Sevice Month | Pune Municipal Corporation |  १५ सप्टेंबरपर्यंतच्या नागरिकांच्या प्रलंबित अर्जांचा निपटारा करण्याचे आदेश

Categories
Breaking News PMC social पुणे

Sevice Month | Pune Municipal Corporation |  १५ सप्टेंबरपर्यंतच्या नागरिकांच्या प्रलंबित  अर्जांचा निपटारा करण्याचे आदेश

| महापालिका  सेवा महिना राबविणार

 

Service Month | Pune Municipal Corporation | राज्य शासनाने यावर्षी १७ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर या कालावधीत सेवा महिना (Service Month) राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत महापालिकेच्या (PMC Pune Website) संकेत स्थळावर तसेच कार्यालयांकडे प्राप्त झालेल्या सर्व अर्जांचा आणि तक्रारींचा विशेष मोहिम राबवून निपटारा करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. तसेच सर्व विभागांच्या वैयक्तिक लाभाच्या सर्व योजनांचा निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट हस्तांतरीत करण्याचे आदेशही अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे (IAS Ravindra Binwade ) यांनी दिले आहेत.

 

राज्य शासनाने सर्वसामान्य जनतेची कामे विहित कालावधीत व्हावीत यासाठी २०१५ मध्ये आपले सरकार सेवा पोर्टल सुरू केले आहे. त्या माध्यमातून जनेतेची कामे विहित कालमर्यादेत पूर्ण होणे अपेक्षित आहे. परंतू या पोर्टलचा आढावा घेतल्यानंतर तसेच मंत्रालय स्तरावर नागरिकांकडून प्राप्त होणार्‍या तक्रारींचे अवलोकन केल्यानंत सक्षम प्राधिकार्‍यांकडून विहित काल मर्यादीत संबधित अर्जांचा निपटारा होत नसल्याचे निदर्शनास आले होते. या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाने मागीलवर्षी १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान सेवा पंधरवडा साजरा करण्यात आला होता. याला नंतर ५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देउन अनेक प्रलंबित अर्ज व तक्रारींचा निपटारा केला होता. यंदाही १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान सेवा महिना आयोजीत करण्यात येणार आहे. महापालिका प्रशासनाने याच पार्श्‍वभूमीवर १७ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर दरम्यान त्यांच्या विविध विभागाकडील प्रलंबित अर्जांचा निपटारा करण्यासाठी सेवा महिन्यांचे आयोजन केले आहे. (Pune PMC – Service Month)

प्रामुख्याने आपले सरकार वेब पोर्टलवरील महापालिकेशी संबधित अर्ज, डी.बी.टी. पोर्टल, नागरी सेवा केंद्रांवरील सर्व सेवा, सर्व विभागांकडील अर्ज, मालमत्ता कराची आकारणी व मागणी पत्र देणे, मालमत्ता हस्तांतरण नोंद घेणे, नव्याने नळजोडणी देणे, विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे, दिव्यांग प्रमाणपत्र देणे, जन्म मृत्यू नोंद घेणे व प्रमाणपत्र देणे, लसीकरण, महिला बचत गटांना परवानगी देणे व रोजगाव उपलब्ध करून देणे यासंदर्भातील अर्जांचा प्रामुख्याने निपटारा करण्यात येणार आहे. (Pune Municipal Corporation)

यासाठी मुख्य विभागाने क्षेत्रिय स्तरावरील कार्यालयांकडून माहिती संकलित करणे, मोहिमेची माहिती भरण्याकरिता व अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक विभागाने स्वतंत्र नोडल अधिकार्‍याची नेमणूक करण्याचे आदेश बिनवडे यांनी दिले आहेत. या मोहिमेच्या अंबलबजावणीसाठी
सर्व विभाग प्रमुखांची २६ सप्टेंबरला बैठक आयोजित करण्यात आली आहे. सेवा महिना संपल्यानंतर सर्व विभागप्रमुखांनी १५ सप्टेंबरपर्यंत प्रलंबित असलेल्या अर्जांची तसेच निपटारा केलेल्या अर्जांचा अहवाल तसेच
अर्ज प्रलंबित राहीले असल्यास सकारण अहवाल सादर करावा, असे बिनवडे यांनी आदेशात नमूद केले आहे. (PMC Pune News)


News title | Service Month | Pune Municipal Corporation | Order to dispose of applications of citizens up to 15th September

 

PMC Retired Employees Pension | गेल्या 10 दिवसांत 100 हून अधिक पेन्शन प्रकरणे मार्गी | अतिरिक्त आयुक्तांचा कारवाईचा इशारा आला कामी

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Retired Employees Pension | गेल्या 10 दिवसांत 100 हून अधिक पेन्शन प्रकरणे मार्गी | अतिरिक्त आयुक्तांचा कारवाईचा इशारा आला कामी

PMC Retired Employees Pension | सद्यस्थितीत पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) सेवानिवृत्त सेवकांची पेन्शन प्रकरणे (PMC Pension Cases) मोठ्या प्रमाणावर विविध कारणास्तव प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत अतिरिक्त आयुक्त यांनी खाते प्रमुख यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. तसेच पेन्शन प्रकरणे निकाली काढण्यासाठी एक मोहीम हाती घेतली होती. त्यानुसार गेल्या 10 दिवसांत 103 पेन्शन प्रकरणे वेगवेगळ्या खात्याकडून निकाली काढण्यात आली आहेत. अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
काही सेवानिवृत्त सेवकांचा मृत्यू होतो, तरीही पेन्शन मिळत नाही. यामुळे सेवकांच्या वारसांना त्रास सहन करावा लागतो. यापुढे वारसांची गैरसोय होऊ नये म्हणून पेन्शन प्रकरणे निकाली काढण्यासाठी 8 ते 10 सप्टेंबर या कालावधीत विशेष मोहीम (Special Campaign) राबवली जावी,याबाबतचे आदेश अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे (IAS Ravindra Binwade) यांनी दिले होते. अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशानुसार प्रलंबित पेन्शन प्रकरणे वेळेत निकाली काढण्यासाठी यापूर्वी विविध विभागांना सुचित करण्यात आले होते, परंतु अद्यापी पेन्शन प्रकरणे प्रलंबित आहेत. याबबात खातेप्रमुख, पगारपत्रक / पेन्शन लेखनिक हे गांभिर्याने दखल घेत नसल्याने सेवानिवृत्त सेवकांची/ मयत सेवकांच्या वारसांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे खाते प्रमुख यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा देखील अतिरिक्त आयुक्तांनी देखील दिला होता. त्यानुसार सर्व विभाग कामाला लागले आहेत. (Pune Municipal Corporation)
एकूण 564 प्रलंबित पेन्शन प्रकरणांपैकी गेल्या 10 दिवसांत 103 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. काही विभागातील कर्मचाऱ्यांनी शनिवार आणि रविवारी देखील काम केले. दरम्यान पेन्शन प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी अतिरिक्त आयुक्त बिनवडे यांच्या कार्यालयात आढावा बैठक होणार आहे. या बैठकीला सर्व खाते प्रमुखांनी उपस्थित राहणे, बंधनकारक करण्यात आले आहे. (PMC Pune News)
——
News Title | PMC Retired Employees Pension | Over 100 pension cases cleared in last 10 days Additional Commissioner’s warning of action came to fruition

PMC Care | महापालिकेच्या नव्या स्वरुपातील ‘पीएमसी केअर’चे उद्घाटन!

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Care | महापालिकेच्या नव्या स्वरुपातील ‘पीएमसी केअर’चे उद्घाटन!

PMC Care | Pune Municipal Corporation | पुणे महानगरपालिकेच्या (PMC Pune) नव्या स्वरुपातील पीएमसी केअर (PMC Care) प्लॅटफॉर्मचे आज महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (ज) रविंद्र बिनवडे (IAS Ravindra Binwade) आणि पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते (IAS Dr Sanjay Kolte) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. पीएमसी केअर मोबाईल अॅप्लिकेशन व पोर्टल सिटीझन एंगेजमेंट प्लॅटफॉर्म, प्रशासन आणि नागरिक यांना जोडून ठेवण्यासाठी महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. या कार्यक्रमाला माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख राहुल जगताप (Rahul Jagtap), विविध खात्यातील आयटी नोडल ऑफिसर आणि कर्मचारी उपस्थित होते. (PMC Care | Pune Municipal Corporation)
यावेळी बोलताना अतिरिक्त आयुक्त (ज) मा. रविंद्र बिनवडे म्हणाले की, पुणे मनपाचा नव्या रुपातील पीएमसी केअर हा एक असा प्लॅफॉर्म आहे. ज्या माध्यमातून पालिका प्रशासन आपली योग्य बाजू नागरिकांपर्यंत पोहोचवू शकेल. प्रत्येक घटनेची तथ्ये जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी हा प्लॅटफॉर्म निश्चित मदत करेल. या प्लॅटफॉर्मद्वारे नागरिक ब्लॉग, लेख लिहू शकतील. पालिकेच्या ज्या सेवा सुविधा
आहेत. त्या नागरिकांना सहज उपलब्ध होतील. अशा या परिपूर्ण प्लॅटफॉर्मची माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. आता १० वेगवेगळे अॅप वापरण्यापेक्षा हे सिंगल अॅप, सिंगल प्लॅटफॉर्म सगळ्यांसाठीच उपयुक्त आहे.” (Pune Municipal Corporation)
या प्लॅटफॉर्मद्वारे तक्रार नोंदवणे, ऑनलाईन मिळकत कर भरणा, पाणीपट्टी भरणा, फेरीवाला देयक, जन्म-मृत्यू प्रमाणपत्र, विवाह नोंदणी, विविध प्रमाणपत्रे, NOC, उद्यान तिकीट, निविदा, तसेच विविध परवाने / परवानगी उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच नागरिकांना ब्लॉग्स, लेख, पुणे मनपाद्वारे राबविण्यात येणारे उपक्रम, प्रकल्प कार्यक्रमांची माहिती व आपल्या आसपासच्या ठिकाणांची माहिती देखील या प्लॅटफॉर्मवरून केवळ एका क्लिकवर मिळणार आहे. (PMC Pune)
तसेच महापालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी यांच्यासाठी पीएमसी केअर प्लॅटफॉर्मद्वारे शासन निर्णय, परिपत्रके नागरिकांमार्फत प्राप्त तक्रारींवर योग्य ती कार्यवाही करणे, तसेच तक्रार डॅशबोर्ड उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. (PMC Pune News)
अशा प्रकारे नागरिक व पुणे मनपा कर्मचारींना आता एका क्लिकवर सर्व सुविधा मिळणार आहेत. ‘पीएमसी केअर’ प्लॅटफॉर्म लहान मुले, युवा वर्ग, गृहिणी, जॉब प्रोफेशनल्स, ज्येष्ठ मंडळी सर्वांसाठीच उपयुक्त ठरणारा आहे. शिक्षण, मनोरंजन, सिटी अपडेट्स, आरोग्य, फूड अशा विविध क्षेत्रातील सगळी माहिती पुणेकरांना एकाच प्लॅटफॉर्म वर उपलब्ध होणार आहे. असा हा परिपूर्ण सिटीझन एंगेजमेंट प्लॅटफॉर्म आता गूगल प्ले स्टोअर आणि आयओएस अॅप स्टोअरवर उपलब्ध आहे. (Pune Municipal Corporation News)
नागरिकाभिमुख सेवा प्रदान करणारा, नागरिक व प्रशासन यांना जोडणारा दुवा असणाऱ्या या प्लॅटफॉर्मवर सर्व नागरिक, मनपा कर्मचारी आणि अधिकारी यांनी नोंदणी करावी, असे आवाहन महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. त्यासाठी अँड्रॉइड https://fxurl.co/rFshd किंवा iOS https://fbxurl.co/4JJ123 या लिंकचा वापर करावा. या नोंदणी प्रक्रियेदरम्यान काही शंका किंवा
अडचण भासल्यास त्वरित ०२०-६७०५७१४८ या क्रमकांवर संपर्क साधावा. असे महापालिका प्रशासनाने म्हटले आहे. (PMC Care App)
—–
News Title |PMC Care | Inauguration of ‘PMC Care’ in the new form of Municipal Corporation!

PMC Retired Employees Pension | सेवानिवृत्त / मयत सेवकांच्या प्रलंबित पेन्शन बाबत 3 दिवसांची विशेष मोहिम

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Retired Employees Pension | सेवानिवृत्त / मयत सेवकांच्या प्रलंबित पेन्शन बाबत 3 दिवसांची विशेष मोहिम

PMC Retired Employees Pension | सद्यस्थितीत पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) सेवानिवृत्त सेवकांची पेन्शन प्रकरणे (PMC Pension Cases) मोठ्या प्रमाणावर विविध कारणास्तव प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच काही सेवानिवृत्त सेवकांचा मृत्यू होतो, तरीही पेन्शन मिळत नाही. यामुळे सेवकांच्या वारसांना त्रास सहन करावा लागतो. यापुढे वारसांची गैरसोय होऊ नये म्हणून पेन्शन प्रकरणे निकाली काढण्यासाठी 8 ते 10 सप्टेंबर या कालावधीत विशेष मोहीम (Special Campaign) राबवली जाणार आहे. याबाबतचे आदेश अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे (IAS Ravindra Binwade) यांनी दिले आहेत. (PMC Pune Retired Employees)
अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशानुसार प्रलंबित पेन्शन प्रकरणे वेळेत निकाली काढण्यासाठी यापूर्वी विविध विभागांना सुचित करण्यात आले होते, परंतु अद्यापी पेन्शन प्रकरणे प्रलंबित आहेत. याबबात खातेप्रमुख, पगारपत्रक / पेन्शन लेखनिक हे गांभिर्याने दखल घेत नसल्याने सेवानिवृत्त सेवकांची/ मयत सेवकांच्या वारसांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. (Pune corporation)
आदेशात पुढे म्हटले आहे कि,  प्रलंबित पेन्शन प्रकरणे जलदगतीने निपटारा होण्याकरिता दिनांक ०८/०९/२०२३ ते १०/०९/२०२३, या कालावधीत पेन्शन प्रकरणांच्या पुर्ततेसाठी विशेष मोहिम राबविण्याचे नियोजन आहे. या तिन्ही दिवशी मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी सदर मोहिमेकरिता त्यांचे विभागाकडील जबाबदार अधिकारी यांची नियुक्ती करुन, जास्तीत जास्त प्रकरणे या विशेष मोहिम अंतंर्गत निकाली निघतील याची दक्षता घ्यावी. तसेच माहिती व तंत्रज्ञान विभाग प्रमुखांनी सदर मोहिमे करिता आवश्यक तो सेवकवर्ग उपलब्ध करुन द्यावा, सर्व संबंधित विभागांनी माहिती तंत्रज्ञान विभाग व मुख्य लेखा व वित्त विभाग यांचेशी योग्य तो समन्वय साधून मोहिमेचे कामकाज पूर्ण करावे. असे आदेशात म्हटले आहे. (PMC Pune News)

तसेच सोमवार ११ सप्टेंबर रोजी या विशेष मोहिमेतंर्गत किती प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे कि नाही याचा अहवाल मुख्य कामगार अधिकारी यांनी मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांचे मार्फत निम्नस्वाक्षरीकर्ते यांचेकडे सादर करावा. (Pune Municipal corporation)

——
News Title | PMC Retired Employees Pension | 3 Days Special Campaign regarding Pending Pension of Retired / Deceased Servants

PMC Pension Cases | पेन्शन आढावा बैठकीला सगळे खातेप्रमुख गैरहजर | महापालिका अतिरिक्त आयुक्त खाते प्रमुखावर करणार कारवाई

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Pension Cases | पेन्शन आढावा बैठकीला सगळे खातेप्रमुख गैरहजर | महापालिका अतिरिक्त आयुक्त खाते प्रमुखावर करणार कारवाई

| अतिरिक्त आयुक्तांनी तीव्र शब्दात व्यक्त केली नाराजी

PMC Pension Cases |  महापालिका सेवानिवृत्त सेवकांच्या (PMC Pune Retired Employees) पेन्शन प्रकरणावरून (Pension Cases) महापालिका अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे (IAS Ravindra Binwade) यांनी खाते प्रमुखांच्या उदासीनतेबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच पेन्शन प्रकरणे प्रलंबित ठेवणाऱ्या खाते प्रमुखांवर कारवाई करण्याचा इशारा अतिरिक्त आयुक्तांनी दिला आहे. शिवाय 8 सप्टेंबरला व्यक्तीश: अतिरिक्त आयुक्तांच्या कार्यालयात (PMC additional commissioner office) उपस्थित राहण्याचे आदेश खाते प्रमुखांना देण्यात आले आहेत. (PMC Pension Cases)
सेवानिवृत्त सेवकांच्या (PMC Retired Employees) प्रलंबित पेन्शन प्रकरणाबाबत (Pension pending cases) अतिरिक्त  महापालिका आयुक्त रविंद्र बिनवडे (IAS Ravindra Binwade) हे 31 ऑगस्ट ला आढावा घेणार होते. विविध खात्यातील 564 पेन्शन प्रकरणे प्रलंबित  आहेत. या अगोदर देखील अतिरिक्त आयुक्तांनी बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये संबंधित खातेप्रमुख, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व पगारपत्रक लेखनिक गांभिर्याने सेवानिवृत्ती वेतन प्रकरणे हाताळत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे महापालिका सेवेतून प्रदिर्घ सेवा होवूनही सेवानिवृत्त सेवकांना / मयत सेवकांच्या वारसांना १-२ वर्षांपासून सेवानिवृत्ती वेतन मिळत नसल्याचे निदर्शनास आले होते. या बाबीच्या अनुषंगाने अतिरिक्त  आयुक्त (ज.) यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली होती. तसेच पगारपत्रक लेखनिकाची (Bill Clerk) एक वेतनवाढ कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला होता. मात्र कुणावर कारवाई झाली नव्हती. (PMC Pension Cases)
गुरुवारी VC द्वारे ही आढावा बैठक बोलावण्यात आली होती. यासाठी खाते प्रमुखानी उपस्थित राहणे आवश्यक होते. मात्र यासाठी एक ही खातेप्रमुख उपस्थित नव्हता. यामुळे अतिरिक्त आयुक्तांनी बैठकच घेतली नाही. मात्र यावेळी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. तसेच आगामी आठवडाभरात प्रकरणे निकाली लागली नाही तर खाते प्रमुखावरच कारवाई करण्याचा इशारा अतिरिक्त आयुक्तांनी दिला आहे. दरम्यान विविध खात्याकडे 564 पेन्शन प्रकरणे प्रलंबित आहेत. यामध्ये यामध्ये सर्वात जास्त प्रकरणे ही प्राथमिक शिक्षण विभागाची (PMC Primary Education Department) आहेत. विभागाकडे सुमारे 115 प्रकरणे प्रलंबित आहेत. त्याखालोखाल पाणीपुरवठा विभागाकडे (PMC Water Supply Department) 41 प्रकरणे प्रलंबित आहेत. आरोग्य विभागाकडे (PMC Health Department) 37 प्रकरणे प्रलंबित आहेत. कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालय (Kasba Vishrambagwada Ward office) 32, ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयाकडे (Dhole Patil Road Ward Office) 18 प्रकरणे प्रलंबित आहेत. शिवाजीनगर घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाकडे (Shivajinagar Ghole Road Ward office) 19, येरवडा, कळस, धानोरी क्षेत्रीय कार्यालयाकडे (Yerwada kalas dhanori ward office) 23 प्रकरणे प्रलंबित आहेत. अशी सर्वच विभागात काही ना काही प्रकरणे प्रलंबित आहेत. यामध्ये सेवानिवृत्त कर्मचारी भरडले जात आहेत. 
 

| अतिरिक्त आयुक्तांनी बैठकीत दिले हे आदेश 

 
1. सर्व खात्यांनी त्यांचेकडे प्रलंबित असलेली पेन्शन प्रकरणे प्राधान्याने ७ दिवसात जास्तीत जास्त संख्येने निकाली काढावीत.
२. विशेषत: ज्या खात्यांकडे १० किंवा त्यापेक्षा जास्त पेन्शन प्रकरणे प्रलंबित आहेत त्या खात्यांच्या खातेप्रमुखांनी पेन्शन प्रकरणे निकाली काढणेकामी विशेष मोहिम राबवावी.
३. प्रकरणी केलेल्या कार्यवाहीबाबतचा अहवाल संबंधित खातेप्रमुखांनी ०७/०९/२०२३ अखेर कामगार कल्याण विभागाकडे सादर करावा.
४. तसेच १० किंवा त्यापेक्षा जास्त पेन्शन प्रकरणे प्रलंबित असणाऱ्या खात्यांच्या खातेप्रमुखांनी शुक्रवार, ०८/०९/२०२३ रोजी दुपारी ०४:३० वाजता व्यक्तीश: मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज.) यांचे दालनात उपस्थित राहावे.
—-
 
News Title | PMC Pension Cases | All the account heads were absent from the pension review meeting Municipal Additional Commissioner will take action against the account head

PMC Pension Cases | प्रलंबित पेन्शन प्रकरणाचा अतिरिक्त आयुक्त घेणार आढावा | विविध खात्यातील 493 पेन्शन प्रकरणे प्रलंबित

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Pension Cases | प्रलंबित पेन्शन प्रकरणाचा अतिरिक्त आयुक्त घेणार आढावा

| विविध खात्यातील 493 पेन्शन प्रकरणे प्रलंबित

PMC Pension Cases |  सेवानिवृत्त सेवकांच्या (PMC Retired Employees) प्रलंबित पेन्शन प्रकरणाबाबत (Pension pending cases) अतिरिक्त  महापालिका आयुक्त रविंद्र बिनवडे (IAS Ravindra Binwade) हे 31 ऑगस्ट ला आढावा घेणार आहेत. विविध खात्यातील 493 पेन्शन प्रकरणे प्रलंबित  आहेत. या अगोदर देखील अतिरिक्त आयुक्तांनी बैठक घेतली होतीझ या बैठकीमध्ये संबंधित खातेप्रमुख, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व पगारपत्रक लेखनिक गांभिर्याने सेवानिवृत्ती वेतन प्रकरणे हाताळत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे महापालिका सेवेतून प्रदिर्घ सेवा होवूनही सेवानिवृत्त सेवकांना / मयत सेवकांच्या वारसांना १-२ वर्षांपासून सेवानिवृत्ती वेतन मिळत नसल्याचे निदर्शनास आले होते. या बाबीच्या अनुषंगाने अतिरिक्त  आयुक्त (ज.) यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली होती. तसेच पगारपत्रक लेखनिकाची (Bill Clerk) एक वेतनवाढ कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला होता. मात्र कुणावर कारवाई झाली नव्हती. येत्या बैठकीत असा कुठला निर्णय घेतला जाणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (PMC Pension Cases)
विविध खात्याची एकूण 493 प्रकरणे प्रलंबित आहेत. या प्रलंबित प्रकरणामध्ये सर्वच क्षेत्रीय कार्यालयापासून सर्वच खात्याचा समावेश आहे. यामध्ये सर्वात जास्त प्रकरणे ही प्राथमिक शिक्षण विभागाची (PMC Primary Education Department) आहेत. विभागाकडे सुमारे 115 प्रकरणे प्रलंबित आहेत. त्याखालोखाल पाणीपुरवठा विभागाकडे (PMC Water Supply Department) 41 प्रकरणे प्रलंबित आहेत. आरोग्य विभागाकडे (PMC Health Department) 37 प्रकरणे प्रलंबित आहेत. कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालय (Kasba Vishrambagwada Ward office) 32, ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयाकडे (Dhole Patil Road Ward Office) 18 प्रकरणे प्रलंबित आहेत. शिवाजीनगर घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाकडे (Shivajinagar Ghole Road Ward office) 19, येरवडा, कळस, धानोरी क्षेत्रीय कार्यालयाकडे (Yerwada kalas dhanori ward office) 23 प्रकरणे प्रलंबित आहेत. अशी सर्वच विभागात काही ना काही प्रकरणे प्रलंबित आहेत. यामध्ये सेवानिवृत्त कर्मचारी भरडले जात आहेत. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे हे VC च्या माध्यमातूम खातेप्रमुखाची बैठक घेणार आहेत. (Pune Municipal Corporation)

——
News Title | PMC Pension Cases | The additional commissioner will review the pending pension case 493 pension cases pending in various accounts