The Karbhari 2nd Anniversary | The karbhari च्या वाचकांना दुसऱ्या वर्धापनदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

Categories
cultural social पुणे संपादकीय

The Karbhari 2nd Anniversary | The karbhari च्या वाचकांना दुसऱ्या वर्धापनदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

आपली The Karbhari वृत्तसंस्था आज दोन वर्षाची झाली. आपण आता तिसऱ्या वर्षात पदार्पण करत आहोत. वाचकांच्या म्हणजे तुमच्या प्रेमाशिवाय ही वाटचाल अशक्य आहे. तुम्ही दाखवलेला विश्वास हाच The karbhari चा आत्मा आहे. आपल्यासाठी ना कुठला सत्ताधारी, ना प्रशासन , ना कुणी उद्योजक, ना राजकारणी, आपला कारभारी. लोक हेच आपले कारभारी. कुठलेही कारभारीपण न मिरवता, आपण सरकारच्या, प्रशासनाच्या कारभारावर लक्ष ठेवतो आहोत. हे केवळ आणि केवळ वाचकांच्या भरवश्यामुळे शक्य झाले आहे.
        शक्य तेवढ्या संतुलित आणि समतोल बातम्या देण्याचा, सकारात्मक बातम्या देण्याचा आपला पहिल्यापासूनच प्रयत्न राहिला आहे. हाच अजेंडा आपण आगामी काळात देखील अबाधित ठेवणार आहोत. वाचकांचे प्रेम आणि त्यांनी दाखवलेला विश्वास हीच The Karbhari ची खरी ताकद आहे. आपण नेहमी सामान्य लोकांच्या बाजूने उभे राहण्याचा प्रयत्न केला. हे करताना आपण कधीही प्रशासन किंवा सत्ताधाऱ्यांवर चुकीच्या पद्धतीने आसूड ओढले नाहीत. आपण नेहमी समतोल (Balance) साधला. याच आपल्या कौशल्यामुळे कितीतरी नवीन लोक आपल्याशी जुडले गेले. आगामी काळात अजून जुडतील.
     प्रत्येक वर्धापनदिन हा त्या संस्थेला काहीतरी शिकवत असतो. नवीन काहीतरी शिकवू पाहत असतो. आपणही प्रामाणिकपणे ते शिकण्याचा प्रयत्न करतो आहोत. गेल्या दोन वर्षात आपण दिलेल्या बातम्यांमुळे आपण थोड्या तरी लोकांना न्याय देऊ शकलो याचा आनंद आहे. आपल्या बातम्यांना लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. एवढेच नाही तर आपल्या प्रेमापोटी आपले चोखंदळ वाचक शुद्धलेखनातील चुका देखील सांगत असतात. त्यांचे मनापासून आभार. कारण अशा गोष्टीतून शिकतच आपली संस्था बळकट होणार आहे. आता तिसऱ्या वर्षात पदार्पण करताना आपली जबाबदारी अजून वाढली आहे. आपल्या अधिकाराचा वापर करत असताना आपल्याला आपली कर्तव्ये देखील लक्षात ठेऊन काम करायचे आहे. त्यासाठी तुमची साथ महत्वाची आहे. तुमचा विश्वास सार्थ ठरवण्याचा, तुमच्या भरवशाच्या कसोटीवर उतरण्याचा  आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील.
पुनःश्च तुम्हां सर्वांना शुभेच्छा!
——-
संपादक 
The Karbhari 

Hadapsar | Animal Hospital | हडपसर मधील नियोजित प्राणी हॉस्पिटलच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन | हॉस्पिटल हलवण्याची मागणी

Categories
Breaking News PMC Political पुणे

हडपसर मधील नियोजित प्राणी हॉस्पिटलच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

| हॉस्पिटल हलवण्याची मागणी

हडपसर मतदारसंघातील रामटेकडी येथे कचरा डेपो शेजारीच पुणे महानगरपालिका मोकाट कुत्र्यांच्या उपचारासाठी हॉस्पिटल बांधत आहे. अगदी कचरा डेपो शेजारी होत असलेल्या या हॉस्पिटलमुळे प्राणीमित्रांच्या आरोग्याचा प्रश्न सुटण्याऐवजी वाढणार आहे. या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात आले. तसेच सदर हॉस्पिटल योग्य ठिकाणी हलविण्याची मागणी करण्यात आली.

याबाबत शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले कि, पुणे शहरात पाळीव प्राण्यांची संख्या मोठी आहे. त्यात प्रामुख्याने कुत्र्यांची संख्या सर्वाधिक आहे. या कुत्र्यांची गणना व्हावी. त्यांना आरोग्य व व्हॅक्सिनेशनच्या सर्व सुविधा मिळाव्यात, अशी मागणी या आंदोलनादरम्यान करण्यात आली. हडपसर रामटेकडी येथे होणारे हॉस्पिटल कचरा डेपो शेजारीच असल्याने येथे उपचारासाठी येणाऱ्या प्राण्यांना विविध प्रकारच्या विषाणूंची लागण होण्याची शक्यता आहे. ही शक्यता पाहता सदर जागेत प्राण्यांचे हॉस्पिटल होणे हे अतिशय धोकादायक ठरू शकते. हडपसर परिसरात सातत्याने अश्या प्रकारचे प्रकल्प येत असल्याने पुढील काळात हडपसर परिसरातील नागरिकांना त्यांच्या विकास कामांसाठी जागाच शिल्लक राहणार नसल्याचा धोका आहे.

शहरातील इतर भागात स्वच्छ ठिकाणी सदर हॉस्पिटल हलवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रयत्नशील आहे. तश्या आशयाचे निवेदन आयुक्तना देण्यात आले असून याबाबत तातडीने पुनर्विचार करणार असल्याचे आयुक्तांनी यावेळी सांगितले.

या आंदोलनासाठी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आमदार श्री.चेतन तुपे ,माजी महापौर वैशालीताई बनकर , माजी नगरसेवक योगेश ससाणे,अशोक कांबळे,गफुर पठाण,प्रदीप देशमुख,मृणालिनी वाणी,रुपाली पाटील,डॉ. शंतनु जगदाळे,दिपक कामठे, आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

7th Pay Commission | सातवा वेतन आयोग फरक रक्कम | सेवानिवृत्त सेवकांची बिले तात्काळ तपासून घ्या  | अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश | आगामी 4 दिवसात मिळणार फरकाची रक्कम 

Categories
Breaking News PMC पुणे

सातवा वेतन आयोग फरक रक्कम | सेवानिवृत्त सेवकांची बिले तात्काळ तपासून घ्या

| अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश

 पुणे महानगरपालिकेकडील सेवानिवृत्त/ मयत सेवकांचे सातवा वेतन आयोगापोटी देय असलेली फरकाची रक्कम अदा करणेकामी विवरण पत्र तपासणी करून घेण्यात आली नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे अतिरिक्त आयुक्तांनी याबाबत आदेश देत आठ दिवसाच्या आता हे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

| असे आहेत आदेश

पुणे महानगरपालिकेतील सर्व अधिकारी / कर्मचारी यांना सातवा वेतन आयोगानुसार वेतन अदा करण्यात येत आहे. त्यानुषंगाने पुणे महानगरपालिकेकडील सेवानिवृत्त / मयत सेवकांचे सातवा वेतन आयोगापोटी देय असलेली फरकाची रक्कम अदा करणेकामी माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून संगणक प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. त्यानुसार पुणे महानगरपालिकेतील सर्व कार्यालये व क्षेत्रिय कार्यालयांकडील सेवानिवृत्त / मयत सेवकांचे विवरण पत्र तयार करून वेतन ऑडीट विभागामार्फत तपासून घेणे आवश्यक आहे. तथापि आमचे निदर्शनास आले आहे की बरेचसे कार्यालये व क्षेत्रिय कार्यालयांकडील सेवानिवृत्त / मयत सेवकांचे विवरण पत्र अद्यापपर्यंत तपासून घेतलेले नाही याबाबत सेवानिवृत्त सेवकांच्या तक्रारी आमच्याकडे प्राप्त होत आहेत. तरी पुणे महानगरपालिकेतील सर्व कार्यालयांनी सेवानिवृत्त / मयत सेवकांचे विवरण पत्र कार्यालयीन परिपत्रकाच्या दिनांकापासून पुढील आठ दिवसात वेतन-ऑडीट विभागामार्फत तपासून घेण्यात यावे.

| आगामी 4 दिवसात मिळणार फरकाची रक्कम

दरम्यान महापालिका कर्मचारी आणि अधिकारी फरकाच्या रकमेची वाट पाहत आहेत. 20 तारखेला ही रक्कम मिळणे अपेक्षित होते. मात्र ती मिळालेली नाही. याबाबत संगणक विभागाला विचारणा केली असता सांगण्यात आले कि शनिवारी आणि रविवारी कर्मचाऱ्यांनी कामचुकार केल्याने हा उशीर होत आहे. जवळपास 60 बिलांचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित सर्व बिलावर युद्धपातळीवर काम सुरु आहे. आगामी 4 दिवसात कर्मचाऱ्यांना ही रक्कम देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

PMC Pune Recruitment Exam Dates | पुणे महापालिकेतील विविध पदांच्या भरतीसाठी होणाऱ्या परीक्षेच्या तारखा जाणून घ्या 

Categories
Breaking News PMC पुणे

पुणे महापालिकेतील विविध पदांच्या भरतीसाठी होणाऱ्या परीक्षेच्या तारखा जाणून घ्या

| परीक्षा प्रवेशपत्र वेबसाईट वरून डाउनलोड करून घ्यावे लागणार

पुणे | पुणे महापालिकेत विविध खात्यात विविध पदांची भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने अर्ज मागवले होते. आता परीक्षा घेणे बाकी आहे. iBPS संस्था यासाठी परीक्षा घेणार आहे. महापालिका प्रशासनाने परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यातील काही तारखा अंतिम आहेत तर काही तारखा या संभाव्य आहेत.
सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांच्या माहितीनुसार कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) आणि कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) या पदासाठी 26 सप्टेंबर ला परीक्षा घेण्यात येणार आहे. ही तारीख अंतिम आहे. याचे जाहीर प्रकटन देखील देण्यात आले आहे. शिवाय याची माहिती उमेदवारांना देखील देण्यात आली आहे.
तर काही पदांच्या परीक्षाही लवकरच घेण्यात येणार आहेत. त्यासाठी तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत; मात्र या तारखा संभाव्य आहेत. यामध्ये कनिष्ठ अभियंता (सिव्हिल इंजिनियर) या पदासाठी 3 ऑक्टोबर ला परीक्षा होण्याची शक्यता आहे तर 4 ऑक्टोबर ला सकाळच्या सत्रात सहायक अतिक्रमण निरीक्षक या पदासाठी तर दुपारच्या सत्रात सहायक विधी अधिकारी पदासाठी परीक्षा होईल.
याची माहिती उमेदवारांना 7 दिवस अगोदर दिली जाईल. उमेदवारांना परीक्षा प्रवेशपत्र वेबसाईट वरून डाउनलोड करून घ्यावे लागणार आहे. याची सर्व माहिती प्रशासनाकडून उमेदवारांना इ मेल आणि मेसेज च्या माध्यमातून दिली जाणार आहे.
पुणे महापालिकेत विविध खात्यातील 448 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-२ व गट ३ मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यासाठी 20 जुलै ते 10 ऑगस्ट या कालावधीत अर्ज मागवण्यात आले होते. मात्र यासाठी महापालिकेला उमेदवारांचा अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसला नाही. कारण 10 ऑगस्ट पर्यंत महापालिकेकडे 87 हजार 471 अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये सर्वात जास्त अर्ज लिपिक टंकलेखक (श्रेणी 3) पदासाठी 63948 दाखल झाले आहेत.
महापालिकेत प्रशासकीय, अभियांत्रिकी, तांत्रिक व विधी सेवेमधील पदे भरण्यासाठी जाहिरात देण्यात आली होती. 2014 सालापासून महापालिकेत भरती झाली नव्हती. त्यामुळे भरती निघाल्यानंतर उमेदवारांच्या उड्या पडतील आणि लाखों अर्ज दाखल होतील. अशी महापालिका प्रशासनाला अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात 93 हजार 991 उमेदवारांची नोंदणी झाली आहे तर त्यापैकी 87 हजार 471 उमेदवारांचे शुल्क सहित अर्ज दाखल झाले आहेत.

Water Budget | PMC Pune | जलसंपदा विभाग पुणे मनपाला देणार फक्त 12.41 TMC पाणी!  | वॉटर बजेट च्या माध्यमातून महापालिकेने मागितले होते 20.34 TMC 

Categories
Breaking News PMC social पुणे

जलसंपदा विभाग पुणे मनपाला देणार फक्त 12.41 TMC पाणी!

| वॉटर बजेट च्या माध्यमातून महापालिकेने मागितले होते 20.34 TMC

पुणे | पुणे महापालिका हद्दीत 34 गावांचा झालेला समावेश आणि दरवर्षी वाढणारी लोकसंख्या गृहीत धरता शहराला आता 20.34 टीएमसी पाण्याची आवश्यकता लागणार आहे. पुणे महापालिकेने पाण्याचे अंदाजपत्रक अर्थात वॉटर बजेट सादर करत ही मागणी केली आहे. सद्यस्थितीत शहराला जलसंपदा विभागाकडून 14.61 टीएमसी पाणी आरक्षित केले गेले आहे. जलसंपदा विभाग पाण्याचा कोटा किती मंजूर करणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार होते. त्यानुसार जलसंपदाविभागाने महापालिकेला पत्र पाठवत 2022-23 वर्षासाठी फक्त 12.41 TMC पाणी मंजूर केले आहे. महापालिकेला वर्षाला 20 टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. जास्तीचे पाणी हवे असेल तर त्यासाठी तीन पट दर द्यावा लागेल, असे ही जलसंपदा विभागाने म्हटले आहे. मात्र जलसंपदा विभागाच्या या भूमिकेने आता पुणे महापालिकेची चांगलीच अडचण वाढली आहे.
सन २०२२ – २०२३ मध्ये पुणे महानगरपालिकेसाठी आवश्यक वार्षिक पाण्याचे अंदाजपत्रक महाराष्ट्र राज्य जलसंपत्ती नियमन प्राधिकरण मुंबई यांचे निर्देशानुसार तयार करण्यात आले  आहे. सन २०१९ मध्ये पुणे महानगरपालिकेकडून आधार नोंदणी व इतर साधनांव्दारे माहिती संकलीत करण्यात आली असून पुणे शहराची लोकसंख्या एकूण ५२,०८,४४४ इतकी निश्चित झाली होती व संदर्भान्वये वार्षिक २% वाढ गृहीत धरुन ५४,१८,८६४ इतक्या लोकसंख्येसाठी सन २०२१-२०२२ चे पाण्याचे अंदाजपत्रक देण्यात आले होते. सन २०२२ मध्ये या लोकसंख्येमध्ये २% वाढ गृहीत धरण्यात आली आहे त्यानुसार होणाऱ्या ५५, २७, २४१ या लाकसंख्येस १५० एल.पी.सी. डी. प्रमाणे तसेच महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या ११ गावांची लोकसंख्या (२९२८५७) तसेच नव्याने समाविष्ठ झालेल्या २३ गावांच्या लोकसंख्येस (८०००००) ७० एल.पी.सी. डी. प्रमाणे पाण्याची मागणी करण्यात आलेली आहे. ही लोकसंख्या 69 लाख 41 हजार 460 होत आहे. त्यानुसार ही मागणी करण्यात आली आहे. शहराला आता 20.34 टीएमसी पाण्याची आवश्यकता लागणार आहे. यामध्ये 35% पाणी गळती गृहीत धरण्यात आली आहे.

– जलसंपदा ने फक्त 12.41 TMC कोटा मंजूर केला

पुणे महानगरपालिकेने स मा. म.ज.नि.प्रा. मुंबई यांनी संदर्भ- ५ अन्वये दिलेल्या विहित नमुन्यात पुणे म.न.पा.च्या लोकसंख्येच्या पाणीवापराच्या वर्गवारीनुसारच्या निकषाप्रमाणे (उदा. Regular household water supply, community stand Posts, Water Provided through Tankers, Floating Population (With and without bathing facility), Village water Supply Outside corporation limits thr. Stand post and piped water supply etc.) तसेच
औद्योगिक पाणी मागणी इत्यादी तपशिलासह पुणे म.न.पा.ने वार्षिक पाणी वापराचे अंदाजपत्रक (Water budget) सादर केलेले आहे. पुणे महानगरपालिकेने  सादर केलेल्या सन २०२२-२३ च्या वार्षिक पाणी वापराच. अंदाजपत्रकानुसार (Water budget) व म.ज.नि.प्रा. मुंबई यांचेकडील निर्धारीत मापदंडानुसार पुणे महानगरपालिकेस बिगर
सिंचनाचा पाण्याचा हक्क (Bulk Water Entitlement)  वार्षिक १२.४१ टीएमसी (९६२.७३ एमएलडी) परिगणित होत आहे. पुणे महानगरपालिकेने गृहीत धरलेल्या लोकसंख्येसाठी आवश्यक आधार (proof) सादर केलेले नाहीत, तथापी सदर लोकसंख्या मा. आयुक्त, पुणे म.न.पा.यांनी प्रमाणित केली आहे. पुणे म.न.पा. च्या वाढीव हद्दीत नव्याने समाविष्ट असलेल्या ग्रामपंचायती तसेच पाणीपुरवठा योजनांसाठी ४९.७७१३ दलघमी (१.७६ TMC) पिण्यासाठी बिगर सिंचन पाणी आरक्षण मंजुर असुन  पुणे म.न.पा. हद्दीत समाविष्ट असलेल्या इतर १८ संस्थाना जलसंपदा विभागामार्फत पिण्यासाठी व औद्योगिक कारणासाठी एकुण १३.६१७३ दलघमी (०.४८ TMC) पाणी आरक्षण मंजुर असुन पुणे म.न.पा. हद्दीतील पाणीपुवठा योजनांसाठी व इतर संस्थासाठी एकुण ६३.३९ दलघमी (२.२३८ TMC) पाणी आरक्षण मंजुर आहे. सदर संस्थांना जलसंपदा विभागामार्फत नविन मुठा उजवा कालव्यामध्ये धरणातुन पाणी सोडुन पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तथापी पुणे म.न.पा. हद्दीतील वरील संस्था असल्यामुळे व त्यांना जलसंपदा
विभागकडुन पाणी पुरवठा होत असल्याने वरील पाणीकोटा ६३.३९ दलघमी (२.२३८ TMC) पुणे म.न.पा.च्या मागणीतून कमी करणेत येत आहे.  शासन निर्णयातील निर्देशानुसार पुणे महानगरपालिकेस सन २०२२-२३ ( कालावधी
दि. १.७.२०२२ ते दि. ३०.६.२०२३) करीता खालील अटींच्या अधीन राहुन पुढीलप्रमाणे बिगर सिंचनाचा पाण्याचा हक्क (Bulk Water Entitlement) मंजुरीस्तव सादर करण्यात येत आहे.

या असतील अटी –

१. पुणे महानगरपालिकेने वरील पाणीवापराच्या मर्यादेतच वार्षिक पाणी वापर करणे बंधनकारक राहील.
२.  महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने पाणी वापरासंदर्भातील निर्देश/अटी पालन करण्याची जबाबदारी पुणे महानगरपालिकेवर राहील.
३. खडकवासला धरणातुन पाणी घेण्याची पुणे महानगरपालिकेची स्वतंत्र यंत्रणा ( पंप हाऊस, जॅकवेल, Gravity valve इ.) असल्यामुळे महानगरपालिकेच्या पाणीवापरावर जलसंपदा विभागामार्फत नियंत्रण
करता येत नाही. यास्तव मा. प्राथमिक विवाद निवारण अधिकारी तथा  मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, पुणे यांनी दिलेल्या आदेशानुसार पुणे महानगरपालिकेने पाणी घेण्याची यंत्रणा/ठिकाण कार्यकारी
अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग, पुणे यांचे ताब्यात देण्यात यावी.
४. पुणे महानगरपालिकेने वरील मंजुर पाणीकोट्याच्या मर्यादेमध्ये पाणी वापर करावा. या मर्यादेपेक्षा जादा पाणी वापरल्यास उन्हाळ्यात पिण्यासाठी व सिंचनासाठी टंचाई परिस्थिती निर्माण होऊ शकते. तसेच यामुळे मा.न्यायालयीन/मा.म.ज.नि.प्रा. कडील प्रकरणे उद्भवु शकतात. तरी पुणे महानगरपालिकेने महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने विहित केलेल्या मापदंडाच्या मर्यादेमध्ये पाणी वापर ठेवणे आवश्यक राहील.
5. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे दि. १७.१२.२०१८ चे आदेशानुसार खडकवासला धरणातून वार्षिक पाणी वापर ११.५० टीएमसी इतक्या मर्यादेतच करण्याचे निर्देश आहेत व उर्वरित पाणीवापर हा
पवना, भामा आसखेड धरणातून होणे आवश्यक आहे. याअनुषंगाने खडकवासला धरणातून ११.५०TMC या मर्यादेतच वार्षिक पाणी वापर करणे पुणे म.न.पा.स बंधनकारक राहील.
६. पुणे म.न.पा.स खडकवासला धरणातून ११.५० TMC वार्षिक पाणी आरक्षण मंजूर आहे. तथापि पुणे म.न.पा. खडकवासला धरण व कालव्याद्वारे दैनंदिन जवळपास १५८७ MLD (वार्षिक २०.४५ TMC) इतका होत आहे.
याअनुषंगाने पुणे म.न.पा.स खडकवासला धरणातून ११.५० TMC च्या मर्यादेत पाणीवापर करणेबाबत म.ज.नि.प्रा.चे आदेश आहेत. परंतु पुणे म.न.पा. या मर्यादेपेक्षा जवळपास वार्षिक ९.३४ TMC इतका जादा पाणीवापर करीत आहे. तसेच जलसंपदा विभागाने सांडपाणी नदीत सोडण्यावरूनही महापालिकेला आरोपी ठरवले आहे.

Water Closure | Pune | शहरात गुरुवारी पाणीपुरवठा बंद 

Categories
Breaking News PMC social पुणे

शहरात गुरुवारी पाणीपुरवठा बंद

गुरूवार दिनांक २२/०९/२०२२ रोजी पर्वती MLR टाकी परिसर, पर्वती HLR टाकी परिसर, पर्वती LLR षरिसर व चिखली पंपिंग येथील विद्युत/पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम असल्या कारणामुळे अत्यावश्यक देखभाल दुरूस्तींचे कामांसाठी उपरोक्त पंपींगचे
अखत्यारीतील पूर्ण दिवसाचा सदर दिवशीचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवार दिनांक २३/०९/२०२२ रोजी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

पाणी पुरवठा बंद असणारा भाग-

पर्वती MLR टाकी परिसर :-
 गुरुवार पेठ, बुधवार पेठ, काशेवाडी, क्वार्टरगेट परिसर, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहिया नगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडीयम परिसर, घोरपडे पेठ इ.
पर्वती HLR टाकी परिसर :-
 सहकार नगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर काही भाग, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणी नगर भाग – १ व २ लेक टाऊन, शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, शेळकेवस्ती महेश सोसायटी, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, आंबेडकरनगर डायस प्लॉट,
ढोलेमळा, सॅलेसबरी पार्क, गरीधरभवन चौक, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण, भाग्योदयनगर, शिवनेरीनगर, मिठानगर, कुमार पृथ्वी, स.नं.४२ कोंढवा खुर्द, साईबाबानगर, इत्यादी.
पर्वती LLR परिसर – 
शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परीसर, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजी नगर परिसर, स्वारगेट परिसर.
चिखली पंपिंगवर अवलंबून असणारा भाग-
संजय पार्क, बर्माशेल सोसायटी, पुणे एअरपोर्ट, राजीव गांधी नगर नॉर्थ व साऊथ, यमुनानगर, गणेशनगर (बोपखेल), कळस काही भाग, म्हस्के वस्ती, टिंगरेनगर गल्ली नं.१ ते ६, एकतानगर झोपडपट्टी, सिध्देश्वर, कुमार समृध्दी, प्री पार्क सोसायटी, पराशर सोसायटी, ठुबे पठारे वस्ती, दिनकर पठारे वस्ती इत्यादी.

EPFO | तुम्ही नोकऱ्या बदलल्या असतील किंवा बदलणार असाल, तर EPFO ​​मधून बाहेर पडण्याची तारीख अपडेट करायला विसरू नका | संपूर्ण प्रक्रिया येथे पहा

Categories
Breaking News Commerce Education social देश/विदेश लाइफस्टाइल

तुम्ही नोकऱ्या बदलल्या असतील किंवा बदलणार असाल, तर EPFO ​​मधून बाहेर पडण्याची तारीख अपडेट करायला विसरू नका | संपूर्ण प्रक्रिया येथे पहा.

 EPFO मधून बाहेर पडण्याची तारीख: जर तुम्ही तुमची नोकरी अलीकडेच बदलली असेल किंवा येत्या काही दिवसांत बदलणार असाल, तर तुम्हाला तुमच्या एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (EPFO) खात्यात लक्षणीय बदल करणे आवश्यक आहे.  वास्तविक, जेव्हा एखादी व्यक्ती नोकरी किंवा नोकरी बदलते तेव्हा त्याला त्याच्या EPF खात्यावर जावे लागते आणि नोकरी सोडण्याची तारीख म्हणजेच बाहेर पडण्याची तारीख आणि नोकरी सोडण्याचे कारण अपडेट करावे लागते.
 EPFO मधून बाहेर पडण्याची तारीख: जर तुम्ही तुमची नोकरी अलीकडेच बदलली असेल किंवा येत्या काही दिवसांत बदलणार असाल, तर तुम्हाला तुमच्या एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (EPFO) खात्यात महत्त्वपूर्ण बदल करणे आवश्यक आहे.  वास्तविक, जेव्हा एखादी व्यक्ती नोकरी किंवा नोकरी बदलते तेव्हा त्याला त्याच्या EPF खात्यावर जावे लागते आणि नोकरी सोडण्याची तारीख म्हणजेच बाहेर पडण्याची तारीख आणि नोकरी सोडण्याचे कारण अपडेट करावे लागते.  आम्ही तुम्हाला सांगतो की पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी बाहेर पडण्याची तारीख अपडेट करणे खूप महत्वाचे आहे.  तुम्ही असे न केल्यास तुमच्या पीएफ खात्यातून पैसे काढता येणार नाहीत.

 आता कर्मचारी स्वत: बाहेर पडण्याची तारीख अपडेट करू शकतात

 EPFO ने देशात काम करणाऱ्या करोडो लोकांना एक अतिशय खास सुविधा दिली आहे, ज्या अंतर्गत तुम्ही तुमच्या EPF खात्यातून बाहेर पडण्याची तारीख स्वतः अपडेट करू शकता.  यापूर्वी, केवळ नियोक्ते किंवा कंपन्या त्यांच्या नोकऱ्या सोडलेल्या कर्मचार्‍यांच्या बाहेर पडण्याची तारीख अपडेट करत असत.  येथे आम्ही तुम्हाला EPFO ​​मधून बाहेर पडण्याची तारीख अपडेट करण्याचा एक सोपा मार्ग सांगणार आहोत.  यासाठी, तुम्हाला फक्त काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील, त्यानंतर तुमच्या EPF खात्यामध्ये तुमच्या जुन्या कंपनीतून बाहेर पडण्याची तारीख अपडेट केली जाईल.

 EPFO मध्ये बाहेर पडण्याची तारीख अपडेट करण्यासाठी चरण-दर-चरण प्रक्रिया

 EPFO मधून बाहेर पडण्याची तारीख अपडेट करण्यासाठी, तुम्हाला प्रथम EPF वेबसाइट www.unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ ला भेट द्यावी लागेल.
 वेबसाइटला भेट दिल्यानंतर तुम्हाला तुमचा 12 अंकी UAN नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल.
 यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक नवीन विंडो उघडेल.  आता या नवीन विंडोवर तुम्हाला वरती हिरवी पट्टी दिसेल, जिथे तुम्हाला Manage लिहिलेले दिसेल.
 मॅनेजवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आणखी काही पर्याय दिसतील, जिथे तुम्हाला मार्क एक्झिटवर क्लिक करावे लागेल.
 Mark Exit वर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज उघडेल.  या पृष्ठावर, तुम्हाला वरच्या बाजूला सिलेक्ट एम्प्लॉयमेंट वर जावे लागेल आणि तुम्ही जिथे नोकरी सोडली आहे ती कंपनी निवडावी लागेल.
 कंपनी निवडल्यानंतर, नोकरी सोडण्याची तारीख आणि कारण टाकावे लागेल.  यासोबतच तुम्हाला रिक्वेस्ट ओटीपीवर क्लिक करावे लागेल.
 रिक्वेस्ट ओटीपीवर क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल.
 आता हा ओटीपी एंटर आधार आधारित ओटीपीच्या समोरील बॉक्समध्ये टाकावा लागेल.
 OTP टाकल्यानंतर, मला खालील मुद्दे काळजीपूर्वक वाचावे लागतील, चेकबॉक्सवर क्लिक करा.
 चेकबॉक्सवर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला खाली जाऊन Submit वर क्लिक करावे लागेल.  सबमिट वर क्लिक केल्यानंतर, तुमच्या स्क्रीनवर एक अलर्ट दिसेल, जिथे तुम्हाला अपडेट वर क्लिक करावे लागेल.

EPFO | प्रत्येक EPFO ​​सदस्याला 7 लाखांपर्यंतचे विमा संरक्षण मिळते | जाणून घ्या त्याचा फायदा कधी आणि कसा होतो?

Categories
Breaking News Commerce Education social देश/विदेश

EPFO: प्रत्येक EPFO ​​सदस्याला 7 लाखांपर्यंतचे विमा संरक्षण मिळते | जाणून घ्या त्याचा फायदा कधी आणि कसा होतो?

 EPFO ने 1976 मध्ये सुरू केलेल्या EDLI योजनेचा उद्देश, EPFO ​​सदस्याचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत करणे हा होता.
 एम्प्लॉईज डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स ही EPFO ​​द्वारे चालवली जाणारी विमा योजना आहे, जी EPFO ​​मध्ये नोंदणीकृत प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी चालवली जाते.  या योजनेअंतर्गत 7 लाखांपर्यंतचे विमा संरक्षण दिले जाते.  ही योजना ईपीएफ आणि ईपीएसच्या संयोजनाने कार्य करते.  याची माहिती प्रत्येकासाठी असणे गरजेचे आहे, कारण नोकरीदरम्यान एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या नॉमिनीला या योजनेअंतर्गत 7 लाखांपर्यंतची आर्थिक मदत मिळू शकते.  एम्प्लॉईज डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्सबद्दल जाणून घेऊया.

 EDLI योजनेत दरमहा योगदान दिले जाते

 EPFO ने 1976 मध्ये सुरू केलेल्या EDLI योजनेचा उद्देश, EPFO ​​सदस्याचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत करणे हा होता.  EDLI अंतर्गत विम्याची रक्कम मागील 12 महिन्यांच्या पगारावर अवलंबून असते.  दरमहा, कर्मचार्‍यांच्या पगारातून जमा केलेल्या PF रकमेपैकी 8.33% EPS, 3.67% EPF आणि 0.5% EDLI योजनेत जाते.  सामान्यतः लोकांना पीएफ पैसे आणि पेन्शन योजनेबद्दल माहिती असते, परंतु EDLI योजना माहिती नसते.

 EDLI शी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी

 नामनिर्देशित किंवा कायदेशीर वारस किंवा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी सदस्याच्या कुटुंबातील सदस्याला सेवेत असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास कमाल 7 लाख रुपयांचा विमा लाभ मिळतो.
 जर EPFO ​​सदस्य 12 महिने सतत काम करत असेल, तर कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर, नॉमिनीला किमान 2.5 लाखांचा फायदा मिळेल.
 EPFO सदस्य जोपर्यंत नोकरी करत आहे तोपर्यंतच तो EDLI योजनेद्वारे कव्हर केला जातो.  नोकरी सोडल्यानंतर त्याचे कुटुंब/वारस/नॉमिनी त्यावर दावा करू शकत नाहीत.
 EDLI मध्ये 0.5% चे योगदान कंपनीच्या वतीने केले जाते, ते कर्मचार्‍यांच्या पगारातून कापले जात नाही.  एम्प्लॉइज डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्समध्ये, कर्मचार्‍यांचे नामांकन नैसर्गिकरित्या होते.
 नॉमिनीला कोणतीही अडचण येत नाही हे लक्षात घेऊन, विम्याची रक्कम थेट त्याच्या खात्यात हस्तांतरित केली जाते.

Vedanta Foxconn Project | खुर्चीत बसले की मुख्यमंत्री होत नाही, त्यासाठी जबाबदारी स्विकारावी लागते | खासदार सुप्रिया सुळे यांचा टोला

Categories
Breaking News Commerce Political पुणे महाराष्ट्र

 खुर्चीत बसले की मुख्यमंत्री होत नाही, त्यासाठी जबाबदारी स्विकारावी लागते

|खासदार सुप्रिया सुळे यांचा टोला

पुणे – वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यामुळे राज्यातील सुमारे अडिच ते तीन लाख तरुणांच्या रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तळेगाव येथील जागा वेदांता कंपनीने निश्चित केली होती. ती कशामुळे गेली याचे उत्तर राज्यातील सत्ताधाऱ्यांना द्यावे लागेल. केवळ खुर्चीमध्ये बसणे आणि हार-तुरे स्विकारणे म्हणजे सर्व काही मिळविले असे नसते तर त्या पदाची जबाबदारी देखील घ्यावी लागते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता सिरियस होण्याची गरज आहे, असे खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सुनावले.

पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सलग दुसऱ्या दिवशी वेदांता-फॉक्सकॉन कंपनी राज्याबाहेर गेल्याचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी *‘महाराष्ट्र को क्या मिला, लॉलीपॉप लॉलीपॉप’ * अशा जोरदार घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिल्या. यावेळी माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टिकेची तोफ डागली. त्या म्हणाल्या की, वेदांता व फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्ही तुम्हाला याच्यापेक्षा मोठा प्रकल्प देऊ अशा प्रकारचे लॉलीपॉप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.केंद्र आणि राज्य सरकार केवळ जनतेस लॉलीपॉप दाखवत असून कोणत्याही आश्वासनाची पूर्तता करण्यात येत नाही. लहान मुलांना ज्या प्रकारे समजूत काढण्यासाठी आश्वासन दिले जाते तसेच लॉलीपॉप सरकार जनतेस देत आहे. राज्याच्या हितासाठी सरकारने काम करणे अपेक्षित आहे. केंद्र सरकारमध्ये गुजरातमधील वजनदार नेते असून आगामी गुजरात विधानसभा निवणुकीपूर्वी मताचा जोगवा पदरात पाडून घेण्यासाठी वेदांता प्रकल्प हलविण्यात आला आहे.

यावेळी प्रवक्ते प्रदीप देशमुख म्हणाले, महाराष्ट्रातला हक्काचा वेदांत ग्रुपचा प्रकल्प गुजरात मध्ये गेलेला आहे. मात्र, त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात रोजगार यावा यादृष्टीने प्रयत्न करताना दिसत नाही. केंद्र सरकारशी चांगला संवाद असल्याचे सांगणारे सत्ताधारी प्रत्यक्षात मात्र रोजगार आणण्यात अपयशी ठरले आहेत. गुजरात देखील भारताचेच एक राज्य आहे . तेथील जनता देखील आपलीच आहे. पण केंद्रातील सत्ताधारी जाणीवपूर्वक महाराष्ट्राला पाण्यात बघत असून गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातून अनेक महत्वाची कार्यालये आणि प्रकल्प गुजरातला हलविण्यात आले असून यामागे विशिष्ट शक्ती किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच शब्दांत सांगायचे झाले तर अदृश्य शक्तीशाली हात आहे. मुख्यमंत्री हे अतिशय स्वाभिमानी आहेत असे आम्हाला सांगितले जाते.त्यांनी आपला स्वाभिमानी मराठी बाणा जागृत करुन केंद्र सरकारला या कृत्याचा जाब विचारावा आणि हा प्रकल्प महाराष्ट्रातच होईल यासाठी प्रयत्न करावेत असा सल्लाही देशमुख यांनी दिला.

यावेळी प्रवक्ते प्रदीप देशमुख, राजू साने , प्रदीप गायकवाड , महेश शिंदे , बाळासाहेब आहेर , सौ.सरीता काळे , कार्तीक थोटे , सौ.जयश्री त्रिभुवन .सौ.धनश्री कराळे सौ.निता गायकवाड, राजू खांदवे , सौ मंजुश्री गव्हाने व इतर प्रमुख मोठेया संख्येने उपस्थित होते.

Property Tax collection | मिळकतकर वसुलीसाठी 75 अतिरिक्त कर्मचाऱ्यांची फौज  | अतिरिक्त आयुक्तांचे आदेश 

Categories
Breaking News PMC पुणे

मिळकतकर वसुलीसाठी 75 अतिरिक्त कर्मचाऱ्यांची फौज

| अतिरिक्त आयुक्तांचे आदेश

पुणे | महापालिकेच्या मिळकतकर विभागावर प्रशासनाने चांगलेच लक्ष दिले आहे. मागील काही दिवसात आयुक्तांनी गंभीरपणे लक्ष देत जास्तीत जास्त वसुली करण्याचे आदेश दिले होते. यावेळी विभागाने अतिरिक्त कर्मचाऱ्यांची फौज मागितली होती. त्यानुसार खात्याला विविध विभागातील 75 अतिरिक्त कर्मचारी देण्यात आले आहेत. महापालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी हे आदेश जारी केले आहेत.
महापालिकेचा मिळकतकर विभाग हा उत्पन्नाचा प्रमुख स्रोत मानला जातो. त्यामुळे या विभागाकडे नेहमीच लक्ष दिले जाते. चालू आर्थिक वर्षात विभागाला 2200 कोटी उत्पनाचे उद्दिष्ट्य देण्यात आले आहे. विभागाकडून आतापर्यंत 1200-1300 कोटी वसूल करण्यात आले आहेत. यावर महापालिका आयुक्त समाधानी नव्हते. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी विभागाला वसुलीसाठी नियोजन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार विभागाने आपले नियोजन सादर केले होते. यामध्ये अतिरिक्त कर्मचाऱ्यांची कुमक देखील मागवली होती. त्यानुसार खात्याला विविध विभागातील 75 अतिरिक्त कर्मचारी देण्यात आले आहेत. महापालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी हे आदेश जारी केले आहेत.