PMC Pune RTO Agency Tender | महापालिकेकडून RTO मध्ये एजेन्सी नेमणूक करण्याबाबतचे टेंडर रद्द करा  | माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर, प्रशांत बधे, सुहास कुलकर्णी यांची मागणी 

Categories
Breaking News PMC Political पुणे

PMC Pune RTO Agency Tender |  RTO मध्ये एजेन्सी नेमणूक करण्याबाबतचे टेंडर रद्द करा

| माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर, प्रशांत बधे, सुहास कुलकर्णी यांची मागणी

 

PMC Pune RTO Agency Tender |पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) वाहनांचे पासिंग करण्यासाठी आरटीओ (RTO) साठी एजन्सी नेमणे बाबत महापालिकेकडून टेंडर काढण्यात आले आहे. हे टेंडर तत्काळ रद्द करावे अशी मागणी माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर (Ujjwal Keskar), प्रशांत बधे (Prashant Badhe), सुहास कुलकर्णी (Suhas Kulkarni) यांनी महापालिका आयुक्त (PMC Commissioner) यांच्याकडे केली आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनानुसार पुणे  महानगरपालिकेने (PMC Pune) आरटीओ च्या कामासाठी एका एजन्सीची नेमणूक करण्याचे टेंडर काढले आहे. मात्र आरटीओ मध्ये एजंट आणि एजन्सी यांना परवानगी नाही. एवढी माहिती IAS विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांना असायला हवीय.  दीड कोटी रुपयाचे हे टेंडर कशासाठी काढले’ याचा खुलासा खातेप्रमुखांना विचारला पाहिजे. निवेदनांत पुढे  म्हटले आहे कि, पुणे मनपा ही एक अर्ध शासकीय संस्था तर आरटीओ ही पूर्ण शासकीय संस्था आहे. यामध्ये समन्वयासाठी एजन्सीची गरज नाही. त्यामुळे हे टेंडर तातडीने रद्द करावे. अन्यथा आम्हाला यासाठी लोकायुक्त यांच्याकडे याचिका दाखल करावी लागेल. असा इशारा उज्ज्वल केसकर, प्रशांत बधे, सुहास कुलकर्णी यांनी महापालिका आयुक्त यांना दिला आहे.


News Title | PMC Pune RTO Agency Tender | Cancel the tender for appointment of agencies in RTO by the Municipal Corporation | Demand of former corporators Ujjwal Keskar, Prashant Badhe, Suhas Kulkarni

Pune RTO | दुचाकी मालिकेतील आकर्षक क्रमांक तीनपट शुल्क भरुन चारचाकींसाठी राखून ठेवता येणार

Categories
Breaking News social पुणे

Pune RTO | दुचाकी मालिकेतील आकर्षक क्रमांक तीनपट शुल्क भरुन चारचाकींसाठी राखून ठेवता येणार

Pune RTO | पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय (Pune Regional Transport Office) येथे लवकरच दुचाकी वाहनांसाठी (Two Wheeler) नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक तीनपट शुल्क भरून खासगी चारचाकी वाहनांसाठी (Four Wheeler) राखून ठेवण्यासाठी तसेच उर्वरित क्रमांकाबाबत दुचाकींसाठी आगाऊ अर्ज स्वीकारण्याची व लिलाव कार्यपद्धतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. (Pune RTO)
नव्याने सुरु होणाऱ्या दुचाकी मालिकेतील आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक चारचाकींसाठी हवे असलेल्या वाहन मालकांनी विहित तीनपट शुल्कासह ५ सप्टेंबर  रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत विहित नमुन्यात अर्ज करावा. एकाच क्रमांकाकरीता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्याची यादी कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल. लिलावाचे धनाकर्ष (डीडी) ६ सप्टेंबर  रोजी दुपारी २.३० वाजेपर्यंत स्वीकारले जातील. त्याच दिवशी दुपारी ४ वाजता सहकार सभागृहामध्ये लिलाव करण्यात येईल.
दुचाकी वाहन मालकांनी आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क भरून हवे असल्यास ६ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३०  ते दुपारी २.३० वाजेपर्यंत अर्ज करावा. एकाच क्रमांकाकरीता एकापेक्षा जास्त अर्ज असल्यास त्याची यादी कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल. लिलावाचे डीडी ७  सप्टेंबर रोजी दुपारी २.३०  वाजेपर्यंत स्वीकारले जातील. त्याच दिवशी दुपारी ४ वाजता सहकार सभागृहामध्ये लिलाव करण्यात येईल.
अर्ज कार्यालयाच्या खासगी वाहन नोंदणी विभागात डीडी, पत्त्याचा पुरावा, आधारकार्ड, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह आधारकार्डला लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकासह जमा करावा. हा डीडी ‘आर.टी.ओ.,पुणे’ यांच्या नावे राष्ट्रीयकृत, अनुसूचित बँकेचा पुणे येथील असावा.
एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर न केल्यास राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व शुल्क सरकारजमा होईल. कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेले शुल्क परत करता येणार नाही. प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणेच्या कार्यक्षेत्रातील वाहनधारकांनीच अर्ज सादर करावेत, कार्यक्षेत्राबाहेरील अर्ज बाद ठरविण्यात येणार असल्याचे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांनी कळविले आहे.
——
News Title | Pune RTO | Attractive numbers in the two-wheeler series can be reserved for four-wheelers by paying three times the fee

Ferguson College | फर्ग्युसनमध्ये ‘रस्ते सुरक्षा कक्षा’ची स्थापना | राज्यातील पहिलेच महाविद्यालय

Categories
Education social पुणे

फर्ग्युसनमध्ये ‘रस्ते सुरक्षा कक्षा’ची स्थापना | राज्यातील पहिलेच महाविद्यालय

| विद्यार्थ्यांना मिळणार वाहतुकीचे धडे आणि शिकाऊ परवाना

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) फर्ग्युसन महाविद्यालयात परिवहन विभागातर्फे ‘रस्ते सुरक्षा कक्षा’ची स्थापना राज्याचे अतिरिक्त परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये वाहतुकीच्या नियमांची जनजागृती करण्यासाठी अशा प्रकारचा कक्ष सुरू करणारे फर्ग्युसन राज्यातील पहिले महाविद्यालय ठरले आहे. या कक्षाच्या माध्यमातून फर्ग्युसन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दुचाकी वाहन चालविण्याचा शिकाऊ परवाना मिळू शकणार आहे.

रस्ते सुरक्षा अभियानाअंतर्गत पुणे प्रादेशिक परिवहन विभागातर्फे फर्ग्युसन महाविद्यालयात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर, डीईएसचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, प्राचार्य डॉ. रवींद्रसिंह परदेशी, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. संजीव भोर, डॉ. राजेंद्र शर्मा, वेस्टर्न इंडिया ऑटोमोटिव्ह असोसिएशनच्या सिमरन कौर यांची प्रमुख उपस्थिती होती.

पाटील म्हणाले, ‘‘वाहन चालन परवाना मिळविणे आता सोपे झाले असले, तरी त्यासाठीची चाचणी अवघड करण्यात आली आहे. ऑनलाईन पद्धतीने वाहन चालवण्याचा परवाना देत असताना वाहन चालकाकडून नियमांचे पालन होणे अपेक्षित आहे. भारतात लोक वाहन चालविण्याचे कौशल्य दाखवायला जातात आणि अपघात होतात. परदेशात वाहतुकीचे नियम पाळले जात असल्याने अपघातांचे प्रमाण कमी आहे. रस्ते सुरक्षा संदर्भात काम करण्यासाठी महाविद्यालयात स्वतंत्र समिती असणे आवश्यक आहे.’’

वाडकर म्हणाले, ‘‘छोट्या-छोट्या चुकांमुळे अपघात होतात. ते टाळण्यासाठी सर्वांनीच वाहतुकीच्या नियमांचे पालन केले पाहिजे. सीटबेल्ट आणि हेल्मेटचा वापर करणे अत्यावश्यक आहे.’’ प्राचार्य डॉ. परदेशी यांनी प्रास्ताविक, नेहा जाधव, शिक्षा चव्हाण यांनी सूत्रसंचालन आणि शुभांगी येवले यांनी आभार प्रदर्शन केले. स्वयंसेवक विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेचे प्रतिक म्हणून हेल्मेटचे वाटप करण्यात आले.