Gratuity Eligibility | नोकरी पाच वर्षांपेक्षा कमी असली तरीही तुम्ही ग्रॅच्युइटीचे पात्र बनता, कसे जाणून घ्या?

Categories
Breaking News Commerce social लाइफस्टाइल

Gratuity Eligibility | नोकरी पाच वर्षांपेक्षा कमी असली तरीही तुम्ही ग्रॅच्युइटीचे पात्र बनता, कसे जाणून घ्या?

 जर कर्मचार्‍याची नोकरी पाच वर्षांपेक्षा कमी परंतु काही महिन्यांची असेल, तरीही तो ग्रॅच्युइटीचा हक्कदार आहे.  ग्रॅच्युइटी कायद्याचे कलम 2A काय म्हणते ते जाणून घ्या.
 ग्रॅच्युइटी हे कंपनीने कर्मचाऱ्याला दिलेले बक्षीस आहे, जे त्याला कंपनीत सतत सेवेच्या बदल्यात दिले जाते.  साधारणपणे असे मानले जाते की पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतरच तुम्ही ग्रॅच्युइटीचे पात्र बनता.  ग्रॅच्युइटीची किमान रक्कम ठरवण्यासाठी एक सूत्र आहे.  परंतु कंपनीची इच्छा असेल तर ती आपल्या कर्मचार्‍यांना विहित सूत्रापेक्षा जास्त रक्कम देऊ शकते.  मात्र, सरकारी नियमांनुसार कर्मचाऱ्याला 20 लाखांपेक्षा जास्त ग्रॅच्युइटी देता येत नाही.  पण अशा परिस्थितीत अनेकांना प्रश्न पडतो की, जर त्यांची नोकरी पूर्ण पाच वर्षांसाठी नसेल, त्यापेक्षा कमी असेल, तर त्यांना ग्रॅच्युइटी मिळण्याचा अधिकार आहे का?  याविषयी आम्ही तुम्हाला सांगतो.

 ग्रॅच्युइटी कायदा काय म्हणतो

 ग्रॅच्युइटी कायद्याच्या कलम 2A नुसार, तुम्ही 5 वर्षे सेवा पूर्ण केली नसली तरीही, तुम्ही ग्रॅच्युइटीचे हक्कदार होऊ शकता.  ग्रॅच्युइटी कायद्याच्या कलम 2A मध्ये असे म्हटले आहे की भूमिगत खाणींमध्ये काम करणारे कर्मचारी जे सलग 4 वर्षे आणि 190 दिवस कंपनीत काम करतात, त्यानंतर त्यांना ग्रॅच्युइटी मिळण्यास पात्र मानले जाते.  दुसरीकडे, इतर संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी 4 वर्षे 240 दिवस म्हणजेच 4 वर्षे 8 महिने सेवा पूर्ण केल्यास ते ग्रॅच्युइटी मिळण्यास पात्र असतील.

 सूचना कालावधी देखील मोजला जाईल

 या कालावधीत तुमचा नोटिस कालावधी देखील मोजला जातो हे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे.  म्हणजेच, जर एखादा कर्मचारी नोटीस कालावधीसह 4 वर्षे आणि 240 दिवस सेवा पूर्ण करत असेल, तर त्याला ग्रॅच्युइटी मिळण्याचा अधिकार कायम आहे.  नोटीस कालावधी देखील सतत सेवेमध्ये मोजला जातो.

 ग्रॅच्युइटी या सूत्राने मोजली जाते

 ग्रॅच्युइटीची गणना करण्यासाठी एक सूत्र आहे – (शेवटचा पगार) x (कंपनीमध्ये काम केलेल्या वर्षांची संख्या) x (15/26).  शेवटचा पगार म्हणजे तुमच्या शेवटच्या 10 महिन्यांच्या पगाराची सरासरी.  या पगारात मूळ वेतन, महागाई भत्ता आणि कमिशन समाविष्ट आहे.  महिन्यातील रविवारचे 4 दिवस आठवड्याची सुट्टी असल्याने, 26 दिवस मोजले जातात आणि 15 दिवसांच्या आधारे ग्रॅच्युइटी मोजली जाते.
  अशा स्थितीत हा कालावधी पूर्ण ५ वर्षे मानला जातो.

Seva fortnight | राज्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर कालावधीत ‘सेवा पंधरवडा’ | नागरिकांचे प्रलंबित अर्ज निकाली काढावेत; मुख्यमंत्र्यांचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

Categories
Breaking News Political social महाराष्ट्र

राज्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर कालावधीत ‘सेवा पंधरवडा’

| नागरिकांचे प्रलंबित अर्ज निकाली काढावेत; मुख्यमंत्र्यांचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

सामान्य नागरिकांच्या तक्रारी, अर्जांवर कालमर्यादेत निपटारा व्हावा यासाठी राज्यात दि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी दूरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधत या पंधरवड्यामध्ये नागरिकांचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. या पंधरवड्याच्या अंमलबजावणीचा मंत्रिमंडळ बैठकीत आढावा घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

ग्रामीण भागातील जनतेला त्यांच्या कामांसाठी मंत्रालयापर्यंत येण्याची आवश्यकता पडू नये यासाठी स्थानिक पातळीवर समस्यांचा निपटारा व्हावा. नागरिकांना प्रशासनाकडून सुशासनाचा अनुभव यावा त्यांची कामे गतीने आणि पारदर्शकपणे व्हावीत यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी नुकतीच सुशासन नियमावली समितीची बैठकही घेतली होती. त्याचबरोबर विभागीय स्तरावरील मुख्यमंत्री सचिवालयाचे काम अधिक गतिमान करण्याचे निर्देशही त्यांनी दिले होते.

१० सप्टेंबर पर्यंतच्या तक्रारींचा होणार निपटारा

आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात चर्चा होऊन सामान्य नागरिकांचे प्रलंबित अर्ज, तक्रारी यांचा निपटारा व्हावा यासाठी हा ‘सेवा पंधरवडा’ राबविण्याचा निर्णय झाला. या सेवा पंधरवड्यात आपले सरकार, महावितरण, डी.बी.टी., नागरी सेवा केंद्र, विभागांचे स्वत:चे पोर्टल अशा वेबपोर्टलवर दि. १० सप्टेंबर २०२२ पर्यंत प्राप्त झालेल्या तक्रारींचा निपटारा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मदत आणि पुनर्वसन, कृषी, महसूल, अन्न व नागरी पुरवठा, ग्राम विकास, नगर विकास, आरोग्य, पाणी पुरवठा, महावितरण, आदिवासी विकास, सामाजिक न्याय या विभागातील सेवांचाही त्यात समावेश करण्यात आला आहे.

विविध विभागांच्या १४ सेवांचा समावेश

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नवीन शासन निर्णयानुसार मदत निधीचे वितरण करणे, तांत्रिक अडचणींमुळे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या प्रलंबित असलेल्या पात्र लाभार्थ्यांना लाभ देणे, फेरफार नोंदीचा निपटारा करणे, शिधापत्रिकांचे वितरण,विवाह नोंदणी प्रमाणपत्र, मालमत्ता हस्तांतरण नोंद घेणे, नव्याने नळ जोडणी, मालमत्ता कराची आकारणी करणे व मागणी पत्र देणे, प्रलंबित घरगुती विद्युत जोडणीस मंजुरी देणे, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजने अतंर्गत सिंचन विहिरी करिता अनूसुचित जमातीच्या लाभार्थ्योची ऑनलाईन नोंदणी करणे, अनूसुचित जमातीच्या लाभार्थ्यांना प्रलंबित वन हक्क पट्टे मजूर करणे (अपिल वगळून),दिव्यांग प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र देणे अशा सेवांचा समावेश करण्यात आला आहे.

निपटारा झालेल्या प्रकरणांचे प्रमाणपत्र घेणार

प्रलंबित प्रकरणांपैकी कितीचा निपटारा झाला आणि निपटारा न झालेल्या प्रकरणांविषयी सेवा पंधरवडा समाप्तीनंतर दि. ५ ऑक्टोबर रोजी सक्षम प्राधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्र घेण्यात येणार आहे. सेवा पंधरवडयातील कामकाजाचा प्रगती अहवाल प्रमाणपत्रासह १० ऑक्टोबर पर्यंत शासनास सादर करण्याच्या सूचना देखील प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
००००

Water supply shut off | शहरात बुधवारी आणि गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार | शुक्रवारी कमी दाबाने पाणी 

Categories
Breaking News PMC social पुणे

शहरात बुधवारी आणि गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार | शुक्रवारी कमी दाबाने पाणी

गुरुवार दिनांक १५/०९/२०२२ रोजी लष्कर जलकेंद्राचे अखत्यारीतील वानवडी ESR व हायसर्व्हिस टाकी तसेच पर्वती जलकेंद्राचे अखत्यारीतील पर्वती HLR येथे व SNDT HLR येथे फ्लो मीटर बसविण्याचे  नियोजन आहे.  त्यामुळे शहरातील पुढीलप्रमाणे परिसर बुधवार दि. १४/९/२०२२ रोजी रात्री १० ते गुरुवार दि. १५/०९/२०२२ रोजी रात्री १० पर्यंत पाणीपुरवठा बंद व शुक्रवार दि. १६/०९/२०२२ रोजी सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे ही विनंती. असे आवाहन महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

पाणी पुरवठा बंद असणारा भाग :-

१) वानवडी इ एस आर व हाय सर्विस टाक्याखालील भाग:- 
वानवडी गाव, फातिमानगर, पुणे कॅन्टोनमेंट बोर्डाचा संपूर्ण भाग, संपूर्ण डिफेन्स एरिया विभागाचा भाग, सोलापूर रोडच्या दोन्ही बाजू रामटेकडी चौकापर्यंत, सोपान बाग, उदय बाग, डोबरवाडी कवडे मळा संपूर्ण परिसर, बी.टी. कवडे रोड व संपूर्ण परिसर, प्रभाग क्र. २५ संपूर्ण परिसर.
२) पर्वती HLR :-
पर्वती HLR, पर्वती गाव, सहकारनगर संपूर्ण, तावरे कॉलनी, आदर्श नगर, पर्वती इंडस्ट्रियल इस्टेट, वाळवेकर नगर, संतनगर, नव महाराज सोसायटी, सारंग सोसायटी, मित्रमंडळ कॉलनी, पर्वती दर्शन, शिवदर्शन, SBI कॉलनी, अरण्येश्वर, कोंढवा, बिबवेवाडी, अप्पर बिबवेवाडी, मार्केट यार्ड, बिबवेवाडी ओटा, महेश सोसायटी, कात्रज कोंढवा, गंगाधाम परिसर, डायस प्लॉट, महर्षीनगर, सॅलिसबरी पार्क, संदेशनगर, मीरा सोसायटी, ST कॉलनी, स्वारगेट, संभाजीनगर धनकवडी (चव्हाणनगर)
३) सेमिनरी GSR :-
अप्पर, इंदिरानगर, कोंढवा खुर्द, शिवनेरी नगर, कोंढवा गावठाण, स.नं. ३५४, मोरे चाळ, गव्हाणे चाळ, भाग्योदयनगर, मिठानगर, कुमार पृथ्वी, साईबाबानगर, स.नं. ४२,४३, युनिटी पार्क, ज्ञानेश्वर नगर, सवेरा पार्क परिसर.
४) SNDT (HLR):-
शिवाजीनगर परिसर, भांडारकर रोड,बी.एम.सी.सी. रोड, रेव्हेन्यू कॉलनी,
गोखलेनगर, मॉर्डन कॉलनी, वैदुवाडी, पत्रकारनगर, पांडवनगर, भोसलेनगर, खैरेवाडी, जनवाडी, सेनापतीबापट रोड, कोथरूड (डहाणूकर कॉलनी, तेजसनगर, कोथरूड गावठाण, जोग शाळेजवळील भाग, भेलकेनगर, गुजरात कॉलनी, सुतार दवाखान्या मागील परिसर, गाडवे कॉलनी, परमहंस नगर, सुतारदरा, रामबाग, आनंदनगर, आयडीयल कॉलनी, गुरुराज सोसायटी, इन्कमटॅक्स कॉलनी, वनाज परिसर, रामबाग कॉलनी, केळेवाडी, जय भवानी नगर, किस्किंदा नगर, एम.आय.टी. कॉलेज परिसर, प्रभाग ३१ चा वडार वस्ती, स्टेट बँक नगर, हैप्पी कॉलनी, पृथ्वी हॉटेल परिसर, मेघदूत सोसायटी).

Pune Municipal Corporation | वकीलपत्रावर सही शिक्का मारण्याबाबत खातेप्रमुख उदासीन  | प्रशासनाला द्यावे लागले आदेश 

Categories
Breaking News PMC पुणे

वकीलपत्रावर सही शिक्का मारण्याबाबत खातेप्रमुख उदासीन

| प्रशासनाला द्यावे लागले आदेश

विधी विभागाकडून  सर्वोच्च न्यायालय / उच्च न्यायालय/ राष्ट्रीय हरित लवाद न्यायालय येथे महानगरपालिके तर्फे विरुद्ध केसेस दाखल होतात, त्याअनुषंगाने पुणे महानगरपालिके तर्फे विधी विभागाकडून संबंधित केसेस मध्ये वकिलांची नियुक्ती करून सदर केसबाबत खात्याचे वकीलपत्र तयार करून दिले जाते.
सदर वकीलपत्रावर संबंधित खातेप्रमुख यांची स्वाक्षरी होऊन त्या खाली त्यांचे नावाचा शिक्का मारणे आवश्यक आहे. याबाबत वारंवार सूचना करूनही खबरदारी घेतली जात नाही, तरी सदर  परिपत्रकाची नोंद घेऊन संबंधित सर्व खातेप्रमुखांनी पुढील उचित कार्यवाही करावी. असे आदेश विधी विभागाकडून सर्व खाते प्रमुखांना देण्यात आले आहेत.