Irshalwadi Landslide | Shivsena Pune | पुणे शिवसेनेच्या वतीने इर्शाळवाडीतील आपत्तीग्रस्तांना मदतीचा हात | मदतकार्यसाठी टीम रवाना

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

Irshalwadi Landslide | Shivsena Pune | पुणे शिवसेनेच्या वतीने  इर्शाळवाडीतील आपत्तीग्रस्तांना  मदतीचा हात | मदतकार्यसाठी टीम रवाना

Irshalwadi Landslide | Shivsena Pune |  पुणे शिवसेनेचे शहर प्रमुख प्रमोद उर्फ नाना भानगिरे (Pramod Bhangire) यांच्या वतीने रायगड (Raigad) येथे शिवसैनिकांची टीम पाठवत त्यांनी एक महिना पुरेल एवढे धान्य व जीवन आवश्यक्य वस्तूच्या किट देखील गावातील नागरिकांना वाटण्यासाठी दिल्या आहेत.  या अन्नधान्य किटमध्ये सर्व जीवन आवश्यक्य वस्तूचा समावेश यामध्ये आहे. पुणे शिवसेनेची (Pune Shivsena) टीम सकाळीच रायगडच्या दिशेने रवाना झाली आहे. अशी माहिती शहर अध्यक्ष नाना भानगिरे यांनी दिली. (Irshalwadi Landslide | Shivsena Pune)

 

रायगड जिल्ह्यातल्या खालापूर तालुक्यातील (Raigad Khalapur) इर्शाळवाडी (Irshalwadi) इथं बुधवारी मध्यरात्री दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या आता सोळा झाली आहे. अजूनही 100 च्या आसपास लोक बेपत्ता असल्याने मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दुर्घटनास्थळी काल मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू होतं; शंभरपेक्षा जास्त लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. सतत कोसळणारा पाऊस आणि निसरड्या वाटांमुळे बचाव कार्यात अडथळे येत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यादिवशी सकाळीच घटनास्थळी पोहचले आणि दिवसभर सुरू असलेल्या मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेतला. स्थानिक ग्रामस्थांना भेटून त्यांची विचारपूस केली आणि आवश्यक ती सर्व मदत सरकारकडून केली जाईल असं आश्वासनही दिलं.

याच पार्श्वभूमीवर पुणे शिवसेनेनं मदतीचा हात पुढे केला आहे.

—–

News Title | Irshalwadi Landslide | Shivsena Pune | On behalf of Pune Shiv Sena, a helping hand to the disaster victims in Irshalwadi Team sent for relief work

Shiv sainiks Pune | Uddhav Thackeray | पुण्यातील शिवसैनिकांना काय म्हणाले उद्धव ठाकरे? 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

पुण्यातील शिवसैनिकांना काय म्हणाले उद्धव ठाकरे?

पुण्यातील शिवसैनिकांनी नुकतीच उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी भारतीय जनता पार्टीला शिवसेना संपवायची आहे, त्यांचा डाव हाणून पाडण्यासाठी मला तुमची ताकद हवी आहे, हा प्रवास विनातिकीट करायचा आहे.  सोबत रहा अशा भावनिक शब्दांमध्ये उद्धव ठाकरे यांनी सोमवारी दुपारी पुण्यातील शिवसैनिकांना साद घातली.

मातोश्री या निवासस्थानी ठाकरे यांनी पुण्यातील शिवसैनिकांची भेट घेतली. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांच्यासह शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, महापालिकेतील माजी गटनेते पृथ्वीराज सुतार, माजी नगरसेवक विशाल धनवडे व अन्य माजी नगरसेवक, उपशहरप्रमुख रुपेश पवार, विजय देशमूख, अनंत गोयल तसेच बरेच शिवसैनिक उपस्थित होते.

ठाकरे यांनी त्यांना सांगितले की, भाजपाने शिवसेनेला संपवण्याचा विडा उचलला आहे. त्यासाठीच हे सगळे सुरू आहे. यापुढचा प्रवास विनातिकीट आहे. माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीही नाही, मात्र ताकदीने माझ्यासमोर उभे रहा, आपण शिवसेना पुन्हा उभी करू, त्यांचा डाव हाणून पाडू. फुटून बाहेर पडलेल्या आमदारांनी हिंमत असेल तर आमदारकीचा राजीनामा द्यावा व पुन्हा निवडून येऊन दाखवावे असे आव्हानही त्यांनी दिले.

Shivsena Pune : Agitation : कोशारींच्या वक्तव्यावर भाजप कडून राजीनामा घेतला जाणार का ? : शिवसेना पुणे

Categories
Political पुणे महाराष्ट्र

कोशारींच्या वक्तव्यावर भाजप कडून राजीनामा घेतला जाणार का ?

: शिवसेना पुणे

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणारे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिह कोशारी यांचा शिवसेना पुणे शहराचे वतीने जाहिर निषेध करून त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली.

कोशारींनी दाखवली आपली अर्धवट होशारी, छत्रपती शिवाजी महाराजांचा ईतिहास आणि पराक्रम संपूर्ण देशाला माहिती आहे, परदेशात त्यांच्या युद्धनीतीचा अभ्यास केला जातो. राज्यपालांना महाराष्ट्रातील इयत्ता पाचवीतील विद्यार्थी छ शिवाजी महाराजांचा ज्वलंत ईतिहास व पराक्रमाची माहिती देउ शकेल. ती त्यांनी आत्मसात करावी. महाराष्ट्रात भाजप नेत्यांकडून छत्रपती शिवरायांचा कायम अपमर्द होत आहे. आणि ईतर राज्यामधे देखील त्यामधे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, कर्नाटक सरकार, केंद्रीय मंत्री, राज्यपाल भगतसिंग कोशारी, पुणे शहर भाजप यासर्वांनी छ शिवाजी महाराजांचा अवमान केला आहे. महाराजांचा एकेरी उल्लेख करून त्यांना दुय्यम दर्जाचे स्थान देण्याचा भाजप नेत्यांकडून कायम प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले आहे. कोशारींच्या वक्तव्यावर भाजप कडून राजीनामा घेतला जाणार का ? हे जाहिर करावे.

याप्रसंगी शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, नगरसेवक संजय भोसले, पल्लवी जावळे, विशाल धनवडे, गजानन पंडित, राजेंद्र शिंदे, मतदार संघ संपर्कप्रमुख रामभाऊ कदम, दिपक शेडे, प्रशांत राणे, भरत कुंभारकर, उत्तम भुजबळ, प्रविण डोंगरे, संजय डोंगरे, उमेश गालिंदे, अनिल दामजी, चंदन साळुंके, सुरज लोखंडे, राहुल जेकटे, जावेद खान, प्रसाद काकडे, योगेश पवार, नंदू येवले, संदिप गायकवाड, जगदिश दिघे, सागर बारणे, बाळासाहेब गरुड महिला आघाडीच्या सुनिता खंडाळकर, करूणा घाडगे, प्रज्ञा लोणकर, स्वाती कथलकर, धनश्री बोराडे, वैशाली दारवटकर, जयश्री भणगे, अनुपमा मांगडे, युवा सेनेचे आकाश शिंदे, युवराज पारिख, सनी गवते, परेश खांडके, अक्षय फुलसुंदर उपस्थित होते.

Pune Shivsena : Amit Shah : शिवसेनेची गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे ‘ही’ मागणी! 

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे महाराष्ट्र

पुतळ्याची विटंबना करणाऱ्या गुंडांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करा

: शिवसेनेची गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मागणी

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच काशी विश्वेश्वर मंदिरात केलेल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत गौरवोद्गार काढले होते. या कार्यक्रमाला काही दिवस होत नाहीत तोच भाजपशासित कर्नाटक राज्यात शिवरायांची विटंबना होते आणि या घटनेतील गुंडांवर कारवाई करण्याऐवजी मराठी माणसाचाच आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जातोय, हे जास्तच संतापजनक आहे. संपूर्ण देशाचे श्रद्धास्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळय़ाची विटंबना करणाऱ्या गुंडांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी. त्यामुळे यापुढे शिवरायांचा असा अवमान करण्यास कोणीही धजावणार नाही. अशी मागणी शहर शिवसेनेच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटून केली गेली.

याबाबत शहर शिवसेना अध्यक्ष संजय मोरे म्हणाले,  कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरू शहरात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची  कानडी गुंडांनी केलेली विटंबना अत्यंत संतापजनक आहे. भारतीय जनता पार्टी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी प्रेम आणि आदर दाखवते, एवढंच काय छत्रपती शिवराय का हाथ भाजप के साथ अशा घोषणाही देते. आणि दुसऱ्या बाजूला भाजपशासित कर्नाटकात वारंवार छत्रपतींचा अवमान होतो, ही गोष्ट आपण व आपल्या पक्षाविषयी संभ्रम निर्माण करणारी आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या याविषयी भावना अतिशय तीव्र आहेत. देशातील कुठलाही शिवरायांवर प्रेम करणारा माणूस छत्रपतींचा अपमान कदापि सहन करणार नाही.

छत्रपती शिवाजी महाराजानी सर्व जाती धर्मांची रक्षा करून तमाम हिंदुस्तानात एक आदर्श निर्माण केला. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या हिंदूं धर्माची अस्मिता  आणि प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या कुशल रणनीतीचे धडे केवळ हिंदुस्थानातच नव्हे, तर जगभरात दिले जातात. अनेक देशांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभारले आहेत. मात्र, शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या महाराष्ट्राशेजारील कर्नाटक राज्यात त्यांचा अवमान करण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान शिवसेना कदापि खपवून घेणार नाही. गेल्या वर्षी बेळगावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटविण्यात आला होता. त्यापाठोपाठ आता पुन्हा त्यांच्या पुतळ्याची कानडी गुंडांनी विटंबना केली. या घटनांमधून छत्रपती शिवाजी महाराजांविषयी द्वेष स्पष्ट होत आहे. तसेच कर्नाटकाकडून सीमाभागातील मराठी भाषिकांवर अत्याचार सुरूच आहेत.

आज आपण पुणे येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या भूमीपूजनासाठी आला आहात. आपल्या हस्ते आज भूमिपूजन झाले आणि कर्नाटक मध्ये आपल्याच पक्षाचे मुख्यमंत्री घडलेल्या निंदनीय आणि अपमानास्पद घटनेला क्षुल्लक घटना म्हणून संबोधित करतात आणि ह्या घटनेचा निषेध करणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून जेलमध्ये डांबत आहेत किती हा विरोधाभास ? एक प्रकारे ते ह्या घटनेचे समर्थनच करत आहेत. हे अतिशय अशोभनीय आणि निंदनीय आहे आपल्याच पक्षाच्या कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून असे वक्तव्य होणे हे आपल्या हस्ते होणारे आज चे भूमिपूजन निरर्थकच ठरवत आहे. हे या घटनांवरून दिसून येत आहे. आपण देशाचे गृहमंत्री म्हणून कर्नाटक सरकारने दाखल केलेले गुन्हे त्वरित मागे घेण्याचे तेथील मुख्यमंत्र्यांना आदेश पारित करावेत. आज जर छत्रपती शिवाजी महाराज यांचा  वापर फक्त निवडणुकीत आणि भाषणापूरता करून बाकी काहीही झाले तर दुर्लक्षित करणे योग्य लक्षण नाही ह्याला वेळीच आळा घालणे खूप आवश्यक आहे.