Misbehavior in the subway | भुयारी मार्गामध्ये होणाऱ्या गैरप्रकारा विरोधात युवक राष्ट्रवादी चे कोथरूड पोलिस व महापालिकेस निवेदन

Categories
Breaking News PMC Political पुणे

भुयारी मार्गामध्ये होणाऱ्या गैरप्रकारा विरोधात युवक राष्ट्रवादी चे कोथरूड पोलिस व महापालिकेस निवेदन

भुयारी मार्गात चालू असलेली गुन्हेगारी रोखून, साफ सफाई करून ते मार्ग सर्वसामान्य जनतेसाठी लौकरात लौकर चालू करावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक कोथरूड चे अध्यक्ष गिरीश गुरूनानी यांनी केली.  वेळेतच उपायोजना न केल्यास आंदोलनाचा इशारा देखील गिरीश गुरनानी यांनी प्रशासनाला दिला

पुण्यात बऱ्याच ठिकाणी महानगरपालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी रस्ता ओलाडण्याकरिता लाखो रुपये खर्चून भुयारी मार्ग बनवले आहेत. पण ज्या कारणासाठी हे मार्ग बनवले आहेत त्या व्यतिरिक्त इतरच गोष्टींसाठी ते वापरले जात आहेत समाज कंटक अश्या भुयारी मार्गांचा वापर स्वतःचे “अड्डे” म्हणून करत आहेत असेच चित्र अनेक ठिकाणी दिसते. काही भुयारी मार्गांना सार्वजनिक मुतारी चे स्वरूप आलेले आहे तर काही ठिकाणी पत्त्यांचे डाव रचले जातात तर काही ठिकाणी काही लोक खुशाल दारू पीत बसतात.महापालिकेने नेमलेले सुरक्षा रक्षक कधीच भुयारी मार्गाच्या प्रवेशाला उपस्थित नसतात.
अश्या मार्गांचा वापर वास्तविक स्त्रिया, गरोधर महिला व अबालवृद्ध नागरिक सुरक्षित रित्या रस्ता ओलांडण्यासाठी करू शकतात. पण तिथे चालत असलेल्या गचाळ कारभारामुळे नागरिक जाण्याचे टाळतात.

या सर्व प्रकारा विरुद्ध राष्ट्रवादी युवक कोथरूड चे अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी कोथरूड पोलिस ठाणे येथे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब बडे यांना व पुणे महानगरपालिकेत मुख्य अभियंता श्रीनिवास बोलाना यांना निवेदन देऊन या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे. भुयारी मार्गात चालू असलेली गुन्हेगारी रोखून, साफ सफाई करून ते मार्ग सर्वसामान्य जनतेसाठी लौकरात लौकर चालू करावे अशी विनंती गिरीश गुरूनानी यांनी केली. या वेळी वेळेतच उपायोजना न केल्यास आंदोलनाचा इशारा देखील गिरीश गुरनानी यांनी प्रशासनाला दिला .या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे संकेत शिंदे ,ऋषिंकेश शिंदे आदि पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

sound limit | Ganeshotsav | गणेशोत्सवात रात्री १० पर्यंतच्या ध्वनीमर्यादेला आता पाच दिवसांची सवलत गणेशोत्सव मंडळांना सर्व परवानग्या एक खिडकीद्वारे

Categories
Breaking News cultural PMC Political social पुणे

गणेशोत्सवात रात्री १० पर्यंतच्या ध्वनीमर्यादेला आता पाच दिवसांची सवलत

गणेशोत्सव मंडळांना सर्व परवानग्या एक खिडकीद्वारे

ध्वनीमर्यादेत अतिरिक्त एक दिवस शिथिलता

गणेशोत्सव कालावधीदरम्यान जिल्हाधिकारी यांनी ध्वनीमर्यादेला ४ दिवसांची सवलत दिली होती. गणेश मंडळांच्या मागणीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यामध्ये एक दिवसाची वाढ करण्याचे आदेश दिले.

गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दहीहंडी आदी आगामी सण, उत्सव शांततेत, उत्साहात, धुमधडाक्यात साजरा करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेश मंडळांना केले. उत्सवात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दहीहंडी, मोहरम तसेच आगामी सण व उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्तालयात कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात आढावा बैठक मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, पुणे शहरात सार्वजनिक गणेशोत्सवाला १२५ हून अधिक वर्षांची परंपरा आहे. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती हे उत्सव समाजजागृतीच्या उद्देशाने सुरू केले. ही परंपरा मंडळांनी सुरू ठेवावी. गेली दोन वर्षे आपण कोरोनाच्या सावटाखाली होतो, त्यामुळे आपले सण उत्साहाने साजरे करता आलेले नाहीत. त्यामुळे यंदा गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दही हंडी आदी सण उत्साहाने, धुमधडाक्यात साजरे व्हावेत यासाठी राज्य शासनामार्फत गणेशोत्सव मंडळांना सहकार्य करण्यात येईल.

कोविडमध्ये गणेश मंडळांनी सामाजिक जबाबदारीने चांगले काम केले आहे. आगामी गणेशोत्सवातही उत्कृष्ट काम करावे, कोरोनाबाबत चांगली जनजागृती करावी. गोविंदा उत्सवही चांगल्याप्रकारे साजरा करावा, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

राज्य शासनाने गणेश मूर्तींबाबतचे निर्बंध काढून टाकल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. विविध परवानग्याही एक‍ खिडकी पद्धतीने देण्यात याव्यात. मनपाने मंडप टाकण्यासाठीचे शुल्क मंडळांकडून घेऊ नये. वीज मंडळांना तात्पुरते वीजजोड देण्याबाबत प्रशासनाने कार्यवाही करावी असे सांगून परवानग्यांसाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांना चकरा माराव्या लागू नये याची काळजी घ्यावी असेही निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

गणेशोत्सव तसेच अन्य सण-उत्सव साजरे करताना सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयांच्या आदेशांचे पालन होईल याकडे विशेष लक्ष देऊन उत्सवाला कोणतेही गालबोट लागणार नाही याची काळजी घ्यावी, असेही श्री. शिंदे म्हणाले. छोट्या फेरीवाल्यांच्या व्यवसायाबद्दलही प्रशासनाने सकारात्मक रहावे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

यावेळी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आगामी सण उत्सवांच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी केलेल्या तयारीचे सादरीकरण केले.

या बैठकीला माजी मंत्री तानाजी सावंत, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, माजी आमदार विलास लांडे, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर, रामनाथ पोकळे, नामदेव चव्हाण, राजेंद्र डहाळे, विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

Ganesh festival | गणेश मंडळासोबत महापालिका व पोलिसांची बैठक होणार या दिवशी  | गणेशत्सवाचे होणार नियोजन

Categories
Breaking News cultural PMC पुणे

गणेश मंडळासोबत महापालिका व पोलिसांची बैठक होणार या दिवशी

| गणेशत्सवाचे होणार नियोजन

पुणे | पुण्यात गणेशोत्सव मोठा थाटामाटात साजरा केला जातो. याबाबत नियोजन करण्यासाठी दरवर्षी गणेश मंडळे आणि पोलीस सोबत महापालिका बैठक घेते. त्यानुसार 8 ऑगस्ट ला ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

पुणे शहरात दि. ३१/०८/२०२२ ते दि.०९/०९/२०२२ चे कालावधीत सालाबादप्रमाणे या वर्षीचा गणेशोत्सव साजरा होत असून त्या अनुषंगाने करावयाच्या नियोजनाबाबत महापालिका आयुक्त यांचे अध्यक्षते खाली दि. १२/०७/२०२२ रोजी प्राथमिक बैठक घेण्यात आली होती. त्यामधील झालेल्या चर्चेमध्ये विषयांकित प्रकरणी पुन्हा बैठक घेणेकरिता पुणे शहरातील गणेश मंडळांचे पदाधिकारीसह मनपा व पोलीस प्रशासन यांची सयुंक्त एकत्रित बैठक घेणेबाबत निश्चित करण्यात आले होते. त्या अनुषंगाने महापालिका आयुक्त यांनी पुणे महानगरपालिकेच्या जुन्या छत्रपती शिवाजी
महाराज या सभागृहामध्ये सर्व संबंधित अधिकारी व शहरातील गणेश मंडळांचे पदाधिकारी यांची सयुंक्त बैठक 8 ऑगस्ट ला
आयोजित केली आहे. यासाठी गणेश मंडळांनी उपस्थित राहण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

Shivjayanti : Mayor : PMC : शिवजयंती मिरवणुकीला परवानगी द्यावी : महापौरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Categories
Breaking News cultural PMC पुणे महाराष्ट्र

शिवजयंती मिरवणुकीला परवानगी द्यावी : महापौरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

:  शिवजयंती उत्सव समिती, पोलीस अधिकारी, महापालिका अधिकाऱ्यांची बैठक

पुणे : कोरोना संकटामुळे गेली दोन वर्षे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यास सलग दोन वर्षे बंधने आल्याने यंदाचा शिवजयंती उत्सव(Shivjayanti) जल्लोषात साजरा व्हावा, असा सूर शिवप्रेमींकडून उमटला असून या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शिवजयंती उत्सवाच्या मिरवणुकीला परवानगी द्यावी, अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ(Mayor Murlidhar Mohol) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackrey) यांच्याकडे केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर महापौर मोहोळ यांनी शिवजयंती साजरी करण्याच्या नियोजनाची बैठक घेतली. या बैठकीस पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, विरोधीपक्ष नेत्या दीपाली धुमाळ यांच्यासह शिवजयंती उत्सव समितीचे, प्रतिनिधी, महापालिका अधिकारी यांची उपस्थिती होती.

याबाबत माहिती देताना महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कशा पद्धतीने साजरी केली जावी? यावर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. कोरोना महामारीच्या दोन वर्षाच्या काळातील निर्बंधांमुळे शिवजयंतीचा उत्सव साजरा करताना मर्यादा आल्या, अशा भावना शिवप्रेमींनी व्यक्त केल्या होत्या. शिवजयंती उत्सवासाठी आवश्यक अटी आणि शर्थी घालून देऊन राज्य सरकारने मिरवणुकीला परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. राज्यशासनाच्या नियमावलीत मिरवणुकीच्या परवानगीचाही समावेश असावा, अशी भूमिका आहे’

शिवजयंती साजरी करण्यासंदर्भात विविध मुद्द्यांवर चर्चा !

◆ मिरवणुकीच्या स्वागतासाठी महापालिकेचा स्वागत कक्ष असणार

◆ पुणे शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्व पुतळ्यांना विद्युत रोषणाई करण्यात यावी.

◆ मिरवणुकीचे परवाने हे ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार

◆ पुणे शहरातील सर्व शाळांमध्ये चित्रकला स्पर्धा, वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात याव्यात.

◆ शिवजंयती महोत्सवासाठी रथयात्रा आणि मिरवणूक यासाठी स्थानिक पोलीस विभागाने लवकरात लवकर बैठका घेऊन आवश्यक त्या परवानग्या द्याव्यात.

◆ शिवजयंतीबाबत काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीकरिता राज्य शासनाकडून नियमावली लवकरात लवकर जाहीर करावी.

◆ पुणे शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मानवंदना देण्यासाठी येणार्याा नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच फिरत्या शौचालयाची व्यवस्था करणे.

◆ मिरवणुका निघणाऱ्या मार्गांवरील खड्डे बुजविण्यात यावे, रस्त्यावरील राडारोडा उचलण्यात यावा, अडथळा निर्माण करणाऱ्या झाडांच्या फांद्या कापण्यात याव्यात.

Navale Bridge : NHAI : police : PMC : नवले पूल भागात उपाययोजनांना सुरुवात : NHAI, पोलीस, महापालिका अधिकारी यांची महापौरांनी घेतली बैठक

Categories
Breaking News PMC Political पुणे

नवले पूल भागात उपाययोजनांना सुरुवात : महापौर मोहोळ

– NHAI, पोलीस, महापालिका अधिकारी यांची महापौरांनी घेतली बैठक

पुणे : वारंवार अपघात होणाऱ्या नवले पूल आणि परिसरात उपाययोजनांना सुरुवात झाली असून या कामात तातडीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना आणि दीर्घकालीन उपाययोजना अशा दोन्ही टप्प्यांवर काम सुरु झाले आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. दिशादर्शक फरक वाढवण्यापासून तर सर्व्हिस रोड बांधेपर्यंतची कामे या उपाययोजनांमध्ये करण्यात येणार असून कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी महापौर मोहोळ लवकरच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार आहेत.

नवले पूल आणि एकूणच शहरतून मुंबई-बंगलोर महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात महापौर मोहोळ यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी, वाहतूक पोलीस अधिकारी, महापालिका अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजक केले होते. बैठकीला महामार्ग प्राधिकरणचे मुख्य प्रकल्प अधिकारी रामचंद्र राव, प्रकल्प अधिकारी एस.एस कदम, सल्लागार भारत तोडकरी, राकेश कोरी, आयुक्त विक्रम कुमार, महामार्ग प्राधिकरणचे उपव्यवस्थापक अंकित यादव, स्थायीचे अध्यक्ष हेमंत रासने, मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला, पथ अभियंता व्ही.जी. कुलकर्णी, वाहतूक व्यवस्थापक निखिल मिजार आदी उपस्थित होते.

बैठकीबाबत माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, ‘महामार्ग प्राधिकरणच्या वतीने दिशादर्शक आणि माहितीफलक लावण्यास सुरुवात झाली असून यात ताशी ६० किमी, तीव्र उतार, हळू जा, अशा फलकांचा समावेश आहे. तुटलेल्या क्रॅश बॅरिअर्सची कामेही हाती घेण्यात आली आहेत. धोकादायक ठिकाणे निश्चित करुन त्या भागात रंबल स्ट्रीप पट्टेही बसविले जात आहेत. त्या सोबतच कॅट आय, रिफ्लेकटिंग बोर्ड आणि सोलर ब्लिनकिंग बसविण्यात आले असून पथदिवेही बसविण्यात येत आहेत’

संपूर्ण महामार्गालगत सर्व्हिस रोड तयार करण्यासाठी महिमार्ग प्राधिकरण आणि महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने सुरुवात करण्यात आली आहे. शिवाय नवले पुलाखाली असलेली अतिक्रमणे काढून त्यानंतर महामार्ग प्राधिकरण सर्व्हिस रोड दुरुस्ती करणार आहे. नव्या कात्रज बोगद्यानंतर आणि दरीपुलाजवळ गॅन्ट्री तयार करुन कायमस्वरूपी स्पीडगन आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची कार्यवाही पोलीस आणि महापालिकेमार्फत करण्यात येणार आहे. नर्हे स्मशानभूमीसंदर्भात स्थानिक नागरिकांशी चर्चा करुन निर्णय होणार आहे. शिवाय सर्व्हिस रोड आणि महामार्गावर कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा निर्णयही घेतलाअसल्याचे महापौर मोहोळ यांनी सांगितले.

महापौर मोहोळ पुढे म्हणाले, ‘अपघात रोखण्यासाठी आम्ही सर्वतोपरी उपाययोजना करत असून सदरील उपाययोजना वेगाने आणि दर्जेदार करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी महापालिकेच्या बाजूने पूर्ण क्षमतेने काम करत आहोत. सर्व उपाययोजना संयुक्तिकरित्या होत असल्याने त्या नक्कीच प्रभावी आणि परिणामकारक असतील, यात शंका नाही’.

◆कायमस्वरूपी उपाययोजना…

– भूमकर चौक ते नवले पूल आणि विश्वास हॉटेल चौक या दोन ठिकाणी अंडरपास करण्यात येणार
– विश्वास हॉटेल चौक ते पासलकर चौक आणि नवलेपुलाच्या वडगाव बाजूचा सर्व्हिस रस्ता रुंदीकरण करणे
– सिंहगड रस्ता ते मुंबई बायपासला जाण्यासाठी आणि महामार्गावरुन सिंहगड रस्त्याला जाण्यासाठी क्लोव्हर लिफ जंक्शनचे विकसन करण्यासाठी डीपीआर तयार करण्यात येणार

Prithviraj Sutar : पोलीस कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट :  शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार यांचा १५ वर्षा पासूनचा उपक्रम 

Categories
cultural पुणे

पोलीस कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट

शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार यांचा १५ वर्षा पासूनचा उपक्रम

पुणे : रात्रं-दिवस काम करून जे समाजाला सुरक्षित ठेवतात,कोव्हिड-१९ च्या आपत्कालीन संकटामध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता सर्व स्तरातील नागरिकांना आधार देण्याचे काम सर्व पोलीस कर्मचारी बंधु-भनिनींनी केले. या कोव्हिड योद्धांच्या प्रति ऋण व्यक्त करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे दीपावलीच्या निमित्ताने ड्रायफ्रूट बॉक्स चे वाटप पोलीस कर्मचारी बंधु-भनिनींना करण्यात आले. गेल्या पंधरा वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. शिवसेना गटनेते व स्थानिक नगरसेवक पृथ्वीराज शशिकांत सुतार यांच्या वतीने हा उपक्रम सुरु आहे.

: पोलीस कर्मचाऱ्या मध्ये आनंदाचे वातावरण

शिवसेना गटनेते व स्थानिक नगरसेवक पृथ्वीराज शशिकांत सुतार यांच्या वतीने हे वाटप करण्यात आले. हे वाटप कोथरूड पोलीस स्टेशन,अलंकार पोलीस स्टेशन,विशेष शाखा परिमंडळ क्र.(३) पुणे शहर कार्यालय व कोथरूड वाहतुक विभाग पुणे शहर चे पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांना करण्यात आले. या प्रसंगी कोथरूड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप,कोथरूड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक(गुन्हे) बाळासाहेब बडे,अलंकार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रतिभाताई जोशी,कोथरूड वाहतुक वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, विशेष शाखा परिमंडळ क्र.(३) पुणे शहर कार्यालय वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीवन जगदाळे विशेष शाखा परिमंडळ क्र.(३) पुणे शहर कार्यालय पोलीस उपनिरीक्षक आर.एस.किरवे हे उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिवराज सुतार,धर्मराज सुतार,सुधीर वरघडे,हेमंत मोहोळ,सुमित माथवड,संजय डाळिंबकर,शशी नाकते,शरद डहाळे,नचिकेत घुमटकर,सुरज अवधूत,सुंदर खुडे यांनी सहकार्य केले.