Jharkhand Congress | झारखंडमधील काँग्रेस खासदाराकडील ३०० कोटींचे घबाड ही तर काँग्रेसी भ्रष्टाचाराच्या हिमनगाचे टोक! | माधव भांडारी 

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे

Jharkhand Congress | झारखंडमधील काँग्रेस खासदाराकडील ३०० कोटींचे घबाड ही तर काँग्रेसी भ्रष्टाचाराच्या हिमनगाचे टोक! | माधव भांडारी

 

 

Jharkhand Congress | भ्रष्टाचार, कमिशनखोरी, लुबाडणूक, दलाली आणि लाचखोरी याच इतिहासाने बरबरटेल्या काँग्रेसचा आणखी एक भ्रष्ट चेहरा झारखंडमध्ये उजेडात आला आहे. या राज्यात काँग्रेसचे राज्यसभा सदस्य धीरज साहू यांच्या घरात सुमारे नऊ कपाटांमध्ये खचाखच भरलेली तीनशे कोटींहून अधिक रकमेची रोकड जप्त करण्यात आली आहे. काळा पैसा आणि भ्रष्टाचार नष्ट करण्याच्या पंतप्रधान मोदी यांच्या मोहिमेतून आता काँग्रेसचा कारभार उघडकीस येऊ लागला असून जिथे काँग्रेस तिथे भ्रष्टाचार हे समीकरण झाले आहे, तर भ्रष्टाचार निपटून काढणे ही मोदी की गॅरंटी असल्याचे स्पष्ट झाले आहे, असा घणाघाती दावा भाजपचे  माधव भांडारी  (Madhav Bhandari)  यांनी पत्रकार परिषदेत केला.

झारखंडमध्ये काँग्रेसच्या एका संसद सदस्याच्या घरात ही कोट्यवधींची रोकड सापडली, तर या हिशेबाने काँग्रेसच्या अन्य नेत्यांच्या घरी आणि काँग्रेसचे सर्वेसर्वा असलेल्या गांधी कुटुंबाकडे किती संपत्ती असेल? याचा हिशेब जनतेने करावा असेही भांडारी म्हणाले.या हिशेबानुसार, गांधी परिवार हा जगातील सर्वात भ्रष्ट परिवार ठरेल, असा आरोपही त्यांनी केला. (BJP Pune)

जेथे जेथे लोकप्रतिनिधी काँग्रेसचा आहे, तेथे तेथे भ्रष्टाचाराची गॅरंटी आहे, आणि जेथे भाजप आहे, तेथे स्वच्छ कारभाराची गॅरंटी आहे, असेही श्री. भांडारी म्हणाले. काँग्रेसच्या नेते, कार्यकर्त्यांना जेथे भ्रष्टाचाराचे प्रशिक्षण मिळते, ते केंद्रस्थान आता देशाला माहीत झाले आहेच, तर त्याचे नाव गांधी करप्शन सेंटर असे ठेवावे, असा उपरोधिक सल्लाही श्री. भांडारी यांनी दिला. या परिवाराकडूनच काँग्रेसींना भ्रष्टाचाराचे प्रशिक्षण दिले जाते का, असा सवालही त्यांनी केला. या सेंटरमधून प्रशिक्षण घेतलेल्यांच्या काळ्या कमाईचा नेमका किती हिस्सा गांधी परिवाराकडे जातो त्याचा हिशेब द्या, अशी मागणी करून ते म्हणाले की, देशातील भ्रष्टाचार निपटून काढण्याची गॅरंटी देणाऱ्या मोदी सरकारने आता या भ्रष्टाचाराची पाळेमुळे खणून काढल्याखेरीज स्वस्थ बसू नये. काँग्रेसच्या एका खासदाराकडे कपाटे ओसंडू वाहतील एवढा काळा पैसा असून ज्यांच्या कृपेने हे नेते बनले त्या गरीब जनतेचे डोळे या संपत्तीने दिपून गेले असतील.

भ्रष्टाचाराचे भांडे फुटू लागल्यामुळेच सारे भ्रष्ट नेते इंडिया आघाडीच्या नावाने एकत्र आले असून एकएक प्रकरण बाहेर पडू लागल्यामुळे आता ईडी, सीबीआय, आयटीसारख्या संस्थांच्या नावाने सामूहिक रडगाणे सुरू झाले आहे. झारखंडमधील सत्तारूढ पक्षाच्या एका खासदाराचा हा घोटाळा मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या डोळ्यादेखत उघडकीस आल्याने आता त्यांना क्षणभरही सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसच्या सत्तेला खडे बोल सुनावले. इंडिया आघाडीच्या नावाने एकत्र आलेल्या सर्वांचा इतिहास भ्रष्टाचाराचाच आहे. बेंगलुरूमध्ये काँग्रेसच्या एका निकटवर्तीच्याच घरी ४२ कोटींचे घबाड सापडले होते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारमधील पार्थ चटर्जी यांच्या घरात ५० कोटींची रोकड व कोट्यवधींचे सोने सापडले होते, तर अरविंद केजरीवाल यांचा इमानदार साथीदार सत्येंद्र जैन याच्याकडेही सोन्याची नाणी व कोट्यवधींची रोकड जप्त करण्यात आल्यावर केजरीवाल यांनी मौन धारण करून भ्रष्टाचार लपविण्याची धडपड चालविली आहे, असे ते म्हणाले.

छत्तीसगडमध्ये काँग्रेस सत्तेवर असताना उघडकीस आलेल्या महादेव ऑनलाईन जुगारातील हप्तेखओरी प्रकरणात खुद्द मुख्यमंत्र्यांचेच हात बरबटले होते, म्हणूनच जनतेने त्यांना घरी बसवून मोदींच्या गॅरंटीवर गाढ विश्वास व्यक्त केला, असे श्री. भांडारी म्हणाले. काँग्रेस आणि हेमंत सोरेन यांच्याठगबंधन सरकारने मनरेगामध्ये साडोपाचशे कोटी, कोळसा खाणींच्या व्यवहारात दीड हजार कोटी, अवैध खाण उत्खननातून दीड हजार कोटी, ग्रामीण विकास निधीतून दीड हजार कोटी, जमीन घोटाळ्यातून तीन हजार कोटींच्या जनतेच्या पैशावर डल्ला मारला आहे, असा आरोप त्यांनी केला. मोदी की गॅरंटी ही केवळ निवडणूक प्रचाराचा मुद्दा नाही. भ्रष्टाचार निपटून काढण्याच्या मोदी सरकारच्या गॅरंटीने कांग्रेसच्या भ्रष्ट कारभाराच्या मुळावर घाव घालण्यास सुरवात केली असून इंडिया आघाडीतील एकामागोमाग एक भ्रष्टाचाऱ्यांना आपल्या काळ्या कारभाराचा हिशेब जनतेसमोर द्यावाच लागणार आहे असा विश्वासही भंडारी यांनी व्यक्त केला.

BJP Mahila Morcha Pune | महिला सुरक्षेविषयी पोलिसांनी कठोर पावले उचलावीत | हर्षदा फरांदे

Categories
Breaking News Political social पुणे

BJP Mahila Morcha Pune | महिला सुरक्षेविषयी पोलिसांनी कठोर पावले उचलावीत | हर्षदा फरांदे

BJP Mahila Morcha Pune | दोन दिवसांपूर्वी नाना पेठेत एका युवतीला लग्नास नकार दिल्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली त्यास पोलिसांनी अटक केली. याच पार्श्वभूमीवर पुणे शहर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाने (BJP Mahila Morcha Pune) आज पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल यांची भेट घेऊन निवेदन दिले.  (BJP Mahila Morcha Pune)

या निवेदनात महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज असल्याचे फरांदे यांनी म्हटलं आहे. काही महिन्यांपूर्वी सदाशिव पेठेत एकतर्फी प्रेमातून एका तरुणी वर कोयत्याने हल्ला केला गेला ही घटना ताजी असताना दोन दिवसांपूर्वी नाना पेठेत हा प्रकार घडला ह्या घटना गंभीर असून अशा घटना पुढील काळात घडू नये याबाबत पोलिसांनी कठोर पावले उचलावीत अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली.  (Pune News)

महिला मोर्चाच्या शिष्टमंडळात फरांदे यांच्या सह आरती कोंढरे, भावना शेळके, श्यामा जाधव , वैशाली नाईक , अश्विनी पवार , रुपाली कदम, थोरविना येनपुरे, रागिणी खडके, कोमल कुटे, उज्वला गौड, सरस्वती अडगळे आणि प्रेरणा तुळजापूरकर यांचा समावेश होता

Vidhansabha Election Results | तीन राज्यातील विजय ही लोकसभा विजयाची नांदी | धीरज घाटे

Categories
Breaking News Political पुणे

Vidhansabha Election Results | तीन राज्यातील विजय ही लोकसभा विजयाची नांदी | धीरज घाटे

Vidhansabha Election Results | पुणे | भारतीय जनता पार्टी ने मध्यप्रदेश (Madhya Pradesh), राजस्थान (Rajasthan), तसेच छत्तीसगड (Chhattisgarh) मध्ये विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) घवघवीत यश मिळवल्या नंतर भारतीय जनता पार्टी पुणे (BJP Pune) शहराच्या वतीने शहराध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate) यांच्या नेतृत्वाखाली आनंदोत्सव साजरा केला

यावेळी बोलताना घाटे म्हणाले ,’ पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या नेतृत्वावर जगाने शिक्कामोर्तब केले आहे . केंद्रातील भारतीय जनता पार्टी सरकार हे जनतेचे सरकार आहे तीन राज्यातील विजय ही लोकसभा विजयाची नांदी आहे’

यावेळी कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत ढोल ताशांच्या गजरात जल्लोष केला
यावेळी घाटे यांच्यासह पुणे भा ज पा प्रभारी माधवजी भांडारी, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, प्रदेश सचिव वर्षा डहाळे,युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस सुशील मेंगडे, कसबा निवडणूक प्रमुख हेमंत रासने, पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी ,वर्षा तापकीर, रवींद्र साळेगावकर,राहुल भंडारे उपाध्यक्ष प्रमोद कोंढरे प्रिया शेंडगे , गायत्री खडके राजेंद्र काकडे गणेश बगाडे यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Chitra Wagh | महिला मोर्चा ने सामान्य नागरिकांसाठी झटले पाहिजे | चित्रा वाघ

Categories
Breaking News Political पुणे

Chitra Wagh | महिला मोर्चा ने सामान्य नागरिकांसाठी झटले पाहिजे | चित्रा वाघ

Chitra Wagh | BJP Mahila Morcha | पुणे | आपण अडीच वर्षे विरोधात होतो आता आपण सत्तेत आहोत त्यामुळे आपली जबाबदारी वाढली आहे . महिला मोर्चाने सामान्य नागरिकांच्या प्रश्नासाठी झटून त्यांना न्याय दिला पाहिजे’ असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केले.

पुणे शहराच्या महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीपत्र वाटप व महिला मेळावा आज संपन्न झाला यावेळी शहराध्यक्ष धीरज घाटे सरचिटणीस राजेंद्र शिळीमकर , वर्षा तापकीर, महिला आघाडी अध्यक्षा हर्षदा फरांदे,माजी उपमहापौर सरस्वती शेंडगे, मंजुषा नागपुरे,रुपाली धाडवे, रंजना टिळेकर यांच्या सह महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होते.

पुढे बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, महिला ही शंभर घरे जोडू शकते रोजचे दैनंदिन प्रश्नामध्ये पुढाकार घेऊन सामान्य नागरिकांना न्याय देण्याचे काम महिला आघाडीच्या पदाधिकाराऱ्यानी केले पाहिजे कामातून माणूस मोठा होतो पदाने माणूस मोठा होत नाही त्यामुळे काम हे एकजुटीने केले पाहिजे असे मत वाघ यांनी व्यक्त केले
शहराध्यक्ष धीरज घाटे बोलताना म्हणाले की, आजची महिला ही सक्षम आहे पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक जबाबदारी यशस्वी रित्या पार पाडते महिला अघडी हा पक्षातील सर्वात महत्वाचा घटक असून पुढच्या काळात महिला सक्षमीकरण , सबलीकरण या विषयात शहर भा ज पा काम करणार आहे’

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुणे शहर महिला आघाडीच्या सरचिटणीस गायत्री खडके यांनी केले

BJP Celebrated Diwali With Katkari | भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने पालावरची दिवाळी

Categories
Breaking News cultural Political social पुणे महाराष्ट्र

BJP Celebrated Diwali With Katkari | भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने पालावरची दिवाळी

BJP Celebrated Diwali With Katkari | पुणे |  भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या (BJP Pune City) वतीने राजगड पायथ्यापाशी असलेल्या पाल बुद्रुक या अतिदुर्गम गावात कातकरी समाजच्या (Katkari Community) बांधवाबरोबर दिवाळी साजरी करण्यात आली.  शहराध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate) यांच्या नेतृत्वात कातकरी वस्ती वरील रहिवाशी यांच्या समवेत पदाधिकाऱ्यांनी दिवाळी साजरी केली. (BJP Pune)
यावेळी वस्तीवरील लहान मुलांना नवीन कपडे, फटाके, मिठाई चे वाटप महिलांना साडी चोळी, भांडी कुंडी तसेच महिना भर पुरेल एवढा शिधा देण्यात आला.
यावेळी बोलताना घाटे म्हणाले की ‘ दिवाळी हा आनंदाचा उत्सव आहे आपण शहरात मोठ्या प्रमाणात उत्सव साजरे करत असतो परंतु हा उत्सव समाजातील वंचित घटकाबरोबर साजरा करण्यात जो मनस्वी आनंद प्राप्त होतो तो अद्वितीय असतो’.

यावेळी कातकरी समाजच्या वतीने ही शहर भा ज पा चे आभार मानण्यात आले.
या उपक्रमात शहराध्यक्ष घाटे यांच्या सह सरचिटणीस पुनीत जोशी, बापू मानकर ,राजेंद्र शिळीमकर, रवींद्र साळेगावकर, महेश पुंडे, राहुल भंडारे,वर्षा तपकीर, सुभाष जंगले महिला आघाडी अध्यक्षा हर्षदा फरांदे,री ,युवा मोर्चा अध्यक्ष करण मिसाळ,ओ बी सी आघाडी नामदेव माळवदे यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

BJP Vs Mahavikas Aaghadi | कंत्राटी पद्धत हे महाविकास आघाडीचे पाप | धीरज घाटे

Categories
Breaking News Political पुणे

BJP Vs Mahavikas Aaghadi | कंत्राटी पद्धत हे महाविकास आघाडीचे पाप | धीरज घाटे

BJP Vs Mahavikas Aaghadi | राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी आघाडी सरकारच्या (MVA Government) काळात सुरू झालेल्या कंत्राटी भरतीचा (Contract Recruitment) भांडाफोड केल्यानंतर आज भारतीय जनता पार्टी पुणे (BJP Pune) शहराच्या वतीने शहराध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate) यांच्या नेतृत्वाखाली  गुडलक चौक (Goodluck Chowk Pune) आंदोलन  येथे करण्यात आले.
‘महाविकास आघाडीच्या काळात मोठ्या प्रमाणावर कंत्राटी कामगार भरती पध्द्त अवलंबण्यात आली. महायुतीचे सरकार आल्यानंतर ही कंत्राटी पद्धत कशी चुकीची आहे, हे महाविकास आघाडीचे नेते सांगत आहे. ही पद्धत कोणी आणली हे महाविकास आघाडीला विचारले पाहिजे. कंत्राटी भरतीची परंपरा हे काँग्रेस च्या काळात सुरू झाली. ती शिवसेना प्रणित महाविकास आघाडी सरकारच्या काळा पर्यंत कायम होती. हीच कंत्राटी पद्धत महायुतीचे सरकार आल्यानंतर मोडीत काढण्यात आली. त्याचाच तिळपापड होऊन आज महाविकास आघाडीचे नेते आज बेभान होऊन प्रतिक्रिया देत आहेत.  ह्या सर्व गोष्टींची माफी महाविकास आघाडी ने मागितली पाहिजे असा घणाघात धीरज घाटे यांनी केला.
यावेळी घाटे यांच्या सह महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ , महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे ,पुणे  शहर सरचिटणीस पुनीत जोशी , राघवेंद्र मानकर , राहुल भंडारे,वर्षा तापकिर ,महिला आघाडी अध्यक्ष हर्षदा फरांदे , युवा मोर्चा अध्यक्ष करण मिसाळ, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर विजय चोरमारे यांच्या सह कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

BJP Pune | Bhide Wada Smarak | ऐतिहासिक भिडे वाड्याचे रुपांतर लवकरच राष्ट्रीय स्मारकात होणार, भाजपाकडून साखर वाटून आनंदोत्सव

Categories
Breaking News PMC Political social पुणे

BJP Pune | Bhide Wada Smarak | ऐतिहासिक भिडे वाड्याचे रुपांतर लवकरच राष्ट्रीय स्मारकात होणार, भाजपाकडून साखर वाटून आनंदोत्सव

पालकमंत्री म्हणून चंद्रकांत दादा पाटील आणि महायुती सरकारने केलेल्या पाठपुराव्याला यश – हेमंत रासने

 

BJP Pune | Bhide Wada Smarak | स्त्रियांना शिक्षणाची कवाडे उगडून देणारे महात्मा ज्योतिबा फुले (Mahatma Jyotiba Phule) आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले (Dnyanjyoti Savitribai Phule) यांनी बुधवार पेठेतील भिडे वाडा (Bhide Wada Budhwar Peth) येथे पहिली शाळा (First school in pune) सुरु केली होती. गेली अनेक वर्षांपासून या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक (National Memorial)  उभारण्याची मागणी सर्व स्तरातून करण्यात येत होती. परंतु न्यायलयात सुरु असणाऱ्या खटल्यामुळे कायदेशीर अडचणी निर्माण झाली होती. आज उच्च न्यायालयाने महापलिका तसेच सरकारच्या बाजूने आपला निकाल दिला आहे. यानंतर भारतीय जनता पार्टी कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या (Kasba Constituency) माध्यमातून साखर वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी बोलताना कसबा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख हेमंत रासने (Hemant Rasane) म्हणाले, आजच्या क्षणाची लाखो नागरिक वाट पाहत होते. देशातील मुलींची पहिली शाळा भिडे वाडा येथे सुरु करण्यात आली होती, न्यायलयाने महापलिका आणि सरकारच्या बाजूने निर्णय दिल्याने आता राष्ट्रीय स्मारक उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. मी मा. श्री. चंद्रकांत दादा पाटील आणि राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार मानतो, त्यांच्या प्रयत्नांतून आज हा ऐतिहासिक क्षण आपल्या सर्वांच्या वाट्याला आला आहे. (Bhide Wada Smarak News)

कसबा विधानसभा अध्यक्ष राजेंद्र काकडे, नगरसेवक योगेश समेळ ,मनिषा लडकत, संजयमामा देशमुख. युवा मोर्चा अध्यक्ष अमित कंक,धनंजय जाधव, पुष्कर तुळजापूरकर,किरण जगदाळे, संदिप लडकत, यशोधन आखाडे, तुषार रायकर, चंद्रकांत पोटे, जयदिप शिंदे,प्रणव गंजीवाले, निर्मल हरिहर, सनी पवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. (Bhide Wada National Memorial)

भिडेवाड्यातील भाडेकरू संदर्भातील वाद न्यायालयात होता. यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून महत्वाची भूमिका बजावण्यात आली. भिडे वाड्यातील काही भाडेकरूंनी रोख मोबदला मागितला होता. महापालिकेकडून त्याची तयारी देखील दर्शवण्यात आली होती. परंतु हा वाद न्यायलयात गेल्याने कामाला विलंब होत गेला. अखेर हा खटला पालिकेने जिंकल्याने भिडे वाड्याचे स्मारक करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. श्री. चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून भिडेवाड्याचे राष्ट्रीय स्मारक व्हावे, यासाठी पालकमंत्री या नात्याने महत्वपूर्ण असे प्रयत्न केले गेले. राज्य शासनाच्या माध्यमातून देखील सातत्याने पाठपुरावा करण्यात आल्याने हे यश मिळाले आहे. (Bhide wada national memorial high court)

Pune City BJP Jumbo executive | पुणे शहर भाजपची जम्बो कार्यकारिणी जाहीर | वर्षा तापकीर, मंजूषा नागपुरे, रुपाली धाडवे, स्वरदा बापट यांच्या खांद्यावर मोठ्या जबाबदाऱ्या

Categories
Breaking News Political पुणे

Pune City BJP Jumbo executive | पुणे शहर भाजपची जम्बो कार्यकारिणी जाहीर | वर्षा तापकीर, मंजूषा नागपुरे, रुपाली धाडवे, स्वरदा बापट यांच्या खांद्यावर मोठ्या जबाबदाऱ्या 

 
 
Pune City BJP Jumbo executive | पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे (Chandrakant Bawankule) यांनी 19 जुलै रोजी एकाच वेळी राज्यातील 53 जिल्हाध्यक्षांची नियुक्ती केली होती. त्या जिल्हाध्यक्षांनी आता दोन महिन्यांनी आपापल्या कार्यकारिणी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. पुणे शहर भाजपची जम्बो कार्यकारिणी जाहीर (Pune City BJP executive) करण्यात आली आहे. त्यात माजी नगरसेविका यांना महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. यामध्ये वर्षा तापकीर, मंजूषा नागपुरे, रुपाली धाडवे यांचा समावेश आहे. तसेच माजी नगरसेवकांच्या खांद्यावर देखील मोठ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. (Pune City BJP executive)

भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी ही कार्यकारिणी जाहीर केली आहे. भाजपच्या शहराध्यक्षपदी धीरज घाटे यांची नियुक्ती झाल्यानंतर शहर कार्यकारिणी कधी जाहीर होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती, अखेर आज नवी कार्यकारणी जाहिर झाली आहे. यात माजी नगरसेवकांना प्राधान्य देण्यात आले आहे. यामध्ये राजेंद्र शिळीमकर, राहुल भंडारे, अजय खेडेकर, आदित्य माळवे, अनिल टिंगरे, हरिदास चरवड यांचा समावेश आहे.

यात प्रतीक देसरडा यांच्यावर शहर भा ज पा यु मो प्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली. तर गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट, मंजूषा नागपुरे, रुपाली धाडवे, तुषार पाटील, गणेश कळमकर, प्रमोद कोंढरे, शाम देशपांडे यांच्या खांद्यावर उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली.

भाजप युवा मोर्चा अध्यक्षपदी करण मिसाळ, महिला मोर्चा अध्यक्षपगी हर्षदा फरांदे, ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी नामदेव माळवदे व अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्षपदी भीमराव साठे तर अल्पसंख्याक आघाडी अध्यक्षपदी इम्तियाज मोमीन व व्यापारी आघाडी अध्यक्ष उमेश शहा यांची नियुक्ती करण्यात आली.

उपाध्यक्ष-
१. विश्वास ननावरे
२. प्रशांत हरसुले
३. मंजुषा नागपुरे
४.जीवन जाधव
५. सुनील पांडे
६. शाम देशपांडे
७ . प्रमोद कोंढरे
८. अरुण राजवाडे
९. तुषार पाटील
१०. स्वरदा बापट
११. योगेश बाचल
१२. भूषण तुपे
१३. संतोष खांदवे
१४. महेंद्र गलांडे
१५. रुपाली धाडवे
१६. हरिदास चरवड
१७. गणेश कळमकर
१८. प्रतिक देसर्डा (भा.ज.यु.मो. पुणे शहर प्रभारी)

सरचिटणीस
१. वर्षा तापकीर ( भा.ज.पा. महिला आघाडी पुणे शहर प्रभारी)
२. राजेंद्र शिळीमकर
३. रवी साळेगावकर
४. सुभाष जंगले
५. राघवेंद्र मानकर
६ . पुनीत जोशी
७. राहुल भंडारे
८. महेश पुंडे

चिटणीस
कुलदीप सावळेकर, किरण कांबळे, किरण बारटक्के, अजय खेडेकर, आदित्य माळवे, राहूल कोकाटे, विवेक यादव, उदय लेले, विशाल पवार, लहू बालवडकर, उमेश गायकवाड, सुनील खांदवे, प्रविण जाधव, हनुमंत घुले, रेश्मा सय्यद, अनिल टिंगरे, आनंद रिठे, दुष्यंत मोहोळ

PM Narendra Modi Birthday | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे सेवा पंधरवडा !

Categories
Breaking News Political पुणे

PM Narendra Modi Birthday | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे सेवा पंधरवडा !

– भाजपाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांची माहिती

 

PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi Birthday) यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या काळात सेवा पंधरवडा आयोजित केला असून या अभियानात विविध सेवा कार्यक्रम राबविले जाणार असल्याची माहिती भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate) यांनी दिली.

घाटे यांनी सांगितले, की सेवा पंधरवड्यात युवा मोर्चातर्फे रक्तदान व आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मोदी सरकार आणि राज्य सरकारच्या गोरगरिबांच्या कल्याणासाठीच्या योजनांची माहिती पोहोचवण्यासाठी वस्ती संपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. त्याचबरोबर २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त व्यापक प्रमाणात स्वच्छतेचे उपक्रम हाती घेतले जाणार आहेत. देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात योगदान दिलेल्या महापुरूषांचे पुतळे तसेच परिसर स्वच्छ करण्याचे कार्यक्रम ही होणार आहेत. आयुष्यमान भव सप्ताहानिमित्त गरजू जनतेकरिता आयुष्मान कार्ड वाटप तसेच नोंदणी कार्यक्रमाचेही आयोजन केले जाणार आहे. या पंधरवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यक्तिमत्व, विकासाची दृष्टी, धोरणे आणि त्यांना मिळालेले यश या विषयावरील प्रदर्शनीही आयोजित केली जाणार आहे, असे त्यांनी नमूद केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेले ९ वर्षात केंद्र सरकारच्या माध्यमातून अंत्योदयाचा विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या. सेवा,सुशासन आणि गरीब कल्याणासाठी वचनबद्ध असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पक्ष संघटनेकडून त्यांचा सेवाभाव विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे, असेही घाटे म्हणाले.

Pune Loksabha Election | BJP | पुणे लोकसभेच्या भाजपा समन्वयकपदी श्रीनाथ भिमाले!

Categories
Breaking News Political पुणे

Pune Loksabha Election | BJP | पुणे लोकसभेच्या भाजपा समन्वयकपदी श्रीनाथ भिमाले!

Pune Loksabha Election | BJP | भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशच्या (BJP Maharashtra)  ‘महाविजय २४’ (Mahavijay 24) या अभियानाच्या पुणे लोकसभा (Pune Loksabha) समन्वयकपदी महापालिकेचे माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले (Shrinath Bhosale) यांची नियुक्ती करण्यात आली असून नियुक्तीचे पत्र भिमाले यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या हस्ते पुण्यात स्विकारले.
यावेळी प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol), विक्रांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे (Rajesh Pande), शहराध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate), जगदीळ मुळीक उपस्थित होते.
भिमाले यांनी १९९८ साली भाजपा युवा मोर्चामधून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली असून २००२ पासून पुणे महापालिकेचे नगरसेवक म्हणून विजयी झाले आहेत. शिवाय २०१२ साली पुणे शहर सरचिटणीस आणि २०१७ साली पुणे महापालिकेच्या सभागृह नेतेपदाची धुराही सांभाळली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिमाले यांना ही जबाबदारी मिळाली आहे. शिवाय पुणे लोकसभेंतर्गत असणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघांचे समन्वयक म्हणूनही भिमाले यांच्याकडे जबाबदारी असणार आहे.
नियुक्तीबाबत भिमाले म्हणाले, ‘उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी  आणि पार्टीने माझ्यावर टाकलेला विश्वास आगामी काळात सार्थ करण्याचा प्रयत्न आहे. पुणे लोकसभेवर पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचाच झेंडा फडकेल, यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा मानस आहे. संघटनेत आजवर मिळालेली जबाबदारी पूर्ण क्षमतेने पार पडली असून नवी जबाबदारीही पूर्ण क्षमतेने आणि समर्पण भावनेतून निभावली जाईल’.
—-
News Title | Pune Loksabha Election | BJP | Srinath Bhimale as BJP coordinator of Pune Lok Sabha!