PMC Solid Waste Management Department | पुणे महापालिकेचे महासंकलन अभियान | उपायुक्त संदीप कदम यांनी केले आहे हे आवाहन

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Solid Waste Management Department | पुणे महापालिकेचे महासंकलन अभियान | उपायुक्त संदीप कदम यांनी केले आहे हे आवाहन

PMC Solid Waste Management Department | सणासुदीच्या तयारीनिमित्त घराची साफसाई कराच, पण आपला परिसर देखील स्वच्छ ठेवण्यास योगदान द्या. यासाठी एक छोटीशी गोष्ट करा, साफसफाई दरम्यान फेकून देण्यासारखे समान कचऱ्यात न टाकता आपल्या जवळच्या संकलन केंद्रावर जमा करा. (Pune Municipal Corporation)
सर्व नागरिकांनी निश्चित केलेल्या तारखांना ठराविक निरुपयोगी वस्तू संकलन केंद्रांवर जमा कराव्या असे आवाहन  मनपा उपायुक्त संदीप कदम, घनकचरा व्यवस्थापन यांनी केले आहे.
संकलन केंद्रांची यादी : https://bitly.ws/Xh55

PMC Solid Waste Management Department | पुणे महापालिकेने गेल्या 7 दिवसांत नागरिकांकडून साडे सहा लाखांचा दंड केला वसूल | कारण घ्या जाणून

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Solid Waste Management Department | पुणे महापालिकेने गेल्या 7 दिवसांत नागरिकांकडून साडे सहा लाखांचा दंड केला वसूल | कारण घ्या जाणून

PMC Solid Waste Management Department | पुणे | पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या (PMC Solid Waste Management Department) वतीने सार्वजनिक जागी थुंकणे, कचरा जाळणे, अस्वच्छता करणे, अशा कारणांसाठी दंडात्मक कारवाई केली जाते. विभागाने ही कारवाई गंभीरपणे सुरु केली आहे. गेल्या 7 दिवसांत सर्व क्षेत्रीय कार्यालयाकडून 6 लाख 43 हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे. अशी माहिती उपायुक्त संदीप कदम (Deputy Commissioner Sandip Kadam) यांनी दिली. (Pune Municipal Corporation)
पुणे महापालिकेने सार्वजनिक जागी स्वच्छता राखण्यासाठी स्वच्छता उपविधी तयार केली आहे. त्या नियमानुसार अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांस दंडात्मक कारवाई केली जाते. यामध्ये सार्वजनिक जागी थुंकणे, लघवी करणे, कचरा जाळणे, कचऱ्याचे सुका आणि ओला असे वर्गीकरण न करणे, नदीत राडारोडा टाकणे, अशा गोष्टींचा समावेश आहे. यासाठी 180 रुपयापासून ते 5 हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. यानुसार महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाने ही कारवाई 2 ऑक्टोबर पासून सुरु केली आहे. (PMC Pune)
सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याबाबद्दल 17 लोकांकडून 17 हजार दंड वसूल करण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी लघवी करणाऱ्या 13 जणांकडून 2600 रुपये वसूल केले. कचरा जाळणाऱ्या 36 लोकांकडून 18000 वसूल करण्यात आले. कचऱ्याचे वर्गीकरण न केल्याबद्दल 89 लोकांकडून 33340 रुपये वसूल करण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्या 1289 लोकांकडून 4 लाख 34 हजार 670 रुपये वसूल करण्यात आले. बल्क वेस्ट जनरेटर कचरा प्रक्रिया प्रकल्प बंद बाबत एकाकडून 5 हजार वसूल केले. बांधकाम राडारोडा टाकणाऱ्या 4 लोकांकडून 16 हजार वसूलण्यात आले. 23 लोकांवर प्लास्टिक कारवाई करत 1 लाख 15 हजार वसूल करण्यात आले. अशा एकूण 1479 लोकांवर दंड ठोठावत महापालिकेने 6 लाख 43 हजार रुपये वसूल केले. (Pune Municipal Corporation)
—-
सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवणे ही नागरिकांची देखील जबाबदारी आहे. त्यामुळे नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, अस्वच्छता करणे, कचरा जाळणे, अशा गोष्टी करू नयेत. असे आमचे आवाहन आहे. अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल.
संदीप कदम, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग, पुणे मनपा.
——

PMC Solid Waste Management Department | दसरा, दिवाळी सणात जमा होणाऱ्या कचऱ्याबाबत पुणे महापालिकेचे विधायक पाऊल!

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Solid Waste Management Department | दसरा, दिवाळी सणात जमा होणाऱ्या कचऱ्याबाबत पुणे महापालिकेचे विधायक पाऊल!

| घनकचरा व्यवस्थापन विभाग राबवणार महाअभियान

 

PMC Solid Waste Management Department |दसरा, दिवाळी (Diwali) व विविध सण समारंभाच्या पार्श्वभूमीवर घरातील जुन्या वस्तू, फर्निचर बदलले जातात. त्याचप्रमाणे गाद्या उश्या यांचा कचरासुद्धा मोठ्या प्रमाणावर साठून राहतो. अश्या प्रकारचा कचरा इतःस्ततः पडू नये याकरिता पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation) विधायक पाऊल उचलले आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२३ अंतर्गत सणसमारंभाच्या अनुषंगाने विविध प्रकारच्या निरुपयोगी वस्तूंच्या संकलनाचे महाअभियान राबविले जाणार आहे. त्यानुसार हा कचरा गोळा करून पुणे महानगर पालिकेच्या सिस्टीममध्ये आणला जाणार आहे.  त्यावर थ्री आर (RRR – Reduce, Reuse and Recycle) संकल्पना राबविली जाणार आहे. याकरिता क्षेत्रीय कार्यालयांमध्ये खालीलप्रमाणे संकलन मोहीमा आयोजित करण्याचे आदेश उपायुक्त संदीप कदम यांनी सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत. (PMC Pune)

 

असे आहेत आदेश

१. दिनांक १४/१०/२०२३ चिंध्या, उश्या गाद्या व फर्निचर या करिता प्रत्येक प्रभागनिहाय किमान ०२ आरोग्य कोठ्यांची जागा निश्चित करण्यात यावी व त्याची माहिती दि. ११/१०/२०२३ पर्यंत वॉर रूम ला कळवावी. याठिकाणी  १४/१०/२०२३ रोजी स. १०:०० ते दु ०४:०० या वेळेत सदर वस्तू गोळा करण्यात याव्यात व तदनंतर निश्चित केलेल्या ठिकाणी या वस्तूंची वाहतूक करण्यात यावी.
२. दिनांक २८/१०/२०२३ व २९/१०/२०२३ देवीदेवतांसंबंधित सर्व वस्तू/ साहित्य याकरिता क्षेत्रीय कार्यालय निहाय १ जागा निश्चित करावी व त्याची माहिती दि. १६/१०/२०२३ पर्यंत वॉर रूम ला कळवावी. याठिकाणी दि. २८/१०/२०२३ व २९/१०/२०२३ रोजी स. १०:०० ते दु ०४:०० या वेळेत सदर वस्तू गोळा करण्यात याव्यात व तदनंतर निश्चित केलेल्या ठिकाणी या वस्तूंची वाहतूक करण्यात यावी. तसेच सन्मानपूर्वक सदर वस्तू निश्चित करण्यात आलेल्या ठिकाणी पोहचविण्यात याव्यात.
३. दिनांक ०५/११/२०२३ घनकचरा व्यवस्थापनामध्ये नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी पुणे महानगरपालिका, जनवाणी, कमिन्स इंडिया, पूर्णम इकोव्हीजन, सागर मित्र थंब क्रिएटीव्ह, आदर पूनावाल क्लीन सिटी इनिशिएटीव्ह व इतर शैक्षणिक संस्था व सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने शहरात ई. कचरा व प्लास्टिक कचरा संकलन दि. ०५/११/२०२३ रोजी स.०९:०० ते दु. ०१:०० या वेळेत शहरातील विविध ३०० ठिकाणी ई-कचरा व प्लास्टिक कचरा संकलन महाअभियान राबविण्यात येणार आहे.
आपल्या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ई-कचरा व प्लास्टिक कचरा संकलनाच्या केंद्राबाबाटची सविस्तर माहिती संबंधित संस्थांशी समन्वय साधून उपलब्ध करून घ्यावी. या ठिकाणांबाबत  जास्तीत जास्त नागरिकांना अवगत करून या महाअभियानात सहभागी होणेबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी.

वरील सर्व मोहिमांना अनुकूल प्रतिसाद मिळणेकरिता, नागरिक मोहल्ला कमिटी सदस्य, स्वयंसेवी संस्था यांचेमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात यावी. या सर्व मोहिमांची माहिती सोशल मिडिया व सर्व प्रसारमध्यमांदवारे नागरिकांपर्यंत पोचविण्यात येणार आहे. आपल्या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत असणाऱ्या प्रत्येक संकलन मोहिमेच्या ठिकाणी अभिकारी/कर्मचारी यांची नियुक्ती करून जबाबदारी निश्चित करावी. क्षेत्रीय कार्यालय निहाय संकलन मोहीम अहवाल त्याच दिवशी सायं ०५:०० वाजेपर्यंत घनकचरा व्यवस्थापन वॉर रूम ला सादर करावा. असे आदेश उपायुक्त कदम यांनी दिले आहेत.

———-

Mahatma Gandhi Jayanti | PMC Pune | पुणे महापालिकेकडून उत्कृष्ट काम करणाऱ्या सफाई सेवकांचा सत्कार

Categories
Breaking News PMC social पुणे

Mahatma Gandhi Jayanti | PMC Pune | पुणे महापालिकेकडून उत्कृष्ट काम करणाऱ्या सफाई सेवकांचा सत्कार

Mahatma Gandhi Jayanti | PMC Pune |स्वच्छता पंधरवडा स्वच्छता ही सेवा (SHS) २०२३ अंतर्गत  ०२ ऑक्टोबर रोजी प्रभातफेरी, जनजागृतीवर रॅलीचे आयोजन व उत्कृष्ट काम करणाऱ्या सफाई सेवकांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त (Mahatma Gandhi Jayanti) त्यांना आदरांजली वाहण्याकरीता   नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता पंधरवडा स्वच्छता ही सेवा (SHS) २०२३ अंतर्गत  १५ क्षेत्रीय कार्यालयामध्ये नागरिकांच्या सहभागातून जनजागृतीपर प्रभात फेरी, रॅली व सफाईसेवकांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आले. अशी माहिती उपायुक्त संदीप कदम (PMC Deputy Commissioner Sandeep Kadam) यांनी दिली. (Pune Municipal Corporation)

तसेच ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असणाऱ्या गणपती चौक, पंचशील चौक, सौरभ हॉल, अलंकार टॉकीज ते महात्मा गांधी पुतळा पुणे स्टेशन या दरम्यान प्रभातफेरी, जनजागृतीवर रॅली काढण्यात आली. तसेच
पुणे स्टेशन येथील महात्मा गांधीच्या पुतळ्याला आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. सदर कार्यक्रमात  आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त (इ) डॉ. कुणाल खेमनार (IAS Dr Kunal Khemnar), उपायुक्त संदीप कदम, उपआयुक्त किशोरी शिंदे (PMC Deputy Commissioner Kishori Shinde), सहा. आरोग्य अधिकारी डॉ. केतकी घाटगे (Dr Ketaki Ghatge), मा. महापालिका सहाय्यक आयुक्त अशोक सीताराम झुळूक, सिफार संस्थेचे आनंद भाकडे, ढोले पाटील क्षेत्रीय कार्यलयाचे ब्रँड अम्बॅसेडर राजेश गायकवाड व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (PMC Pune)

वाडीया कॉलेज मधील विद्यार्थीनी स्वच्छता ही सेवा या विषयावर सुंदर
पथनाट्य सादर केले. या ठिकाणी उत्कृष्ट कामकरणा-या सफाई सेवकांनी आपल्याला दिलेल्या कामाची जबाबदारी सांभाळून काम करताना प्रसंगाअवधान राखून अनेक नागरिकांचे व आपल्या सहकारी
सेवकांचे जीव वाचविले तसेच काही सेवकांना सापडलेले मौल्यवान ऐवज परत केले तेसच काम करत असताना स्वच्छतेचा संदेश दिला. अशा सेवकांचा प्राथमिक स्वरूपामध्ये आयुक्त विक्रम कुमार,
यांच्या हस्ते पुणे महानगरपालिकाकडील क्षेत्रिय कार्यालयनिहाय व स्वच्छसंस्थेच्या उत्कृष्ट काम करणाऱ्या सफाई सेवकांचा सत्कार करण्यात आला. यावेळेस स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक व नागरिक उपस्थित होते. (Pune Municipal Corporation)

त्याचबरोबर १५ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत अंदाजे २६ ठिकाणी जनजागृती मोहीम, रॅलीज अशा विविध उपक्रमांचे आयोजन करून त्यामध्ये शहरातील माजी मा.सभासद व पदाधिकारी, पुणे शहरातील विविध शाळा / महाविद्यालये, खाजगी संस्था, विविध स्वयं सेवी संस्था, गणेश मंडळे,
मोहल्ला कमिटी सदस्य व कार्यक्षेत्रातील विविध मान्यवर प्रतिष्ठित व्यक्ती व क्षेत्रीय कार्यलयाचे ब्रँड अम्बॅसेडर असे एकूण अंदाजे ४४५२ नागरिकांनी आपला सहभाग नोंदविला.
आयुक्त विक्रम कुमार या सदर कार्यक्रमाचे मध्ये स्वच्छतेची शपथ देण्यात आली. सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मा. उपायुक्त संदीप कदम यांनी केले. (Gandhi Jayanti 2023)


 

SHS 2023 | PMC Pune | पुणे महापालिकेच्या मेगा ड्राईवमध्ये ३५० ठिकाणी ३ लाख ६२ हजार नागरिकांमार्फत श्रमदान | ६५ हून अधिक संस्था सहभागी 

Categories
Breaking News PMC social पुणे

SHS 2023 | PMC Pune | पुणे महापालिकेच्या मेगा ड्राईवमध्ये ३५० ठिकाणी ३ लाख ६२ हजार नागरिकांमार्फत श्रमदान | ६५ हून अधिक संस्था सहभागी

| स्वच्छता पंधरवडा स्वच्छता ही सेवा (SHS) २०२३ अंतर्गत  मेगा ड्राईवचे  आयोजन

SHS 2023 | PMC Pune |राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित (Mahatma Gandhi Jayanti)  आदरांजली वाहण्याकरीता  पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ०१ ऑक्टोबर रोजी स्वच्छतेकरीता सर्व नागरिकांनी १ तास श्रमदान करावे असे आवाहन केले होते. त्या अनुषंगाने ०१ ऑक्टोबर रोजी स्वच्छता पंधरवडा स्वच्छता ही सेवा (SHS) २०२३ अंतर्गत पुणे शहरात पुणे महापालिकेकडून (Pune Municipal Corporation) स्वच्छता मेगा ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते.  ड्राईवमध्ये ३५० ठिकाणी ३,६२,००० नागरिकांमार्फत श्रमदान केले. तर ६५ हून अधिक संस्था सहभागी  झाल्या होत्या. अशी माहिती उपायुक्त संदीप कदम (PMC Deputy Commissioner sandeep Kadam) यांनी दिली. (PMC Solid Waste Management Department)

https://swachhatahiseva.com/. या संकेतस्थळावर ३५० event करण्यात आले शहरातील विविध शैक्षणिक संस्था, युवा क्लब, NCC NSS, NYKS, RWAs, कॉर्पोरेट कंपन्या, नागरिक इत्यादिंचा यशस्वी सहभाग (६५ हून अधिक संस्था सहभाग)
– पुणे शहरात ३५० ठिकाणी ३,६२,००० नागरिकांमार्फत श्रमदान
-एकूण ९८ टन कचरा गोळा करण्यात आला. (६१ टन सुका व ३७ टन ओला कचरा)
-५५ हून अधिक मान्यवर मा. पालक मंत्री, Celebrity, पदाधिकारी, मा. आयुक्त विविध उच्च अधिकारी, स्वच्छता Brand Ambassador व विविध संस्थाचालक/ प्रतिनिधी उपस्थित होते.
-१५/०९/२०२३ रोजी पासून पुणे महानगरपालिकेच्या १५ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत एकूण महत्वाचे रस्ते, विविध वारसा स्थळे, शहरातील उद्याने, टेकड्या, पुणे शहरातील विविध नदी घाट इ. ठिकाणी स्वच्छता मोहीम, नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी श्रमदान, स्वच्छता ड्राईव्ह राबविण्यात आला.
• महानगरपालिकेच्या चतुर्थ क्षेणी कामगारांचे आरोग्य तपासणी, सफाई मित्र सुरक्षा शिबीर, तसेच कर्मचारीयांना सरकारी योजनाची माहिती पर शिबीर आयोजित करण्यात आले होते.
•  ३०.०९.२०२३ रोजी पुणे महानगरपालिका सायकल क्लबमार्फत जनजागृतीपर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ३५० हून जास्त सायकलस्वार सहभागी झाली होते.
●  १.१०.२०२३ रोजी भिडे पूल याठिकाणी आयोजित मुख्य कार्यक्रम व इतर सर्व स्वच्छता क्षमदान कार्यक्रम पूर्णपणे Zero Waste Event म्हणून राबविण्यात आले. या मध्ये कापडी बॅबर, Recyclable बॅनर द्वारे प्रचार प्रसार करण्यात आला. त्याच प्रमाणे Single Use Plastic व Plastic PET Bottle चा वापर पूर्णपणे टाळण्यात आला.

• सदर कार्यक्रमात मा. पालक मंत्री चंद्रकांतदादा पाटील, मा. लोकप्रतिनिधी, मा. आयुक्त कुमार मा. जिल्हा अधिकारी राजेश देशमुख, स्मार्ट सिटी CEO डॉ. संजय कोलते, मा. अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार मा अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, मा. अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, मा. सह आयुक्त उल्का कळसकर, मा. कृष्णन CEO APCC, मा. उपायुक्त संदीप कदम, अविनाश सकपाळ, माधव जगताप, सचिन
इथापे व इतर अधिकारी व कर्मचारी तसेच विविध शाळा/ महाविद्यालये, खाजगी संस्था, विविध स्वयं सेवी संस्था, महिला बचत गट, गणेश मंडळे, मोहल्ला कमिटी सदस्य, कार्यक्षेत्रातील विविध मान्यवर व प्रतिष्ठित व्यक्ती, क्षेत्रिय कार्यालयांकडील ब्रॅन्ड अॅम्बेसिडर इ. सहभागी झाले होते.
• सदर कार्यक्रमामध्ये विविध कॉलेज च्या विदयार्थी व विविध संथा सदस्यांनी स्वच्छता बाबत पथ नाट्य, रॅप सॉग, व प्रोबोदन पर माहिती देण्यात आली. मा. पालक मंत्री या सदर कार्यक्रमाचे कौतुक केले व सदर कार्यक्रम वारंवार घेण्यत यावे असे सुचविले व स्वच्छतेची शपथ देण्यात आली. सदर कार्यक्रमाचे प्रास्तावीक मा अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांनी व आभार प्रदर्शन मा. उपायुक्त संदीप कदम यांनी केले.

Plastic Seizure Action | PMC Pune | पुणे महापालिकेकडून कात्रज परिसरातील 800 किलो प्लास्टिक जप्त 

Categories
Breaking News PMC social पुणे

Plastic Seizure Action | PMC Pune | पुणे महापालिकेकडून कात्रज परिसरातील 800 किलो प्लास्टिक जप्त

Plastic Seizure Action | पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या (PMC Solid Waste Management Department) वतीने केंद्रीय प्लास्टिक पथकाने कात्रज परीसरात प्लास्टिक विरोधात कारवाई करुन अंदाजे ८०० कि. प्लास्टिक जप्त करून ५,०००/- रु दंड करण्यात आला. अशी माहिती घनकचरा विभागाच्या वतीने देण्यात आली.
घनकचरा विभागाच्या माहितीनुसार केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (CPCB) शरद भारती, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (MPCB) संदीप पाटील, आणि पुणे महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग उपायुक्त  संदीप कदम (Deputy Commissioner Sandeep Kadam) तसेच डॉ. केतकी घाडगे आणि  प्रमुख आरोग्य निरीक्षक आय.एस. इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक राजेश रासकर, शाहु पोकळे, उमेश देवकर, अमोल पवार यांच्या केंद्रीय प्लास्टिक पथकाने कात्रज परीसरात प्लास्टिक विरोधात कारवाई करुन अंदाजे ८०० कि. प्लास्टिक जप्त करून ५,०००/- रु दंड करण्यात आला.

SHS 2023 | PMC Pune | स्वच्छता पंधरवडा स्वच्छता सेवा (SHS) २०२३ अंतर्गत 1 ऑक्टोबरला पुणे महापालिकेकडून मेगा ड्राईव्हचे आयोजन

Categories
Breaking News PMC social पुणे

SHS 2023 | PMC Pune | स्वच्छता पंधरवडा स्वच्छता सेवा (SHS) २०२३ अंतर्गत 1 ऑक्टोबरला पुणे महापालिकेकडून मेगा ड्राईव्हचे आयोजन

| महापालिका घनकचरा विभागाचा उपक्रम

SHS 2023 | PMC Pune |  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त (Mahatma Gandhi Jayanti) त्यांना आदरांजली वाहण्याकरीता पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी ०१ ऑक्टोबर २०२३ रोजी स्वच्छतेकरीता (Sanitation) सर्व नागरिकांनी १ तास श्रमदान करावे असे आवाहन केले आहे.  त्या अनुषंगाने दिनांक ०१ ऑक्टोबर रोजी पुणे महापालिकेकडून (Pune Municipal Corporation) भिडे पूल (Bhide Bridge) या ठिकाणी मेगा ड्राइव्हचे (Mega Drive) आयोजन करण्यात आले आहे. घनकचरा विभागाकडून (PMC Solid Waste Management Department) हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar), अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमनार (IAS Dr Kunal Khemnar) यांनी दिली. यावेळी उपायुक्त संदीप कदम (Deputy commissioner Sandeep Kadam) उपस्थित होते.
स्वच्छता पंधरवडा स्वच्छता ही सेवा (SHS) २०२३ अंतर्गत देशभरात स्वच्छता मेगा ड्राईव्हचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये शहरातील विविध शैक्षणिक संस्था, युवा क्लब, NCC, NSS, NYKS, RWAs, कॉर्पोरेट कंपन्या, नागरिक इत्यादिना सहभागी करून घेऊन ०१ ऑक्टोबर २०२३ रोजी शहरातील
विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम आणि नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी श्रमदान, प्लॉगेथॉन ड्राइव्ह इ. उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यानुसार ०१/१०/२०२३ रोजी स्वच्छता पंधरवडा स्वच्छता ही सेवा (SHS) २०२३ अंतर्गत मुख्य कार्यक्रमाचे आयोजन भिडे पूल या ठिकाणी करण्यात येणार आहे. असे आयुक्तांनी सांगितले.  या  अभियानामध्ये क्षेत्रिय कार्यालयाकडील अधिकारी / कर्मचारी, लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार, मा. सभासद व पदाधिकारी, विविध शाळा/ महाविद्यालये, खाजगी संस्था, विविध स्वयं सेवी संस्था, महिला बचत गट, गणेश मंडळे, मोहल्ला कमिटी सदस्य, कार्यक्षेत्रातील विविध मान्यवर व प्रतिष्ठित व्यक्ती, क्षेत्रिय कार्यालयांकडील ब्रॅन्ड अॅम्बॅसिडर इ. सहभागी असणार आहेत. (Pune Municipal Corporation)
क्षेत्रिय कार्यालय निहाय उपक्रम घेण्यात येणारी विविध ठिकाणे पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर व https://swachhatahiseva.com/. यावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. याव्यतिरिक्त नागरिकांना आपल्या सोयीनुसार ज्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवायची असल्यास त्या ठिकाणी नागरिक स्वच्छता मोहीम राबवू शकतात व त्याबाबत https://swachhatahiseva.com/. या संकेतस्थळावर माहिती अपलोड करू शकतात. ०१/१०/२०२३ रोजी आपल्या नजीकच्या क्षेत्रिय कार्यालयांतर्गत होणा-या श्रमदान अभियानामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन पुणे महानगरपालिकेमार्फत करण्यात आले आहे. (PMC Pune)
——-
News Title | SHS 2023 | PMC Pune | Organized Mega Drive by Pune Municipal Corporation on 1st October under Swachhta Dharwad Swachhta Seva (SHS) 2023

Indian Swachhata League | PMC Solid Waste Management | स्वच्छ भारत मिशन अर्बन २.० उपक्रमांतर्गत पुणे महापालिकेकडून “मेगा ड्राईव्ह” चे आयोजन

Categories
Breaking News PMC social पुणे

Indian Swachhata League | PMC Solid Waste Management | स्वच्छ भारत मिशन अर्बन २.० उपक्रमांतर्गत पुणे महापालिकेकडून “मेगा ड्राईव्ह” चे आयोजन

| 6774 नागरिकांचा सहभाग | ७०१५ किलो सुका कचरा व २१०३ किलो ओला कचरा संकलित


Indian Swachhata League | PMC Solid Waste Management | स्वच्छ भारत मिशन अर्बन २.० (Swatch Bharat Mission Urban 2.0) उपक्रमांतर्गत भारत सरकारच्या MOHUA (गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय) द्वारे आयोजत इंडियन स्वच्छता लीग मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. “Indian Swachhata League” अंतर्गत “पुणेरी नायक” या नावाने पुणे शहर सहभागी झाले असून 17 सप्टेंबर  (सेवा दिवस) ते 2 ऑक्टोबर  (गांधी जयंती व स्वच्छता दिवस) या कालावधीत नागरिकांच्या व विशेषता युवा वर्गाच्या सहभागातून पुणे शहरात पुणे महानगरपालिके (Pune Municipal Corporation) मार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार आज संपूर्ण शहरभर मेगा ड्राईव्ह चे आयोजन करण्यात आले. अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम (Deputy commissioner Sandeep Kadam) यांनी दिली. (Indian Swachhata League | PMC Solid Waste Management)
नानासाहेब पेशवे तलाव व शहरात इतर ठिकाणी नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये शनिवारवाडा, कात्रज तलाव या ठिकाणी रॅलीस, स्वच्छता मोहीम, प्लॉगेथोन या मध्ये पुणे महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी, विविध स्वयंसेवी संस्था, शाळा / महाविद्यालयाचे विद्यार्थी व प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. दिनांक १५ सप्टेंबर पासून सुरु होणा-या आणि २ ऑक्टोबर (राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती आणि स्वच्छता दिवस) या कालावधीत राबविण्यात येणा-या मोहिमेमध्ये विविध शहरस्तरीय उपक्रमांचा समावेश असून कचरामुक्त शहर (मेरा शहर कुडे से आझाद शहर) या संकल्पनेसाठी संयुक्त कृती आणि वचनबद्धतेवर लक्ष केंद्रित करणे हा या मोहिमेचा व्यापक उद्देश आहे.मोहिमेचा एक भाग म्हणून विविध पार्श्वभूमीतील MMCC कॉलेज, SNDT कॉलेज, BMCC
कॉलेज, गोखले इन्स्टिट्यूट, हुजूरपागा शाळा, HV देसाई, SP कॉलेज, मॉडर्न कॉलेज, मामासाहेब मोहोळ
कॉलेज, सिंहगड कॉलेज, कॅम्ब्रीज शाळा, कमिन्स कॉलेज, कर्वे इन्स्टिट्यूट, GSMAC शाळा, Asian कॉलेज इत्यादी शैक्षणिक संस्था, व स्वच्छ संस्था, जनवाणी जीवित नदी Worship earth foundation, Wepunekars foundation, कमिन्स इंडिया, हर्षदीप फाउंडेशन, स्वच्छ पुणे सहकारी संस्था, सेवा सहयोग सह. संस्था, थंब फ्रीएटिव्ह इत्यादी स्वयंसेवी संस्था सहभागी होण्यासाठी १७ सप्टेंबर, २०२३ रोजी युवकाचा पुढाकार असलेली देशव्यापी ‘भारतीय स्वच्छता लीग मोहीमचे आयोजन करण्यात आले होते.

या मोहिमे मध्ये पुणे महानगरपालिका पुणेरी नायक संघ सहभागी असून आपले संघनायक डॉ. सलील कुलकर्णी
(ब्रॅन्ड अॅम्बेसिडर पुणे महानगरपालिका) सुप्रसिद्ध गायक संगीतकार गीतकार, लेखक, दिग्दर्शक आहेत. श्री.
विक्रम कुमार, मा. महापालिका आयुक्त श्री. डॉ. कुणाल खेमनार, मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ). श्री. संदीप कदम, मा. उप आयुक्त घनकचरा व्यवस्थापन, श्री. सत्या नटराजन, ब्रॅन्ड अॅम्बेसिडर, श्रीमती, आम्रपाली चव्हाण, ब्रॅन्ड अॅम्बेसिडर, महापालिका सहाय्यक आयुक्त व अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते.
त्याचबरोबर १५ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत अंदाजे ३० ठिकाणी जनजागृती मोहीम, फ्लॅश मॉब व रॅलीज अशा विविध उपक्रमांचे आयोजन करून त्यामध्ये शहरातील माजी मा.सभासद व पदाधिकारी, पुणे शहरातील विविध शाळा/ महाविद्यालये, NSS, NCC, खाजगी संस्था, विविध स्वयं सेवी संस्था, महिला बचत गट, गणेश मंडळे, मोहल्ला कमिटी सदस्य व कार्यक्षेत्रातील विविध मान्यवर, प्रतिष्ठित व्यक्ती एकूण अंदाजे ६७७४ नागरिकांनी आपला सहभाग नोंदविला व सर्व ठिकाणाच्या स्वच्छता मोहिमांतर्गत एकूण ७०१५ किलो सुका कचरा व २१०३ किलो ओला कचरा संकलित करून पुनः चक्रीकरण करण्यासाठी
पाठविण्यात आला.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे उद्यानामध्ये ई कचऱ्यापासून बनविलेल्या कलाकृतींचे लोकार्पण घनकचरा विभागाचे प्रमुख श्री. संदीप कदम यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी
महानगरपालिकेच्या सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. केतकी घाटगे, महापालिका सहाय्यक आयुक्त श्री.केदार वाले वरिष्ट आरोग्य निरीक्षक श्री राम सोनावणे तसेच कमिन्स इंडिया फाउंडेशनच्या श्रीमती अवंती कदम, श्री. संपत खैरे, जनवाणीचे श्री. मंगेश क्षीरसागर, श्री. समीर अजगेकर, श्रीमती ज्योती सातव उपस्थित होत्या. ई कचऱ्याचे वाढते प्रमाण लक्षात घेता त्याचे शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावणे काळाची गरज बनली आहे. कमिन्स इंडिया फाउंडेशन मागील १० वर्षांपासून जनवाणी आणि पूर्णम वा सामाजिक संस्थांच्या मध्यातून पुणे शहरात जनजागृती करत आहे. शहरातील नागरिकांना ई- कचऱ्याचे महत्त्व लक्षात आणून देण्यासाठी हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे. या कलाकृती टाकाऊ इलेक्रोनिक बोर्ड, वायर, पाईप यापासून बनविण्यात आल्या आहेत, ई कचऱ्याचा वापर करून उद्यानाच्या परिसरात रोषणाई करण्यात आली आहे. अश्याप्रकरे टाकाऊ वस्तूंचा पूनरवापर करणे शक्य आहे. परिसरातील नागरिकांकडून या उपक्रमाचे कौतुक होत आहे. या सुंदर कलाकृती श्री. गिरीश धामणे यांनी साकारल्या आहेत. यासाठी कमिन्स इंडिया फाउंडेशन आणि जनवाणी संस्थेने पुढाकार घेतला.
या वर्षी पुणे महापालिकेने सार्वजनिक स्वच्छतागृहे उपलब्धी, त्याविषयी माहिती व अभिप्राय या समस्या सोडवण्याच्या दृष्टीकोनातून एक पाऊल पुढे टाकले आहे. जून महिन्यामध्ये पुणे महापालिकेने
टॉयलेटसेवा (ToiletSeva) सोबत सेवा पार्टनरशिप घोषित केली आहे. पुणे महापालिकेने पुणे शहरामधील ११८३ सार्वजनिक स्वच्छतागृहांची (public टॉयलेट्स community टॉयलेट्स) माहिती टॉयलेटसेवा (ToiletSeva) अॅप मध्ये उपलब्ध करून दिली आहे. टॉयलेटसेवा अॅप मध्ये पुणे शहरामधील कुठलाही पत्ता टाकून पुणे महापालिकेची सार्वजनिक स्वच्छतागृहे शोधता येतात. गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुणे शहरामधील सर्व सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये QR Code स्टिकर्स लावले जात आहेत. ते QR Code
टॉयलेटसेवा अॅप मध्ये स्कॅन करून नागरिकांना तात्काळ अभिप्राय देता येईल. ह्या विषयावर जागृती करण्यासाठी आणि हा नावीन्यपूर्ण उपक्रम लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी गणेशोत्सव मंडळांची सामाजिक कार्यकत्यांची समाज माध्यमांची आणि सजग नागरिकांची मदत अपेक्षित आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहांविषयीचा आपला अभिप्राय टॉयलेटसेवा अॅप मधून रेटिंग्स च्या मार्फत आणि समस्या (issues) रिपोर्ट करून कळवाव्यात असे आवाहन पुणे महापालिका करत आहे. स्वच्छ सार्वजनिक स्वच्छतागृहे हा स्वच्छ भारत अभियानाचा महत्वाचा भाग आहेत. म्हणूनच सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये QR Code स्टिकर्स लावण्याच्या उपक्रमाचे उदघाटन दि. १७ सप्टेंबर ह्या सेवा दिवशी उपायुक्त, श्री. संदीप कदम, घनकचरा व्यवस्थापन विभाग यांचे उपस्थितीत कोथरूड मधील लक्ष्मीनगर येथील ँ सामूहिक स्वच्छतागृहात झाले. टॉयलेटसेवा अॅप मध्ये असे QR Code स्टिकर स्कॅन करून वापरकर्त्यांना त्या टॉयलेट साठीचा अभिप्राय लगेच देता येईल. पुणे महापालिका टॉयलेटसेवा अॅप कडून मिळणाऱ्या अभिप्रायावरती कृती करण्यासाठी कटिबद्ध आहे. ह्या कार्यक्रमासाठी डॉ. केतकी घाटगे ( सहा आरोग्य अधिकारी), श्री. केदार बझे (महापालिका सहाय्यक आयुक्त ) श्री. प्रीतम आणि श्रीमती सोनाली चोपडा
(टॉयलेटसेवा पुणे डायरेक्टर्स) आणि पुणे महापालिकेमधील अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते.

PMC Solid Waste Management | स्वच्छता कर्मचार्‍यांची  सुरक्षितता व प्रतिष्ठा याबाबत ५३ मास्टर ट्रेनर्सचे प्रशिक्षण संपन्न

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे

PMC Solid Waste Management | स्वच्छता कर्मचार्‍यांची  सुरक्षितता व प्रतिष्ठा याबाबत ५३ मास्टर ट्रेनर्सचे प्रशिक्षण संपन्न

 

PMC Solid Waste Management | वॉश सेक्रेटरीएट आणि युनिसेफ (UNISEF) च्या सहाय्याने व पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) सहयोगाने ५३ मास्टर ट्रेनर्सचे ३ दिवसांचे प्रशिक्षण राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी, घोले रोड, पुणे येथे  ११ ते १३ सप्टेंबर २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, आरोग्य निरीक्षक आणि मुकादम सहभागी झाले होते. हे सर्व मास्टर ट्रेनर्स पुढील कालावधीत पुणे महानगरपालिका मधील सर्व स्वच्छता कर्मचार्‍यांना (Sanitation Workers) या विषयाबाबत प्रशिक्षित करतील. अशी माहिती महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या (PMC Pune Solid Waste management Department) वतीने देण्यात आली.

 

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन (नागरी) टप्पा २.० च्या मार्गदर्शक सुचनांच्या अनुसार महाराष्ट्र राज्यात मिशनची अंमलबजावणी स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत सुरू आहे. यामध्ये ‘सफाईमित्र’ हे अत्यंत महत्वाचे सहयोगी आहे. तसेच स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत स्वच्छता कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण, क्षमता बांधणी, माहिती, शिक्षण व संवाद या उपक्रमाच्या माध्यमातून सफाईमित्रांची/ स्वच्छता कर्मचार्‍यांची व्यावसायिक सुरक्षा आणि प्रतिष्ठा यावर भर द्यावयाचा आहे. यासाठी  विभागीय नागरी आणि पर्यावरण अभ्यास केंद्र (RCUES), अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, मुंबई (AIILSG) येथे युनिसेफ महाराष्ट्र यांच्या सहयोगाने सेक्रेटरीएट महाराष्ट्र अर्बन वॉश आणि एनवारमेंटल सॅनिटेशन कोएलिशन स्थापन करण्यात आले आहे. या वॉश सेक्रेटरीएट आणि युनिसेफ च्या सहाय्याने पुणे महानगरपालिकेच्या सहयोगाने ५३ मास्टर ट्रेनर्सचे ३ दिवसांचे प्रशिक्षण राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी, घोले रोड, पुणे येथे दिनांक ११ ते १३ सप्टेंबर २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, आरोग्य निरीक्षक आणि मुकादम सहभागी झाले होते. (Pune Municipal Corporation)

हे सर्व मास्टर ट्रेनर्स पुढील कालावधीत पुणे महानगरपालिका मधील सर्व स्वच्छता कर्मचार्‍यांना या विषयाबाबत प्रशिक्षित करतील. या प्रशिक्षणाच्या समापन सत्रात या सर्व प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. हे समापन सत्र श्रीमती. जलपा रत्ना, चीफ फील्ड सर्व्हिसेस, युनिसेफ, इंडिया कंट्री ऑफिस , श्रीमती. राजेश्वरी चन्द्रशेखर,  चीफ फील्ड ऑफिस, युनिसेफ, महाराष्ट्र, श्री. संदीप कदम, उप आयुक्त (घन कचरा व्यवस्थापन ) पुणे महानगरपालिका , श्री. आनंद घोडके, वॉश ऑफिसर, युनिसेफ महाराष्ट्र आणि श्रीमती. उत्कर्षा कवडी, वरिष्ठ कार्यकारी संचालिका, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, मुंबई, (संचालिका, सेक्रेटरीएट, महाराष्ट्र अर्बन वॉश आणि एनवारमेंटल सॅनिटेशन कोएलिशन), संचालिका, वॉश सेक्रेटरीएट,  यांच्या विशेष उपस्थितीत संपन्न झाले. (PMC Pune)


News Title |PMC Solid Waste Management | Completed training of 53 Master Trainers on safety and dignity of sanitation workers

Pune Municipal Corporation | आशा राऊत यांच्याकडे परिमंडळ तीन च्या उपायुक्त पदाची जबाबदारी | राजीव नंदकर यांच्याकडील मोटार वाहन विभागाचा कार्यभार काढून घेतला

Categories
Breaking News PMC पुणे

Pune Municipal Corporation | आशा राऊत यांच्याकडे परिमंडळ तीन च्या उपायुक्त पदाची जबाबदारी

| राजीव  नंदकर यांच्याकडील मोटार वाहन विभागाचा कार्यभार काढून घेतला

Pune Municipal Corporation | पुणे | पुणे महापालिकेच्या (PMC Pune) परिमंडळ तीन च्या उपायुक्तपदी आशा राऊत (Deputy Commissioner Aasha Raut) यांची नेमणूक करण्यात आली आहे. राऊत पूर्वी घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या (PMC Solid Waste Management Department) उपायुक्त होत्या. मात्र या पदावर संदीप कदम (Sandeep Kadam) यांची नेमणूक केली होती. राऊत यांना अजून कुठला पदभार दिला नव्हता. अखेर आयुक्तांनी त्यांच्याकडे परिमंडळ तीन ची जबाबदारी दिली आहे. (Pune Municipal Corporation)
दरम्यान उपायुक्त राजीव नंदकर (Deputy Commissioner Rajiv Nandkar) यांच्याकडून मोटार वाहन विभाग (PMC Vehicle Depot) काढून घेण्यात आला आहे. त्यांच्याकडे शिक्षण विभाग (PMC Éducation Department) कायम ठेवण्यात आला आहे. तर परिमंडळ तीन ला जयंत भोसेकर (Deputy Commissioner Jayant Bhosekar) काम करत होते. त्यांच्याकडे आता मोटार वाहन विभाग आणि मागासवर्ग विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी नुकतेच याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

News Title | Pune Municipal Corporation | Asha Raut holds the charge of Deputy Commissioner of Circle Three Rajiv Nandkar took charge of Motor Vehicle Department