BJP : PMC Election : महापालिका निवडणूक मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली लढणार भाजप

Categories
Breaking News PMC Political पुणे

महापालिका निवडणूक मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली लढणार भाजप

पुणे : पुणे महापालिकेची आगामी निवडणूक भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली लढविल्या जातील अशी घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. दरम्यान, शुक्रवारी (ता.२५) प्रचारप्रमुख म्हणून राजेश पांडे यांची घोषणा केल्यानंतर आज हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक काल पक्ष कार्यालयात आयोजित केली होती. महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, संघटन सरचिटणीस राजेश पांडे हे यावेळी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, आपली निवडणुकीची तयारी शेवटच्या टप्प्यात आली आहे. बूथ स्तरापर्यंतच्या रचना पूर्ण झाल्या आहेत. शहर, विधानसभा आणि प्रभागनिहाय निवडणूक व्यवस्थापन समितीची रचना लवकरच पूर्ण होईल. जगदीश मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत भाजपचे शंभरपेक्षा जास्त नगरसेवक निवडून येतील.

Jagdish Mulik : जलसंपदा विभागाने पाण्याची प्रस्तावीत दरवाढ रद्द करावी!

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

जलसंपदा विभागाने पाण्याची प्रस्तावीत दरवाढ रद्द करावी

: भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची मागणी

पुणे : जलसंपदा विभागाने ( Department of Water Resources) राज्यातील सर्व महापालिकांना (Corporations)  दिल्या जाणाऱ्या पाण्याच्या दरामध्ये (Water rage) पाचपट वाढ प्रस्तावित केली आहे. हा निर्णय अत्यंत अन्यायकारक असून, ही प्रस्तावित दरवाढ रद्द करावी, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक (BJP city President Jagdish Mulik)  यांनी जलसंपदा विभागाकडे केली आहे.

सलग दोन वर्षे चांगला पाऊस पडल्याने पाणी कपातीचे संकट दूर होते आहे. असे असतानाच जलसंपदा विभागाचा पाणीदरात प्रचंड वाढ करण्याचा निर्णय हा अन्यायकारक आहे. राज्य सरकारच्या अनागोंदी कारभाराचा बोजा सर्वसामान्य नागरिकांवर टाकण्याचा हा प्रकार आहे. संपूर्ण राज्यात पाणीसाठा समाधानकारक असून, तो वाढविण्यासाठी कोणताही अतिरिक्त खर्च होत नसताना प्रस्तावित केलेली दरवाढ हे अनाकलनीय आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. कोरोना काळात सर्वसामान्यांना दिलासा देण्याची गरज आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने हा प्रस्ताव मागे घ्यावा व सर्वसामान्यांवर कोणताही बोजा टाकू नये, अन्यथा आंदोलन करू, असा इशाराही मुळीक यांनी दिला आहे.

Amol Balwadkar: Balewadi : बालेवाडीत 38 गाळ्यांची अद्ययावत भाजी मंडई : शाश्वत सर्वांगीण विकास हेच भाजपचे लक्ष्य

Categories
PMC Political social पुणे

बालेवाडीत 38 गाळ्यांची अद्ययावत भाजी मंडई

: शाश्वत सर्वांगीण विकास हेच भाजपचे प्रमुख उद्दिष्ट!!!

: जगदीश मुळीक यांचे प्रतिपादन

पुणे : स्मार्ट सिटी व पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून बालेवाडी येथील साई चौक येथे दहा हजार स्क्वेअर फूट मध्ये ३८ गाळ्यांच्या अद्ययावत भाजी मंडईचा भूमिपूजन समारंभ भाजपा पुणे शहर अध्यक्ष जगदीश जी मुळीक यांच्या हस्ते पार पडला. यावेळी मुळीक म्हणाले, शाश्वत सर्वांगीण विकास हेच भाजपचे लक्ष्य आहे आणि बालेवाडीतील लोकांच्या पाठीमागे भाजप नेहमीच उभी राहील.

नगरसेवक अमोल बालवाडकर यांच्या पुढाकारातून ही भाजी मंडई उभी राहत आहे. अशा वास्तूंमुळे परिसरात स्थानिक भाजी विक्रेत्यांना सुनियोजित हक्काची जागा देता येईल, होणारे अतिक्रमण रोखता येईल तसेच, नागरिकांनाही दैनंदिन अत्यावश्यक असलेल्या भाजी खरेदीसाठी एक उत्तम ठिकाण मिळेल..

याप्रसंगी नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका स्वप्नाली सायकर, नगरसेविका ज्योती कळमकर, भाजपा नेते प्रकाशतात्या बालवडकर, मा.नगरसेवक सनी निम्हण, मा.महापौर दत्तात्रय गायकवाड, बाळासाहेब रानवडे, आशाताई बालवडकर, युवा नेते लहुशेठ बालवडकर, उमा गाडगिळ, शहर उपाध्यक्ष सुनिल माने, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, राहुल कोकाटे, प्रकाशतात्या कि.बालवडकर, शिवम बालवडकर, शशिकांत बालवडकर, नितिन रनवरे, किरण तापकिर, अनिल बालवडकर, आत्माराम बालवडकर, दत्तात्रय बालवडकर, मंदार राराविकर, सुभाष भोळ, रिना सोमैया, राखी श्रीवास्तव, रोहित पाटील व परिसरातील सर्व ग्रामस्थ व ज्येष्ठ मंडळी उपस्थित होती.

Jagdish Mulik : कितीही गुन्हे दाखल केले तरी भाजप कार्यकर्ते मागे हटणार नाहीत : जगदीश मुळीक 

Categories
Breaking News PMC Political पुणे

कितीही गुन्हे दाखल केले तरी भाजप कार्यकर्ते मागे हटणार नाहीत

: जगदीश मुळीक

पुणे : भाजप नेतर किरीट सोमय्या यांच्या सत्कारावेळी बरेच भाजप कार्यकर्ते जमा झाले होते. कोविड प्रोटोकॉल चे पालन नाही झाले तर आम्ही गुन्हा दाखल करणार, असा इशारा देऊनही न ऐकल्यामुळे आता भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यावर भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कितीही गुन्हे दाखल केले तरी भाजप कार्यकर्ते मागे हटणार नाहीत, असे मुळीक म्हणाले.

मुळीक पुढे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने भाजप कार्यकर्त्यांवर सुडाच्या भावनेतून कारवाई केली आहे. शहरात गेल्या काही दिवसांत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने विविध आंदोलने आणि मोठा जमाव जमवून जाहीर कार्यक्रम केले. परंतु त्यांचावर कारवाई करण्यात आली नाही. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर महापालिकेत प्राणघातक हल्ला करण्यात आला. परंतु गुन्हेगारांवर सौम्य कलमे लावून त्यांना सोडून देण्याचा प्रयत्न केला. राज्य सरकार सर्वच क्षेत्रांत अपयशी ठरल्याने सुडाच्या भावनेतून कारवाई करीत आहे. पुणे पोलिस सरकारच्या दबावाखाली आहे. या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो. असे कितीही गुन्हे दाखल केले तरी भाजप कार्यकर्ते मागे हटणार नाहीत. सरकारचा गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार सातत्याने जनतेसमोर आणू. पुणेकर जनता या सरकारला नक्की धडा शिकवेल.

Kirit Somaiya : Pune BJP : किरीट सोमय्या यांना जिथे धक्काबुक्की झाली तिथेच होणार जंगी स्वागत!

Categories
Breaking News PMC Political पुणे महाराष्ट्र

किरीट सोमय्या यांचे पुणे महापालिकेत होणार जंगी स्वागत

: ११ फेब्रुवारीला पुन्हा पुण्यात येणार

 

पुणे: भाजप नेते किरीट सोमय्या ११ फेब्रुवारीला पुन्हा पुण्यातील महापालिकेमध्ये येणार आहेत. हिंमत असेल तर त्यांना रोखून दाखवा, असा इशारा भाजपचे प्रदेश अध्यक्ष यांनी दिला आहे. त्यामुळे भाजपा आणि शिवसेना असा वाद आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

किरीट यांना पुण्यात येण्याचे निमंत्रण देण्यात आले असून ११ फेब्रुवारीला महापालिकेच्या त्याच पायरीवर सोमय्यांचे जंगी स्वागत करणार असल्याचे भाजपाचे नेते जगदीश मुळीक यांनी सांगितले आहे. पुण्यातील भाजपच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेतली, अशी माहिती देखील जगदीश मुळीक यांनी दिली.

तत्पूर्वी, भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर पुणे महानगरपालिकेत हल्ला करण्यात आला होता. शिवसेनेचे पुणे शहराध्यक्ष संजय मोरे आणि त्याची काही साथीदार सोमय्या यांना निवेदन देण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी निवेदन न स्वीकारल्यामुळे शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. पुणे महापालिका परिसरात असताना सोमय्या यांना काही शिवसैनिकांनी रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या धक्काबुक्कीत किरीट सोमय्या महापालिकेच्या इमारतीच्या पायऱ्यांवर कोसळले. याप्रकरणी पुण्याच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी शिवसैनिकांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Pune BJP : Jagdish Mulik : १०० पेक्षा जास्त जागा जिंकू : पुणे शहर भाजपचा दावा 

Categories
Breaking News PMC Political पुणे

१०० पेक्षा जास्त जागा जिंकू

: पुणे शहर भाजपचा दावा

 

पुणे : भाजपची पुणे शहरातील संघटनात्मक बांधणी, गेल्या पाच वर्षांत महापालिकेच्या माध्यमातून केलेला नियोजनबध्द विकास, पुणेकरांचा दृढ विश्वास आणि सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या राज्यातील महविकास आघाडी सरकारवरील जनतेचा रोष यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत भाजपच्या १०० हून अधिक जागा निवडून येतील असा विश्वास शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी व्यक्त केला.

महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा प्रसिद्ध झाल्यावर मुळीक पत्रकारांशी बोलत होते.

मुळीक म्हणाले, महाविकास आघाडी सरकारमध्ये अंतर्गत कलह असल्याने आराखडा प्रसिद्ध होण्यास विलंब झाला. आराखडा तयार करताना त्यांच्यात एकवाक्यता नव्हती. प्रभागांची तोडफोड करून नवीन रचना करण्यात आली. आत्मविश्वास गमावलेल्या महाविकास आघाडीवर भाजप सहज विजय संपादन करू शकेल असा विश्वास वाटतो.

मेट्रो, समान पाणीपुरवठा, भामा आसखेड प्रकल्प, पीएमपीच्या ताब्यात मोठ्या प्रमाणात बसेसची खरेदी, नदी शुध्दीकरण योजनेला गती, अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, कोरोना काळात आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याचे काम, सेवा कार्य आणि प्रभाग स्तरावर नगरसेवकांनी केलेली विकासकामे या जोरावर आम्ही पुन्हा एकदा पुणेकरांच्या विश्वासाला पात्र ठरू.

Archana Patil : प्रभाग 19 मध्ये 3 कोटीच्या विकास कामांचे भूमिपूजन

Categories
PMC Political पुणे

प्रभाग 19 मध्ये 3 कोटीच्या विकास कामांचे भूमिपूजन

पुणे : प्रभाग क्रमांक 19 मध्ये नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांच्या विकास निधीतून 3 कोटीच्या विकास कामाचे भूमिपूजन करण्यात माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे व शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या हस्ते करण्यात आले.

माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे म्हणाले, प्रभागातील गोर गरीब जनतेला लुबडण्याचे काम येथील काँग्रेस ने केले. हीच गुंडगिरी संपवण्यासाठी आणि प्रभागाच्या विकासासाठी नगरसेविका अर्चना पाटील आणि तुषार पाटील काम करतायेत. 2019 ल कशी साथ पाटील कुटुंबाला आणि भाजप ल दिली तशीच साथ 2022 ला पण द्या.

जगदीश मुळीक म्हणाले, एकाच दिवसामध्ये तब्बल 21 कामाचे भूमपूजन होतंय, याबद्दल मी अर्चना पाटील आणि तुषार पाटील यांचे अभिनंदन करतो. त्यांनी काँग्रेस सारखा गाजावाजा न करता कामाला महत्त्व दिलाय. कारण त्यांच्या त्यांच्या मनामध्ये आणि विचारा मध्ये प्रभागाचा विकास हा एकाच ध्यास आहे.

नगरसेविका अर्चना तुषार पाटील म्हणाल्या, तुम्ही दाखवलेला विश्वास हा माझ्यासाठी खूप मोठा आशीर्वाद आहे. तुमच्या विश्वसामुळे प्रभागाचा विकास करू शकले. तुम्हाला दिलेले वचन पूर्ण करताना खूप जास्त समाधान वाटतय. आता प्रभागाच्या विकासावर काम केले आणि ते करत राहणार पण इथून पुढे प्रभागातील प्रत्येक महिला आणि आणि तरुण वर्ग सक्षम करण्यासाठी मला काम करायचं आहे. यासाठी तुमची अशीच साथ मला 2022 ला पण द्या. असे आवाहन नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांनी केली.

यावेळी माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार सुनील सुनील कांबळे , सुखदेव अडागळे, सनी अडागळे, विकी ढोले, दिनेश रासकर, मुनावर रामपुरी, रेहमान शेख , आशिष झांझोत, संध्या पवार, परवीन तांबोळी, राईस शेख, पुष्पक चव्हाण, मनीषा गायकवाड तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माथाडी कामगार संघटनेचे उपाध्यक्ष तुषार पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन बंडू चरण यांनी केले.

Atalshakti Abhiyan : 21 हजार 115 कार्यकर्त्यांकडून 1 लाख 23 हजार 343 घरात संपर्क – शहराध्यक्ष जगदीश मुळीक

Categories
Political पुणे

 21 हजार 115 कार्यकर्त्यांकडून 1 लाख 23 हजार 343 घरात संपर्क – शहराध्यक्ष जगदीश मुळीक

अटलशक्ती महासंपर्क अभियानास अपेक्षेपेक्षा जास्त यश – राजेश पांडे

प्राथमिक अंदाजानुसार एकूण 493372 नागरिकांपर्यंत संपर्क आणि संवाद

पुणे : आज पुणे शहरातील अटलशक्ती महासंपर्क अभियानात शहरातील एकूण 2854 बूथ पैकी प्रत्यक्ष 2649 बूथ वर संपर्क झाला,या सम्पर्क अभियानात 21115 कार्यकर्ते सहभागी झाले व त्यांनी तब्ब्ल 123343 ( एक लाख तेवीस हजार तीनशे त्रेचाळीस ) घरांपर्यंत संपर्क केला असल्याची प्राथमिक आकडेवारी उपलब्ध झाली असून अजूनही काही भागातील आकडेवारी चे संकलन सुरु असल्याचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक व संघटन सरचिटणीस राजेश पांडे म्हणाले.हर घर मोदी हा संकल्प घेऊन पक्षाच्या बूथ समितीतील कार्यकर्ते सकाळी 8 वाजताच बाहेर पडले व त्यांच्या यादीतील सर्व घरात संपर्क करून कुटुंबाशी संवाद साधला असेही शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी सांगितले.

कोणतीही निवडणूक नसताना कार्यकर्ता घरी येतो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार च्या लोकोपयोगी योजनांची माहिती पुस्तिका देतो याचे नागरिकांना नवल वाटले व त्यांनी घरी येणाऱ्या कार्यकर्त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले असे ह्या अभियानाचे प्रमुख पुणे शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे यांनी सांगितले.माजी पंतप्रधान भारत रत्न अटलबिहारी वाजपेयी यांना अपेक्षित असलेले कार्य यशस्वी करून आज त्यांच्या जयंती दिनी त्यांना समर्पक अभिवादन केले गेले अशी भावना व्यक्त करताना, भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील,केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती पवार,खासदार गिरीश बापट,आमदार माधुरीताई मिसाळ, आ. भीमराव तापकीर, आ. मुक्ता टिळक, आ. सिद्धार्थ शिरोळे, आ. सुनील कांबळे, महापौर मुरलीधर मोहोळ, सर्व नगरसेवक, शहर पदाधिकारी ते शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख आणि बूथ समिती सदस्यांनी आजचे अभियान यशस्वी केल्याचे ही राजेश पांडे म्हणाले. भाजप चा कार्यकर्ता हा पक्षाप्रति समर्पित कार्यकर्ता असून हीच पक्षाची ताकत असल्याचे ही राजेश पांडे यांनी स्पष्ट केले.आज एका दिवसात झालेला हा बहुधा सर्वात मोठा जनसंपर्क अभियान असावा, ज्या माध्यमातून शहरातील कला, क्रीडा, साहित्य, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, व्यवसायिक अश्या सर्व क्षेत्रातील नागरिकांपासून सामान्य माणसापर्यंत भाजपचा कार्यकर्ता पोहोचला आणि मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपेक्षित असलेल्या पक्ष संघटनेप्रतीचे आपले कर्तव्य पूर्ण करता झाला असे ही ते म्हणाले.

Atal Shakti Mahasampark Abhiyan : देवेंद्र फडणवीस म्हणतात, पुणे शहरात जिथे जाईल तिथे भाजपचेच अस्तित्व जाणवते!

Categories
Political पुणे महाराष्ट्र

पुणे शहरात जिथे जाईल तिथे भाजपचेच अस्तित्व जाणवते : देवेंद्र फडणवीस

: 25 डिसेंबरला भाजपचे अटलशक्ती महासंपर्क अभियान

पुणे : पुण्यात लोकोपयोगी कामे होत असताना सत्ता आणि संघटन एकत्रित काम करीत आहेत, त्यामुळे शहरात जिथे जार्इल तिथे भाजपचेच अस्तित्व जाणवते, असे मत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी (२५ डिसेंबर) शहर भाजपच्या वतीने अटलशक्ती महासंपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या प्रचारार्थ तयार करण्यात आलेली पुस्तिकेचे प्रकाधन, बोधचिन्ह आणि पक्षाच्या यूट्यूब चॅनेलचे अनावरण फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री नारायण राणे, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, मुक्ता टिळक, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, माजी आमदार योगेश टिळेकर, बापूसाहेब पठारे, संघटन मंत्री रवी अनासपुरे, सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, दीपक नागपुरे, दत्ता खाडे, दीपक पोटे, संदीप लोणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

मॅन टू मॅन आणि हार्ट टू हार्ट म्हणजेच मतदारांशी थेट संपर्क हे भाजपचे पारंपरिक शक्तीस्थळ आहे. मतदारांपर्यंत केंद्र आणि महापालिकेच्या माध्यमातून केलेली विकासकामे आणि योजना पोहोचवा. त्यासाठी अटलशक्ती महासंपर्क अभियान महत्त्वाचे आहे. सर्व कार्यकर्त्यांनी ते मनावर घ्या. भाजपच्या कार्यकर्त्यांनी मनावर घेतले तर ते काहीही करू शकतात. पुण्यात चांगले काम केले आहे. लोकांमध्ये सकारात्मकतेची भावना आहे. मागच्या महापालिका निवडणुकीतील रेकॉर्ड तोडून आपण त्यापेक्षा जास्त जागा जिंकू शकतो. त्यासाठी बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांना कार्यरत करण्यासाठी योग्य नियोजन आणि अंमलबजावणी करा.

राणे म्हणाले, पुणेकरांना नागरी सुविधा देऊन, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी काम करा. भाजपचे पुण्यात वर्चस्व आहे. लोकसंपर्क, लोकांचा विश्वास, जागरुकता, नियोजन, जिद्द, निष्ठा आणि प्रामाणिकपणाची जोड यामुळे निवडणुकीत विजय खेचून आणण्याचे कौशल्य प्राप्त करता येते. राजकारणात केवळ आत्मविश्वास कामाचा नाही, तर सैन्याप्रमाणे कार्यकर्त्यांनी निवडणुकीत विजय मिळेपर्यंत जागरुक राहायला पाहिजे.

पाटील म्हणाले, भाजपचे ३३ हजारहून अधिक कार्यकर्ते २५ डिसेंबरला एकाच दिवसात पुणे शहरातील दीड लाखांहून अधिक घरांत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे कार्य घराघरात पोहचविण्यासाठी अटलशक्ती महासंपर्क अभियान राबविणार आहेत. केंद्र सरकारच्या लोकोपयोगी योजना, महापालिकेची विकासकामे घरोघरी पोहोचविली जाणार आहेत या माध्यमातून संघटनचे सक्षमीकरण आणि जनसंपर्क वाढविण्यात येणार आहे.

शहराध्यक्ष मुळीक म्हणाले, सहा लाख नागरिकांपर्यंत पोहोचण्याची योजना करण्यात आली आहे. त्यासाठी मंडल बैठका, प्रभाग बैठका, शक्ती केंद्र बैठका, बूथ बैठका, बूथ समिती बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. विविध योजनांची माहिती देणारी पुस्तिका तयार करण्यात आली आहे. तिचे दीड लाख कुटुंबांमध्ये वितरण करण्यात येणार आहे.

अभियानाचे प्रमुख राजेश पांडे म्हणाले, अभियान यशस्वी करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी आठ मंडलातील ६० प्रभागप्रमुख, ६०० शक्तीकेंद्र प्रमुख, ३००० बूथप्रमुख आणि ३३ हजार बूथ संपर्क कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. विविध योजना आणि विकासकामांबरोबर कॉल सेंटर, मतदार नोंदणी, यू ट्यूब चॅनेलची माहिती दिली जाणार आहे.

Pune BJP : पुणे शहर भाजपच्या नवीन वास्तूतील मध्यवर्ती कार्यालयाचे उद्या उद्घाटन : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांची उपस्थिती

Categories
Political पुणे

पुणे शहर भाजपच्या नवीन वास्तूतील मध्यवर्ती कार्यालयाचे उद्या उद्घाटन : शहराध्यक्ष जगदीश मुळीक

पुणे : शहर भाजपच्या नवीन वास्तूतील कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते उद्या शुक्रवारी  सायंकाळी साडेपाच वाजता होणार असल्याची माहिती शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

भारतीय जनसंघ आणि भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेपासून पुणे शहर भाजपाचे कार्यालय बुधवार पेठेतील जोगेश्वरी मंदिराच्या शेजारील इमारतीत आहे. गेल्या महापालिका निवडणुकीच्या पूर्वी जंगली महाराज रस्त्यावरील ‘हॉटेल सन्मान’ येथे शहर कार्यालय स्थलांतरित केले होते.

कार्यालयाच्या कामकाजासाठी असलेली अपुरी जागा, पार्किंग, शहराचा वाढता विस्तार, भाजपाच्या कामातील नागरिकांचा वाढता सहभाग आणि अपेक्षा लक्षात घेऊन पुणे शहर भाजपा कार्यालय उद्यापासून महापालिका भवनासमोरील नवीन जागेत स्थलांतरित होत आहे.

साडेचार हजार चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या प्रशस्त जागेत कार्यालयाचे अत्याधुनिक सोयीसुविधांनी आणि संपर्काच्या दृष्टीने नवीन तंत्रज्ञानक्षम कार्यालय बनविण्यात आले आहे. बैठक कक्ष, स्वतंत्र पदाधिकारी कक्ष निर्माण करण्यात आले आहेत. या नवीन वास्तूच्या माध्यमातून पुणे शहरातील भाजपाचे जनसेवेचे काम जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोचेल आणि भाजपा दिवसेंदिवस अजून संघटनात्मक रित्या सशक्त होत जाईल असा विश्वास मुळीक यांनी व्यक्त केला.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, प्रदेश संघटन सरचिटणीस श्रीकांत भारतीय, खासदार प्रकाश जावडेकर, खासदार गिरीश बापट, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, मुक्ता टिळक, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, प्रदेश उपाध्यक्ष किरीट सोमय्या, चित्रा वाघ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहाणार आहे.