Road Work in Sus | पालिकेने केला नाही म्हणून सुस मधील नागरिकांनी रस्ता बनविण्याकरिता घेतला पुढाकार

Categories
Breaking News PMC social पुणे

पालिकेने केला नाही म्हणून सुस मधील नागरिकांनी रस्ता बनविण्याकरिता घेतला पुढाकार

वेळोवेळी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याशी पत्र व्यवहार करून देखील महादेव नगर सुस येथील रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण आहे. रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. या प्रश्नाचे उत्तर महानगरपालिकेला विचारले असता पालिकेकडून निधी नसल्याचे वेळोवेळी सांगण्यात आले म्हणून स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेऊन स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून रोडचे काम आपल्या हाती घेतले आहे. सर्व स्थानिक नागरिकांनी आपल्या स्वखर्चातून रोड वरती मुरूम टाकून रोड तात्पुरत्या स्वरूपाचा चालू करण्यात आला आहे. तरीदेखील पालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर या रोडचा प्रश्न मार्गी लावावा अशी स्थानिक नागरिकांकडून मागणी करण्यात आली आहे.

यावेळी रयत विद्यार्थी परिषदेचे खजिनदार ऋषिकेश कानवटे, अशोक लिपणे, बबन गडसिंग, मल्लिनाथ बिराजदार, हनुमंता पुजारी, भगवान आंबुरे, हरी पवार, अमोल चव्हाण, धोंडीराम रेंगे, प्रमोद चांदरे, सुनील चांदरे, सचिन कामटकर, अनिल अंभोरे, प्रकाश सामाले, केशव पवार, पिराजी कानवटे, माणिक अंभोरे या सर्वांच्या पुढाकारामुळे रोडची अवस्था येण्या जाण्या योग्य झाली आहे. तरी महानगरपालिके प्रशासनाने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर हे काम मार्गी लावावे. अशी मागणी ऋषिकेश पिराजी कानवटे खजिनदार, रयत विद्यार्थी परिषद, महाराष्ट्र राज्य यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.

Rushikesh Balgude | मनपा अधिकारी आणि ठेकेदार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कॉंग्रेसची मागणी  | पोलीस आयुक्तांना दिले निवेदन 

Categories
Breaking News PMC Political पुणे

 मनपा अधिकारी आणि ठेकेदार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कॉंग्रेसची मागणी

| पोलीस आयुक्तांना दिले निवेदन

पुणेकरांचा जीव टांगणीला लावणाऱ्या  मनपा अधिकारी आणि ठेकेदार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कॉंग्रेसने पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे केली आहे.

याबाबत काँग्रेसचे सरचिटणीस ऋषिकेश बालगुडे यांनी दिलेल्या निवेदनानुसार शहरात पुणे महानगरपालिका वतीने पाणी पुरवठा, ड्रेनेज,रस्ते,स्मार्ट सिटी, मोबाईल कंपनी व इतर बाबत शहरात सर्वत्र रस्ते खोदाई करण्यात आली. खोदाई बुजविताना पुणे मनपाच्या ठेकेदार कडून निकृष्ट दर्जाहीन काम होते आहे, असे आम्ही पुणे मनपा आयुक्त यांना हि बाब मार्च, एप्रिल मध्ये मिडिया यांच्या द्वारे समोर आणली आहे. या कामाच्यामुळे संपूर्ण शहर खड्डेमय व चिखलमय झाले आहे. यामुळे नागिरकांना प्रचंड प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

खड्ड्यामुळे नागरिकांना पाठीचे व इतर आजार झाले आहे. मनपा प्रशासन यांच्यामुळे नागरिकांचे छोटे मोठे अपघात घडत आहे. यातून कुठल्याही नागरिकाचा जीवाला काही झाल्यास याला सर्वस्वी जवाबदार पुणे मनपा अधिकारी, संबंधित ठेकेदार ,आयुक्त यांची राहील. नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा, याबाबतचे निवेदन पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभजी गुप्ता यांना देण्यात आले. यावेळी शहर काँग्रेसचे सरचिटणीस ऋषिकेश बालगुडे, प्रदेश सोशल मीडिया काँग्रेस सचिव विशाल गुंड, जतिन परदेशी, युवक काँग्रेसचे प्रणव नामेकर उपस्थित होते