Finance Minister Ajit Pawar | अजित पवार यांच्याकडून कामकाजाला सुरुवात | वित्त विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन घेतला कामकाजाचा आढावा

Categories
Breaking News Commerce Political महाराष्ट्र

Finance Minister Ajit Pawar | अजित पवार यांच्याकडून कामकाजाला सुरुवात

| वित्त विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन घेतला कामकाजाचा आढावा

Finance Minister Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांच्याकडे राज्याच्या वित्त व नियोजन विभागाच्या (Finance and Planning Minister) मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे तत्पूर्वी सकाळी त्यांनी दोन्ही विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मंत्रालयात बैठक घेऊन वित्त व नियोजन विभागाच्या सद्यस्थितीची माहिती तसेच कामकाजाचा आढावा घेतला. अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, अतिरिक्त मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता यावेळी उपस्थित होते. (Finance Minister Ajit Pawar)
 उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन विभागाच्या मंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयातील त्यांच्या दालनातून कामकाजाला सुरुवात केली. सकाळी लवकर मंत्रालयात आलेल्या अजित पवार यांनी वित्त व नियोजन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर ते अभ्यागत नागरिकांना भेटले. (Ajit Pawar News)
उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांचे कार्यालय मंत्रालयातील पाचव्या मजल्यावरील 503 क्रमांकाचे दालनात असून या दालनातूनच ते आपल्या विभागांचे तसेच उपमुख्यमंत्रीपदाचे  कामकाज पाहणार आहेत.
०००००
News Title | Finance Minister Ajit Pawar Ajit Pawar started the work

Maharashtra Politics | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची पत्रकार परिषद महत्वाचे मुद्दे

Categories
Breaking News Political देश/विदेश महाराष्ट्र

Maharashtra Politics | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची पत्रकार परिषद महत्वाचे मुद्दे

 देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या कालावधीनंतर म्हणजे 1994 सालानंतर एका नेत्याच्या नेतृत्वाखाली देशात सरकार आले आहे.
 पंतप्रधान मोदी साहेबांचं नेतृत्व खंबीर, त्यामुळे परदेशात सुध्दा मोदी साहेबांना मोठा काम.
 देशात मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरु आहेत. त्यामुळे मा. नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वासोबत जाण्याचा निर्णय घेतला.
 आम्ही सगळ्यांनी एकत्रित निर्णय घेऊन सरकारमध्ये सामिल होण्याचा निर्णय.
 अनेक दिवस चर्चा सुरु होती. देशपातळीवरील आणि राज्याच्या परिस्थितीचा विचार करुन विकासासाठी आम्ही सरकार मध्ये सामिल होण्याचा निर्णय घेतला.
 मोदीसाहेब देशाला मजबुतीने पुढे नेत आहेत.
 देशाला पुढे नेण्याचे काम पंतप्रधान मोदी साहेब करत आहेत, म्हणूनचं त्यांना पाठींबा देण्याचा निर्णय.
 विकासाला महत्व देण्यासाठी सरकारमध्ये जाण्याचा निर्णय.
 शुक्रवारी विरोधी पक्षपदाचा राजीनामा दिला.
 इथून पुढच्या काळात तरुणांना संधी देण्याची गरज आहे. तरुणांना संधी देणार. त्यामुळे आदिती तटकरे, संजय बनसोडे या तरुणांना संधी.
 महिला, आदिवासी, ओबीसींना मोठ्या प्रमाणात सत्तेत संधी.
 आम्ही आमच्या अडीच वर्षाच्या काळात कोरोना असून सुध्दा विकासाकामे केली.
 आपण विकासाला महत्व देऊनच काम करतो, टीका टिपणीला महत्व देत नाही.
 पक्षातल्या बहुतेकांना आमचा निर्णय मान्य. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच आम्ही सरकार बरोबर.
 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच आणि पक्षाच्या चिन्हावर या पुढच्या निवडणुका लढविणार.
 घड्याळ या चिन्हावरच पुढच्या निवडणुका लढविणार.
 आम्ही शिवेसेनेबरोबर जाऊ शकतो तर भाजप बरोबर सुध्दा जाऊ शकतो. नागालँण्डमध्ये पक्ष यापूर्वीच भाजप बरोबर आहे.
 पक्ष वाढीसुध्दा आम्ही सर्वस्व पणाला लावणार.
 काही आमदार बाहेर आहेत, संध्याकाळपर्यंत ते मुंबईत पोहोचतील.
 पक्षाचे आमदारांसह कार्यकर्ते सुध्दा आमच्यासोबत आहेत.
 लोकशाहीत बहुमताला महत्व, त्यामुळे बहुमतानं आम्ही हा निर्णय घेतला आहे. पक्ष आमच्या सोबत आहे, नेते आमच्या सोबत आहेत. वरिष्ठांशी चर्चा करुनच निर्णय घेतला आहे.
 महाराष्ट्रातल्या तरुणांचे, शेतकऱ्यांचे, महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी सत्तेत.
 राज्यात एका पक्षाचे सरकार येण्याचे दिवस संपले त्यामुळे सहकारी पक्षांना सोबत घेऊनच राज्यातील सत्ता चालवावी लागले.
 राज्याचं आणि देशाचं हित बघुनचं सत्तेत येण्याचा निर्णय सगळ्यांनी मिळून घेतला.
******

DPDC | २६९ कोटी ३४ लक्ष रुपयांच्या स्वराज्य रक्षक संभाजी महाराज स्मारक विकास आराखड्यास मान्यता

Categories
Breaking News cultural Political पुणे महाराष्ट्र

२६९ कोटी ३४ लक्ष रुपयांच्या स्वराज्य रक्षक संभाजी महाराज स्मारक विकास आराखड्यास मान्यता

| जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न

जिल्ह्यातील ३३ कोटी ५७ लक्ष रुपयांच्या अष्टविनायक विकास आराखड्यास मान्यता

 

पुणे | जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत होणाऱ्या विकासाकामात शिक्षण, आरोग्य आणि रस्ते विकासावर अधिक भर देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. श्री.पवार यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन पुणे येथे झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ३३ कोटी ५७ लक्ष रुपयांच्या अष्टविनाय विकास आराखड्यास आणि स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांचे तुळापूर येथील स्मारक आणि वढू बुद्रुक येथील समाधीस्थळाच्या २६९ कोटी ३४ लक्ष रुपयांच्या विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली.

बैठकीस राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, वंदना चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, सामाजिक उत्तरदायित्व निधी, जिल्हा परिषद आणि जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून २६ कोटी रुपये खर्च करून प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सर्व तालुक्यात आवश्यक तेथे अंगणवाडी बांधकाम करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये चांगल्या शैक्षणिक सुविधा देण्यात येत आहेत. रस्ते विकासालाही गती देण्यात येणार आहे.

अष्टविनायक विकासासाठी अंदाजपत्रकात २५ कोटी तरतूद करण्यात आले असून पुरवणी मागण्यातही अधिक निधी देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. परिसर विकास करताना मंदिराचे मूळ स्वरूप आणि सौंदर्य कायम राहावे याकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे. सर्व कामे मंदिर व्यवस्थापनाच्या मार्गदर्शनाखाली होणार असल्याने त्यांनी यासाठी सहकार्य करावे.

स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज स्मारक आणि वढू बुद्रुक येथील संभाजी महाराजांच्या समाधीस्थळ विकास आराखड्याबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने काम सुंदर आणि भव्य होईल याकडे विशेष लक्ष द्यावे. स्मारक आणि समधीस्थळाला भेट देण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक येण्याची शक्यता लक्षात घेता वाहनतळाचे योग्य नियोजन करावे, लोकप्रतिनिधींनी याबाबत सूचना केल्यास त्यांचाही अंतर्भाव करण्यात येईल, असे पवार यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी गतवर्षी जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत झालेला खर्च, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज स्मारक आणि वढू बुद्रुक येथील संभाजी महाराजांच्या समाधीस्थळ विकास आराखड्याबाबत करण्यात आलेल्या नियोजनाची आणि अष्टविनायक परिसर विकास आराखड्याची माहिती दिली.२०२१-२१ या वर्षात जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत १०० टक्के , अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत ९९.६९ आणि आदिवासी उपयोजनेअंतर्गत ९९.९२ टक्के खर्च झाल्याचे त्यांनी सांगितले.

बैठकीस आमदार महादेव जानकर, अतुल बेनके, दिलीप मोहिते पाटील, अशोक पवार, भीमराव तापकीर, संजय जगताप, सुनील शेळके, माधुरी मिसाळ, राहुल कुल, संग्राम थोपटे, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, राजेश पाटील, पीएमआरडीएचे सुहास दिवसे, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी संजय मरकळे आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Varunraj Bhide Memorial Award : उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कै. वरुणराज भिडे स्मृति पुरस्कार वितरण

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कै. वरुणराज भिडे स्मृति पुरस्कार वितरण

महाराष्ट्राचे ऐक्य अबाधित ठेवण्यासाठी माध्यमांनी जबाबदारीने काम करावे-अजित पवार

पुणे :- महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा जपण्याची आपणा सर्वांची जबाबदारी असून माध्यमांनी राज्याचे ऐक्य अबाधित ठेवण्यासाठी जबाबदारीने काम करावे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

नवी पेठ येथील एस. एम. जोशी फाऊंडेशन सभागृहात पत्रकार वरुणराज भिडे मित्रमंडळाच्यावतीने ज्येष्ठ पत्रकार कै. वरुणराज भिडे स्मृति पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष  मधुकर भावे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर, माजी आमदार उल्हास पवार, माजी महापौर अंकुश काकडे, प्रशांत जगताप आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले,  कै. वरुणराज भिडे हे व्यासंगी, अभ्यासू,  उत्तम पत्रकार म्हणून पुणे शहरासह महाराष्ट्रात परिचित आहेत. ते अत्यंत स्पष्टपणे आपली भूमिका मांडत असत. राजकीय घराणी, सामाजिक व धार्मिक संघटनांचा अभ्यास आणि पाणी प्रश्न या विषयांवर त्यांचा मोठ्या प्रमाणात व्यासंग, अभ्यास असल्याने त्यांनी या विषयीचे भरपूर लेखन केले. राजकीय घराणी हा विषय राज्यात खूप मोठ्या प्रमाणात गाजला. सामाजिक व धार्मिक संघटनाविषयी केलेले भाष्य टोकदार आणि परखड होते. सर्व प्रकारच्या क्षेत्रातील व्यक्तींशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते.

महाराष्ट्राच्या पत्रकारितेला गौरवशाली परंपरा आहे. स्वातंत्र्य चळवळीत राजकीय व सामाजिक भान निर्माण करण्याचे काम पत्रकारांनी केले. सामाजिक परिवर्तनासाठी आणि लोकजागृतीचे महत्वाचे साधन म्हणून पत्रकारिता काळानुरुप वेगाने बदलत आहे. वृत्तपत्राची कागदावरील आवृत्ती ते संगणक, खिळे जुळविण्यापासून ते डिजीटल प्रिटींग आणि मुद्रीत माध्यम ते दूरचित्रवाणी वाहिन्या तसेच आत्ताच्या काळात दैनंदिन वापरला जाणारा समाज माध्यम असा प्रवास झालेला आहे.

मागील काही वर्षापासून माध्यमांचे स्वरुप बदलत चालले असून हा प्रवास मुद्रीत माध्यमांपासून ते आजच्या समाज माध्यमापर्यंत येवून पोहचला आहे. समाज माध्यमांनी संपूर्ण जग व्यापले आहे. सेकंदा-सेकंदाला अद्यावत माहिती पोचविण्याचे काम करताना हा वेग सर्वांना थक्क करणारा आहे. या वेगाशी जुळवून घेतल्यास स्पर्धेत टिकण्यास मदत होईल.

तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांच्या हातात भ्रमणध्वनी, इंटरनेटची मोठी शक्ती आली आहे. समाज माध्यमांचा वापर सामान्य जनता करीत आहे. समाज माध्यम हे दुधारी हत्यार असून त्याचा वापर अंत्यत काळजीपूर्वक, सामाजिक भान ठेवून करावा. मुख्य प्रवाहातल्या संपादकांनी पुढाकार घेवून पत्रकारितेला योग्यप्रकारचे वळण लावण्यासाठी पावले उचलण्याचे आवाहन त्यांनी केले.

सुसंस्कृत महाराष्ट्राची घडी बसविण्याचे स्व. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक अशा अनेक दिग्गज नेत्यांनी केले आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी आपण सर्वांनी एकजुटीने काम केले पाहिजे. विकासाच्या बाबतीच वृत्तपत्रांनी विधायक सूचना मांडाव्यात, असेही त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते दै. लोकसत्ताचे संतोष प्रधान, महाराष्ट्र टाइम्सचे धमेंद्र कोरे, टाइम्स ऑफ इंडियांच्या अलका धुपकर, एबीपी माझाचे राहुल कुलकर्णी (प्रतिनिधी मिकी घई) आणि सामनाच्या मेधा पुंडे -पालकर यांना कै. वरुणराज भिडे स्मृति पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पुरस्कार्थी निवड समितीतील परीक्षक पराग करंदीकर, मुंकुद संगोराम, अद्वैत मेहता व जयराम देसाई तसेच वृत्तपत्र परीक्षेत प्रथम क्रमांकाने उर्तीण झालेल्या रोहित वाळींबे आणि आतीत शेख यांनादेखील यावेळी सन्मानित करण्यात आले.

किशोर राजे निंबाळकर यांना ‘एमपीएससी’चे निकाल विक्रमी वेळेत जाहीर करण्याबद्दल सन्मानित करण्यात आले.

PMRDA Budget : PMRDA च्या  2 हजार 419 कोटीच्या अंदाजपत्रकास मान्यता

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

PMRDA च्या  2 हजार 419 कोटीच्या अंदाजपत्रकास मान्यता

: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची बैठक संपन्न

पुणे: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृष्य प्रणालीद्वारे झालेल्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) सभेच्या बैठकीत प्राधिकरणाच्या 2022-23 साठीच्या 2 हजार 419 कोटी रुपये महसूली व भांडवली खर्चाच्या संभाव्य अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे मंत्रालयातून तसेच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. बैठकीस वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, पीएमआरडीएचे महानगर आयुक्त सुहास दिवसे मंत्रालयातून तर पुणे महानगर पालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आदी दूरदृष्य प्रणालीद्वारे यावेळी उपस्थित होते.

प्राधिकरणाने 2023-24 साठी 1 हजार 334 कोटी रुपये आरंभीची शिल्लक आणि बांधकाम परवानगी, टीओडी, टीडीआर, सुविधांसाठी तसेच इतर जागा भाडेकराराने देणे, भूखंड अधिमूल्य, मुद्रांक शुल्क, व्याजाची रक्कम वित्तीय संस्थांमार्फत अथवा कर्ज, रोखे याद्वारे निधी उभारणी आदी स्वरुपात 1 हजार 859 कोटी अशा एकूण 3 हजार 193 कोटी रुपयांच्या जमा रकमेचा अंदाजपत्रकात समावेश केला असून भांडवली खर्च आणि महसूली खर्चासाठी 2 हजार 419 रुपये एकूण अंदाजपत्रक मांडले आहे. या अंदाजपत्रकात पीएमआरडीएकडून हाती घेण्यात आलेले गृहनिर्माण प्रकल्प, रिंग रोड, विविध नगररचना योजना आणि नाविन्यपूर्ण योजनांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.

जागतिक बँक समूहाची सदस्य असलेली इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेसोबत (आयएफसी) सामंजस्य करार करण्यास मान्यता देण्यात आली. हा बंधनविरहित स्वरूपाचा करार झाल्यानंतर आयएफसी ही संस्था पीएमआरडीएला सल्लागार सेवा, पायाभूत सुविधा प्रकल्पांचा अभ्यास, क्षमता विकास कार्यक्रम तसेच प्रकल्पनिहाय वित्तीय पुरवठा करणार आहे.

युरोपिअन संघाच्या अंतर्गत शहरी आणि प्रादेशिक सहकार्य कार्यक्रम (इंटरनॅशनल अर्बन ॲण्ड रिजनल कोऑपरेशन) या संस्थेसोबत आणि जर्मनी येथील कार्लस्रुहे सिटी कौन्सिल या संस्थेसोबत पुणे महानगर प्रदेशात एक सुनियोजित इंटीग्रटेड टाऊनशीप उभारण्यासाठी करार करण्यास मान्यता देण्यात आली. या प्रस्तावित शहरात औद्योगिक रहिवास आणि वाणिज्य अशा एकात्मिक सुविधा असतील. त्यासाठी मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूक, तंत्रज्ञानाची देवाणघेवाण होणार असून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणे अपेक्षित आहे.

पुणे मेट्रोलाईन-३ (हिंजवडी-शिवाजीनगर) या मार्गिकेच्या नावात अंशतः बदल करून पुणे मेट्रोलाईन-३ (माण-हिंजवडी-शिवाजीनगर) असे करण्यास मान्यता देण्यात आली. आंतरराष्ट्रीय स्तरावरील पीएमआर ओपन टेनिस स्पर्धेसाठी १ कोटी रुपये क्रीडा संचालनालयाला देण्यासही बैठकीत मान्यता देण्यात आली.

मेट्रो लाईन- ३ मार्गिकेतील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील पाडण्यात आलेल्या पुलाच्या ठिकाणी मेट्रोसह एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे बांधकाम आवश्यक खर्चास मान्यता देण्यात आली.

मुळशी तालुक्यातील म्हाळुंगे नगर रचना योजना क्र. १ अंतर्गत रस्ते, पूल, मोऱ्या, पावसाळी गटारी, सांडपाणी व्यवस्थापन, विद्युत पुरवठा उपकेंद्र म्हाळुंगे हाय टेक सिटी विकसित करण्यास सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) अथवा ईपीसी तत्वावर टप्पेनिहाय विकास करण्यास मान्यता देण्यात आली.

मेट्रो लाईन-3 प्रकल्पासाठी व विद्यापीठ चौकातील नवीन एकात्मिक उड्डाणपुलासाठी ग्रामीण पोलीस विभागाच्या औंध येथील 1 हजार 893 चौरस जागेचे हस्तांतरण करुन त्याऐवजी एकूण 1 हजार 960 चौरस मीटर क्षेत्राचे दोन सुविधा भूखंड ग्रामीण पोलीस विभागास हस्तांतरण करण्यास मान्यता देण्यात आली. या मेट्रो लाईनसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी थेट खरेदी प्रक्रियेने संपादित करण्यासाठी करण्यात आलेल्या खर्चासही कार्योतर मान्यता देण्यात आली.

बैठकीस पुणे येथील पीएमआरडीए कार्यालयातून अतिरिक्त महानगर आयुक्त बन्सी गवळी, सह आयुक्त स्नेहल बर्गे, उपायुक्त रामदास जगताप आदी उपस्थित होते.

MLC : विधान परिषदेच्या दहा सदस्यांना निरोप!

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

विधान परिषदेच्या दहा सदस्यांना निरोप

 

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेतून दहा सदस्य लवकरच निवृत्त होत असून या सर्व सदस्यांना निरोगी व दीर्घायुष्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या.

विधानपरिषदेतून सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई, सदस्य सर्वश्री दिवाकर रावते, सदाशिव खोत, सुजितसिंह ठाकूर, विनायक मेटे, प्रसाद लाड, संजय दौंड, रवींद्र फाटक हे दहा सदस्य निवृत होणार आहेत. या सदस्यांना सभागृहात निरोप देण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व दहा सदस्यांच्या कारकीर्दीविषयी व त्यांच्या सभागृहातील कामगिरीविषयी आपले विचार व्यक्त केले.

सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं अभ्यासू, सुसंस्कृत, उच्चशिक्षित व्यक्तिमत्वं म्हणून ओळखले जाते. फलटण राजघराण्याचे २९ वे वंशज म्हणूनही त्यांचं जनमानसात वेगळे स्थान आहे. प्राध्यापक, फलटणचे नगराध्यक्ष, विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे आमदार, राज्याचे मंत्री, विधान परिषदचे सभापती अशा जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. त्यांनी त्यांच्या कार्यातून विधिमंडळ सभागृहाची उंची वाढवण्यासाठी योगदान दिले आहे. त्यांच्यासोबतच्या अनेक आठवणी उपस्थित सदस्यांच्या मनात कायम राहतील, असे उपमुख्यमंत्री म्हणाले.

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सभागृहात निश्चितच चांगलं काम केले आहे. ते सहकारी बँकिंग क्षेत्रातून पुढं आलेलं नेतृत्व असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.

उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी महाराष्ट्रासारख्या औद्योगिक, व्यापारी, आर्थिकदृष्ट्या प्रगत राज्याचे उद्योगमंत्री म्हणून काम करताना, या राज्यात औद्योगिक गुंतवणूक वाढावी, उद्योगधंद्यांचा विकास व्हावा, उद्योगांसाठी पोषक वातावरण निर्माण व्हावे, यासाठी त्यांनी केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.

सदस्य दिवाकर रावते यांनी मराठी भाषेसाठी आणि मराठी बांधवांच्या हक्काच्या लढ्याचा वसा आणि वारसा पुढे नेला आहे. या सभागृहातली त्यांची भाषणे, विचार पुढे नेणारी होती, असे उपमुख्यमंत्री म्हणाले.

सदाभाऊ खोत हे शेतकरी संघटनेच्या चळवळीतून पुढे आलेले नेतृत्व आहे. शेतकरी संघटनेचे नेते, दिवंगत शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदाभाऊंनी चळवळीच्या कामाला सुरुवात केली. सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यातल्या मरळनाथपूर सारख्या छोट्याशा गावातला, सामान्य शेतकऱ्याच्या घरी जन्‍मलेला युवक या सभागृहाचा सदस्य होतो, राज्याच्या मंत्रीमंडळात काम करतो, ही मोठी गोष्ट असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.

सुजितसिंह ठाकूर हे विधीमंडळात मराठवाड्याचं प्रतिनिधीत्वं करतात. त्यांनी राजकीय, सामाजिक जीवनाची सुरुवात, परांड्यांतून केली. राजकारण, समाजकारण, सहकाराच्या बरोबरीनं शिक्षण क्षेत्रात योगदान दिलं. त्यांच्या तिथल्या ज्ञानाचा, अनुभवाचा उपयोग त्यांना सभागृहात निश्चितपणे झाला.

विनायक मेटे यांचे संघटन कौशल्य चांगलं आहे. त्यांच्याकडे वक्तृत्वं, वकूब आहे. त्यांच्या या गुणांचा फायदा समाजाला झाला पाहिजे. त्यासाठी त्यांना शुभेच्छा देत असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.

सदस्य प्रसाद लाड हे राजकारण, समाजकारण, उद्योग, सेवा अशा अनेक क्षेत्रात एकाच वेळी काम करणारं नेतृत्व आहे. राज्यातल्या एका उद्योगशील प्रतिनिधीला या सभागृहाच्या माध्यमातून आपण निरोप देत असल्याची भावना आपल्या सगळ्यांच्या मनात असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.

बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यात जन्मलेल्या आमदार संजय दौंड यांना त्यांचे वडील माजी मंत्री पंडीतराव दौंड यांचा राजकीय, सामाजिक वारसा लाभला आहे. तो वारसा ते समर्थपणे पुढे चालवत आहेत. बीड जिल्हा परिषद सदस्य म्हणून संजय दौंड यांचा राजकीय प्रवास सुरु झाला. स्थानिक स्वराज्य संस्थेत प्रदीर्घ काळ काम केल्यामुळं त्यांना जनतेच्या प्रश्नाची चांगली जाण आहे. त्याचा उपयोग त्यांना या सभागृहात झाला असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.

रविंद्र फाटक हे संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात काम करतात. त्यांनाही शुभेच्छा देत असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान, यावेळी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, उपसभापती नीलम गोऱ्हे, परिवहन मंत्री अनिल परब, सदस्य सुरेश धस, दिवाकर रावते, विनायक मेटे, भाई गिरकर, सदाशिव खोत, निलय नाईक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Wanwadi General Hospital : “वानवडी जनरल हॉस्पिटल”चे लोकार्पण

Categories
Political आरोग्य पुणे

“वानवडी जनरल हॉस्पिटल”चे लोकार्पण

पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते आज वानवडी येथील शंभर बेडच्या सुसज्ज अशा “वानवडी जनरल हॉस्पिटलचा” लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

१०० बेडची क्षमता असणाऱ्या या हॉस्पिटलमध्ये अद्यावत सोयी-सुविधांसह नागरिकांच्या सेवेत उपलब्ध असणार आहेत.” या हॉस्पिटलच्या माध्यमातून वानवडी ,हडपसर तसेच पुणे शहरातील नागरिकांना आरोग्यविषयक उत्तम सुविधा मिळतील”, असे मत अजितदादांनी व्यक्त केले. तसेच महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १. येथील बॅडमिंटन कोर्टच्या इंनडोर स्टेडियमचा शुभारंभ आदरणीय अजितदादांच्या शुभहस्ते करण्यात आला.  प्रशांत जगताप व  रत्नप्रभा जगताप हे सातत्याने २००७ पासून एस.आर.पी.एफ मधील पायाभूत सुविधांवर काम करत असून राज्यभर आपत्कालीन परिस्थिती सण-उत्सव अशा सर्व परिस्थितीमध्ये आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांची काळजी घेतात याचा मला निश्चित अभिमान आहे. एस. आर.पी.एफ साठी इथून पुढच्या काळात देखील कुठल्याही प्रकारे निधीची कमतरता भासणार नाही”, अशी ग्वाही अजितदादांनी या वेळी दिली.

कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आमदार चेतन तुपे, ज्येष्ठ नेते अंकुश  काकडे, नगरसेविका रत्नप्रभा जगताप,  नंदाताई लोणकर, अश्विनीताई कदम,नगरसेवक आनंद अलकुंटे ,मोहसिन शेख आदी उपस्थित हो

Mask Wearing : DCM Ajit Pawar : बाबांनो कोरोनाला हलक्यात घेऊ नका  : मास्क न घालणाऱ्यांना अजित पवारांचा सल्ला 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

बाबांनो कोरोनाला हलक्यात घेऊ नका

: मास्क न घालणाऱ्यांना अजित पवारांचा सल्ला

पुणे : पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विविध कामांचे उदघाटन होत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तब्बल ३१ ठिकाणच्या कार्यक्रमांना पवार भेटी देणार आहेत. यावेळी कात्रज येथील कार्यक्रमात कार्यकर्त्यांना मास्क घालण्याची विनंती अजित पवार यांनी केली आहे. बाबांनो कोरोनाला एवढं हलकं घेऊ नका, चीनमध्ये अजूनही हा वेगाने पसरत असल्याचं ते यावेळी म्हणाले.

चीनमध्ये काल परवा लॉक डाऊन करण्याची वेळ आली आहे. आपल्याकडे मागील वर्षी कोरोनाचे संकट असताना देखील विकास कामांना गती देण्याचे काम सुरु होते. पण आता कोरोना कमी झालाय पण गेलेला नाही. इथं तर पठ्ठ्यानी मास्कच काढून टाकलाय. असं चालणार नाही. असं पवार यांनी यावेळी सांगितलं आहे.

आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये तेव्हाच मी मास्क काढतो. तुम्ही मला दोन वर्षात एकदा तरी विनामास्क पाहिले का? फक्त जेवताना आणि पाणी पिताना मास्क झोपताना तेवढा मास्क काढतो. अर्थसंकल्प सांगत असताना अनेक जण म्हणाले की, दादा मास्क काढा, तर मी म्हणालो की, माझा आवाज खणखणीत आहे. गमतीचा भाग जाऊ द्या, सर्वांनी मास्क वापरला पाहिजे, आपण सर्वांनी कोरोना काळात मास्क न घालण्याची आणि काळजी न घेण्याची खूप मोठी किंमत मोजली आहे. अनेक जीवा-भावाची माणसं सोडून गेलीत, त्यामुळे काळजी घ्या”, असं अजित पवार म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी माझ्या सारख्या कार्यकर्त्यांवर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली आहे. ही जबाबदारी कशा पद्धतीने पार पाडता येईल, हा माझा प्रयत्न असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शहरातील वाहतुकीचा प्रश्न मिटवण्यासाठी सर्व भागात मेट्रोचं जाळं पसरले पाहिजे, यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जाईल. मात्र, यासाठी केंद्राची देखील मदत आवश्यक असून याबाबत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी केली आहे,” असं त्यांनी सागितलं.

Local Body Election : DCM Ajit Pawar : जागृत राहा : मनपा निवडणुकीबाबत अजित पवारांचे सूचक विधान 

Categories
Breaking News PMC Political पुणे

जागृत राहा : मनपा निवडणुकीबाबत अजित पवारांचे सूचक विधान 

 
पुणे : शहरातील लांबलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत उपमुख्यमंत्र्यांनी बोलताना सूचक विधान करत शहरातील प्रभाग रचना न बदलता तशीच राहणार आहे. तीन सदस्यांचा प्रभाग राहणार असून ओबीसी राजकीय आरक्षण याबाबत कोर्टाचा निकाल लागल्यानंतरही ताबडतोब निवडणुका लागू शकतात. तेव्हा सर्वांनी जागृत राहा असे विधान यावेळी केले. त्यामुळे निवडणुकीबाबत पुन्हा हालचाली सुरु झाल्या आहेत.

बदलत्या जीवनशैलीचा आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे आजारी पडण्याचं प्रमाण वाढले. असुन उत्तोत्तम आरोग्यासाठी सकस आहार आणि व्यायाम करणे आवश्यक आहे. तसेच रुग्णालयाच्या माध्यमातून शहरातील आरोग्य सुविधाच गुणवत्तापूर्ण भर पडेल. असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. माजी महापौर तथा नगरसेवक दत्तात्रय धनकवडे यांच्या संकल्पनेतून राजीव गांधीनगर परिसरात उभारलेल्या महापालिकेच्या स्व. माणिकचंद नारायणदास दुगड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल लोकार्पण सोहळ्यात पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी शहरातील लांबलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत उपमुख्यमंत्र्यांनी बोलताना सूचक विधान करत शहरातील प्रभाग रचना न बदलता तशीच राहणार आहे व तीन सदस्यांचा प्रभाग राहणार असून ओबीसी राजकीय आरक्षण याबाबत कोर्टाचा निकाल लागल्यानंतरही ताबडतोब निवडणुका लागू शकतात. तेव्हा सर्वांनी जागृत राहा असे विधान यावेळी केले. व कात्रज पर्यंत मेट्रो लवकरात लवकर काम सुरू होऊन मेट्रो सुरू होईल. यावेळी धनकवडे तसेच दुगड परिवारातर्फे अजित पवार यांचा सन्मान करण्यात आला. प्रस्तावना करताना दत्तात्रय धनकवडे म्हणाले, या भागातील मध्यमवर्गीय नागरिकांची संख्या अधिक आहे. त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने येथील आरोग्य सुविधा सक्षम व्हावी यासाठी या रुग्णालयाची उभारणी केली आहे.

अजित पवार म्हणाले की, कोरोनाचे संकट जगासह राष्ट्र,राज्य, परिसरावर आले. अन आपण खळबळून जागे झालो. आरोग्याला जेवढे महत्त्व देऊ, तेवढे पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे आरोग्य सुविधांसाठी महाविकास आघाडी कटिबद्ध आहे. तसेच यावेळी राज्यासाठी काल मांडलेले पंचसूत्री अर्थसंकल्प यातील बाबी मांडल्या. शहरातील अनेक खाजगी हॉस्पिटल मोठ्या प्रमाणात आहे. मात्र सर्वसामान्य नागरिकांना परवडण्यासारखी महापालकेच्यावतीने रुग्णालय उपलब्ध झाले.तर सर्वसामान्य नागरिकांना माफक दरात आरोग्य सेवा मिळतील. मात्र हॉस्पिटल कितीही चांगल्या सुविधा असल्या तरी कोणाला याचा वापर ना करण्याची संधी मिळो. नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे. तसेच डॉक्टरांनी त्याचा अनुभव पणाला लावून रुग्णांचा विश्वास संपादन केला पाहिजे.  कार्यक्रमात आमदार चेतन तुपे, रा.कॉ.शहराध्यक्ष प्रशांत जगताप,अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, राज्य महिल आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, माजी उपमहापौर दीपक मानकर, उद्योजक प्रकाश धारीवाल, ओमप्रकाश रांका, प्रमोद दुग्गड, व राष्ट्रवादीचे परिसरातील नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते.

DCM Ajit Pawar : प्रशासकीय मान्यता असेल तरच विकास कामाचे उदघाटन करणार  : उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या कामाबाबत चोख 

Categories
Breaking News PMC Political पुणे महाराष्ट्र

प्रशासकीय मान्यता असेल तरच विकास कामाचे उदघाटन करणार

: उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या कामाबाबत चोख

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार प्रशासकीय कामात अत्यंत चोख असतात, हे महाराष्ट्राने पहिलेच आहे. शिवाय कामात शिस्तप्रिय आणि जास्त काम करणारे म्हणून देखील ओळख आहे. त्यांच्या कार्यपद्धतीचे अजून एक नवीन दर्शन घडले आहे. महापालिकेची मुदत संपत आल्याने राष्ट्रवादीचे नगरसेवक आपल्या प्रभागातील विकास कामाचे उदघाटन करून घेण्यासाठी अजित दादांना बोलवत आहेत. मात्र उदघाटन करण्याआधी संबंधित कामाला प्रशासकीय मान्यता तसेच इतर परवानग्या घेतल्या आहेत, याची चाचपणी उपमुख्यमंत्री करत आहेत. तशी माहिती देखील त्यांच्या खाजगी सचिवांनी महापालिका तसेच जिल्हा प्रशासनाकडून मागवली आहे.

: नगरसेवकांची उदघाटनाची लगबग

महापालिकेतील सध्याच्या नगरसेवकांची मुदत 14 मार्च ला संपत आहे. त्यामुळे सर्वच पक्षातील नगरसेवक आपापल्या प्रभागातील विकास कामाचे उदघाटन करून घेण्यात व्यस्त आहेत. शनिवार आणि रविवार तर उदघाटनाचाच वार ठरणार आहे. तसेच जिल्हा परिषदेची देखील मुदत संपत आहे. त्यामुळे तेथील सदस्य देखील गावामध्ये उदघाटनाचे कार्यक्रम घेत आहेत. सर्वांनाच उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या कार्यक्रमाला यावे, असे वाटते. त्यामुळे सर्वानी अजित दादांची वेळ मागितली आहे. दादा या सर्व कार्यक्रमाला येणार आहेत. रविवारी होणाऱ्या उदघाटनाची संख्या जास्त आहे. यामध्ये आमदार सुनील टिंगरे यांच्या मतदार संघातील बरीच कामे, नगरसेवक  युवराज बेलदरे, रेखा टिंगरे, सागर काळभोर, दीपाली धुमाळ तसेच जिल्हा परिषद सदस्यांच्या विकास कामाचा समावेश आहे.
मात्र यात काही कसूर राहू नये, याची काळजी उपमुख्यमंत्री घेत आहेत. उदघाटन करण्याआधी संबंधित कामाला प्रशासकीय मान्यता तसेच इतर परवानग्या घेतल्या आहेत, याची चाचपणी उपमुख्यमंत्री करत आहेत. तशी माहिती देखील त्यांच्या खाजगी सचिव अविनाश सोलवट यांनी महापालिका तसेच जिल्हा प्रशासनाकडून मागवली आहे. अजित दादांच्या या कार्यपद्धतीमुळे त्यांचा प्रशासकीय कामातील चोखपणा दिसून येतो.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे यांचा रविवार, दिनांक १३ मार्च, २०२२ रोजी पुणे दौरा कार्यक्रम

■ सकाळी ७.०० वाजता सुस गाव येथील नाला व रस्ता रूंदीकरणाच्या कामांची पाहणी

■ सकाळी ७.३० वाजता वारजे माळवाडी येथे क्रीडा संकुल व क्लब हाऊस- भूमिपूजन समारंभ

■ सकाळी ८.०० वाजता- वारजे येथे कै. सुभदा प्रभाकर बराटे मल्टिस्पेशालिटी व मॅटर्निटी रूग्णालयास सदिच्छा भेट

■ सकाळी ८.३० वाजता- शिवणे येथे शिवणे-नांदेड पूलाचा उद्घाटन समारंभ व विविध विकास कामांचे लोकार्पण, उद्घाटन व भूमिपूजन

■ सकाळी ९.०० वाजता कात्रज डेअरी सरहद शाळा चौक येथे
कात्रज डेअरीमधून जाणारा २४ मीटर सहकार महर्षी मामासाहेब मोहोळ रस्ता लोकार्पण सोहळा

■ सकाळी ९.४५ वाजता- राजीव गांधी नगर बालाजी नगर, पुणे येथे स्व.माणिकचंद नारायणदास दुगड रूग्णालयाचा लोकार्पण सोहळा

■ सकाळी -१०.२५ वाजता- सुखसागर नगर येथे विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा
१) डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम क्रीडा संकुल
२) पोलीस चौकी
३)महिला बचत गट कार्यालय ४) कै. किसनराव माऊली कदम उद्यान प्रयाण

■ सकाळी ११.०० मिठानगर, काँढवा खुर्द, येथे
१) माँ खदीजा (र.अ.) प्रसुतिगृहाचा लोकार्पण सोहळा
२) हजरत अब्दुल रहेमान (रहे) ओटा मार्केटचा लोकार्पण सोहळा

■ सकाळी-११.४५ वाजता- कौसर बाग येथे विविध विकास कामांचा भूमिपूजन कार्यक्रम
१) डॉ. सय्यदना मोहम्मद बुराउद्दीन उद्यान
२) ‘बाग जन्नत’ कब्रस्तान ३)मुख्य भैरोबानाला ते एन.आय.बी.एम परिसर मलवाहिनी

■ दुपारी – १२.३० वाजता वानवडी येथे विविध विकास कामांचा भूमिपूजन / लोकार्पण सोहळा
१) ४५ फूट उंच राष्ट्रध्वज भूमिपूजन
२) १०० बेडचे रूग्णालय व ३) बॅडमिंटन हॉल लोकार्पण

■ दुपारी १.१५ वाजता ११० रामटेकडी, प्रभाग क्र. २४ येथे विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा –
१) पंचशील बुद्ध विहार
२) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन

■ दुपारी ३.०० वाजता
कृषिभवन, शिवाजीनगर येथे जिल्हास्तरीय धान्य महोत्सव कार्यक्रमास भेट

■ दुपारी ४.१० वाजता पंचशील चौक, ताडीवाला रोड, पुणे येथे आगमन नूतनीकृत शिल्पाचे लोकार्पण

■ दुपारी ४.३० वाजता प्रभाग क्र. फुलेनगर-नागपूर चाळ, आळंदी रोड येथे स्वर्गीय माजी महापौर भारतजी सावंत पाम उद्यानाचे उद्घाटन

■ सायंकाळी ५.१५ वाजता धानोरी जकात नाका, धानोरी येथे विविध विकास कामांचे उद्घाटन
१) राजयोग मेडिटेशन सेंटर
२) अग्निशामक केंद्र
३) माजी सैनिक सांस्कृतिक भवन
४) भव्य उद्यान

■ सायंकाळी ६.०० वाजता वडगांव शिंदे रोड, लोहगाव, येथे’ब्रिलियंट इंटरनॅशनल स्कूल’ भूमिपूजन सोहळा

■ सायंकाळी ६.५० वाजता प्रभाग क्रं. ०३, खराडी, येथेऑक्सिजन पार्कचे भूमिपूजन व सभा