PMC Solid Waste Management Bylaws | हवा आणि ध्वनी प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या बावधन मधील मार्बल मार्केट कंपनी वर महापालिकेची कारवाई 

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Solid Waste Management Bylaws | हवा आणि ध्वनी प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या बावधन मधील मार्बल मार्केट कंपनी वर महापालिकेची कारवाई

| 50 हजाराचा दंड वसूल केला

 

PMC Solid Waste Management Bylaws | पुणे मुंबई हायवे (Pune Mumbai Highway) सेवा सर्विस रस्ता, बावधन येथील मार्बल मार्केट यांनी हवा प्रदुषण, ध्वनी प्रदुषण (Pune Air Pollution) केल्यामुळे  दंडात्मक कारवाई करून प्रशासकीय शुल्क म्हणून ५०००० रुपये दंड वसूल करण्यात आला. अशी माहिती महापालिका घनकचरा विभागाच्या (PMC Solid Waste Management Department) वतीने देण्यात आली. (PMC Solid Waste Management Bylaws)

सार्वजनिक ठिकाणी तसेच रस्ता किंवा मार्गावर अस्वच्छता करणे  कचरा टाकणे यासाठी पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून (PMC Pune Solid Waste Management Department) दंड आकारला जातो. मागील चार-पाच  महिन्यात महापालिकेने 1 कोटींहुन अधिक दंड वसूल केला आहे. घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ चे (PMC Solid Waste Management Bylaws) तरतुदींचे अनुपालन न करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांना दंड करण्याचे अधिकार नगरपरिषद / नगर पंचायत यांना शासन निर्णय नुसार देण्यात आले आहेत. (Pune Municipal Corporation (PMC))

PMC Sanitation penalty

उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन संदीप कदम, उपायुक्त परिमंडळ क्र. ० संतोष वारुळे, महापालिका सहाय्यक आयुक्त केदार वझे यांच्या आदेशानुसार तसेच वरिष्ठ आरोग्य निरीक्षक  राम सोनावणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कोथरुड बावधन क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत बावधन बुद्रुक आरोग्य कोठी अंतर्गत आरोग्य निरीक्षक हनुमंत चाकणकर, सुरज पवार, मोकादम  राम गायकवाड, बापु वाघमारे यांनी पुणे मुंबई हायवे सेवा सर्विस रस्ता येथील मार्बल मार्केट बावधन यांनी धूळ वायु प्रदुषण, ध्वनी प्रदुषण केल्यामुळे  दंडात्मक कारवाई करून प्रशासकीय शुल्क रक्कम रुपये ५००००/-रुपये दंड वसूल केला.

Pune Air Pollution | नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 6 बिल्डरांना महापालिकेकडून नोटीस

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune Air Pollution | नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 6 बिल्डरांना महापालिकेकडून नोटीस

 Pune Air Pollution | आदेश देऊनही नियमांचं उल्लंघन करणार्‍या ६ बांधकाम व्यावसायिकांना (Builders) महापालिका प्रशासनाकडून Pune Municipal Corporation (PMC) नोटीस देण्यात आली आहे. दरम्यान यापुढे राडा रोडा वाहतुक करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. अशी माहिती उपायुक्त माधव जगताप (Madhav Jagtap) यांनी दिली.  (Pune Air Pollution)

सर्वोच्च न्यायालयाने शहरातील वायु प्रदुषणाविषयी चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर खळबळून जागे झालेल्या राज्य सरकार आणि महापालिकांनी नियमावली जाहीर केली. शहरात सूक्ष्म धुलिकणांवर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेने उपाययोजना जाहीर केल्या. यात बांधकामे तसेच प्रकल्पांच्या ठिकाणी धूळ उडणार नाही, यासाठी नियमावली लागू केली. मात्र, या नियमावलीचे पालन संबंधित बांधकाम व्यावसायिकांकडून होत नसल्याचे आढळून आले आहे.

यामुळे आता प्रशासनाकडून कठोर भुमिका घेण्यास सुरुवात केली आहे. सहा बांधकाम व्यावसायिकांना नोटीस दिली आहे. बांधकामाच्या ठिकाणी बाजुने पत्रे न उभारणे, धुळीचा प्रवास रोखण्यासाठी हिरवे कापड न लावणे आदी उपाय योजना न केल्यामुळे या नोटीस दिल्या गेल्या आहेत. तसेच बांधकामाच्या ठिकाणाहून राडारोडा, खोदकाम केल्यानंतरचा मुरुम, माती आदीची वाहतुक करणार्‍यांनी तो झाकून नेला नाही तर त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे. बांधकाम व्यावसायिकांना नोटीस पाठविल्यानंतर त्यांनी उपाययोजना केली नाही तर कठोर कारवाई त्यांच्यावर केली जाणार असल्याची माहिती जगताप यांनी दिली. (Pune Air Pollution)

Air pollution in Pune | हवा प्रदूषण नियंत्रणासाठी 4 अधिकाऱ्यांचे पथक | सहाय्यक महापालिका आयुक्त यांचे राहणार नियंत्रण 

Categories
Breaking News PMC social पुणे महाराष्ट्र

Air pollution in Pune | हवा प्रदूषण नियंत्रणासाठी 4 अधिकाऱ्यांचे पथक | सहाय्यक महापालिका आयुक्त यांचे राहणार नियंत्रण

Air Pollution in Pune | पुणे शहराच्या (Pune city air pollution) हवेची गुणवत्ता खराब होत चालली आहे. देशातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून पुणे गणले जात आहे. याची गंभीरता लक्षात घेत पुणे महापालिकेने (PMC Pune) देखील गंभीरपणे पाऊल उचलले आहे. हवा प्रदूषण नियंत्रणासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने 4 अधिकाऱ्यांचे पथक नियुक्त करण्यात येणार आहे. यावर सहाय्यक महापालिका आयुक्त यांचे नियंत्रण राहणार आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी याबाबतचे आदेश नुकतेच जारी केले आहेत. (Pune Municipal Corporation)

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या आदेशांनुसार शहरामध्ये हवा प्रदूषण कमी करणे बाबत उपाययोजना व निर्देशपारित केले आहेत.  तसेच उच्च न्यायालयामध्ये मुंबई व महाराष्ट्रातील इतर शहरामधील हवा निर्देशांक खराब होत असल्यामुळे उच्च न्यायालय, मुंबई यांनी SUO MOTO PUBLIC INTEREST LITGATION पारित केलेला आहे. त्यानुसार खालीलप्रमाणे आदेश देण्यात आले आहेत.

१. बांधकाम विकास विभाग व मनपामधील सर्व अभियांत्रिकी विभाग, पुणे महानगरपालिकेमार्फत वेळोवेळी पारीत केलेल्या परिपत्रका/आदेशानुसार मनपा हद्दीतील चालू असलेले बांधकामांबायत संबंधित विकसक तसेच मनपाचे ठेकेदारामार्फत मनपाव्दारे करणेत येणाऱ्या देखभाल दुरुस्ती व विकास कामांच्या ठिकाणी नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे बाबत आदेश देण्यात यावेत. तसेच नव्याने बांधकाम परवानगी अथवा विकास कामांचा कार्यारंभ आदेश देताना आदेशामध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी दि. ०२/११/२०२३ रोजी पारित केलेल्या मार्गदर्शक आदेशांचा बाबत अटींमध्ये स्पष्ट उल्लेख करणेत यावा. तसेच सदर अटींची पूर्तता होत असल्याबाबत दक्षता घ्यावी.
२. पर्यावरण अभियांत्रिकी विभाग पर्यावरण विभाग यांनी हवा प्रदूषण नियंत्रण या उपक्रमामाकरिता मुख्य समन्वय अधिकारी म्हणून कामकाज करुन दैनंदिन अहवाल मा. अति. महापालिका आयुक्त (ज) यांचेकडे सादर करणेत यावा. तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी दि. ०२/११/२०२३ रोजी पारित केलेल्या अनुक्रमांक १८, १९, २० बायतची प्रभावीपणे अंमल असल्याची खातरजमा करणेत यावी. तसेच मुद्दा क्र. १८,१९,२० बाबतची कार्यवाही पोलीस विभाग व परिवहन विभाग [RTO] यांचेशी समन्वय साधून करणेत यावी.
३. सर्व सहाय्यक महापालिका आयुक्त सर्व सहाय्यक महापालिका आयुक्त यांच्या नियंत्रणाखाली हवा प्रदूषण नियंत्रण करणेकामी हवा प्रदूषण नियंत्रण पथक स्थापन करणे. सदर पथकामध्ये
(१) उप अभियंता (स्थापत्य),
(२) आरोग्य निरीक्षक,
(३) कनिष्ठ अभियंता / बीट निरीक्षक
(४) एम.एस.एफ. जवान यांची नेमणूक करणेत यावी.

सदर पथकाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी ०२/११/२०२३ रोजी पारित केलेल्या मार्गदर्शक आदेशांमधील अनुक्रमांक १ ते १२, १७, अनुक्रमांक २१ ते २९ नुसार कामकाज करावे, तसेच उपरोक्तमध्ये नमुद केलेल्या निर्देशाचे उल्लंघन केल्याचे निर्देशनास आल्यावर नियमानुसार कारवाई करून संबंधित विभागास कळविण्यात यावे. दैनंदिनी केलेल्या कारवाईचा अहवाल गुगल शीटवर अद्ययावत करावा. जेणेकरून दैनंदिन अहवाल एकत्रित करून मा. अति. महापालिका आयुक्त (ज) यांचेकडे सादर करणे सोयीस्कर होईल.
४. शिक्षण विभाग, माहिती व जनसंपर्क विभाग व माहिती व तंत्रज्ञान विभाग पुणे महानगरपालिकेमार्फत उपरोक्त प्रमाणे पारीत केलेल्या हवा प्रदूषण कमी करणे बाबत मनपा कार्यक्षेत्रातील रहीवाशी / नागरिकांपर्यंत पोहचविण्याकरिता व्यापक स्वरुपात जनजागृती करावी. तसेच मनपा शाळांमध्ये यायावतचे अभिनव उपक्रम राबवावेत. तसेच जन संपर्क विभागाने
व पर्यावरण विभागाने माहिती व तंत्रज्ञान विभागाशी संपर्क साधून हया प्रदुषणाशी संबंधित माहिती पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळा वर प्रसिद्धी देणे बाबतची कार्यवाही करावी.

Dry Mist Based Fountain System | पुणे महापालिकेत नुकतीच उदघाटन केलेली ड्राय मिस्ट बेस्ड फाऊंटन सिस्टीम काय आहे?

Categories
Breaking News PMC social पुणे

Dry Mist Based Fountain System | पुणे महापालिकेत नुकतीच उदघाटन केलेली ड्राय मिस्ट बेस्ड फाऊंटन सिस्टीम काय आहे?

Dry Mist Based Fountain System | शहरातील प्रमुख चौकांमध्ये वाहनांपासुन होणारे हवा प्रदूषणाचे, विशेषतः हवेतील १० मायक्रॉन आकारापर्यंतचे धूलीकण (PM10) व 2.5 मायक्रॉन आकारापर्यंतचे चे धूलीकणाचे प्रमाण कमी करण्यासाठी पुणे महानगरपालिके (Pune Municipal Corporation) तर्फे ७ चौकांमध्ये “ड्राय मिस्ट बेस्ड फाउंटन”  (Dry Mist Based Fountain System) बसविण्यात आले आहे. यामध्ये स.गो. बर्वे चौक, डेक्कन चौक, गुडलक चौक, शास्त्री नगर चौक, वाडिया कॉलेज चौक, ब्रेमेन चौक यांचा समावेश आहे. (Dry Mist Based Fountain System)
या पद्धतीमध्ये अत्यंत बारीक साइजच्या Nozzle मधून १० ते ५० मायक्रो मीटर आकाराचे Atomize झालेले पाण्याचे तुषार बाहेर पडतात. हे तुषार प्रेशर पंप च्या सहाय्याने Nozzle मधून बाहेर पडल्यानंतर हवेच्या धूलीकणांच्या संपर्कात येतात. यामुळे मिस्ट बेस्ड फाऊंटन च्या परिसरातील धूलीकणाचे प्रमाण कमी होतात. या मिस्ट बेस्ड फाऊंटन ला ड्राय मिस्ट बेस्ड फाऊंटन असे म्हटले जाते कारण यामधून पडणारे तुषार इतके बारीक असतात कि, ते जमिनीवर पडण्याअगोदर हवेत मिसळून जातात. वाहतुकीची वर्दळ व सिग्नल जवळ वाहने थांबत असल्याने वाहनांच्या धुरातून बाहेर पडणाऱ्या प्रदुषणाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे अशा प्रकारचे ड्राय मिस्ट बेस्ड फाऊंटन चौकांमध्ये बसवणे अधिक फायदेशीर ठरते. या प्रकारच्या ड्राय मिस्ट बेस्ड फाऊंटन Automizer सिस्टीम मध्ये प्रदुषणाची पातळी अंदाजे २५ ते ३० % कमी झाल्याचे एका पाहणी मधून निर्दशनास आले आहे.
—-
News Title | Dry Mist Based Fountain System | What is the recently inaugurated dry mist based fountain system in Pune Municipal Corporation?

PMC Environment Report 2022-23 | पीएमपीच्या सीएनजी व इलेक्ट्रिक बस मुळे पुणे शहराच्या वायू आणि ध्वनी प्रदूषणात घट

Categories
Breaking News Education PMC social आरोग्य पुणे

PMC Environment Report 2022-23 | पीएमपीच्या सीएनजी व इलेक्ट्रिक बस मुळे पुणे शहराच्या वायू आणि ध्वनी प्रदूषणात घट 

 

| महापालिकेच्या पर्यावरण अहवालातून करण्यात आला दावा 

PMC Environment Report 2022-23 | पुणे शहरात PMPML च्या एकूण २०७९ बसेस कार्यरत असून त्यांपैकी १४२१ सी. एन. जी. (PMPML CNG Bus) + ४५८ इलेिक्ट्रक बस (PMPML Electric Bus) मिळून स्वच्छ इंधन वर चालणाऱ्या एकूण १८७९ बसेस आहेत. सदर चे प्रमाण एकूण २०७९ बस ताफ्याच्या ९०% आहे. इलिक्ट्रक व सी. एन. जी. बसेसमुळे पुणे शहरातील वायू प्रदूषणाबरोबरच (Pune Air Pollution) ध्वनी प्रदूषणाची पातळी (Pune Sound Pollution) देखील कमी होत आहे. PMPML च्या ४५८ इलेक्ट्रिक बस डिसेम्बर २०२२ पर्यंत एकूण इलिक्ट्रक बसेस चा प्रवास ३.५० कोटी कि.मी. पेक्षा जास्त झाला आहे. अशी माहिती पुणे महापालिकेच्या  पर्यावरण सद्य:स्थिती अहवाल 2022-23 यामध्ये मांडण्यात आली आहे. (PMC Environment Report 2022-23)
पर्यावरण अहवालात पुढे म्हटले आहे कि, पुणे शहरात जून २०२३ पर्यंत एकूण ३५,९४,१३२ नोंदणीकृत वाहने. सन २०२१ ( १,६९,५५२) च्या तुलनेत सन २०२२ मध्ये नवीन २,५५,७५७ वाहनांची भर पडली आहे. महापालिका प्रशासनाकडून हा अहवाल स्थायी समितीला सादर करण्यात आला आहे. यावेळी आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त, डॉ कुणाल खेमणार, उपायुक्त माधव जगताप, पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे आदी उपस्थित होते. (Pune Municipal Corporation)

पर्यावरण अहवालातील काही ठळक गोष्टी 

पुणे शहर व परिसरात आढळणाऱ्या विविध पक्ष्यांच्साठी हॉटस्पॉट ठरलेल्या नैसर्गिक अधिवासांचे ई- बर्ड या वेबसाईटवरील मॅपींग वरून पुणे शहराच्या पूर्व भागातील कवडीपाठ या ठिकाणी सर्वाधिक २६३ प्रजाती, तर ARAI टेकडीवर २५३, पाषाण तलाव परिसरात २३६ प्रजातींचे पक्षी आढळून आले आहेत. (PMC Pune)

शहरात प्रतिदिन तयार होणारा घनकचरा: २१०० ते २२०० मे.टन. ओला कचरा ९५० मे. टन यावर कंपिस्टिंग, बायोगॅस, बल्क वेस्ट जनरेटर, होम कम्पिोस्टंग, शेतकऱ्यामार्फत जिरवला जाणारा कचरा, ओल्या कचऱ्यापासून कॉम्प्रेस्ड बायोगॅसमधून (सीबीजी) वापर PMPML बसेस साठी इंधन स्वरुपात वापरण्यास सुरुवात. सुका कचरा १२०० मे. टन : सुका कचऱ्यावर RDF रीफ्युस डीराईव्हड फ़ुएल, MRF- मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी, कचरा वेचकां माफर्त रिसायकल, सिमेंट कंपनीस थेट वापर. २०० सोसायटीमध्ये राबाविलेलेया ४० अभियानाच्या माध्यमातून ६८ टन ई-वेस्ट संकलित. स्वच्छ संस्थेच्या ‘वी कलेक्ट च्या माध्यमातून २४२ अभियानांतगर्त ६२ टन ई-वेस्ट संकलित. पुणे शहरातील विविध ठिकाणी कायर्रत कचरा प्रक्रिया प्रकल्पांमध्ये १००% कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे. उरुळी फुरसुंगी कचरा डेपो येथे बफर झोन अमृत वन अंतर्गत २१,००० वृक्षांची लागवड केली आहे.

हवा प्रदूषण मधील PM १० व PM २.५ या घटकांचे सन २०२२ मध्ये पी.एम. १० चे सरासरी प्रमाण शिवाजीनगर व हडपसर या ठिकाणी सर्वात जास्त नोंदविले गेले

२४ x ७ पाणीपुरवठा योजनेच्या कामामध्ये नियोजित १५५० कि.मी. जलवाहिन्यांची लांबी पैकी ८३० कि.मी. चे काम पूर्ण झाले आहे. ट्रान्समिशनच्या कामामधील ११५ कि.मी. पैकी ७३ कि. मी. लांबीचे काम पूर्ण झाले आहे. ३,१८,८४७ AMR मीटर पैकी १,१९,७४६ मीटर्स बसविण्यात आले आहेत.
मैलाजलशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रिया केलेले पाणी बांधकामासाठी वापरणे बंधनकारक करण्याकरिता कायार्लयीन परिपत्रक लागू केले आहे. यासाठी PMC STP WATER TANKER SYSTEM नावाचा मोबाईल अॅप तयार केला आहे. विविध बांधकाम व्यावसायिकांनी याचा वापर सुरु केला आहे. (PMC Pune news)
सन २०२०-२१ मध्ये पुणे शहराचा एकूण ऊर्जा वापर ४४६३.५९ MU ( Million Units) इतका होता तर सन २०२१-२२ मध्ये वाढून ४९८२.८९ MU इतका झाला. रहिवासी भागात सन २०२०-२१ मध्ये ऊर्जा वापर २०४५ MU इतका होता तर सन २०२१-२२ मध्ये वाढून २१४४ MU इतका झाला. उर्जेची मागणी रहिवासी भागांत सवार्त जास्त, तर त्या खालोखाल औद्यगिक आणि व्यावसायिक भागात होती.

 पुणे शहराची वाटचाल कार्बन न्यूट्रॅलिटीच्या दिशेने कशी व्हावी यासाठी महानगरपालिका, शासकीय संस्था, शैक्षणिक संस्था या क्षेत्रात काम करणारे तज्ञ व स्वयंसेवी संस्था मिळून क्लायमेट अॅक्शन सेल तयार करण्यात आला आहे.
सन २०२२ मध्ये ११२२ मि. मि. पावसाची नोंद. सर्वाधिक तापमान ४१.८ डिग्री सेल्सियस तर सर्वात कमी तापमान ८.५ डिग्री सेल्सियस

आय. जी. बी. सी. ग्रीन सिटी रेटिंग सिस्टीम अंतर्गत पुणे शहराला प्लॅटीनम रेटिंग प्राप्त झाले. शहराचा हरित विकास, ग्रीन बिल्डिंग, घनकचरा व्यवस्थापन, पाण्याची
उपलब्धता पब्लिक ट्रान्सपोर्ट मध्ये इलेक्ट्रिक बस चा वापर इ. पर्यावरण संवर्धन संबंधी केलेल्या कामासाठी प्लॅटीनम रेटिंग असलेले महाराष्ट्रातील प्रथम व भारतातील दुसरे शहर झाले आहे.
पुणे शहरामध्ये शहरांमध्ये शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी आंतरराष्ट्रीय G20 शिखर परिषदे अंतगर्त पायाभूत सुविधांवर कार्यागटाची पहिली मोठी बैठक झाली. शहरांचा विकास, शहरिकरणामुळे निमार्ण झालेल्या समस्यांवर उपाय, शहरे विकसित करण्यासाठी जागतिक स्तरावरून उपलब्ध होऊ शकणारा निधी शाश्वत जीवनशैली इत्यादी सारख्या
विषयांवर बैठकित चर्चा झाली.

माझी वसुंधरा मध्ये पुणे शहराला तृतीय क्रमांक प्राप्त झाला.
—-/
News Title | PMC Environment Report 2022-23 | Reduction in air and noise pollution of Pune city due to CNG and electric buses of PMP