PMC CHS Card | एका CHS कार्डवर कर्मचारी किंवा सभासदांना आई-वडील किंवा सासू-सासरे यांनाच लाभ घेता येणार | एकाचवेळी चौघांना लाभ न देण्याचा CHS कमिटीचा निर्णय

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे

PMC CHS Card | एका CHS कार्डवर कर्मचारी किंवा सभासदांना आई-वडील किंवा सासू-सासरे यांनाच लाभ घेता येणार | एकाचवेळी चौघांना लाभ न देण्याचा CHS कमिटीचा निर्णय

PMC CHS Card | पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत (PMC Health Department) अंशदायी वैद्यकीय साहाय्य योजना (CHS) कार्यान्वित आहे. या  अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजनेअंतर्गत पुणे महानगरपालिका सेवक/सेविका, सेवा निवृत्त सेवक/सेविका शिक्षण मंडळ व पीएमपीएमएल विभागाकडील सेवक/सेविका, सेवा निवृत्त सेवक/सेविका, मा. आजी सभासद, व मा. माजी सभासद यांचे वैयक्तिक स्वखार्चाची वैद्यकीय परतावा बिले सादर केल्यानंतर वैद्यकीय बिलांची प्रतिपूर्ती करण्यात येत आहे. दरम्यान आता एका CHS कार्डवर (CHS Card) आई-वडील किंवा सासू-सासरे यांनाच लाभ घेता येणार आहे. एकाचवेळी चौघांना लाभ न देण्याचा निर्णय CHS कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली. (PMC Pune Health Department)

कमिटीच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले

1. पुणे महानगरपालिका सेवक/सेविका विभागाकडील सेवक/सेविका, सेवा निवृत्त सेवक/सेविका, मा. आजी सभासद, व मा. माजी सभासद यांना वैयक्तीक स्वखर्चाची वैद्कीय बीले सादर करतांना औषधांच्या मुळ (Original) रिसीट/कॅश मेमो यामध्ये जी.एस.टी.ची रक्कम नमूद असलेल्या वैयक्तीक वैद्यकीय परताव्याची बीले अदा करण्यात येतील.
2. पुणे मनपा सेवक, शिक्षण मंडळ व पीएमपीएमएल सेवा निवृत्त सेवक/सेविका, सेवा निवृत्त सेवक/सेविका, मा. आजी सभासद, व मा. माजी सभासद यांना अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजनेअंतर्गत आयुर्वेदिक औषधोपचारांच्या बीलांव्यतिरिक्त सादर करण्यात आलेले आयुर्वेदिक प्रोसिजर्सची उदा. पंचकर्म इ. बीले अदा करण्यात येणार नाहीत.
3. पुणे मनपा सेवक, सेवा निवृत्त सेवक/सेविका, शिक्षण मंडळ व पीएमपीएमएल  सेवक/सेविका विभागाकडील सेवक/सेविका, सेवा निवृत्त सेवक/सेविका, मा. आजी सभासद, व मा. माजी सभासद यांना
त्यांच्या फक्त आई-वडिलांची नांवे अथवा फुक्त सासू-सासरे यांची नावे नियमानुसार समाविष्ठ करता येतील. ज्या वर्षी आई-वडील किंवा सासू सासरे यांचे नांव समाविष्ठ असेल त्या आर्थिक वर्षासाठी आई-वडील किंवा सासू सासरे यांचीच नांवे समाविष्ठ राहतील. आई-वडील अथवा सासू सासरे यापैकी जी नांवे कार्डवर समाविष्ठ करावयाची असतील, ती नांवे तसे स्वयंघोषणापत्र भरुन दिल्यानंतर त्या पुढील आर्थिक वर्षातच समाविष्ठ करता येतील. परंतू एकदा निश्चीत केलेली नावे अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजना कार्डमध्ये नियमानुसार समाविष्ठ केल्यास त्यामध्ये चालू आर्थिक वर्षात बदल करता येणार नाही.

PMC Election | प्रभाग रचनेला स्थगिती द्या  | माजी नगरसेवकांची मागणी 

Categories
Breaking News PMC पुणे

प्रभाग रचनेला स्थगिती द्या

| माजी नगरसेवकांची मागणी

पुणे | महापालिका अंतिम प्रभाग रचना मंजुरी बाबत निवडणूक आयोगाने दोन पत्रे दिली आहेत. ज्यातून संशय घ्यायला जागा निर्माण होत आहे. त्यामुळे आयोगाच्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी आणि प्रभाग रचना रद्द करावी, अशी मागणी माजी नगरसेवक उज्वल केसकर, प्रशांत बधे आणि सुहास कुलकर्णी यांनी केली आहे.

आयोगाला दिलेल्या पत्रानुसार  चोकलीन्गम अहवालाची मागणी आम्ही हायकोर्टामध्ये दाखल केलेल्या याचिकेमध्ये केली होती. आयोगाच्या वकिलाने  हायकोर्टामध्ये स्टेटमेंट केल्याप्रमाणे आम्हाला ही कागदपत्र प्राप्त झाली.  या संदर्भामध्ये उल्लेख केलेल्या पत्राची छाननी केली असता
त्यामध्ये प्रभाग क्रमांक 12, 13, 15  आणि 57या प्रभाग रचनेचे राज्य निवडणूक आयोगाची मान्यतानसताना बदल झालेले आढळले ही बाब आम्हाला गंभीर वाटली म्हणून आम्ही महानगरपालिकांच्या अधिकाऱ्याकडे चौकशी केली असता त्यावेळेला त्यांनी आम्हाला असे सांगितले की आमच्या
पातळीवर आम्ही कुठलेही बदल केले नाही.  तर राज्य निवडणूक आयोगाने आम्हाला अंतिम प्रभाग रचना मंजुरी बाबत १२ मे रोजी पत्र क्रमांक रानिआ/मनपा-२०२२ / प्र.क्र.६ /का-५ दिनांक १२ मे २०२२ हे पत्र पाठवले आणि त्या पत्राप्रमाणेच आम्ही प्रभाग रचना केली त्या पत्राची प्रत त्यांनी आम्हाला दिली. आम्ही दोन्ही प्रत्र तपासले असता एक गंभीर बाब आमच्या निदर्शनास आली. आम्हाला निवडणूक आयोगाने दिलेले पत्र व महानगर पालिकेला पाठवलेले पत्र एकाच तारखेचे एकाच जावक क्रमाकाचे असल्याचे स्पष्ट दिसत आहे. यामधील दोन्ही पत्रामधील मजकुरात फरक केला आहे. त्यामध्ये मुख्यता प्रभाग क्रमाक कमी जास्त दाखविण्यात आलेले आहेत.

याबाबत पुणे महानगरपालिकेची व पुणेकर नागरिकांची आणि आयुक्त म्हणून आपली देखील फसवणूक आपलेच अधिकारी अविनाश सणस यांनी केली आहे असे आमचे मत झाले आहे. कारण या दोन्ही पत्रांच्या मध्ये आयुक्त राज्य निवडणूक आयोग यांच्या मान्यतेने असा उल्लेख आहे परंतु आपण कशाला नेमकी मान्यता दिली हे स्पष्ट होत नाही. कारण याच्यामध्ये प्रभागांचे नंबर आणि क्रमांक वेगळे असल्यामुळे हा गोंधळ निर्माण केल्यामुळे ही परिस्थिती झालेली आहे या अधिकाऱ्याचा मागचा
इतिहास तपासला तर कागदा पात्रांच्या हेराफेरीमध्ये त्यांच्यावर लाचलुचपत विभागाने गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे असे फेरफार करून फसवणूक करायची अशी त्यांची मानसिकता आहे असे आमच्या लक्षात आले.

 हे दोन्ही पत्र जे एक पत्र आम्हाला राज्य निवडणूक आयोगाने पाठवलं दुसरं पत्र पुणे महानगरपालिकेचे अधिकाऱ्याने आम्हाला दिलं यातलं कुठलं पत्र खरं आणि खोटं याची शहानिशा आपण करावी तोपर्यंत या प्रभाग रचनेला स्थगिती द्यावी, कारण या पत्राचा परिणाम पुणे शहराच्या प्रभाग रचनेवर होतो आहे आणि अशा प्रकारे फसवणूक करून प्रभाग रचना करणे योग्य नाही. आपण
आपल्या स्तरावर या संदर्भामध्ये पुढच्या आठ दिवसांमध्ये निर्णय करावा.  जर या संदर्भात निर्णय केला नाही तर आपली राज्य निवडणूक आयोग ही संस्था ७४व्या घटनादुरुस्तीच्या नंतर निर्माण झालेली स्वायत्त संस्था आहे त्यामुळे त्या संदर्भातला कायदा राज्य विधिमंडळाने केला आहे त्यामुळे राज्य विधिमंडळाकडे याविरुद्ध दाद मागावी लागेल अन्य दुसरा कुठलाही पर्याय आमच्यासमोर दिसत नाही. त्यामुळे प्रभाग रचनेला स्थगिती द्यावी. या मागण्या आम्ही आपल्याकडे करत आहोत. असे ही पत्रात म्हटले आहे.

Property Tax Bills : पुणेकरांनो मिळकत कराची वाढीव बिले भरू नका  : महापालिकेच्या माजी नगरसेवकांचे पुणेकरांना आवाहन 

Categories
Breaking News PMC social पुणे

पुणेकरांनो मिळकत कराची वाढीव बिले भरू नका

: महापालिकेच्या माजी नगरसेवकांचे पुणेकरांना आवाहन

पुणे : आर्थिक वर्ष २०१८-१९ साली शासनाच्या आदेशाप्रमाणे नवीन मालमत्तेची मिळकत कर आकारणी करताना १०% देखभाल दुरुस्ती खर्चाप्रमाणे सवलत देणे अशी करणे आवश्यक होते; परंतु ते केले नाही. ही  चूक यावर्षी लक्षात आल्यामुळे पुणेकरांना वाढिव बिले पाठविण्यास सुरुवात केली आहे. हे चुकिचे व बेकायदेशीर आहे. याचा आम्ही निषेध करतो आणि महापालिकेने वाढिव बिले दुरूस्त करावीत. त्याशिवाय पुणेकरांनी वाढिव बिले भरू नयेत. हि थकबाकी write off करण्याचा स्थायी समितीला आहे सध्या आयुक्त म्हणजेच स्थायी समिती आहे त्याचे अधिकार त्यांनी वापरावेत आणि पुणेकरांना दिलासा द्यावा. अन्यथा आम्हाला या संदर्भामध्ये हायकोर्टामध्ये जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही. असा इशारा महापालिकेचे माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर, प्रशांत बधे नि सुहास कुलकर्णी यांनी दिला आहे.

प्रसिद्धीस  दिलेल्या पत्रानुसार  महानगरपालिके मध्ये मिळकत करा विषयी प्रचंड गोंधळ व अनास्था माजली आहे. आता महापालिकेत प्रशासकाचे राज्य आहे. यासंदर्भात काही मूलभूत बाबी अशा आहेत कि एमएमसी ॲक्ट कलम 127 (2A)-3 नमूद करतो महापालिका क्षेत्रातील मिळकतींचा
कर हा या कायद्याला धरूनच केला पाहिजे. एमएमसी ॲक्ट
कलम 129 असं सांगतं कि रिटेबल व्हॅल्यू किंवा कॅपिटल व्हॅल्यू महानगरपालिका ठरवू शकते. त्याचा दर काय असावा हे ठरवण्याचे अधिकार सुध्दा या कलमाद्वारे महानगरपालिकेलाच आहेत. यात राज्य सरकारची लोक लेखा समिती हस्तक्षेप करू शकत नाही. तरी देखील लोकलेखा समितीने महानगरपालिकेच्या एका चुकीमुळे जी चूक 1970 साली ठराव क्रमांक ५ यात देखभाल दुरुस्तीसाठी १५% सवलत दिली होती जी कायद्याला मान्य नव्हती ती १०% असणे गरजेचे होते. परंतु इतके वर्ष ते सुरळीत चालू होते महालेखा परीक्षकांनी या अहवालामध्ये यावर बोट ठेवले आणि मग लोक लेखा समिती मध्ये देखील या विषयावर चर्चा झाली. या ठिकाणी आम्हाला नमूद करावेसे वाटते यामध्ये मूळ मालकाला ४०% वाजवी भाड्यात सवलत देण्याचा विषय ना लेखापरीक्षकांच्या आहवालात ना लोकलेखा समितीच्या अहवालात नमूद केला गेला. परंतू तरी देखील ही सवलत अन्यायकारक रित्या बंद करण्यात आली की जो अधिकार महानगरपालिकेचा आहे त्या अधिकारावर एक प्रकारे बेकायदेशीररित्या अतिक्रमण केले गेले असे आमचे स्पष्ट म्हणणे आहे.

लेखापरीक्षकांनी २०१०-११ साली अहवाल दिल्यानंतर तत्कालीन आयुक्त आणि इतर अधिकाऱ्यांनी त्याची अंमलबजावणी का केली याचे स्पष्टीकरण नगर विकास विभागाने मागितले. तसेच महानगरपालिकेचे तत्कालिन आयुक्त व अधिकारी यांच्याकडून सदरची रक्कम वसूल करण्यासंबंधी मंत्रालयात कार्यवाही सुरू झाल्यानंतर मुळातूनच ही सवलत रद्द करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने केला मुख्य सभेचा अधिकार काढून घेण्याचे ठरवले मुख्य सभेने केलेला ठराव रद्द केला. तो ठराव अंशता विखंडित करून ६०% मिळकत कर आकारणी करण्याचा मुख्य सभेचा अधिकार काढून घेतला त्यामुळे पुणेकरांना हा त्रास सहन करावा लागतोय. १५% सवलती ऐवजी १०% रक्कम करपात्र मुल्यातून वजा करावी असा आदेश राज्य शासनाकडून ६|७|२०१८ ला आयुक्तांना दिलाय.
सन २०१८-१९ या अर्थिक वर्षांपासून एमएमसी ॲक्टच्या तरतुदीनुसार करपात्र शुल्कातून १०% सवलत देण्याची कार्यवाही करण्यात यावी
याच्या मागील वर्षांचा (रेट्राॅस्पेक्टिव्ह इफेक्ट) देखभाल-दुरुस्तीचा खर्च वसूल करा असा कुठलाही आदेश राज्य सरकारने दिला नाही. प्रचलित कायद्याप्रमाणे तसा आदेश देऊही शकत नाही याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे आणि विषय पुढे घेण्याच्या प्रवृत्तीमुळे शासनाकडे महानगरपालिकेचे पर्यायाने ३५ लाख पुणेकरांचं प्रतिनिधित्व झालं नाही असा आमचा दावा आहे.

या संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकार, पालक मंत्री, पुण्यातले खासदार-आमदार यांनी योग्य लक्ष घालून पुणेकरांच्या हक्काचा अधिकार त्यांना मिळवून दिला पाहिजे. आर्थिक वर्ष २०१८-१९ साली शासनाच्या आदेशाप्रमाणे नवीन मालमत्तेची मिळकत कर आकारणी करताना १०% देखभाल दुरुस्ती खर्चाप्रमाणे सवलत देणे अशी करणे आवश्यक होते परंतु ते केले नाही   हि चूक यावर्षी लक्षात आल्यामुळे पुणेकरांना वाढिव बिले पाठविण्यास सुरुवात केली आहे. हे चुकिचे व बेकायदेशीर आहे याचा आम्ही निषेध करतो आणि महापालिकेने वाढिव बिले दुरूस्त करावीत त्याशिवाय पुणेकरांनी वाढिव बिले भरू नयेत. हि थकबाकी write off करण्याचा स्थायी समितीला आहे सध्या आयुक्त म्हणजेच स्थायी समिती आहे त्याचे अधिकार त्यांनी वापरावेत आणि पुणेकरांना दिलासा द्यावा. अन्यथा आम्हाला या संदर्भामध्ये हायकोर्टामध्ये जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही.