Tag: Ujjwal keskar
UDPCR | Pune News | 20 टक्के झोपडपट्टी टीडीआर वापरण्याची केलेली सक्ती रद्द करा | माजी नगरसेवकांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
UDPCR | Pune News | युडीसीपीआर मध्ये पुण्यासाठी 20 टक्के झोपडपट्टी टीडीआर वापरण्याची केलेली सक्ती रद्द करणेची मागणी माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी, प्रशांत बधे, संजय बालगुडे, शिवा मंत्री यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. (Pune News)
माजी नगरसेवक यांच्या निवेदनानुसार पुण्यामध्ये कुठला टीडीआर कधी वापरायचा याबाबत UDCPR मध्ये काही तरतूद नव्हती. काही मान्यवर नगरसेवक व्यावसायिक नगरसेवक यांच्या आग्रहाने पुण्यामध्ये झोपडपट्टी साठी असलेला वीस टक्के टीडीआर वापरण्याची परवानगी देण्याची तरतूद आयुक्तांना दिली. पुण्यामध्ये झोपडपट्टी पुनर्वसनाचा एकही प्रकल्प चालू नाही. झोपडपट्टी पुनर्वसनाचे जे प्रकल्प आहेत ते जुने वाडे चाळी यांच्या पुनर्वसनाचे प्रकल्प आहेत. त्यांना झोपडपट्टी सदृश्य असे गोंडस नाव दिले आहे.
हे संपूर्ण व्यवहार बेकायदेशीर असून यात महानगरपालिकेचे नुकसान होत आहे. त्यामुळे ज्या उदात्त हेतूने झोपडपट्टी पुनर्वसनाचा टीडीआर वापरण्याचे आदेश दिले त्याचा फायदा या मान्यवरांनी स्वतः झोपडपट्टी पुनर्वसनाच्या नावाखाली खाजगी वाडे आणि चाळी यांचे पुनर्वसन करून निर्माण झालेला टीडीआर सक्तीचा करण्यास भाग पाडले. यात महानगरपालिकेचे नुकसान आहे बांधकाम व्यावसायिकाचे नुकसान आहे आणि पर्यायाने युजर म्हणून पुणेकर नागरिकांचे देखील नुकसान आहे. साधारणतः 180 पट जास्त भावाने हा झोपडपट्टीचा टीडीआर सर्वप्रथम घ्यावा लागतो तो घेतल्याशिवाय बाकी टीडीआर घेता येत नाही. यात अधिकाऱ्यांचे देखील साटे लोटे असू शकते.
यामुळे सर्वसामान्य पुणेकरांना जास्त भावात घरे विकत घ्यावी लागतात.
आम्ही जे सांगितले त्याची संपूर्ण शहानिशा करून मग निर्णय करा पण हा निर्णय नक्की करा आणि पुण्यासाठी झोपडपट्टीचा टीडीआर वापरल्यानंतरच बाकीचा टीडीआर वापरता येईल अशा प्रकारची तरतूद तातडीने रद्द करावी. अशी मागणी निवेदानाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
SRA | PMC Pune | जुने वाडे झोपडपट्टी सदृश्य असल्याचा दिला जातो अभिप्राय | माजी नगरसेवकांचा आरोप
PMC Pune RTO Agency Tender | RTO मध्ये एजेन्सी नेमणूक करण्याबाबतचे टेंडर रद्द करा
| माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर, प्रशांत बधे, सुहास कुलकर्णी यांची मागणी
PMC Pune RTO Agency Tender |पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) वाहनांचे पासिंग करण्यासाठी आरटीओ (RTO) साठी एजन्सी नेमणे बाबत महापालिकेकडून टेंडर काढण्यात आले आहे. हे टेंडर तत्काळ रद्द करावे अशी मागणी माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर (Ujjwal Keskar), प्रशांत बधे (Prashant Badhe), सुहास कुलकर्णी (Suhas Kulkarni) यांनी महापालिका आयुक्त (PMC Commissioner) यांच्याकडे केली आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनानुसार पुणे महानगरपालिकेने (PMC Pune) आरटीओ च्या कामासाठी एका एजन्सीची नेमणूक करण्याचे टेंडर काढले आहे. मात्र आरटीओ मध्ये एजंट आणि एजन्सी यांना परवानगी नाही. एवढी माहिती IAS विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांना असायला हवीय. दीड कोटी रुपयाचे हे टेंडर कशासाठी काढले’ याचा खुलासा खातेप्रमुखांना विचारला पाहिजे. निवेदनांत पुढे म्हटले आहे कि, पुणे मनपा ही एक अर्ध शासकीय संस्था तर आरटीओ ही पूर्ण शासकीय संस्था आहे. यामध्ये समन्वयासाठी एजन्सीची गरज नाही. त्यामुळे हे टेंडर तातडीने रद्द करावे. अन्यथा आम्हाला यासाठी लोकायुक्त यांच्याकडे याचिका दाखल करावी लागेल. असा इशारा उज्ज्वल केसकर, प्रशांत बधे, सुहास कुलकर्णी यांनी महापालिका आयुक्त यांना दिला आहे.
News Title | PMC Pune RTO Agency Tender | Cancel the tender for appointment of agencies in RTO by the Municipal Corporation | Demand of former corporators Ujjwal Keskar, Prashant Badhe, Suhas Kulkarni
TDR Disbursement Process | PMC | TDR खर्ची करण्याचे कार्यपध्दतीत बदल करण्याची माजी नगरसेवकांची मागणी
TDR Disbursement Process | PMC | पुणे महापालिकेची (Pune Municipal Corporation) अस्तित्वातील टीडीआर खर्च करण्याची जी कार्यपद्धती (TDR Disbursement Process) ठरली आहे ती अनावश्यक बाबींची पूर्तता व वेळखाऊपणा आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या वेळेचा प्रश्न अशी आहे. त्यामुळे या कार्यपद्धतीत बदल करण्याची मागणी माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, माजी नगरसेवक प्रशांत बधे आणि सुहास कुलकर्णी यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. (TDR Disbursement Process | PMC)
PMC TDR Cell | भूसंपादनासाठी टीडीआर सेल निर्माण करा | माजी नगरसेवकांची मागणी
वारजे हॉस्पिटल चा प्रस्ताव दफ्तरी दाखल करण्याची मागणी!
| प्रकरण बेकायदेशीर असल्याचा आरोप
प्रभाग रचनेला स्थगिती द्या
| माजी नगरसेवकांची मागणी
आयोगाला दिलेल्या पत्रानुसार चोकलीन्गम अहवालाची मागणी आम्ही हायकोर्टामध्ये दाखल केलेल्या याचिकेमध्ये केली होती. आयोगाच्या वकिलाने हायकोर्टामध्ये स्टेटमेंट केल्याप्रमाणे आम्हाला ही कागदपत्र प्राप्त झाली. या संदर्भामध्ये उल्लेख केलेल्या पत्राची छाननी केली असता
त्यामध्ये प्रभाग क्रमांक 12, 13, 15 आणि 57या प्रभाग रचनेचे राज्य निवडणूक आयोगाची मान्यतानसताना बदल झालेले आढळले ही बाब आम्हाला गंभीर वाटली म्हणून आम्ही महानगरपालिकांच्या अधिकाऱ्याकडे चौकशी केली असता त्यावेळेला त्यांनी आम्हाला असे सांगितले की आमच्या
पातळीवर आम्ही कुठलेही बदल केले नाही. तर राज्य निवडणूक आयोगाने आम्हाला अंतिम प्रभाग रचना मंजुरी बाबत १२ मे रोजी पत्र क्रमांक रानिआ/मनपा-२०२२ / प्र.क्र.६ /का-५ दिनांक १२ मे २०२२ हे पत्र पाठवले आणि त्या पत्राप्रमाणेच आम्ही प्रभाग रचना केली त्या पत्राची प्रत त्यांनी आम्हाला दिली. आम्ही दोन्ही प्रत्र तपासले असता एक गंभीर बाब आमच्या निदर्शनास आली. आम्हाला निवडणूक आयोगाने दिलेले पत्र व महानगर पालिकेला पाठवलेले पत्र एकाच तारखेचे एकाच जावक क्रमाकाचे असल्याचे स्पष्ट दिसत आहे. यामधील दोन्ही पत्रामधील मजकुरात फरक केला आहे. त्यामध्ये मुख्यता प्रभाग क्रमाक कमी जास्त दाखविण्यात आलेले आहेत.
याबाबत पुणे महानगरपालिकेची व पुणेकर नागरिकांची आणि आयुक्त म्हणून आपली देखील फसवणूक आपलेच अधिकारी अविनाश सणस यांनी केली आहे असे आमचे मत झाले आहे. कारण या दोन्ही पत्रांच्या मध्ये आयुक्त राज्य निवडणूक आयोग यांच्या मान्यतेने असा उल्लेख आहे परंतु आपण कशाला नेमकी मान्यता दिली हे स्पष्ट होत नाही. कारण याच्यामध्ये प्रभागांचे नंबर आणि क्रमांक वेगळे असल्यामुळे हा गोंधळ निर्माण केल्यामुळे ही परिस्थिती झालेली आहे या अधिकाऱ्याचा मागचा
इतिहास तपासला तर कागदा पात्रांच्या हेराफेरीमध्ये त्यांच्यावर लाचलुचपत विभागाने गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे असे फेरफार करून फसवणूक करायची अशी त्यांची मानसिकता आहे असे आमच्या लक्षात आले.
आपल्या स्तरावर या संदर्भामध्ये पुढच्या आठ दिवसांमध्ये निर्णय करावा. जर या संदर्भात निर्णय केला नाही तर आपली राज्य निवडणूक आयोग ही संस्था ७४व्या घटनादुरुस्तीच्या नंतर निर्माण झालेली स्वायत्त संस्था आहे त्यामुळे त्या संदर्भातला कायदा राज्य विधिमंडळाने केला आहे त्यामुळे राज्य विधिमंडळाकडे याविरुद्ध दाद मागावी लागेल अन्य दुसरा कुठलाही पर्याय आमच्यासमोर दिसत नाही. त्यामुळे प्रभाग रचनेला स्थगिती द्यावी. या मागण्या आम्ही आपल्याकडे करत आहोत. असे ही पत्रात म्हटले आहे.