Pune 5 Star City | PMC | पुणे शहर झाले आता 5 स्टार! | पुणे महापालिकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा!

Categories
Breaking News PMC social देश/विदेश पुणे

Pune 5 Star City | PMC | पुणे शहर झाले आता 5 स्टार! | पुणे महापालिकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा!

| पुणे महापालिकेला मिळाला राष्ट्रीय पुरस्कार

Pune 5 Star City | PMC | पुणे शहराच्या (Pune City) शिरपेचात आणखी एका मानाचा तुरा खोवला गेला आहे. पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) करत असलेल्या प्रयत्नामुळे पुणे शहर आता 5 स्टार झाले आहे. पुणे महापालिकेला (PMC Pune) स्वच्छ सर्वेक्षण 2023 (Swachh Survey 2023) मध्ये एक राष्ट्रीय पुरस्कार आणि स्टार सिटी प्रमाणपत्र मिळाले आहे. पुणे शहर हे आजपर्यंत 3 स्टार मधेच होते. मात्र महापालिकेने उत्तम कामगिरी करून पहिल्यांदाच 5 स्टार होण्याचा मान मिळवला आहे. पुणे महापालिका आणि पुणे शहरासाठी ही मोठी उपलब्धी मानली जात आहे. (PMC Pune News)
देशातील राहण्यायोग्य सर्वोत्तम शहर म्हणून पुणे शहराचा नावलौकिक झाला आहे. तसेच विद्येचे माहेरघर, राज्याची सांस्कृतिक राजधानी अशी बरीच बिरुदे पुणे शहराला मिळाली आहेत. त्यात अजून एक नावलौकिकाची भर पडली आहे. पुणे शहर आता 5 स्टार झाले आहे. पुणे महापालिकेचा घनकचरा विभाग (PMC Solid Waste Management Department) यासाठी सातत्याने प्रयत्नशील होता. पुणे शहर आतापर्यंत 3 स्टार मधेच होते. मात्र आता यात वाढ होऊन ते 5 स्टार झाले आहे. खरे पाहता महापालिका यासाठी 2019 सालापासूनच प्रयत्न करत होती. मात्र काहींना काही कारणाने हे मानांकन हातून सुटत होते. मात्र अखेर महापालिकेने ही उपलब्धी मिळवली आहे. याबाबत सप्टेंबर च्या शेवटच्या आठवड्यात केंद्राकडून सर्वे करण्यात आला होता. यामध्ये घरोघर कचरा जमा करणे, कचऱ्याचे वर्गीकरण करणे, अशा 24 विविध घटकांचा समावेश होता. या सर्व गोष्टीत महापालिकेने चांगली प्रगती केली आहे. त्यामुळे महापालिका हा ‘किताब मिळवू शकली आहे. पुणे महापालिका आगामी काळात 7 स्टार आणि वॉटर प्लस मानांकन मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. जायका प्रकल्प अंतर्गत जलशुद्धीकरण केंद्राची कामे पूर्ण झाल्यावर महापालिका यासाठी पात्र होऊ शकते. (Pune PMC News)
दरम्यान नुकतेच केंद्र सरकारकडून पुणे शहराला हे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. तसेच 11 जानेवारीला राष्ट्रीय पुरस्कार दिला जाणार आहे. यामध्ये शहराची स्वच्छ सर्वेक्षण मधील रँकिंग देखील कळणार आहे. केंद्र सरकारने 11 जानेवारीला राज्यातून फक्त 3 शहरांनाच निमंत्रण दिले आहे. यामध्ये नवी मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराचा समावेश आहे. पुणे महापालिकेचे याबाबत कौतुक होत आहे. पुणे महापालिका याआधीच ओपन डिफिकेशन मुक्त झाले आहे. याबाबत महापालिकेने मानांकन देखील मिळवले आहे. मात्र महापालिका अजून कामगिरीत सुधारणा करत असून रँकिंग पहिल्या 5 मध्ये ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे. तसेच आगामी काळात 7 स्टार आणि वॉटर प्लस मानांकन मिळवण्याचा मानस देखील महापालिकेच्या घनकचरा विभागाने व्यक्त केला आहे.
पुणे शहराला पहिल्यांदाच 5 स्टार प्रमाणपत्र मिळाले आहे. आगामी काळात आपण 7 स्टार साठी प्रयत्न करणार आहोत. 5 स्टार मध्ये देशातील 8-9 शहरे आहेत. त्यामध्ये पुण्याचा समावेश आहे. ही पुणे महापालिकेच्या दृष्टीने मोठी गोष्ट आहे. महापालिकेने केलेल्या चांगल्या कामगिरीवर केंद्र सरकारने मोहोर लावली आहे. मागील वर्षी पेक्षा खूप सुधारणा आपण केल्या आहेत. महापालिका आपल्या कामगिरीत अजून चांगल्या सुधारणा करणार आहे. दरम्यान 11 जानेवारीला दिल्लीला होणाऱ्या कार्यक्रमात पुणे शहराला देखील निमंत्रण आहे. ही आणखी चांगली गोष्ट आहे. यात राष्ट्रीय पुरस्कार आणि आपली रँकिंग देखील  कळणार आहे.
डॉ कुणाल खेमणार, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका 
स्वच्छ सर्वेक्षण 2023, (SS23), आपल्या पुणे महापालिकेला एक राष्ट्रीय पुरस्कार आणि 5 स्टार सिटी प्रमाणपत्र मिळाले आहे. मनपा आयुक्त यांचे प्रशंसनीय नेतृत्व व विश्वास, अतिरिक्त आयुक्त यांचे  मार्गदर्शन, तसेच सर्व  अधिकारी आणि कर्मचारी यांचे कठोर परिश्रम यामुळे हे घडले आहे. आजी माजी पदाधिकारी, पत्रकार आणि पुणेकर नागरिक यांचे देखील यात मोलाचे योगदान आहे. मात्र आता आमची जबाबदारी वाढली आहे. आम्ही जोमाने काम करू.
संदिप कदम, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग 

Swachh Survekshan Award | स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार क्रमवारीत पुण्याला देशात पहिल्या पाचमध्ये आणण्यासाठी नागरिकांनी योगदान द्यावे | पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

Categories
Breaking News PMC social पुणे

स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार क्रमवारीत पुण्याला देशात पहिल्या पाचमध्ये आणण्यासाठी नागरिकांनी योगदान द्यावे | पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे| स्वच्छ सर्व्हेक्षण पुरस्काराच्या क्रमवारीत पुणे शहराचा क्रमांक उंचावत देशात पहिल्या पाच शहरात समाविष्ट होण्याच्यादृष्टीने नागरिकांनी महापालिकेच्या स्वच्छ्ताविषयक उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

पंडित जवाहरलाल नेहरु सांस्कृतिक भवन येथे पुणे महानगरपालिकेच्यावतीने आयोजित स्वच्छ तंत्रज्ञान चॅलेंज आणि स्वच्छ पुरस्कार २०२३ च्या वितरण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार, महानगरपालिका स्वच्छता उपक्रमाचे ब्रँड ॲम्बेसेडर डॉ. सलील कुलकर्णी, घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त आशा राऊत आदी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेचे महत्व लक्षात घेवून देशात स्वच्छता अभियान राबविण्याचा निर्णय घेतला. या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना स्वच्छतेच्या उपक्रमात सहभागी करुन घेण्यासाठी, स्वच्छतेबाबत महत्व पटवून देण्यासाठी विविध शहरात स्पर्धा, उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या माध्यमातून आपला परिसर, शहर, वसाहत, जिल्हा, राज्य व देश स्वच्छ होण्यास मदत होत आहे. स्वच्छ सर्वेक्षणात पुणे शहर देशात ९ व्या क्रमांकावर असून आपली क्रमवारी उंचावण्याचे लक्ष्य ठेवले पाहिजे, असेही ते म्हणाले.

पालकमंत्री पुढे म्हणाले, पुणे शहराला चांगल्या उपक्रमात पुढाकार घेण्याची परंपरा आहे. त्यामुळे कचरा निर्मूलन तसेच व्यवस्थापनातही चांगले काम केले जात आहे. वाढती लोकसंख्या विचारात घेता शहरात मोठ्या प्रमाणात कचरा निर्मिती होते. परंतु अद्ययावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यावर प्रक्रिया करुन जीवनाश्यक वस्तूंची निर्मिती करण्यात येत आहे. शहरातील वसाहतीत निर्माण होणाऱ्या कचऱ्यापासून खत आणि गॅस निर्मितीबरोबरच वीज निर्मिती करण्यात येत आहे. कचरा आज एक प्रकारची मालमत्ता बनली आहे. रोजगाराचे साधन बनले आहे. कचरा निमिर्तीपासून ते कचरा निर्मूलन पर्यंतचा प्रवास विचारात घेता पुणे महानगरपालिका अद्ययावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून यावर कार्य करीत आहे. या स्वच्छतेच्या कार्यात नागरिकांनी अधिकाधिक संख्येने सहभागी होऊन आपले शहर स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन श्री. पाटील यांनी नागरिकांना केले.

श्री. कुमार म्हणाले, पुणे शहरात नवीन हद्दवाढीमुळे सुमारे ६२ लाख लोकसंख्या असून शहरात दररोज सुमारे २ हजार २०० टन कचरा निर्माण होतो. महानगरपालिकेचे सुमारे १२ हजार कर्मचारी पुणे शहर स्वच्छ करण्यासाठी काम करीत आहे. पुणे महानगरपालिका कचऱ्यावर १०० टक्के प्रक्रिया करण्याचे काम करते. या सर्व कार्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. १०० किलो पेक्षा जास्त कचरा निर्माण होणाऱ्या गृहनिर्माण संस्था, हॉटेल आदीनी त्यांच्यास्तरावर कचरा निर्मूलन करण्याची प्रक्रिया करावी.

डॉ. कुलकर्णी म्हणाले, कचऱ्याची विल्हेवाट करण्यासाठी पुणे महानगर पालिका अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करीत आहे. पुणे शहरातील नागरिकांनी आपल्या घरात, परिसरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी प्रयत्न करावेत.

यावेळी पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरु सांस्कृतिक भवन येथे आयोजित घनकचरा व्यवस्थापन प्रदर्शनाचे उद्धघाटन करण्यात आले.

Ease of Living 2022 | पुणे शहरास राहण्यास सर्वोत्तम शहर म्हणून पुनःश्च प्रथम क्रमांक प्राप्त होण्यासाठी महापालिका प्रयत्नशील | मनपा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा सहभाग अपेक्षित

Categories
Breaking News PMC social पुणे

पुणे शहरास राहण्यास सर्वोत्तम शहर म्हणून पुनःश्च प्रथम क्रमांक प्राप्त होण्यासाठी महापालिका प्रयत्नशील

| मनपा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा सहभाग अपेक्षित

पुणे | इज ऑफ लिव्हिंग इंडेक्स अंतर्गत शहरातील नागरिकांचे राहण्यायोग्य सर्वोत्तम शहर बद्दल सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणात महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा सहभाग अपेक्षित आहे. त्यामुळे महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सिटीझन पर्सेप्शन सर्वेक्षण फॉर्म भरावा लागणार आहे. याबाबतचे आदेश महापालिका प्रशासनाकडून जारी करण्यात आले आहेत.

प्रशासनाच्या आदेशानुसार गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय, केंद्र शासन (MoHUA) मार्फत Urban Outcome Framework (UoF) 2022 लाँच केले आहे. शहरातील नागरिकांचे राहण्यायोग्य सर्वोत्तम शहर बद्दल सर्वेक्षण सिटीझन पर्सेप्शन सर्व्हे (CPS) हा इज ऑफ लिव्हिंग इंडेक्सचा एक भाग आहे. या सर्वेक्षणामुळे शहरांमधील जीवनमानाच्या गुणवत्तेबद्दल नागरिकांचे मत विचारात घेतले जाणार आहे. ज्यामुळे सेवा वितरण आणि शहरांचे प्रशासन सुधारण्यास मदत होणार आहे. पुणे शहरास यापूर्वी २०१८ मध्ये १ ला आणि २०१९ मध्ये २ रा क्रमांक प्राप्त झाला आहे. त्याअनुषंगाने पुणे शहरास राहण्यास सर्वोत्तम शहर म्हणून पुनःश्च प्रथम क्रमांक प्राप्त होण्यासाठी पुणे महानगरपालिकेचे सर्व अधिकारी/ कर्मचारी यांनी सर्वेक्षण फॉर्म भरणे अपेक्षित आहे. असे आदेशात म्हटले आहे.

Citizen Feedback For Swachh Survey : सिटीझन फीडबॅक साठी पुणेकरांची आणि महापालिका कर्मचाऱ्यांची उदासीनता  : एकट्या घनकचरा विभागाची धावाधाव 

Categories
Breaking News PMC social पुणे

सिटीझन फीडबॅक साठी पुणेकरांची आणि महापालिका कर्मचाऱ्यांची उदासीनता

: एकट्या घनकचरा विभागाची धावाधाव

पुणे :    केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण रँकिंगमध्ये मोठ्या शहरांमध्ये  क्रमवारीत  सुधारणा करण्याच्या प्रयत्नात, पुणे महानगरपालिका आहे. महापालिकेनं  (PMC) आपल्या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना व मित्रांना सोबत घेऊन याची जास्तीत जास्त माहिती देऊन  सकारात्मक प्रतिक्रिया नोंदवण्यास सांगितले आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमणार यांनी हे आदेश दिले होते. मात्र याला महापालिका कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. त्यामुळे एकट्या घनकचरा विभागाला धावपळ करावी लागत आहे. दरम्यान महापालिका आयुक्तांनी येत्या दोन तीन  दिवसांत जास्तीत जास्त फीडबॅक घेण्याचे टार्गेट विभागाला दिले आहे.
 पुणे शहरातील  स्वच्छतेच्या कामांमध्ये सातत्य आहे हे तपासण्यासाठी केंद्र सरकारच्या ‘स्वच्छता’ आणि नागरिकांच्या प्रतिक्रिया मोबाइल ऍप्लिकेशन्सवर नोंदवलेल्या सकारात्मक अभिप्रायांवर सर्वेक्षणाचे महत्त्व आहे.  त्यामुळे “सर्व  विभागांनी आपल्या सर्व नागरी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ‘स्वच्छता’ मोबाईल ऍप्लिकेशन डाउनलोड करण्याच्या सूचना द्याव्यात आणि 25 मार्चपर्यंत शहराच्या स्वच्छतेबाबत सकारात्मक प्रतिक्रिया नोंदवाव्यात. असे आदेश अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमणार यांनी दिले होते.   सर्व  अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि मित्रांना देखील शहराच्या स्वच्छतेबद्दल सकारात्मक अभिप्राय नोंदवावा,” असे आदेशात म्हटले होते.  अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पीएमसीच्या स्वच्छ सर्वेक्षण वॉर रूममध्ये फीडबॅक नोंदवणाऱ्या त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची नावे आणि मोबाईल क्रमांक देखील सादर करावेत. असे ही म्हटले होते.
 PMC ने 2021 मध्ये 2020 मध्ये 17 व्या क्रमांकावर आणि 2019 मध्ये 37 व्या क्रमांकावर सुधारणा केली. 2016 मध्ये 11 व्या क्रमांकावर, 2017 मध्ये 13 व्या आणि 2018 मध्ये 10 व्या क्रमांकावर असलेल्या 2019 मध्ये झालेल्या घसरणीने  राजकीय पक्ष तसेच नागरिक व नागरी संस्था कडून टीकेचा सामना करावा लागला होता.
त्यामुळे पहिल्या 5 मध्ये येण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र सिटीझन फीडबॅक बाबत पुणेकरांची उदासीनता दिसून येत आहे. तसेच महापालिका कर्मचारी देखील याबाबत उदासीन आहेत. फक्त घनकचरा विभागाला धावाधाव करावी लागत आहे. फक्त 6 हजार फीडबॅक झाले आहेत. दरम्यान पिंपरी मनपा सध्यातरी पुण्याच्या पुढे आहे. पिंपरीचे 50 हजाराच्या वर फीडबॅक आहेत. त्यामुळे आता महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी येत्या दोन दिन दिवसांत जास्तीत जास्त फीडबॅक घेण्याचे टार्गेट विभागाला दिले आहे.
दरम्यान घनकचरा विभागाकडून पुन्हा एकदा नागरिक आणि मनपा कमर्चाऱ्यांना जास्तीत जास्त फीडबॅक देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी नागरिक

https://bit.ly/ss22pune यावर जाऊन ऍप डाउनलोड करू शकतात.

Swachh Survey Feedback : मनपा कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना व  मित्रांना सोबत घेऊन सकारात्मक प्रतिक्रिया घ्याव्या लागणार!

Categories
Breaking News PMC पुणे

मनपा कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना व  मित्रांना सोबत घेऊन सकारात्मक प्रतिक्रिया घ्याव्या लागणार

 : स्वच्छ क्रमवारीत सुधारणा करण्यासाठी अतिरिक्त महापालिका आयुक्त कुणाल खेमणार यांचे आदेश

पुणे :    केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण रँकिंगमध्ये मोठ्या शहरांमध्ये  क्रमवारीत  सुधारणा करण्याच्या प्रयत्नात, पुणे महानगरपालिका आहे. महापालिकेनं  (PMC) आपल्या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना व मित्रांना सोबत घेऊन याची जास्तीत जास्त माहिती देऊन  सकारात्मक प्रतिक्रिया नोंदवण्यास सांगितले आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमणार यांनी हे आदेश दिले आहेत.
 सर्व नागरी विभागांना जारी केलेल्या आदेशात, अतिरिक्त महापालिका आयुक्त कुणाल खेमनार म्हणतात की, शहरातील स्वच्छतेच्या कामांमध्ये सातत्य आहे हे तपासण्यासाठी केंद्र सरकारच्या ‘स्वच्छता’ आणि नागरिकांच्या प्रतिक्रिया मोबाइल ऍप्लिकेशन्सवर नोंदवलेल्या सकारात्मक अभिप्रायांवर सर्वेक्षणाचे महत्त्व असेल.
 “सर्व  विभागांनी आपल्या सर्व नागरी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ‘स्वच्छता’ मोबाईल ऍप्लिकेशन डाउनलोड करण्याच्या सूचना द्याव्यात आणि 25 मार्चपर्यंत शहराच्या स्वच्छतेबाबत सकारात्मक प्रतिक्रिया नोंदवाव्यात. तसेच त्यांनी नागरिकांच्या प्रतिक्रिया अर्जावरही अशाच प्रतिक्रिया नोंदवाव्यात.  सर्व  अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि मित्रांना देखील शहराच्या स्वच्छतेबद्दल सकारात्मक अभिप्राय नोंदवावा,” असे आदेशात म्हटले आहे.
 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पीएमसीच्या स्वच्छ सर्वेक्षण वॉर रूममध्ये फीडबॅक नोंदवणाऱ्या त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची नावे आणि मोबाईल क्रमांक देखील सादर करावेत.
 अतिरिक्त महापालिका आयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले आहे कि, केंद्र सरकार शहराच्या स्वच्छतेबाबत अभिप्राय घेण्यासाठी नोंदणीकृत नागरिकांना थेट फोन करू शकते त्यामुळे नागरी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबीयांना त्याबद्दल माहिती द्यावी.
 PMC ने 2021 मध्ये 2020 मध्ये 17 व्या क्रमांकावर आणि 2019 मध्ये 37 व्या क्रमांकावर सुधारणा केली. 2016 मध्ये 11 व्या क्रमांकावर, 2017 मध्ये 13 व्या आणि 2018 मध्ये 10 व्या क्रमांकावर असलेल्या 2019 मध्ये झालेल्या घसरणीने  राजकीय पक्ष तसेच नागरिक व नागरी संस्था कडून टीकेचा सामना करावा लागला होता.
 स्वच्छता अॅप द्वारे तक्रारी दाखल करणे व प्रतिक्रिया देणेबाबतची पद्धती :
• स्वच्छता MOHUAॲप play store मधून डाउनलोड व रजिस्टर करणे.
• तक्रारिचा फोटो काढून तक्रार दाखल करणे. तीन तासात आपली तक्रार निराकरण झाल्यावर त्यावर स्माईली देउन
सकारात्मक प्रतिक्रिया देणे.
2. वेब साईट द्वारे प्रतिक्रिया देण्याची पद्धती:
(SS2022VOTEFORYOURCITY CITIZEN’S FEEDBACK) https://ss-cf.sbmurban.org/#/feedback.Citizen’s feedback
Fill the general information like name, e-mail, mobile no.etc
Enter the OTP received on registered no.
Answer the questions
Submit the feedback
तरी सर्व खातेप्रमुख यांनी आपले नियंत्रणाखालील अधिकारी/कर्मचारी यांना दिनांक २५/०३/२०२२ पर्यंत वरीलप्रमाणे सकारात्मक प्रतिक्रया देणेविषयी आदेशित करून त्याचा अहवाल स्वच्छ सर्वेक्षण २०२२ वॉररूम येथे सादर करावयाचा आहे.

Water plus Certificate : वॉटर प्लस मानांकन मिळवण्याकरिता पुणे महापालिका प्रयत्नशील! 

Categories
Breaking News PMC पुणे महाराष्ट्र

वॉटर प्लस मानांकन मिळवण्याकरिता पुणे महापालिका प्रयत्नशील!

: राज्य सरकार देखील करणार साहाय्य

पुणे : स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत पुणे महापालिकेने चांगली कामगिरी केली आहे. मात्र महापालिकेला अजूनही वॉटर प्लस मानांकन मिळालेले नाही. हे मानांकन फक्त नवी मुंबई महापालिकेला मिळाले आहे. आता पुणे महापालिका देखील हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी राज्य सरकार देखील मदत करणार आहे.

: 4 मार्च ला पाहणी दौरा

राज्य सरकार कडून याबाबत महत्वाच्या महापालिका आणि नगरपालिकांना निमंत्रण देण्यात आले आहे. त्यात पुणे महापालिकेचा देखील समावेश आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे राज्य अभियान संचालक अनिल मुळे यांनी याबाबत महापालिकेला पत्र पाठवले आहे.  त्यानुसार स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत आपण केलेल्या कामगिरीच्या आधारे आपण या स्वच्छ सर्वेक्षण २२ मध्ये “वॉटर प्लस” करिता प्रमाणित होण्याबाबत संचालनालयीन स्तरावर विविध बैठकांमध्ये इच्छा व्यक्त केलेली आहे. महाराष्ट्र राज्यात फक्त नवी मुंबई महानगरपालिकेला “वॉटर प्लस” सर्टीफिकेशन मिळालेले आहे. आपल्या महानगरपालिकेने मागील स्वच्छ सर्वेक्षणमध्ये केलेली कामगिरी पाहता आपली महानगरपालिका ही “वॉटर प्लस” होवू शकते हे आपणांस विदीत आहेच. त्याअनुषंगाने आपल्या शहरास हे नामांकन प्राप्त होण्याकरिता आपल्या विविध शंकेचे निरसन होण्याच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने दिनांक २ मार्च,२०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता ऑनलाईन कार्यशाळा संचालनालयाने आयोजित केलेली आहे. या कार्यशाळेस स्वतः मा. प्रधान सचिव संबोधित करणार आहेत. तरी सदरच्या कार्यशाळेस संबधितांना हजर रहाण्यास सांगावे.

तसेच, या प्रशिक्षणानंतर दिनांक ४ मार्च, २०२२ रोजी नवी मुंबई महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये “वॉटर प्लस” मिळविण्याकरिता केलेल्या कामाच्या प्रत्यक्ष पाहणीसाठी दौरा देखील आयोजित करण्यात आलेला आहे. अशा पद्धतीने सरकार महापालिकेला मदत करणार आहे.

Swachh Survey : Swachhata App : महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना स्वछता ऍप डाउनलोड करणे बंधनकारक  : स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत प्रथम येण्याचे उद्दिष्ट्य 

Categories
Breaking News PMC पुणे

महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना स्वछता ऍप डाउनलोड करणे बंधनकारक

: स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत प्रथम येण्याचे उद्दिष्ट्य

पुणे : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत घेण्यात येणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण 2021 स्पर्धेत पुण्याने झेप घेतली आहे. देशातील दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरात पुणे शहर देशात पाचव्या स्थानावर झेपावले आहे. मागील वर्षी पुणे शहर 17 व्या क्रमांकावर होते. यापुढे हे स्थान प्रथम क्रमांकावर नेण्याचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे. त्यासाठी सर्व महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना स्वछता ऍप डाउनलोड करणे बंधनकारक केले आहे. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी जारी केले आहेत.

: सर्व विभागाकडून मागवली माहिती

महापालिका आयुक्त यांच्या आदेशानुसार स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सन २०१६ पासून गृहनिर्माण व नागरी व्यवहार मंत्रालयामार्फत भारतातील विविध शहरांमध्ये स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा घेण्यात येते. या सर्वेक्षणाचा प्रमुख हेतू आहे कि, व्यापक स्वरूपात नागरिकांचा सहभाग वाढविण्यास उदयुक्त करणे आणि समाजाच्या सर्व स्तरावरील लोकांमध्ये जागृती निर्माण करणे, जेणेकरून सांधिक कार्याचे महत्व पटवून शहरातील वास्तव्य अधिक सुखरूप होईल. याशिवाय शहरे स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा पुरविण्याच्या बाबतीत शहरांमध्ये निकोप स्पर्धेची प्रेरणा निर्माण व्हावी या उद्देशाने च्या पत्रान्वये  केंद्र सरकारकडून स्वच्छ सर्वेक्षण २०२२ स्पर्धेची घोषणा करण्यात आली असल्याने, पुणे महानगरपालिकेस यावर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे मानांकन, water plus व ७ स्टार मानांकन प्राप्त करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानुषंगाने पुणे शहर प्रथम क्रमांकावर येणेसाठी शहर स्वच्छ व सुंदर राखणे आवश्यक असून त्यासाठी महानगरपालिकेच्या सर्व विभागातील अधिकारी / कर्मचारी यांचे योगदान मोलाचे आहे. त्यादृष्टीने पुणे महानगरपालिकेत सर्व विभागातील अधिकारी / कर्मचारी यांनी स्वच्छता अॅप (Swachhata-MOHUA)
डाऊनलोड केले असलेबाबतची एकत्रित माहिती संबंधित विभागाने घनकचरा व्यवस्थापन कार्यालय, पुणे महानगरपालिका यांना कळविण्याची दक्षता घ्यावी. असे आदेशात म्हटले आहे.