला काम करणार आहे.
डॉ रमेश शेलार. 

Ramesh Shelar PMC | रमेश शेलार यांना एमआयटी विद्यापीठाकडून पीएचडी प्रदान!

Categories
Breaking News Education PMC पुणे

Ramesh Shelar PMC | रमेश शेलार यांना एमआयटी विद्यापीठाकडून पीएचडी प्रदान!

Ramesh Shelar PMC- (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्य घनकचरा विभागात (PMC Solid Waste Management Department) पर्यावरण व्यवस्थापक (अकार्यकारी) पदावर काम करणारे अधिकारी रमेश शेलार (Ramesh Shelar) यांना एमआयटी विद्यापीठाने (MIT University) पीएचडी (Ph.D.) प्रदान केली आहे. नुकतीच विद्यापीठाकडून त्यांचा प्रबंध उत्कृष्ट असल्याचे मान्य केले आहे. (Pune Municipal Corporation (PMC)
पुणे महानगरपालिकेमध्ये कार्यरत असलेले अधिकारी  रमेश शेलार, मुख्य सुरक्षा अधिकारी तथा अकार्यकारी पर्यावरण व्यवस्थापक ( घनकचरा व्यवस्थापन विभाग) पुणे महानगरपालिका यांना एम.आय.टी. आर्ट, डिझाईन, टेक्नोलॉजी युनिवर्सिटी पुणे यांचे कडून त्यांनी सादर केलेले प्रबंध “THE STUDY OF TRANSFORMATION OF SOLID WASTE TO REVENUE WITH REFERENCE TO MUNICIPAL CORPORATIONS IN WESTERN REGION OF MAHARASHTRA” यांस 4 एप्रिल रोजी पि.एच.डी. प्रदान करण्यात आलेले आहे. या प्रसंगी  सुनिता कराड, डॉ. छबी सिन्हा चव्हाण यांनी खूप मोलाचे सहकार्य करून  रमेश शेलार यांचे प्रबंध उत्कृष्ट असल्याचे मान्य केले आहे.

शेलारांना आता तरी कार्यकारी पद दिले जाणार का?

पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागात (PMC Solid Waste Management Department) रमेश शेलार (Ramesh Shelar) हे पर्यावरण व्यवस्थापक (अकार्यकारी) म्हणून काम पाहत आहेत. मात्र असे पद देताना प्रशासनाने चुकीचा संदर्भ दिला आहे, असे शेलार यांनी प्रशासनास याआधीच निदर्शनास आणून दिले आहे. तसेच दोन महिने कार्यकारी पद देऊन पुन्हा अकार्यकारी पद प्रशासनाने दिले, हे माझ्यावरच्या आकसापोटी केले असल्याचा आरोप देखील शेलार यांनी केला होता. तसेच आता तरी प्रशासनाने आपली चूक सुधारून कार्यकारी पद द्यावे, अशी मागणी शेलार यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली होती.

तसेच रमेश शेलार यांनी पुढे म्हटले होते कि, माझी अभियांत्रिकी विभगाकडून सन २००९ मध्ये सरळसेवेने मुख्य सुरक्षा अधिकारी पदावर निवड झाली आहे. त्यावेळी मुख्य सुरक्षा अधिकारी पदासाठी एल.एल.बी पदविका धारकास प्राधान्य अशी अट होती. त्यानुसार माझी निवड झाली. मी या पदाचा कार्यभार पाहत होतो.
आता हे पद एकाकी आहे. शेलार यांनी मागणी केली होती कि  मुख्य कामगार अधिकारी, नगरसचिव तसेच मुख्य अभियंता या पैकी कुठलेहीपदावरती काम करण्याची संधी मला देण्यात यावी. मात्र प्रशासनाकडून याबाबत कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही.
दरम्यान शेलार यांना आता पीएचडी मिळाली आहे. त्यांच्या नावासमोर डॉक्टर हे उपनाम लागणार आहे. त्यांचा महापालिकेतील कामाचा अनुभव देखील दांडगा आहे. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांचा पालिकेच्या कामासाठी उपयोग करून घेतला जाणार का? त्यांना कार्यकारी पद दिले जाणार का किंवा त्यांना त्यांच्या मूळ पदावर पाठवले जाणार का? असे प्रश्न या निमित्ताने प्रशासनाला विचारले जात आहेत.

PMC Additional Commissioner | पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त पदासाठी नाव डावलल्याबाबत रमेश शेलार यांची राज्याच्या प्रधान सचिवांकडे तक्रार

Categories
PMC पुणे महाराष्ट्र

PMC Additional Commissioner | पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त पदासाठी नाव डावलल्याबाबत रमेश शेलार यांची राज्याच्या प्रधान सचिवांकडे तक्रार

PMC  Additional Commissioner | पुणे | महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (Pune Municipal Corporation Additional Commissioner) पदावर  महापालिकेचा अधिकारी पदोन्नतीच्या माध्यमातून येणार आहे. यासाठी पात्र अधिकाऱ्यांची यादी महापालिका सामान्य प्रशासन विभागाने (PMC Général Administration Department) राज्य सरकारकडे पाठवली आहे. यामध्ये नगर अभियंता प्रशांत वाघमारे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर, मुख्य अभियंता (प्रकल्प) श्रीनिवास बोनाला आणि विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदूल यांचा समावेश होता. आता यातून वाघमारे आणि बोनाला यांनी माघार घेतली आहे. दरम्यान या यादीवर रमेश शेलार (Ramesh Shelar) यांनी याआधीच आक्षेप घेतला होता. शेलार यांनी अतिरिक्त आयुक्त पदावर दावा केला असून आपले नाव या पदासाठी डावलल्याबाबत राज्याच्या प्रधान सचिवांकडे तक्रार केली आहे. प्रधान सचिवांनी याची दखल घेतली आहे. अशी माहिती रमेश शेलार यांनी दिली. (Pune Municipal Corporation Additional Commissioner)
राज्य सरकारने महापालिकेत एक अतिरिक्त आयुक्तपद हे महापालिका अधिकाऱ्यांसाठी राखीव ठेवले आहे. त्याबाबतचा निर्णय देखील घेण्यात आला होता. त्यानुसार पहिले अतिरिक्त आयुक्त होण्याचा मान सुरेश जगताप यांना मिळाला होता. त्यानंतर ज्ञानेश्वर मोळक, विलास कानडे यांना संधी मिळाली होती. महापालिका अधिनियम, सेवानियमावली आणि सेवा ज्येष्ठतेनुसार हे पदनियुक्त केले जाणार आहे. (PMC Pune)
दरम्यान सामान्य प्रशासन विभागाने तयार केलेल्या यादीवर उपायुक्त रमेश शेलार यांनी आक्षेप घेतला आहे. सेवा नियमावली आणि सेवा ज्येष्ठतेनुसार आपणच या पदासाठी पात्र ठरत आहोत, असा दावा शेलार यांनी केला आहे. त्यामुळे प्रशासनाने अतिरिक्त आयुक्त पदाच्या यादीत आपले नाव समाविष्ट करणे आवश्यक होते. असे शेलार यांनी म्हटले आहे. शेलार यांनी तक्रारीत म्हटले आहे कि, वास्तविक १: ५ या तत्त्वानुसार ५ अधिकारी यांचे नावांची शिफारस झालेली दिसून येत नाही. कारण यापूर्वी पाठविलेल्या यादीतील अधिकारी वयोपरत्वे सेवानिवृत्त झालेले आहेत. तसेच सुयोग्य अधिकारी निवड यादीमध्ये मुख्य उद्यान अधिकारी, मुख्य विधी अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, समाज विकास अधिकारी व समकक्ष पदावरील अधिकारी यांचा समावेश होवू शकेल. यादी मधील असलेल्या नावांमध्ये नवीन ‘सुयोग्य अधिकारी यांची नावे समाविष्ठ होवून सेवाजेष्ठतेनुसार यादी महापालिकेकडून घेण्यांत येवून  माझे नाव निवड यादीमध्ये नावे समाविष्ठ करण्यात यावी. अशी मागणी शेलार यांनी प्रधान सचिवांकडे केली आहे.

Ramesh Shelar | international Institute of Management Studies | इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज संस्थेकडून रमेश शेलार यांचा सन्मान!

Categories
Breaking News Education PMC पुणे

Ramesh Shelar | international Institute of Management Studies | इंटरनॅशनल  इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज संस्थेकडून रमेश शेलार यांचा सन्मान!

| रमेश शेलार यांचा पेपर्स उत्कृष्ट म्हणून निवडला

Ramesh Shelar | international Institute of Management Studies |  इंटरनॅशनल  इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज संस्थेकडून रमेश शेलार (Ramesh Shelar | international Institute of Management Studies) यांचा सन्मान करण्यात आला आहे. Ph. D. रिसर्च मार्केटिंग या सदरामध्ये रमेश शेलार (Ramesh Shelar) यांचा पेपर्स उत्कृष्ट म्हणून निवडण्यात आलेला आहे. दरम्यान शेलार यांनी PhD पूर्ण करून अंतिम प्रबंध युनिव्हर्सिटीकडे सादर केला आहे. (Ramesh Shelar | international Institute of Management Studies)
इंटरनॅशनल  इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या संस्थेमध्ये १५ ते १६ डिसेंबर २०२३ या कालावधीत देश विदेशातील प्राध्यापक, रिसर्च व विद्यार्थी यांचेकडून विविध विषयावरती पेपर्स मागवून अंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे नाव “ विश्लेषण 2k23” असे ठेवण्यात आले होते. या चर्चासत्रामध्ये ५ प्रकारामध्ये विभागणी करण्यात आली होती. त्यानुसार फायनान्स,मार्केटिंग, HR, मल्टीडीस्पेंसन्सी, Student विभाग यामध्ये उत्कृष्ट पेपर्स निवडण्यात येणार होते. त्यांना अवार्ड देण्यात आले.

यामध्ये PhD रिसर्च मार्केटिंग या सदरामध्ये रमेश शेलार यांचा पेपर्स उत्कृष्ट म्हणून निवडण्यात आलेला आहे. त्यासाठी शेलार यांनी  “Study of Transformation of Plastic Waste to cash in Pune” या विषयावरती पेपर्स सादर केलेला होता. या विषयासाठी  शेलार यांना PhD मार्गदर्शक Dr. Chabhi Chavan, प्राचार्य, एम आय टी युनिव्हर्सिटी व अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि रिसर्च प्राचार्य श्री.ठाकरे सर व प्राध्यापक गावडे सर यांनी मार्गदर्शन केले आहे.  शेलार यांनी PhD पूर्ण करून अंतिम प्रबंध युनिव्हर्सिटीकडे सादर केला आहे.

PMC Additional Commissioner | कोण होणार अतिरिक्त महापालिका आयुक्त? | प्रशांत वाघमारे कि उल्का कळसकर! | उद्या पदोन्नती समितीची बैठक 

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Additional Commissioner | कोण होणार अतिरिक्त महापालिका आयुक्त? | प्रशांत वाघमारे कि उल्का कळसकर! | उद्या पदोन्नती समितीची बैठक

PMC Pune Additional Commissioner | पुणे | महापालिका अतिरिक्त आयुक्त पदाबाबत उद्या पदोन्नती समितीची बैठक होणार आहे. सेवाज्येष्ठतेनुसार नगर अभियंता यांना पदासाठी प्राथमिकता असणार आहे. त्यानंतर मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर (Chief Account and Finance Officer Ulka Kalaskar), मुख्य अभियंता बोनाला आणि श्रीनिवास कंदूल यांची नावे आहेत. चर्चा अशी आहे कि वाघमारे यांना या पदात स्वारस्य नाही. त्यामुळे कळसकर जोरदार फिल्डिंग लावून आहेत. वाघमारे यांनी पद नाही घेतले तर त्यांचीच वर्णी लागू शकते. याबाबत आता उद्याच्या पदोन्नती समितीच्या बैठकीत निर्णय होईल.  (Pune Municipal Corporation)
महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (Pune Municipal Corporation Additional Commissioner) पदाबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. मागील वेळेस हक्काचे असताना महापालिका अधिकाऱ्यांच्या (PMC Officers) हातून हे पद निसटले होते. काही काळाने हे पद रिक्त होणार आहे. या पदावर महापालिकेचा अधिकारी पदोन्नतीच्या माध्यमातून येणार आहे. यासाठी अधिकारी पात्र होत आहेत. या अधिकाऱ्यांची यादी महापालिका सामान्य प्रशासन विभागाने राज्य सरकारकडे पाठवली आहे. यामध्ये नगर अभियंता प्रशांत वाघमारे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर, मुख्य अभियंता (प्रकल्प) श्रीनिवास बोनाला आणि विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदूल यांचा समावेश आहे. यामधून कुणीतरी एक निवडला जाणार आहे. यासाठी उद्या पदोन्नति समितीची बैठक बोलावण्यात आली आहे. यामध्ये पुणे महापालिका आयुक्त, पिंपरी मनपा आयुक्त, राज्याच्या नगर विकास विभागाचे अधिकारी अशा 5 लोकांचा समावेश आहे.
राज्य सरकारने महापालिकेत एक अतिरिक्त आयुक्तपद हे महापालिका अधिकाऱ्यांसाठी राखीव ठेवले आहे. त्याबाबतचा निर्णय देखील घेण्यात आला होता. त्यानुसार पहिले अतिरिक्त आयुक्त होण्याचा मान सुरेश जगताप यांना मिळाला होता. त्यानंतर ज्ञानेश्वर मोळक, विलास कानडे यांना संधी मिळाली होती. कानडे सेवानिवृत्त झाले. त्यामुळे हे पदरिक्त झाले होते. त्यानुसार महापालिका अधिनियम, सेवानियमावली आणि सेवा ज्येष्ठतेनुसार हे पदनियुक्त केले जाणार आहे. यासाठी बरेच जण पात्र ठरत होते. मात्र राज्य सरकारने महापालिका अधिकाऱ्यांना हे पद न देता विकास ढाकणे यांच्या रूपाने सरकारचा अधिकारी या पदावर दिला आहे. त्यामुळे मनपा अधिकाऱ्यांच्या हातून हे पद निसटले होते. (PMC Pune)

|  श्रीनिवास कंदूल यांची सरकारकडे तक्रार

पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त (PMC Additional Commissioner) पद यावरून  महापालिकेत (Pune Municipal Corporation) जोरदार लॉबिंग सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.कारण  विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदूल (Chief Engineer Shrinivas Kandul) यांनी राज्याच्या प्रधान सचिवांना (Chief Secretary) पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी दावा केला आहे कि मुख्य लेखापाल यांच्या पेक्षा माझी सेवाज्येष्ठता वरिष्ठ आहे. त्यामुळे हे पद मलाच देण्यात यावे. अशी मागणी कंदूल यांनी केली आहे.

| रमेश शेलार यांच्या तक्रारीला सरकारचा प्रतिसाद

दरम्यान या अगोदर रमेश शेलार यांनी देखील राज्य सरकारकडे तक्रार केली होती. महापालिकेने पाठवलेल्या यादीवर रमेश शेलार (Ramesh Shelar) यांनी आक्षेप घेतला होता. महापालिका सेवा नियमावली आणि सेवा ज्येष्ठतेनुसार अतिरिक्त आयुक्त पदासाठी मी पात्र ठरत आहे. सामान्य प्रशासन विभागाने माझे नाव वगळण्याचे काहीच कारण नाही.  मी पात्र ठरत असल्याने मला या पदावर संधी मिळायला हवी.   माझे नाव डावलल्यास मी प्रशासनाविरोधात उच्च न्यायालयात जाणार, असा इशारा शेलार यांनी दिला होता. तसेच त्यांनी आपल्याला डावलल्याबाबत राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्याकडे देखील याबाबत तक्रार केली होती. आपली चौकशी पूर्ण होईपर्यंत अतिरिक्त आयुक्त भरण्या बाबतची प्रक्रिया थांबवावी, अशी मागणी शेलार यांनी केली आहे. यावर सरकारने शेलार यांच्या तक्रारीची दखल घेतली आहे. असे सरकारकडून सांगण्यात आले आहे.