Gratuity | GR | सेवेत असताना कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला निवृत्तीवेतन देण्याचा सरकारचा निर्णय 

Categories
Breaking News Education social पुणे महाराष्ट्र

Gratuity | GR | सेवेत असताना कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला निवृत्तीवेतन देण्याचा सरकारचा निर्णय

| राज्य सरकारने शासन निर्णय जारी केला

Gratuity | GR | ०१.११.२००५ रोजी व त्यानंतर राज्यातील जिल्हा परिषदा (Zilla Parishad) तसेच, मान्यता प्राप्त खाजगी १००% अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील १००% अनुदानित पदावरील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी (Teacher) जो परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा (CPC)  सदस्य आहे  अशा शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला निवृत्तीवेतन तसेच मृत्यू उपदान दिले जाणार आहे. राज्य सरकारच्या वतीने याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. (Gratuity GR)

असा आहे शासन निर्णय –

दिनांक ०१.११.२००५ रोजी व त्यानंतर राज्यातील जिल्हा परिषदा तसेच, मान्यता प्राप्त खाजगी १००% अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील १००% अनुदानित पदावरील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी जो परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा सदस्य आहे अशा –
(अ) शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याचा सेवेत असतांना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यू उपदान,
(ब) रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान लागू करण्यात येत आहे. त्यानुसार सदर कुटुंब निवृत्तिवेतनधारकास व रुग्णता निवृत्तिवेतनधारकास महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ मधील तरतुदीप्रमाणे कुटुंब निवृत्तिवेतन / रुग्णता निवृत्तिवेतन लागू होईल.
(क) तसेच १००% अनुदानित शाळेतील सेवेतून निवृत्त होणाऱ्या शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान लागू करण्यात येत आहे.
दिनांक १ नोव्हेंबर, २००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणा-या कर्मचा-यांसाठी नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना  येथील शासन निर्णयान्वये अंमलात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपध्दती  शासन निर्णयान्वये ठरविण्यात आली आहे. राज्यातील मान्यता प्राप्त खाजगी १००% अनुदानित प्राथमिक, माध्यमिक/उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील १००% अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती  शासन निर्णयान्वये ठरविण्यात आली आहे.
शासन निर्णयान्वये जिल्हा परिषदेकडील शिक्षण विभागात शिक्षकांसाठी नवीन परिभाषित अंशदान  निवृत्तीवेतन योजना लागू करण्यात आली आहे. सदर योजना केंद्राच्या धर्तीवर राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत  शासन निर्णय अन्वये समाविष्ट केलेली आहे. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदा, मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना लागू असलेली परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (DCPS) केंद्राच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत (NPS) समाविष्ट करण्याची कार्यपद्धती शासन निर्णय अन्वये विहीत केली आहे.
परिभाषित अंशदान निवृत्तिवेतनयोजना / राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतनाचे अंशराशीकरण) नियम, १९८४ व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधीचे लाभ अनुज्ञेय ठरत नाहीत. तदनंतर केंद्र शासनाच्या संदर्भ क्र.११ येथील Central Civil Services (Implementation of National Pension System) Rules, २०२१ दिनांक ३०.०३.२०२१ अन्वये केंद्र शासनाच्या सेवेतील राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांना सेवेत कार्यरत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबास कुटुंब निवृत्तिवेतन अथवा रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचान्यास रुग्णता निवृत्तिवेतन अनुज्ञेय केले आहे. तसेच केंद्र शासनाच्या संदर्भ क्र. १२ येथील Central Civil Services (Payment of Gratuity under National Pension System) Rules, २०२१ दिनांक २३.०९.२०२१ अन्वये केंद्र शासनाच्या सेवेतील राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंर्तगत कर्मचाऱ्याचा सेवेत कार्यरत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला मृत्यू उपदान, रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यास सेवानिवृत्ती
उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान अनुज्ञेय केले आहे.
केंद्र शासनाच्या वरील निर्णयाच्या धर्तीवर राज्य शासनाच्या सेवेतील परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या
कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवा उपदान तसेच सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा उपदान मंजूर करणेबाबतची कार्यपध्दती  वित्त विभागाच्या शासन निर्णयान्वये विहीत केली आहे. सदर तरतूद राज्यातील जिल्हा परिषदा तसेच, मान्यता प्राप्त खाजगी १००% अनुदानित प्राथमिक, माध्यमिक / उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील १००% अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेत्तर पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी लागू राहील. मात्र याबाबत स्वतंत्र आदेश संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी निर्गमित करण्याबाबतची कार्यवाही त्यांच्या
स्तरावरुन करावी. या सूचनेस अनुसरुन राज्यातील जिल्हा परिषदा, मान्यता प्राप्त खाजगी १००% अनुदानित प्राथमिक, माध्यमिक / उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील १००% अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत स्वतंत्र आदेश करण्याची बाब शासनाच्या
विचाराधीन होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
News Title | Gratuity | GR | Government’s decision to provide pension to the family of an employee who dies while in service

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी | जुलैमध्ये DA सोबत याचाही लाभ मिळणार

Categories
Breaking News Commerce social देश/विदेश

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी | जुलैमध्ये DA सोबत याचाही लाभ मिळणार

 7th Pay Commission | केंद्रीय कर्मचारी (Central Government employees) जुलैची वाट पाहत आहेत.  जुलैमध्ये पुन्हा एकदा महागाई भत्त्यात (Dearness Allowance) वाढ होणार आहे.  यामुळे त्याच्या पगारात (Salary) मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.  पण, त्याचा आनंद एवढ्यापुरताच मर्यादित नाही.  महागाई भत्त्यात वाढ झाल्याने इतर भत्त्यांमध्येही वाढ होणार आहे.  जुलै 2023 पासून त्याचा थेट फायदा कर्मचाऱ्यांपासून निवृत्तीवेतनधारकांना मिळणार आहे.  यात प्रवास भत्ता (Travel Allowance) आणि सिटी भत्ता (City Allowance) यांचाही समावेश आहे.  याशिवाय केंद्रीय कर्मचार्‍यांना भविष्य निर्वाह निधी (Provident Fund) आणि ग्रॅच्युइटीमध्येही (Gratuity) मोठी वाढ मिळणार आहे. (7th Pay commission)
 केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ४२ टक्क्यांवरून ४६ टक्क्यांपर्यंत वाढू शकतो.  म्हणजे त्यात ४ टक्क्यांनी वाढ होऊ शकते.  तज्ज्ञांच्या मते, वाढत्या डीएचा परिणाम टीए अर्थात प्रवास भत्त्यावरही होईल.  जेव्हा DA 46 टक्के असेल तेव्हा TA देखील थेट वाढेल.

 भविष्य निर्वाह निधीची व्याप्ती वाढेल (provident Fund)

 तज्ज्ञांच्या मते, केंद्रीय कर्मचाऱ्यांनाही सेवानिवृत्तीचे फायदे मिळत आहेत.  महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे त्यांचा पगार वाढणार असून मासिक भविष्य निर्वाह निधी आणि ग्रॅच्युइटीही वाढणार आहे.  हे दोन्ही घटक बेसिक + डीए वरून मोजले जातात.  डीए वाढला तर पीएफ, ग्रॅच्युइटीही वाढेल.  यामध्ये मासिक पीएफ, ग्रॅच्युइटी योगदान वाढेल.

 कर्मचार्‍यांसोबत पेन्शनर्सही लाभ घेतील (Retired Employees)

 केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणार्‍या पेन्शनधारकांच्या महागाई सवलत (DR) देखील वाढेल.  हे फक्त DA शी जोडलेले आहे.  निवृत्तीनंतर, ते महागाई सवलत म्हणून उपलब्ध आहे.  DR देखील 42 टक्क्यांवरून 46 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो.  त्याचे मासिक पेन्शन वाढणार आहे.

 जुलैमध्ये महागाई भत्त्यात प्रचंड वाढ होणार आहे (DA Hike)

 डीएमध्ये पुढील वाढ केवळ जुलै 2023 पासून लागू होईल.  म्हणजे जून २०२३ पर्यंतचा महागाई भत्ता जुलैपासून लागू होईल.  डीएमध्ये ४ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.  यासह ते 46 टक्क्यांपर्यंत वाढू शकते.
——
News Title: 7th Pay Commission : Good News for Central Employees | This will also be availed along with DA in July

Old pension | आत्ता सेवानिवृत्त नंतर मिळेल जुन्या पेन्शन प्रमाणे ग्रॅज्युएटी | आत्ता संघर्ष हा सेवानिवृत्त नंतर मिळणाऱ्या पेन्शन साठी

Categories
Breaking News Political social महाराष्ट्र

आत्ता सेवानिवृत्त नंतर मिळेल जुन्या पेन्शन प्रमाणे ग्रॅज्युएटी

| आत्ता संघर्ष हा सेवानिवृत्त नंतर मिळणाऱ्या पेन्शन साठी

नवीन पेशन योजनेच्या विरोधात संघर्ष करणाऱ्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकाराने काहीसा दिलासा दिला आहे. ज्या कर्मचाऱ्यांचा सेवेत असताना मृत्यू झाला असेल त्याच्या कुटुंबाला आता पेन्शन लागू करण्यात आली आहे. कुटुंब निवृत्ती वेतन व ग्रॅज्युएटी जुन्या पेन्शन प्रमाणेच मिळणार आहे. एखादा कर्मचारी अपंग झाल्यास नोकरी करण्यास असमर्थ झाल्यास सुद्धा जुनी पेन्शन मिळणार आहे. (Old pension)

नवीन पेन्शन म्हणजेच २००५ मध्ये सरकती सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शन योजनेत राज्य सरकाराने अंशतः बदल केले आहेत. केंद्र सरकारच्या धर्तीवर हे बदल करण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेल्या राष्ट्रिय निवृत्ती प्रणालीप्रमाणे राज्य सरकारने दोन अटी स्वीकारल्या आहेत.

या नव्या प्रणाली नुसार राज्य सेवेत २००५ नंतर भरती झालेल्या कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला आता पेन्शन सुरु करण्यात आली आहे. यामध्ये यापूर्वी सानुग्रह अनुदान देण्यात येत होते ते बंद करुन आता मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला पेन्शन देण्यात येईल. तर रुग्णात सेवा निवृत्ती झालेल्या कर्मचाऱ्याला रूग्णता निवृत्तिवेतन तसेच सेवा उपादान योजना लागू करण्यात आली आहे. यांसदर्भातला शासकिय अद्यदेश ३१ मार्च रोजी शासनाने प्रकाशित केला आहे. यात आता सानुग्रह अनुदानाच्या अट रद्द करुन मृत कर्मचारी यांच्या कुटुंबाला निवृत्ती वेतान दिले जाणार आहे.

राज्य शासनाने १ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त झालेल्या आणि अंशदान निवृत्तिवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यू उपदान, रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचान्याला रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवा उपदान लागू करण्यात येत आहे. त्यानुसार या कुटुंब निवृत्तिवेतनधारकास व रुग्णता निवृत्तिवेतनधारकास महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम १९८२ मधील तरतुदीप्रमाणे कुटुंब निवृत्तिवेतन/रुग्णता निवृत्तिवेतन लागू होईल. तसेच शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा उपदान लागू करण्यात येत आहे, असा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे याचा लाभ राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.

राज्याच्या वित्त विभागाच्या शासन निर्णय २००५ व २०१४ अन्वये २००५ रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना अंशदान निवृत्तिवेतन योजना व राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली लागू करण्यात आली आहे. अंशदान निवृत्तिवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम १९८२ महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतनाचे अंशराशीकरण) नियम १९८४ व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधीचे लाभ मात्र त्यांना लागू ठरत नाहीत.

केंद्र शासनाच्या संदर्भ क्र.७ येथील Central Civil Services (Implementation of National Pension System) Rules, २०२१ अन्वये केंद्र शासनाच्या सेवेतील राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत एखाद्या कर्मचाऱ्याचा सेवेत कार्यरत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबास कुटुंब निवृत्तिवेतन अथवा रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यास रुग्णता निवृत्तिवेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कुटुंबाला मृत्यू उपदान, रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यास सेवा उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा उपदान दिले आहे.

केंद्र शासनाच्या या निर्णयाच्या धर्तीवर राज्य शासनाच्या सेवेतील परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवा उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा उपदान मंजूर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

Gratuity Eligibility | नोकरी पाच वर्षांपेक्षा कमी असली तरीही तुम्ही ग्रॅच्युइटीचे पात्र बनता, कसे जाणून घ्या?

Categories
Breaking News Commerce social लाइफस्टाइल

Gratuity Eligibility | नोकरी पाच वर्षांपेक्षा कमी असली तरीही तुम्ही ग्रॅच्युइटीचे पात्र बनता, कसे जाणून घ्या?

 जर कर्मचार्‍याची नोकरी पाच वर्षांपेक्षा कमी परंतु काही महिन्यांची असेल, तरीही तो ग्रॅच्युइटीचा हक्कदार आहे.  ग्रॅच्युइटी कायद्याचे कलम 2A काय म्हणते ते जाणून घ्या.
 ग्रॅच्युइटी हे कंपनीने कर्मचाऱ्याला दिलेले बक्षीस आहे, जे त्याला कंपनीत सतत सेवेच्या बदल्यात दिले जाते.  साधारणपणे असे मानले जाते की पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतरच तुम्ही ग्रॅच्युइटीचे पात्र बनता.  ग्रॅच्युइटीची किमान रक्कम ठरवण्यासाठी एक सूत्र आहे.  परंतु कंपनीची इच्छा असेल तर ती आपल्या कर्मचार्‍यांना विहित सूत्रापेक्षा जास्त रक्कम देऊ शकते.  मात्र, सरकारी नियमांनुसार कर्मचाऱ्याला 20 लाखांपेक्षा जास्त ग्रॅच्युइटी देता येत नाही.  पण अशा परिस्थितीत अनेकांना प्रश्न पडतो की, जर त्यांची नोकरी पूर्ण पाच वर्षांसाठी नसेल, त्यापेक्षा कमी असेल, तर त्यांना ग्रॅच्युइटी मिळण्याचा अधिकार आहे का?  याविषयी आम्ही तुम्हाला सांगतो.

 ग्रॅच्युइटी कायदा काय म्हणतो

 ग्रॅच्युइटी कायद्याच्या कलम 2A नुसार, तुम्ही 5 वर्षे सेवा पूर्ण केली नसली तरीही, तुम्ही ग्रॅच्युइटीचे हक्कदार होऊ शकता.  ग्रॅच्युइटी कायद्याच्या कलम 2A मध्ये असे म्हटले आहे की भूमिगत खाणींमध्ये काम करणारे कर्मचारी जे सलग 4 वर्षे आणि 190 दिवस कंपनीत काम करतात, त्यानंतर त्यांना ग्रॅच्युइटी मिळण्यास पात्र मानले जाते.  दुसरीकडे, इतर संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी 4 वर्षे 240 दिवस म्हणजेच 4 वर्षे 8 महिने सेवा पूर्ण केल्यास ते ग्रॅच्युइटी मिळण्यास पात्र असतील.

 सूचना कालावधी देखील मोजला जाईल

 या कालावधीत तुमचा नोटिस कालावधी देखील मोजला जातो हे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे.  म्हणजेच, जर एखादा कर्मचारी नोटीस कालावधीसह 4 वर्षे आणि 240 दिवस सेवा पूर्ण करत असेल, तर त्याला ग्रॅच्युइटी मिळण्याचा अधिकार कायम आहे.  नोटीस कालावधी देखील सतत सेवेमध्ये मोजला जातो.

 ग्रॅच्युइटी या सूत्राने मोजली जाते

 ग्रॅच्युइटीची गणना करण्यासाठी एक सूत्र आहे – (शेवटचा पगार) x (कंपनीमध्ये काम केलेल्या वर्षांची संख्या) x (15/26).  शेवटचा पगार म्हणजे तुमच्या शेवटच्या 10 महिन्यांच्या पगाराची सरासरी.  या पगारात मूळ वेतन, महागाई भत्ता आणि कमिशन समाविष्ट आहे.  महिन्यातील रविवारचे 4 दिवस आठवड्याची सुट्टी असल्याने, 26 दिवस मोजले जातात आणि 15 दिवसांच्या आधारे ग्रॅच्युइटी मोजली जाते.
  अशा स्थितीत हा कालावधी पूर्ण ५ वर्षे मानला जातो.