City President | Pune Congress | कॉंग्रेसचा नवा शहर अध्यक्ष कोण?

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र
Spread the love

कॉंग्रेसचा नवा शहर अध्यक्ष कोण?

महापालिका निवडणुकी अगोदर कॉंग्रेस पक्षात बऱ्याच घडामोडी घडताना दिसत आहेत. कॉंग्रेस हायकमांड च्या निर्णयानुसार ५ वर्ष पूर्ण झालेल्या  पदाधिकाऱ्याना राजीनामा देण्यास सांगितले आहे. तसा नियम करण्यात आला आहे. त्यानुसार कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष रमेश बागवे यांच्यासह तीन पदाधिकाऱ्यानी आपले राजीनामे सादर केले आहेत. त्यामुळे आता नवीन शहर अध्यक्ष कोण होणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे. या पदासाठी शहरातून सर्व तगडे नेते इच्छुक आहेत. यामध्ये आबा बागुल, अरविंद शिंदे, संजय बालगुडे आणि दत्ता बहिरट यांचा समावेश आहे. आगामी काही दिवसात यांच्यापैकी कुणाच्या गळ्यात शहर अध्यक्ष पदाची माळ पडणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.

काँग्रेस शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश सरचिटणीस अॅड. अभय छाजेड यांच्यासह रोहित टिळक यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसच्या ठरावानुसार त्यांनी हे राजीनामे पाठवल्याचं कळतंय. यामुळे पुण्यातील काँग्रेसमध्ये मोठे बदल होणार हे स्पष्ट झालंय.

पाच वर्षांपेक्षा जास्त पदावर असलेल्यानी पदं रिक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार देशभरातील पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेण्यात आले आहेत. मागील आठवड्यात नगरच्या शिर्डीत राज्य काँग्रेसची बैठक पार पडली. यावेळी चिंतन शिबिरात हाच नियम राज्यात लागू करण्याचे ठरवण्यात आले. यानंतर पुण्याला नवं नेतृत्व मिळणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

आता नवीन शहर अध्यक्ष कोण होणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे. या पदासाठी शहरातून सर्व तगडे नेते इच्छुक आहेत. यामध्ये आबा बागुल, अरविंद शिंदे, संजय बालगुडे आणि दत्ता बहिरट यांचा समावेश आहे. आबा बागुल हे सलग सहा वेळा महापालिका नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे पुण्यात ते कॉंग्रेसचे जुने नेते म्हणून ओळखले जातात. शिवाय त्यांच्याकडे ओबीसी चेहरा म्हणून देखील पहिले जाते. आज ओबीसी बाबत चर्चा राज्यात सुरु आहे. त्यामुळे कॉंग्रेस बागुल यांच्याकडे ओबीसी चेहरा म्हणून पाहू शकते. शिवाय आगामी महापालिका निवडणुकीत बागुल यांच्या अनुभवाचा पक्षाला फायदा होऊ शकतो. तसेच बागुल यांनी महापालिकेचे गटनेते झाल्या नंतर शहरातील सर्व नेत्यांना एकत्रित करण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यामुळे पक्ष या सर्व गोष्टींचा विचार करू शकतो.

अरविंद शिंदे यांच्याकडे एक अभ्यासू नेता म्हणून पहिले जाते. आपल्या अभ्यासू वृत्तीने त्यांनी महापालिकेत देखील बऱ्याच प्रश्नांना वाचा फोडली आहे. सध्या ते प्रदेश सरचिटणीस म्हणून काम पाहत आहेत. नगरसेवक पदाचा त्यांना गाढा अनुभव आहे. शिवाय त्यांनी आमदारकी देखील लढवली होती. या सर्वांचा महापालिका निवडणुकीत उपयोग होऊ शकतो. शिवाय मराठा समाजाचा नेता म्हणून देखील त्यांच्याकडे पहिले जाते. शहर कॉंग्रेसला आता मराठा समाजाचा नेता शहर अध्यक्ष म्हणून करायाचा आहे, अशी चर्चा आहे. त्यामुळे पक्ष शिंदे यांचा देखील विचार करू शकतो.

संजय बालगुडे आणि दत्ता बहिरट यांच्याकडे देखील मराठा नेता म्हणून पहिले जाते. संजय बालगुडे हे देखील प्रदेश सरचिटणीस आहेत. शिवाय त्यांनी सुमारे १६ वर्षे युवक कॉंग्रेस चे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. त्यांना स्वीकृत नगरसेवक देखील करण्यात आले होते. बालगुडे नेहमी प्रदेश पातळीवर एक्टीव असतात. युवक कॉंग्रेस च्या माध्यमातून त्यांनी बरीच कामे केली आहेत. नेहमी आंदोलने केली आहेत. त्यामुळे पक्ष त्यांच्या अनुभवाचा फायदा करून घेऊ शकतो. तसेच दत्ता बहिरट हे देखील या पदासाठी इच्छुक आहेत. बहिरट यांनी नेहमीच कॉंग्रेसच्या धोरणानुसार गरीब लोकांना जवळ करत त्यांना मदत करण्याचे काम केले आहे. खास करून झोपडपट्टीतील लोकांसाठी त्यांचे काम कौतुकास्पद आहे. सामान्या विषयी कळवळा असणारे नेते म्हणून त्यांच्याकडे पहिले जाते. त्यांच्याकडे आता कुठलेही पद नाही. बहिरट यांनी देखील आमदारकी लढवली आहे.

हे सगळेच नेते आपापल्या परीने शहर होण्यासाठी प्रयत्न करत आहे. यामुळे पक्ष आता या चौघांपैकी कुणाला संधी देणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

One reply on “City President | Pune Congress | कॉंग्रेसचा नवा शहर अध्यक्ष कोण?”

Leave a Reply