PMC Toilet Seva App | टॉयलेटसेवा अॅपचा वापर करणे घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांना बंधनकारक   | अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमणार यांची पत्रकार परिषदेत माहिती 

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Toilet Seva App | टॉयलेटसेवा अॅपचा वापर करणे घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांना बंधनकारक

 | अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमणार यांची पत्रकार परिषदेत माहिती

PMC Toilet Seva App| पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) व टॉयलेटसेवा (Toilet Seva) यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे शहरातील उपलब्ध सार्वजनिक शौचालयाची ठिकाण सुविधांसह माहिती देणाऱ्या टॉयलेटसेवा अॅप सत्र २ (Toilet Seva App 2) ची सुरुवात नुकतीच झाली. स्वच्छता ब्रॅन्ड अॅम्बेसिडर डॉ. सलील कुलकर्णी (Dr Saleel Kulkarni) यांच्या हस्ते याचे उदघाटन झाले. दरम्यान याचा प्रभावी वापर होण्यासाठी हा ऍप वापरणे घनकचरा विभागाच्या (PMC Solid Waste Management Department) कर्मचाऱ्यांना बंधनकारक आहे. अशी माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमणार (Dr Kunal Khemnar IAS) यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Pune Municipal Corporation)

डॉ खेमणार यांनी सांगितले कि लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करायचे आहेत. Review तपासणे, आलेल्या तक्रारींचे निरसन करणे, लोकांना जागृत करणे, जास्तीत जास्त स्वच्छता ठेवण्यासाठी प्रयत्न करणे, अशी कामे कर्मचाऱ्यांना करावी लागणार आहेत. अभिनेते डॉ सलील कुलकर्णी (Dr Saleel Kulkarni) यांनी पुणेकरांना हा ऍप वापरण्याचे आवाहन केले. खासकरून शाळेतील आणि कॉलेजवयीन मुलांनी याबाबत पुढाकार घ्यायला हवा, असे डॉ कुलकर्णी म्हणाले. अमोल भांगे (Amol Bhange) यांनी या ऍप विषयी सविस्तर माहिती देत जास्तीत जास्त फीडबॅक देण्याचे आवाहन पुणेकरांना केले.
पुणे शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची उपलब्धता व सोयीसुविधांबाबत अधिक प्रमाणात जनजागृती होणेकरीता  अमोल भिंगे यांनी शहरातील सार्वजनिक शौचालयांची ठिकाणे शोधणे, वापरानंतर त्या शौचालयास Feedback देणे किंवा तक्रारी नोंदविणे इ. सुविधा उपलब्ध असलेले Toilet Seva app तयार केले असून या App द्वारे टॉयलेट्स search करणे, टॉयलेट add करणे, ओव्हरऑल रेटिंग नुसार results sort करणे, टॉयलेटमध्ये असणाऱ्या सुविधा पहाणे किंवा त्यानुसार search results थे filtering करणेz उदाहरणार्थ – वॉशबेसिन, पाणी, liquid soap किंवा sanitizer, इस्टबिन, lights, महिलांसाठीच्या सॅनिटरी नॅपकिन्स, टॉयलेट कुठे लोकेटेड आहे हे तपासणे अशा विविध सुविधा उपलब्ध आहेत. पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील एकूण १९८३ सार्वजनिक स्वच्छतागृहांची (public टॉयलेट्स community टॉयलेट्स) माहिती टॉयलेटसेवा app मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ही माहिती शहरातील नागरिक तसेच प्रवास करणाऱ्यांना उपयोगी पडणार आहे. शहरातील सार्वजनिक शौचालयांविषयी नागरिकांना आपला अभिप्राय टॉयलेटसेवा app मधून रेटिंग्सच्या मार्फत देणे आणि आपल्या तक्रारी नमूद करणे सोयीचे होणार आहे.  सध्या सुरू असणारया Clean Toilet Challenge २०२३ च्या अनुषंगाने Toilet Seva App च्या माध्यमातून शौचालय प्रतवारी करून शहर पातळीवर स्वच्छ शौचालाय स्पर्धा राबविल्यास शौचालय व्यवस्थापन अधिक सक्षमपणे होऊन नागरिकांना योग्य सोयीसुविधा देण्यात येतील. याकरिता स्वच्छ शौचालय स्पर्धा संपूर्ण शहरभर राबविण्यात येणार आहे. सदर स्पर्धेमध्ये प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयातून उत्कृष्ट पाच शौचालयांपैकी एका शौचालयाची निवड अंतिम फेरीकरिता केली जाणार आहे. शहर पातळीवर

या १५ शौचालयांमधून तीन उत्कृष्ट शौचालय निवडले जातील. सदर स्पर्धेचा कालावधी ०१ जानेवारी २०२४ ते ३० जून २०२४ असा असणार आहे. एकूण १०० गुणांकरिता Toilet Seva App Rating / मानांकन ३० गुण, Toilet Seva App वापर ३० गुण व प्रत्यक्ष निरीक्षण (FACES Parameters / मापदंड)- ४० गुण हे स्पर्धेचे निकष असतील.
स्पर्धेचे परीक्षण करण्याकरीत क्षेत्रीय कार्यालय स्तरावर प्रत्येकी एक अश्या एकूण १५ समिती व मुख्य खात्याच्या स्तरावर केंद्रीय समिती कार्यरत असतील. केंद्रित स्तरावर अपेक्स कमिटीचे सदस्य पत्रकार,
स्वयं सेवी संस्था प्रतिनिधी, नागरिक प्रतिनिधी, निवृत्त अधिकारी, सफाई कर्मचारी आयोग प्रतिनिधी इत्यादी सदस्य असणार आहेत व विकेंद्रित स्तरावर मोहल्ला कमिटी सदस्य, स्वयं सेवी संस्था प्रतिनिधी नागरिक प्रतिनिधी, निवृत्त अधिकारी इत्यादी सदस्य असणार आहेत. महापालिका सहाय्यक आयुक्त क्षेत्रीय स्तरावरील समितीचे अध्यक्ष राहतील व मुख्य खात्याच्या स्तरावर केंद्रीय समिती चे अध्यक्ष उप आयुक्त घनकचरा व्यवस्थापन असणार आहेत. परीक्षणाबाबत सदस्यांमध्ये मतभिन्नता अढळल्यास अंतिम निर्णय अध्यक्षांचा असेल. शौचालयांचे वापरकर्त्यांना अपेक्षित सेवा सुविधा देणे व उत्कृष्ठ शौचालयांना सर्वज्ञात करणे असे या अभियानाचे उद्दिष्ट आहे.

PMC Solid Waste Management | घनकचरा विभागातील निरीक्षकांचे मनोबल वाढवण्यासाठी आता चारचाकी गाड्या | अस्वच्छता करणाऱ्यांवर होणार ठोस कारवाई

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Solid Waste Management | घनकचरा विभागातील निरीक्षकांचे मनोबल वाढवण्यासाठी आता चारचाकी गाड्या

| अस्वच्छता करणाऱ्यांवर होणार ठोस कारवाई

PMC Solid Waste Management | पुणे | महापालिकेच्या घनकचरा विभागाने (PMC Pune Solid Waste Management Department) शहरात स्वच्छता टिकून राहावी, यासाठी गंभीरपणे पाऊल उचलले आहे. शहरात अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करताना विभागातील कर्मचाऱ्यांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र आता या कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यात येणार आहे. त्यासाठी या कर्मचाऱ्यांच्या दिमतीला चारचाकी गाड्या देण्यात येणार आहेत. या माध्यमातून शहरात अस्वच्छता करणाऱ्यांवर होणार ठोस कारवाई करण्यास मदत होणार आहे. पहिल्या टप्प्यात 4 गाड्या घेण्यात येणार आहेत. त्यासाठी 34 लाखाचा खर्च अपेक्षित आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समिती (PMC Standing Committee) समोर ठेवण्यात आला आहे. अशी माहिती उपायुक्त संदीप कदम (Deputy Commissioner Sandip Kadam) यांनी दिली. (Pune Municipal Corporation)
पुणे शहरात घनकचरा विभागाच्या माध्यमातून स्वच्छता करण्याचे काम केले जाते. शहरात दररोज 2300 मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. यातील 1700 मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. दरम्यान स्वच्छतेबाबत शहरातील लोक मात्र उदासीन दिसून येतात. उघड्यावर कचरा फेकण्याचे प्रमाण जास्तच आहे. त्यासाठी घनकचरा विभागाच्या माध्यमातून लोकांना दंड केला जातो. मात्र तरीही काही लोकांची उदासीनता दिसून येते. कारवाई करण्याबाबत महापालिका कर्मचाऱ्यांच्या मर्यादा दिसून येतात. ही बाब लक्षात घेत घनकचरा विभागाने निरीक्षकांचे मनोबल वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना दंडात्मक कारवाईचे अधिकार आहेतच; मात्र ही कारवाई प्रभावीपणे करण्यासाठी त्यांच्या दिमतीला आता चारचाकी गाड्या देण्यात येणार आहेत. (PMC Pune News)
याबाबत उपायुक्त कदम यांनी सांगितले कि एकूण 18 गाड्या घेण्यात येणार आहे. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयासाठी 1 आणि व्हिजिलन्स साठी तीन अशा 18 गाड्या घेण्यात येणार आहेत. त्यात पहिल्या टप्प्यात 4 गाड्या घेण्यात येणार आहेत. एका गाडीसाठी साधारणतः साडे आठ लाख खर्च अपेक्षित आहेत. 4 गाड्यांचा खर्च 34 लाख इतका येणार आहे. हा खर्च आतापर्यंत जो दंड जमा झाला आहे. त्यातूनच घेतल्या जाणार आहेत. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या या गाड्या GeM पोर्टल वरून घेण्यात येणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समिती समोर ठेवण्यात आला आहे.
कदम यांनी सांगितले कि शहरात गस्त घालणे आणि दंडात्मक कारवाई करण्यासाठी या गाड्या उपयुक्त ठरणार आहेत. एका गाडीत 4 कर्मचारी असतील. सहायक आयुक्त आणि विभागीय निरीक्षक ठरवतील हे चार लोक कोण असणार ते. दिवस आणि रात्री अशा दोन्ही वेळा या गाड्या शहरातून फिरतील. लोकांनी उघड्यावर कचरा आणि राडारोडा फेकू नये, तसेच स्वच्छतेबाबत शिस्त लावण्यासाठी याचा उपयोग होईल. तसेच कर्मचाऱ्यांना देखील अधिकार आल्याने लोक त्यांना घाबरतील आणि नियमांचे पालन करतील.
या चारचाकी गाड्यांच्या माध्यमातून आपल्या सेवकांचे मनोबल वाढण्यास मदत होणार आहे.  दंडात्मक कारवाई करताना आता जो विरोध तो  विरोध कमी होईल आणि ठोस कारवाई होईल. जेणेकरून लोकांना शिस्त लागेल आणि शहरात स्वच्छता टिकून राहिल. कारण बरेच लोक रात्रीच्या वेळी हायवे वर कचरा टाकत असतात. त्याला या माध्यमातून आळा घालता येईल. तसेच गर्दीच्या ठिकाणी या माध्यमातून स्वच्छते बाबत जनजागृती करता येईल.
संदीप कदम, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग. 
—-

Plastic Use Ban | PMC Pune | प्लास्टिकचा वापर बंद करण्याचे पुणे महापालिकेचे आवाहन | अन्यथा 5 हजारापासून 25 हजारापर्यंत दंड 

Categories
Breaking News PMC social पुणे

Plastic Use Ban | PMC Pune | प्लास्टिकचा वापर बंद करण्याचे पुणे महापालिकेचे आवाहन | अन्यथा 5 हजारापासून 25 हजारापर्यंत दंड

Plastic Use Ban | PMC Pune | पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) कार्यक्षेत्रात प्लास्टिक वापराबाबत नियमांच्या तरतुदी लागू आहेत. त्यास अधीन राहून प्लास्टिकचा वापर बंद करण्याचे आवाहन पुणे महापालिकेच्या (PMC Pune) वतीने करण्यात आले आहे. अन्यथा 5 हजारापासून 25 हजारापर्यंत दंड ठोठावला जाणार आहे. पुणे महापालिका आयुक्तांनी नागरिकांना हे आवाहन केले आहे. (PMC Pune News)

प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम २१६ च्या नियम ४ (२) नुसार (सुधारित केल्यानुसार ), “पॉलीस्टीरिन आणि विस्तारित पॉलिस्टीरिनसह खालील एकल वापराच्या प्लास्टिक (SUP) चेउत्पादन, आयात, साठा, वितरण, विक्री आणि वापर दिनांक १ जुलै २०२२ पासून प्रभावीपणे प्रतिबंधित करण्यात आल्या आहेत. यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे. (Pune Municipal Corporation)

अ) प्लास्टिकच्या काड्या असलेले इअरबड्स, फुग्यासाठी वापण्यात येणा-या प्लास्टिकच्या  काड्या, प्लास्टिकचे ध्वज, कँडी स्टिक्स, आइस्क्रीम स्टिक्स, सजावटीसाठीचे पॉलिस्टीरिन;
ब) प्लेट्स, कप, ग्लासेस, कटलरी जसे की काटे, चमचे, चाकू, पेंढा, ट्रे, मिठाईचे बॉक्सेस, निमंत्रण पत्रिका आणि सिगारेटची पाकिटे गुंडाळण्यासाठी वापरलेल्या पॅकिंग फिल्म्स, 100 मायक्रॉनपेक्षा कमी आकाराचे प्लास्टिक किंवा पीव्हीसी बॅनर, स्टिरर इ. (PMC Solid Waste Management Department)

प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम 2016 च्या नियम ४(१) (क) नुसार (सुधारणा केल्यानुसार ) “व्हर्जिन किंवा पुनर्वापर केलेल्या प्लास्टिकची कॅरी बॅग दिनांक ३० सप्टेंबर २०२१ पासून पंचाहत्तर (७५) मायक्रॉनपेक्षा कमी जाडीची नसावी आणि दिनांक ३१ डिसेंबर २०२२ पासून एकशे वीस (१२०) मायक्रॉनपेक्षा कमी जाडीची नसावी. महाराष्ट्र शासनाच्या २३ मार्च २०१८ च्या अधिसूचनेनुसार, संपूर्ण राज्यात हँडलसह आणि हँडलशिवाय प्लास्टिक पिशव्यांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून या सर्व नियमांचे पालन न करणाऱ्या व्यक्ती/संस्था/ कंपन्यांना खालीलप्रमाणे दंड आकारण्यात येईल.

प्लास्टिकचे उत्पादन, वितरण, साठवण, विक्री किंवा प्लास्टिक वस्तू किंवा थर्माकोलचा वापर केल्यास किंवा पहिल्या वेळी ५०००/- दंड/तडजोड शुल्क, दुस-या वेळी १००००/-, तिस-या वेळी २५०००/- व तीन महिन्यांची कैद

पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात सर्वत्र वरील नियमांच्या तरतुदी आणि सुधारणांसह अधिसूचना लागू आहेत आणि सर्व उत्पादक, स्टॉकिस्ट, किरकोळ विक्रेते, दुकानदार, ई-कॉमर्स कंपन्या, रस्त्यावरील विक्रेते, व्यावसायिक आस्थापने (मॉल्स/बाजारपेठे/शॉपिंग सेंटर/सिनेमा घर/पर्यटन ठिकाणे ) यांना सूचित करण्यासाठी जारी केले जात आहेत. शाळा/महाविद्यालये/कार्यालयीन ठिकाणे/रुग्णालये आणि इतर संस्था) आणि सामान्य जनतेने बंदी असलेल्या प्लास्टिकचे उत्पादन, साठवणूक, पुरवठा,
विक्री, वाहतूक, वितरण किंवा वापर त्वरीत बंद करावा हे सर्व नागरिकांस आवाहन करण्यात आले आहे.

PMC Solid Waste Management Department | पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून स्वच्छतेबाबत आरोग्य निरिक्षक, वरिष्ठ आरोग्य निरीक्षकांना  प्रशिक्षण देण्यास सुरुवात 

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Solid Waste Management Department | पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून स्वच्छतेबाबत आरोग्य निरिक्षक, वरिष्ठ आरोग्य निरीक्षकांना  प्रशिक्षण देण्यास सुरुवात

PMC Solid Waste Management Department | पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाने (PMC Pune Solid Waste Management Department) नुकताच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी इंदौर शहराची (PMC Indore Tour) स्वच्छते बाबत पाहणी करण्यासाठी दौरा आयोजित केला होता. दौऱ्यांनंतर तात्काळ  विभागाकडून उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. त्यानुसार  आरोग्य निरिक्षक आणि वरिष्ठ आरोग्य निरीक्षक यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये त्यांना इंदोर आणि पुणे शहराची तुलना करत घरोघरी १०० टक्के कचरा संकलन, त्याचे वाहतुक नियोजन, कर्मर्शियल भागातील कचरा याबाबत केलेले सुयोग्य नियोजन तसेच झाडणकाम इ.बाबत प्रशिक्षण देण्यात आले. अशी माहिती घनकचरा विभागाच्या वतीने देण्यात आली. (Pune Municipal Corporation)

घोले रोड क्षेत्रीय कार्यालयात हे प्रशिक्षण आयोजित केले होते. यामध्ये औंध आणि वारजे क्षेत्रीय कार्यालयाच्या सहायक आयुक्त यांनी तसेच इंदोर च्या दौरा केलेल्या इतर अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. पुणे महानगरपालिकेमार्फत ३० नोव्हेंबर व 1 डिसेम्बर रोजी इंदौर शहराचा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौ-यासाठी पुणे महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली होती. इंदोर शहरामध्ये स्वच्छतेचा आयाम राखणेकामी ज्या ज्या बेस्ट प्रॅक्टीसेस जसे की घरोघरी १०० टक्के कचरा संकलन, वाहतुक नियोजन, कर्मर्शियल भागातील कच याबाबत केलेले सुयोग्य नियोजन तसेच झाडणकाम इ.बाबतची पाहणी करण्यात आले या पाहणी दरम्यान आढळलेल्या बाबींचे अनुषंगाने आरोग्य निरीक्षक व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक यांना याबाबत अवगत करणे व त्याबाबतचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. त्यानुसार परिमंडळ नुसार हे प्रशिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आगामी काही दिवस हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. असे घनकचरा विभागाकडून सांगण्यात आले. (PMC News)

PMC Solid Waste Management Department | इंदौर दौऱ्यानंतर महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून तात्काळ उपाययोजना सुरु | आरोग्य निरिक्षक, वरिष्ठ आरोग्य निरीक्षकांना दिले जाणार प्रशिक्षण 

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Solid Waste Management Department | इंदौर दौऱ्यानंतर महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून तात्काळ उपाययोजना सुरु | आरोग्य निरिक्षक, वरिष्ठ आरोग्य निरीक्षकांना दिले जाणार प्रशिक्षण

PMC Solid Waste Management Department | पुणे शहराला अजून स्वच्छ बनवण्यासाठी आणि देशात प्रथम क्रमांकाचे स्वच्छ शहर बनवण्यासाठी महापालिकेच्या घनकचरा विभागाने (PMC Pune Solid Waste Management Department) कंबर कसली आहे. त्यासाठी महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी इंदौर शहराची (PMC Indore Tour) याबाबत पाहणी करण्यासाठी दौरा आयोजित केला होता. दौऱ्यांनंतर दुसऱ्याच दिवशी विभागाकडून उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. त्यानुसार सर्वप्रथम आरोग्य निरिक्षक आणि वरिष्ठ आरोग्य निरीक्षक यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामध्ये त्यांना घरोघरी १०० टक्के कचरा संकलन, वाहतुक नियोजन, कर्मर्शियल भागातील कच याबाबत केलेले सुयोग्य नियोजन तसेच झाडणकाम इ.बाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. अशी माहिती उपायुक्त संदीप कदम (Deputy Commissioner Sandeep Kadam) यांनी दिली. (Pune Municipal Corporation)

पुणे महानगरपालिकेमार्फत ३० नोव्हेंबर व 1 डिसेम्बर रोजी इंदौर शहराचा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौ-यासाठी पुणे महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली होती. इंदोर शहरामध्ये स्वच्छतेचा आयाम राखणेकामी ज्या ज्या बेस्ट प्रॅक्टीसेस जसे की घरोघरी १०० टक्के कचरा संकलन, वाहतुक नियोजन, कर्मर्शियल भागातील कच याबाबत केलेले सुयोग्य नियोजन तसेच झाडणकाम इ.बाबतची पाहणी करण्यात आले या पाहणी दरम्यान आढळलेल्या बाबींचे अनुषंगाने आरोग्य निरीक्षक व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक यांना याबाबत अवगत करणे व त्याबाबतचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. त्यानुसार परिमंडळ नुसार हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. (PMC News)

 

| अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ही देण्यात आली आहे जबाबदारी

1. वरिष्ठ आरोग्य निरीक्षक  राम सोनवणे, आरोग्य निरीक्षक  जालिंदर चांदगुडे व   नवनाथ शेलार यांनी इंदौर शहराची केलेल्या पहाणीबाबत पुणे महानगरपालिकेच्या परिमंडळ क्र. १ ते ५ मधील सर्व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक व आरोग्य निरीक्षक यांना प्रशिक्षण देणेकामी दैनंदिन बॅचेस तयार करून दु.०३.०० ते सायं ०५.०० या कालावधीत शिवाजीनगर घोलेरोड क्षेत्रिय कार्यालयाकडील ऑडिटोरियम मध्ये प्रशिक्षण पूर्ण करण्यात यावे.

2. तसेच वरिष्ठ आरोग्य निरीक्षक श्री राम सोनवणे, आरोग्य निरीक्षक श्री. जालिंदर चांदगुडे व श्री. नवनाथ शेलार यांनी दिलेल्या प्रशिक्षणाबाबतचा अहवाल मुख्य खात्याकडे सादर करावा.

3. प्रशिक्षणासाठी लागणारा शिवाजीनगर घोलेरोड क्षेत्रिय कार्यालयाकडील ऑडिटॉरियम (उप आयुक्त कार्यालय परिमंडळ क्र. १) येथील उपलब्धतेबाबत व त्याबाबतचे योग्य ते आवश्यक नियोजन प्र. सहायक
आरोग्य अधिकारी डॉ. केतकी घाटगे व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक श्री. इमामुद्दीन इनामदार यांनी करावयाचे आहे.

PEHEL 2023 | Pune News | ई कचरा संकलनात १५ टन ई-कचरा व ८ टन प्लॅस्टिक कचरा जमा

Categories
Breaking News PMC social पुणे

PEHEL 2023 | Pune News | ई कचरा संकलनात १५ टन ई-कचरा व ८ टन प्लॅस्टिक कचरा जमा

| पुणेकरांचा PEHEL२०२३, ई-कचरा संकलन महाअभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद

PEHEL 2023 | Pune News | पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) आणि पुणे शहरातील विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त प्रयत्नांनी ०५  नोव्हेंबर  रोजी ई-कचरा व प्लॅस्टिकविषयी जनजागृती (Plastic Awareness) व संकलनाचे महाअभियान आयोजित करण्यात आले. हे अभियान रविवारी, सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत, संपूर्ण पुणे शहरात ३०० ठिकाणी पार पडले. अभियानात पुणेकरांनी उत्सुर्त प्रतिसाद देत १५ टन ई-कचरा व ८ टन प्लॅस्टिक कचरा जमा केला. अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या (PMC Solid Waste Management Department) वतीने देण्यात आली.
पुणे महानगरपालिका, केपिआईटी टेक्नाँलॉजीस, कमिन्स इंडिया फाऊंडेशन, आदर पूनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह, जनवाणी, महालक्ष्मी इ- रिसायक्लर, के.के. नाग प्रा. लिमिटेड आणि इतर संस्थांनी या अभियाना मध्ये सक्रिय सहभाग घेतला.
या अभियानादरम्यान पुणे शहरातील सर्व भागात इ-कचरा संदर्भात जनजागृती करण्यात आली. वरील सर्व सामाजिक संस्थांनी पुण्यातील शैक्षणिक संस्थांना भेटी देऊन या महासंकलनात सामील होण्याचे अहवान केले व या अहवानाला प्रतिसाद देत, १७ शैक्षणिक संस्थांकडून  १००० हून अधिक स्वयंसेवकांनी सहभाग दिला. त्याचप्रमाणे  पुणे महानगपालीकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. कुणाल खेमनार (IAS Dr Kunal Khemnar) यांनी तसेच स्वच्छसर्वेक्षण २०२३ साठी नियुक्त केलेले ब्रॅंड अॅम्ब्यासीडर संगीतकार व कवी डॉ. सलील कुलकर्णी यांनी देखील पुणेकरांना या PEHEL२०२३ च्या महासंकलन अभियानात सामील होण्यासाठी आवाहन केले. या अभियानात पुणेकरांनी उत्सुर्त प्रतिसाद देत १५ टन ई-कचरा व ८ टन प्लॅस्टिक कचरा जमा केला. अभियाना दरम्यान ई-कचरा दान करणार्या प्रत्येक नागरिकास डोनेशन सर्टिफिकेट देखील देण्यात आले. (PMC Pune)
या अभियानाचे उद्घाटन शिवरकर उद्यान, वानवडी येथे पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त तसेच घन कचरा विभागाचे प्रमुख श्री. संदीप कदम (Deputy Commissioner Sandip Kadam) यांच्या हस्ते झाली, या उदघाटन सोहळ्यास कामिन्स इंडिया कंपनीच्या सी एस आर प्रमुख श्रीमती सौजन्या वेगुरू, केपीआयटी टेक्नोलोजीसचे मार्केटिंग विभागाचे संचालक श्री. धनंजय जाधव,सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. केतकी घाटगे, कमिन्स कंपनीच्या सौ. अवंती कदम  इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
PEHEL२०२३ सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी उपायुक्त श्री. संदीप कदम यांनी सर्व पुणेकरांना आवाहन करत ओला-सुका कचरा आणि इलेक्ट्रोनिक कचरा घरातच वेगवेगळा करावा, जेणेकरून महानगरपालिकेला सर्व प्रकारच्या कचर्याचे शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावणे सोयीचे होईल. तसेच इलेक्ट्रोंनिक कचर्याच्या संकलनासाठी पुण्यातील पहिल्या टप्प्यात २३ गार्डनमध्ये संकलन केंद्र सुरू करण्याची घोषणा केली. सौ. सौजन्या वेगुरू यांनी देखील स्वतःच्या घरातील ई-वेस्ट दान देऊन या उद्दात्त कार्यात सर्वांचा कृतीशील सहभाग असला पाहिजे असे सांगितले.
जनवाणीचे उपसंचालक श्री. मंगेश क्षीरसागर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना ई-वेस्ट कमी करण्यासाठी संस्थेमार्फत घेण्यात येणाऱ्या उपक्रमांचा आढावा दिला तसेच विविध सोसायटी मधून कायमस्वरूपी ई-कचरा संकलन बीन बसवणार असल्याचे देखील सांगितले. जनवानीचे श्री. सतीश आदमने यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.

Housing Society & Quality city Expo | तुम्हांला ओला कचरा जिरवणाऱ्या तंत्रज्ञानाविषयी जाणून घ्यायचंय | तर मग पुणे महापालिकेच्या उद्यापासून सुरु होणाऱ्या प्रदर्शनाला भेट द्या

Categories
Breaking News PMC social पुणे

Housing Society & Quality city Expo | तुम्हांला ओला कचरा जिरवणाऱ्या तंत्रज्ञानाविषयी जाणून घ्यायचंय | तर मग पुणे महापालिकेच्या उद्यापासून सुरु होणाऱ्या प्रदर्शनाला भेट द्या

Housing Society & Quality city Expo |  पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) , नॅशनल सोसायटी फॉर क्लीन सिटी (National Society for clean city) व पुणे जिल्हा गृहनिर्माण महासंघ (Pune District Gruhnirman Mahasangh) यांचे संयुक्त विद्यमाने “Housing Society & Quality city Expo” चे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या (PMC Solid Waste Management Department) वतीने देण्यात आली.

२७ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर २०२३ या कालावधीमध्ये गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट पुणे या ठिकाणी “Housing Society & Quality city Expo” चे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्टार्टअप कंपन्यांनी उपकरणे व उत्पादने समावेश आहे. त्याद्वारे नागरिकांना विविध तंत्रज्ञानाबाबत एकाच ठिकाणी माहिती उपलब्ध होणार असून शहर दर्शनी साफ़ दिसण्यात मदत होईल. शुध्द हवा, शुद्ध पाणी, कचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती केली जाणार आहे. तसेच या ठिकाणी ओला कचरा जिरवीणाऱ्या विविध तंत्रज्ञान प्रदात्यांचे प्रदर्शन देखील आयोजित करण्यात येणार आहे.
गुणवत्ता पूर्ण शहर निर्माण (क्वालिटी सिटी मिशन) करणे हा केंद्र सरकारच्या अभियानाचा एक महतवपूर्ण भाग असून यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचा पुढाकार आणि नागरिकांचा कृतीशील, सातत्यपूर्ण सहभाग महत्वपूर्ण ठरणार आहे. ही संकल्पना पुणेकर नागरिकांसमोर ठेवण्यासाठी सहकार विभाग (महाराष्ट्र
शासन), पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगर पालिका, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंटस महासंघ मर्यादित, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, नॅशनल सोसायटी फॉर क्लीन सिटी (NSCC) आणि विविध समविचारी, सहयोगी संस्था “Housing Society & Quality city Expo” चे आयोजन करीत आहेत.
“Housing Society & Quality city Expo” ला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून संबोधित करणार आहे. २७/१०/२०२३ रोजी “Housing Society & Quality city Expo” चे उद्घाटन व
मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे. दि. २८/१०/२०२३ रोजी पर्यावरण पुरक वाँड सोसायटी व दर्शनी शहर सफाइत नागरिकांचा सहभाग याविषयी विशेष सत्र सादर होणार आहे. यामध्ये नॅशनल सोसायटी फॉर क्लीन सीटीस यांच्या सुवर्ण मोहोत्सवी वर्षानिमित्त त्यांचे ५० वर्ष कामामागील (१९७३ ते २०२३) मनोगत सादरीकरण, श्रीमती. पुर्वा केसकर यांचे विचार, पुणे महानगरपालिकेच्या पर्यावरण विभाग व शुद्ध हवा व इतर योजनांची माहिती, घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या योजना, कर आकारणी व कर संकलन, पुणे
विभागाचे सादरीकरण मा. डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट) पुणे महानगरपालिका यांचे मार्गदर्शन व मा.नीलमताई गोऱ्हे उप सभापती, विधान परिषद, महाराष्ट्र यांचे अध्यक्षीय भाषण होणार आहे.
“Housing Society & smart Quality city Expo” चा लाभ जास्तीतजास्त गृहनिर्माण संस्था, शासकीय – शैक्षणिक संस्था व खाजगी संस्था व पुणेकर नागरिक यांनी घ्यावा असे आवाहन पुणे महानगरपालिकेमार्फत करण्यात आले आहे.

PMC Solid Waste Management Department | शहरातील वर्दळीच्या तसेच कमर्शियल भागात स्वच्छता करण्यासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती | घनकचरा व्यवस्थापन विभागाचा निर्णय

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Solid Waste Management Department | शहरातील वर्दळीच्या तसेच कमर्शियल भागात स्वच्छता करण्यासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती

| घनकचरा व्यवस्थापन विभागाचा निर्णय

PMC Solid Waste Management Department | पुणे | पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने (PMC Pune Solid Waste Management Department) शहरातील स्वच्छतेवर (Sanitation) चांगलाच जोर दिला आहे. शहरात वर्दळीची तसेच कमर्शियल (Commercial Areas) असणारी बरीच ठिकाणे आहेत. या ठिकाणी कचरा देखील जास्त होतो. त्यामुळे दुपारच्या सत्रात म्हणजेच सायंकाळी 4 ते 12 या कालावधीत अतिरिक्त कमर्चारी देऊन स्वच्छता करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या 15% कर्मचारी तैनात करण्याचे आदेश उपायुक्त संदीप कदम (Deputy Commissioner Sandip Kadam) यांनी सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत. तसेच सर्व आरोग्य निरीक्षकांनी त्याचा अहवाल देण्याचे आदेश देखील कदम यांनी दिले आहेत. (Pune Municipal Corporation)
उपायुक्त कदम यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे कि, पुणे महानगरपालिका, घनकचरा व्यवस्थापन विभागांतर्गत क्षेत्रिय कार्यालय स्तरावर शहराची दैनंदिन स्वच्छता करण्यासाठी कायम स्वरूपी व कंत्राटी/कायम पद्धतीने सफाई सेवक कार्यरत आहेत. या सर्व सफाई सेवकांमध्ये एकसंधता दिसण्यासाठी, सफाई सेवकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व सफाई सेवकांनी त्यांच्या दैनंदिन कामकाजा दरम्यान गणवेष, अॅप्रन व ओळखपत्र परिधान करतील याची दक्षता सर्व आरोग्य निरीक्षकांनी घ्यावयाची आहे. तसेच कंत्राटी पद्धतीने काम करणा-या सेवकांना देखील गणवेष, अॅप्रन, सुरक्षा प्रावरणे व ओळखपत्र संबंधीत ठेकेदाराकडून पुरविले जाईल व सेवक त्याचा वापर करतील याची दक्षता सर्व महापालिका सहाय्यक आयुक्त यांनी घ्यावयाची आहे. (PMC Pune)
क्षेत्रीय कार्यालयांतर्गत (नवीन समाविष्ट गावांसहित) नेमणूक करण्यात आलेल्या कंत्राटी/कायम सेवकांकडून सायंकाळी ०४.०० ते रात्री १२.०० या दुसऱ्या पाळीमध्ये कामकाज करुन घेणे तसेच कंत्राटी सुपरवायझर/कायम मोकादाम यांनी कामकाज करुन घेतल्याबाबत वेळोवेळी कामकाजाचे फोटोग्राफ्स सादर करायचे आहेत. त्याचप्रमाणे आवश्यक त्या वर्दळीच्या ठिकाणी व कमर्शियल भागामध्ये दुपारचे सत्रात १५% कंत्राटी/कायम सेवकांकडून कामकाज करून घेणेबाबतची कार्यवाही करणेबाबत संबंधिताना सूचित करण्यात यावे. असे म्हटले आहे. (PMC Pune News)
ज्या ठिकाणी मेकॅनिकल स्वीपिंग करण्यात येते अश्या ठिकाणां व्यतिरिक्त ठिकाणी सेवकांमार्फत कामकाज करून घेण्यात यावे. याबाबत कटाक्षाने दक्षता घेण्यात यावी. सर्व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक यांनी वर नमूद केल्यानुसार कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा दैनंदिन अहवाल महापालिका सहायक आयुक्त यांचेमार्फत घनकचरा व्यवस्थापन विभागास सादर करावा. असेही आदेशात म्हटले आहे. (Pune Municipal Corporation Marathi News)
——-

PMC Solid Waste Management Department | पुणे महापालिकेने 1 ऑक्टोबर पासून नागरिकांकडून 20 लाखांचा दंड केला वसूल | वाचा सविस्तर

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Solid Waste Management Department | पुणे महापालिकेने 1 ऑक्टोबर पासून नागरिकांकडून 20 लाखांचा दंड केला वसूल | वाचा सविस्तर

PMC Solid Waste Management Department | पुणे | पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या (PMC Solid Waste Management Department) वतीने सार्वजनिक जागी थुंकणे, कचरा जाळणे, अस्वच्छता करणे, अशा कारणांसाठी दंडात्मक कारवाई केली जाते. विभागाने ही कारवाई गंभीरपणे सुरु केली आहे. 1 ऑक्टोबर पासून सर्व क्षेत्रीय कार्यालयाकडून 20 लाख 18 हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे. अशी माहिती उपायुक्त संदीप कदम (Deputy Commissioner Sandip Kadam) यांनी दिली. दरम्यान दंड करणे नाही तर स्वच्छते बाबत जनजागृती करणे हा महापालिकेचा उद्देश असून नागरिकांनी महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन उपायुक्त कदम यांनी केले आहे. (Pune Municipal Corporation)
पुणे महापालिकेने सार्वजनिक जागी स्वच्छता राखण्यासाठी स्वच्छता उपविधी तयार केली आहे. त्या नियमानुसार अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांस दंडात्मक कारवाई केली जाते. यामध्ये सार्वजनिक जागी थुंकणे, लघवी करणे, कचरा जाळणे, कचऱ्याचे सुका आणि ओला असे वर्गीकरण न करणे, नदीत राडारोडा टाकणे, अशा गोष्टींचा समावेश आहे. यासाठी 180 रुपयापासून ते 5 हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. यानुसार महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाने ही कारवाई 2 ऑक्टोबर पासून सुरु केली आहे. (PMC Pune)
सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याबाबद्दल 152 लोकांकडून 1 लाख 52 हजार दंड वसूल करण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी लघवी करणाऱ्या 71 जणांकडून 15800 रुपये वसूल केले. कचरा जाळणाऱ्या 125 लोकांकडून 61980 रु वसूल करण्यात आले. कचऱ्याचे वर्गीकरण न केल्याबद्दल 237 लोकांकडून 75790 रुपये वसूल करण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्या 4038 लोकांकडून 10 लाख 6 हजार रुपये वसूल करण्यात आले. बल्क वेस्ट जनरेटर कचरा प्रक्रिया प्रकल्प बंद बाबत 7 लोकांकडून 35 हजार वसूल केले. बांधकाम राडारोडा टाकणाऱ्या 25 लोकांकडून 1 लाख 2 हजार 500 वसूलण्यात आले. 71 लोकांवर प्लास्टिक कारवाई करत 3 लाख 60 हजार वसूल करण्यात आले. अशा एकूण 4743 लोकांवर दंड ठोठावत महापालिकेने 20 लाख 18 हजार 980 रुपये वसूल केले. (Pune Municipal Corporation)
——
या अभियानाचा उद्देश हा लोकांमध्ये स्वच्छते बाबत जनजागृती करणे हा आहे. त्यानुसार लोकांचा चांगला प्रतिसाद आम्हांला मिळू लागला आहे. तरीही स्वच्छेबाबत नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आमचे आवाहन आहे. कारण महापालिकेचा दंड वसूल करणे हा हेतू नसून फक्त जनजागृतीवर भर राहणार आहे.
संदीप कदम, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग, पुणे महापालिका. 

PMC Solid Waste Management Department | पुणे महापालिकेने संकलित केल्या शेकडो गाद्या, उशा, चिंध्या | वस्तू संकलन महाअभियानाला उस्फुर्त प्रतिसाद

Categories
Uncategorized

PMC Solid Waste Management Department | पुणे महापालिकेने संकलित केल्या शेकडो गाद्या, उशा, चिंध्या | वस्तू संकलन महाअभियानाला उस्फुर्त प्रतिसाद

PMC Solid Waste Management Department | पुणेकरांना वस्तू संकलन महाअभियानात सहभागी होणेविषयी पुणे महानगरपालिकेमार्फत (Pune Municipal Corporation) आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला पुणेकरांनी उत्तम प्रतिसाद दिला. या मध्ये संपूर्ण १५ क्षेत्रीय कार्यालय (PMC 15 Ward Offices) मार्फत करण्यात आलेले गाद्या ची संख्या २६९ व अंदाजे वजन ४१६८ किलो, उश्या ची संख्या ३३७ व अंदाजे वजन ७०१ किलो, चिंध्यांचे वजन ५६३० किलो, फर्निचर ची संख्या ४९२ व अंदाजे वजन ९१८८ किलो आणि ई-कचरा एकूण २६० किलो गोळा करण्यात आला. अशी माहिती उपायुक्त संदीप कदम (Deputy Commissioner Sandeep Kadam) यांनी दिली. (PMC Pune)

दसरा दिवाळी व विविध सण समारंभाच्या पार्श्वभूमीवर घरातील जुन्या वस्तू, फर्निचर बदलले जातात. त्याचप्रमाणे गाद्या, उश्या यांचा कचरासुद्धा मोठ्या प्रमाणावर साठून राहतो. अश्या प्रकारची साहित्य सामुग्री इतःस्ततः पडू नये याकरिता या निरुपयोगी वस्तू गोळा करून पुणे महानगरपालिकेच्या (PMC Pune) सिस्टीममध्ये आणणे व त्यावर थ्री आर ( RRR Reduce, Reuse, and Recycle) संकल्पना राबविणे आवश्यक आहे. याकरिता पुणे महानगरपालिका व स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयाने विविध प्रकारच्या निरुपयोगी वस्तूंच्या संकलनाचे महाअभियान राबवीण्यात येत आहे. (PMC Pune News)

या अनुषंगाने  आज चिंध्या, उश्या, गाद्या व फर्निचर संकलन मोहीम आयोजित करण्यात आलेली होती. याकरिता प्रत्येक प्रभागनिहाय किमान ०२ आरोग्य कोठ्यांची जागा निश्चित करून एकूण ९१ ठिकाणी दि. १४/१०/२०२३ रोजी स.१०:०० ते दु ०४:०० या वेळेत सदर वस्तू गोळा करण्यात आल्या व तदनंतर निश्चित केलेल्या ठिकाणी या वस्तूंची वाहतूक करण्यात आली.
पंधरा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत एकूण ९१ संकलन केंद्र निश्चित करण्यात आलेली आहेत. या संकलनाच्या केंद्राबाबतची सविस्तर माहिती पुणे महानगरपालिकेच्या वेबसाईट व सोशल मिडीयावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. वरील सर्व मोहिमांना अनुकूल प्रतिसाद मिळणेकरिता, नागरिक, मोहल्ला कमिटी सदस्य, स्वयंसेवी संस्था यांचेमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली.
या ठिकाणांबाबत जास्तीत जास्त नागरिकांना अवगत करून या महाअभियानात सहभागी होणेविषयी पुणे महानगरपालिकेमार्फत आवाहन करण्यात आले. या आवाहनाला पुणेकरांनी उत्तम प्रतिसाद दिला. या मध्ये संपूर्ण १५ क्षेत्रीय कार्यालय मार्फत करण्यात आलेले गाद्या  ची संख्या २६९ व अंदाजे वजन ४१६८ किलो, उश्या ची संख्या ३३७ व अंदाजे वजन ७०१ किलो, चिंध्यांचे वजन ५६३० किलो, फर्निचर ची संख्या ४९२ व अंदाजे वजन ९१८८ किलो आणि ई-कचरा एकूण २६० किलो गोळा करण्यात आला. आयुक्त श्री. विक्रम कुमार, मा अतिरिक्त आयुक्त (इ) डॉ कुणाल खेमनार आणि उप आयुक्त संदीप कदम घनकचरा व्यवस्थापन
कार्यालय यांच्या मार्गदर्शना खाली ही महाअभियान राबविण्यात आले. सदर महाअभियाना मध्ये सर्व महापालिका सहाय्यक आयुक्त, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, सफाई कर्मचारी, मोहल्ला कमिटी सदस्य, नागरिक व इतर संस्थानी सहभाग नोंदविला.