RPI : गोरगरीब व्यावसायिकांना त्रास दिल्यास शहरभर तीव्र आंदोलन छेडू : आरपीआयचा इशारा

Categories
Breaking News PMC Political पुणे

गोरगरीब व्यावसायिकांना त्रास दिल्यास शहरभर तीव्र आंदोलन छेडू

– आरपीआयचा इशारा ; शिष्टमंडळाच्या वतीने पुणे महापालिका आयुक्तांना निवेदन

पुणे : पुणे महापालिकेत प्रशासक आल्यापासून हातावर पोट असणाऱ्या व्यावसायिकांवर चुकीच्या पद्धतीने कारवाई केली जात आहे. दुसऱ्या बाजूला राजकीय वरदहस्त असणाऱ्या मोठ्या व्यावसायिकांकडे कानाडोळा केला जात आहे. परिणामी सर्वसामान्य व्यावसायिकांमध्ये अन्यायाची भावना निर्माण होत आहे. परिणामी महापालिका कर्मचारी व छोट्या व्यावसायिकांमध्ये वादाचे प्रसंग निर्माण होत आहे. नियमानुसार बेकायदेशीर वागणाऱ्या सर्वांवरच कारवाई करणे गरजेचे आहे. मात्र विनाकारण हातावर पोट असणाऱ्या व्यावसायिकांना त्रास दिल्यास शहरभर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) वतीने दिला आहे.

पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार  यांची आरपीआयच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. या वेळी दिलेल्या निवेदनात हा इशारा दिला. तसेच विविध मागण्या मांडण्यात आल्या. या वेळी पुणे शहर अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी नगरसेवक अशोक धेंडे, नगरसेविका हिमाली कांबळे, सरचिटणीस महिपाल वाघमारे, शाम सदाफुले आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.

आरपीआयच्या वतीने दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की, पुणे महापालिका कर्मचाऱ्यांवरती झालेला हल्ला अत्यंत निंदनीय आहे. त्यांचे समर्थन कोणीही करणार नाही. रिपब्लिकन पक्ष या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करीत आहे. महापालिका प्रशासक सध्या पुणे मनपामधील धोरण ठरवत आहे. महापालिकेचे काम चालवित आहेत. महापालिका कर्मचाऱ्यांना मारहाण झालेल्या घटनेच्या मुळापर्यंत गेलो तर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रशासक म्हणून आपण पदभार घेतला आहे. तेव्हापासून बेकायदेशीरपणे पथारी व्यवसाय करणारे नागरिक, बेकायदेशीरपणे झालेले बांधकाम यांचेवर कारवाई करण्याचा पहिला निर्णय घेण्यात आला. कायद्यानुसार हे बरोबर देखील आहे. परंतु कोरोनाच्या दोन वर्षामध्ये अनेक कुटुंबाची वाताहत झाली आहे. त्याचा अधिक फटका हातावर पोट असणाऱ्या व्यवसायिकांना बसला. मुलांची शाळेची फी थकलेली आहे. विविध कारणांकरिता बँकेचे कर्ज घेतले मात्र त्याचे हफ्ते रखडलेले आहे. नोकरी गमवावी लागल्याने अनेकांना हलाखीचे जीवन जगावे लागत आहे.

शहरातील गरीब कुटुंबाची जगण्याची अशी लढाई एका बाजूला चालु आहे. तर दुसऱ्या बाजूला महापालिकेचे चुकीची धोरणे हातावर पोट असणाऱ्या व्यावसायिकांच्या मानसिक तणावात भर घालत आहेत. पथपथारीवरील जिवंत माणसे काढायची आणि निर्जीव, बेकायदेशीर बांधलेले होर्डींग, राजकीय लोकांचे कार्यालय, पक्षाचे कार्यालय, विविध धार्मिक स्थळ, विविध पक्ष, संघटना, संस्था यांचे नामफलक यांच्यावर कोणीतीही कारवाई करायची नाही हे चुकीचे धोरण महापालिकेचे आहे. छोटे पथारी व्यवसायिक यांच्यवर कारवाई करताना मोठे पंचताराकिंत हॉटेल्स व मॉल मध्ये असणाऱ्या अनधिकृत बांधकामे, टेरेसवर साईट व फ्रंन्ट मार्टिनल, बेसमेंट व पार्किंग मधील चालू असलेले व्यवसाय यावर मात्र कसलीही कारवाई होत नाही. हे दुटप्पी धोरण आहे. हे देखील आपण विचारात घ्यायला पाहिजे. मनपा प्रशासक यांवर कारवाई करणार आहे का ? असा सवाल पक्षाच्या वतीने उपस्थित करण्यात आला.

बेकायदेशीरपणे झालेले व चालु असलेल्या बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश काढले. परंतु मोठे व्यवसायिक यांचेकडून अन्य बेकायदेशीरपणे झालेले बांधकाम यांना मात्र महापालिका प्रशासन अभय देत आहे. पैसेवाले, राजकीय वरदहस्त असणाऱ्यांना नियमांमध्ये सुट आहे व दुसरीकडे आर्थिक दुर्बल, राजकीय पाठींबा नसणाऱ्यांना त्रास दिला जात आहे. प्रशासक व प्रशासन यांनी फक्त एका वर्गावर अन्याय होईल असे कोणतेही धोरणांचा अवलंब करायला नको आहे. त्यांचा परिणाम हा नागरिकांमध्ये असंतोष निर्माण करण्यास पुरेसा होतो. त्यामुळेच महापालिका कर्मचारी व नागरिकांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवत आहेत. त्यामुळे महापालिका मधील सर्व स्तराच्या वर्गाना समान न्याय द्यावा. कोणाचेही जगण्याचे साधन हिरावून घेऊ नये. तसेच नागरीकांमध्ये भय, द्वेष निर्माण होईल अशी कृती होता कामा नये. अन्यथा रिपब्लिकन पक्ष पुणे शहरामध्ये उग्र आंदोलन करेल असा इशारा पक्षाच्या वतीने देण्यात आला.
————–

Swachh Survey Feedback : मनपा कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना व  मित्रांना सोबत घेऊन सकारात्मक प्रतिक्रिया घ्याव्या लागणार!

Categories
Breaking News PMC पुणे

मनपा कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना व  मित्रांना सोबत घेऊन सकारात्मक प्रतिक्रिया घ्याव्या लागणार

 : स्वच्छ क्रमवारीत सुधारणा करण्यासाठी अतिरिक्त महापालिका आयुक्त कुणाल खेमणार यांचे आदेश

पुणे :    केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण रँकिंगमध्ये मोठ्या शहरांमध्ये  क्रमवारीत  सुधारणा करण्याच्या प्रयत्नात, पुणे महानगरपालिका आहे. महापालिकेनं  (PMC) आपल्या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना व मित्रांना सोबत घेऊन याची जास्तीत जास्त माहिती देऊन  सकारात्मक प्रतिक्रिया नोंदवण्यास सांगितले आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमणार यांनी हे आदेश दिले आहेत.
 सर्व नागरी विभागांना जारी केलेल्या आदेशात, अतिरिक्त महापालिका आयुक्त कुणाल खेमनार म्हणतात की, शहरातील स्वच्छतेच्या कामांमध्ये सातत्य आहे हे तपासण्यासाठी केंद्र सरकारच्या ‘स्वच्छता’ आणि नागरिकांच्या प्रतिक्रिया मोबाइल ऍप्लिकेशन्सवर नोंदवलेल्या सकारात्मक अभिप्रायांवर सर्वेक्षणाचे महत्त्व असेल.
 “सर्व  विभागांनी आपल्या सर्व नागरी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ‘स्वच्छता’ मोबाईल ऍप्लिकेशन डाउनलोड करण्याच्या सूचना द्याव्यात आणि 25 मार्चपर्यंत शहराच्या स्वच्छतेबाबत सकारात्मक प्रतिक्रिया नोंदवाव्यात. तसेच त्यांनी नागरिकांच्या प्रतिक्रिया अर्जावरही अशाच प्रतिक्रिया नोंदवाव्यात.  सर्व  अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि मित्रांना देखील शहराच्या स्वच्छतेबद्दल सकारात्मक अभिप्राय नोंदवावा,” असे आदेशात म्हटले आहे.
 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पीएमसीच्या स्वच्छ सर्वेक्षण वॉर रूममध्ये फीडबॅक नोंदवणाऱ्या त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची नावे आणि मोबाईल क्रमांक देखील सादर करावेत.
 अतिरिक्त महापालिका आयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले आहे कि, केंद्र सरकार शहराच्या स्वच्छतेबाबत अभिप्राय घेण्यासाठी नोंदणीकृत नागरिकांना थेट फोन करू शकते त्यामुळे नागरी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबीयांना त्याबद्दल माहिती द्यावी.
 PMC ने 2021 मध्ये 2020 मध्ये 17 व्या क्रमांकावर आणि 2019 मध्ये 37 व्या क्रमांकावर सुधारणा केली. 2016 मध्ये 11 व्या क्रमांकावर, 2017 मध्ये 13 व्या आणि 2018 मध्ये 10 व्या क्रमांकावर असलेल्या 2019 मध्ये झालेल्या घसरणीने  राजकीय पक्ष तसेच नागरिक व नागरी संस्था कडून टीकेचा सामना करावा लागला होता.
 स्वच्छता अॅप द्वारे तक्रारी दाखल करणे व प्रतिक्रिया देणेबाबतची पद्धती :
• स्वच्छता MOHUAॲप play store मधून डाउनलोड व रजिस्टर करणे.
• तक्रारिचा फोटो काढून तक्रार दाखल करणे. तीन तासात आपली तक्रार निराकरण झाल्यावर त्यावर स्माईली देउन
सकारात्मक प्रतिक्रिया देणे.
2. वेब साईट द्वारे प्रतिक्रिया देण्याची पद्धती:
(SS2022VOTEFORYOURCITY CITIZEN’S FEEDBACK) https://ss-cf.sbmurban.org/#/feedback.Citizen’s feedback
Fill the general information like name, e-mail, mobile no.etc
Enter the OTP received on registered no.
Answer the questions
Submit the feedback
तरी सर्व खातेप्रमुख यांनी आपले नियंत्रणाखालील अधिकारी/कर्मचारी यांना दिनांक २५/०३/२०२२ पर्यंत वरीलप्रमाणे सकारात्मक प्रतिक्रया देणेविषयी आदेशित करून त्याचा अहवाल स्वच्छ सर्वेक्षण २०२२ वॉररूम येथे सादर करावयाचा आहे.

Dr. Kunal Khemnar : Hemant Rasane : Ideal Ward : स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमणार यांच्यावर सोपवली ‘ही’ जबाबदारी!

Categories
Breaking News PMC पुणे

सदाशिव-शनिवार आदर्श प्रभाग बनवण्याची जबाबदारी अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार यांच्याकडे

: स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांची माहिती

पुणे : सदाशिव पेठ-शनिवार पेठ प्रभाग आदर्श(Ideal ward) करण्याची प्रशासकीय जबाबदारी अतिरिक्त कुणाल खेमणार(Additional Commissioner Dr Kunal Khemnar) यांनी स्वीकारली असून याच धर्तीवर शहर आदर्श करण्यासाठी महापालिकेचे तीन अतिरिक्त आयुक्त, पंचवीस विभाग प्रमुख आणि पाच क्षेत्रिय अधिकार्यांवर अशाप्रकारची एकएका प्रभावाची जबाबदारी टाकण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने(Standing Commitee Chairman Hemant Rasane) यांनी दिली.

मध्यवर्ती पेठांचा भाग असलेल्या सदाशिव पेठ-शनिवार पेठ प्रभागातील विकासकामांची आज पाहाणी करण्यात आली. यावेळी रासने यांच्यासह अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार, नगरसेविका अड. गायत्री खडके, पाणीपुरवठा विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर, पथ विभाग प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी, मैलापाणी विभाग प्रमुख संतोष तांदळे, उपायुक्त अविनाश सपकाळ, आशीष महाडळकर, उमेश गोडगे, काशिनाथ गांगुर्डे, उदय लेले, किरण जगदाळे, परेश मेहेंदळे, अमित गोखले, मनिष जाधव, दिलीप पवार, अनिल बेलकर, विनायक घाटे, निलेश कदम, अमित कंक, सौरभ रायकर, बिरजू ननावरे उपस्थित होते.

रासने म्हणाले, हा प्रभाग आदर्श करण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून मी व्यक्तिश: लक्ष घालून पाठपुरावा करीत आहे. आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांनी तीन वेळा भेटी देऊन विकासकामांचा आढावा घेतला आहे. या दर्जाच्या अधिकार्यांच्या आदेशानंतर विकासकामांना गती मिळाली असली तरी अनेक छोटी-मोठी विकासकामे प्रलंबित आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या हेतूवर नागरिक प्रश्न उपस्थित करतात. यावर उपाययोजना म्हणून प्रशासकीय अधिकार्यांवर प्रभाग आदर्श करण्याची जबाबदारी निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

रासने म्हणाले, लक्ष्मी रस्ता आणि केळकर रस्त्यावरील पथ विभागाची कामे पूर्ण झाली आहेत. बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता आणि टिळक रस्त्यावरील पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्मार्ट सिटी विभागाची कामे आठवड्याभरात पूर्ण होतील. त्यानंतर दहा दिवसात पथ विभागाची डांबरीकरणाची कामे पूर्ण होणे अपेक्षित आहे. अंदाजपत्रकात महत्त्वाच्या २५ रस्ते सुशोभीकरणासाठी निधीची विशेष तरतूद करण्यात आली आहे. मध्यवर्ती पेठांतील सर्व रस्त्यांचा त्यात समावेश असून, सुशोभिकरण, सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना करण्यात येणार आहेत.

रासने पुढे म्हणाले, रस्त्यांवरील ड्रेनेज चेंबर समपातळीत आणणे, पदपथांची दुरूस्ती व पादचार्यांना अडथळा एमएसईबीचे डीपी आणि अनधिकृत बांधकामे हटविणे, ठिकठिकाणी साठलेला राडारोडा साफ करणे, काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्यावरच ठेवलेले पाईप उचलणे, पेव्हर ब्लॉकची दुरुस्ती करणे, स्वच्छतेच्या उपायययोजना करणे, पुरेशी प्रकाश व्यवस्था करणे, सीसीटीव्ही यंत्रणा बसविणे, अनधिकृत पोस्टर, बॅनर लावणार्यांवर कारवाई करणे अशाप्रकारच्या सुचना करण्यात आल्या. ही छोटी-मोठी कामे पंधरा दिवसांत पूर्ण करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले.

 

ऐतिहासिक शनिवारवाड्याच्या भोवताली ठिकठिकाणी राडारोडा पसरला आहे. परिसरात स्वच्छतेचा अभाव आहे. प्रकाश व्यवस्था पुरेशी नाही. सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा बसविणे गरजेचे आहे,या वास्तूचे पावित्र्य राखणे आवश्यक आहे. त्यासाठी दोन दिवसांत रंगरंगोटीसह सर्व कामे प्राधान्याने करण्याचे आदेश रासने यांनी दिले.

वृत्तपत्र विक्रेत्याचे शिल्प

शंभर वर्षांपासून आप्पा बळवंत चौक हे वृत्तपत्र वितरणाचे मुख्य ठिकाण आहे. या ठिकाणी वर्तमानपत्रांचे संकलन करून विक्रेते शहराच्या विविध भागांमध्ये त्याचे वितरण करतात. या चौकाचे ऐतिहासिक महत्त्व जतन करणे आणि वृत्तपत्र विक्रेत्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वृत्तपत्र विक्रेत्याचे शिल्प उभारण्यात येणार असल्याचे रासने यांनी सांगितले.

Unauthorized hoardings : PMC : विद्युत पोलसहित शहरात ठिकठिकाणी अनधिकृत होर्डिंगचा सुळसुळाट! : प्रशासनाची कारवाई थंडावल्याने कामकाजावर प्रश्नचिन्ह

Categories
Breaking News PMC पुणे

विद्युत पोलसहित शहरात ठिकठिकाणी अनधिकृत होर्डिंगचा सुळसुळाट!

: प्रशासनाची कारवाई थंडावल्याने कामकाजावर प्रश्नचिन्ह

पुणे : शहरात अनधिकृत होर्डिंगचा सुळसुळाट झाल्याने महापालिका प्रशासनाने यावर कारवाई करण्यासाठी एक अभियान सुरु केले होते. शिवाय महापालिका आयुक्तांनी परिपत्रक काढून दंडाची रक्कम वाढवून गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. आयुक्तांनी आदेश दिल्याने थोडे दिवस कारवाई केली गेली. मात्र मनुष्यबळाचे कारण देत ही कारवाई थांबवली गेली. शहरात ठिकठिकाणी आणि विशेष म्हणजे कुठलीही परवानगी नसताना विद्युत पोलवर बॅनर, फ्लेक्स लावले जाताहेत. यावर ना गुन्हे दाखल होताहेत ना दंड वसूल केला जातो. उल्लेखनीय बाब म्हणजे नगरसेवकांनी याबाबत तक्रारी करून देखील प्रशासन ढिम्मच आहे. प्रशासनाच्या या भूमिकेवरून कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

: प्रशासनाकडून मनुष्यबळाचे कारण केले जाते पुढे

शहराचे विद्रुपीकरण रोखण्यासाठी कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश राज्य सरकार कडून देण्यात आले आहेत. कारण याबाबत कोर्टात देखील याचिका दाखल केल्या गेल्या होत्या. त्यानुसारमहापालिका प्रशासनाने नियमावली बनवली होती. तरीही शहरात अनधिकृत होर्डिंगचा सुळसुळाट सुरूच होता. याबाबत तक्रारी आल्यानंतर मात्र महापालिका प्रशासन कारवाई करते. मात्र ही कारवाई थोडेच दिवस चालते. पुन्हा मामला जैसे थे राहतो. नुकतेच महापालिका आयुक्तांनी एक परिपत्रक जारी करत दंडाची रक्कम वाढवून गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. आयुक्तांनी आदेश दिल्याने थोडे दिवस कारवाई केली गेली. मात्र मनुष्यबळाचे कारण देत ही कारवाई थांबवली गेली. शहरात ठिकठिकाणी आणि विशेष म्हणजे कुठलीही परवानगी नसताना विद्युत पोलवर बॅनर, फ्लेक्स लावले जाताहेत. यावर ना गुन्हे दाखल होताहेत ना दंड वसूल केला जातो. याबाबत प्रशासनाला जाब विचारला तर ते एकमेकांवर ढकलून मोकळे होतात शिवाय मनुष्यबळ कमी असल्याचे कारण देतात. मात्र यामुळे महापालिकेचे नुकसान होते आहे, तसेच शहराचे विद्रुपीकरण देखील होत आहे.

: नगरसेवकांच्या तक्रारीची देखील घेतली नाही दखल

याबाबत महापालिका प्रशासनाकडे नगरसेवकांनी तक्रारी केल्या. मात्र त्यांना देखील जुमानले नाही. नगरसेविका छाया मारणे यांनी देखील वारंवार तक्रारी केल्या होत्या. शिवाय मुख्य सभेत देखील लिखित प्रश्न विचारले होते. याबाबत मारणे यांनी सांगितले कि  विभागामार्फत सन २०२१ ते २०२३ या कालावधीकरिता जाहिरात फलक नूतनीकरण चालू असल्याचे निदर्शनास येत आहे. जाहिरात फलक नूतनीकरण देताना जाहिरात फलक नियमावली २००३ अन्वये नूतनीकरण देणे अपेक्षित आहे. सन २०१९ ते २०२१ या कालावधीमध्ये जाहिरात फलक नूतनीकरण देताना परवाना निरिक्षक व संबंधित अधिकारी यांचेमार्फत नूतनीकरण देताना मोठया प्रमाणात चुकीच्या पध्दतीने नूतनीकरण दिल्याचे आढळून येते. उदा. तळभागापासून ४० फुटापर्यंत उंचीची मर्यादा असणे, फुटपाथपासून जवळ, मिळकतीमध्ये प्रकाश येण्यास अडथळा निर्माण होईल अशा फलकांना परवानगी व नूतनीकरण दिलेले आहे. सन २०२१ ते २०२३ या कालावधीतील जाहिरात फलक नूतनीकरण करताना जाहिरात फलक नियमावली २००३ चे काटेकोरपणे अंमलबजावणी करणेची खातेप्रमुख  जबाबदारी निश्चित आहे. परवाना निरिक्षकांमार्फत नियमबाहय पध्दतीने देण्यात येवू नयेत याची त्याने दक्षता घ्यावी. तसेच पुणे शहरात विविध ठिकाणी विदयुत पोलवर मोठया प्रमाणात फलक दिसून येत असून शहर विद्रुप होत आहे. परवाना निरिक्षक याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून आर्थिक हित जोपासत आहेत व मनपाचा महसूल बुडवित आहेत. या फलकांवर व संबंधित अधिकारी यांचेवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अनेक ठिकाणी प्रस्ताव
दाखल करून अंतिम मान्यता न घेता जाहिरात फलक उभारण्यात आलेले असून त्यावर जाहिरात चालू असून याकडे परवाना निरिक्षक जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून आर्थिक हित जोपासत आहेत. दाखल प्रस्तावास अंतिम मान्यता न करता प्रस्ताव जाणीवपूर्वक रेंगाळत ठेवून मनपाचे आर्थिक नुकसान करीत आहे. त्यामुळे या जाहिरात फलकांवर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी मारणे यांनी केली आहे.
 आम्ही वारंवार या विषयावर आवाज उठवला. मात्र आम्हाला देखील चुकीची उत्तरे दिली गेली. पुणे शहरात विविध ठिकाणी विदयुत पोलवर मोठया प्रमाणात फलक दिसून येत असून शहर विद्रुप होत आहे. परवाना निरिक्षक याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून आर्थिक हित जोपासत आहेत व मनपाचा महसूल बुडवित आहेत. या फलकांवर व संबंधित अधिकारी यांचेवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अनेक ठिकाणी प्रस्ताव दाखल करून अंतिम मान्यता न घेता जाहिरात फलक उभारण्यात आलेले असून त्यावर जाहिरात चालू असून याकडे परवाना निरिक्षक जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून आर्थिक हित जोपासत आहेत. त्यामुळे यावर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे.

         : छाया मारणे, नगरसेविका

शहरातील अनधिकृत होर्डिंग वर कारवाई करण्याचे निर्देश संबंधित विभागास तात्काळ दिले जातील. शिवाय आगामी काळात कारवाई करण्यासाठी मनुष्यबळाची कमी होणार नाही. कारण त्यासाठी कर्मचारी नियुक्त करण्यासाठी टेंडर प्रक्रिया लागू केली आहे. तसेच शहरातील अनधिकृत होर्डिंग चा सर्वे करण्यासाठी एक संस्था नेमली जाणार आहे. ही प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल.

            : डॉ कुणाल खेमणार, अतिरिक्त आयुक्त, महापालिका.

Shivajinagar Hinjewadi metro : शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोच्या कामासाठी महापालिका अतिरिक्त आयुक्त समन्वय अधिकारी 

Categories
Breaking News PMC पुणे

हिंजवडी मेट्रोच्या कामासाठी महापालिका अतिरिक्त आयुक्त समन्वय अधिकारी

: सर्व विभागाशी करावा लागणार समन्वय

पुणे :  हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन प्रकल्पाचे मार्गिकेमधील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकामध्ये प्रस्तावित असलेल्या मेट्रोसह एकात्मिक दुमजली उड्डाण पुलाचे प्रत्यक्ष बांधकाम व त्यानुषंगाने बॅरीकेटींग व तदनुषंगिक कामे चालू आहेत. या कामांची पूर्तता वेळेत पूर्ण होणेकामी तसेच पुणे मनपा, पोलीस विभाग, पी.एम.आर.डी.ए. स्मार्टसिटी, ई विभागांशी समन्वय साधनेकामी  अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ) कुणाल खेमणार यांची नियुक्ती करण्यात येत आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी हे आदेश जारी केले आहेत.

: महापालिका आयुक्तांचे आदेश

सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौक येथे गणेशखिंड रस्त्याने होणारी वाहतूक कोंडी विचारात घेऊन व दीर्घकालीन नियोजन करणेसाठी अस्तित्वातील पूल पाडून त्याऐवजी एकाच खाबावर (Pier) दुमजली पूलाचे (वर मेट्रो व त्या खाली दुहेरी वाहतुकीचा उड्डाणपूल) बांधकाम करणेसाठी सवलतकारा सोबत करावयाच्या पूरक करारनामा मसुद्यास महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाचीव अस्तित्वातील पूल तोडणेस पुणे महानगरपालिकेची मान्यता घेवून सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौकातील अस्तित्वातील दोन उड्डाणपुलाचे पाडकाम माहे जुलै-ऑगस्ट २०२० या कालावधीत पूर्ण करण्यात आले आहे. प्रस्तावित दुमजली उड्डाणपुलाचे बांधकाम करतेवेळी गणेशखिंड रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्राधिकरणामार्फत Traffic Diversion Plan तयार करण्यात आला असून सदर आराखड्यास  विभागीय आयुक्त, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली दि.२६/१०/२०२१ रोजी  झालोन्या पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार या कामाला गती देण्यात आली आहे. दरम्यान या कामांची पूर्तता वेळेत पूर्ण होणेकामी तसेच पुणे मनपा, पोलीस विभाग, पी.एम.आर.डी.ए. स्मार्टसिटी, ई विभागांशी समन्वय साधनेकामी  अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ) कुणाल खेमणार यांची नियुक्ती करण्यात येत आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी हे आदेश जारी केले आहेत.

Social Media : PMC : महापालिकेची कार्यप्रणाली नागरिकापर्यंत पोचवण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करा  : महापालिका अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांचे आदेश 

Categories
Breaking News PMC पुणे

महापालिकेची कार्यप्रणाली नागरिकापर्यंत पोचवण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करा

: महापालिका अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांचे आदेश

पुणे : पुणे महानगरपालिकेमार्फत नागरिकांना दैनंदिन जीवनात अनेक प्रकारच्या सेवा यशस्वीरित्या दिल्या जातात. परंतु असे आढळून आले आहे की, जनमाणसांमध्ये महापालिकेच्या कामकाजाविषयी संभ्रम असतो. महापालिकेतील वेळोवेळी होणारी सर्व कामे, तसेच नागरिकांच्या तक्रारी व सुचना योग्यप्रकारे हाताळण्याकरिता सोशल मिडीयाचा वापर होणे आवश्यक आहे. त्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्याचे निर्देश महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमनार यांनी दिले आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या 56 अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

: वेगवेगळ्या 56 अधिकाऱ्यांची नियुक्ती

पुणे महानगरपालिकेमध्ये माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत सोशल मिडिया कक्ष सुरु करण्यात आला असून माहिती तंत्रज्ञान विभागाचे स्तरावर सोशल मिडिया कक्षाचे कामकाज सुरु आहे. यामध्ये सर्व विभागांशी समन्वय व सहकार्य आवश्यक आहे. जेणेकरून पुणे महानगरपालिकेच्या विविध विभागांकडील नागरिकोपयोगी माहिती सोशल मिडिया माध्यमांवर प्रभावीपणे प्रसिद्ध करता येईल. सर्व खातेप्रमुखांना असे निर्देशित करण्यात आले आहे की, आपल्या खात्यामार्फत नागरिकोपयोगी व प्रसिद्ध करणेजोगी माहिती जसे सुरु असणाऱ्या योजना, प्रकल्प, कार्यक्रम, जाहीर प्रकटन / सूचना करण्यात येत असलेल्या उपाययोजना, प्रेसनोट इत्यादी माहिती तसेच उपलब्ध असल्यास फोटो, व्हिडीओ इत्यादी माहिती सोशल मिडिया तसेच सर्व डिजिटल प्लॅटफॉर्सवर प्रसिद्ध करणेसाठी आपल्या विभागामार्फत  SOP प्रमाणे उप आयुक्त (भांडार) यांच्याशी समन्वय साधून कार्यवाही करावी.

: अशी करावी लागणार कार्यवाही

१) खातेप्रमुख यांनी आपल्या खात्यामार्फत नागरिकोपयोगी व.प्रसिद्ध करणेजोगी माहिती जसे सुरु असणाऱ्या योजना, प्रकल्प, कार्यक्रम, जाहीर प्रकटन सूचना /, करण्यात येत असलेल्या उपाययोजना, प्रेसनोट, टिपणी इत्यादी माहिती तसेच उपलब्ध असल्यास फोटो, व्हिडीओ इत्यादी
माहिती संकलित करून त्याचा कच्चा मसुदा .उदा)Image, Video Script.) तयार करणे .
२) तसेच आपल्या विभागाबाबत घनकचरा उदा), आरोग्य, निवडणूककेंद्र / राज्य शासनाकडून ( सरकारकडून येणारे कार्यक्रम, योजना इत्यादी माहिती प्राप्त करून घेणे व माहिती सोशल मिडीया तसेच सर्व डिजिटल प्लॅटफॉर्सवर प्रसिद्ध करणेबाबत नियोजन करून सोशल मिडिया कक्षाला नमूद केलेल्या ईमेल आयडीवर पाठविणे.
३) आपले विभागामार्फत होणारे कार्यक्रम योजना याबाबतची माहिती सोशल / सुरु होणारे प्रकल्प | मिडिया तसेच सर्व डिजिटल प्लॅटफॉर्स प्रसिद्ध करणेपूर्वी किमान एक आठवडा अगोदर देणे जेणेकरून सोशल मिडिया पोस्ट डिझाईन )content) तयार करणेस पुरेसा वेळ मिळेल.
४) संकलित केलेली माहिती सोशल मिडिया तसेच सर्व डिजिटल प्लॅटफॉर्सवर प्रसिद्ध करणेसाठी “socialmedia@punecorporation.org” या ईमेल आयडीवर पाठवावी.
५) सोशल मिडिया कक्षाला आवश्यक असल्यास वीर सावरकर भवन येथील माहिती व तंत्रज्ञान विभागामध्ये सोशल मिडिया कक्ष याठिकाणी आपले विभागामार्फत माहिती )Content) तयार करून द्यावी.
६) सोशल मिडिया कक्षाकडून तयार करणेत आलेल्या पोस्टची माहिती )Content) तपासणी पडताळणी करून घेऊन तो सोशल मिडियावर प्रसिद्ध करणेसाठी मंजुरीApproval) द्यावी. प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या माहितीसाठी संबंधीत खातेप्रमुख जबाबदार राहतील
७) सोशल मिडीयावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आपल्या विभागाच्या पोस्टवर नागरिकांच्या आलेल्या टिप्पणी प्रत्युत्तर देणेसाठी सोशल मिडिया / तक्रार यास योग्य प्रतिसाद / प्रश्न / शेरा / कक्षाकडूनाracker Sheet तयार करण्यात आले असून त्या Tracker Sheet मध्ये आपल्या विभागाच्या पोस्ट समोरील टिप्पणी प्रतिसाद विनाविलंब / तक्रार यास योग्य प्रत्युत्तर / प्रश्न / शेरा/.द्यावे
८) सोशल मिडीयावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या विभागाची माहिती पोस्टचे आपलेमार्फत दैनंदिन / पर्यवेक्षण करावे व याबाबत कधी सूचना असल्यास सोशल मिडिया कक्षास कळविणे

Hemant Rasne : PMC : सदाशिव पेठ-शनिवार पेठ  प्रभागाला एकक मानून  विकासकामे पूर्ण करणार : हेमंत रासने

Categories
PMC पुणे

सदाशिव पेठ-शनिवार पेठ  प्रभागाला एकक मानून  विकासकामे पूर्ण करणार

: स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांचे आश्वासन

पुणे: शहराच्या मध्यवर्ती पेठांमध्ये सुरु असलेली विकासकामे येत्या दीड महिन्यांत पूर्ण करून परिसरातील रस्ते सुस्थितीत आणले जातील. अशी ग्वाही स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली. सदाशिव पेठ-शनिवार पेठ या प्रभागाला एक एकक मानून विविध प्रकारची विकासकामे खात्यांतर्गत समन्वयातून पूर्ण करण्यात येणार आहेत. असे ही रासने यांनी सांगितले.

: आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांच्यासोबत विकास कामांची पाहणी

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या समवेत रासने यांनी शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता, शनिवार पेठ आणि केळकर रस्ता परिसरात सुरू असलेल्या मेट्रो, रस्ते, समान पाणीपुरवठा योजना, मैलापाणी शुद्धीकरण आदी विकासकामांची पाहाणी केली.
नगरसेवक राजेश येनपुरे, गायत्री खडके, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार, उपायुक्त अविनाश सकपाळ, पथ विभागाचे प्रमुख विजय शिंदे, मैलापाणी शुद्धीकरण विभागाचे प्रमुख संतोष तांदळे, पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर, नंदकुमार जगताप, आशिष म्हाडाळकर यांच्यासह माजी नगरसेवक दिलीप काळोखे, किरण जगदाळे, परेश मेहेंदळे, अमित गोखले, मनिष जाधव, दिलीप पवार, अनिल बेलकर, विनायक रासने, सौरभ रायकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
रासने म्हणाले, एप्रिल महिन्यापासून या परिसरात विविध प्रकारची विकासकामे सुरू आहेत. या कामांची गती खूपच संथ आहे. काही भागात काम झाल्यानंतर रस्ते डांबर आणि सिमेंट कॉंक्रिट टाकून बुजविले आहेत. हे काम निकृष्ट पद्धतीने झाल्याने काही भागातील रस्ते खचले आहेत. तर काही भागातील रस्त्यांची पातळी असमान झालेली आहे. त्यामुळे वाहनचालकांना विशेषत: दुचाकीस्वारांना मोठा त्रास सहन करावा लागतो.
रासने पुढे म्हणाले, गेल्या काही दिवसांपूर्वी अतिरिक्त आयुक्तांसमवेत या भागाची पाहाणी केली. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करीत आहे. परंतु प्रशासनाचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. म्हणून आज आयुक्तांसोबत पाहाणी करून त्यांना सद्यस्थितीची माहिती दिली. पाहाणी दरम्यान समस्यांची नोंद करण्यात आली. सर्व खात्यातील समन्वयाने कालबद्ध कार्यक्रम निश्चित करून विकासकामे पूर्ण करण्यात येतील. पुढील दीड महिन्यांत या परिसरातील सर्व विकासकामे पूर्ण होऊन रस्ते सुस्थितीत येतील अशी ग्वाही देतो.

प्रभाग विकासाचा आराखडा (मॉडेल)

सदाशिव पेठ-शनिवार पेठ या प्रभागाला एक एकक मानून विविध प्रकारची विकासकामे खात्यांतर्गत समन्वयातून पूर्ण करण्यात येणार आहेत. या प्रभागात ज्या समस्या आहेत तशाच समस्या अन्य ४१ प्रभागात आहेत. आजच्या पाहाणी दौऱ्यातून एक विकासाचा आराखडा (मॉडेल) तयार करण्यात येणार आहे. त्याची अंमलबजावणी पुढील दीड महिन्यात पूर्ण करण्यात येईल. हा आराखडा अन्य प्रभागांमध्ये राबवून पुढील काळात त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल. त्यामुळे पुणेकरांना गुणवत्तापूर्ण, दर्जेदार मूलभूत सुविधा उपलब्ध होतील असा विश्वास रासने यांनी व्यक्त केला.